Skip to main content

लॉन-वरचं लगीन!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 20/04/2017 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17991585_1325052557581027_2522918732284372163_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=87b7fe7cee10ef8de3ed78cb4dfac684&oe=59985CF0 नाटकापेक्षा आमच्या धंद्यात, नेमका उलटा खेळ आहे. तिथे भेळेला खाणारा आहे. इथे खाणाय्राला-भेळ "आहे! " स्टेज लागून तयार आहे. नेपथ्यंही सज्ज आहे. वधूपार्टी येऊन गरम, आणी .. वरंपार्टी थंड आहे. या रे! जा रे! .. आणा रे! बोलवा रे! हलकल्लोळ आता उडणार आहे. जो तो येऊन गप पडल्या, भटावर आता चिडणार आहे. दोन तास लेट झाला आकराची वेळ छापून ! आइस्रकिम जरी "तयार होतं" वितळण्या आधी कापून! (स्लाइस करून) केटरिंग आणी भटजिंचीही अवस्था अशी-एक आहे. काम ठरताना चालंलेली नोट आज मात्र "फेक" आहे. लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट! लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट! भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट! तेव्हढ्यात एक लहान मूल, आइस् करीम घेऊन येते. "काका.. आयश्लिम खानार? " म्हणून थंडावा देऊन जाते. मग मनात विचार येतो.. इथे लहान होऊनच रहायला हवं. त्याच्या निरागस नजरेनी, सगळं चालंलेलं पहायला हवं! मग सगळे त्रास सु सह्य होऊन, अॅक्सेप्टन्स वाढेल. आणी फार तर तिथला 'राग', तो कवितेतून काढेल! सोप्पं होऊन जाइल सगळं त्रास हवेत विरून जाइल! शब्द उरले नाहित.. तरी, काव्य तळाशी राहिल! ============== अत्रुप्त...

वाचने 8391
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

छान

वा वा....काय सुंदर जमलिये हो कविता. लग्नाचा हंगाम आला की गुर्जींना कविता व्हायलाचं पाहिजे. रच्याकने त्या आइश्क्लिम वाल्या कार्ट्याला काही दिलतं की नाही ;)!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गुर्जींच्या सगळ्या लिखाणात, खफ पोस्टीत वगैरे हल्ली लहान बाळांचा फार उल्लेख असतो, नै? =))

In reply to by प्रचेतस

गेंडा हत्ती युतीत सोलापुरचा घुसला उंट! जाता जाता यशो तैं नी टपली मारून केला स्टं... टं! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/baby-soldier-sticky-out-tongue-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

वा वा! बोलणार तुम्ही, आणि आमी फक्त सांगितलं, नजरेस आणून दिलं तर स्टंट काय? हे बरंय! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

कशा गुदगुल्या होतेत एका माणसाला....अं..अं..अं.... कसं खिदळतंय एक माणूस मनातल्या मनात....अं...अं...अं... . कसं बसतंय एक मानूस अ‍ॅक्टिव्हावर मांडी घालून. अं..

In reply to by यशोधरा

आईशक्लीमचा पण असतो. परवाच्या कवितेत पण आईशक्लीम आजच्या कवितेत पण आईशक्लीम. ;)!!!

> लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट! लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट! भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट!blockquote छान आहे कविता, जास्त आवडलं. तेवढं क्रीया पद मात्र क्रियापद असायला हवं होतं.