Skip to main content

फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 05/04/2017 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
मग्रूर काजव्यांचा संचार होत आहे पणती जपून ठेवा अंधार होत आहे! वाटेत सावल्यांचे थांबे नकोत मजला माझ्याच सावलीचा मज भार होत आहे! झाली नवीन ओळख,माझी मला अशी की ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे! सुरवंट वेदनेचा कोषांत वाढताना फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे! हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण? एकेक पाकळीचा गुलजार होत आहे! —सत्यजित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4234
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण? एकेक पाकळीचा गुलजार होत आहे! ››› तू सॉल्लिड है बॉस! साला लपेट लपेट के मारता है!

In reply to by संदीप-लेले

'चिमणी' शब्दाच्या अर्थछटेवर अवलंबून आहे का? कविचं 'हृदय' अशी अर्थछटा फिट बसते का ? आणि 'चिमणी' या शब्दाची अर्थछटा कच्ची बच्ची पिलावळ (लहानमुले) घेतली तर झेपणे अवघड गेल्यास नवल नसावे.

In reply to by माहितगार

स्वतःला शोधत असताना (सोबतच व्यवहाराच्या कसोटीवर स्वतःचे यश-अपयश जोखताना) स्वतःची एक अशीकाहीशी प्रतिमा कवीसमोर येते आहे,ज्यामुळे त्याच्या मनात एक विचित्र द्वंद्व उभे होते आहे!ज्याप्रमाणे एखादी चिमणी आरश्यातला आपल्याच प्रतिमेला कुणी और (प्रतिस्पर्धी ई.) समजून सारखी चोचीने टोचणी मारत राहते!

धन्यवाद शैलेंद्र,अत्रुप्त आत्मा

सुरेखच!
पणती जपून ठेवा अंधार होत आहे!
यातली 'पणती जपून ठेवा' ही आधी वाचलेली कल्पना आहे.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!

सुरेख !!! शेवटचे चरण तर खासच !