मनातल्या मनात !!
बरेच दिवस मनाविषयी चार ओळी टंकायची इच्छा होती. पण मन मानत नव्हतं :) आता थोडं मनावर घेतोय.
आजवर मनावर जितका विचार झालाय तेव्हढा कदाचीत कुठल्याच विषयावर झाला नसावा. तत्वज्ञ, कवि, साहित्यीक, वैज्ञानीक, दार्शनीक... किंबहुना अवघी मानवजात या एका विषयाचं गेली कित्येक शतकं चिंतन करतेय. पण मन बालकृष्णासारखं समस्त वैचारीक ब्रह्मांड व्यापुन दशांगुळे उरतच. मनच ते.
साधारणपणे 'भावना' या विषयाला धरुन मनाचा अभ्यास सुरु होतो. 'विचार' आणि/किंवा भावना या दोन घटकांची संगती लावणं हा फार मजेदार विषय आहे. प्रचंड मोठं शास्त्र उभं आहे याचा अभ्यास करायला. अलीबाबाची गुहाच ति. यच्चयावर मानवी व्यवहारांचे धागेदोरे अत्यंत क्लीष्ट, पण तेव्हढेच नेमकेपणाने गुंफलेले आढळतात मनाच्या महावस्त्रात.
आता प्रश्न येतो कि हि भावना म्हणजे नेमकं काय. सोप्या शब्दात सांगायचं तर एक विशिष्ट क्रिया करायला शरीराला सज्ज करण्याची यंत्रणा म्हणजे भावना. जीवशास्त्रं म्हणतं कि प्रेरणेला प्रतिसाद देणं हे सजीवाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. शुद्ध मराठीत आपण त्याला रिस्पॉन्स टु स्टिम्युलस म्हणतो. आहार-निद्रा-भय-मैथुन या प्रेरणा प्रकारांबरहुकूम शरीराने प्रतिक्रीया द्यावी म्हणुन शरीराला एका विशिष्ट अवस्थेत घेऊन जाण्यासाठी जे काहि रासायनीक उपद्व्याव शरीरात होतात त्याला आपण भावना म्हणतो. साधारणपणे हि क्रिया क्षणार्धात होते. संकटाची चाहुल लागली कि हरीण कान टवकारतो, नाग फणा काढतो, सरडा रंग बदलतो, भीमाचे स्नायु फुरफुरतात, धर्मेंद्रच्या जिभेवर कमिने-कुत्ते वगैरे शब्द आपापली पोझीशन घेतात. प्रेरणेची दाहकता, शरीराची घडण व इतर परिस्थितीनुसार या क्रियेची लांबि-रुंदी बदलते. उद्देश मात्रं एकच. रिस्पॉन्स टु स्टिम्युलस.
मनाचा दुसरा घटक म्हणजे विचार. इतर प्राण्यांच्या मानाने मानवाला हे वैचारीक दान अगदी भरभरून देण्यामागे निसर्गाची काय इच्छा असेल कोण जाणे. पण माकडसदृश एका प्राण्याचा मेंदु एका विशिष्ट प्रकारे डेव्हलप झाला. त्या प्राण्याला आपण मानव असं नाव दिलं. शरीराचे इतर उपद्व्याप सांभाळण्यापलिकडे या मानवी मेंदुचं काम तसं बघितलं तर इतर प्राण्यांसारखच आहे. ते काम म्हणजे गणितीय समिकरणं. चित्त्याचा मेंदु भक्षावर फायनल झेप कधि घ्यायची याचं समीकरण मांडतो. एकदा झेप झाली कि भक्ष्य मिळो अथवा न मिळो त्याचे सरकारी बाबुसारखे संध्याकाळचे पाच वाजतात. धृवीय प्राणी याच न्यायाने पोटाचे पेटारे भरुन आपल्या शीतकालीन निद्रेची सोय करते. मोराचे नृत्य असो वा गोगलगाईचा विजेच्या चपळाईने केलेला प्रवास, सर्वांची समीकरणं काहि ठरावीक उद्दीष्टाच्या भोवती अगदी गच्च आवळलेले असतात. मानवाच्या बाबतीत मात्र या समीकरणांच्या जंत्रीचा परिघ फार म्हणजे फारच मोठा असतो. इतका मोठा, कि नेमका कुठल्या उद्दीष्टासाठी हि समीकरणं चालली आहेत हे कळेनासं व्हावं. हा परिघ इतका मोठा व्हायचं कारण म्हणजे मानवी मेंदुला इतर प्राण्यांच्या मानाने काळाचं अफाट भान असणे होय. चित्ता मागच्या-पुढच्या काहि क्षणांचा विचार करुन स्वस्थ बसतो. मानवी मेंदुसाठी अशा मागच्या-पुढच्या संदर्भाला काहिच मर्यादा नाहि. या परिघीय संदर्भांनाच आपण म्हणतो "विचार". या विचारांचं जंजाळ किती खोल असावं याचा काहि थांगपत्ता नाहि.
हा डोलारा सांभाळायला स्मृतीची सोबत असतेच. असं हे भावना आणि विचारांचं कॉकटेल घेऊन मानवी मेंदु आपली करामात दाखवत असतं. त्याची अनेक प्रतलं असतात. कुठली भावना विचारांच्या आश्रयाने समुद्रात बुडालेल्या एखाद्या जहाजाप्रमाणे मेंदुत कुठेतरी पडुन असेल व कधि उफाळुन वर येईल याचा नेम नाहि. विचारांच्या पृष्ठभागावर मेंदु एखादं समीकरण मांडत असेल. ते तसच खालच्या प्रतलांमधे गडप होऊन आपलं उत्तर शोधत बसेल. उत्तर सापडलं कि सरसरुन परत पृष्ठभागावर येऊन "सरप्राइझ" म्हणुन कधि बोंब ठोकेल सांगता येत नाहि. ब्रेनवेव्ह वगैरे प्रकरणं याच सदरात मोडतात.
हे सगळं मनुष्यप्राणी जंगलात रहायचा तोपर्यंत ठीक होतं. निसर्गाने मानवाला पक्षांप्रमाणे पंख दिले नाहि. हत्तीची शक्ती दिली नाहि. सापाचं विष दिलं नाहि. मासोळीची पोहोण्याची क्षमता दिली नाहि. हे सर्व कंपन्सेट करायला म्हणुन कि काय, एक प्रगत मेंदु देऊन टाकला... आणि लोचा झाला ना राव. माणुस झाडामाडांच्या जंगलातुन बाहेर पडला व त्याच्या मेंदुने आपलं स्वतःचं जंगल निर्माण केलं. आता शरीर टिकवायला भावना नामक सिस्टीम जुनीच, पण प्रेरणा निर्माण करणारे घटक मात्रं वैचारीक असं नवीन नाटक सुरु झालं. जंगलात असताना वाघाची डरकाळी ऐकुन भिती नामक भावना धावायची प्रेरणा उत्पन्न करायची. आता ऑफीसात बॉस ओरडला कि हिच भिती धावायला सांगते, पण प्रॉब्लेम असा कि त्याची गरजच नसते. मग आणखी नाटकं सुरु होतात. भावनांचा कंट्रोल काय, विचारांना आवरणं काय, सुख-दु:खांवर रामबाण उपाय काय, मनाला शटडाऊन करणं काय... बरच काय काय.
आपलं जगणं हि अशी मनाशी केलेल्या व्यवहारांची गाथा असते. खरं तर "मनाशी व्यवहार" वगैरे काहि भानगड नसते. कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसते. मनाची कवाडं आपापसात कुजबुजतात फक्त. पण मनाचा व्यवहार वगैरे म्हटलं कि कसं एकदम फिलॉसॉफीकल वाटतं :)
कोळ्याने स्वतःच जाळं विणाव व आपणच त्रयस्थासारखं त्यात भटकत राहावं असं काहिसं मनाचं होतं. कल्पकता, बुद्धी, भावनांचा कल्लोळ, समीकरणं सोडवताना सतत बदलणार्या भुमीका, त्यातनं निर्माण होणार्या स्व-आयडेण्टिटी, सुख-दु:खांचे प्रसंग. मग त्यावर उपाय शोधताना इतर प्रश्न निर्माण होणं. असं सगळं मस्तपैकी चाललं असतं. त्यावर खात्रीशीर उपाय काहि सांगता येत नाहि. एक मात्रं नक्की. मनाशी व्यवहार करताना त्याला उगाच चिडवु नये. उदा. प्रसंग जर दु:खाचा असेल तर उगाच मुद्दाम त्याला कुठल्या अवडंबराखाली दाबु नये, कि नकारु नये, किंवा त्याला खोटा ठरवु नये. मनाला त्याचा स्वतःचा मार्ग काढण्याची मोकळीक दिली कि ते बरोबर आपलं आनंदनिदान शोधतच. आळस, अहंकार, भिती, नैराश्य... समस्या काहिही असली तरी शेवटी आहे तो मनाचा स्वतःचा केमीकल लोचा असतो.. त्याचा त्याला निस्तरु द्यावा.
तर सांगायचा मुद्दा असा... मुद्दा वगैरे काहि नाहि. झोप येत नव्हती म्हणुन कळफलक बडवायला घेतला :) . झोपतो आता.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वर चाललेल्या डिप्रेशन च्या
:)
@ संदीप ,
डिप्रेशन हा आजार आहे, स्वयंनिंर्णय नाही, स्वेच्छा नाही हे लक्षात असू द्यावे.डिप्रेशन हा मनाच्या नेगटिवीटीचा परिणाम आहे. स्वेच्छेचा अर्थ व्यक्तीची इच्छा असा होतो. जोपर्यंत व्यक्ती स्वतः डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत ते कायम राहील. व्यसनमुक्तीतही स्वेच्छाच काम करते. डिप्रेशनमधे जाण्याची कारणं असंख्य असू शकतील पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग व्यक्तीनं स्वतःला सावरणं हाच आहे. जेव्हा व्यक्ती स्वतःला सावरते तेव्हा मनाची नेगटिवीटी दूर होण्याचा मार्ग सापडतो, अन्यथा नाही. २)वर चाललेली दिग्गजांची चर्चा मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे आहे.अध्यात्म हा स्व-जागरणाचा विषय आहे आणि मानसशास्त्र मनाचा आभ्यास आहे. स्व-जागृतीविना मनाचा आभ्यास धोक्याचा आहे कारण सैरभैर झालेलं मन केव्हाही स्व-विस्मरण घडवून व्यक्तीला स्वतःच्या काह्यात घेऊ शकतं. ३)आउटपुट झिरोतसं वाटत असेल तर या चर्चेत भाग न घेतलेला बरा.संक्षि, तीन स्पष्ट प्रश्न.
संदीप,
मानसशास्त्र व अध्यात्म अशा
नो !
मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे ह्यातून आऊटपूट झिरो असतो हा आतापर्यंतचा माझे वैयक्तिक अनुभव व निरिक्षणावर आधारलेला निष्कर्ष आहे.मानशास्त्र किंवा मनोव्यापार समजल्याखेरीज अध्यात्म व्यर्थ आहे. त्यामुळे अध्यात्म हा प्रथम चरणात मनाचा उलगडा आहे. थोडक्यात, स्वतःप्रत येण्याचा मार्ग मनाचा महाल पार करुनच जातो. तुम्ही म्हणतायं तशी `रसायनांचे मेंदूवर होणारे परिणाम व त्यानुसार बदलणारी व्यक्तीची निर्णयक्षमता' यावर इथे डेटा ओतला जाईल. मग मतभेदांमुळे वाद होईल आणि निष्पन्न काहीएक होणार नाही.मानसशास्त्र, सायकॅट्री,
.
अभ्यासाची विषयवस्तू एक असली तरी गृहितके, प्रयोग, निष्कर्ष, परिणाम वेगवेगळे आहेत.सहमत आहे.शास्त्रज्ञ मनोचिकित्सा करतांना वेगवेगळ्या रसायनांच्या, कार्यकारणभावाच्या अनुषंगाने मनाचा (प्रत्यक्षात मेंदूचा) अभ्यास करतात. अध्यात्मात असं अजिबात होत नाही.मानसशास्त्र व्यक्तीला, `सोशली नॉर्मल' (समाजशील व्यक्ती) बनवण्याचा प्रयत्न आहे आणि अध्यात्म व्यक्तीला `व्यक्तीमत्त्वातून मुक्तता' देण्याचा प्रयत्न आहे. पण इथे चर्चा फार वेगळ्या विषयावर चालली आहे.लेखकाच्या मते मनंच सर्वसत्ताक आहे आणि `आपण' अशी काही मनावेगळी चिजच या दुनियेत नाही ! त्यांनी तर अशी हद्द केलीये की `मनावेगळे आपण ही मनानीच स्वतःच्या सुखासाठी केलेली कल्पना आहे !' आणि त्याहून ग्रेट म्हणजे त्यांना वाटतंय की मनावेगळे आपण ही स्प्लीट पर्सनॅलिटी आहे.आणि माझं म्हणणंय :आपण सर्वसत्ताक आहोत आणि मन हा शरीरस्थित बायोकंप्युटर आहे. आपण तो वापरु शकतो पण मन म्हणजे सर्वस्व नाही. आणि याही पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की स्व-विस्मरण हाच मनोरुग्ण होण्याचा प्रथम चरण आहे.त्यामुळे ही चर्चा योग्य मार्गानं गेली तर सदस्यांना उपयोगी होईल.@ संदीप,
१. डिप्रेशन हा आजार आहे की राग-लोभ-मोह-मत्सर ह्यासारखी भावना?डिप्रेशन हा मूड आहे. तो विचार आणि भावनांपेक्षा गहीरा आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ टिकू शकतो. पण कोणताही मनोविकार उद्भवण्याचं मूळ कारण स्व-विस्मरण हेच आहे. २)२. डिप्रेशनच्या आजारात (आणि बहुतेक नशामुक्तीमध्येही) जी मेंदूत रासायनिक परिणाम घडवून आणणारी औषधे दिली जातात, त्याबद्दल काय मत आहे?अनुभव नाही. ध्यानप्रणालींचा आभ्यास केल्यामु़ळे तशी आवश्यकताही वाटली नाही. ३)३. एखादी नशा 'चढल्यावर' व्यक्तिचं आपल्या कृती-विचारांवर पूर्ण नियंत्रण असते की नसते? (नशा चढणे म्हणजेच नियंत्रण गमावणे म्हटले जाते.)अर्थात ! पण यात एक मेख आहे. निद्रा हे पूर्ण आत्मविस्मरण आहे आणि त्यामुळे देह पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जातो. काही प्रमाणात चढलेली नशा ही निद्रा पण सतत चालू असलेले विचार यांच्या मधली स्थिती आहे. म्हणजे जागृत आणि विचारांची रहदारी कमी झालेली. अशा वेळी नव्या कल्पना सुचणं, इतर वेळी न होऊ शकणारं साहस करता येणं, वैचारिक उहापोह कमी झाल्यामुळे मूड लाइट होणं अशा गोष्टी घडतात..
डिप्रेशन हा मूड आहे. तो विचार
मेडिटेशन उपयोगाचे नाही.
ते खरं आहे
ढेरेसाहेब, शास्त्रज्ञ
मुद्दा हा की हा लय नाजूक आणि
नाजूक आणि महत्त्वाचा विषय आहे
बाय द वे,
मेडिटेशन' म्हणजे नक्की काय
The word “meditation” stems
मला विचारताय काय सर? मला
रजनीशांच्या ध्यान विधी
डिटेल प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
तुमचे म्हणणे शंभर टक्के मान्य
'आपण' आणि 'मन'
ऑफ्कोर्स..
स्वप्नातलं मन
गामाश्री,
स्वप्नात देह जागृत नसतांना देहाची अनुभूती देण्याइतपत मन शक्तिशाली असतं.स्वप्नातून बाहेर पडणं म्हणजे मनाच्या चित्रपटातून बाहेर पडणं आहे. मन देहाची अनुभूती देत नाही तर आपण मनाच्या कब्जातून बाहेर येतो. २)मग स्वप्नातलं मन खरं की खोटं मानावं? देहाप्रमाणे मनाचाही कशावरून भासच होत नसेल स्वप्नात?मन एकच आहे आणि त्याचा चलतपट आहोरात्र चालूच असतो. दिवसाच्या उजेडामुळे तो दिसत नाही पण रात्रीच्या अंधारात, डोळे मिटल्यामुळे तो स्पष्ट होतो इतकंच. थोडक्यात, ज्याप्रमाणे चित्रपटगृहात पडदे आणि दरवाजे उघडले की स्क्रीन धूसर होऊन चित्र अस्पष्ट होतं आणि पुन्हा अंधार केल्यावर ते स्पष्ट होऊन वास्तविक वाटायला लागतं तसा प्रकार आहे.मन कधिही खोटं नसतं
सगळ्या सव्यापसव्यातून शेवटी
का नाही ठरणार ?
संक्षी, चर्चा आहे कुठे?
मी तर प्रामाणिकपणे प्रतिसाद देतोयं !
लेखकाच्या मते मनंच सर्वसत्ताक आहे आणि `आपण' अशी काही मनावेगळी चिजच या दुनियेत नाही ! त्यांनी तर अशी हद्द केलीये की `मनावेगळे आपण ही मनानीच स्वतःच्या सुखासाठी केलेली कल्पना आहे !' आणि त्याहून ग्रेट म्हणजे त्यांना वाटतंय की मनावेगळे आपण ही स्प्लीट पर्सनॅलिटी आहे.आणि माझं म्हणणंय :आपण सर्वसत्ताक आहोत आणि मन हा शरीरस्थित बायोकंप्युटर आहे. आपण तो वापरु शकतो पण मन म्हणजे सर्वस्व नाही. आणि याही पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की स्व-विस्मरण हाच मनोरुग्ण होण्याचा प्रथम चरण आहे.त्यामुळे ही चर्चा योग्य मार्गानं गेली तर सदस्यांना उपयोगी होईल.चर्चा पुढे नेणं म्हणजे फक्त
असं कुठेयं ?
मला तर जास्त करुन एकमेकांना
आपण आहोत ही एकमात्र निर्विवाद गोष्ट आहे
बघा, "चर्चा पुढे नेणं म्हणजे
अहो मॅडम, इथे मन स्वत:लाच खोडुन काढतय
खेत की मूली आवडत नसेल. :)
संदीप भाया...
:-) :-)
अध्यात्मावर बोलायचो तेव्हा
आमची नुसतीच पावडर.
अर्धवटराव जी काही प्रामाणीक प्रश्न
मारवाजी...
आता निदान अध्यात्मिक अज्ञान तरी लपवाल तेवढं बरं !
जीवनाचे तसेही काहि प्रयोजन आहे असं वाटत नाहि.एक्झॅक्टली हेच फ्रस्ट्रेशन तर मनाला सर्वस्व मानणारा अनुभवतो ! जीवन हेच जीवनाचं प्रयोजन आहे आणि आनंदानं जगणं ही त्याची निष्पत्ती आहे. २)तसं बघितलं तर अॅब्सोल्युट अद्वैत अवस्थेत माणुस जगाच्या रहाटगाडग्यासंदर्भात निरुपयोगी होतोयाला म्हणतात अध्यात्मिक आंधार ! अद्वैत झालेला निवांत होतो. त्याच्यासाठी जग स्वप्नवत होतं. इतरांना त्याचं जगणं मार्गदर्शक तत्व होतं. प्रणय त्याच्यासाठी कंपल्शन राहात नाही. तो आनंद शेअर करण्याचा एक बहाना होतो. ३)द्वैतीचा स्व मी-तू असा सापेक्ष असतो तर अद्वैतीचा विश्वाकार.काहीही फेकाफेकी ! अद्वैत ही स्थिती आहे, व्यक्ती नाही. नैतिकता त्या स्थितीत `रुल्स ऑफ द गेम' इतपत वास्तविकता राहाते. तीचं बंधन राहात नाही.का बरं लपवांवं आध्यात्मीक अज्ञान?
मन मनास उमगत नाही
मोघे छान लिहायचे !