जगायास कारण ईतकेच आहे...
नवे रोज धागे नवा पेच आहे
जगायास कारण ईतकेच आहे!
कुणी एकटा जात नाही प्रवासा
कुणी चालताना कुणा ठेच आहे!
कुणी आरसा काल देवून गेले
मला भेटतो मी नव्यानेच आहे!
कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे
उभे विश्व सारे फुकाचेच आहे!
नको फार त्रागा करु तू उन्हाचा
सखी सावली या उन्हानेच आहे!
—सत्यजित
:)
कुण्या वर्तुळाच्या कडेने
संदीप,फुत्कार धन्यवाद!
अप्रतिम !!! कविता आवडली.
नको फार त्रागा करु तू उन्हाचा
धन्यवाद!
सुंदर!