गझल - आणि हा खेळ झाला
जरा हासलो आणि हा खेळ झाला
तुझा भासलो आणि हा खेळ झाला
तसा संयमी नित्य मी राहणारा
जरा त्रासलो आणि हा खेळ झाला
मला वाटले वेळ आलीच होती
तरी वाचलो आणि हा खेळ झाला
मला मोडणे मान्य होते तरीही
पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला
जरा शेवटी हात जोडावयाला
उभा ठाकलो आणि हा खेळ झाला
अता थांबता येत नाही अपूर्व
जरा धावलो आणि हा खेळ झाला
- अपूर्व ओक
फार मस्त
सुंदर
सुंदर!
सर्वांना धन्यवाद :)
सुरेख! गजल आवडलीच
हाहहहा
=))
हाही घोळ मस्त जमलाय.... भारी
चला सकाळ कारणी लागली
प्रत्येक शेर मस्त जमलाय...
खेळ
गेमच झाला
मस्त!!
+१
छान आहे !!
क्या बात है!
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Largo al factotum" [ The Barber of Seville ] Andre Rieuआहाहा ! सुंदर !!!
वाह वाह!! सुरेख.
अरे वा. इतके दिवसांनी या