Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 05/07/2017 - 00:54
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
खुशवंत, सिंग वन-शॉर्ट-ऑफ अ सेंश्युरी वर बाद झाले. त्यांनी आनंदानं जगायला (आणि मरायला) नक्की काय लागतं याची १० सूत्रं मांडली. मध्यंतरी याचा एक वॉटस-अ‍ॅप फॉरवर्ड पण फिरत होता. तरीही ही सूत्रं वाचून आंमलात आणण्याजोगी नक्कीच आहेत, त्या निमित्तानं हा लेखनप्रपंच ! खुशवंत म्हणतात, मी अनेकदा सुख नक्की कशात आहे, माणसाला सुखानं जगायला नक्की काय करायला हवं याचा विचार केलायं. १) तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीरस्वास्थ्य ! जर शरीरस्वास्थ्य नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. साधीशी का असेना, एखादी जरी व्याधी असेल तर ती जगण्याचं सुख कमी करते. २) दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकस्वास्थ्य ! याचा अर्थ तुमच्याकडे करोडो रुपये हवेत असा नाही. तर तुम्हाला हव्या त्या सुविधा, स्वतःच्या सृजनात्मकतेसाठी असणारी मोकळीक...कधी वाटलं तर बाहेर जाऊन जेवणं, एखादा सिनेमा, समुद्र किनारी किंवा डोंगर-दरीतली एखादी सहल करण्याइतपत तरी तुमची आर्थिक ऐपत हवी. आर्थिक चणचण तुम्हाला हतोत्साह करु शकते. आणि उधारी किंवा कर्ज तुम्हाला एकप्रकारचा अवमानकारक फिल देऊ शकते. ३) खुशवंत म्हणतात : स्वतःच घर असणं हा एक मोठा सुखाचा भाग आहे. भाड्याच्या घरात तुम्हाला आपलेपणा आणि निर्धास्तता वाटत नाही. जर तुमच्या घराशी छोटीशी का होईना, बाग फुलवली तर उत्तम ! स्वतः लावलेली झाडं मोठी होतांना आणि बहरतांना बघणं, सृष्टीशी एकतानता साधण्याचा आनंद देतं. ४) एक समंजस सहचारिणी असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ती तुमची पत्नी असो, जिच्याशी शारिरीक जवळीक आहे अशी मैत्रिण असो की नुसती मैत्रिण असो. जर (सहचारिणीशी ) कमालीचे मतभेद असतील तर तुमचा मनोभंग होईल. मतभेद विसरुन एकमेकांचा स्वीकर करत कलहविरहीत जगणं कधीही बरं ! ५) तुमच्यापेक्षा श्रेष्ठांचा मत्सर करणं थांबवा ! ते आर्थिकदृष्ट्या पुढे असतील किंवा प्रसिद्धी पावलेले असतील, पण मत्सर जीवनाची मजा घालवतो. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा. ६) तुमच्याबद्दल कुचाळक्या करणारे दूर ठेवा. त्यांच्या दोषारोपांशी दोन हात करतांना तुम्ही थकून जाल आणि त्यांनी केलेली मानहानी तुमचं जीवन निष्कारण विषाक्त करुन जाईल. ७) स्वतःला आनंदी ठेवतील असे एक-दोन तरी छंद आयुष्यात हवेत. मग ते बागकाम असेल, लेखन किंवा वाचन असेल, चित्रकला असेल, वादन असेल, किंवा संगीत ऐकण्याचा छंद असेल. क्लबात जाऊन टिपी करणं, पार्ट्यात जाऊन फुकटची पीणं, प्रथितयश व्यक्तींच्या मागेमागे करणं हे अक्षम्य कालापव्यय आहेत. स्वतःला विधायकतेनं रमवणारी परिमाणं असणं गरजेचं आहे . ८) रोज सकाळी आणि संध्याकाळी, दहा/दहा मिनीटं ध्यान किंवा सिंहावलोकनाला ठेवा. सकाळच्या १० मिनीटांपैकी ५ मिनीटं नुसतं शांत बसा. आणि ५ मिनीटं दिवसभरात काय करायचं ते ठरवा. संध्याकाळी सुद्धा ५ मिनीटं नुसत शांत बसा. आणि उरलेल्या ५ मिनीटात आपण ठरवलेल्या कामातली किती पार पाडली याचा आढावा घ्या. ९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज व्यथित होणं किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणं, टाळता येईल तेवढं बरं ! अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला. १०) सर्वात महत्त्वाचं म्हणजे जायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नसायला हवा किंवा तुमची कुणाविषयी काहीही तक्रार नको ! ___________________________________ स्वतःचा मृत्यू-लेख खुशवंत सिंगांनी असा लिहीला आहे : Here lies one who spared neither man nor God; Waste not your tears on him, he was a sod; Writing nasty things he regarded as great fun; Thank the Lord he is dead, this son of a gun या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही, याच्या मृत्यूचा शोक करु नका, हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता. प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता. हा गेला ते देवाचे उपकार आहेत.... हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !
  • Log in or register to post comments
  • 40412 views

प्रतिक्रिया

Submitted by उदय on Wed, 05/10/2017 - 20:36

In reply to साहेब by सुबोध खरे

Permalink

डांबरट अजून छान आहे, पण तो

डांबरट अजून छान आहे, पण तो चालेल का हे सर्वज्ञ स्वामी शो शो (दाखवा-दाखवा-माझीच-लाल फेम उर्फ शोऑफ ओशो) यांनाच विचारा.
  • Log in or register to post comments

Submitted by अमेरिकन त्रिशंकू on Wed, 05/10/2017 - 21:20

In reply to साहेब by सुबोध खरे

Permalink

काहीही ! डांबरावर हिरवळ कधी

काहीही ! डांबरावर हिरवळ कधी उगवते का?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 05/11/2017 - 12:07

In reply to अनुवाद गंडला आहे by उदय

Permalink

@ उदय,

(तुम्ही वेबसाइटच्या पोस्टवर दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार मानून लिहीतो) son of a gun ला अक्करमाश्या (= अनौरस) हा शब्द अजिबात सुयोग्य नाही. son of a gun ला जवळचा शब्द म्हणजे धूर्त, ठग किंवा तुच्छ. son of a gun चा संपूर्ण उहापोह इथे केला आहे. तुमच्या माहितीसाठी, तो शब्द `son of a bitch' चा माइल्ड फॉर्म गणला जातो ! तस्मात `अक्करमाश्या' हा प्रतिशब्द पर्फेक्ट आहे हे निदर्शनास आणून देतो. शिवाय लिव हाच उच्चार बरोबर आहे. फार सॉफ्ट व्हायला नको म्हणून मी लीव लिहीलं इतकंच, तितपत मान्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 05/10/2017 - 21:12

In reply to @ अढे by संजय क्षीरसागर

Permalink

>>बाय द वे, सदस्यांनी केलेले

>>बाय द वे, सदस्यांनी केलेले `छान अनुवाद' पाहा ! (१) "गवतपट्टा" मस्करीत लिहिलेल्या "गवतपट्टा" शब्दाला गांभीर्याने घेणे तुमच्या अनाकलनाची परिसीमा बयाँ करते.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Wed, 05/10/2017 - 21:19

In reply to >>बाय द वे, सदस्यांनी केलेले by सतिश गावडे

Permalink

'कमालीच्या' हा शब्द ऍडजस्ट

'कमालीच्या' हा शब्द ऍडजस्ट करून घ्या न कुठेतरी !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 05/10/2017 - 23:48

In reply to >>बाय द वे, सदस्यांनी केलेले by सतिश गावडे

Permalink

सारखं बयाँ, बयाँ चाललयं...

सारखं बयाँ, बयाँ चाललयं... कोण ही बया ?! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/11/2017 - 08:19

In reply to सारखं बयाँ, बयाँ चाललयं... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

एकच बया, बाकी सारे वाया

एकच बया, बाकी सारे वाया =))
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 05/11/2017 - 10:46

In reply to सारखं बयाँ, बयाँ चाललयं... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

बानुबया

बानुबया बानुबया बानुबया बानुबया (...पुढचं गाणं तुम्ही म्हणा.)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 05/10/2017 - 19:20

Permalink

सगळे मिपाकर वाह्यात आहेत...

सगळे मिपाकर वाह्यात आहेत... स्वामीजी.. तुम्ही फंडा नंबर ६ वापरून सर्वांना दूर का ठेवत नाही..? (अतीवाह्यात) मोदक.
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Wed, 05/10/2017 - 20:04

Permalink

वा

अतिशय भव्य दिव्य अनुवाद. 'मोकलाया' च्या तोडीस तोड आहे. प्रतिसादातून केलेले मनोरंजन हा बोनस. वाचनखूण साठवून ठेवण्यात येईल. धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on गुरुवार, 05/11/2017 - 11:09

Permalink

टेन कमाण्ड्मेन्टस

१.Never obey anyone's command unless it is coming from within you also. हौ अबाउट बॉस ... नोकरी जाईल ना भाउ आमचा पैल्या प्रथमच बल्ल्या झाला ना राव
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/11/2017 - 11:44

In reply to टेन कमाण्ड्मेन्टस by विटेकर

Permalink

हाहा

ही पहीली कमांडमेंट स्वच्छंद करणाऱ्या लोकांसाठी असावी, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by देशपांडे विनायक on गुरुवार, 05/11/2017 - 12:14

Permalink

Definition of son of a gun

Definition of son of a gun for English Language Learners : a person (especially a man) or thing that you are annoyed with —used by a man to address a male friend —used to express mild surprise, disappointment, etc.ही व्याख्या आणि खुशवंतसिंग बद्दल ची होणारी चर्चा यावरून मला खालील शब्द सुचवावासा वाटतो '' बारा XXX ''
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on गुरुवार, 05/11/2017 - 12:54

Permalink

संक्षी सर

माझं इंग्लिश फार कच्च आहे :) लिखाण तर त्याहून . त्यामुळे काही सुधारणा करू नाही शकणार . तरी आपण २-४ सूचना ऐकून घेतल्या असत्या आणि त्या दृष्टीनेही विचार होऊ शकतो असे म्हणाला असतात तरी तुम्हाला जी व्याख्या अभिप्रेत होती त्यावर सुसंगत चर्चा होऊ शकली असती . जसा मुद्दा कि हिरवळ हा शब्द तुम्हाला अभिप्रेत जो होता तो वेगळा होता . आणि ते तुमचे पूर्ण वैयक्तिक स्वातंत्र्य आहे . कारण लिखाण तुमचं आहे . तरी थोडं संयमाने ऐकून घेतलं असतात तर बरं झालं असतं. आयता झेल नसता मिळाला .
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 05/11/2017 - 13:45

In reply to संक्षी सर by वरुण मोहिते

Permalink

वमो,

सगळे प्रतिसाद शांतपणे वाचूनच मी प्रतिसाद देतोयं. दोन शब्दांवर शब्दच्छल चाललायं. पैकी एक दुरुस्ती पण केली आहे कारण तसा मराठी प्रतिशब्द मला त्यावेळी सुचला नव्हता. दुसरा शब्द योग्य अनुवादित केला होताच. माझ्या दृष्टीनं बाकी काही इश्यू नाही. त्यामुळे सदस्यांना आयता झेल वगैरे मिळाला नाही. जर कुणी योग्य अनुवाद करु शकलं असतं तर माझी मान्य करण्याची तयारी होतीच पण तसं झालं नाही हे सगळे प्रतिसाद वाचून कळेलच.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 05/11/2017 - 14:09

In reply to वमो, by संजय क्षीरसागर

Permalink

संक्षी "तुम्ही अहंकारी आहात"

संक्षी "तुम्ही अहंकारी आहात" हे एकदा शिक्कामोर्तब झाले आहे ना. आता आखा धागा जरी तुम्ही बदलला तरी समाधान होणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 05/11/2017 - 15:35

In reply to संक्षी "तुम्ही अहंकारी आहात" by विशुमित

Permalink

त्याची सुरुवात मोठी मजेशीर आहे !

थोडक्यात सांगतो. मी इथे आलो तेव्हा अध्यात्मातल्या इथल्या दिग्गजांचा फार बोलबाला होता. कुणी कुणाला सूक्ष्म देहातून पार पाचशे किलोमीटरवर भेटायचं आणि सल्ले द्यायचं, कुणी चक्रमासारख्या परिक्रमा करुन धागे टाकायचे, कुणी भल्या मोठ्या आरत्या आणि त्यावर कल्पनाविलासाचे निबंध लिहायचे आणि बाकी सगळे `वॉव! ग्रेट!! सिंप्ली सुपर्ब !" वगैरे करायचे. मी आपलं सरळ-साधं लिहायचो की देव ही मानवी कल्पना आहे, परिक्रमा कालापव्यय आहे, आरती टिपी आहे... आता जगातले ९०% लोक देवभोळे, त्यांची छातीच होत नाही देव नाही म्हणायला ! पण सांगतायं कुणाला ? कारण मुद्याचा प्रतिवाद कसा करणार ? मग आरत्या बंद पडल्या, ग्रेट अध्यात्मिक पोस्टस येईनाश्या झाल्या, परिक्रमा एपिसोडस थांबले. त्यावर लोकांनी एक नामी शक्कल लढवली ! मला अहंकारी ठरवून टाकलं ! आता धाग्याचा कशाशी काही संबंध नसो, मुद्दा काहीही असो, सदस्य कुणीही असो, प्रतिवाद जमला नाही की तो एकच टेप लावतो : अहंकारी !
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on गुरुवार, 05/11/2017 - 15:58

In reply to त्याची सुरुवात मोठी मजेशीर आहे ! by संजय क्षीरसागर

Permalink

हे उत्तरच अहंकारी आहे .

असो . जसा तुमचा अनुभव तुम्हाला श्रेष्ठ वाटतो तसा लोकांचा लोकांना . जाऊदे . ते खुशवंत सिंग पण जागे असतील अजून धागा पाहत :))
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 05/11/2017 - 16:15

In reply to हे उत्तरच अहंकारी आहे . by वरुण मोहिते

Permalink

वमो !

लोकांना त्यांचे अनुभव श्रेष्ठ वाटतात ते योग्यच आहे. इथे पाकीट हरवण्यावरचा धागा आहे तो लेखकाच्या दृष्टीनं मंत्र सामर्थ्य आणि देवावरची श्रद्धा यावर बेतला आहे. तिथे सुद्धा मी माझा विचार मांडला आहे. नाही तर संकेतस्थळावर चर्चा कसली होणार ? सो तो प्रश्न नाही, मला अहंकारी कशामुळे ठरवलं गेलं ते सांगितलं ! बाकी खुशवंतसिंगांकडे व्यक्ती म्हणून पाहाणं निरुपयोगी आहे. ती एक जगण्याची वृत्ती आहे आणि त्या अर्थानं प्रत्येकात लपलेला खुशवंतसिंग धागा वाचून जागा व्हावा म्हणून तर ही पोस्ट ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेशीवरचा म्हसोबा on Fri, 05/12/2017 - 09:07

In reply to त्याची सुरुवात मोठी मजेशीर आहे ! by संजय क्षीरसागर

Permalink

नंगेसे खुदा भी डरता हैं तर

नंगेसे खुदा भी डरता हैं तर मिपाकर तुम्हाला वचकून राहीले तर त्यात काही नवल नाही. त्या आरत्या बंद होण्याचे कारण वेगळे होते. त्या आरत्या करणारे प्रवचनकार भलतीकडेच आरत्या ओवाळू लागले. म्हणून त्यांची हाकलपट्टी झाली. तुम्हाला मात्र वाटते की तुमचा प्रतिवाद न करता आल्याने आरत्या बंद झाल्या. शी बै.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on गुरुवार, 05/11/2017 - 14:28

Permalink

मी काय म्हणतो...ते सन ऑफ

मी काय म्हणतो...ते सन ऑफ गनसाठी बंदुकीची औलाद ऐवजी तोफखाना हा शब्द जमेल का?? ह्याला पर्यायी शब्द तोफचंद सुद्धा आहे. आमच्याकडे "तो काय तोफचंद आहे का?" असं म्हणायची पद्धत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/11/2017 - 14:42

Permalink

सल्ला.

संक्षीसेठ, तुम्ही एकदा लेख टाकला की काही प्रतिसादांकडे दुर्लक्ष का करीत नाही, असा प्रश्न मला राहून राहून पडतो. राहीलं काहींचा हिशेब चुकता करायचा विषय तर जालावर संधी खूप वेळा मिळते, तेव्हा हयगय नै करायची. धुधु धुवायचं असं माझं स्पष्ट मत आहे. ;) - दिलीप बिरुटे (संक्षीजालमित्र)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 05/11/2017 - 15:53

In reply to सल्ला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

डिबी,

एकतर विषय तिथेच संपवलेला बरा असं माझं मत आहे. त्यामुळे स्कोर सेटलींगचा प्रश्नच उरत नाही. शिवाय प्रतिवाद करायला मला ही मजा येते. बघा ना, या निमित्तानं माझा इंग्लीश स्लँग्ज, प्रनंन्सीएशन, मराठीतले प्रतिशब्द यांचा बराच अभ्यास झाला ! बाकी तुम्हाला लेख आवडला याबद्दल धन्यवाद ! मित्रांचा उर्मटपणा सोडून द्यायचा हे मान्य पण आपला वाद मुद्याशी असला की लिहायला मजा येते.... आणि मुद्दा कायम निर्वैयक्तिक असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 05/11/2017 - 16:09

In reply to डिबी, by संजय क्षीरसागर

Permalink

आणि मुद्दा कायम निर्वैयक्तिक

आणि मुद्दा कायम निर्वैयक्तिक असतो. == हाच मुद्दा तुमचा फार आवडतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 05/11/2017 - 16:19

In reply to डिबी, by संजय क्षीरसागर

Permalink

मला पण प्राडॉ सरांना डीबी असे

मला पण प्राडॉ सरांना डीबी असे म्हणावेसे वाटते पण काय करणार.... नाईलाज आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 05/11/2017 - 16:22

In reply to मला पण प्राडॉ सरांना डीबी असे by अभ्या..

Permalink

बादवे खंप्लीट अवांतरः माझ्या

बादवे खंप्लीट अवांतरः माझ्या घराजवळच्या पोलिश दुकानात हे पाणी मिळतं. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 05/11/2017 - 16:28

In reply to बादवे खंप्लीट अवांतरः माझ्या by आदूबाळ

Permalink

सरांचा सगळा कारभारच रॉयल.

=)) सरांचा सगळा कारभारच रॉयल. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 05/11/2017 - 16:43

In reply to बादवे खंप्लीट अवांतरः माझ्या by आदूबाळ

Permalink

पाणी? ..ते ही बिरुटे नावाचे??

पाणी? ..ते ही बिरुटे नावाचे?? मी मरताना गंगेऐवजी ह्या पाण्याचे चार थेंब द्या बरका. पुढच्या जन्मी तरी सुखात राहीन म्हणतो. =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 05/11/2017 - 17:08

In reply to पाणी? ..ते ही बिरुटे नावाचे?? by अभ्या..

Permalink

आबा ! नीट बघ,

पाण्याच्या बाटलीतून बिरुटे नांवाचा वोडका विकत असतील :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/11/2017 - 17:36

In reply to बादवे खंप्लीट अवांतरः माझ्या by आदूबाळ

Permalink

हाहाहा

च्यायला, माझी परवानगी न घेता माझं आड़नाव कोण वापरतय ? =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 05/11/2017 - 21:10

In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

डिबी, आबाकडनं पत्ता घ्या,

रीतसर नोटीस पाठवा आणि कंपनी ताब्यात घ्या ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/11/2017 - 21:25

In reply to बादवे खंप्लीट अवांतरः माझ्या by आदूबाळ

Permalink

आबांच्या गावात आणि

आबांच्या गावात आणि बिरुटेंच्या भावात =))
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 05/12/2017 - 10:17

In reply to मला पण प्राडॉ सरांना डीबी असे by अभ्या..

Permalink

आमच्या भाषेत डी बी म्हणजे डबल

आमच्या भाषेत डी बी म्हणजे डबल बॅरल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/11/2017 - 14:49

Permalink

अरे हो अनुवाद आवडला.

६) तुमच्याबद्दल कुचाळक्या करणारे दूर ठेवा. त्यांच्या दोषारोपांशी दोन हात करतांना तुम्ही थकून जाल आणि त्यांनी केलेली मानहानी तुमचं जीवन निष्कारण विषाक्त करुन जाईल. अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला हे छान आहे. लक्षात ठेवा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 05/11/2017 - 15:40

In reply to अरे हो अनुवाद आवडला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+1000

+1000
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 05/11/2017 - 16:28

In reply to अरे हो अनुवाद आवडला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सरांच्या या प्रतिसादाशी सहमत.

सरांच्या या प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by सप्तरंगी on गुरुवार, 05/11/2017 - 17:18

Permalink

अनुवाद चांगलाच पण हिरवळ खटकली

संक्षी खरं तर १० सूत्रांचा अनुवाद खरोखर चांगला केला आहे. आणि मुख्य म्हणजे तो 'आपण' त्याला अनुसरून वागण्याचा प्रयत्न करावा असे आहे. ५ ते १० पॉईंट्स तर अति महत्वाचे वाटले. पण इतक्या चांगल्या अनुवादाला तुम्हाला प्रतिसाद का असे का आले....(अर्थात मी एन्जॉय केले ते हि), विचार करावा, सुज्ञास सांगणे न लगे ! मात्र मृत्युलेखाचा अनुवाद त्यांना जे सांगायचे आहे त्याला अधोरेखित करत नाही असे वाटते. उदाहरणअर्थ : sod चा शब्दाश: अनुवाद '' हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता '' हा खटकला. इथे त्यांना ते किंवा डिफिकल्ट पर्सन किंवा एक शुल्लक आहेत आणि उगीच त्यांच्यावर असावे गाळत बसू नका असे काहीसे अभिप्रेत असावे असे वाटते. मग इथे 'हिरवळ' हा पॉसिटीव्ह शब्द आल्यामुळे अनर्थ झाल्यासारखा वाटतो, हे त्यांचे म्हणणे असावे असे मुळीच नाही वाटत. माझेही चित्रांसारखीच माझी मराठी भाषाही तितकी चांगली नसेल त्यामुळे मला कृपया मला अनुवाद करायला सांगू नका जसा पैसाताई ला सांगितलात. त्यामुळे नक्की अनुवाद कसा करायचा हे इतर जाणकार सांगतीलच किंवा तुमची परत विचार करून करू शकाल , मला किंवा सगळ्यांनाच सगळ्यातले सगळेच ज्ञान आणि प्रतिभाही नसते :))
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 05/11/2017 - 17:49

Permalink

हा माणूस बंदुकीची औलाद होता !

हा माणूस बंदुकीची औलाद होता ! ख्या.ख्या.ख्या खी खी खी ! वरती खुशवंत सिंग यांनी हे वाचले तर त्यांना परत कार्डियाक अरेस्ट व्हायचा ! बाकी जिलबी बाबांनी वरती मंत्र असा उल्लेख केलेला दिसला... वाचकांसाठी जिलबीचे ताट ;) : मंत्रयोग - जपयोग बाकी जिलबी बाबा गीता न वाचता त्या बद्धल बोलु शकण्याचा दावा करु शकतात यातच सर्व काही आले, नाही ? त्यांना गीता न वाचता त्या बद्धल बोलायचे सामर्थ्य कसे प्राप्त झाले ? या बद्धल त्यांनी अजुनही उत्तर दिलेले नाही ! :प बाकी ही जिलबी विनोदी होती ! :प मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Indian techies take to social media to vent their ire
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 05/11/2017 - 20:17

Permalink

Son of a gun साठी

लय बाराचा/अवलादी/भंटोल (हा वैदर्भीय शब्द आहे) हे शब्द कसे वाटतात? बाकी अनुवादाबद्दल श्री.म. माटे जे म्हणाले आहेत - एका कुपीतलं अत्तर दुस-या कुपीत ओतणं - ते अगदी शंभर टक्के खरं आहे. आणि असं अत्तर ओतत असताना एक-दोन थेंब इकडे तिकडे जातात. त्याबद्दल इतका वितंडवाद घालण्याचं काय कारण आहे ते समजलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 05/11/2017 - 20:44

In reply to Son of a gun साठी by बोका-ए-आझम

Permalink

ओ बोकाशेठ.. ते मोसादचे बघा की

ओ बोकाशेठ.. ते मोसादचे बघा की...
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 05/11/2017 - 21:17

In reply to Son of a gun साठी by बोका-ए-आझम

Permalink

आझम भाई, क्या बात है !

असं अत्तर ओतत असताना एक-दोन थेंब इकडे तिकडे जातात. त्याबद्दल इतका वितंडवाद घालण्याचं काय कारण आहे ते समजलं नाही. इतक्या कल्लोळात पहिला सूज्ञ प्रतिसाद . पब्लिकला अत्तरामधे इंटरेस्टच नाही !!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 05/12/2017 - 10:16

In reply to आझम भाई, क्या बात है ! by संजय क्षीरसागर

Permalink

इतक्या कल्लोळात पहिला सूज्ञ

इतक्या कल्लोळात पहिला सूज्ञ प्रतिसाद. बघितलं काय बोका शेट. प्रथम पुरुषी एकवचनी आणि पुढे अहं आवाम वयम!
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on गुरुवार, 05/11/2017 - 22:21

Permalink

सर तुमचा मुळाशी जुळलेला हा

सर तुमचा मुळाशी जुळलेला हा अनुवाद बरोबर आहे आहे नम्र पणे सांगू इच्छितो .. मला हि एक अनुवाद करून हवाय . . Rick Flair माहिती असेलच तुम्हाला .. त्याचा स्वतःचा इंट्रो असा काहीसा होता . I'm Rick Flair ! The Stylin', profilin', limousine riding, jet flying, kiss-stealing, wheelin' n' dealin', son of a gun ! याचा अनुवाद करून देता का ? कर्नाटकात राहिल्यामुळे मराठी कच्चं आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on गुरुवार, 05/11/2017 - 22:22

Permalink

बाकी.. खुशवंत सिंग अति भारी

बाकी.. खुशवंत सिंग अति भारी माणूस होता .
  • Log in or register to post comments

Submitted by एस on गुरुवार, 05/11/2017 - 22:45

Permalink

त्या सुक्काळीच्या खुशवंत

त्या सुक्काळीच्या खुशवंत सिंगला कशाला सिरीयसली घ्यायचं? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 05/11/2017 - 23:06

In reply to त्या सुक्काळीच्या खुशवंत by एस

Permalink

"son of gun" ला "सुक्काळीचा"

"son of gun" ला "सुक्काळीचा" हा चांगला अस्सल मराठी प्रतिशब्द होईल ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 05/12/2017 - 02:11

In reply to "son of gun" ला "सुक्काळीचा" by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

खिक्क!

खिक्क!
  • Log in or register to post comments

Submitted by कुटस्थ on गुरुवार, 05/11/2017 - 23:06

Permalink

संक्षी,

संक्षी, इंग्रजीचा खरंतर मराठी अनुवाद देण्याची गरज नव्हती फारशी...माझ्यामते ९०% मिपाकरांना तेवढं इंग्रजी नक्कीच समजतं. असो. परंतु तुमची पोस्ट नक्कीच वाचनीय आहे त्याबद्दल धन्यवाद. बाकी तुमचं चालू द्या...
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 05/11/2017 - 23:43

Permalink

या पोस्टरमधील उजवीकडील "सन ऑफ गन" आहे का?

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रे on Fri, 05/12/2017 - 09:16

Permalink

या दहा कलमी कार्यक्रमात

या दहा कलमी कार्यक्रमात "आपल्यापेक्षा वाईट अवस्था असलेल्या लोकांना मदत करा" या अर्थाचं कस काय नाही लिहिलं? मला तरी ही सगळी सूत्रे आत्मकेंद्रित वाटली.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com