✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

या गुलाबाच्या फुलाला...

स — सत्यजित..., Mon, 05/08/2017 - 04:41
पाहिजे तर बाग सारा,आज तू जाळून जा... या गुलाबाच्या फुलाला,आज तू माळून जा! सांगतो वारा खबर..तू यायची अन् जायची... तू मला भेटून जा..वा,तू मला टाळून जा! तू दिलेल्या डायरीचे,काय झाले ऐक ना... एकदा माझ्या मनाचे,पान तर चाळून जा! चांदण्याचा कवडसा मी,मोल माझे काय ते? तू नभीचा चंद्रमा हो..वचन दे..पाळून जा! मेघ राहू दे तुझे तू,दाटलेले अंतरी... वेदनेवर दोन अश्रू,कोरडे ढाळून जा! प्रीत-पत्रे-शेर-कविता..फोल तू ठरवून जा... कैफियत ऐकून माझी,मजवरी भाळून जा! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
1548 वाचन

💬 प्रतिसाद (2)

छान

धनावडे
Tue, 05/23/2017 - 20:18 नवीन
छान
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
गुरुवार, 05/25/2017 - 02:43 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद सुश मय! आपला एकमेव प्रतिसादही लाख मोलाचाच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा