Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माम्लेदारचा पन्खा on Wed, 06/28/2017 - 09:48
रिकामी दिसली एक गाडी त्यात जाऊन बसलो मी आता मजा येईल प्रवासाची म्हणून स्वतःशीच हसलो मी कधी वाटलं गाडीला थांबवावं कधी सुसाट पळवावं तिला पण आयुष्य नामक चालकाने माझा पूर्ण भ्रमनिरास केला मी नेईन तसंच जायचं तू म्हणालं मला माझं आयुष्य कसला हट्ट करायचा नाही विचारायचं नाही कधी भविष्य घडवीन तुला सफर मी आता एका वेगळ्याच जादुई दुनियेची कुठे फार थांबायचं नाही आपण आणि घाईही नाही करायची आलास जसा जन्माला सगळे रंग तू बघून घे लक्षात नाही यायचा खेळ हा हे पहिल्यांदा समजून घे तुझ्यासारखेच इतर अनेक भेटतील तुला पावलोपावली तू मात्र असशील एकटाच बरोबर फक्त तुझीच सावली वाटेल तुला तूच करतोस सगळं पण तो फक्त आभास असेल एका ठिकाणाहून दुसरीकडे एवढाच तुझा प्रवास असेल हे एेकून अंतर्मुख झालो मी विचारलं एवढं फक्त आयुष्याला माझं वाटतं तरीही काहीच नाही माझं मग काय अर्थ आहे या धावपळीला ? हसलं आयुष्य आणि म्हणालं मला मी तुला अगदीच निराश नाही करणार अनुभवांचं गाठोडं अन आठवणींची शिदोरी गाडीतून उतरताना तुझं तुलाच परत देणार !

Submitted by पद्मावति on Wed, 06/28/2017 - 13:21

Permalink

फारच सुरेख.

फारच सुरेख. वाटेल तुला तूच करतोस सगळं पण तो फक्त आभास असेल एका ठिकाणाहून दुसरीकडे एवढाच तुझा प्रवास असेलखरंय अगदी. हे लक्षात ठेवलं तर आयुष्य किती सुखकर होईल. अनुभवांचं गाठोडं अन आठवणींची शिदोरी गाडीतून उतरताना तुझं तुलाच परत देणार ! क्या बात है! खूप खुप आवडली कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन५८८ on Wed, 06/28/2017 - 14:10

Permalink

खुप आवडली

खुप आवडली फारच सुरेख
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Wed, 06/28/2017 - 14:18

Permalink

सुंदर!

सुंदर!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 06/28/2017 - 15:53

Permalink

आहे जिलबी.. तरिही मनोहर.

आहे जिलबी.. तरिही मनोहर. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जगप्रवासी on Wed, 06/28/2017 - 15:58

Permalink

छान आहे

छान आहे कविता
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 06/28/2017 - 21:48

Permalink

क्या बात है....

"अनुभवांचं गाठोडं अन आठवणींची शिदोरी गाडीतून उतरताना तुझं तुलाच परत देणार !" + १ ...मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप-लेले on गुरुवार, 06/29/2017 - 13:47

Permalink

खूपच छान !

खूपच छान ! पण ...
गाडीतून उतरताना तुझं तुलाच परत देणार !
यापेक्षा .. 'गाडी चालू आहे तोपर्यंत भरभरून देणार' या अर्थाचं काही जास्त सुसंगत होईल असं वाटतं ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सिद्धेश्वर विल… on गुरुवार, 06/29/2017 - 18:49

Permalink

खरंय आयुष्य आहेच मुळी गाडी

खरंय आयुष्य आहेच मुळी गाडी मनी फार चढाओढी पहिला डब्बा तो बालपणाचा गोडगोड खाऊ न द्वाडपणाचा दुसरा डब्बा शाळेचा हसत रडत घालवायचा तिसरा डब्बा कॉलेजमध्ये वेळ जाई पोरींमध्ये चौथा डब्बा नोकरीचा पाचवा नेहेमीच लग्नाचा सहावा वाटे नेहेमी असावा छकुल्यांचा आसरा सदैव लाभावा सातवा डब्बा काठीचा थेट वरच्या भेटीचा गाडी अशीच धावत असते इंजिन नेहेमीच बदलत असते डब्बे जोडत जोडत सुस्साट पळत असते मित्रा ,, आयुष्य वेचायचे असते , तिच्यासाठी जी आपलयाला जन्म देते , सोबत देते ... ती आई असते न दुसरी बायको असते ...........
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 06/29/2017 - 19:09

In reply to खरंय आयुष्य आहेच मुळी गाडी by सिद्धेश्वर विल…

Permalink

बदा बदाबदा बदाबदा !

बदा बदाबदा बदाबदा ! =))
  • Log in or register to post comments

Submitted by सिद्धेश्वर विल… on गुरुवार, 06/29/2017 - 19:22

Permalink

बदा बदाबदा बदाबदा लिहिले आहे

बदा बदाबदा बदाबदा लिहिले आहे ...त्याच्या बाजूला जिलेबी पडायचं मशीन बसवलंय का दादा ? ....
  • Log in or register to post comments

Submitted by सिद्धेश्वर विल… on गुरुवार, 06/29/2017 - 19:50

Permalink

गुर्जी खाकी गोळी संपली वाटत

गुर्जी खाकी गोळी संपली वाटत एम सील असेल देर्देकरांकडे मला पोचला आवाज तुमच्या अतृप्त आत्म्याचा मी बसलोय तुम्ही दिलेली खाकी गोळी शोधत वेदना फार होत असतील आवाजही फार फार येत असतील आषाढ चालू आहे ना .... आषाढीच्या कळा सोसत नसतील ... धैर्य बाळग जरा मनी सोबत देईल तुला यामध्ये माझी प्रेमळ बहीण .... जेनी
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 7152 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com