नाटकापेक्षा आमच्या धंद्यात,
नेमका उलटा खेळ आहे.
तिथे भेळेला खाणारा आहे.
इथे खाणाय्राला-भेळ "आहे! "
स्टेज लागून तयार आहे.
नेपथ्यंही सज्ज आहे.
वधूपार्टी येऊन गरम,
आणी .. वरंपार्टी थंड आहे.
या रे! जा रे! .. आणा रे! बोलवा रे!
हलकल्लोळ आता उडणार आहे.
जो तो येऊन गप पडल्या,
भटावर आता चिडणार आहे.
दोन तास लेट झाला
आकराची वेळ छापून !
आइस्रकिम जरी "तयार होतं"
वितळण्या आधी कापून! (स्लाइस करून)
केटरिंग आणी भटजिंचीही
अवस्था अशी-एक आहे.
काम ठरताना चालंलेली नोट
आज मात्र "फेक" आहे.
लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट!
लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट!
भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत
कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट!
तेव्हढ्यात एक लहान मूल,
आइस् करीम घेऊन येते.
"काका.. आयश्लिम खानार? " म्हणून
थंडावा देऊन जाते.
मग मनात विचार येतो..
इथे लहान होऊनच रहायला हवं.
त्याच्या निरागस नजरेनी,
सगळं चालंलेलं पहायला हवं!
मग सगळे त्रास सु सह्य होऊन,
अॅक्सेप्टन्स वाढेल.
आणी फार तर तिथला 'राग',
तो कवितेतून काढेल!
सोप्पं होऊन जाइल सगळं
त्रास हवेत विरून जाइल!
शब्द उरले नाहित.. तरी,
काव्य तळाशी राहिल!
==============
अत्रुप्त...
काव्यरस
वाचने
8391
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा!!
कविता आवडली.
छान
कविता आवडली.
आवडली कविता.
वा वा....काय सुंदर जमलिये हो
नाहि, त्यांचे यजमान रागावतात.
In reply to वा वा....काय सुंदर जमलिये हो by कॅप्टन जॅक स्पॅरो
गुर्जींच्या सगळ्या लिखाणात,
In reply to वा वा....काय सुंदर जमलिये हो by कॅप्टन जॅक स्पॅरो
ते पण बोबड्या बोलणाऱ्या
In reply to गुर्जींच्या सगळ्या लिखाणात, by यशोधरा
गेंडा हत्ती युतीत सोलापुरचा
In reply to ते पण बोबड्या बोलणाऱ्या by प्रचेतस
वा वा! बोलणार तुम्ही, आणि आमी
In reply to गेंडा हत्ती युतीत सोलापुरचा by अत्रुप्त आत्मा
आं Sssssssssss दुत्त दुत्त!
In reply to वा वा! बोलणार तुम्ही, आणि आमी by यशोधरा
कशा गुदगुल्या होतेत एका
In reply to आं Sssssssssss दुत्त दुत्त! by अत्रुप्त आत्मा
ल्लूल्लूल्लूल्लूल्लू..! =))
In reply to कशा गुदगुल्या होतेत एका by अभ्या..
वा वा गुर्जी !!! एकदम मस्त
In reply to गेंडा हत्ती युतीत सोलापुरचा by अत्रुप्त आत्मा
काय अभ्यास काय अभ्यास!
In reply to गुर्जींच्या सगळ्या लिखाणात, by यशोधरा
आईशक्लीमचा पण असतो. परवाच्या
In reply to गुर्जींच्या सगळ्या लिखाणात, by यशोधरा
व्वाव्वा!!
वाहव्वा वाहव्वा. इनशादेव.
लायटिंगच्या माळा स्टेजची फूल
उत्तम!!!!!!!!!
गुर्जी! दर्शन द्या ;)
अवघड आहे.
सर्व वाचक ,प्रतिसादकांचे आभार