Skip to main content

जि एस टी - गुड सर्व्हिस टॅक्स -एक देश -एक टॅक्स -एक मार्केट

लेखक सन्घमित्रा यांनी शुक्रवार, 23/06/2017 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?

वाचने 126271
प्रतिक्रिया 361

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

developing country मध्ये महागाई ही नेहमी increasing च असणार. अधीच शासनाचा मिळकती पेक्षा खर्च अधिक आहे, विकास कामांना निधी अपुरा आहे अश्यात tax कमी होउन स्वस्ताई येण्याचा/ आणण्याचा प्रश्नचं येत नाही. महागाईच्या प्रश्ना पेक्षा जमाहोणारा tax योग्य ठीकाणी खर्च होणे तसेच कुठलाही भ्रष्टाचार न होणे अपेक्षीत आहे. तसेच कष्टाळु गरीबांची मदत शासनाने करावी.

जिएसटी आला तरी आणखी इतर टॅक्स चालूच राहू शकतील~~~~~ उदा० डिटिएच,सिनेमा तिकिटवर सर्विस + एंटरटेनमेंट आहे तो जीएसटी +एंटरटेनमेंट असं

जिएसटी आला तरी आणखी इतर टॅक्स चालूच राहू शकतील~~~~~ उदा० डिटिएच,सिनेमा तिकिटवर सर्विस + एंटरटेनमेंट आहे तो जीएसटी +एंटरटेनमेंट असं

सरकारची तळी उचलून लिहिणार्‍यांनी व सरकारचे सर्व चुकतेच असे समजणार्‍या दोघांनीही या धाग्यावर चालवलेले 'बाजारात तुरी, भटभटणीला मारी' प्रकार मनोरंजक आहेत, त्याशिवाय जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. येत्या तीन महिन्यात कळेलच दूध का दूध पानी का पानी. इथे कितीही एकमेकांच्या अकला वगैरे काढल्या तरी बाजारात जीएसटी लागू होण्यापासून, त्यामुळे तयार होणारा गोंधळ किंवा सुटसुटीतपणा येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. नोटाबंदीबाबत वेट अ‍ॅन्ड वॉच धोरण अवलंबवावे असे सांगितले होते, त्याचे परिणाम सगळे बघत आहेतच. जीएसटीबद्दलही वेट अ‍ॅन्ड वॉच ठेवा. त्याचे परीणाम तर धाडकन दिसणारच आहेत. शेतकर्‍यांपासून व्यापार्‍यांपर्यंत सगळ्यांना अकला शिकवणारे जालावर उदंड आहेतच. पण शेवटी ज्याचे प्रॉब्लेम्स त्यालाच निस्तरावे लागतात. धन्यवाद!

जीएसटी - तुमच्या आमच्यावर काय फरक पडणार? आवर्जून वाचा, उगाच "लांडगा आला रे" म्हणत असलेल्या लोकांच्या विचाराने जावे कि स्व बुद्धी वापरुन, विचार करून योग्य अयोग्य ठरवणे योग्य याचा जरूर विचार करा. वर दिलेली लिंक पूर्ण समाधान करेल असे नाही, पण सामान्य लोकांना स्पष्ट फायदे व तोटे सांगत आहे तेव्हा हा प्रतिसाद दैवी लोकांसाठी नसून सर्वसामान्य तुमच्या व माझ्या सारख्या लोकांना "समर्पित" ;)

In reply to by दशानन

माहितीपूर्ण लेख. पण, असे आकड्यांसकट मुद्देसूद लिहीलेले असते तिकडे दुर्लक्ष करायचे ठरले आहे ना ? "तज्ञांनी" फक्त हवेत बाण मारणारी विधाने करायची असतात. :)

In reply to by दशानन

लिंक मध्ये दिलेल्या माहितीनुसार १)घरे स्वस्त होणार आहेत. ---> तसे काही होईल याबद्दल मी आजचा लोकसत्ता वाचल्यावर साशंक झालो आहे. बातमीनुसार गृहप्रकल्प उभारणीसाठी होणाऱ्या जागेच्या व्यवहारावर १२% कर लागणार आहे. तर घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या महत्वाच्या वस्तूंपैकी सिमेंटवरचा कर २४ वरून २८% होणार आहे. तर पोलादवर देखील एक टक्का करवाढ करण्यात आलेली आहे. तसेच अंडर कन्स्ट्रक्शन घरांवर ती सेवा गृहीत धरण्यात आल्यामुळे त्यावर १२ ते १८% GST लागणार आहे. पूर्वीचा मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क हे राक्षस अजून आहेतच. वास्तविक पाहता विद्यमान सरकारने २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे पक्के घर देणार अशी घोषणा केलेली होती. त्या दृष्टीने परवडणाऱ्या घरांसाठी GST ५% असायला हवा होता. पण तसे काही केलेले नाही. म्हणजे एकीकड़े सर्वाना परवडणारे घर अशी घोषणा करायची पण ती परवडणारी घरे बांधता यावीत ह्यासाठी जरुरी गोष्टी मात्र करायच्या नाहीत असे हे दुट्टपी वर्तन आहे. २) क्रेडिट कार्ड पेमेंट महागणार. सरकार डिजिटल पेमेंटला चालना देत आहे. मात्र जीएसटीनंतर क्रेडिट कार्ड बिल महागणार आहेत. आतापर्यंत क्रेडिट कार्ड बिलवर 15 टक्के सर्व्हिस टॅक्स होता. मात्र जीएसटीमध्ये हा टॅक्स तीन टक्क्यांनी वाढवून 18 टक्के करण्यात आला आहे. ---> क्रेडिट कार्डच्या बिलावर १५% सर्व्हिस टॅक्स कधी होता ? ३) पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि मद्य जीएसटीतून बाहेर ---> ह्या तरतुदीचा फायदा महाराष्ट्रासारख्या राज्यांना नक्की होईल. हल्लीच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महामार्गापासून ५०० मी. अंतरात दारू विक्रीला बंदी आली. त्यामुळे बुडालेला महसूल वसूल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पेट्रोल नावाच्या दुभत्या गाईवर ५ रुपये अधिभार वसूल करण्यास सुरवात केलेली आहे. GST मुळे महाराष्ट्र सरकारच्या उत्पन्नात घट झाल्यास (घट होणार आहे जे जवळपास नक्की) आणि केंद्र सरकारने महसूल उत्पन्नात झालेल्या घटीबद्दल केलेली भरपाई पुरेशी नसल्यास, महसूल वाढीसाठी महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवर परत अधिभार वाढवल्यास आश्चर्य वाटायवास नको.

पेट्रोलियम पदार्थ आणि दारू या दोन दुभत्या गाई जीएसटीमधून वगळून केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यांच्या महसुलावर टाच येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. अन्यथा पेट्रोल-डिझेलवर समजा फक्त अठ्ठावीस टक्के कर असता तर ते किती स्वस्त झाले असते! आणि हा सेवा कर नावाचा प्रत्यक्ष कर जो उत्पन्नरेषेच्या सर्व घटकांना त्यांच्या घेतलेल्या सेवांच्या प्रमाणात द्यायलाच लागतो, त्याचे प्रमाण सरकारने अत्यंत चलाखीने आता थेट अठरा टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. बारा टक्क्यांपासून सुरू झालेला हा कर. हळूहळू कर आणि उपकर मिळून पंधरा टक्क्यांवर नेला गेला होताच. आता अठरा टक्के झाल्याने बऱ्याचशा सेवा आणि बिले ही महागणार आहेत. जे चुकीचे आहे. बाकी जीएसटीचा मूळ उद्देश करआकारणीत सुसूत्रता आणि सुलभीकरण आणणे हा असतो. तो कितपत साध्य होतोय हे येणारा काळच ठरवेल.

चांगली माहिती मिळत आहे धाग्यातून पण झोपडपट्टीतल्या बायका जसे वचावचा भांडतात / टीव्हीवर सासू सुनांच्या सीरिअलीत जसे एकमेकांना टोमणे मारतात - तसे इथे कृपया भांडू नका.

जीएसटीमुळे भावकपात होईल अशी शक्यता कमी आहे. झालीच तरी तिचा फायदा अंतिम गिऱ्हाईकाला मिळण्यासाठी किमान वर्ष सहा महिन्याचा अवधी द्यावा लागेल. किंबहुना नजीकच्या भविष्यात तर भाववाढच झालेली जाणवेल. प्रशासकीय पातळीवर आपली व्यवस्था जीएसटी साठी तितकी सक्षम नाही असे माझे आकलन आहे. त्यामुळे सरकारला मोठ्या रोषाला बळी पडावे लागू शकते. पण मोठे व्यापारी आणि उद्योजक यांच्यासाठी हा निर्णय फायदेशीर आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक होऊन काही उद्योगक्षेत्रांना चालना मिळेल याची मोठी शक्यता आहे.

हि सिए उमेश शर्मा कडून आलेली इमेल्स आहेत. त्यांच्या वेबसाइट्सवरही www.karneeti.com प्रश्न-उत्तर याद्वारे GST उलगडून दाखवण्यात आला आहे. समजण्यास खूप सोपे आहे. बाकी GST तील अडथळ्यांची शर्यत कळेल लवकरच.

जीएसटीमुळे भावकपात होईल अशी शक्यता कमी आहे. असंच होईल. व्यापारी आपले प्रॉफीट मार्जिन वाढवेल. पण मोठे व्यापारी आणि उद्योजक यांच्यासाठी हा निर्णय फायदेशीर आहे. नक्कीच. अर्थात आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक होऊन काही उद्योगक्षेत्रांना चालना मिळेल याची मोठी शक्यता आहे. त्याच बरोबर निर्यातदाराला आपल्या उत्पादनावर देशात भरलेला संपुर्ण कर परत मिळणार असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक भावात आपले उत्पादन निर्यात करता येईल. हा जीएसटीचा मोठा फायदा आहे.

चर्चा तर छान चालू आहे . कुडतरकर साहेब तुम्ही दिलेल्या "दुव्या "साठी आमचा " दुआ " घ्यावा .__/\__ .

@संक्षी जी तुम्हीच एखादा HSN नंबर उदाहरणासाठी घ्या आणि त्याचे तुलनात्मक विश्लेषण करा. आमच्या ज्ञानात भर पडेल. GST ही संपूर्णतः कंप्युटराइज्ड सिस्टम असल्यामुळे अक्षरशः प्रत्येक वस्तू आणि सेवेला एक स्वतंत्र HSN (Harmonized System of Nomenclature) Code देण्यात आला आहे. या कोडचं तुलनात्मक विश्लेषण वगैरे काही करायचं नाही किंवा करताच येणार नाही. म्हात्रेंनी जे टेबल लावलं आहे त्यात सध्याच्या २४.५% दरावरुन, ती वस्तू GST मधे १२% वर आणून ठेवली आहे आणि आभासी स्वस्ताईची निर्माण केली आहे. वास्तविकात GST मधे प्रत्येक वस्तू (किंवा सेवेवरचे) सर्व प्रचलित टॅक्सेस एकत्र करुन ती वस्तू (किंवा सेवा) ५% - १२% - १८% किंवा २४% या चार पैकी कोणत्या तरी एका बास्केटमधे बसवली आहे. हे वर्गिकरण करतांना नेक्स्ट बेस्ट रेट हा (सरकारी दडपशाही) रुल लावला आहे. याचं उघड कारण म्हणजे सरकारला स्वतःचा तोटा करुन घ्यायचा नाही. उदा. सध्या सर्विस टॅक्स १५% आहे पण वरच्या चार दरात तो बसत नाही म्हणून सरळ पुढे ढकलून १८% केला आहे. म्हात्रेंना मी विचारतोयं की तुमच्या सध्याच्या २४.५% वरुन GST मधे १२% वर गेलेल्या वस्तूचा HSN Code द्या ! कारण त्यांनी लावलेलं टेबल हे `वरिष्ठ कॉर्पोरेट तज्ञानी' केलं आहे. म्हात्रे HSN Code कोड देऊच शकत नाहीत कारण अशी कोणतीही वस्तू नाही :) त्यामुळे तीन गोष्टी होतात : १) सदर टेबल वरिष्ठ कॉर्पोरेट तज्ञानी केलं हा पोकळ दावा आहे किंवा सदर तज्ञ अनभिज्ञ आहे. २) टेबलमधे दाखवलेली स्वस्ताई ही दिशाभूल आहे. ३) मी म्हटल्याप्रमाणे सध्याचे कर-दर आणि जिएसटीचे कर-दर जवळजवळ सारखेच असल्यामुळे सामान्यांसाठी स्वस्ताईचं गाजर बघणं सोडून द्या. वरच्या प्रतिसादात म्हात्रे `मी कुणाला बांधील नाही, योग्य वेळ आल्यावर देईन' वगैरे टिपी करत आहेत. त्यांनी कितीही वेळ घेतला तरी ते HSN Code कोड देऊच शकत नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

१. मी म्हटल्याप्रमाणे सध्याचे कर-दर आणि जिएसटीचे कर-दर जवळजवळ सारखेच असल्यामुळे ... २. हे वर्गिकरण करतांना नेक्स्ट बेस्ट रेट हा (सरकारी दडपशाही) रुल लावला आहे. याचं उघड कारण म्हणजे सरकारला स्वतःचा तोटा करुन घ्यायचा नाही. हा हा हा... इंग्लिश आकडे वाचता येणार्‍या कोणालाही खालील टेबले पाहून वरची वाक्ये सत्यापासून किती दूर आहेत हे कळणे सहज शक्य आहे. जर नवीन जीएसटी प्रणालीने हितसंबंधाना धक्का बसल्याने सत्याचा विपर्यास करायचा असला तर गोष्ट वेगळी... (स्त्रोत : https://www.bloombergquint.com/gst/2017/05/19/tax-rates-before-and-afte… वरून साभार) माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, "नवीन कर ठरवताना, जीवनावश्यक, नेहमीच्या गरजेच्या, सर्वसामान्य वापराच्या, चैनीच्या, इत्यादी प्रकारच्या वस्तूंचे कर ०% पासून सर्वसाधारणपणे चढत्या भाजणीने वर जात कमाल २८% पर्यंत ठरविलेले आहेत. (http://www.thehindu.com/business/Economy/article18514302.ece/BINARY/Sche...) यामुळे काही वस्तूंचे अंतीम करदर कमी-जास्त झाले असले तरी ते ग्राहकांच्या फायद्याचे व्हावे अशी काळजी घेतली गेली आहे.           एकंदरीत, अजून काही हवेतले दावे करण्याअगोदर अभ्यास वाढवणे जरूर आहे ! आणि हे शिल्लक राहिले आहेच ... http://www.misalpav.com/comment/945161#comment-945161 ते केले तर इतर बरेच गैरसमज दूर व्हायला मदत होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१) इंग्लिश आकडे वाचता येणार्‍या कोणालाही खालील टेबले पाहून वरची वाक्ये सत्यापासून किती दूर आहेत हे कळणे सहज शक्य आहे. डोळे उघडे ठेवून दर पाहिलं तर : अ) यात एकही वस्तू किंवा सेवा २४.५% वरनं १२% वर आलेली नाही ! थोडक्यात, म्हात्रेंनी स्वतःच्या प्रतिसादानं स्वतःलाच अडचणीत आणलं आहे :) ब) ओवर ऑल सर्व दर एकतर वाढलेले आहेत किंवा जैसे थे आहेत आणि कमी झालेले दर हे क्वचित लागणार्‍या वस्तू आणि सेवांवरचे आहेत . क) सर्विस टॅक्स सरसकट ३% वाढला आहे ही गोष्ट म्हात्रेंच्या अजून लक्षात आलेली दिसत नाही २) जर नवीन जीएसटी प्रणालीने हितसंबंधाना धक्का बसल्याने सत्याचा विपर्यास करायचा असला तर गोष्ट वेगळी... हा सुद्धा फसलेला डाव आहे. कारण मी जिएसटीकडे सामान्य नागरिक म्हणून पाहातो. इनडिरेक्ट टॅक्सेशनची प्रॅक्टीस मी करत नाही हे सुरुवातीलाच क्लिअर केलं आहे. तस्मात, व्यावसायिक दृष्टीनं मला, असल्या घोडे छाप कामाचा ना ताण, ना प्रोफेशनल रिसीट्सवर काही परिणाम. .......आणि ज्या टेबलपायी म्हात्रेंना इतका आटापिटा करावा लागतोयं तो HSN Code कोड ते अजूनही देऊ शकत नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

ज्याला साधे छापील इंग्लिश आकडे दिसत नाहीत / वाचता येत नाहीत अशा माणसाला काय म्हणावे बरे ?!

*dash1* *yahoo*

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आणि हे शिल्लक राहिले आहेच ... http://www.misalpav.com/comment/945161#comment-945161 एका अकाउंटींग प्रोफेशनलने याची टाळाटाळ करायचे काय कारण असावे बरे ???!!! *secret*

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मराठीच कळत नाही त्याला काय म्हणावे बरे ? तुम्हाला २४.५% वरुन १२% वर आलेल्या वस्तूचाHSN Code द्यायचा आहे :) तो तुम्हाला देता येत नाही म्हणजे तुमचा सगळा पसारा फेल गेला आहे. आणखी कोणत्याही टेबलची अपेक्षा करणं म्हणजे उगीच टिपी करणं आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही नुसतच २४-१२.. २४-१२ करत हुडकत गेला वाटते. कारण मला तर बऱ्याच वस्तू दिसल्या ज्यावरचा कर कमी झालाय. आणि सरळ साधा ट्रेंड पण लक्षात आला. रोज लागणाऱ्या आणि सगळ्या वर्गाच्या लोकांना लागणाऱ्या वस्तू जसे दूध, साखर, तेल , धान्य , lpg इत्यादी वरचा टॅक्स कमी झालाय आणि सो कॉल्ड चैनीच्या वस्तू, प्रोसेस्ड फूड वरचा टॅक्स वाढलाय. बाकी माफ करा पण बहुतांश व्यावसायिक प्रामाणिक असतात काहीच अप्रामाणिक असतात यावर विश्वास ठेवणे जरा अवघड आहे.

In reply to by पद्माक्षी

बाकी माफ करा पण बहुतांश व्यावसायिक प्रामाणिक असतात काहीच अप्रामाणिक असतात यावर विश्वास ठेवणे जरा अवघड आहे.
करांच्या बाबतीत प्रामाणिक असलेच पाहीजे असे काही नाही. प्रामाणिक आहोत असे दाखवता आले की झाले.

In reply to by पद्माक्षी

मला तर रोजच्या वापरातील वस्तू महाग झाल्याचे दिसतेय. असो प्रतीकांची नजर वेगळी. आणि भक्त तर काय , त्यांची गोष्टच वेगळी.

In reply to by पद्माक्षी

१) दूध स्वस्त झालं ? हा आयटेम `डेअरी अँड फार्म प्रडक्टस' मधे पाहा २) एलपीजी गॅस `किचनवेअर आणि अप्लायंसेस'मधे पाहिल्यामुळे गैरसमज झालेला दिसतो. ३) साखर (रिफाइंड) २६% वरुन १८% वर आणि तेल १२% वरुन ५% वर आणलं आहे हे मान्य. पण तूप ६% वरुन १२% वर गेलं आहे आणि त्याबरोबर टूथपेस्ट, रेझर्स, इंस्टंट कॉफी यामधली प्रत्येकी २% वाढ लक्षात घेतली तर ओवर ऑल फारसा फरक पडणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

म्हणजे पुरता वॉश आऊट मारला जाईल !

In reply to by संजय क्षीरसागर

बरं मग हि लिंक बघा; http://www.financialexpress.com/economy/gst-rate-new-tax-to-reduce-pric… किंवा हि http://www.india.com/business/gst-rollout-no-tax-on-milk-jaggery-list-o… किंवा मग "नास्तिक" लोकांसाठी खास NDTV ची लिंक; :) इथे तर लईच detail लिस्ट आहे. http://www.ndtv.com/india-news/after-gst-these-household-items-will-bec…

In reply to by पद्माक्षी

ज्या प्रतिसादावरुन निर्णयाप्रत आलात त्यात तुम्ही चुकीची टेबल्स पाहिली आहेत हे प्रथम मान्य करा !

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही चुकीची टेबल्स पाहिली आहेत हे प्रथम मान्य करा ! सगळ्या गोष्टींचे दर वाढले'च' आहेत हे तुमचे विधान चुकीचे आहे हे अगोदर मान्य करा. ३) साखर (रिफाइंड) २६% वरुन १८% वर आणि तेल १२% वरुन ५% वर आणलं आहे हे मान्य. पण तूप ६% वरुन १२% वर गेलं आहे आणि त्याबरोबर टूथपेस्ट, रेझर्स, इंस्टंट कॉफी यामधली प्रत्येकी २% वाढ लक्षात घेतली तर ओवर ऑल फारसा फरक पडणार नाही. टूथपेस्ट, रेझर्स, इंस्टंट कॉफी या गोष्टी साखर, तेला सारख्या मुबलक प्रमाणात वापरल्या जातात हे नवीनच आहे. जास्त प्रमाणात वापरल्या जाणार्‍या वस्तूंचे दर कमी झाले तर निश्चित फरक पडतो. अर्थ व्यवसायात असणार्‍याला किमान एवढी गोष्ट कळावी ही अपेक्षा फार नाही ना?

In reply to by रामपुरी

कुठे प्रतिवाद करत बसला आहात? त्यांना फक्त दुसरा कसा चुकीचा हेच दाखवणे "आवडते" अनुभवी (दशानन)

In reply to by दशानन

त्यांना फक्त दुसरा कसा चुकीचा हेच दाखवणे "आवडते" १००% सहमती. नुसते आवडत नसून तेवढेच जमते, कारण कुठल्याच प्रश्नाचे आणि त्यांनीच उकरून काढलेल्या वादांचे त्यांना नीटसे उत्तर देता आले नाहीये.

In reply to by ट्रेड मार्क

घाणेरडे स्कोर सेटलिंग आहे हे. दशानन हा आयडी तर केवळ स्कोर सेटलिंग करत काड्या करणे एवढ्याच हेतूने पुनः अवतरीत झालाय असे वाटते.

In reply to by अभ्या..

संक्षी सतत दुसऱ्यांना चुकीचेच नव्हे तर मूर्ख ठरवतात हे बऱ्याच धाग्यांमधून दिसतं. उगाच परत स्कोअर सेटलिंग होतंय असं व्हायला नको म्हणून फक्त याच धाग्याचं उदाहरण घेऊ. माझा आणि जीएसटीचा फारसा काही डायरेक्ट संबंध सध्या तरी येणार नाही, त्यामुळे मी फक्त वाचन करत होतो आणि तज्ज्ञांच्या प्रतिसादांमधून जरा माहिती मिळेल असं वाटत होतं. त्यामुळे त्रयस्थाच्या नजरेतून कसं होत गेलं ते सांगतो. धागा लेखक काय म्हणतात, म्हणजे धाग्याचा उद्देश काय? "काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?" यावर दुसराच प्रतिसाद संक्षींनी काय दिलाय बघा. "सामन्यांना कळला नाही तरी चालेल, तो कळण्यासारखाही नाही आणि कळून उपयोग ही नाही. व्यावसायिकांना मात्र तो कळून घेणं भाग आहे आणि एकदा कळल्यावर, कुठून झक मारली आणि हे सरकार निवडून दिलं, हे वाटण्यापलिकडे काही करणं आता त्यांच्या हातात नाही". त्यापुढे ही ते फक्त ते ढोबळ विधानं करत जातात. ग्राहकांना फारसा काही फरक पडणार नाही या पासून ते स्लॅब १२% ची १८% झाल्याने महागाई वाढेल. तसेच व्यापाऱ्यांना ३७ रिटर्न भरायला लागल्याने त्रास होईल हे परत परत सांगितलंय जातंय. काही सदस्यांनी उदाहरणे देऊन सांगितल्यावर ते नुसतं बरोबर आहे का चूक आहे ते सांगतात पण मग नक्की काय चूक आहे ते सांगत नाहीत. एकीकडे म्हणतात की ते अप्रत्यक्ष करांशी ते संबंधित नाहीत मग दुसऱ्यांना म्हणतात प्रत्यक्ष प्रोफेशनल सेमिनार मध्ये भाग घेतल्याशिवाय कळणार नाही. संपूर्ण धाग्यात संक्षींचा एक तरी प्रतिसाद दाखवा ज्यात त्यांनी उदाहरण देऊन कुठल्या वस्तूंचे भाव वाढणार/ कमी होणार हे स्पष्ट केलंय. असं गृहीत धरलं की काही वस्तूंचे भाव वाढणार आणि काहींचे कमी होणार, त्यामुळे सरासरीने सामान्यांना फारसा फरक पडणार नाही. तर व्यापारी व कारखानदार यांच्या कामकाजात काय फरक पडणार हे उदाहरणाने दाखवलाय का? नुसतं ३७ रिटर्न्स भरायचे एवढं सांगतात, पण मग सध्या किती रिटर्न्स आहेत, सध्याची प्रोसेस वि. नंतरची प्रोसेस अशी तुलना कुठे केली आहे का? विविध दुवे, एखादी वस्तू घेऊन उदाहरण वा टेबल्स देऊन, अर्थक्षेत्रात नसलेल्या बऱ्याच मंडळींनी आपापल्या परीने माहिती द्यायचा प्रयत्न केला. पण सी.ए. असूनही संक्षींनी असा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यात जीएसटी मध्ये सर्विस टॅक्स आणून अजून आमच्या मनातला गोंधळ वाढवतात. मग इतरांना दूषणे देऊन अज्ञानी, काही कळत नाही ई विशेषणे कशाला द्यायची? बाकी जीएसटी लागू होण्याची तारीख एक वर्ष आधीपासूनच जाहीर केली होती. मग तयारीला पुरेसा वेळ नाही अशी आरडाओरड का होतेय? समजा १ एप्रिल २०१८ पासून लागू करायचं ठरवलं तर तेव्हा तरी समस्त जनतेची तयारी पूर्ण होईल याची खात्री काय?

In reply to by रामपुरी

१ किलो साखर आणि १ लिटर तेल यावर मिळणारी सूट १ किलो तूपानं बाद होईल. आणि पुढचा प्रतिसाद वाचला असेल तर सर्विस टॅक्स ३% वाढल्यामुळे फोनबिलात आणि जिथे सर्विस टॅक्स लागतो तिथे किती वाढ होईल ते काढा. म्हणजे एकूणात काहीही फरक पडणार नाही हे कळेल. सर्व वस्तूंचे दर वाढलेच आहेत हे मी म्हणालो हा तुमचा शोध आहे. शिवाय तुम्ही टूथपेस्ट आणि रेझर वापरत नसाल किंवा कॉफी पित नसाल तर तो तुमचा प्रश्न आहे. त्या नेहेमीच्या वापरातल्या वस्तू आहेत. इथे `मुबलक' हा पुन्हा तुमचाच शोध आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

एक साधी गोष्ट लक्षात येते का बघा १ किलो साखर आणि एक किलो तेल संपायला लागणारा वेळ हा १ किलो तूप संपायला लागणार्‍या वेळापेक्षा कितीतरी कमी आहे. म्हणाजे साखरेची आणि तेलाची किंमत कमी झाली तर मला फायदाच होईल. एक महिन्यात साखर व तेल किती लागते आणि तूप किती लागते हे बघा. या तिन्हीच्या किंमती आणि प्रमाण घेऊन समीकरण मांडल्यास फायदा किती याचा निश्चित आकडा समजेल. तुम्ही टूथपेस्ट आणि रेझर, कॉफी, साखर आणि तेलाच्या प्रमाणात वापरत,असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. संसार करत असाल तर त्याचे प्रमाण कदाचित माहिती असेल. नसेल तरी तो तुमचाच प्रश्न आहे.

In reply to by रामपुरी

किंमतीत एक किलो तूप = तीन किलो साखर आणि दोन लिटर तेल आहे. तुम्ही टूथपेस्ट, रेझर, आणि कॉफी तेलाच्या प्रमाणात वापराण्याचा प्रश्न नाही. त्या नित्याच्या गरजा आहेत. आणि त्यामुळे बजेट वाढेल हे कळायला संसार करावा लागतो. सर्विस टॅक्सचा मुद्दा अजून लक्षात आलेला दिसत नाही त्यामुळे नंतर जाग येईलच.

In reply to by संजय क्षीरसागर

काय?? भलतेच विनोदी आहात हो तुम्ही. आधी डेटा द्या डेटा द्या म्हणून ओरडायचे, आणि दिला कि, " अरेच्या, तुम्ही दिली होय लिंक, पण आता मी नाही वाचणार. माझे १ ते १०० आकडे झाले कि म्हणून. आता काय उपयोग नाही. आधी मला शहाणा म्हणा, तरच बघेन मी" :). मजाच आहे. लहान पोरे पण हल्ली यापेक्षा जास्त रिझनेबल असतात. एनीवे, मी महिन्याला १ किलो तूप खात नाही. त्यामुळे माझ्यासाठी स्वस्ताई आहे. आणि तुमच्याशी बिनबुडाचा वाद घालण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. तुम्ही तुमचे २४-१२ हुडका. बेस्ट ऑफ लक. टाटा, बाय बाय

In reply to by पद्माक्षी

एकूण वस्तू कमी आणि जास्त अशा दोन्ही दर -प्रमाणात विभागल्या गेल्या आहेत . नक्की कोण किती तूप खातो आणि किती तेल वापरतो हा प्रश्न नाही . ते मिक्स्ड पॅकेज आहे. माझा मुद्या सामान्यांच्या जीवनात, जिएसटीमुळे सरसकट स्वस्ताई आली नाही हा होता. आणि म्हात्रेंनी डायरेक्ट टेबल टाकून फुल स्वस्ताईची घोषणा केली. पुढे म्हात्रेंना HSN code देता येईना तेव्हा त्यांनी पळवाट म्हणून नवी टेबतं चिटकवली :) थोडक्यात, कमी जास्त प्रमाणात दर- फरक आहेत पण एकूणात काही लक्षणीय होणार नाही. तुम्ही बहुदा कोणतीही सर्विस वापरत नाही त्यामुळे सर्विस टॅक्सची वाढ तुम्हाला कळालेली दिसत नाही. तुम्हाला स्वस्ताई आल्याचा झालेला आनंद जुलै एंड पर्यंत टिकवता येईल . तदनंतर मात्र उपरती होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

एक वात्रट टिका..... मला तर अगरबत्तीचे दर शुन्य % वरुन १२% आणि मेनबत्तीचा दर २६ % वरुन १२ % केल्याने वेगळाच वास येतोय. याचा अर्थ खालील प्रमाणे लावता येईल का? (आज काल कशाचाही अर्थ, कश्यासीही लावण्याची प्रथाच आहे, मग मी का मागे राहु.) कारण अगरबत्तीचा वापर मंदिरातुनच जास्त प्रमाणात होतो अगरबत्ती महाग करुन लोकांना मंदिरात जण्यापासुन परावृत करण्यासाठीचा तर हा डाव नसावा? जाणकारांनी उत्तर द्यावे.

In reply to by संजय क्षीरसागर

ज्या टेबलपायी म्हात्रेंना इतका आटापिटा करावा लागतोयं तो HSN Code कोड ते अजूनही देऊ शकत नाहीत. == HSN Code बाबत सहमत. HSN Code शिवाय सामान्य जनतेवर काय परिणाम होईल ह्यासाठी नंतर दिलेली टेबलं पण कुचकामी ठरतात.

In reply to by विशुमित

१) ज्या टेबलपायी म्हात्रेंना इतका आटापिटा करावा लागतोयं तो HSN Code कोड ते अजूनही देऊ शकत नाहीत. आणि आजचा प्रतिसाद पाहाता, आता म्हात्रे तो कोड देण्याची शक्यताच संपली ! :) २) HSN Code शिवाय सामान्य जनतेवर काय परिणाम होईल ह्यासाठी नंतर दिलेली टेबलं पण कुचकामी ठरतात. सांगा म्हात्रेंना !

In reply to by संजय क्षीरसागर

सांगा म्हात्रेंना ! == नको बाबा. प्रतिउत्तरात आलेली त्यांची मोठं मोठी वाक्य आणि बोल्ड केलेले उद्गारवाचक शब्द मला काय झेपणार नाहीत. सोयऱ्याची अशी कुचंबणा होते बघा (म्हात्रे सर हलके घ्या)

In reply to by विशुमित

मला ते सगळे प्रतिसाद वाचावे लागतात ! :) आता ते संपादक म्हटल्यावर त्यातला व्यक्तिगत भाग मलाच काढून टाकावा लागतो. मग आवांतर आणि अती अवांतर काढावं लागतं.... तेव्हा कुठे थोडाफार अर्थ निघतो. तो समजावून घेऊन मी शक्यतितक्या कमी ओळीत उत्तर देतो. आणि त्यावर...... पुन्हा त्यांचा आधीपेक्षा दीर्घ, विविध फाँटसमधला आणि उगीचच अंडर लाइन केलेला प्रतिसाद येतो !

In reply to by संजय क्षीरसागर

छ्या.. इतके कष्ट घेऊनही तुमच्या त्यागाची इथल्या पब्लीकला किंमत नाही. कधी कळणारही नाही... तरीही तुम्ही ज्ञानामृताची भट्टी जोमाने सुरू ठेवल्याबद्दल मी तुमचे शतशः आभार मानतो.

In reply to by विशुमित

मला ते सगळे प्रतिसाद वाचावे लागतात ! :) आता ते संपादक म्हटल्यावर त्यातला व्यक्तिगत भाग मलाच काढून टाकावा लागतो. मग आवांतर आणि अती अवांतर काढावं लागतं.... तेव्हा कुठे थोडाफार अर्थ निघतो. तो समजावून घेऊन मी शक्यतितक्या कमी ओळीत उत्तर देतो. आणि त्यावर...... पुन्हा त्यांचा आधीपेक्षा दीर्घ, विविध फाँटसमधला आणि उगीचच अंडर लाइन केलेला प्रतिसाद येतो !

In reply to by संजय क्षीरसागर

इतके सगळे करूनही... काही काळानंतर, प्रत्यक्ष करवाढ झालेली दिसली नाही आणि / किंवा लोक खूष आहेत असे दिसले की, संक्षींचा... "त्यात माझी काहीच्च चूक नाही. मी बरोबरच्च होतो. पण, सरकारनेच्च माझा अपेक्षाभंग केला." ....असाच्च प्रतिसाद येईल याची खात्री आहे. =)) =)) =))

In reply to by विशुमित

अजिबात काळजी करू नका ! तुम्ही माझ्या मतांवर योग्य/अयोग्य टीका केलीत तर मी त्याचा विरोध करेन पण माझा तोल जाणार नाही याची खात्री बाळगा. :) त्याविरुद्ध, तुमच्या त्या दुसर्‍या "सोयर्‍यांची" एकमात्र खरोखरची चूक दाखवून देण्याचा त्यांना संशय आला तरी, तुम्ही जन्मोजन्मीचे शत्रू होणार आणि तुमचे सगळेच्च चूकच्च असणार याची खात्री बाळगा ! ...धोक्याचा सल्ला दिला आहे, सांभाळून रहा. नंतर म्हणू नका की अगोदर का सांगीतले नाही. ;) :)

डोळे उघडे ठेवून दर पाहिले तर :

In reply to by संजय क्षीरसागर

डोळे उघडे ठेवून दर पाहिले तर : डोळे उघडे ठेवून दर पाहिले तर नि:शब्द व्हायला झाले ना ?! बघा हेच सांगत होतो मी केव्हापासून. =)) =)) =))

खरे सांगायचे तर महागाई वाढन्याला बरीच कारणे आहेत. यामधे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्या तेलाचे दर, पेट्रोल डीझेलचे दर, व्याज दर, चलन पुरवठा, मान्सून, अर्थ्व्यवस्थेतील काळा पैसा या गोष्टीही येतात. कोणताही कर आल्यने महागाई वाढेल किंवा स्वस्ताई येईल असे फारसे नसते. उदाहरन द्यायचे झाले तर इलेक्ट्रोनिक वस्तुचे देता येइल. या क्षेत्रातील वस्तुंवर जरी जास्त कर लावला तरी किंमत वाढेलच असे नाही. कारन या क्षेत्रात रोज नवीन तंत्राज्ञान येत असल्याने जुन्या वस्तुंचे दर आपोआप कमी करावे लागतात. तसेच समजा एखादी वस्तुची पुर्वी मुळ किंमत समजा रू.१०००० होती व त्यावर कर रू २००० असे ती वस्तु ग्राहकला १२००० ला मिळत होती. परंतु नवीन काय्द्याप्रमाने त्या वस्तुवर कर फक्त रू१००० येतो तर आपली अपेकक्षा आहे की ती वस्तु रू ११००० ला मिळावी. पन ग्राहकाला तर ही वस्तु रू १२००० ला खरेदी करायची सवय झाली आहे. अश्यावेळी व्यापरी त्या वस्तुची किंमत अश्याप्रकारे वाढवतो की करासहित वस्तु ग्राहकाला १२००० लाच मिळेल व त्याचा फाय्दा वाधेल..

बापरे ! सकाळपासून बरीच चर्चा झाली की ! आता सध्या जास्त वेळ नाही. जीएसटी रेडी होण्यासाठी तयारी करत आहे. निवांत भेटूया. तोपर्यंत एकोळी प्रतिसाद देतो.

In reply to by धर्मराजमुटके

तुम्हाला उपयोगी पडू शकेल अशी एक माहिती : आत्ताच टाईम्स नाऊ वर एक जाहिरात पाहिली. Zoho books नावाचे एक जीएसटी सॉफ्ट्वेअर रु२४९९/प्रतिवर्ष वापरायला मिळते आहे.

HSN Code ही काही नवीन गोष्ट नाही. कस्टममध्ये आधीपासूनच वापरात आहे. जगभरात वस्तू बरोबर ओळखण्यासाठीची खूण आहे. ड्युटी आणि सुरक्षा कारणांसाठी वापरतात. काही लोक इन्व्हॉईसवर पेन्सिल लिहितात तर काहीजण रबर पेन्सिल, लेड पेन्सिल, ग्रॅफाइट पेन्सिल असं लिहितात, तेंव्हा वस्तू ओळखण्यात गफलत न होण्यासाठी HSN Code. (दुकानदार तर काहीतरी अगम्यच लिहितात) १ ते ९८ चॅप्टर मध्ये HSN Codes विभागलेले आहेत. जसे कि चॅप्टर ८५ मध्ये इलेक्ट्रिकल वस्तू. चॅप्टर ८४ मध्ये मशिनरी आणि पार्ट्स. चॅप्टर ८७ मध्ये गाड्या वगैरे. HSN Code कोड आठ आकड्यांमध्ये असतो. पहिले दोन आकडे, तो कुठल्या चॅप्टर मध्ये आहे ते दर्शवतो. नंतरचे प्रत्येकी २ आकडे त्या चॅप्टर मधील सबग्रुप्स दर्शवतात आणि शेवटचे दोन आकडे ती वस्तू. CBEC Chapter अमुकअमुक असं गुगल्यास लगेच सापडेल.

जीएसटी रेडी होण्यासाठी तयारी करत आहे. >> ह्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. खरी अडचण इथे आहे. यंत्रणा तयार आहे का? नियम तयार आहेत का? अधिकारी तयार आहेत का? प्रोसेस तयार आहेत का? व्यापारी तयार आहेत का?

In reply to by अभिदेश

या प्रतिसादातील दुवा वाचला तर असे वाटते कि जी एस टी चे रिटर्न्स भरणे एवढे कठीण नाही. मला एक समजत नाही कि जी एस टी एवढा टाकाऊ आणि व्यवसायास मारक होता तर सर्व व्यावसायिकांनी जी एस टी आणा म्हणून आग्रह का धरला होता आणि आतापर्यंत आलेल्या सर्व पक्षाच्या सरकारांनी जी एस टी आणण्यासाठी पावले का उचलली असावीत? कोणताही प्रख्यात (स्वघोषित नव्हे) अर्थ तज्ज्ञ सुद्धा त्याला विरोध करताना आढळला नाही हा योगायोग तर नक्कीच नाही. मला वाटते त्याप्रमाणे जी एस टी ने महागाई कमी होणार नाही पण कर भरणी भविष्यात सुलभ होईल आणि जितक्या खिंडी(BOTTLENECKS) कमी होतील तितक्या कमी खिंडी व्यावसायिकांना लढवायला लागतील ( पक्षी :- जितक्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांची दाढी धरायला लागते तितका भ्रष्टाचार वाढत जातो ज्यामुळे काळ आणि पैशाचा अक्षम्य अपव्यय होतो). त्यामुळे भविष्यात व्यवसाय करायला जास्त सोपे जाईल असे वाटते. सुरुवातीला व्यावसायिकांना अज्ञाताची भीती (FEAR OF UNKNOWN) आहे असे वाटते. परंतु मी काही कर सल्लागार नाही किंवा सी ए पण नाही आणि मला यात काही समजते असा माझा दावाहि नाही तेंव्हा या समजुतीत काही चूक असेल तर ती मला दाखवल्यास मी ती बदलायला तयार आहेच जी एस टी वर इतकी जहरी टीका करणारे लोकांचे कुठे तरी, काही तरी जळते आहे किंवा कुठेतरी त्यांना त्यातून जोरदार नुकसान होण्याची भीती वाटत आहे असेच वाटते.

In reply to by सुबोध खरे

१)कोणताही प्रख्यात (स्वघोषित नव्हे) अर्थ तज्ज्ञ सुद्धा त्याला विरोध करताना आढळला नाही हा योगायोग तर नक्कीच नाही. हे कळायला जिएसटीचे प्रोफेशन सेमीनार अटेंड करायला लागतात. घरबसल्या वर्तमानपत्र वाचून ते कळण्याची शक्यता शून्य . २) मला वाटते त्याप्रमाणे जी एस टी ने महागाई कमी होणार नाही कळलं ना ? इथल्या जिएसटीएन नसलेल्या सदस्यांचा खरं तर तेवढाच संबंध आहे.... आणि आता हे तुमच्या व्यासंगी मित्राला सांगा !

In reply to by सुबोध खरे

http://m.thehindubusinessline.com/opinion/letters/gsts-time-has-come/ar… हे श्री अमर्त्य सेन म्हणतात संक्षी साहेब डॉ मनमोहन सिंह वाय व्ही रेड्डी आणि अमर्त्य सेन हे कदाचित आपल्यापेक्षा जास्त शिकलेले आणि हुशार नसतील पण जास्त प्रथितयश नक्की आहेत. आणि हे तिन्ही अर्थ तज्ञा G S T चे जोरदार समर्थन करत आहेत म्हणजे त्यात काही तरी चांगले नक्कीच असावे. आपल्याला पटत नसेल ठीक आहे आपल्या मताचा आदर आहे शेवटी काय आहे मी आपला एक साधा डॉक्टर आहे तेंव्हा अर्थतज्ज्ञ परिषदेत काही जात नाही पण चार शिकलेली माणसे चांगलं म्हणताहेत तर त्यात काही तरी असेल असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

आणि हो हे तिघेही मोदी सरकार सत्तेत असताना असे बोलले आहेत. म्हणजे विरोधी बाजूला सुद्धा G S T चांगला आहे असंच वाटतय. बघा बुवा तुम्हालाही बाजू बदलायची असेल तर.

In reply to by सुबोध खरे

खरे सर, तुमच्याविषयी आदर आहे. हा प्रतिसाद काडी टाकण्यासाठी नाही. पण ज्या तीन तज्ज्ञांचा आधार तुम्ही घेताय त्या मनमोहन सिंग, अमर्त्य सेन आणि रघुराम राजन या तिघांनीही नोटबंदीला विरोध केला होता. मग त्यावेळी ते अर्थ तज्ज्ञ नव्हते का?? म्हणण्याचा उद्देश असा की नोटबंदी, GST हे खूप मोठे आणि गहन विषय आहेत. त्यात हा काय म्हणतो किंवा तो काय म्हणतो या पेक्षा मार्केट आणि सामान्य जनता त्याला कशी सामोरी जाते, रिऍक्ट होते हे जास्त महत्त्वाचे आहे. GST मागे सरकारचा उद्देश प्रामाणिक असेलही किंवा नसेलही पण जनता त्याला कशी स्वीकारते ह्यावर यशापयश अवलंबून आहे.

In reply to by विशुमित

चिनार साहेब जी एस टी यशस्वी होतो कि नाही हा मुद्दा अलाहिदा आहे. संक्षी हे इतर सर्व "मूर्ख" आहेत असे गृहीत धरून प्रतिसाद देतात कि जी एस टी आणणे हे मूर्ख पणाचे आहे आणि फक्त अर्थतज्ज्ञांना त्याबद्दल कळते.माझ्या प्रतिसादांना त्यांनी वापरलेली भाषा तुम्ही पाहिलीत तर हे लक्षात येईल. किंवा त्यांच्या प्यूबिक रिंग च्या धाग्यावर त्यांची वक्तव्ये वाचली तरहि तुम्हाला लक्षात येईल. त्यांना फक्त एवढेच सांगायचे होते कि प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे/ नोबेल पारितोषिक मिळवलेले अर्थतज्ज्ञ ज्यांनी निश्चलनीकरणालाहि विरोध दाखवला होता आणि जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी सुद्धा जी एस टी चे जोरदार समर्थन केले आहे. मी एक यःकश्चित माणूस आहे. मला समजते कि नाही हा मुद्दा इथे नाहीच. "मीच काय तो शहाणा" याबद्दल त्यांना फक्त दाखवायचे होते कि इतरही प्रख्यात अर्थतज्ज्ञ लोक बोलतात ते काही कमी शहाणे नाहीत. कोणत्याही पक्षीय दृष्टिकोनातून याकडे पाहू नका. मोदी भक्त कि मोदिरुग्ण हा मुद्दा येथे नाहीच. तसे असते तर विरोधी पक्षांनी सुद्धा एकमताने जी एस टी विधेयक पस केले असते का? व्यवसाय करणे हो सुलभ आणि सहज व्हावे आणि भ्रष्टाचार कमी व्हावा हा जी एस टीचा मूळ हेतू आहे. भारतीय मनोवृत्ती पाहता तो किती सफल होईल कि नाही हे मी कसे सांगू शकेन? एवढेच आहे कि मी एक आशावादी माणूस आहे त्यामुळे जसे नोटबंदीचे मी स्वागत केले तसेच जी एस टी चे करतो आहे.

In reply to by सुबोध खरे

चिनार साहेब धागा प्रकाशित झाल्या झाल्या संक्षींनी दिलेला "दुसराच" प्रतिसाद जिएसटी हा विषय..... 23 Jun 2017 - 11:45 pm | संजय क्षीरसागर सामन्यांना कळला नाही तरी चालेल, तो कळण्यासारखाही नाही आणि कळून उपयोग ही नाही. व्यावसायिकांना मात्र तो कळून घेणं भाग आहे आणि एकदा कळल्यावर, कुठून झक मारली आणि हे सरकार निवडून दिलं, हे वाटण्यापलिकडे काही करणं आता त्यांच्या हातात नाही Smile हा त्यांचा प्रतिसाद त्यांची वृत्ती स्पष्टपणे दाखवतो.

In reply to by सुबोध खरे

तिच्यामायला ते जीएसटी - फियेस्टी गेलं उडत...मी कुठे कडमडलो होतो त्या धाग्याच्या दिवसात माहित नाही...बट फीलिंग व्हेरी अशेम्ड ऑफ myself ....लिंक द्या हो कृपया त्या "प्यूबिक रिंग " च्या धाग्याची..असे इंटरेस्टिंग धागे नजरेतून कसे निसटतात काय माहित ? लवकर द्या हो कुणी तरी ती लिंक !!!!