खुशवंत, सिंग वन-शॉर्ट-ऑफ अ सेंश्युरी वर बाद झाले. त्यांनी आनंदानं जगायला (आणि मरायला) नक्की काय लागतं याची १० सूत्रं मांडली. मध्यंतरी याचा एक वॉटस-अॅप फॉरवर्ड पण फिरत होता. तरीही ही सूत्रं वाचून आंमलात आणण्याजोगी नक्कीच आहेत, त्या निमित्तानं हा लेखनप्रपंच !
खुशवंत म्हणतात, मी अनेकदा सुख नक्की कशात आहे, माणसाला सुखानं जगायला नक्की काय करायला हवं याचा विचार केलायं.
१) तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीरस्वास्थ्य ! जर शरीरस्वास्थ्य नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. साधीशी का असेना, एखादी जरी व्याधी असेल तर ती जगण्याचं सुख कमी करते.
२) दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकस्वास्थ्य ! याचा अर्थ तुमच्याकडे करोडो रुपये हवेत असा नाही. तर तुम्हाला हव्या त्या सुविधा, स्वतःच्या सृजनात्मकतेसाठी असणारी मोकळीक...कधी वाटलं तर बाहेर जाऊन जेवणं, एखादा सिनेमा, समुद्र किनारी किंवा डोंगर-दरीतली एखादी सहल करण्याइतपत तरी तुमची आर्थिक ऐपत हवी. आर्थिक चणचण तुम्हाला हतोत्साह करु शकते. आणि उधारी किंवा कर्ज तुम्हाला एकप्रकारचा अवमानकारक फिल देऊ शकते.
३) खुशवंत म्हणतात : स्वतःच घर असणं हा एक मोठा सुखाचा भाग आहे. भाड्याच्या घरात तुम्हाला आपलेपणा आणि निर्धास्तता वाटत नाही. जर तुमच्या घराशी छोटीशी का होईना, बाग फुलवली तर उत्तम ! स्वतः लावलेली झाडं मोठी होतांना आणि बहरतांना बघणं, सृष्टीशी एकतानता साधण्याचा आनंद देतं.
४) एक समंजस सहचारिणी असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ती तुमची पत्नी असो, जिच्याशी शारिरीक जवळीक आहे अशी मैत्रिण असो की नुसती मैत्रिण असो. जर (सहचारिणीशी ) कमालीचे मतभेद असतील तर तुमचा मनोभंग होईल. मतभेद विसरुन एकमेकांचा स्वीकर करत कलहविरहीत जगणं कधीही बरं !
५) तुमच्यापेक्षा श्रेष्ठांचा मत्सर करणं थांबवा ! ते आर्थिकदृष्ट्या पुढे असतील किंवा प्रसिद्धी पावलेले असतील, पण मत्सर जीवनाची मजा घालवतो. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा.
६) तुमच्याबद्दल कुचाळक्या करणारे दूर ठेवा. त्यांच्या दोषारोपांशी दोन हात करतांना तुम्ही थकून जाल आणि त्यांनी केलेली मानहानी तुमचं जीवन निष्कारण विषाक्त करुन जाईल.
७) स्वतःला आनंदी ठेवतील असे एक-दोन तरी छंद आयुष्यात हवेत. मग ते बागकाम असेल, लेखन किंवा वाचन असेल, चित्रकला असेल, वादन असेल, किंवा संगीत ऐकण्याचा छंद असेल. क्लबात जाऊन टिपी करणं, पार्ट्यात जाऊन फुकटची पीणं, प्रथितयश व्यक्तींच्या मागेमागे करणं हे अक्षम्य कालापव्यय आहेत. स्वतःला विधायकतेनं रमवणारी परिमाणं असणं गरजेचं आहे .
८) रोज सकाळी आणि संध्याकाळी, दहा/दहा मिनीटं ध्यान किंवा सिंहावलोकनाला ठेवा. सकाळच्या १० मिनीटांपैकी ५ मिनीटं नुसतं शांत बसा. आणि ५ मिनीटं दिवसभरात काय करायचं ते ठरवा. संध्याकाळी सुद्धा ५ मिनीटं नुसत शांत बसा. आणि उरलेल्या ५ मिनीटात आपण ठरवलेल्या कामातली किती पार पाडली याचा आढावा घ्या.
९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज व्यथित होणं किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणं, टाळता येईल तेवढं बरं ! अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला.
१०) सर्वात महत्त्वाचं म्हणजे जायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नसायला हवा किंवा तुमची कुणाविषयी काहीही तक्रार नको !
___________________________________
स्वतःचा मृत्यू-लेख खुशवंत सिंगांनी असा लिहीला आहे :
Here lies one who spared neither man nor God;
Waste not your tears on him, he was a sod;
Writing nasty things he regarded as great fun;
Thank the Lord he is dead, this son of a gun
या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही,
याच्या मृत्यूचा शोक करु नका,
हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता.
प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता.
हा गेला ते देवाचे उपकार आहेत....
हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !
वाचने
40759
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
Thank the Lord he is dead,
हा हा हा..!!
In reply to Thank the Lord he is dead, by अमेरिकन त्रिशंकू
९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज
आणि he was a sod =
"हा एक गवतपट्टा होता" कसे
In reply to आणि he was a sod = by भाकरी
नको..मगरपट्टा आठवतो!
In reply to "हा एक गवतपट्टा होता" कसे by सतिश गावडे
खेडुतजी
In reply to नको..मगरपट्टा आठवतो! by खेडूत
केवळ मृत्यू -लेखच नाही
एक ते दहा मुद्दे चांगले
In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर
अनुवाद तांत्रिकदृष्टीनं किती
In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर
अनुवाद तांत्रिकदृष्टीनं किती योग्य आहे यापेक्षा तो ( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो की नाही आणि एपिटाफ खुशवंत सिंगांचं व्यक्तिमत्त्व बयाँ करतो की नाही हे निकष आहेत.एखाद्याने वरील निकषांनुसार लेखन केले असेल तर तुम्ही त्याची बाजू समजून घेऊन संयतपणे प्रतिसाद द्याल की खिल्ली उडवाल..? (निकषांचे गोलपोस्ट सोयीस्करपणे न बदलणारा) मोदक.एपिटाफ खुशवंत सिंगांचं
In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर
तुमच्यामते
In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर
चांगल्या लेखाचे छान भाषांतर.
sod चा शब्दशः अर्थ जरी गवताचा
खुशवंत सिंग माझ्या आवडत्या
खुशवंत कामुक लंपट
हा हा हा
अपनुवाद आणखी सोज्वळ कसा करणार
अपनुवाद आणखी सोज्वळ कसा करणार
ओह्ह
आपकी पारखी नजर !!!
In reply to ओह्ह by पैसा
हाहाहा!
In reply to आपकी पारखी नजर !!! by अभिजीत अवलिया
मीही तिथेच ठेचकाळलो.
In reply to ओह्ह by पैसा
=))
In reply to मीही तिथेच ठेचकाळलो. by शिवोऽहम्
बाईश्री
In reply to =)) by पैसा
जरा थंड घ्या
In reply to बाईश्री by संजय क्षीरसागर
असंय होय !
In reply to जरा थंड घ्या by पैसा
=))
In reply to असंय होय ! by संजय क्षीरसागर
ज्ञानकोशकार डॉ केतकर एकदा
In reply to =)) by पैसा
एपिक!
In reply to ज्ञानकोशकार डॉ केतकर एकदा by सुबोध खरे
@ खरे,
In reply to ज्ञानकोशकार डॉ केतकर एकदा by सुबोध खरे
पण ज्याला कवितेत नक्की काय
In reply to @ खरे, by संजय क्षीरसागर
@ खरे !
In reply to पण ज्याला कवितेत नक्की काय by सुबोध खरे
तुमचा अहं दुखावला गेला आहे म्हणून अस वितंडवाद घालता आहात.अहं एकदा मधे आणला की सगळे धन्य झाले ! आहो, मी लेखात बदल केला आहेच आणि तो स्वतःच्या शब्दानं केला आहे. चर्चा करता येत नाही तिथे अहंकार म्हटलं की झालं ! आणि इथे गाण्याचा प्रश्नच येत नाही. मराठीच येत नसेल तर मग कमेंट मारायचीच कशाला ?एक साधा सरळ मुद्दा आहे तुम्ही
In reply to @ खरे ! by संजय क्षीरसागर
हेच तर मी वर म्हटलंय !
In reply to =)) by पैसा
अंडं रुचकर लागतं हे समजायला
In reply to हेच तर मी वर म्हटलंय ! by संजय क्षीरसागर
(No subject)
In reply to अंडं रुचकर लागतं हे समजायला by सुबोध खरे
हे बरोबर
In reply to अंडं रुचकर लागतं हे समजायला by सुबोध खरे
काय हे!
In reply to हे बरोबर by मितान
गरीब बिचार्या स्वामीना
In reply to काय हे! by पैसा
सही पकडे है!
In reply to हे बरोबर by मितान
@मितान !
In reply to हे बरोबर by मितान
शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का
In reply to @मितान ! by संजय क्षीरसागर
शुउउ !!!
In reply to शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का by अनुप ढेरे
?
In reply to शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का by अनुप ढेरे
ते जौदे, पण केतकरांच्या
In reply to अंडं रुचकर लागतं हे समजायला by सुबोध खरे
Lol !!!!!!
In reply to ते जौदे, पण केतकरांच्या by खेडूत
जरा भाषांतर करुन प्रतिभा
In reply to बाईश्री by संजय क्षीरसागर
जरा भाषांतर करुन प्रतिभा दाखवली तर बोलता येईल.ट्युलिप पेंटिंगवर तुम्ही टीका केली होतीत तेव्हा "तुमची चित्रे मिपावर टाका" असे म्हटले तर तुम्हाला ते हास्यास्पद आणि विचित्र :-~ वाटले होते... त्यामुळे, हे वाक्य पाहून आता कोणाला तसेच वाटले तर आश्चर्य वाटायला नको, नाही का ?!ते जग प्रसिद्ध वाक्य माझेच
In reply to जरा भाषांतर करुन प्रतिभा by डॉ सुहास म्हात्रे
खुद्द स्वघोषित स्वामींनी ते
In reply to ते जग प्रसिद्ध वाक्य माझेच by दशानन
जर वेगळा काही विचार करावासा वाटला तर
In reply to खुद्द स्वघोषित स्वामींनी ते by डॉ सुहास म्हात्रे
एक आगाऊ प्रश्न "तुम्हाला समजत
In reply to जर वेगळा काही विचार करावासा वाटला तर by संजय क्षीरसागर
हाहाहा ! हा प्रश्न वाचुन Big
In reply to एक आगाऊ प्रश्न "तुम्हाला समजत by दशानन
संक्षी किती हसवणार आता ?! पोट
In reply to जर वेगळा काही विचार करावासा वाटला तर by संजय क्षीरसागर
.
सुरेख जमला आहे भावानुवाद !!
In reply to . by मूकवाचक
यातला "भंपक" या एका शब्दाचा
In reply to . by मूकवाचक
जम्या जम्या..
In reply to . by मूकवाचक
हे मस्त जमलंय !!! खुशवंत
In reply to . by मूकवाचक
वा !!! याला म्हणायचा अनुवाद.
In reply to . by मूकवाचक
एक वेगळा विचार
Here lies one who spared
हेच बरोबर.
हम्म. हे सगळं वाचताना छान
एकूण लेखातल्या `जगण्याची सूत्रं' या `कंटेंट' ऐवजी
Here lies one who spared neither man nor God;या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही, (हा अनुवाद तर निर्विवाद आहे कारण खुशवंत नास्तिक तर होतेच पण कधीही आणि कुणाही विरुद्ध रोखठोक लिहायचे) २)Waste not your tears on him, he was a sod;याच्या मृत्यूचा शोक करु नका, हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता. (Sod or turf is grass and the part of the soil beneath it held together by its roots) त्यामुळे हा अनुवाद सुद्धा एकदम पर्फेक्ट आहे. तो जमीनीशी इमान (डाऊन टू अर्थनेस) आणि हिरवेपणा (खुशवंत सिंगांचा रोमँटिसिझम) दर्शवतो). ३)Writing nasty things he regarded as great fun;प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता. (nasty चा शब्दशः अर्थ Very bad or unpleasant असला तरी तो इथे अभिप्रेत नाही). त्यामुळे अनुवाद एकदम यथोचित आहे. ४)Thank the Lord he is dead, this son of a gunहा गेला ते देवाचे उपकार आहेत.... हा माणूस बंदुकीची औलाद होता ! इथे मला मूळ शब्द रचनाच इतकी आवडली की मी शब्दश : भाषांतर केलं ! अर्थात त्या शब्दरचनेचा अर्थ असा आहे : usually used as a mild or euphemistic alternative to son of a bitch ; sometimes used interjectionally to express surprise or disappointment. कुणाला फारच अणखर वाटत असेल तर माझ्याच शैलीत थोडा बदल करतो : हा गेला ते देवाचे उपकार आहेत.... हा माणूस पुरता अक्करमाश्या होता ! मला वाटतं एका शब्दानं फारसा गहजब झालेला नाही किंवा जगण्याच्या सूत्रांना तर कदापीही धक्का पोहोचलेला नाही.(मीमीमी सोडून) अख्ख्या होल
In reply to एकूण लेखातल्या `जगण्याची सूत्रं' या `कंटेंट' ऐवजी by संजय क्षीरसागर
आधी मराठी तर नीट लिहीयला शिका !
In reply to (मीमीमी सोडून) अख्ख्या होल by गब्रिएल
आस कस आस कस ?
In reply to आधी मराठी तर नीट लिहीयला शिका ! by संजय क्षीरसागर
गिरे तो भी टांग उपर...
In reply to एकूण लेखातल्या `जगण्याची सूत्रं' या `कंटेंट' ऐवजी by संजय क्षीरसागर
त्रिशंकू,
In reply to गिरे तो भी टांग उपर... by अमेरिकन त्रिशंकू