Skip to main content

हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग !

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 07/05/2017 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
खुशवंत, सिंग वन-शॉर्ट-ऑफ अ सेंश्युरी वर बाद झाले. त्यांनी आनंदानं जगायला (आणि मरायला) नक्की काय लागतं याची १० सूत्रं मांडली. मध्यंतरी याचा एक वॉटस-अ‍ॅप फॉरवर्ड पण फिरत होता. तरीही ही सूत्रं वाचून आंमलात आणण्याजोगी नक्कीच आहेत, त्या निमित्तानं हा लेखनप्रपंच ! खुशवंत म्हणतात, मी अनेकदा सुख नक्की कशात आहे, माणसाला सुखानं जगायला नक्की काय करायला हवं याचा विचार केलायं. १) तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीरस्वास्थ्य ! जर शरीरस्वास्थ्य नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. साधीशी का असेना, एखादी जरी व्याधी असेल तर ती जगण्याचं सुख कमी करते. २) दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकस्वास्थ्य ! याचा अर्थ तुमच्याकडे करोडो रुपये हवेत असा नाही. तर तुम्हाला हव्या त्या सुविधा, स्वतःच्या सृजनात्मकतेसाठी असणारी मोकळीक...कधी वाटलं तर बाहेर जाऊन जेवणं, एखादा सिनेमा, समुद्र किनारी किंवा डोंगर-दरीतली एखादी सहल करण्याइतपत तरी तुमची आर्थिक ऐपत हवी. आर्थिक चणचण तुम्हाला हतोत्साह करु शकते. आणि उधारी किंवा कर्ज तुम्हाला एकप्रकारचा अवमानकारक फिल देऊ शकते. ३) खुशवंत म्हणतात : स्वतःच घर असणं हा एक मोठा सुखाचा भाग आहे. भाड्याच्या घरात तुम्हाला आपलेपणा आणि निर्धास्तता वाटत नाही. जर तुमच्या घराशी छोटीशी का होईना, बाग फुलवली तर उत्तम ! स्वतः लावलेली झाडं मोठी होतांना आणि बहरतांना बघणं, सृष्टीशी एकतानता साधण्याचा आनंद देतं. ४) एक समंजस सहचारिणी असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ती तुमची पत्नी असो, जिच्याशी शारिरीक जवळीक आहे अशी मैत्रिण असो की नुसती मैत्रिण असो. जर (सहचारिणीशी ) कमालीचे मतभेद असतील तर तुमचा मनोभंग होईल. मतभेद विसरुन एकमेकांचा स्वीकर करत कलहविरहीत जगणं कधीही बरं ! ५) तुमच्यापेक्षा श्रेष्ठांचा मत्सर करणं थांबवा ! ते आर्थिकदृष्ट्या पुढे असतील किंवा प्रसिद्धी पावलेले असतील, पण मत्सर जीवनाची मजा घालवतो. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा. ६) तुमच्याबद्दल कुचाळक्या करणारे दूर ठेवा. त्यांच्या दोषारोपांशी दोन हात करतांना तुम्ही थकून जाल आणि त्यांनी केलेली मानहानी तुमचं जीवन निष्कारण विषाक्त करुन जाईल. ७) स्वतःला आनंदी ठेवतील असे एक-दोन तरी छंद आयुष्यात हवेत. मग ते बागकाम असेल, लेखन किंवा वाचन असेल, चित्रकला असेल, वादन असेल, किंवा संगीत ऐकण्याचा छंद असेल. क्लबात जाऊन टिपी करणं, पार्ट्यात जाऊन फुकटची पीणं, प्रथितयश व्यक्तींच्या मागेमागे करणं हे अक्षम्य कालापव्यय आहेत. स्वतःला विधायकतेनं रमवणारी परिमाणं असणं गरजेचं आहे . ८) रोज सकाळी आणि संध्याकाळी, दहा/दहा मिनीटं ध्यान किंवा सिंहावलोकनाला ठेवा. सकाळच्या १० मिनीटांपैकी ५ मिनीटं नुसतं शांत बसा. आणि ५ मिनीटं दिवसभरात काय करायचं ते ठरवा. संध्याकाळी सुद्धा ५ मिनीटं नुसत शांत बसा. आणि उरलेल्या ५ मिनीटात आपण ठरवलेल्या कामातली किती पार पाडली याचा आढावा घ्या. ९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज व्यथित होणं किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणं, टाळता येईल तेवढं बरं ! अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला. १०) सर्वात महत्त्वाचं म्हणजे जायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नसायला हवा किंवा तुमची कुणाविषयी काहीही तक्रार नको ! ___________________________________ स्वतःचा मृत्यू-लेख खुशवंत सिंगांनी असा लिहीला आहे : Here lies one who spared neither man nor God; Waste not your tears on him, he was a sod; Writing nasty things he regarded as great fun; Thank the Lord he is dead, this son of a gun या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही, याच्या मृत्यूचा शोक करु नका, हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता. प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता. हा गेला ते देवाचे उपकार आहेत.... हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 40759
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

हा अनुवाद तर निर्विवाद आहे त्यामुळे हा अनुवाद सुद्धा एकदम पर्फेक्ट आहे त्यामुळे अनुवाद एकदम यथोचित आहे रच्याकने अणखर आणि आचपेच म्हणजे काय? हे शब्द कधी ऐकले नाहीत.

संजयजी, मी तुमच्याइतका व्यासंगी नाही, ज्ञानी तर अजिबात नाही. पण माझ्या कवडीमूल्य आकलनानुसार एपिटाफ हा फार विचारपूर्वक लिहिलेला असतो, त्याच्यातला शब्द आणि शब्द चपखल असतो. त्यात संदर्भ सोडून काहीही नसते. संबंधित माणसाचे सर्व आयुष्य त्या दोन चार ओळीत बसवणे फारच कौशल्याचे व हुशारीचे काम असते. तेव्हा अनुवाद करतांना आपल्या मनाला वाटेल तो संदर्भ आणि तो पर्यायी शब्द घेता येत नसतो. ते मग लॉस्ट इन ट्रान्सलेशन होऊन जातं. सॉड चा तुमचा अर्थ हिरवळ, जमिनीसे जुडा हुआ आदमी वगैरे म्हणजे एकदम कैच्याकै आहे. उदा: उद्या माझ्या एपिटाफवर "ह्या माणसाने सगळ्यांची वाट लावली" असा वाक्यप्रयोग असेल तर त्याचा अर्थ "ह्या माणसाने सगळ्यांना योग्य मार्गदर्शन केले, योग्य वाटेवर आणले" असा काढल्यासारखे होईल. रोमॅण्टीसिझम, हिरवटपणा म्हणजे अगदी कैच्याकै. साक्षात सिंगसाब वरुन उतरुन खाली आले तरी तुम्ही त्यांनाही हाच अनुवाद बरोबर आहे असे ठणकावून सांगायला कमी करणार नाहीत याची खात्री आहे. सॉड चा योग्य अर्थ हा त्याच्या आधी कोणते शब्दप्रयोग केले आहेत त्यावरुन सहज कळतो. तो नक्कीच सन्मानदर्शक नाही. शिवाय स्वतःची स्तुती स्वतःच खुशवंतसिंग करत नाहीयेत हे संपूर्ण एपिटाफमध्ये दिसतंय. "याच्यावर अश्रू गाळू नका कारण हा माणूस मातीशी जुळलेला आहे" हा अनुवाद पाहून डोक्यावर हात मारुन घेत असतील सिंगसाहेब. एखाद्या नालायक, हरामी, बदमाश माणसावरच अश्रू गाळू नका असे म्हटले जाते. डाउन टू अर्थ माणसाला सन्मान दिला जातो हे तर अगदी बेसिक आहे. तुमच्यासारख्या परमज्ञानी व्यक्तीस काय सांगावे? ------------------------- सन ऑफ अ बिच म्हणण्याऐवजी सन ऑफ अ गन हे अंमळ मैत्रीपूर्ण पद्धतीने, आपण मित्राला शिव्या घालतो (आमच्याकडे मित्राला 'काबे भोसडीच्या' - सन ऑफ अ गन सारखेच- असे उद्देशले जाते) तसे म्हटले जाते. त्याला बंदुकीची औलाद वगैरे म्हणणे तर टूमच आहे. प्रत्येक भाषेचे सांस्कृतिक संदर्भ असतात, ते आपल्याला समजतीलच असे नसते. त्यामुळे असे गुगल ट्रान्सलेशन हमखास फसते. ------------------------- आपली चूक खरोखर झाली असेल तर मान्य करण्यापेक्षा दुसरा मोठेपणा जगात नाही. पहिल्याच फटक्यात समजून उमजून चूक मान्य केली असती तर एवढं कोणी ताणले नसते. पण आता तुम्ही इतके इरेला पेटलात. सगळं हास्यास्पद झालेलं आहे. तुमची चूक उघड झाली आहे. आता प्रतिसादांमधून वेळ वाया घालवू नका अशी माझी मैत्रीपूर्ण विनंती आहे. एखाद्यावेळेस चुकतो माणूस, त्यात काय एवढे मनाला लावून घ्यायचे. इट्स ओके. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

'सॉड'ला प्रतिशब्द हवा असल्यास गांडु/हरामी हा शब्द वापरावा. मित्राला अशी प्रेमळ हाक अनेकदा मारतात.

In reply to by संदीप डांगे

प्रश्न चूक आणि बरोबर असा कुठेय ? काँटेक्स्टचा प्रश्न आहे. एक शब्द जसाच्या तसा अनुवादित केला तो सुद्धा दुरुस्त केलायं इतकंच ! अत्रे हे जवळजवळ खुशवंतजींच्यासारखं मराठी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा हा मृत्यूलेख पाहा : "उद्या जर माझी समाधी बांधायची झाली तर त्यावर एकच वाक्य लिहा- हा माणूस मूर्ख असेल,याच्या हातून अनेक चुका झाल्या असतील ; पण हा कृतघ्न मात्र कधीही नव्हता!” - प्रल्हाद केशव अत्रे याचा अर्थ अत्रे स्वतःला `मूर्ख आणि बावळट' म्हणतात असा अर्थ इथल्या सदस्यांनी काढला (कारण तसेच अनुवाद तुम्ही आणि इतरांनी केलेत!).... तर तो ज्योक होईल. कारण सगळा फोकस कृतघ्न मात्र कधीही नव्हता वर आहे. त्यामुळे जसे अत्रे स्वतःला कमी लेखत नाहीत तर `कृतज्ञता' ही वॅल्यू `मूर्ख आणि बावळटाच्या' वर आहे हे सांगतायंत. तद्वत खुशवंत सिंगांनी स्वतःला कमी लेखलेलं नाही (जे तुम्ही आणि इतर सदस्य डोक्यात धरुन अनुवाद करण्याचा प्रयत्न करतायं), फक्त स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातले (समाजाला वाटलेले न्यूनत्व) त्यांना स्वतःच्या `आचपेच न ठेवता बोलणं आणि अक्करमाशेपणापेक्षा' प्रिय होते असंच दर्शवतात. तस्मात, अनुवाद ती मूळ विचारधारा गृहित धरुन केला आहे.

जो मझा, पंच आणि चुरचुरीतपणा "बंदुकीची औलाद" ह्या युनिक कन्सेप्टमध्ये होता त्याचा एक शतांशही "अक्करमाश्या" हा शब्द पेलू शकत नाही हे नमूद करु इच्छितो.

लेख परत एकदा वाचला ! मजा आली !! ७) स्वतःला आनंदी ठेवतील असे एक-दोन तरी छंद आयुष्यात हवेत. मग ते बागकाम असेल, लेखन किंवा वाचन असेल, चित्रकला असेल, वादन असेल, किंवा संगीत ऐकण्याचा छंद असेल. क्लबात जाऊन टिपी करणं, पार्ट्यात जाऊन फुकटची पीणं, प्रथितयश व्यक्तींच्या मागेमागे करणं हे अक्षम्य कालापव्यय आहेत. स्वतःला विधायकतेनं रमवणारी परिमाणं असणं गरजेचं आहे . >>> हे एकदम सत्य आहे , आजवर आमच्या ट्रेकच्या छंदाने आयुष्यत अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत ते आठवले :) अवांतर : ह्यावरुन मला ओशो च्या १० कमांडमेन्ट्स ची आठवण झाली : १.Never obey anyone's command unless it is coming from within you also. २.There is no God other than life itself. ३.Truth is within you, do not search for it elsewhere. ४.Love is prayer. ५.To become a nothingness is the door to truth. Nothingness itself is the means, the goal and attainment. ६.Life is now and here. ७.Live wakefully. ८.Do not swim—float. ९.Die each moment so that you can be new each moment. १०.Do not search. That which is, is. Stop and see. ह्यातील आठ नंबर तर एकदम अफाट आहे !!

एवढी महान व्यक्ती इथे मिपावर येऊन आपल्याला फुकट ज्ञानामृत पाजत आहे आणि तुम्ही उगाच एक शब्द घेऊन बसलात. नंतर हेच ज्ञान तुम्हाला सरांच्या वेबसाईट वर पैसे भरून घ्यायला लागेल. सरांनी सांगितलेलं प्रत्येक वाक्य म्हणजे ब्रम्हवाक्य असतं. त्यातून नसते अर्थ काढायचे नसतात. जरी ते आपल्या धाग्यांचा आशय लक्षात न घेता आपल्या धाग्याचं काश्मीर करत असले तरी ते आपलं भाग्य आहे. त्यांच्या धाग्यांवर येऊन तिथला स्कोअर सेटल करायचा प्रयत्न करू नये. सर स्थलकालातीत आहेत, त्यामुळे हा अनुवाद सरांना प्रत्यक्ष खुशवंतसिंगांनीच सांगितलेला असू शकतो. जो सांगायला त्यांना १ तास लागला असेल तो सरांनी आपल्याला ५ मिनटात समजावून सांगितला आहे, उगाच फाटे फोडून काला(?)पव्यय करू नये. नाहीतर नंतर सरांनी अपमान केल्यावर कांगावा करू नये.

तुम्ही सर्व प्रतिसाद वाचलेत का ते आधी बघा ! १) sod आणि son of a gun या दोन शब्दांवर आक्षेप होता अ) पैकी sod चा अर्थ असा आहे : Sod or turf is grass and the part of the soil beneath it held together by its roots or another piece of thin material. जर sod हा शब्द स्लँग म्हणून वापरला तर त्याचा अर्थ : something or someone considered unpleasant or difficult: ( तो डायरेक्ट `शिवी' म्हणून गणला जात नाही) मी तो शब्द स्लँग न धरता आहे तसा धरला. त्यामुळे "हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता." हा अनुवाद योग्य आहे. तस्मात, तो विषय संपला. बाय द वे, सदस्यांनी केलेले `छान अनुवाद' पाहा ! (१) "गवतपट्टा" (२) "तो शब्द एखाद्या शिवीसारखा वापरतात. सोडोमाइट वरून आलेला असावी ही शिवी." (हा तुमचा स्वतःचा ज्योक !) ब) son of a gun हा तिथला स्लँग आहे आणि त्याचा अर्थ असा आहे : Son of a gun is an exclamation or a noun in American and British English. It can be used encouragingly or to compliment, as in "You son of a gun, you did it!" Or may be used sarcastically, as in "You son of a gun, that's not how you do it!" बोली भाषेतल्या अनौपचारिक शब्दाचा अनुवाद संस्कृतीपरत्वे बदलतो. मी सुरुवातीला केलेली शब्दयोजना जरी खुशवंतसिंगांच्या व्यक्तिमत्त्वाचं यथार्थ वर्णन करणारी होती तरी ती अपेक्षित स्लँगला तितकीशी मिळती जुळती नव्हती (त्यात सुमार, धादांत-चूक किंवा हास्यास्पद असं काही वाटणं म्हणजे अनाकलनाची पातळी आहे). तरीही मी ते मान्य करुन लेखात योग्य तो बदल केला. सदस्य जो अहं चा (नेहेमीचा) उद्घोष लावतायंत तो विनोदी आहे. मी फक्त इतकंच म्हणतोयं की ज्यांना Live चा साधा उच्चार सुद्धा माहिती नाही त्यांनी तो इथे ऐकावा त्यामुळे त्यांना कशाचंही हसू येईल, त्यात काही नवल नाही. पण वर गॅब्रियल यांचा प्रतिसाद आणि इतर सदस्यांचे प्रतिसाद (जे स्वतःला मराठीचा अभिमान आहे वगैरे समजतात) त्यात थोडा तरी फरक असावा. थोडक्यात, प्रश्न सही अनुवादाचा आहे, अहं चा नाही इतपत समज येईल तो सुदीन ! आणि त्याही पुढे जाऊन, लेखातल्या कंटेंटवर चर्चा होऊ शकली तर तो मिपाचा भाग्योदय !

In reply to by संजय क्षीरसागर

आयला तुम्ही पण विकी पंडित का? मग चालू द्या! अगदी निवांत!!

In reply to by संजय क्षीरसागर

सॉड'ला प्रतिशब्द हवा असल्यास गांडु/हरामी हा शब्द वापरावा याला म्हणतात सुपर ज्योक ! आता वर कमेंटस मारणारे हसणार का ? :)

In reply to by संजय क्षीरसागर

ती बाई तुम्ही दिलेल्या लिंक वर घसा ताणून "लिव्ह " " लिव्ह " म्हणतीये ...अन .....तुम्हाला "लीव लीव " ऐकू येतंय .... आता असं म्हणू नका कि "हाऊ टू लीव अँड डाय" म्हणजे मला " How to LEAVE and die" म्हणायचं होतं .....

In reply to by संजय क्षीरसागर

ती बाई तुम्ही दिलेल्या लिंक वर घसा ताणून "लिव्ह " " लिव्ह " म्हणतीये ...अन .....तुम्हाला "लीव लीव " ऐकू येतंय .... आता असं म्हणू नका कि "हाऊ टू लीव अँड डाय" म्हणजे मला " How to LEAVE and die" म्हणायचं होतं .....

In reply to by नवशिक्या

कदाचित तुम्ही घसा ताणून ऐकतायं त्यामुळे तसं ऐकू येतंय :) इथे बघा शब्दाचं फोनेटिक्स लिहीलंय

In reply to by खेडूत

उगा काहितरी काय ?... स्वामी म्हणाले "घसा ताणून ऐकलं" तर ते ऐकून खुद्द जगन्निर्माताही उद्यापासून सर्व प्राणीमात्रांचा (ऐकण्याचे संदेश वहन करणारा) ऑडिटरी नर्व्ह कानापासून तोडून घश्याला चिकटवेल... काय समजलात काय ? =))

In reply to by खेडूत

सर, कान... कान ताणून! इतक्या कल्लोळात सुद्धा हे खरंच मार्मिक आणि भारीये ! धन्यवाद .

In reply to by संजय क्षीरसागर

Writing nasty things he regarded as great fun; Thank the Lord he is dead, this son of a gun son of a gun ला अक्करमाश्या (= अनौरस) हा शब्द अजिबात सुयोग्य नाही. son of a gun ला जवळचा शब्द म्हणजे धूर्त, ठग किंवा तुच्छ. लीव हे पण चुकले आहे. ते लिव्ह किंवा लीव्ह असे हवे होते. लिव्ह म्हणजे live (जगणे) आणि लीव्ह = लीsssव्ह म्हणजे सोडून जाणे. बाकी चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

डांबरट अजून छान आहे, पण तो चालेल का हे सर्वज्ञ स्वामी शो शो (दाखवा-दाखवा-माझीच-लाल फेम उर्फ शोऑफ ओशो) यांनाच विचारा.

In reply to by उदय

(तुम्ही वेबसाइटच्या पोस्टवर दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार मानून लिहीतो) son of a gun ला अक्करमाश्या (= अनौरस) हा शब्द अजिबात सुयोग्य नाही. son of a gun ला जवळचा शब्द म्हणजे धूर्त, ठग किंवा तुच्छ. son of a gun चा संपूर्ण उहापोह इथे केला आहे. तुमच्या माहितीसाठी, तो शब्द `son of a bitch' चा माइल्ड फॉर्म गणला जातो ! तस्मात `अक्करमाश्या' हा प्रतिशब्द पर्फेक्ट आहे हे निदर्शनास आणून देतो. शिवाय लिव हाच उच्चार बरोबर आहे. फार सॉफ्ट व्हायला नको म्हणून मी लीव लिहीलं इतकंच, तितपत मान्य आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

>>बाय द वे, सदस्यांनी केलेले `छान अनुवाद' पाहा ! (१) "गवतपट्टा" मस्करीत लिहिलेल्या "गवतपट्टा" शब्दाला गांभीर्याने घेणे तुमच्या अनाकलनाची परिसीमा बयाँ करते.

सगळे मिपाकर वाह्यात आहेत... स्वामीजी.. तुम्ही फंडा नंबर ६ वापरून सर्वांना दूर का ठेवत नाही..? (अतीवाह्यात) मोदक.

अतिशय भव्य दिव्य अनुवाद. 'मोकलाया' च्या तोडीस तोड आहे. प्रतिसादातून केलेले मनोरंजन हा बोनस. वाचनखूण साठवून ठेवण्यात येईल. धन्यवाद

१.Never obey anyone's command unless it is coming from within you also. हौ अबाउट बॉस ... नोकरी जाईल ना भाउ आमचा पैल्या प्रथमच बल्ल्या झाला ना राव

In reply to by विटेकर

ही पहीली कमांडमेंट स्वच्छंद करणाऱ्या लोकांसाठी असावी, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नाही.

Definition of son of a gun for English Language Learners : a person (especially a man) or thing that you are annoyed with —used by a man to address a male friend —used to express mild surprise, disappointment, etc.ही व्याख्या आणि खुशवंतसिंग बद्दल ची होणारी चर्चा यावरून मला खालील शब्द सुचवावासा वाटतो '' बारा XXX ''

माझं इंग्लिश फार कच्च आहे :) लिखाण तर त्याहून . त्यामुळे काही सुधारणा करू नाही शकणार . तरी आपण २-४ सूचना ऐकून घेतल्या असत्या आणि त्या दृष्टीनेही विचार होऊ शकतो असे म्हणाला असतात तरी तुम्हाला जी व्याख्या अभिप्रेत होती त्यावर सुसंगत चर्चा होऊ शकली असती . जसा मुद्दा कि हिरवळ हा शब्द तुम्हाला अभिप्रेत जो होता तो वेगळा होता . आणि ते तुमचे पूर्ण वैयक्तिक स्वातंत्र्य आहे . कारण लिखाण तुमचं आहे . तरी थोडं संयमाने ऐकून घेतलं असतात तर बरं झालं असतं. आयता झेल नसता मिळाला .

In reply to by वरुण मोहिते

सगळे प्रतिसाद शांतपणे वाचूनच मी प्रतिसाद देतोयं. दोन शब्दांवर शब्दच्छल चाललायं. पैकी एक दुरुस्ती पण केली आहे कारण तसा मराठी प्रतिशब्द मला त्यावेळी सुचला नव्हता. दुसरा शब्द योग्य अनुवादित केला होताच. माझ्या दृष्टीनं बाकी काही इश्यू नाही. त्यामुळे सदस्यांना आयता झेल वगैरे मिळाला नाही. जर कुणी योग्य अनुवाद करु शकलं असतं तर माझी मान्य करण्याची तयारी होतीच पण तसं झालं नाही हे सगळे प्रतिसाद वाचून कळेलच.

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी "तुम्ही अहंकारी आहात" हे एकदा शिक्कामोर्तब झाले आहे ना. आता आखा धागा जरी तुम्ही बदलला तरी समाधान होणार नाही.

In reply to by विशुमित

थोडक्यात सांगतो. मी इथे आलो तेव्हा अध्यात्मातल्या इथल्या दिग्गजांचा फार बोलबाला होता. कुणी कुणाला सूक्ष्म देहातून पार पाचशे किलोमीटरवर भेटायचं आणि सल्ले द्यायचं, कुणी चक्रमासारख्या परिक्रमा करुन धागे टाकायचे, कुणी भल्या मोठ्या आरत्या आणि त्यावर कल्पनाविलासाचे निबंध लिहायचे आणि बाकी सगळे `वॉव! ग्रेट!! सिंप्ली सुपर्ब !" वगैरे करायचे. मी आपलं सरळ-साधं लिहायचो की देव ही मानवी कल्पना आहे, परिक्रमा कालापव्यय आहे, आरती टिपी आहे... आता जगातले ९०% लोक देवभोळे, त्यांची छातीच होत नाही देव नाही म्हणायला ! पण सांगतायं कुणाला ? कारण मुद्याचा प्रतिवाद कसा करणार ? मग आरत्या बंद पडल्या, ग्रेट अध्यात्मिक पोस्टस येईनाश्या झाल्या, परिक्रमा एपिसोडस थांबले. त्यावर लोकांनी एक नामी शक्कल लढवली ! मला अहंकारी ठरवून टाकलं ! आता धाग्याचा कशाशी काही संबंध नसो, मुद्दा काहीही असो, सदस्य कुणीही असो, प्रतिवाद जमला नाही की तो एकच टेप लावतो : अहंकारी !

In reply to by संजय क्षीरसागर

असो . जसा तुमचा अनुभव तुम्हाला श्रेष्ठ वाटतो तसा लोकांचा लोकांना . जाऊदे . ते खुशवंत सिंग पण जागे असतील अजून धागा पाहत :))

In reply to by वरुण मोहिते

लोकांना त्यांचे अनुभव श्रेष्ठ वाटतात ते योग्यच आहे. इथे पाकीट हरवण्यावरचा धागा आहे तो लेखकाच्या दृष्टीनं मंत्र सामर्थ्य आणि देवावरची श्रद्धा यावर बेतला आहे. तिथे सुद्धा मी माझा विचार मांडला आहे. नाही तर संकेतस्थळावर चर्चा कसली होणार ? सो तो प्रश्न नाही, मला अहंकारी कशामुळे ठरवलं गेलं ते सांगितलं ! बाकी खुशवंतसिंगांकडे व्यक्ती म्हणून पाहाणं निरुपयोगी आहे. ती एक जगण्याची वृत्ती आहे आणि त्या अर्थानं प्रत्येकात लपलेला खुशवंतसिंग धागा वाचून जागा व्हावा म्हणून तर ही पोस्ट ! :)

In reply to by संजय क्षीरसागर

नंगेसे खुदा भी डरता हैं तर मिपाकर तुम्हाला वचकून राहीले तर त्यात काही नवल नाही. त्या आरत्या बंद होण्याचे कारण वेगळे होते. त्या आरत्या करणारे प्रवचनकार भलतीकडेच आरत्या ओवाळू लागले. म्हणून त्यांची हाकलपट्टी झाली. तुम्हाला मात्र वाटते की तुमचा प्रतिवाद न करता आल्याने आरत्या बंद झाल्या. शी बै.

मी काय म्हणतो...ते सन ऑफ गनसाठी बंदुकीची औलाद ऐवजी तोफखाना हा शब्द जमेल का?? ह्याला पर्यायी शब्द तोफचंद सुद्धा आहे. आमच्याकडे "तो काय तोफचंद आहे का?" असं म्हणायची पद्धत आहे.

संक्षीसेठ, तुम्ही एकदा लेख टाकला की काही प्रतिसादांकडे दुर्लक्ष का करीत नाही, असा प्रश्न मला राहून राहून पडतो. राहीलं काहींचा हिशेब चुकता करायचा विषय तर जालावर संधी खूप वेळा मिळते, तेव्हा हयगय नै करायची. धुधु धुवायचं असं माझं स्पष्ट मत आहे. ;) - दिलीप बिरुटे (संक्षीजालमित्र)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकतर विषय तिथेच संपवलेला बरा असं माझं मत आहे. त्यामुळे स्कोर सेटलींगचा प्रश्नच उरत नाही. शिवाय प्रतिवाद करायला मला ही मजा येते. बघा ना, या निमित्तानं माझा इंग्लीश स्लँग्ज, प्रनंन्सीएशन, मराठीतले प्रतिशब्द यांचा बराच अभ्यास झाला ! बाकी तुम्हाला लेख आवडला याबद्दल धन्यवाद ! मित्रांचा उर्मटपणा सोडून द्यायचा हे मान्य पण आपला वाद मुद्याशी असला की लिहायला मजा येते.... आणि मुद्दा कायम निर्वैयक्तिक असतो.

In reply to by आदूबाळ

पाणी? ..ते ही बिरुटे नावाचे?? मी मरताना गंगेऐवजी ह्या पाण्याचे चार थेंब द्या बरका. पुढच्या जन्मी तरी सुखात राहीन म्हणतो. =)) =))

६) तुमच्याबद्दल कुचाळक्या करणारे दूर ठेवा. त्यांच्या दोषारोपांशी दोन हात करतांना तुम्ही थकून जाल आणि त्यांनी केलेली मानहानी तुमचं जीवन निष्कारण विषाक्त करुन जाईल. अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला हे छान आहे. लक्षात ठेवा....! -दिलीप बिरुटे

संक्षी खरं तर १० सूत्रांचा अनुवाद खरोखर चांगला केला आहे. आणि मुख्य म्हणजे तो 'आपण' त्याला अनुसरून वागण्याचा प्रयत्न करावा असे आहे. ५ ते १० पॉईंट्स तर अति महत्वाचे वाटले. पण इतक्या चांगल्या अनुवादाला तुम्हाला प्रतिसाद का असे का आले....(अर्थात मी एन्जॉय केले ते हि), विचार करावा, सुज्ञास सांगणे न लगे ! मात्र मृत्युलेखाचा अनुवाद त्यांना जे सांगायचे आहे त्याला अधोरेखित करत नाही असे वाटते. उदाहरणअर्थ : sod चा शब्दाश: अनुवाद '' हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता '' हा खटकला. इथे त्यांना ते किंवा डिफिकल्ट पर्सन किंवा एक शुल्लक आहेत आणि उगीच त्यांच्यावर असावे गाळत बसू नका असे काहीसे अभिप्रेत असावे असे वाटते. मग इथे 'हिरवळ' हा पॉसिटीव्ह शब्द आल्यामुळे अनर्थ झाल्यासारखा वाटतो, हे त्यांचे म्हणणे असावे असे मुळीच नाही वाटत. माझेही चित्रांसारखीच माझी मराठी भाषाही तितकी चांगली नसेल त्यामुळे मला कृपया मला अनुवाद करायला सांगू नका जसा पैसाताई ला सांगितलात. त्यामुळे नक्की अनुवाद कसा करायचा हे इतर जाणकार सांगतीलच किंवा तुमची परत विचार करून करू शकाल , मला किंवा सगळ्यांनाच सगळ्यातले सगळेच ज्ञान आणि प्रतिभाही नसते :))

हा माणूस बंदुकीची औलाद होता ! ख्या.ख्या.ख्या खी खी खी ! वरती खुशवंत सिंग यांनी हे वाचले तर त्यांना परत कार्डियाक अरेस्ट व्हायचा ! बाकी जिलबी बाबांनी वरती मंत्र असा उल्लेख केलेला दिसला... वाचकांसाठी जिलबीचे ताट ;) : मंत्रयोग - जपयोग बाकी जिलबी बाबा गीता न वाचता त्या बद्धल बोलु शकण्याचा दावा करु शकतात यातच सर्व काही आले, नाही ? त्यांना गीता न वाचता त्या बद्धल बोलायचे सामर्थ्य कसे प्राप्त झाले ? या बद्धल त्यांनी अजुनही उत्तर दिलेले नाही ! :प बाकी ही जिलबी विनोदी होती ! :प मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Indian techies take to social media to vent their ire

लय बाराचा/अवलादी/भंटोल (हा वैदर्भीय शब्द आहे) हे शब्द कसे वाटतात? बाकी अनुवादाबद्दल श्री.म. माटे जे म्हणाले आहेत - एका कुपीतलं अत्तर दुस-या कुपीत ओतणं - ते अगदी शंभर टक्के खरं आहे. आणि असं अत्तर ओतत असताना एक-दोन थेंब इकडे तिकडे जातात. त्याबद्दल इतका वितंडवाद घालण्याचं काय कारण आहे ते समजलं नाही.