बागडावे वाटले की बागडावे तू...
मी फुलांना पाहिले की आठवावे तू!
मी पिसे पिंजून माझी बांधले घरटे
पाखरा,अलवार या घरट्यात यावे तू!
मी गुलाबी पाकळ्यांची हौस पुरवावी
अन् फुलांचे देह ओले पेटवावे तू!
मी तुझा उल्लेख टाळावा म्हणालो की
शेवटी मक्त्यात नामी आढळावे तू!
एवढा असतो रुमानी कोणता शेवट?
पत्र माझे चुंबनांनी चुर्गळावे तू!
—सत्यजित
वाचने
4760
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_ _/\_
मनःपूर्वक धन्यवाद! ___/\___
In reply to _/\_ _/\_ by एस.योगी