मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल - आणि हा खेळ झाला

वेल्लाभट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जरा हासलो आणि हा खेळ झाला तुझा भासलो आणि हा खेळ झाला तसा संयमी नित्य मी राहणारा जरा त्रासलो आणि हा खेळ झाला मला वाटले वेळ आलीच होती तरी वाचलो आणि हा खेळ झाला मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला जरा शेवटी हात जोडावयाला उभा ठाकलो आणि हा खेळ झाला अता थांबता येत नाही अपूर्व जरा धावलो आणि हा खेळ झाला - अपूर्व ओक

वाचने 4311 वाचनखूण प्रतिक्रिया 20

निश 29/06/2016 - 17:32
मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला .....ह्या ओळि एकदम मस्त...

चतुरंग 30/06/2016 - 23:16
नेहेमीप्रमाणेच आमची पोचपावती.... जरा हासलो आणि हा घोळ झाला 'तिचा' भासलो आणि हा घोळ झाला! नसे संयमी नित्य मी चापणारा जरा ग्यासलो आणि हा घोळ झाला! रमा बोलता वेळ झाली भिशीची उगा नाचलो आणि हा घोळ झाला! सुरा सोडणे मान्य होते तरीही पुन्हा प्यायलो आणि हा घोळ झाला! असे तातडी, नाडि सोडावयाला उभा ठाकलो आणि 'हा घोळ' झाला! कवी तिंबती आज 'रंग्यास' जाली जरा चावलो आणि हा घोळ झाला! (घोळदार)रंगा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 01/07/2016 - 07:43
वेल्लाभट आणि रंगासेठ दोघांच्याही रचना खासच. -दिलीप बिरुटे (गझलप्रेमी)

नाखु 01/07/2016 - 15:39
आणि पुढचा घोळ दोन्ही फर्मास.. घोळसलेला खेळाडु नाखु

चाणक्य 02/07/2016 - 22:51
छान गजल

सत्यजित... 03/05/2017 - 01:48
ज ब र द स्त! त्यातही...त्रासलो,वाचलो आणि वाकलो...गजब शेर! >>>मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला>>>पहिलीच ओळ कितीतरी पुरेशी आहे खरं तर आणि त्यात ही दुसरी!लाजवाब!

वेल्लाभट 03/05/2017 - 12:08
अरे वा. इतके दिवसांनी या ग़ज़लेचा धागा वर आलेला बघून छान वाटलं. प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद. सत्यजित, मदनबाण, मितान, दशानन!