माझ्या चित्रातले पक्षी चौकट तोडून मोकळ्या आकाशात आले
तेव्हा दिसलं
इंद्रधनुष्य कवेत घेण्यासाठी
रिमझिमतं आभाळ तर
कधीचं ओथंबून वाकलंय
वीट वीट पारखून बांधलेल्या माझ्या कुंपणापलीकडे मी पाहिलं
तेव्हा दिसलं
मी सहज फेकलेल्या विटेवर
माझं श्रेय-प्रेय तर
कधीचं उभं ठाकलंय
अंधार पीत पीत मी इथवर आलो उजेडाच्या प्रतीक्षेत
तेव्हा दिसलं
माझ्या रोमरोमात तर
पहाटेचं तेज
कधीचं फाकलंय
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2824
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर!!
वाह!
गुड. तुमच्या कवितांच्या
सहमत. सुंदर प्रतिमा !
In reply to गुड. तुमच्या कवितांच्या by एस
रुपी, अत्रुप्त आत्मा, एस ____/\____
मस्त
माझ्या रोमरोमात तर पहाटेचं तेज कधीचं फाकलंयहे विशेष आवडलंइ.डो.,धन्यवाद
सुरेख!
वाह!!!
फूत्कार, पद्मावति, सनकी...
सुर्रेख!
सत्यजित, धन्यवाद! शेवटचा ब॑ध...
मेळविता एकेक पणती,उजळता
In reply to सत्यजित, धन्यवाद! शेवटचा ब॑ध... by अनन्त्_यात्री