ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते
विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते!
ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी
कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते!
तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला
पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते!
तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले
चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते!
केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या
वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते!
नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा
रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते!
—सत्यजित
वाचने
3104
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाह! सुंदर..
मस्तच!
मस्त !!
धन्यवाद!
In reply to मस्त !! by शार्दुल_हातोळकर
तो गझलेचा गाभा असेलही....
In reply to धन्यवाद! by सत्यजित...
सकस चर्चांचे स्वागत!
In reply to तो गझलेचा गाभा असेलही.... by शार्दुल_हातोळकर
धन्यवाद!
सुंदर कच्चा माल !
स्वागत!
In reply to सुंदर कच्चा माल ! by प्रसाद गोडबोले
व्वा, लिखते रहो !
धन्यवाद!
In reply to व्वा, लिखते रहो ! by संदीप-लेले