Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 05/07/2017 - 00:54
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
खुशवंत, सिंग वन-शॉर्ट-ऑफ अ सेंश्युरी वर बाद झाले. त्यांनी आनंदानं जगायला (आणि मरायला) नक्की काय लागतं याची १० सूत्रं मांडली. मध्यंतरी याचा एक वॉटस-अ‍ॅप फॉरवर्ड पण फिरत होता. तरीही ही सूत्रं वाचून आंमलात आणण्याजोगी नक्कीच आहेत, त्या निमित्तानं हा लेखनप्रपंच ! खुशवंत म्हणतात, मी अनेकदा सुख नक्की कशात आहे, माणसाला सुखानं जगायला नक्की काय करायला हवं याचा विचार केलायं. १) तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीरस्वास्थ्य ! जर शरीरस्वास्थ्य नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. साधीशी का असेना, एखादी जरी व्याधी असेल तर ती जगण्याचं सुख कमी करते. २) दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकस्वास्थ्य ! याचा अर्थ तुमच्याकडे करोडो रुपये हवेत असा नाही. तर तुम्हाला हव्या त्या सुविधा, स्वतःच्या सृजनात्मकतेसाठी असणारी मोकळीक...कधी वाटलं तर बाहेर जाऊन जेवणं, एखादा सिनेमा, समुद्र किनारी किंवा डोंगर-दरीतली एखादी सहल करण्याइतपत तरी तुमची आर्थिक ऐपत हवी. आर्थिक चणचण तुम्हाला हतोत्साह करु शकते. आणि उधारी किंवा कर्ज तुम्हाला एकप्रकारचा अवमानकारक फिल देऊ शकते. ३) खुशवंत म्हणतात : स्वतःच घर असणं हा एक मोठा सुखाचा भाग आहे. भाड्याच्या घरात तुम्हाला आपलेपणा आणि निर्धास्तता वाटत नाही. जर तुमच्या घराशी छोटीशी का होईना, बाग फुलवली तर उत्तम ! स्वतः लावलेली झाडं मोठी होतांना आणि बहरतांना बघणं, सृष्टीशी एकतानता साधण्याचा आनंद देतं. ४) एक समंजस सहचारिणी असणं अत्यंत गरजेचं आहे. मग ती तुमची पत्नी असो, जिच्याशी शारिरीक जवळीक आहे अशी मैत्रिण असो की नुसती मैत्रिण असो. जर (सहचारिणीशी ) कमालीचे मतभेद असतील तर तुमचा मनोभंग होईल. मतभेद विसरुन एकमेकांचा स्वीकर करत कलहविरहीत जगणं कधीही बरं ! ५) तुमच्यापेक्षा श्रेष्ठांचा मत्सर करणं थांबवा ! ते आर्थिकदृष्ट्या पुढे असतील किंवा प्रसिद्धी पावलेले असतील, पण मत्सर जीवनाची मजा घालवतो. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा. ६) तुमच्याबद्दल कुचाळक्या करणारे दूर ठेवा. त्यांच्या दोषारोपांशी दोन हात करतांना तुम्ही थकून जाल आणि त्यांनी केलेली मानहानी तुमचं जीवन निष्कारण विषाक्त करुन जाईल. ७) स्वतःला आनंदी ठेवतील असे एक-दोन तरी छंद आयुष्यात हवेत. मग ते बागकाम असेल, लेखन किंवा वाचन असेल, चित्रकला असेल, वादन असेल, किंवा संगीत ऐकण्याचा छंद असेल. क्लबात जाऊन टिपी करणं, पार्ट्यात जाऊन फुकटची पीणं, प्रथितयश व्यक्तींच्या मागेमागे करणं हे अक्षम्य कालापव्यय आहेत. स्वतःला विधायकतेनं रमवणारी परिमाणं असणं गरजेचं आहे . ८) रोज सकाळी आणि संध्याकाळी, दहा/दहा मिनीटं ध्यान किंवा सिंहावलोकनाला ठेवा. सकाळच्या १० मिनीटांपैकी ५ मिनीटं नुसतं शांत बसा. आणि ५ मिनीटं दिवसभरात काय करायचं ते ठरवा. संध्याकाळी सुद्धा ५ मिनीटं नुसत शांत बसा. आणि उरलेल्या ५ मिनीटात आपण ठरवलेल्या कामातली किती पार पाडली याचा आढावा घ्या. ९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज व्यथित होणं किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणं, टाळता येईल तेवढं बरं ! अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला. १०) सर्वात महत्त्वाचं म्हणजे जायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नसायला हवा किंवा तुमची कुणाविषयी काहीही तक्रार नको ! ___________________________________ स्वतःचा मृत्यू-लेख खुशवंत सिंगांनी असा लिहीला आहे : Here lies one who spared neither man nor God; Waste not your tears on him, he was a sod; Writing nasty things he regarded as great fun; Thank the Lord he is dead, this son of a gun या माणसानं मनुष्य काय देवाविरोधात जायला कमी केलं नाही, याच्या मृत्यूचा शोक करु नका, हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता. प्रक्षोभक लेखनच याचा छंद होता. हा गेला ते देवाचे उपकार आहेत.... हा माणूस पुरता अक्करमाश्या होता !
  • Log in or register to post comments
  • 40412 views

प्रतिक्रिया

Submitted by अमेरिकन त्रिशंकू on Sun, 05/07/2017 - 04:28

Permalink

Thank the Lord he is dead,

Thank the Lord he is dead, this son of a gun हा माणूस बंदुकीची औलाद होता ! असा शब्दशः अनुवाद बघून गहिवरून आलं.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sun, 05/07/2017 - 09:11

In reply to Thank the Lord he is dead, by अमेरिकन त्रिशंकू

Permalink

हा हा हा..!!

हा हा हा..!!
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sun, 05/07/2017 - 07:50

Permalink

९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज

९) शक्यतो व्यथित होऊ नका. सहज व्यथित होणं किंवा बदला घेण्याची भावना निर्माण होणं, टाळता येईल तेवढं बरं ! अगदी जवळचे मित्र उर्मटासारखे वागले तरी सोडून द्या आणि पुढे चला.
हे खुप महत्वाचे आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by भाकरी on Sun, 05/07/2017 - 07:52

Permalink

आणि he was a sod =

"हा मूळं आणि माती धरुन जगणारी, हिरवळ होता" हा तर कहर आहे!!!!! पण म्हणा संक्षीनी केलाय तो म्हणजे अगदि योग्य आहे. :-P
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sun, 05/07/2017 - 08:09

In reply to आणि he was a sod = by भाकरी

Permalink

"हा एक गवतपट्टा होता" कसे

"हा एक गवतपट्टा होता" कसे वाटते?
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Sun, 05/07/2017 - 12:50

In reply to "हा एक गवतपट्टा होता" कसे by सतिश गावडे

Permalink

नको..मगरपट्टा आठवतो!

नको..मगरपट्टा आठवतो! =)) त्यापेक्षा नुसती हिरवळ ठीकै. . . सारांश आवडला. यादीतल्या जवळजवळ सर्व सिद्धी अता प्राप्त होत आल्यात असं वाटतंय.. एकूणात त्यांचे वृत्तपत्रीय स्तंभ जास्त वाचलेत. बाकी खुशवंतसिंगांनी हळुवार लेखनही केलंय. अकरावीला त्यांच्या आजीवर लिहीलेले ' पोर्ट्रेट ओफ अ लेडी' नावाचे सुरेख व्यक्तिचित्र होते!
  • Log in or register to post comments

Submitted by Ranapratap on Sun, 05/07/2017 - 19:52

In reply to नको..मगरपट्टा आठवतो! by खेडूत

Permalink

खेडुतजी

हा धडा आठवायचा प्रयत्न करत होतो. फार सुंदर व्यक्ती चित्रण आहे. यामुळे इंग्रजी लिहिणारे भारतीय लेखकांची पुस्तके वाचायची संवय लागली.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 05/07/2017 - 09:21

Permalink

केवळ मृत्यू -लेखच नाही

तर सगळी पोस्टच अनुवाद आहे ! अनुवाद तांत्रिकदृष्टीनं किती योग्य आहे यापेक्षा तो ( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो की नाही आणि एपिटाफ खुशवंत सिंगांचं व्यक्तिमत्त्व बयाँ करतो की नाही हे निकष आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sun, 05/07/2017 - 09:53

In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर

Permalink

एक ते दहा मुद्दे चांगले

एक ते दहा मुद्दे चांगले भाषांतरीत केलेत तुम्ही. मात्र मृत्यू लेखाचा अनुवाद वाईट फसला आहे. तुमचे मृत्यू लेखाचे भाषांतर वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याऐवजी विनोदी झाले आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sun, 05/07/2017 - 13:46

In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर

Permalink

अनुवाद तांत्रिकदृष्टीनं किती

अनुवाद तांत्रिकदृष्टीनं किती योग्य आहे यापेक्षा तो ( मूळ अर्थाला धक्का न लावता) वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो की नाही आणि एपिटाफ खुशवंत सिंगांचं व्यक्तिमत्त्व बयाँ करतो की नाही हे निकष आहेत. एखाद्याने वरील निकषांनुसार लेखन केले असेल तर तुम्ही त्याची बाजू समजून घेऊन संयतपणे प्रतिसाद द्याल की खिल्ली उडवाल..? (निकषांचे गोलपोस्ट सोयीस्करपणे न बदलणारा) मोदक.
  • Log in or register to post comments

Submitted by अमेरिकन त्रिशंकू on Sun, 05/07/2017 - 18:24

In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर

Permalink

एपिटाफ खुशवंत सिंगांचं

एपिटाफ खुशवंत सिंगांचं व्यक्तिमत्त्व बयाँ करतो की नाही हे निकष आहेत. तुमचा अनुवाद हे करतो असं तुम्हाला खरच वाटतं का? असेल तर मी इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments

Submitted by भाकरी on Mon, 05/08/2017 - 00:21

In reply to केवळ मृत्यू -लेखच नाही by संजय क्षीरसागर

Permalink

तुमच्यामते

एपिटाफ खुशवंत सिंगांचं व्यक्तिमत्त्व बयाँ करतो की नाही हे निकष आहेत
मूळ ईंग्रजी एपिटाफचे तुमचे मराठी भाषांतर "अर्थाला धक्का न लावता वाचकांपर्यंत प्रभावी पोचतय" असं तुम्हाला वाटते?? उत्तर दिलेच पाहीजे असे नाही काही. कारण 'नाही नीट जमले' हे काही तुमच्याकडून आले नाही यात सगळे आले !!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 05/07/2017 - 12:36

Permalink

चांगल्या लेखाचे छान भाषांतर.

चांगल्या लेखाचे छान भाषांतर. इपिटाफचे भाषांतर फसले आहे याबद्दल सहमती. हा मुद्दा कळीचा आहे... ५) तुमच्यापेक्षा श्रेष्ठांचा मत्सर करणं थांबवा ! ते आर्थिकदृष्ट्या पुढे असतील किंवा प्रसिद्धी पावलेले असतील, पण मत्सर जीवनाची मजा घालवतो. स्वतःची इतरांशी तुलना करणं टाळा. "Comparisons are odious." असं कोणीतरी १५व्या शतकातच लिहून ठेवलेलं आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Sun, 05/07/2017 - 13:06

Permalink

sod चा शब्दशः अर्थ जरी गवताचा

sod चा शब्दशः अर्थ जरी गवताचा पट्टा असला तरी तो शब्द एखाद्या शिवीसारखा वापरतात. सोडोमाइट वरून आलेला असावी ही शिवी. सन ऑफ गनचा अनुवाद देखील मजेशीर.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sun, 05/07/2017 - 13:13

Permalink

खुशवंत सिंग माझ्या आवडत्या

खुशवंत सिंग माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. त्यांची आठवण काढल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Sun, 05/07/2017 - 15:22

Permalink

खुशवंत कामुक लंपट

अस्ल्याने त्यांचे सेक्सी लिखाण अधिक वाचनीय आहे. वरील लेख्न दुबळ्या अवस्थेतील वाईट काळातले असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by वरुण मोहिते on Sun, 05/07/2017 - 15:29

Permalink

हा हा हा

पण ते विद्वान होते . मला आवडतं त्यांनी लिहिलेलं .
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 05/07/2017 - 16:54

Permalink

अपनुवाद आणखी सोज्वळ कसा करणार

अपनुवाद आणखी सोज्वळ कसा करणार म्हणा मराठी संस्थळासाठी. चारपाच पुस्तकं वाचली आहेत. भारी अन रोखठोक. दिल्ली,आत्मचरित्र,ट्रेन टु पाकिस्तान
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 05/07/2017 - 16:55

Permalink

अपनुवाद आणखी सोज्वळ कसा करणार

अपनुवाद आणखी सोज्वळ कसा करणार म्हणा मराठी संस्थळासाठी. चारपाच पुस्तकं वाचली आहेत. भारी अन रोखठोक. दिल्ली,आत्मचरित्र,ट्रेन टु पाकिस्तान
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 05/07/2017 - 17:56

Permalink

ओह्ह

लेख वाचला आणि मग लेखकाचे नाव हेमंत लाटकर नाही ना याची पुन्हा खात्री केली. खरे तर शीर्षकातच ठेचकाळले कारण लेखकाला 'live' हा शब्द अभिप्रेत असेल तर त्याचा उच्चार 'लिव्ह' असा करतात आणि 'लीव' असा दीर्घ उच्चार 'leave' या शब्दाचा करतात. बाकी सूत्रांचे भाषांतर ठीकठाक. फक्त ते अमलात कोणी आणायचे हा मोठ्ठा प्रश्न आहे. मृत्युलेखाचे भाषांतर बदललेत तर बरे होईल. नाहीतर ते मिपावर 'मोकलाया दाही दिशा'च्या पंक्तीत जाऊन बसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Mon, 05/08/2017 - 06:24

In reply to ओह्ह by पैसा

Permalink

आपकी पारखी नजर !!!

आपकी पारखी नजर !!!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/10/2017 - 07:44

In reply to आपकी पारखी नजर !!! by अभिजीत अवलिया

Permalink

हाहाहा!

इथे फक्त 'सुपर'च आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by शिवोऽहम् on Tue, 05/09/2017 - 23:23

In reply to ओह्ह by पैसा

Permalink

मीही तिथेच ठेचकाळलो.

मीही तिथेच ठेचकाळलो. पण नंतर 'सॉड'चे शब्दशः केलेले भाषांतर पाहून 'सावर'लो (म्हणजे तोंड आंबट झाले).
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/10/2017 - 07:43

In reply to मीही तिथेच ठेचकाळलो. by शिवोऽहम्

Permalink

=))

भाषांतर पाहून 'सावर'लो (म्हणजे तोंड आंबट झाले).
=))
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/10/2017 - 11:31

In reply to =)) by पैसा

Permalink

बाईश्री

आपण भाषांतर हास्यास्पद आहे वगैरे कमेंट मारल्या आहेत. जरा भाषांतर करुन प्रतिभा दाखवली तर बोलता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/10/2017 - 11:38

In reply to बाईश्री by संजय क्षीरसागर

Permalink

जरा थंड घ्या

तुम्ही मनमुराद हसवलंत हे खरं आहे. त्याबद्दल धन्यवाद! मी काय लिहू शकते हे तुर्तास बाजूला राहू दे. तुम्ही लिहिताय त्याच चालीत बोलायचे तर डॉ खरे यांनी स्त्रियांच्या रोगांबद्दल लिहू नये असे म्हणता येईल. म्हणजेच ते एखाद्या पुरुष गायनॅकला आधी बाळंत व्हा आणि मग प्रसूतीबद्दल बोला असे म्हणण्यासारखे होईल. अभावित विनोद झाला म्हणून तुम्ही स्वतःवर कधी हसत नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/10/2017 - 12:00

In reply to जरा थंड घ्या by पैसा

Permalink

असंय होय !

हसायला काय काहीही चालतं कारण त्याला काही कळायला पाहिजे असं नाही. एकतर तुम्हाला काय की त्रिशंकूंना काय अनुवाद जमत नाही हे उघड आहे. बाळंत होण्याची तुलना, जे स्वतःला (किमान मराठीचे तरी) तज्ञ समजतात त्यांनी, मराठी अनुवाद करण्याशी जोडणं हा खरा हास्यास्पद प्रकार आहे आणि अर्थातच उघड पलायनवाद आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/10/2017 - 12:06

In reply to असंय होय ! by संजय क्षीरसागर

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 05/10/2017 - 12:22

In reply to =)) by पैसा

Permalink

ज्ञानकोशकार डॉ केतकर एकदा

ज्ञानकोशकार डॉ केतकर एकदा सकाळी न्याहारी करत असताना एक कवी महाशय आले आणि त्याना म्हणाले कि मी तुम्हाला माझ्या काही कविता वाचून दाखवतो. डॉ. हो म्हणाले. कवी महाशयांनी त्यांना तीन कविता वाचून दाखवल्या आणि आशेने विचारले कि कशा आहेत . डॉ केतकर म्हणाले "अगदी भिकार" यावर कवी महाशय संतापून म्हणाले तुम्ही ज्ञानकोशच लिहा कविता म्हणजे काय ते तुम्हाला कसे कळणार? यावर डॉ केतकरानी न्याहारीच्या टेबलवर असलेले एक उकडलेले अंडे उचलले आणि ते हसत म्हणाले," हे पहा, हे अंडे काही मी दिलेले नाही. पण हे किती रुचकर लागते ते मी कोंबडीच्या पेक्षा जास्त चांगले सांगू शकतो." हे ऐकून कवी महाशय आपले कवितेचे बाड उचलून पसार झाले .
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/10/2017 - 12:27

In reply to ज्ञानकोशकार डॉ केतकर एकदा by सुबोध खरे

Permalink

एपिक!

=))
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/10/2017 - 12:33

In reply to ज्ञानकोशकार डॉ केतकर एकदा by सुबोध खरे

Permalink

@ खरे,

विनोद म्हणून त्यावेळी चालून गेला असेल. पण ज्याला कवितेत नक्की काय चूक आहे ते दाखवता येत नाही त्यानं अंडं आणि कोंबडीच्या चवीच्या ज्ञानाशी स्वतःची तुलना करणं हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 05/10/2017 - 12:43

In reply to @ खरे, by संजय क्षीरसागर

Permalink

पण ज्याला कवितेत नक्की काय

पण ज्याला कवितेत नक्की काय चूक आहे ते दाखवता येत नाही त्यानं अंडं आणि कोंबडीच्या चवीच्या ज्ञानाशी स्वतःची तुलना करणं हास्यास्पद आहे. संक्षी तुमचा अहं दुखावला गेला आहे म्हणून अस वितंडवाद घालता आहात. मला गाण्यातील ओ का ठो कळत नाही तरीही एखादा साधारण गायक बेसूर झाला आहे एवढं तरी नक्की समजतं. कोणता सूर चुकला आहे हे समजत नसेल तरीही. चूक झाली तर ती प्रांजळपणे कबुल करण्याचं धारिष्ट्य किंवा प्रामाणिकपणा असावा माणसात.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/10/2017 - 13:57

In reply to पण ज्याला कवितेत नक्की काय by सुबोध खरे

Permalink

@ खरे !

तुमचा अहं दुखावला गेला आहे म्हणून अस वितंडवाद घालता आहात. अहं एकदा मधे आणला की सगळे धन्य झाले ! आहो, मी लेखात बदल केला आहेच आणि तो स्वतःच्या शब्दानं केला आहे. चर्चा करता येत नाही तिथे अहंकार म्हटलं की झालं ! आणि इथे गाण्याचा प्रश्नच येत नाही. मराठीच येत नसेल तर मग कमेंट मारायचीच कशाला ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 05/10/2017 - 19:13

In reply to @ खरे ! by संजय क्षीरसागर

Permalink

एक साधा सरळ मुद्दा आहे तुम्ही

एक साधा सरळ मुद्दा आहे तुम्ही पैसाताईंना म्हणाला कि "जरा भाषांतर करुन प्रतिभा दाखवली तर बोलता येईल." याचा साधा अर्थ ज्याला भाषांतर करता येत नाही त्याने बोलू नये. म्हणजेच तुमच्या म्हणण्याप्रमाणे " तुम्हाला गाणं म्हणता येत नसेल तर गाण्याच्या सुराबद्दल टीका करू नका" किंवा "अंडं घालता येत नसेल तर त्याच्या स्वादाबद्दल बोलू नका". चूक मान्य करण्याइतका प्रामाणिकपणा किंवा धारिष्ट्य असावे लागते हे मी एवढ्यासाठीच म्हटले होते. मराठीच येत नसेल तर मग कमेंट मारायचीच कशाला ? असे लिहून तुम्ही फक्त ते अट्टाहासाने सिद्ध करून दाखवता आहात. इथे येणार किंवा लिहिणारा प्रत्येक अन थोडीफार तरी मराठी येते म्हणूनच आलेला आहे एवढेच लक्षात ठेवा. मराठीचा गंधहि नसलेला माणूस मिपावर दाखवून द्या
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/10/2017 - 12:24

In reply to =)) by पैसा

Permalink

हेच तर मी वर म्हटलंय !

स्मायली टाकायला किंवा हसायला काही समजलंच पाहिजे असं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 05/10/2017 - 12:28

In reply to हेच तर मी वर म्हटलंय ! by संजय क्षीरसागर

Permalink

अंडं रुचकर लागतं हे समजायला

अंडं रुचकर लागतं हे समजायला अंडं द्यावं लागत नाही. ते खाऊन पाहिलं कि झालं.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 05/10/2017 - 12:31

In reply to अंडं रुचकर लागतं हे समजायला by सुबोध खरे

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Wed, 05/10/2017 - 12:34

In reply to अंडं रुचकर लागतं हे समजायला by सुबोध खरे

Permalink

हे बरोबर

हे बरोबर चित्र चांगलं की वाईट हे कळण्यासाठी स्वतःला चित्र काढता आलेच पाहिजे असं नाही असं परवाच एक सर म्हणत होते ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/10/2017 - 12:39

In reply to हे बरोबर by मितान

Permalink

काय हे!

नको ते बरं आठवतं तुला नको तिथे! =))
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 05/10/2017 - 13:09

In reply to काय हे! by पैसा

Permalink

गरीब बिचार्‍या स्वामीना

गरीब बिचार्‍या स्वामीना सगळे टपले छळण्याला. कंपुबाजीचा निषेध असो.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 05/10/2017 - 13:45

In reply to हे बरोबर by मितान

Permalink

सही पकडे है!

=)) सही पकडे है!
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/10/2017 - 13:51

In reply to हे बरोबर by मितान

Permalink

@मितान !

पुन्हा खरेंचाच विनोद ! मराठी संकेतस्थळावर आपण लिहीतो (शिवाय हास्यास्पद वगैरे कमेंट मारतो) याचा अर्थ आपल्याला नक्की काय हास्यास्पद आहे आणि त्या जागी काय असायला पाहिजे इतपत तरी समज हवी. अन्यथा हसणं हा वेडगळपणा होईल. त्या गोष्टीची चित्र काढता येणं आणि त्याहून थोर म्हणजे बाळंत होता येणं याच्याशी सांगड घालणं हे खरं तर हास्यास्पद आहे . शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का सुमार आहेत याची मी कारणं दिली होती, याकडे दुर्लक्ष करणं हा सोयिस्करपणा नेहेमीचाच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 05/10/2017 - 14:47

In reply to @मितान ! by संजय क्षीरसागर

Permalink

शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का

शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का सुमार आहेत याची मी कारणं दिली होती,
लोकांचे मूळ आक्शेप लेखाबद्द्ल नसून त्या एपिटाफच्या तुम्ही केलेल्या सुमार आणि धादांत चूक भाषांतराबद्दल आहेत. त्यात काय चुकलय हे देखील लोकांनी सांगितलं आहे. एकदोन लोकांनी छाना रुपांतर करून देखील दाखवलय.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 05/10/2017 - 14:54

In reply to शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का by अनुप ढेरे

Permalink

शुउउ !!!

शुउउ !!! असे नका लिहू "तात्या कावतो"
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/10/2017 - 15:52

In reply to शिवाय त्या पोस्टवर, चित्रं का by अनुप ढेरे

Permalink

?

प्रतिसाद खाली दिला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Wed, 05/10/2017 - 13:34

In reply to अंडं रुचकर लागतं हे समजायला by सुबोध खरे

Permalink

ते जौदे, पण केतकरांच्या

ते जौदे, पण केतकरांच्या न्याहारीत अंडे? शी...!
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Wed, 05/10/2017 - 15:12

In reply to ते जौदे, पण केतकरांच्या by खेडूत

Permalink

Lol !!!!!!

Lol !!!!!! :))
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 05/10/2017 - 15:08

In reply to बाईश्री by संजय क्षीरसागर

Permalink

जरा भाषांतर करुन प्रतिभा

जरा भाषांतर करुन प्रतिभा दाखवली तर बोलता येईल. ट्युलिप पेंटिंगवर तुम्ही टीका केली होतीत तेव्हा "तुमची चित्रे मिपावर टाका" असे म्हटले तर तुम्हाला ते हास्यास्पद आणि विचित्र :-~ वाटले होते... त्यामुळे, हे वाक्य पाहून आता कोणाला तसेच वाटले तर आश्चर्य वाटायला नको, नाही का ?! Image removed. (लोका सांगे तत्वज्ञान... ची आठवण आली. पण वाद Image removed. नको म्हणून ते सांगणार नाही. ;) :) )
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 05/10/2017 - 15:10

In reply to जरा भाषांतर करुन प्रतिभा by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ते जग प्रसिद्ध वाक्य माझेच

ते जग प्रसिद्ध वाक्य माझेच होते. दहा तोंडे असून देखील, आपला नम्र, दशानन
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 05/10/2017 - 15:29

In reply to ते जग प्रसिद्ध वाक्य माझेच by दशानन

Permalink

खुद्द स्वघोषित स्वामींनी ते

खुद्द स्वघोषित स्वामींनी ते वाक्य इथे लिहिलेले असल्याने, ते जगाच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत अजून दुसर्‍या कोणाचे होऊच्च शकत नाही... अगदी स्वामिने त्याविरुद्ध कर्म केले तरीसुद्धा ! काय समजलात ;) :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com