✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

ध
धर्मराजमुटके यांनी
Tue, 08/20/2013 - 09:48  ·  लेख
लेख
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित ! डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
52214 वाचन

💬 प्रतिसाद (222)

प्रतिक्रिया

दाभोळकरांच्या भ्याड हत्येचा

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 16:48 नवीन
दाभोळकरांच्या भ्याड हत्येचा अन कोणताही पुरावा नसताना त्याचे खापर हिंदुत्वावादी संस्थांच्या माथ्यावर फोडणार्यांचा ह्या इथे जाहीर निषेध करुन मी माझे चार शब्द संपवतो !>> मान्य. मीही हेच बोलून थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मरणान्तिनि वैराणि>>>>>>>>> हा

प्रसाद१९७१
गुरुवार, 08/21/2014 - 13:36 नवीन
मरणान्तिनि वैराणि>>>>>>>>> हा शुद्ध दांभिकपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हा शुद्ध दांभिकपणा आहे.

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/21/2014 - 14:33 नवीन
हा शुद्ध दांभिकपणा आहे.
अशुध्द किंव्वा भेसळयुक्त दांभिकपणा कसा असतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

कदाचित आपण म्हणता ते सत्यही

असंका
Wed, 08/20/2014 - 16:31 नवीन
कदाचित आपण म्हणता ते सत्यही असेल. पण आपण एक सांगा की श्रद्धांजलीच्या धाग्यावर बोलायला TRP वगैरे गोष्टी योग्य आहेत का? आपण एक वेगळा धागा का काढत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मिपावर सुध्धा राजकिय रंग :(..

टवाळ कार्टा
Wed, 08/20/2014 - 17:26 नवीन
मिपावर सुध्धा राजकिय रंग :(...दुसरीकडे जावे का??
  • Log in or register to post comments

दाभोळकरांच्या मतांविषयी अनेक

श्रीगुरुजी
गुरुवार, 08/21/2014 - 13:25 नवीन
दाभोळकरांच्या मतांविषयी अनेक मते असू शकतात. परंतु ते प्रामाणिक व स्वच्छ चारित्र्याचे होते याविषयी दुमत नाही. त्यांची हत्या झाली हे अत्यंत दुर्दैव आहे. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचा खून सनातन किंवा जातपंचायतवाल्यांनी नक्कीच केला नसावा. सुपारी किलर पाठविणारे हे सामान्यतः पुढारी, माफिया गुंड, लॅण्ड माफिया इ. पैकी असतात. सनातन किंवा जातपंचायतवाल्यांकडे असे शार्प शूटर असण्याची शक्यता कमी आहे. साधना साप्ताहिकाच्या शनिवार व सदाशिव पेठेत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या प्रॉपर्ट्या हे एक कारण असावे. पुण्यात तसे लॅण्डमाफिया पुष्कळ आहेत. किंवा २०१४ मधील निवडणुकांवर डोळा ठेवून भाजप/संघ परिवाराला बॅकफूटवर नेण्यासाठी तसेच सनातनवर बंदी आणण्यासाठी सत्ताधार्‍यांपैकीच कोणीतरी यामागचा मास्टरमाईंड असावा. सुरवातीला संशयाची सुई सनातनवर नेण्यात त्यांना यश मिळाले होते. परंतु सनातनविरूद्ध कणभरही पुरावा सापडलेला दिसत नाही. पोलिसांना व सत्ताधार्‍यांना खुनी व मास्टरमाईंड नक्की माहित असावा व सत्ताधार्‍यांच्या पाठबळामुळेच इतके दिवस खुनी सापडत नसावेत.
  • Log in or register to post comments

+१

कवितानागेश
गुरुवार, 08/21/2014 - 15:58 नवीन
सरकार बदललं की मारेकरी सापडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> सरकार बदललं की मारेकरी

श्रीगुरुजी
गुरुवार, 08/21/2014 - 20:55 नवीन
>>> सरकार बदललं की मारेकरी सापडतील. अशीच आशा करू या. पण काय आहे, की सर्व पक्षातल्या नेत्यांचं एकमेकांबरोबर साटंलोटं असतं, त्यामुळे मारेकरी सापडतीलच अशी पूर्ण खात्री वाटत नाही. सरकार बदलले तरी नवीन सत्ताधारी पक्ष मारेकर्‍यांना न पकडण्याच्या बदल्यात आधीच्या सत्ताधार्‍यांकडून काहीतरी किंमत वसूल करेल आणि बाकी जनता दरवर्षी २० ऑगस्टला अजूनपर्यंत मारेकरी न सापडल्याचा निषेध करत राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

दाभोळकरांची मते न पटणारे लोक

पिलीयन रायडर
गुरुवार, 08/21/2014 - 14:15 नवीन
दाभोळकरांची मते न पटणारे लोक आहेत.. त्यांची मते अत्यंत तीव्र सुद्धा असतील.. पण ती मांडण्यासाठी हाच धागा का निवडला असावा? श्रद्धांजलीच्या धाग्यावर काय लिहावे ह्याचे भान ठेवले असते तर बरे झाले असते. शिवाय नुसतीच ब्लॅंकेट विधानं करण्यापेक्षा नक्की काय पटलं नाही हे "एखाद्या वेगळ्या लेखात" लिहीलं असतं तर हीच चर्चा तिथे करता आली असती.. धर्म, आत्मा न मृत्यु असल्या गप्पा मारायच्या आधी साधे काही मॅनर्स लक्षात ठेवले असते तर.. असो.. दाभोलकरांना विनम्र श्रद्धांजली..
  • Log in or register to post comments

+१११११११११११११

टवाळ कार्टा
गुरुवार, 08/21/2014 - 14:39 नवीन
+१११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+१११११११११११११

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/21/2014 - 14:48 नवीन
+१११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कायदा होण्या पुर्वी असा सुर

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 08/21/2014 - 23:43 नवीन
कायदा होण्या पुर्वी असा सुर पुरोगाम्यानी लावला होता कि अख्खा महाराष्ट्र विळख्यात आहे..पण तसे काहि दिसत नाहि..असो कायदा झाला अंद्धश्र्द्धा दुर झाल्या पाहिजेत याबद्दल दुमत नाहि...पण गाजावाजा झालेला कायदा झाल्यावर असे वाटले होते कि तुरुंग बुवा व जादुगारानी ओसंडुन वहातिल..पण १-२ तक्रारी सोडल्या तर फारसे कानावर आले नाहि..बाकि कोर्ट कचे~या शिक्षा तर दुरची गोष्ट... एक बरे झाले...आता कायदा झाला आहे ..कायद्याचे राज्य आहे ..त्या मुळे कायदा ठरवेल तोच जादुगार,,बुवा.तिच अंधश्रद्धा......बाकि निश्फळ चर्चा
  • Log in or register to post comments

आता पाच वर्षे होत आली तरीही

पुंबा
Mon, 07/03/2017 - 18:19 नवीन
आता पाच वर्षे होत आली तरीही अद्यापपर्यंत दाभोळकरांच्या खुन्यांचा शोध लागलेला नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांच्या प्रायोरिटी लिस्ट वर हा विषय नाही असे दिसते. खरे तर भाजपाच्या जाहिरनाम्यात कायदा आणी सुव्यवस्था रुळावर आणण्ञाचे वचन होते. दाभोळकरांची हत्येचा शोध लागून त्याविषयीची माहिती जनतेपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

दाभोलकरांची हत्या

गामा पैलवान
Mon, 07/03/2017 - 20:43 नवीन
सौरा, दाभोलकरांच्या हत्येचा भाजप शासनाशी काहीही संबंध नाही. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. पृथ्विराज चव्हाण यांनी जाणूनबुजून विघ्ने उपस्थित करून तपास भरकटवला आहे. त्याचं खापर भाजपप्रणीत शासनावर फोडणं उचित नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

>>> आता पाच वर्षे होत आली

श्रीगुरुजी
Mon, 07/03/2017 - 22:56 नवीन
>>> आता पाच वर्षे होत आली तरीही अद्यापपर्यंत दाभोळकरांच्या खुन्यांचा शोध लागलेला नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. शोध लागून एक वर्ष होऊन गेलं. खुनाच्या आरोपाखाली सनातनचा वीरेंद्र तावडे १२ महिन्यांहून अधिक काळ विनाजामीन तुरुंगात आहे. आता अजून कोणाला शोधायचंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

कैच्या कै

उपाशी बोका
गुरुवार, 07/06/2017 - 08:20 नवीन
लाजिरवाणी गोष्ट काय त्यात? तपास चालू असेल किंवा काही धागेदोरे मिळत नसतील अजून. प्रत्येक खुनाचा शोध अमुक वर्षाच्या आत लागलाच पाहिजे असा काही नियम आहे काय? स्वीडनचे माजी पंतप्रधान ओलॉफ पाल्मे यांची हत्या १९८६ साली झाली, त्याच्या खुन्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

तपास केव्हाच पूर्ण झाला आहे.

श्रीगुरुजी
गुरुवार, 07/06/2017 - 08:34 नवीन
तपास केव्हाच पूर्ण झाला आहे. दाभोळकर व पानसरे या दोघांच्याही खुनातील आरोपींना अटक झालेली आहे. अजून खुनातील आरोपी मोकळे आहेत असे का बोलले जाते ते समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका

तपास पूर्ण झाला असेल तर मग

उपाशी बोका
गुरुवार, 07/06/2017 - 08:40 नवीन
तपास पूर्ण झाला असेल तर मग खटला का सुरू करत नाहीत? असे एखाद्याला वर्षानुवर्षे तुरुंगात कसे काय ठेऊ शकतात? आणि समजा ठेवला तर तो आरोपी आणि त्याचे वकील काहीच हालचाल कशी काय करत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तपास पूर्ण झाला असेल तर मग

श्रीगुरुजी
गुरुवार, 07/06/2017 - 15:22 नवीन
तपास पूर्ण झाला असेल तर मग खटला का सुरू करत नाहीत? खटला सुरू होत नाही कारण निधर्मांधांच्या दबावामुळे पोलिसांनी चुकीच्या व्यक्तींना पकडले आहे. त्यांच्याविरूद्ध पुरेसे पुरावे नसल्याने खटला सुरू झाला तर ते निर्दोष सुटतील व पोलिसांचे पितळ उघडे पडेल. म्हणून आरोपींना जामीन न देता वर्षानुवर्षे तुरूंगात डांबून ठेवायचे, खटला सुरूच करायचा नाही व दरम्यानच्या काळात सनातन संस्थेवर दोषारोप करीत रहायचे अशी योजना आहे. दाभोळकरांचा खून झाल्यानंतर काही मिनिटातच "ज्या धर्मांध शक्तींनी गांधीजींना मारले, त्यांनीच दाभोळकरांना मारले आहे" अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी देऊन तपासाला एक विशिष्ट दिशा दिली होती. दाभोळकर व सनातन संस्था यांच्यातील संघर्ष अनेक दिवसांपासून सुरू होता. त्यामुळे खून झाल्याक्षणी तपासाची सुई सनातनकडे वळविण्यात आली. हे अजाणतेपणे केले होते का खर्‍या खुन्यांना निसटून जाण्यास व पुरावे नष्ट करण्यात पुरेसा वेळ मिळावा म्हणून असे करण्यात आले होते हे सांगता येणे अवघड आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यामुळे पोलिसांनी इतर कोणत्याही शक्यतांचा विचार न करता पुढील १४-१५ दिवस सनातनच्या साधकांची चौकशी करण्यात अक्षरश: वाया घालविले. त्यामुळे त्या वेळात खर्‍या खुन्यांना निसटून जाण्यासाठी व सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. सलग १४-१५ दिवसांच्या चौकशीनंतर खुनात सनातनचा हात असल्याचे पुरावे न मिळाल्याने पोलिसांनी दुसर्‍या शक्यतांचा विचार सुरू केला. परंतु तेव्हा खूपच उशीर झाला होता. दरम्यानच्या काळात माध्यमांनी सनातनला लक्ष्य करून या खुनामागे सनातनच आहे असा निष्कर्ष काढला होता. दाभोळकरांनी धर्मचिकित्सा केल्याने सनातननेच त्यांचा खून केला हे निधर्मांधांनी व माध्यमांनी ठरवूनच टाकले होते. त्यामुळे वृत्तवाहिन्यांवरून सनातनवर टीकेचा भडीमार सुरू होता. अर्थात सनातनच्या पदाधिकार्‍यांची मूर्खासारखी उधळलेली मुक्ताफळे सुद्धा त्यासाठी कारणीभूत होती. दाभोळकरांच्या खुनानंतर दुसर्‍या दिवशी सनातनच्या संकेतस्थळावर दाभोळकरांच्या चित्रावर लाल फुली मारून प्रसिद्ध केलेल्या चित्रामुळे सनातनविरूद्ध संशय जास्तच वाढला होता. श्रीपाल सबनीस यांच्यासारखा आचरटशिरोमणी सुद्धा सनातनमुळे प्रसिद्धीस पावला कारण सनातनच्या संजीव पुनाळीकरने ट्विटरवर "रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात रहा, सबनीस" असे ट्विट करून आपल्यावरील संशय अधिक वाढविला. दरम्यानच्या काळात पानसरेंचा खून झाला. त्याचे खापरही सनातनवर फोडण्यात आले. परंतु सनातनाच्या एकाही साधकाविरूद्ध पुरावे मिळत नव्हते. पानसरेंच्या खुनानंतर ६ महिन्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये समीर गायकवाड नावाच्या सनातनच्या साधकाला खुनाच्या आरोपावरून पकडण्यात आले. पकडल्याक्षणी माध्यमांनी त्याच्याविषयी कंड्या पिकवायला सुरूवात केली. समीर रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्याकडे २०-२५ मोबाईल फोन सापडले, त्याने मैत्रिणीकडे खुनांची कबुली दिली अशा बातम्या पसरविण्यात आल्या. प्रत्यक्षात पूर्वायुष्यात त्याच्यावर एकाही गुन्ह्याची नोंद नाही. मोबाईल दुरूस्तीचे त्याचे दुकान असल्याने त्याच्याकडे २०-२५ मोबाईल फोन असणे स्वाभाविक होते. त्याने म्हणे मैत्रिणीला सांगितले त्याने दोन पापे केली आहेत. पोलिसांनी ही दोन पापे म्हणजे दोन खून असा बादरायण संबंध लावला. त्याची ओळखपरेड झाली तेव्हा पानसरेंचा खून होताना त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या उमा पानसरेंना सुद्धा त्याला ओळखता आले नाही. खुनाच्या दिवशी त्याच्या मोबाईल फोन लोकेशननुसार तो ठाण्यात होता. पानसरेंच्या गल्लीतील ३-४ जणांची त्याला ओळखपरेडमध्ये ओळखले नाही. खुनात वापरलेली मोटारसायकल त्याच्याकडे किंवा इतरत्र मिळालेली नाही. खुनात वापरलेले पिस्तूल मिळालेले नाही. खुनामागचा हेतू अजूनही समजलेला नाही (अर्थात धर्मचिकित्सा केल्याने दाभोळ्कर व पानसरेंना सनातनने मारले हा निष्कर्ष निधर्मांधांनी पूर्वीच काढलेला आहे. म्हणजे खून कोणी केला व का केला हे त्यांनी आधीच ठरविलेले आहे.). एकंदरीत पोलिसांनी संशयावरून चुकीच्या माणसाला पकडले हे निश्चित आहे. समीरला पकडून एक वर्ष विनाजामीन तुरूंगात ठेवल्यावर सुद्धा त्याला जामीन द्यायला पानसरे कुटुंबियांचा विरोध होता. त्याच्याविरूद्ध खटला सुरू करण्याचे ठरायला लागल्यावर इतक्यात खटला सुरू करु नये यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात मागणी केली. म्हणजे समीरला जामिनावर सोडायचे नाही व खटलाही सुरू करायचा नाही. कारण खटला सुरू झाला तर पुराव्याअभावी तो निर्दोष सुटणार हे नक्की. तो तसा सुटला तर सनातनवर आरोप करणे बंद करावे लागणार. शेवटी २१ महिने विनाजामीन तुरूंगात काढल्यानंतर समीर गायकवाडला नुकतेच जामिनावर सोडण्यात आले आहे. समीरप्रमाणेच सनातनच्या विरेंद्र तावडेला जून २०१६ मध्ये दाभोळारांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करून आजतगायत विनाजामीन तुरूंगात डांबले आहे. त्याच्या बाबतीतही अनेक कंड्या पिकविण्यात आल्या. त्याला म्हणे भारतात हिंदुराष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यासाठी तो म्हणे १५००० सैनिकांची फौज उभारणार होता. अशा हास्यास्पद गोष्टी माध्यमातून पसरविल्या गेल्या. १५००० सैनिकांची फौज उभारणे हे काय लाडू खायचं काम आहे का? इतक्या लोकांना पगार, शस्त्रे, घरे कोठून देणार? त्यासाठी कितीतरी अब्ज रूपये लागतील. आणि हे सगळं तो पोलिस, माध्यमे इ. च्या नकळ्त करणार होता. १५००० सैनिकांना काय पाताळात दडवून ठेवणार होता का तो? त्याला पकडल्यावर त्याची प्राथमिक सुनावणी सुरू असताना रोज पोलिसांऐवजी मुक्ता दाभोळकरच पत्रकारांसमोर येऊन तपासातल्या प्रगतीची माहिती देत होत्या. काही दिवस हा तमाशा सुरु राहिल्यानंतर शेवटी न्यायाधीशांनी पोलिसांना झापल्यानंतर हे प्रकार बंद झाले. विरेंद्र तावडेच्या बाबतीतही पोलिसांना कोणतेच पुरावे मिळालेले नाहीत. तरीसुद्धा त्याला विनाजामीन १३ महिने तुरूंगात ठेवले आहे व खटला सुरू केला जात नाही. सगळ्यात आश्चर्य म्हणजे 'पोलिसांनी अजूनही खर्‍या खुन्यांना पकडलेले नाही' असे पानसरे व दाभोळकर कुटुंबीय दर महिन्याला सांगत असतात. जर खरे खुनी बाहेर असतील तर समीर गायकवाड व विरेंद्र तावडेला का पकडले? ते खरे खुनी नसतील तर त्यांना सोडून द्यायला हवे. परंतु त्यांना सोडायला यांचा विरोध आहे. त्यांना सोडायचे नसेल तर त्यांच्याविरूद्ध खटला सुरू करून त्यांना शिक्षा व्हायला हवी. परंतु खटला सुरू झाला तर ते निर्दोष सुटतील व त्यामुळे सनातनविरूद्ध आगपाखड करणे थांबवावे लागेल या भीतिने त्यांना जामीन मिळू दिला जात नाही व खटलाही सुरू करून दिला जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका

पोलिसांना आणि इतर

एस
Mon, 07/03/2017 - 21:40 नवीन
पोलिसांना आणि इतर तपासयंत्रणांना जर छडा लावायचा असताच तर कधीच लावला असता. डॉ. साहेबांची आणि कलबुर्गी, पानसरे इत्यादींच्या हत्त्या ज्या संघटनेने घडवल्या असतील ती एकतर फारच पॉवरफुल असली पाहिजे किंवा कुठल्याच राज्यकर्त्यांना तिला हात लावायचा नसेल.
  • Log in or register to post comments

या धाग्यावर नको चर्चा करायला.

मोदक
Mon, 07/03/2017 - 23:29 नवीन
या धाग्यावर नको चर्चा करायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

श्रीगुरुजींना धन्यवाद

गामा पैलवान
गुरुवार, 07/06/2017 - 18:54 नवीन
श्रीगुरुजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! माझ्या अंदाजानुसार स्मिता पानसरे यांना सत्य ठाऊक आहे. त्यामुळे त्या निरपराध असलेल्या सनातनच्या साधकांना जामीन मिळू देत नाहीयेत. नको तेव्हढी माहिती असल्याने कदाचित स्मिता पानसऱ्यांचा काटा काढला जाईलही. मात्र असा काही प्रकार मुक्ता वा हमीद दाभोलकरांच्या बाबतीत संभवत नसावा. हे सगळे माझे अंदाज आहेत. माझ्याकडे कसलाही पुरावा वा विदा नाही. आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा