✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

उपेक्षित सावरकर

भ
भोचक यांनी
गुरुवार, 02/26/2009 - 10:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10443 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

अक्षरक्ष:

मृगनयनी
गुरुवार, 02/26/2009 - 10:59 नवीन
अक्षरक्ष: अक्षरन् अक्षर खरे आहे! :) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला मानाचा मुजरा! :) राष्ट्राचे चैतन्य मूर्त तु.... नीति सम्पदांची | स्वतंत्रते भगवति, त्वामहं राज्ञी तू त्यांची....|| वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे!...... :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

+१

मिंटी
गुरुवार, 02/26/2009 - 11:04 नवीन
मृगनयनीशी एकदम सहमत !!!!! स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझाही मानाचा मुजरा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

+२

दिपक
गुरुवार, 02/26/2009 - 11:10 नवीन
सहमत! आमचाही महानायकास मानाचा मुजरा ! पु.लंचे हे भाषण आठवले. पुन्हा वाचुन काढले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

माझाही

अभिष्टा
गुरुवार, 02/26/2009 - 11:25 नवीन
माझाही स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा. सुर्याला कुणा काजव्याच्या "आहेस बाबा तू तेजःपुंज" अशा सर्टिफिकेटची गरजच नाहिये. सावरकरांना, कुणी उपेक्षा करो किंवा सन्मान करो काहीही फरक पडत नव्हता, ते खर्‍या अर्थाने कर्मयोगी होते. --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
  • Log in or register to post comments

काय बोललात!

धमाल मुलगा
गुरुवार, 02/26/2009 - 17:54 नवीन
वा:! अगदी चपखल. पुर्णतः सहमत. बाकी, भोचक यांचा लेख नेहमीप्रमाणेच उत्तम :) हजार सुर्यांची प्रखरता एकवटून बनलेल्या हिंदुस्तानाच्या ह्या क्रांतीसुर्याच्या चरणि विनम्र अभिवादन. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिष्टा

अनादि मी..

ढ
गुरुवार, 02/26/2009 - 11:37 नवीन
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।। अट्टाहास करित जईं धर्मधारणीं मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो खुळा रिपू । तया स्वयें मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।। लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला नम्र दाससम चाटिल तो पदांगुला कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते हलाहल । त्रिनेत्र तो मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांप्रति माझेही विनम्र अभिवादन.
  • Log in or register to post comments

स्वातंत्र

अनिल हटेला
गुरुवार, 02/26/2009 - 11:54 नवीन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांप्रति माझेही विनम्र अभिवादन. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढ

आदरांजली

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/26/2009 - 11:45 नवीन
स्वातंत्र्यवीरांचे पुण्यस्मरण हे मागच्या वर्षी वाहिलेली मिपाकरांची आदरांजली आठवली. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण

मदनबाण
गुरुवार, 02/26/2009 - 12:13 नवीन
सुंदर लेख... Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. या महानायकास कोटी कोटी प्रणाम... मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda.
  • Log in or register to post comments

वाह!

दिपक
गुरुवार, 02/26/2009 - 12:31 नवीन
वाह मदनबाणजी. धन्य झालो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

+१ हेच

दशानन
गुरुवार, 02/26/2009 - 12:47 नवीन
+१ हेच म्हणतो धन्य झाहलो आज मी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

मस्त.

शितल
गुरुवार, 02/26/2009 - 22:08 नवीन
लेख आणी बाणाने प्रतिसादात दिलेले फोटो खुपच सुंदर.. बरेच दिवसांनी बाणाने फोटो दिलेत मिपाकरांना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

ही जी

माझी दुनिया
Fri, 02/27/2009 - 13:16 नवीन
ही जी क्षणचित्रे दिली आहेत, ती कुठे संग्रहीत केलेली आहेत ? प्रत्यक्ष जाऊन पहायची झाल्यास काय करावे ? ____________ माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत ! _____________ माझी दुनिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सुंदर लेख

नाटक्या
गुरुवार, 02/26/2009 - 12:37 नवीन
आपले शतशः धन्यवाद... - नाटक्या
  • Log in or register to post comments

स्वातंत्र

इनोबा म्हणे
गुरुवार, 02/26/2009 - 12:49 नवीन
स्वातंत्र्यवीराला आदरांजली... मदनबाण, छायाचित्रांकरिता धन्यवाद! -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

डॉ अभिराम दिक्षित

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/26/2009 - 12:55 नवीन
पुण्यातील डॉ अभिराम दिक्षित हे सावरकर विचारांच्या जागृतीचे कार्य करतात. त्यांचे अभिनव निर्माण प्रतिष्ठान पहा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

आवडला लेख.

यशोधरा
गुरुवार, 02/26/2009 - 12:55 नवीन
आवडला लेख.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

उपटसुंभ
गुरुवार, 02/26/2009 - 16:06 नवीन
धन्यवाद मदनबाण..! :)
  • Log in or register to post comments

चांगला लेख

उपटसुंभ
गुरुवार, 02/26/2009 - 16:08 नवीन
चांगला लेख आहे मोचक. छायाचित्रांबद्दल धन्यवाद मदनबाण..! :)
  • Log in or register to post comments

अभिवादन

विनायक पाचलग
गुरुवार, 02/26/2009 - 18:32 नवीन
आमच्या या दैवतास आमचा सविनय प्रणाम छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपटसुंभ

सावरकर उपेक्षित नव्हते

आनंद घारे
गुरुवार, 02/26/2009 - 18:30 नवीन
"अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला। मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।।" असे प्रतिपादन करणारा स्वयंप्रकाशी स्वातंत्र्यसूर्य 'तेजस्वी' आहे असे कोणी सांगावे लागत नाही. त्यांच्या तेजाच्या झळाळीने पाहणार्‍याचे डोळे आपोआप दिपतात. ज्यांनी त्यांचे चरित्र आणि लेखन वाचले असेल, त्यांचे स्फूर्तीदायक काव्य ऐकले असेल, त्यांना मनापासून त्यांचा अतीव आदर वाटल्याशिवाय राहणार नाही, इतके ते उत्तम, उदात्त, उन्नत वगैरे सर्वगुणांनी युक्त आहे. त्यांच्याबद्दल मनात आदरभाव बाळगणार्‍या लोकांची संख्याही अपरंपार आहे. त्यांच्या जीवनकार्याबद्दल सकारात्मक माहिती देणारे अनेक स्फूर्तीदायक लेख प्रसारमाध्यमात येत राहतात, तसेच विविध क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती वेळोवेळी विनम्र भावाने त्यांना आदरांजली वहात असतांना प्रत्यक्ष कार्यक्रमात आणि टीव्हीवर दिसत असतात. त्यामुळे सर्वसामान्य वाचक किंवा प्रेक्षक स्वातंत्र्यवीरांना 'उपेक्षित' अशी उपाधी देणार नाही. या लेखातील फक्त खाली दिलेली मोजकी वाक्ये स्व. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी आहेत. त्यांचा विस्तार करून एक सुंदर लेख लिहिता आला असता. पण त्यासाठी थोड्या अभ्यासाची गरज आहे. या लेखाचा निम्म्याहून अधिक भाग कोणाला ना कोणाला दूषणे देण्यात खर्ची घातला आहे. पण इतर शंभर लोकांचा हजार प्रकारचा क्षुद्रपणा दाखवण्यामुळे कोणाचेही मोठेपण कधीच वाढत नसते हे सावरकरांच्या तथाकथित 'भक्तां'ना कधीतरी उमजेल अशी आशा आहे. "सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते. राष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे अशा व्यक्तिंमध्ये एकेकाळी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या व्यक्ती होत्या. त्यात निर्विवादपणे सावरकर होते. त्यावेळी त्यांचे महत्त्व तेवढे होतेही. बंगालमधील अनेक क्रांतीकारकांना सावरकरांची प्रेरणा होती. सावरकरांचे 'मॅझिनी'चे चरित्र अनेक तरूणांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून गेले. मुळात सावरकरांसारखा अतिशय महत्त्वाचा नेता तुरूंगात खितपत पडून रहाणे त्या काळात परवडणारे नव्हते. त्यामुळे तिथे खितपत पडून रहाण्यापेक्षा बाहेर काही कार्य करत रहाणे जास्त महत्त्वाचे हे सावरकरांनी महत्त्वाचे मानले. त्याचवेळी आपल्यापेक्षा आपल्या इतर सहकार्‍यांची सुटका करावी यासाठी ते जास्त आग्रही होते, हेही कागदपत्रातून पुढे आले आहे. मुळात मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावीच लागते, हे शिवाजी महाराजांचे धोरण सावरकरांनी अतिशय मुत्सद्दीपणे राबविले. सावरकर हे इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंतही होते. ब्रिटिश, कम्युनिस्टांच्या नजरेतील इतिहासाला त्यांनी भारतीय दृष्टी दिली. १८५७ चा उठाव हा तोपर्यंत बंड ठरवला होता, पण सावरकरांनी हे बंड नव्हते स्वातंत्र्यसमर होते, हे ठासून सांगितले. स्वातंत्र्याची पहिली ज्वाला या घटनेनेच पेटवली, हेही त्यांनी बर्‍याच आधाराने सांगितले. त्यासाठी इतिहासही खोदून काढला." आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

उत्तम

अवलिया
गुरुवार, 02/26/2009 - 18:38 नवीन
उत्तम लेख --अवलिया
  • Log in or register to post comments

उत्तम

अवलिया
गुरुवार, 02/26/2009 - 18:38 नवीन
उत्तम लेख --अवलिया
  • Log in or register to post comments

थोर नेत्यांचा पराभव...

विकास
गुरुवार, 02/26/2009 - 20:18 नवीन
लेख आवडला आणि योग्य वेळेस लिहील्याबद्दल आभार! थोडे वेगळे थोडे लेखासंदर्भात... थोर नेत्याचा पराभव हा त्यांच्या विरोधकांपेक्षा बहुतांशी त्या नेत्याचे अनुयायीच करतात... वडाच्या झाडाखाली नवीन झाड येऊ शकत नाही पण फांद्यांना बांडगुळे मात्र येतात. तशीच काहीशी "कमी-अधिक" फरकाने अवस्था आहे. शिवाजीने दूरदृष्टीने स्वतःच्या नावाऐवजी हिंदवी स्वराज्य स्थापले पण त्याच्या आजतागायतच्या पुढच्या पिढ्यांनी "शिवाजी", हेच एक घराणे करून टाकले. टिळकांनी "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे..." अशी सिंहगर्जना केली, पण सहा वर्षाच्या तुरूंगवासात एक अनुयायी नव्हता ज्याने त्यांचे काम पुढे तितक्याच मुत्सद्दीपणे, लोकसंग्रह करत चालवले. टिळकांच्या जाण्यानंतर तर काय त्यांच्या सहकार्‍यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून त्यांच्या मुलाला आत्महत्या करावी लागली. गांधीजींबद्दल तर बोलायला नको इतके दुर्दैव आहे. त्या नथुरामने गांधींना मारायचे जितके घोर पातक केले त्यापेक्षाही गांधींजींच्या विचाराला, आचाराला आणि त्यातील मूळ गाभ्याला (तत्वज्ञानाला) दरोज मारायचे अघोरी पाप गेले ६० वर्षे चालू आहे. हे सर्व लिहायचे कारण काय? - सावरकरांच्या बाबतीतही तेच घडले. आज काही संकेतस्थळावर (मिपा आणि तत्सम नाही) जेंव्हा सावरकरांचे छायाचित्र दिसते, त्यांचे विचार/कथा वगैरे दिलेल्या दिसतात तेंव्हा वास्तवीक खिन्न होयला होते. असल्या महाभागांना ना धड हिंदूत्ववाद कळला ना धड सावरकर. मात्र स्वतःच्या "कर्तुत्वाने(?)" त्यांचे नाव आणि त्याहूनही महत्वाचे, विचारच बदनाम करतात हे लक्षात येत नाही. .... >>> म्हणून संघाच्या व्यासपीठावर सावकरांच्या फोटोला सहसा स्थान नसते. <<< या संदर्भात आधीपण लिहीले आहे. संघाच्या व्यासपीठावर फक्त संघाच्या उत्सवाच्या वेळेस अथवा विशेष कार्यक्रम (अभ्यासवर्ग वगैरे) असतात तेंव्हाच छायाचित्रे असतात आणि ती फक्त तीनच - संस्थापक आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक श्री गोळवळकर गुरूजी आणि मध्यभागी शिवाजी. संघ चालू केला तेंव्हा व्यक्तिनिरपेक्ष संस्था केवळ दूरगामी राष्ट्रनिर्मिती हा उद्देश ठेवून झाला होता. सावरकरांना सुरवातीस ते मान्य नव्हते असे वाचल्याचे आठवते कारण त्यांच्या दृष्टीने नजीकच्या काळातील ताबडतोब फळे हवी होती. संघाचा या विचाराला विरोध नव्हताच फक्त त्यांचे म्हणून त्यांनी जे ध्येय ठरवले होते त्यात ते बसणार नव्हते इतकेच. तरी देखील सावरकरांसंदर्भात अनेक संघियांनी मराठी-अमराठी बरेच लिहीलेले आहे. सावरकर चित्रपट ज्या सुधीर फडक्यांनी काढला ते स्वतः स्वयंसेवकच म्हणवून घेयचे आणि आयुष्यभर त्यासाठी झटून तो तयार केल्यावर जेंव्हा त्यांनी दुसर्‍या स्वयंसेवकाला म्हणजे अटलबिहारी, अडवाणींना त्याचा प्रिमियर शो दाखवला त्यानंतर म्हणले देखील की, "आता मी मरायला मोकळा झालो" >>>'गाय हा उपयुक्त पशू असून प्रसंग ओढवला तर गायीचे मांसभक्षण करायलाही हरकत नाही' असे सावरकरांचे 'प्रॅक्टिकल' विचार...<<< ह्या संदर्भात वास्तवीक मला येथे त्यांचा लेखच चिकटवायला आवडेल. प्रयत्न करेन. कारण निव्वळ त्यांचे एक वाक्य ते पण "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" घेऊन लिहीले जाते तेंव्हा तो त्यांच्या पारदर्शी आणि पुरोगामी विचारांवर अन्याय केला असे वाटते. सरते शेवटी सावरकरांचा काहीजणांना विज्ञानवाद भावला, तर काहीजणांना हिंदूत्ववाद आवडला. मात्र त्यांनी ज्या सप्तबंद्या उठवायला सांगितल्या त्याबद्दल मात्र अजून हवी तशी वैचारीक (कृतीत नंतर) प्रगती झाली आहे असे वाटत नाही. जात हा प्रकार, अनुवंशिकतेच्या नावाखाली चालणारा आचरटपणा (त्यांनीच तसे म्हणले आहे), हे आत्मसात करण्याचे धाडस त्या पिढीतील फारच कमी लोकांनी दाखवले असेल आणि ते कधी प्रसिद्धीस आले देखील नसतील. वास्तवीक गणितातील सेट संकल्पनेत बोलायचे तर त्यांची विज्ञाननिष्ठा, समाजकारण, हिंदूत्ववाद हे वाचल्यास समजेल की "म्युचुअली इन्ल्क्युझिव्ह" होते/आहे. थोडक्यात सावरकर नावाचा एक हत्ती भारतातील तमाम वैचारीक आंधळ्यांनी स्वतःच्या सोयीने त्याची पूजा करायला अथवा झोडपायला वापरला आणि त्या प्रक्रीयेत समाजाला पण आंधळे ठेवायला मदत केली... तरी देखील कधीतरी त्यांच्याबद्दलचे या अर्थी ऐकलेले पटते: सावरकरांना कल्पना होती के ते त्यांच्या काळासाठी खूप टोकाचे विचार सांगत होते. पण त्यांनी त्याची तमा बाळगली नाही. "आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुमच्या वीना आणि विरोधाल तर मोडून...", असे म्हणत ते त्यांचे कार्य करत राहीले. म्हणून त्यांना हवे तसे अनुयायी मिळाले नाहीत. मात्र हे देखील सत्य आहे की त्यांनी टोकाचे विचार सांगितल्याने समाज किमान अशंतः हलला आणि पुढे जाण्यास मदत झाली... असो.
  • Log in or register to post comments

चांगला प्रतिसाद

केदार
गुरुवार, 02/26/2009 - 20:48 नवीन
विकास चांगला प्रतिसाद. भोचकराव अजुन थोडे खोलात शिरता आले असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उपेक्षित सावरकर

जागल्या
गुरुवार, 02/26/2009 - 23:30 नवीन
विकास, अगदी माझ्या मनातल लिहीलस. उत्तम प्रतिसाद जागल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार

अतिशय उत्तम प्रतिसाद

मैत्र
Fri, 02/27/2009 - 11:59 नवीन
विकास, नेहमीप्रमाणेच संयमी आणि विचार करायला लावणारा प्रतिसाद. गांधीजी, सावरकर, आंबेडकर सर्वांच्या बाबतीत हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे - त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या नावाचा केलेला वापर आणि तत्वांना / विचारांना सपशेल नजरेआड करणे. हे जसं तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल बोललात तसं जगातल्या कोणत्याही मोठ्या राजाचं उदाहरण घेतलं तर पुढची पिढी / राजपुत्र / राजे तेवढे कर्तृत्ववान आणि बुद्धिमान नाही निघाले तर काही पिढ्यांत त्या विचारांचा आणि राज्याचा क्षय होतो. हा जगाच्या सर्व इतिहासात एक समान भाग आहे.. तेच सर्व थोर नेत्यांना लागू पडतं. नवीन विचार, नवीन नेतृत्व ज्यामध्ये तेवढी कुवत आहे हे जोवर येत नाही तोवर ही पिछेहाट होतच राहते. आत्ताच्या राजकारणाचा विचार करता हे अशक्यप्राय वाटतं. अवांतरः नगरच्या एका मोठ्या काँग्रेस कार्यकर्त्या जानकी बाई आपटे यांच्या चरित्रवजा पुस्तकात (आपट्याचं पान) ४२ च्या चळवळीआधी पासून आणि स्वातंत्र्यानंतर लगेचच काँग्रेस मध्ये मूळ समाज सुधारणा / प्रबोधन / स्वातंत्र्य हे सर्व सोडून फक्त राजकारण कसं स्थापित (एस्टॅब्लिश ?) होत गेलं हे दिसतं... आंबेडकरी चळवळीच्या दशा आणि दुर्दशा स्पष्ट दिसत आहेतच. भोचक - एका समयोचित आणि उत्तम लेखाबद्दल अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

चांगला लेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/26/2009 - 20:45 नवीन
समाजाच्या प्रगतीला अडचणीचे ठरणारे जन्मजात जातिभेद मोडून काढले पाहिजे यासाठी सावरकरांनी जे विविध लेखन केले ते आजही वाचले जातात. हिंदुधर्मातील काही आत्मघाती प्रथांवर त्यांनी लेखणी चालवली. सावरकरांनी जन्मजात आरक्षणामुळे जातिभेद वाढीला लागेल असा एक विचार मांडल्याचे स्मरते..मात्र त्यांची उपेक्षा होते वगैरे तितकेसे पटत नाही. असो, समयोचित लेखाबद्दल अभिनंदन !
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्यवीर

विद्याधर३१
गुरुवार, 02/26/2009 - 21:12 नवीन
केवळ स्वातन्त्रवीर म्हणून नव्हे तर एक उत्तम कवी, भाषाप्रभु, साहित्यिक, विज्ञानवादी, समाजसुधारक अश्या सर्व गुण संपन्न नरशार्दुलाला कोटी कोटी प्रणाम. विद्याधर
  • Log in or register to post comments

सावरकरांचे मुख्य कार्य.

कलंत्री
गुरुवार, 02/26/2009 - 23:31 नवीन
सावरकरांचा विचार एका तटस्थ नजरेतून करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे भाषा शुद्धी हेच होते असे म्हणावेसे वाटते. राजकिय पुरुष म्हणून सावरकर पूर्णपणे अयशस्वी झाले असे माझे मत आहे. त्यांच्या कल्पना अवास्तव होत्या आणि फक्त पुस्तके लिहुन कार्य होईल असा समज असावा असे अतिरेकी मत मांडण्याचाही मला मोह होतो. द्विराष्ट्राच्या कल्पनेने त्यानी नकळतच जीनांचे हातच बळकट केले. या लेखाचा उद्देश हा वरील प्रकारच्या प्रतिसादासाठी नाही हे मान्य करुनही मला मात्र सावरकरांच्या एका कृतीवर आयूष्यभर नतमस्तक व्हायला आवडेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू असताना अनेक लोक त्यांना बेळगाव महाराष्ट्रात यावा म्हणून चळवळीत सहभागी व्हावे म्हणून विनंती करायला गेले. सावरकरांनी जर चळवळीचे नेतृत्व केले असते तर कदाचित आजचे राजकिय चित्र वेगळे असते. मात्र सावरकरांचा प्रतिसाद असा होता, जोपर्यंत बेळगाव महाराष्ट्रात अथवा कर्णाटकात आहे मला त्याची चिंता नाही, पण बेळगाव जर पाकिस्तानमद्ये जाणार असेल तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनही मला या चळवळीत भाग घ्यायला आवडेल. इतका प्रामाणिक माणूस मी पाहिला नाही असे माझे मत नमूद करतो. मराठी भाषेच्या बाबतीत मला सावरकरांचे कार्य आणि विचारांचा अभिमान आहे असे ही मी नमूद करतो आणि या श्रेष्ठ भाषाप्रेमीसमोर मी नतमस्तक होतो. अवांतर : सावरकरांची आणि माझी जन्मभूमी एकच आहे.
  • Log in or register to post comments

सावरकर आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ

विकास
Fri, 02/27/2009 - 03:21 नवीन
सावरकरांचे आशिर्वद घेयला काँग्रेसविरहीत सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते ५०च्या दशकात गेले असताना त्यांनी या अर्थी सांगितले होते की देशांतर्गत सीमा कशाही राहूंदेत पण चिनी माओ आपल्या देशाच्या सीमेवर हल्ला करतो आहे त्याच्याकडे त्या नेहरूंना लक्ष देयला सांगा. नंतर काय झाले ते आपल्याला माहीत असेलच... त्या नामुष्कीनंतर सावरकरांची पुन्हा एकदा मला कुठले ते आठवत नाहीत शोधून सांगेन (माझ्याकडे कुठेतरी पुस्तक आहे) पण गोखल्यांनी (दि.वि. नाहीत) मुलाखत घेतली. त्यात सावरकरांनी असेही सांगितले की आता नेहरू ती जबाबदारी मेननवर टाकून मोकळे होतील. मग संरक्षण खाते कोणाकडे असावे याला त्यांनी उत्तर दिले की आत्ता मराठी माणसाची तेथे गरज आहे. काँग्रेसमधे असे संरक्षणासाठीचे नेतृत्व हे यशवंतराव चव्हाण देऊ शकतील. मग त्यांनी काय करावे हे त्यांना वाटलेले विचार त्यांनी सांगितले. सरते शेवटी विनंती केली की हे विचार चर्चा/विचार/लेख स्वरूपात प्रसिद्धीस आणा पण माझे नाव त्यात घालू नका (की सावरकर असे म्हणाले वगैरे...) कारण तसे म्हणाल तर नेहरू उलटे वागतील. आठवणी प्रमाणे चीनच्या हल्ल्याच्या वेळेस सावरकर बेळगावहून कदाचीत मूंबईस येयला निघाले होते का उलट. तर त्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्थानबद्ध केले होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

कलंत्री साहेब, आपल्याला प्रणाम

सातारकर
Fri, 02/27/2009 - 09:40 नवीन
ह्यासाठी
सावरकरांचा विचार एका तटस्थ नजरेतून करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे भाषा शुद्धी हेच होते असे म्हणावेसे वाटते. राजकिय पुरुष म्हणून सावरकर पूर्णपणे अयशस्वी झाले असे माझे मत आहे. त्यांच्या कल्पना अवास्तव होत्या आणि फक्त पुस्तके लिहुन कार्य होईल असा समज असावा असे अतिरेकी मत मांडण्याचाही मला मोह होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

कोटी कोटी प्रणाम

समिधा
Fri, 02/27/2009 - 01:15 नवीन
लेख आणी बाणाने प्रतिसादात दिलेले फोटो खुपच सुंदर आहेत. फोटो बघुन शेवटी अपोआप हात जोडले गेले. छायाचित्रांबद्दल धन्यवाद मदनबाण..! तुम्ही लिहीलेल्या लेखातला शब्द आणि शब्द खरा आहे.
  • Log in or register to post comments

पण गेले

विसोबा खेचर
Fri, 02/27/2009 - 09:02 नवीन
पण गेले वर्ष सावरकरांचे १२५ वे जयंती वर्ष असूनही सरकारी पातळीवर सारे काही थंड होते. सावरकरांची उपेक्षा अजूनही संपलेली नाही, याचा हा पुरावा. भोचकगुरुजी, नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.. मदनची चित्रेही सुरेख..! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा