Skip to main content

हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग !

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 07/05/2017 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
खुशवंत, सिंग वन-शॉर्ट-ऑफ अ सेंश्युरी वर बाद झाले. त्यांनी आनंदानं जगायला (आणि मरायला) नक्की काय लागतं याची १० सूत्रं मांडली. मध्यंतरी याचा एक वॉटस-अ‍ॅप फॉरवर्ड पण फिरत होता. तरीही ही सूत्रं वाचून आंमलात आणण्याजोगी नक्कीच आहेत, त्या निमित्तानं हा लेखनप्रपंच ! खुशवंत म्हणतात, मी अनेकदा सुख नक्की कशात आहे, माणसाला सुखानं जगायला नक्की काय करायला हवं याचा विचार केलायं. १) तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीरस्वास्थ्य ! जर शरीरस्वास्थ्य नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. साधीशी का असेना, एखादी जरी व्याधी असेल तर ती जगण्याचं सुख कमी करते. २) दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकस्वास्थ्य ! याचा अर्थ तुमच्याकडे करोडो रुपये हवेत असा नाही. तर तुम्हाला हव्या त्या सुविधा, स्वतःच्या सृजनात्मकतेसाठी असणारी मोकळीक...कधी वाटलं तर बाहेर जाऊन जेवणं, एखादा सिनेमा, समुद्र किनारी किंवा डोंगर-दरीतली एखादी सहल करण्याइतपत तरी तुमची आर्थिक ऐपत हवी. आर्थिक चणचण तुम्हाला हतोत्साह करु शकते. आणि उधारी किंवा कर्ज तुम्हाला एकप्रकारचा अवमानकारक फिल देऊ शकते. ३) खुशवंत म्हणतात : स्वतःच घर असणं हा एक मोठा सुखाचा भाग आहे. भाड्याच्या घरात तुम्हाला आपलेपणा आणि निर्धास्तता वाटत नाही. जर तुमच्या घराशी छोटीशी का होईना, बाग फुलवली तर उत्तम ! स्वतः लावलेली झाडं मोठी होतांना आणि बहरतांना बघणं, सृष्टीशी एकतानता साधण्याचा आनंद देतं. ४) एक समंजस सहचारिणी असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ती तुमची पत्नी असो, जिच्याशी शारिरीक जवळीक आहे अशी मैत्रिण असो की नुसती मैत्रिण असो. जर (सहचारिणीशी ) कमालीचे मतभेद असतील तर तुमचा मनोभंग होईल. मतभेद विसरुन एकमेकांचा स्वीकर करत कलहविरहीत जगणं कधीही बरं ! ५) तुमच्यापेक्षा श्रेष्ठांचा मत्सर करणं थांबवा ! ते आर्थिकदृष्ट्या पुढे असतील किंवा प्रसिद्धी पावलेले असतील, पण मत्सर जीवनाची मजा घालवतो. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा. ६) तुमच्याबद्दल कुचाळक्या करणारे दूर ठेवा. त्यांच्या दोषारोपांशी दोन हात करतांना तुम्ही थकून जाल आणि त्यांनी केलेली मानहानी तुमचं जीवन निष्कारण विषाक्त करुन जाईल. ७) स्वतःला आनंदी ठेवतील असे एक-दोन तरी छंद आयुष्यात हवेत. मग ते बागकाम असेल, लेखन किंवा वाचन असेल, चित्रकला असेल, वादन असेल, किंवा संगीत ऐकण्याचा छंद असेल. क्लबात जाऊन टिपी करणं, पार्ट्यात जाऊन फुकटची पीणं, प्रथितयश व्यक्तींच्या मागेमागे करणं हे अक्षम्य कालापव्यय आहेत. स्वतःला विधायकतेनं रमवणारी परिमाणं असणं गरजेचं आहे . ८) रोज सकाळी आणि संध्याकाळी, दहा/दहा मिनीटं ध्यान किंवा सिंहावलोकनाला ठेवा. सकाळच्या १० मिनीटांपैकी ५ मिनीटं नुसतं शांत बसा. आणि ५ मिनीटं दिवसभरात काय करायचं ते ठरवा. संध्याकाळी सुद्धा ५ मिनीटं नुसत शांत बसा. आणि उरलेल्या ५ मिनीटात आपण ठरवलेल्या कामातली किती पार पाडली याचा आढावा घ्या. ९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज व्यथित होणं किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणं, टाळता येईल तेवढं बरं ! अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला. १०) सर्वात महत्त्वाचं म्हणजे जायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नसायला हवा किंवा तुमची कुणाविषयी काहीही तक्रार नको ! ___________________________________ स्वतःचा मृत्यू-लेख खुशवंत सिंगांनी असा लिहीला आहे : Here lies one who spared neither man nor God; Waste not your tears on him, he was a sod; Writing nasty things he regarded as great fun; Thank the Lord he is dead, this son of a gun या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही, याच्या मृत्यूचा शोक करु नका, हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता. प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता. हा गेला ते देवाचे उपकार आहेत.... हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 40759
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by बोका-ए-आझम

असं अत्तर ओतत असताना एक-दोन थेंब इकडे तिकडे जातात. त्याबद्दल इतका वितंडवाद घालण्याचं काय कारण आहे ते समजलं नाही. इतक्या कल्लोळात पहिला सूज्ञ प्रतिसाद . पब्लिकला अत्तरामधे इंटरेस्टच नाही !!

In reply to by संजय क्षीरसागर

इतक्या कल्लोळात पहिला सूज्ञ प्रतिसाद. बघितलं काय बोका शेट. प्रथम पुरुषी एकवचनी आणि पुढे अहं आवाम वयम!

सर तुमचा मुळाशी जुळलेला हा अनुवाद बरोबर आहे आहे नम्र पणे सांगू इच्छितो .. मला हि एक अनुवाद करून हवाय . . Rick Flair माहिती असेलच तुम्हाला .. त्याचा स्वतःचा इंट्रो असा काहीसा होता . I'm Rick Flair ! The Stylin', profilin', limousine riding, jet flying, kiss-stealing, wheelin' n' dealin', son of a gun ! याचा अनुवाद करून देता का ? कर्नाटकात राहिल्यामुळे मराठी कच्चं आहे

संक्षी, इंग्रजीचा खरंतर मराठी अनुवाद देण्याची गरज नव्हती फारशी...माझ्यामते ९०% मिपाकरांना तेवढं इंग्रजी नक्कीच समजतं. असो. परंतु तुमची पोस्ट नक्कीच वाचनीय आहे त्याबद्दल धन्यवाद. बाकी तुमचं चालू द्या...

या दहा कलमी कार्यक्रमात "आपल्यापेक्षा वाईट अवस्था असलेल्या लोकांना मदत करा" या अर्थाचं कस काय नाही लिहिलं? मला तरी ही सगळी सूत्रे आत्मकेंद्रित वाटली.

Here lies one ...
सिंगसाहेबाच्या देहास दिल्लीतील 'दयानंद मुक्तीधाम' स्मशानात जाळले ना ? मग Here lies म्हणजे कुठे lies ? ते किरिस्तावांना जमिनीत पुरतात, त्यावर दगड बसवून त्यावर Here lies वगैरे लिहीतात ते ठीक आहे, पण जाळल्यावरही Here lies ??? .