Skip to main content

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

लेखक धर्मराजमुटके यांनी मंगळवार, 20/08/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित ! डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 52654
प्रतिक्रिया 222

प्रतिक्रिया

ह्या दुर्दैवी घटने इतके आश्चर्य वाटण्या सारखे काय आहे? ह्या देशामधले आमदार, खासदार, नगरसेवक बघितले तर सज्जन माणसांचे खून होणार हे सांगायला कशाला पाहिजे.

समाजाला अत्यंत गरज असणार्‍या व्यक्तीची अशाप्रकारे हत्या हि खरच मनाला ह्ळह्ळ वाटणारी.निषेध करावा तितका कमीच!

डॉ. दाभोळकरांच्या हत्येमागचं कारण वैचारिक असो, राजकीय वा आर्थिक -- "बोला आमच्याविरूद्ध हवं तेवढं! आमच्या समाजातले दोष दाखवलेत म्हणून जीवे मारण्याचे फतवे का निघणार आहेत? तेव्हा रहा सुरक्षित आणि करा टीका." छापाचं जे लंगडं समर्थन अनेकदा वाचायला/ऐकायला मिळे -- त्यातला फोलपणा निदान आता तरी अशांच्या ध्यानी यावा, ही अपेक्षा बाळगणंदेखील व्यर्थ आहे; असं वाटायला लावणारे काही प्रतिसाद (फेसबुकावर/अन्यत्र) वाचले आणि ही दु:खद बातमी ऐकल्यावर वाटलेली खंत अधिक गडद झाली.

हुतात्मा बनलेल्या वैचारिक क्रुसेडर्स् च्या साखळीतला आणखी एक दुवा. हा दुवा अखेरचाच ठरो आणि ही साखळी इथेच थांबो अश्या आशेच्या एका किरणाचीही अपेक्षा करता येऊ नये इतपत वातावरण काळेकुट्ट झाले आहे. आयुष्यभर आपले युद्ध अहिंसकतेने लढणार्‍याचा अंत हिंसामय असावा हे इतिहासाला मान्यच जणू. जयंतराव साळगावकरांना श्रद्धांजली.

:( :( :(

१० वर्षा आधी स्वत: च्या हाताने कुठलेही शस्त्र न वापरता शस्त्रक्रिया करणारा आणि अंनिस ला आव्हान देणारा तो असलं बाबा कुठे गेला?

हे सगळं खरंच घडलंय का? अजून विश्वास बसत नाही. उत्तर भारतात अशा घटना घडतात असे म्हणून आम्ही वाळूत डोकं खुपसून बसलो होतो! :(

In reply to by पैसा

अगदी, आज महाराष्ट्र पण अधोगतीला लागलाय... :(

In reply to by पैसा

आत्ता येथे सकाळी सकाळी जालावर वर्तमानपत्र वाचायला घेतले आणि दाभोलकरांची बातमी ऐकून सुन्न झालो. महाराष्ट्र खरेच वाळूत डोके खुपसून बसलेला आहे. या घटनेचे कुठलेही राजकारण न करता त्याच्या मुळाशी जाऊन मारेकरी आणि बोलवते धनी शोधणे गरजेचे आहे असे वाटते. स्वतः दाभोलकरांचा अध्यात्म (यात फिलॉसॉफी आली, अंधश्रद्धा म्हणून नाही) विश्वास होता का माहीत नाही. म्हणून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी असे मी माझ्या श्रद्धेने म्हणतो आणि त्यांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य पुढे योग्य दिशेने चालूच राहूंदेत अशी प्रार्थना करतो.

राजा कालाय कारणम हे खरेच . रोज कलियुग आहे हे नव्याने जाणवते आहे.

सकाळपासून अत्यंत अस्वस्थ आणि उद्विग्न आहे. बातमी कळल्यापासून कामातले लक्षच उडाले. शेवटी लवकर घरी आलो. काय चाललंय हे आपल्या महाराष्ट्रात ? जास्तीतजास्त लोकांनी या अंधश्रद्धेपासून मुक्ती घ्यावी हीच डॉक्टरांना उचित श्रद्धांजली ठरेल.

In reply to by तिमा

मी आध्यात्म वा हे श्रद्धा अंधश्र्द्धा याबाबतीत अगदी दाभोलकरच असल्याने मला घरचा माणूस गेल्याचे दु: ख झाले. मी त्यांना एक अगदी छोटी मदत केली होती. बाकी त्यांच्या कार्यात झोकून द्यायचे राहिले. कारण ते यात्री होते मी शंकेखोर आहे. माणूस जन्मत:च काही तरी बरेच बरोबर घेऊन येतो. त्याला बलदण्यासाठी चळवळी , उपदेश यांच्यापेक्षा अनुभवाचा झटकाच अधिक उपयुक्त असे माझे मत आहे.

अत्यंत दु:खदायक घटना आहे. भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अत्यंत दु:खदायक घटना आहे.भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते - सुन्न करणारं आहे हे सगळं...

मनःपूर्वक श्रद्धांजली!! महाराष्ट्रात फोफावलेली गुंडगिरी आणि कायदा, पोलिस वगैरे गोष्टींची रसातळाला गेलेली किंमत पुनश्च अधोरेखित झाली.

डॉ. दाभोळकरांच्या हत्येचा निषेध. अंधश्रद्धा - जादुटोणा विरोधी विधेयकाचे कायद्यात रुपांतर व त्याची कडक अंमलबजावणीच त्यांच्या कार्याला योग्य ती श्रद्धांजली ठरेल.

"आई गं!" ही पहिली प्रतिक्रीया आली तोंडातून.. लाजिरवाणी गोष्ट आहे एक समाज म्हणून आपल्याला. "पटले नाही विचार, टाक संपवून" ही वृत्ती पुन्हा पुन्हा वर येतेय. सतिश शेट्टींच्या हत्येचं पूर्ण राजकारण केलं गेलं.. आर्.टी.आय. च्या चळवळीचं अपरिमित नुकसान झालं तेव्हा.. शासनाला दोष देऊन थांबता येणार नाही, खूप चुकीच्या दिशेने वेगात चाल्लोय आपण. सामाजिक कार्यकर्त्यांना जीव ओतून काम करायला कसा धीर देणार आता! निराश वाटतय एकदम.. असं काही झालं की सामाजिक चळवळींचा वेग अतिशय मंदावतोच, ते कधीही न भरुन येणारं नुकसान असतं! डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या नावानेच विधेयक आणणं हीच खरी आदरांजली असेल त्यांना, बाकी सरकार काही करेल असं वाटत नाही, त्यांच्यावर तितका विश्वास राहिला नाही हे उघड सत्य आहे!

सरांना विनम्र श्रद्धांजली. आपलं प्रतिबींब बघवत नाहि तर रूप टीकठाक करण्याऐवजी आरसा फोडायचा... हे कृत्य केवळ अविचारी नव्हे तर आत्मघाती आहे. सरांचं शरीर संपवलं तरी त्यांचे विचार संपणार नाहित वगैरे गप्पा तात्वीक म्हणुन ठीक आहे, पण एक माणुस निर्भीडपणे समाजाला त्याच्या उणीवा दाखवुन देत होता. तो आता गेला, तर त्या कार्याचे व्हायचे ते नुकसान झालेच :( वर गविंनी म्हटलय तसं, हा प्रकार केवळ वैचारीक मतभेदातुन झाला असावा असं वाटत नाहि. कुठे तरी हितसंबंध दुखावले गेले असावेत. अनिंस हि संस्था काहि खुप पैसा बाळगुन नसावी, व त्यात राजकीय फायदा देखील नसावा, त्यामुळे सरांच्या खुर्चीवरुन हे कांड झालेलं नाहि. सरांच्या कोअर वर्तुळातल्या लोकांना काहि कल्पना असेल... त्यांनी आता अधिक सावधानी बाळगण्याची गरज आहे. मेणाबत्ती मोर्चावाल्यांना हस्तिदंती मनोर्‍यातले समाजसुधारक म्हणुन हिणवले जाते... पण आजघडीला पुणे शहरात या मंडळींनी मोर्चा काढण्याची अत्यावष्यकता आहे. या खुनावर समाजाने सक्रिय प्रतिक्रीया द्यायलाच हवी. अर्धवटराव

आजच्या काळापेक्षाहि प्रतिकूल परिस्थितीत पूर्वी समाजसुधारकांनी, प्रचंड टीका सहन करीत काम केले, पण तेव्हा विरोधकांनी असे खून नाही केले. आज जे घडले ते भयंकर आहे. मन सुन्न झाले.

दाभोळकरांना दोन तीन वेळा प्रत्यक्ष भेटायची संधी मिळली... प्रचंड कार्यक्षम व्यक्तीमत्व.... कट्टर नास्तिकाला ओंकारेश्वरा जवळ म्रुत्यु यावा हा कसला विचित्र योग.... भावपुर्ण श्रद्धांजली!!

काही वर्षापुर्वी तळेगावमधे आर्.टी.आय कार्यकर्ते सतिश शेट्टी यांची हत्या, पत्रकार जे.डे. यांची मुंबईत केलेली हत्या आठवल्या एकदम +१

In reply to by जुबेर बिजापुरे

पत्रकार जे.डे. यांच्या हत्येमागे गँगवॉर तसेच डबल गेम करणे, ब्लॅकमेलींग असे बरेच पदर आहे.

दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!! मात्र अनिसवाल्यांचे विचार मला कधिच मानवले नाही. मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेदच मला एकतर मुर्खपणाचा किंवा आपापल्या परिने आपापल्या सोईची व्याख्या करण्याचा प्रकार वाटतो. मी कॉलेजात असताना कॉलेजमध्येच श्याम मानव यांच्या उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मुलनावर एक परिसंवाद झाला होता. त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते. ३० वर्ष उलटले पण मला अजून उत्तर काही मिळाले नाही आणि मिळण्याची शक्यता नाही. दुसर्‍याची बुवाबाजी संपवून आपली बुवाबाजी किंवा आधुनिक बुवाबाजी सुरू करण्यासारखाच हा प्रकार असतो. असो. विचार पटो ना पटो, कुणाचाही अशा तर्‍हेने अंत व्हावा, हे दु:खदायकच. पुन्हा एकदा दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

In reply to by गंगाधर मुटे

सर, ३० वर्षापुर्वी आपण वीचारलेला प्रश्न काय होता? ज्याचे आपल्याला समाधानकारक उत्तर मिळाले नव्हते.

In reply to by गंगाधर मुटे

मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेदच मला एकतर मुर्खपणाचा किंवा आपापल्या परिने आपापल्या सोईची व्याख्या करण्याचा प्रकार वाटतो. >> साफ असहमत. त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते.>> आपण श्याम मानव किंवा दाभोळकरांना निरुत्तर केले असा दावा करणारे तुम्ही पहिलेच नाही हे नोंदवून ठेवतो. दुसर्‍याची बुवाबाजी संपवून आपली बुवाबाजी किंवा आधुनिक बुवाबाजी सुरू करण्यासारखाच हा प्रकार असतो.>> हा तर चक्क ठोकून देतो ऐसा जी प्रकार आहे. असल्या भोंगळ विधानाला सिद्ध करता येत नाही तसेच असिद्धही. तेव्हा 'मी निरुत्तर केले' हा दावा करता येतोच. तुमच्या सर्वच मुद्द्यांना विस्तृत उत्तरे द्यायची तयारी आहे पण 'आज' ते औचित्याला धरून होणार नाही म्हणून थांबतो. कधीतरी भेटून बोलू या.

In reply to by रमताराम

ता.क. माझा नि अंनिस वा दाभोळकरांचा कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही किंवा त्यांचे सारेच मुद्दे मला पटत होते असे नाही. तेव्हा माझा प्रतिसाद केवळ तुमच्या प्रतिसादाचा प्रतिवाद समजावा.

In reply to by रमताराम

अरेच्या उद्धृते कुठे गेली??? संदर्भच हरवले की. मुटे यांचे हे तीन मुद्दे उद्धृत केले होते. जे गायबले. मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेदच मला एकतर मुर्खपणाचा किंवा आपापल्या परिने आपापल्या सोईची व्याख्या करण्याचा प्रकार वाटतो. त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते. दुसर्‍याची बुवाबाजी संपवून आपली बुवाबाजी किंवा आधुनिक बुवाबाजी सुरू करण्यासारखाच हा प्रकार असतो.

In reply to by गंगाधर मुटे

"मानव यांच्या उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मुलनावर एक परिसंवाद झाला होता. त्या परिसंवादात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तर श्याम मानव देवू शकले नव्हते" म्हणजे त्यांनी तुम्हाला दिलेले उत्तर तुम्हाला कळले नाही का पटले नाही? "३० वर्ष उलटले पण मला अजून उत्तर काही मिळाले नाही" ३० वर्षात अजून किती लोकांना विचारलात प्रश्न? बाकी ३० वर्षांनंतर तुम्ही स्वतःच प्रश्न विसरलेला दिसता, नाहीतर लिहला असतात. असो.

इ-सकाळमधे दाभोळकरांवरील वृत्ताच्या खाली लिहीलेले पण कविवर्य मंगेश पाडगावकरांनी लिहीलेला उदासबोध... दुवा. आज हयात असते रामदास । तर भोवती बघुन हरामदास । अन्तरी जाले असते उदास । लागोन चिन्ता ॥ १ ॥ समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुन्ड आहे । त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥ या सत्याचा लागता शोध । कुठुन सुचता असता दासबोध ? लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥ भ्रष्टाचारे पोखरला देश । दीन जनांसी अपार क्लेश । दुर्जना यश । सज्जना अपेश सर्वत्र दिसे ॥ ४ ॥ नीतीचा डोळा काणा । प्रत्येक माणूस दीनवाणा । सर्व फ़ोलपटे नाही दाणा । पीक ऐसे ॥ ५ ॥ देवतांसी उचलून धरती । वेडेविद्रे नाच करती । भसाड ओसाड आरती । झोकून दारू ॥ ६ ॥ कबीर सांगे अल्लाची महती । मुंगीच्या पायी घुंगुर वाजती । तरी ते अल्लाशी ऐकु येती । ऐसे म्हणे ॥ ७ ॥ येथे अल्लासी बहिरा मानती । ठणाणा ध्वनीक्षेपक आणती । त्यातुन कर्कश बांग हाणती। अल्लासाठी ॥ ८ ॥ कंडम बरगड्यांच्या जनतेवरी । बिल्डर, स्मगलर, गुन्ड राज्य करी । प्रत्येक नेता खिसे भरी । हाती धरून तयांसी ॥ ९ ॥ दुष्काळ खणी, भुई फाटे । शोष पडून विहीर आटे । काळा कडु गहिवर दाटे । गळ्यात भविष्याच्या ॥ १० ॥ सत्या सामोरे पहाण्यासाठी । त्राण असावे लागे गाठी । भेकड पळपुट्याचे पाठी । हिजडा लागे ॥ ११ ॥ ग्रंथ नाम उदासबोध । कवी जनतेचा संवाद । काळा कडु आतला विषाद । हलका केला। ॥ १२ ॥

डॉ. नरेन्द्र दाभोळकरांना श्रद्धांजली...

भारत हा सर्व धर्म संमभाव असा देश आहे, तरीही भारतात कोणीही काहि केले तरी काही लोकांना हिंदुचाच वास येतो .

In reply to by मंदार कात्रे

यदाकदाचित ह्या नाटकात कर्णाचं पात्र सारखं ’हा आपला अपमान आहे’ असं बोलतं..तेव्हा दुर्योधन त्याला आठवण करुन देतो की हा आपला नाही तुझा अपमान आहे. त्याच धर्तीवर इथे सांगावेसे वाटतेय की हिंदुंवर कोणी आरोप करत नाहीये, काही स्वयंघोषित ठेकेदार आहेत हिंदु धर्माचे जे रोज उठसुठ दाभोळकरांवर टिका करायचे त्यांच्यावर काही लोकांनी आरोप केले आहेत हे नक्की. पण म्हणुन समस्त हिंदुंवर आरोप होतोय असं भासवुन कोणी उर बडवायची गरज नाहीये. जसे रोज दाभोळकरांवर आरोप व्हायचेत की ते मिशनरींचे हस्तक आहेत, फ़क्त हिंदुंधर्मींयांविरुद्धच बोलतात वगैरे वगैरे..तसेच हेही फ़क्त आरोप आहेत कि काही मंडळींनी दाभोळकरांविरुद्ध इतका अपप्रचार केला की त्यातुन हा hate crime घडला असावा. शेवटी १०-१५ वर्षांनी चौकशीतुन काहीतरी बाहेर येईल, पण तोवर आरोप-प्रत्यारोप चालणारच. हिंदुंचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

जे झाले ते फारच दु:खदायक आहे. एका महान विचारांची हत्या झाली. निषेध करावा तितका थोडाच. डॉ. नरेन्द्र दाभोळकरांना श्रद्धांजली.

अशा माणसाची हत्या करेपर्यंत मजल का जाते? आर्थिक राजकारण असलं तरी इतके वर्ष अंनिसचं कार्य असूनही या बुवाबाजीवाल्यांची दुकानं जोरात सुरूच होती ना!! कदाचित कोणीतरी त्यांचा विरोध वैयक्तिक घेउन हत्या केली असावी. हि घटना महाराष्ट्रात घडली हे अविश्वसनीय आहे. मारेकरी पकडला जाणार नहिच ! श्रद्धांजली !

एका विशिष्ट विचारांसाठी झोकून देऊन काम करणारा तळमळीचा 'माणूस' आज संपवला गेला. पण ह्या हत्येला ज्या पध्दतीनं रंग दिला जातो आहे ते पाहून आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. 'अमुक एका विचारांनी ही हत्या केली' असं बेजबाबदारपणाचं विधान केलं की परिस्थितीचा रंग काय नी कसा बदलतो हे न उमजण्याइतपत आपले पुढारी निरागस नक्की नसावेत. जेव्हा विचारांनी ही हत्या केली असं म्हणलं जातं तेव्हा 'नक्की विचारच असावेत का?' हा प्रश्न पडल्यावाचून रहावत नाही. आजवर महाराष्ट्रात केवळ विचारांना विरोध म्हणून खून पडले नाहीत (नसावेत) . हां, आर्थिक भानगडींच्या मूळावर एखादा सेवाभावी कार्यकर्ता येत असेल तर त्याची विल्हेवाट लावणं तसं आपल्याकडं नवं नाही. आपण भाबड्या जनतेला दिसतो तो केवळ अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीचा पदर. पण ह्या चळवळीच्या माध्यमातून कुणाच्या आर्थिक गणितांच्या शेपटावर कसा पाय पडला असेल हे कुठं आपल्याला ठाऊक असतं? अन अश्यांचे लागेबांधे कुठे कसे जुळलेले असू शकतात हे तर तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांच्या गावीही नसतं. बरं, त्यातून आणि, निवडणूका जवळ येताहेत. वातावरण तापवण्यासाठीची दिशाही काहीशी दिसते आहे काही प्रभृतींच्या विधानांमधून... त्यावरुन तर मनातला संशय अधिकच गडद होतो. आज इतकी वर्षं झाली डॉ.दाभोळकरांच्या चळवळीला; जादूटोणा विरोधी कायद्याचं घोंगडंही भिजत घालून आता बराच काळ लोटला. कोणत्याही चळवळीचा नेता हा त्या चळवळीच्या सुरुवातीच्या अन तरुणपणाच्या काळात अधिक प्रखर आणि सक्रिय असतो. दाभोळकरांना संपवायचं असतं तर तोच काळ जास्त योग्य नव्हता काय? निदान गेलाबाजार जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल चर्चा सुरु झाली तो तरी. पण नाही...ही हत्या तेव्हा नाही झाली! म्हणजे ही हत्या विचारांच्या विरोधातून झाली नाही असाही निष्कर्श काढता येऊ शकतो का?

In reply to by धमाल मुलगा

एकमात्र "(डोके) शाबूत" प्रतिसाद (बाकी मिपावर पण राजकारण्यांसारखी या मुद्द्यावरून चिखलफेक करू नये अशी वाचन मात्र मिपाकरची प्रार्थना) साळ्गावकर्-दाभोळकर यांचे विचारांवर चर्चा/माहिति लेख हिच मिपाकरांकडून ऊचित श्रद्धांजली ठरेल.

डॉ. नरेंद्र दाभोळकर व जयंत साळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! दाभोळकरांना गोळ्या घालून मारणे हा नालायकपणाचा व क्रूरतेचा कळस आहे. खुन्यांना लवकरात लवकर पकडून जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. काल बर्‍याच मराठी वाहिन्यांवरच्या प्रतिक्रिया ऐकल्या व चर्चा पाहिल्या. एकंदरीत सर्वांनी संशयाची सुई सनातन प्रभातकडे वळविली आहे. ज्या खुन्यांनी गोळ्या झाडल्या ते सराईत व्यावसायिक सुपारी किलर असावेत. भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी, पोलिस चौकीपासून १०० मीटरच्या आत चालत येऊन अचूक गोळ्या घालणे हे व्यावसायिक भाडोत्री मारेकर्‍यांचेच काम असणार. असे मारेकरी हे राजकीय पुढारी, माफिया, बांधकाम व्यावसायिक, गुन्हे करणार्‍या टोळ्या यांच्याशी संबंधित असतात. सनातन प्रभात सारखी फक्त पनवेल परिसरात थोडेसे अस्तित्व असलेली संघटना असे कृत्य करेल असे प्रथमदर्शनी वाटत नाही. अशी शक्यता पूर्णपणे फेटाळता आली नाही तरी शक्यता कमी वाटते. जादूटोणा विरोधी विधेयकामुळे सुद्धा ही हत्या होईल असे वाटत नाही, कारण हे विधेयक गेली १७ वर्षे प्रलंबित आहे व ते विधिमंडळात कधीही मंजूर होणार नाही ही सर्वांनाच खात्री आहे. अंधश्रद्धा निर्मूलन किंवा हे विधेयक या विषयांबाबतीत गेल्या काही दिवसात असे काहीही नवीन घडले नव्हते की ज्यामुळे त्यांचा खून करण्यास कोणीतरी प्रवृत्त व्हावे. त्यांनी गेल्या २ महिन्यांपासून जातपंचायतीविरूद्ध आवाज उठविला होता. एखादी जात पंचायत यामागे असावी का? खुनाचे नेमके कारण व हेतू लक्षात येत नाही. सनातन प्रभात किंवा एखादी जातपंचायत यामागे असण्याची थोडीशी शक्यता असली तरी त्यांचा मुख्य हेतू लक्षात येत नाही. त्यांचा एखादा जागेचा वाद होता का हे माहिती नाही. पण पुण्यात "साधना"ची कार्यालये ही सदाशिव पेठ, शनिवार पेठ अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत आणि पुण्यात लँड माफिया देखील आहेत. एकंदरीत झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी व वाईट आहे.

In reply to by श्रीगुरुजी

साधनेची कार्यालये दाभोलकरांची वैयक्तिक मालमत्ता होती काय? स्पेक्युलेशन्स आर ऑलराईट, पण हे लँड माफिया प्रकर्ण पटत नाही. कुणी केले असावे याबद्दल मला स्वतःला मत नाही. पण पोलिसतपास होऊन सत्यच काय ते बाहेर येईल अशी अंधश्रद्धा यानिमित्ताने बाळगायला काय हरकत आहे?

आज २० ऑगस्टला नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्ष झाले. त्यांच्या खुनाचे कसलेच धागे-दोरे अद्याप पोलिस-सरकारच्या हाती लागलेले नाहीत. त्याच्या निषेधाचा आवाज सर्व समाजाच्या हृदयापर्यंत आणि आजूबाजूला लपून बसलेल्या खुन्यांच्या निदान कानापर्यंत पोचावा म्हणून त्याच दिवशी पुण्यात होणाऱ्या रिंगणनाट्यामागची भूमिका. अधिक माहिती या दुव्यावर .. Dabholkar

आत्तापर्यंत खून झालेल्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहा. उगाच एखाद्याला ग्लोरिफाय करु नका.

In reply to by मंदार दिलीप जोशी

नुसतं खून झालेल्यांना कशाला ग्लोरीफाय करायचं.. आत्तापर्यंत सगळ्या मेलेल्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहा !!

In reply to by मंदार दिलीप जोशी

:) सहमत- मंदार.. & बाळ... उगीचच एखाद्याला ग्लोरिफाय करणे चुकीचेच वाटते. २० ऑगस्ट'ला ज्यांचा ज्यांचा खून झालाये.. किंवा ज्यांना ज्यांना मृत्यू आलाये.. त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!.. गेल्यावर्षी महामृत्यू पावलेले प्रसिद्ध ज्योतिषी 'ज्योतिर्भास्कर'- "श्री जयन्त साळगांवकर" यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!! .. तसेच आजच निधन पावलेले प्रसिद्ध योगाचार्य- "अय्यांगार गुरुजी" यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली !!!! त्याचप्रमाणे स्व. पंतप्रधान- श्री. राजीव'जी गांधी यांच्या जयन्तीनिमित्त त्यांच्या स्मृतीस "विनम्र अभिवादन"!!!!! :) .... :)

In reply to by धन्या

ही काय भानगड आहे? माणसाच्या मरण्यातही काही स्पेशालिटी असते का?
अं.. हो.. नॅचरली - म्ह्णजे .. जीवनातील सर्व कर्मे करून, समाजोन्नतीसाठी उचित कार्य केल्यावर, तसेच सर्व मनातील इच्छा तृप्त झाल्यावर वृद्धापकाळी आलेला किंवा माहित असलेला मृत्यू... म्हणजे- महामृत्यू अश्या व्यक्तींना सु-गती प्राप्त होते. सहसा अश्या लोकांच्या पिंडाला कावळा पटकन शिवतो... :) . कारण यांच्या कोणत्याच इच्छा मागे उरलेल्या नसतात. :) .. :) दाभोळकरांना आलेला मृत्यू- हा अचानक होता. ध्यानी मनी नसताना, जगण्याची किंवा समाजासाठी अजून कार्ये करण्याची इच्छा मनात असताना मनाविरूद्ध आलेला मृत्यू हा व्यक्तीला सहसा पुढे "गती" प्राप्त करून देत नाही. ते स्वत: जरी आत्मा मानत नसले, तरी "पुराणा"नुसार "अश्या" पद्धतीने मृत्यूमुखी पडलेल्या शरीरातील आत्म्यांना "पिशाच-योनी" प्राप्त होते. ..... ( आणि प्लँचेट करून कुणीही त्यांना सहज बोलावू शकते !!! ;) .. ;) हं हं.. ) अश्या आत्म्यांना मुक्ती मिळणे अवघड असते.... :) शेवटी आयुष्यात केलेल्या आपापल्या ""कर्मा""नुसारच प्रत्येकाला मृत्यू आणि मुक्ती मिळत असते.

In reply to by प्यारे१

महानिर्वाण म्हणून स्वतःला मोठं करण्याचा क्षीण प्रयत्न.
हे तुम्ही कशावरुन ठरवलंत? आणि शब्द नेमके वापरत चला. "ग्लोरीफाय करण्याचा क्षीण प्रयत्न" म्हणा. *lol*

In reply to by धन्या

मलाही. महानिर्वाण प्राप्त होवून दुसर्‍या बिगब्यांगमध्ये तयार झालेल्या आकाशगंगेत दुसरा जन्मही मिळाला, आहात कुठे!

In reply to by बॅटमॅन

तुमच्या पूर्वीच्या जन्मात महानिर्वाण प्राप्त झाल्यानंतर पिंडाला कावळा लगेच शिवला होता का?

In reply to by धन्या

पिंडाला कावळा लगेच शिवला होता का?
म्हणजे काय? फॉक्कन शिवला म्हणतानाच दुसरा जन्म मिळाला, नैतर तरंगत राहिलो असतो कयामतीपरेंत.

In reply to by बॅटमॅन

वर मृगनयनी यांनी म्हटल्याप्रमाणे,
जीवनातील सर्व कर्मे करून, समाजोन्नतीसाठी उचित कार्य केल्यावर, तसेच सर्व मनातील इच्छा तृप्त झाल्यावर वृद्धापकाळी आलेला किंवा माहित असलेला मृत्यू... म्हणजे- महामृत्यू अश्या व्यक्तींना सु-गती प्राप्त होते. सहसा अश्या लोकांच्या पिंडाला कावळा पटकन शिवतो...
तुमच्याही बाबतीत हेच झाले असणार.

In reply to by धन्या

असेल बॉ. आमचा पिंड त्या भाताच्या मुदीत कैद होता आणि कावळ्याने त्याला चोच मारताक्षणी आम्ही दुस्रीकडे जन्मास आलो, इतकेच आठवते आहे. बाकी अगोदरच्या जन्मातलं आता काय आठवत नाही.

In reply to by बॅटमॅन

माणसाच्या मृत्यूसमयी त्याचे सारे संस्कार त्याच्या चित्तात साठवले जातात. मानसाचा पुढचा जन्म जेव्हा होतो तेव्हा एखादया बॅकप हार्ड डिस्कवरुन नविन संगणकात ज्याप्रमाणे जुन्या संगणकातील फाईल्स कॉपी कराव्यात त्याप्रमाणे हे जुन्या संस्कार नव्या जन्मात उचलले जातात. असं म्हणतात हा. खरे खोटे ते धर्मशास्त्र पंडीत जाणोत. :)

In reply to by मृगनयनी

दाभोलकर हे मंदार जोशी ( व तुमच्या) विचारांच्या अगदी विरुद्ध विचारांचे असल्याने आलेल्या तिरस्कारात्मक प्रतिक्रियेला उपहासाने उत्तर द्यायचा प्रयत्न निष्फळ म्हणायचा.. खून झाल्यामुळे ग्लोरीफिकेशन होत नसते. त्यांच्या कार्याने ते आधीच झालेय. तुमचा प्रतिसादात देखिल मेलेल्या सर्वांना श्रद्धांजली म्हणून नंतर तिघांचा खास उल्लेख आहेच.. ..