गझल - आणि हा खेळ झाला
काव्यरस
जरा हासलो आणि हा खेळ झाला
तुझा भासलो आणि हा खेळ झाला
तसा संयमी नित्य मी राहणारा
जरा त्रासलो आणि हा खेळ झाला
मला वाटले वेळ आलीच होती
तरी वाचलो आणि हा खेळ झाला
मला मोडणे मान्य होते तरीही
पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला
जरा शेवटी हात जोडावयाला
उभा ठाकलो आणि हा खेळ झाला
अता थांबता येत नाही अपूर्व
जरा धावलो आणि हा खेळ झाला
- अपूर्व ओक
वाचने
4311
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
मला मोडणे मान्य होते तरीही
पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला .....ह्या ओळि एकदम मस्त...
प्रत्येक शेर जमलाय!
सुंदर!
सर्वांना धन्यवाद :)
नेहेमीप्रमाणेच आमची पोचपावती....
जरा हासलो आणि हा घोळ झाला
'तिचा' भासलो आणि हा घोळ झाला!
नसे संयमी नित्य मी चापणारा
जरा ग्यासलो आणि हा घोळ झाला!
रमा बोलता वेळ झाली भिशीची
उगा नाचलो आणि हा घोळ झाला!
सुरा सोडणे मान्य होते तरीही
पुन्हा प्यायलो आणि हा घोळ झाला!
असे तातडी, नाडि सोडावयाला
उभा ठाकलो आणि 'हा घोळ' झाला!
कवी तिंबती आज 'रंग्यास' जाली
जरा चावलो आणि हा घोळ झाला!
(घोळदार)रंगा
In reply to सुरेख! गजल आवडलीच by चतुरंग
वावा जबर घोळ घातलात !वा!
In reply to सुरेख! गजल आवडलीच by चतुरंग
=))
In reply to सुरेख! गजल आवडलीच by चतुरंग
हाही घोळ मस्त जमलाय.... भारी
वेल्लाभट आणि रंगासेठ दोघांच्याही रचना खासच.
-दिलीप बिरुटे
(गझलप्रेमी)
प्रत्येक शेर मस्त जमलाय... व्वा
आणि पुढचा घोळ दोन्ही फर्मास..
घोळसलेला खेळाडु नाखु
गेमच झाला
मस्त!!
छान गजल
छान आहे !!
ज ब र द स्त!
त्यातही...त्रासलो,वाचलो आणि वाकलो...गजब शेर!
>>>मला मोडणे मान्य होते तरीही
पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला>>>पहिलीच ओळ कितीतरी पुरेशी आहे खरं तर आणि त्यात ही दुसरी!लाजवाब!
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Largo al factotum" [ The Barber of Seville ] Andre Rieuआहाहा ! सुंदर !!!
वाह वाह!!
सुरेख.
अरे वा. इतके दिवसांनी या ग़ज़लेचा धागा वर आलेला बघून छान वाटलं. प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद. सत्यजित, मदनबाण, मितान, दशानन!
फार मस्त