हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग !
खुशवंत, सिंग वन-शॉर्ट-ऑफ अ सेंश्युरी वर बाद झाले. त्यांनी आनंदानं जगायला (आणि मरायला) नक्की काय लागतं याची १० सूत्रं मांडली. मध्यंतरी याचा एक वॉटस-अॅप फॉरवर्ड पण फिरत होता. तरीही ही सूत्रं वाचून आंमलात आणण्याजोगी नक्कीच आहेत, त्या निमित्तानं हा लेखनप्रपंच !
खुशवंत म्हणतात, मी अनेकदा सुख नक्की कशात आहे, माणसाला सुखानं जगायला नक्की काय करायला हवं याचा विचार केलायं.
१) तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीरस्वास्थ्य ! जर शरीरस्वास्थ्य नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. साधीशी का असेना, एखादी जरी व्याधी असेल तर ती जगण्याचं सुख कमी करते.
२) दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकस्वास्थ्य ! याचा अर्थ तुमच्याकडे करोडो रुपये हवेत असा नाही. तर तुम्हाला हव्या त्या सुविधा, स्वतःच्या सृजनात्मकतेसाठी असणारी मोकळीक...कधी वाटलं तर बाहेर जाऊन जेवणं, एखादा सिनेमा, समुद्र किनारी किंवा डोंगर-दरीतली एखादी सहल करण्याइतपत तरी तुमची आर्थिक ऐपत हवी. आर्थिक चणचण तुम्हाला हतोत्साह करु शकते. आणि उधारी किंवा कर्ज तुम्हाला एकप्रकारचा अवमानकारक फिल देऊ शकते.
३) खुशवंत म्हणतात : स्वतःच घर असणं हा एक मोठा सुखाचा भाग आहे. भाड्याच्या घरात तुम्हाला आपलेपणा आणि निर्धास्तता वाटत नाही. जर तुमच्या घराशी छोटीशी का होईना, बाग फुलवली तर उत्तम ! स्वतः लावलेली झाडं मोठी होतांना आणि बहरतांना बघणं, सृष्टीशी एकतानता साधण्याचा आनंद देतं.
४) एक समंजस सहचारिणी असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ती तुमची पत्नी असो, जिच्याशी शारिरीक जवळीक आहे अशी मैत्रिण असो की नुसती मैत्रिण असो. जर (सहचारिणीशी ) कमालीचे मतभेद असतील तर तुमचा मनोभंग होईल. मतभेद विसरुन एकमेकांचा स्वीकर करत कलहविरहीत जगणं कधीही बरं !
५) तुमच्यापेक्षा श्रेष्ठांचा मत्सर करणं थांबवा ! ते आर्थिकदृष्ट्या पुढे असतील किंवा प्रसिद्धी पावलेले असतील, पण मत्सर जीवनाची मजा घालवतो. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा.
६) तुमच्याबद्दल कुचाळक्या करणारे दूर ठेवा. त्यांच्या दोषारोपांशी दोन हात करतांना तुम्ही थकून जाल आणि त्यांनी केलेली मानहानी तुमचं जीवन निष्कारण विषाक्त करुन जाईल.
७) स्वतःला आनंदी ठेवतील असे एक-दोन तरी छंद आयुष्यात हवेत. मग ते बागकाम असेल, लेखन किंवा वाचन असेल, चित्रकला असेल, वादन असेल, किंवा संगीत ऐकण्याचा छंद असेल. क्लबात जाऊन टिपी करणं, पार्ट्यात जाऊन फुकटची पीणं, प्रथितयश व्यक्तींच्या मागेमागे करणं हे अक्षम्य कालापव्यय आहेत. स्वतःला विधायकतेनं रमवणारी परिमाणं असणं गरजेचं आहे .
८) रोज सकाळी आणि संध्याकाळी, दहा/दहा मिनीटं ध्यान किंवा सिंहावलोकनाला ठेवा. सकाळच्या १० मिनीटांपैकी ५ मिनीटं नुसतं शांत बसा. आणि ५ मिनीटं दिवसभरात काय करायचं ते ठरवा. संध्याकाळी सुद्धा ५ मिनीटं नुसत शांत बसा. आणि उरलेल्या ५ मिनीटात आपण ठरवलेल्या कामातली किती पार पाडली याचा आढावा घ्या.
९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज व्यथित होणं किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणं, टाळता येईल तेवढं बरं ! अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला.
१०) सर्वात महत्त्वाचं म्हणजे जायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नसायला हवा किंवा तुमची कुणाविषयी काहीही तक्रार नको !
___________________________________
स्वतःचा मृत्यू-लेख खुशवंत सिंगांनी असा लिहीला आहे :
Here lies one who spared neither man nor God;
Waste not your tears on him, he was a sod;
Writing nasty things he regarded as great fun;
Thank the Lord he is dead, this son of a gun
या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही,
याच्या मृत्यूचा शोक करु नका,
हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता.
प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता.
हा गेला ते देवाचे उपकार आहेत....
हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जर वेगळा काही विचार करावासा वाटला तर
एक आगाऊ प्रश्न "तुम्हाला समजत
हाहाहा ! हा प्रश्न वाचुन Big
संक्षी किती हसवणार आता ?! पोट
.
सुरेख जमला आहे भावानुवाद !!
यातला "भंपक" या एका शब्दाचा
जम्या जम्या..
हे मस्त जमलंय !!! खुशवंत
वा !!! याला म्हणायचा अनुवाद.
एक वेगळा विचार
Here lies one who spared
हेच बरोबर.
हम्म. हे सगळं वाचताना छान
एकूण लेखातल्या `जगण्याची सूत्रं' या `कंटेंट' ऐवजी
Here lies one who spared neither man nor God;या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही, (हा अनुवाद तर निर्विवाद आहे कारण खुशवंत नास्तिक तर होतेच पण कधीही आणि कुणाही विरुद्ध रोखठोक लिहायचे) २)Waste not your tears on him, he was a sod;याच्या मृत्यूचा शोक करु नका, हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता. (Sod or turf is grass and the part of the soil beneath it held together by its roots) त्यामुळे हा अनुवाद सुद्धा एकदम पर्फेक्ट आहे. तो जमीनीशी इमान (डाऊन टू अर्थनेस) आणि हिरवेपणा (खुशवंत सिंगांचा रोमँटिसिझम) दर्शवतो). ३)Writing nasty things he regarded as great fun;प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता. (nasty चा शब्दशः अर्थ Very bad or unpleasant असला तरी तो इथे अभिप्रेत नाही). त्यामुळे अनुवाद एकदम यथोचित आहे. ४)Thank the Lord he is dead, this son of a gunहा गेला ते देवाचे उपकार आहेत.... हा माणूस बंदुकीची औलाद होता ! इथे मला मूळ शब्द रचनाच इतकी आवडली की मी शब्दश : भाषांतर केलं ! अर्थात त्या शब्दरचनेचा अर्थ असा आहे : usually used as a mild or euphemistic alternative to son of a bitch ; sometimes used interjectionally to express surprise or disappointment. कुणाला फारच अणखर वाटत असेल तर माझ्याच शैलीत थोडा बदल करतो : हा गेला ते देवाचे उपकार आहेत.... हा माणूस पुरता अक्करमाश्या होता ! मला वाटतं एका शब्दानं फारसा गहजब झालेला नाही किंवा जगण्याच्या सूत्रांना तर कदापीही धक्का पोहोचलेला नाही.(मीमीमी सोडून) अख्ख्या होल
आधी मराठी तर नीट लिहीयला शिका !
आस कस आस कस ?
गिरे तो भी टांग उपर...
त्रिशंकू,
प्रतिसादाचे सार...
संजयजी, मी तुमच्याइतका
+१
@ संदीप,
"उद्या जर माझी समाधी बांधायची झाली तर त्यावर एकच वाक्य लिहा- हा माणूस मूर्ख असेल,याच्या हातून अनेक चुका झाल्या असतील ; पण हा कृतघ्न मात्र कधीही नव्हता!” - प्रल्हाद केशव अत्रेयाचा अर्थ अत्रे स्वतःला `मूर्ख आणि बावळट' म्हणतात असा अर्थ इथल्या सदस्यांनी काढला (कारण तसेच अनुवाद तुम्ही आणि इतरांनी केलेत!).... तर तो ज्योक होईल. कारण सगळा फोकसकृतघ्न मात्र कधीही नव्हतावर आहे. त्यामुळे जसे अत्रे स्वतःला कमी लेखत नाहीत तर `कृतज्ञता' ही वॅल्यू `मूर्ख आणि बावळटाच्या' वर आहे हे सांगतायंत. तद्वत खुशवंत सिंगांनी स्वतःला कमी लेखलेलं नाही (जे तुम्ही आणि इतर सदस्य डोक्यात धरुन अनुवाद करण्याचा प्रयत्न करतायं), फक्त स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातले (समाजाला वाटलेले न्यूनत्व) त्यांना स्वतःच्या `आचपेच न ठेवता बोलणं आणि अक्करमाशेपणापेक्षा' प्रिय होते असंच दर्शवतात. तस्मात, अनुवाद ती मूळ विचारधारा गृहित धरुन केला आहे.बर्र काय ठरला मंग ?
मिस लवंगलतिका - बंदुक की आवाज
साला ये प्रतिसाद मैने बघ्याच नय :P :) :P
बरं ते जावुद्या....
जो मझा, पंच आणि चुरचुरीतपणा
लै वेळा सहमत..!!
सहमत आहे
पुढे चला अन खुशवंतचं बोला.
दोन दिवस झाले .....
लेख परत एकदा वाचला ! मजा आली
तुफ्फान !!
कशाला रे उगाच खुस्पटं काढताय
हाहाहा..
एका लेखात, छ. शिवाजी
@ अढे
sod आणि son of a gun या दोन शब्दांवर आक्षेप होताअ) पैकी sod चा अर्थ असा आहे : Sod or turf is grass and the part of the soil beneath it held together by its roots or another piece of thin material. जर sod हा शब्द स्लँग म्हणून वापरला तर त्याचा अर्थ : something or someone considered unpleasant or difficult: ( तो डायरेक्ट `शिवी' म्हणून गणला जात नाही) मी तो शब्द स्लँग न धरता आहे तसा धरला. त्यामुळे "हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता." हा अनुवाद योग्य आहे. तस्मात, तो विषय संपला. बाय द वे, सदस्यांनी केलेले `छान अनुवाद' पाहा ! (१) "गवतपट्टा" (२) "तो शब्द एखाद्या शिवीसारखा वापरतात. सोडोमाइट वरून आलेला असावी ही शिवी." (हा तुमचा स्वतःचा ज्योक !) ब) son of a gun हा तिथला स्लँग आहे आणि त्याचा अर्थ असा आहे : Son of a gun is an exclamation or a noun in American and British English. It can be used encouragingly or to compliment, as in "You son of a gun, you did it!" Or may be used sarcastically, as in "You son of a gun, that's not how you do it!" बोली भाषेतल्या अनौपचारिक शब्दाचा अनुवाद संस्कृतीपरत्वे बदलतो. मी सुरुवातीला केलेली शब्दयोजना जरी खुशवंतसिंगांच्या व्यक्तिमत्त्वाचं यथार्थ वर्णन करणारी होती तरी ती अपेक्षित स्लँगला तितकीशी मिळती जुळती नव्हती (त्यात सुमार, धादांत-चूक किंवा हास्यास्पद असं काही वाटणं म्हणजे अनाकलनाची पातळी आहे). तरीही मी ते मान्य करुन लेखात योग्य तो बदल केला. सदस्य जो अहं चा (नेहेमीचा) उद्घोष लावतायंत तो विनोदी आहे. मी फक्त इतकंच म्हणतोयं की ज्यांना Live चा साधा उच्चार सुद्धा माहिती नाही त्यांनी तो इथे ऐकावा त्यामुळे त्यांना कशाचंही हसू येईल, त्यात काही नवल नाही. पण वर गॅब्रियल यांचा प्रतिसाद आणि इतर सदस्यांचे प्रतिसाद (जे स्वतःला मराठीचा अभिमान आहे वगैरे समजतात) त्यात थोडा तरी फरक असावा. थोडक्यात, प्रश्न सही अनुवादाचा आहे, अहं चा नाही इतपत समज येईल तो सुदीन ! आणि त्याही पुढे जाऊन, लेखातल्या कंटेंटवर चर्चा होऊ शकली तर तो मिपाचा भाग्योदय !Son of a gun
आणि सॉडचा तुम्ही काढलेला अर्थ पाहा !
सॉड'ला प्रतिशब्द हवा असल्यास गांडु/हरामी हा शब्द वापरावायाला म्हणतात सुपर ज्योक ! आता वर कमेंटस मारणारे हसणार का ? :)ठीक आहे. तुम्ही बरोबर.
का थोडं
....
नीट ऐका
सर, कान... कान ताणून!
उगा काहितरी काय ?... स्वामी
खेडूतजी !
सर, कान... कान ताणून!इतक्या कल्लोळात सुद्धा हे खरंच मार्मिक आणि भारीये ! धन्यवाद .अनुवाद गंडला आहे
Writing nasty things he regarded as great fun; Thank the Lord he is dead, this son of a gunson of a gun ला अक्करमाश्या (= अनौरस) हा शब्द अजिबात सुयोग्य नाही. son of a gun ला जवळचा शब्द म्हणजे धूर्त, ठग किंवा तुच्छ. लीव हे पण चुकले आहे. ते लिव्ह किंवा लीव्ह असे हवे होते. लिव्ह म्हणजे live (जगणे) आणि लीव्ह = लीsssव्ह म्हणजे सोडून जाणे. बाकी चालू द्या.साहेब