✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

BS - III गाड्यांवर भरपूर सवलती!

श
शब्दबम्बाळ यांनी
गुरुवार, 03/30/2017 - 18:52  ·  लेख
लेख
आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती झालंच असेल कि BS - III असणाऱ्या सगळ्या गाड्यांच्या विक्रीवर आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल पासून बंदी घातली आहे. त्यामुळे वाहन क्षेत्राला भरपूर तोटा होण्याचे दिसत आहे पण हा तोटा सामान्य ग्राहकाला फायदा मिळवून देऊ शकतो. आता बऱ्याच वाहन विक्रेत्यांनी आपल्या गाड्या लवकरात लवकर विकल्या जाव्यात म्हणून अगदी १५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत सवलत दिलेली आहे!! होंडा नवी सारखी गाडी जिचा खप आधीच कमी आहे तिच्यावर २५हजारापर्यंत सूट आहे! म्हणजे जवळपास अर्ध्या किमतीला गाडी मिळू शकते. पण अशा गाड्या घेतल्याने भविष्यात काही तोटा आहे का? तसेच कुठे किती सवलत आहे हे पण इथे सांगावे म्हणजे खरेदी करणाऱ्याला फायदा उठवता येईल. होंडाकडून ‘बंपर’ ऑफर; BS-III प्रकारातील वाहनांवरील बंदीनंतर मोठी सवलत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
22744 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

उद्या ३१ तारीख आहे , एका

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/30/2017 - 19:19 नवीन
उद्या ३१ तारीख आहे , एका दिवसात नोंदणी होणार का ?
  • Log in or register to post comments

नोंदणी होईलच. पैसे मिळणार

खेडूत
गुरुवार, 03/30/2017 - 19:28 नवीन
नोंदणी होईलच. पैसे मिळणार म्हणून उद्या रात्री जागून करतील. डिलीवरी आरामात देतील. २०२२ ला भारत ४ सक्तीचे झाल्यावर पुनः विक्री करता येणार नाहीत. अशी गाडी घेतानाच समस्या विकत घेतो आहोत हे लक्षात घ्यावे! भारत -४ वाहनांमुळे प्रदूषण कांही पटीने कमी होणार आहे.
  • Log in or register to post comments

भारत ३ पेक्षा भारत ४ ची

संदीप डांगे
गुरुवार, 03/30/2017 - 19:51 नवीन
भारत ३ पेक्षा भारत ४ ची इंजिने ८०% कमी प्रदूषण करतात असे वाचले. पण १ एप्रिल पासून बीएस३ बंद म्हणजे बीएस चार सक्तीचेच असेच समजायचे ना? कि काही वेगळे आहे ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

२०२२ ला भारत ४ सक्तीचे

मदनबाण
गुरुवार, 03/30/2017 - 20:05 नवीन
२०२२ ला भारत ४ सक्तीचे झाल्यावर पुनः विक्री करता येणार नाहीत. अशी गाडी घेतानाच समस्या विकत घेतो आहोत हे लक्षात घ्यावे! भारत -४ वाहनांमुळे प्रदूषण कांही पटीने कमी होणार आहे. ज्यांनी आधीच दुचाक्या घेतल्या आहेत त्यांचे काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Closer (Lyric) ft. Halsey :- [ The Chainsmokers ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

रॉयल एन्फ्लिड वर आहे का काही

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 03/30/2017 - 19:35 नवीन
रॉयल एन्फ्लिड वर आहे का काही डिस्काउंट.
  • Log in or register to post comments

1 रूपया सुद्धा नाही.

सतिश पाटील
Fri, 03/31/2017 - 11:18 नवीन
नवी मुंबई आणि ठाणे मधल्या ४ डीलरला मोठ्या अपेक्षेने काल चौकशी केली. पैकी एका मालकाने जे सांगितले ते खालील प्रमाणे जेव्हा तुम्ही आमची गाडी बुक करता त्यानंतरच आम्ही कंपनीला ऑर्डर देतो. त्यातही १ ते-३ महीने वोटिंग असते आमच्या गाड्यांना. त्यामुळ गाड्यां स्टॉक असण्याचा प्रश्नच नाही. अणि ज्या गाड्या तुम्ही शोरुम मधे बघता त्या कोणीतरी बुक केलेल्या आहेत म्हणून इथे उभ्या केल्यात. त्यातही एखादी गाडी उरलीच तर नंतर आम्ही ती डिसलोकेट करुण स्पेर पार्ट्स विकू. काही नुकसान नाही आमचे. अणि आम्ही रॉयल एनफील्ड वले आहोत.इथे स्वस्त कही मिळत नाही. जास्तीत जास्त मी तुम्हाला ३ वर्षांचा इन्शुरन्स मधे सवलत देऊ, तेही तुम्ही माझ्याशी एवढ्या गप्पा मारल्या म्हणून. घेउन या १५६००० रुपये क्याश. नाहीतर तुम्ही तिकडे होंडावाल्यांकड़े जा नावी घ्या ३५ हजारात देतायत, अस बोलुन अपमान देखील केला. अजुन एक माहिती त्याने दिली, हिमालयन आणि क्लासिक मधे आता ABS पण येणार आहे लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

इतका माज बरा नव्हे.

सुबोध खरे
Mon, 04/03/2017 - 19:10 नवीन
इतका माज बरा नव्हे. आज चलती आहे म्हणून ग्राहकांशी उर्मट पणे वागले तर उद्या पश्चात्तापाची पाळी येऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

लोकांना प्रदूषणापेक्षा

एस
गुरुवार, 03/30/2017 - 19:48 नवीन
लोकांना प्रदूषणापेक्षा पैशांची थोडीशी बचत जास्त महत्त्वाची वाटते हे दुर्दैव. हेच लोक परत 'किती प्रदूषण झालंय' असं म्हणायला मोकळे.
  • Log in or register to post comments

भ्रष्टाचारापासून

संदीप डांगे
गुरुवार, 03/30/2017 - 19:57 नवीन
भ्रष्टाचारापासून स्वच्छ्तेपर्यंत सगळं असंच आहे, आता काय बोलायचे? बाकी टेसला च्या इलेक्ट्रीक कार्सचे पेटंट एलन मस्कने २०१४ मध्येच खुले केले तरी अजून कोणी भारतीय वाहननिर्मात्याने काही पावले उचलल्याचे दिसले नाही. मी तर आता टेस्लाच्या मॉडेल एस कारचेच स्वप्न बाळगून आहे. ०-६०किमीप्रतितास फक्त ५ सेकंदात, फुल्ल रिचार्जवर ३४० किमी. घरच्याघरी चार्जींग. सोलर पॅनेल लावले तर इंधनाचा खर्च शुन्य, बॅटरी असल्याने देखभालीचा खर्च प्रचंड कमी. तीनेक वर्षात हे स्वप्न साकार करायचा चंग बांधलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

किती हजारात मिळते ही गाडी? :)

सतिश गावडे
गुरुवार, 03/30/2017 - 21:23 नवीन
किती हजारात मिळते ही गाडी? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

. (अमेरिकन डॉलरमध्ये)

संदीप डांगे
गुरुवार, 03/30/2017 - 22:16 नवीन
. (अमेरिकन डॉलरमध्ये) एकाहत्तर हजारात.. तुम्ही हजारात विचारलं म्हणून.... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

म्हणजे

कुंदन
गुरुवार, 03/30/2017 - 22:56 नवीन
>> एकाहत्तर हजारात.. म्हणजे अजुन काहि वर्षे नोकरी करणे आले. तोवर सदरा लांबुन्च बघायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मला सांगा, न्यायालयाने

शब्दबम्बाळ
गुरुवार, 03/30/2017 - 20:06 नवीन
मला सांगा, न्यायालयाने १एप्रिल पर्यंत वाहन विक्रीस मुदत दिली आहे त्यामुळे खरेदी करणे गैर आहे वगैरे वाटत नाही. टप्प्या टप्प्याने निर्मितीच बंद केली असती तर अचानक बंद करावे लागले नसते. या शिवाय जी वाहने १०-१५ वर्ष जुनी आहेत ती नवीन घेतलेल्या BS -III पेक्षा कित्येक पट जास्त प्रदूषण करतात याबाबत काय करावे?? BS -III आणि अगदी BS -IV देखील पहिले तर आपण या मान्यतांमध्ये मागेच आहोत हे दिसते त्यामुळे कदाचित BS -IV नंतर डायरेक्त्त BS -VI येणार अशी शक्यता आहे... याबाबत अधिक माहिती टाकेनच मिळेल तशी... पण BS -IV हे BS -III पेक्षा ८०% कमी प्रदूषण करते हे सत्य वाटत नाही कारण मग त्यानुसार इंधन म्हणजेच पेट्रोल देखील तितकेच चांगले लागले असते आणि मग सगळेच गणित बदलले असते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अचानक कुठं

अकिलिज
गुरुवार, 03/30/2017 - 21:23 नवीन
भारत-चार २०१० पासून लागू झालंय. आणि १ एप्रिल पासून बंधनकारक असणार आहे. आणि किती कार्बन वगैरे इथं वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

चुकीची माहिती

शब्दबम्बाळ
गुरुवार, 03/30/2017 - 22:06 नवीन
आपण तो टाकता नेट पाहिलात तर ध्यानात येईल कि 4-२०१० ला BS -III पूर्ण भारतभरात लागू झाला! त्याआधी ५ वर्ष तो १३ मोठ्या शहरात लागू होता. आणि गेल्या वर्षी म्हणजेच ४-२०१६ ला BS -IV हा १३ मोठ्या शहरात लागू झाला. आणि आता एका वर्षातच तो संपूर्ण देशात लागू होतोय. इंजिन मॉडिफाय करणे हे लगेच होणारे काम नाही तसेच आधी तयार केलेल्या गाड्या एका वर्षात विकून संपवणे देखील सहज शक्य नाही! १२ करोड रुपयांचा तोटा अपेक्षित आहे. न्यायालयाने लोकांच्या आणि पर्यावरणाच्या हिताचा निर्णय घेतला असला तरी या गोष्टी त्यामुळे बदलत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अकिलिज

*१२ हजार करोड असे वाचावे!

शब्दबम्बाळ
गुरुवार, 03/30/2017 - 22:09 नवीन
*१२ हजार करोड असे वाचावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

ज्यांना पैशापेक्षा प्रदुषण

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/30/2017 - 20:09 नवीन
ज्यांना पैशापेक्षा प्रदुषण आणि पर्यावरणाची काळजी जास्त महत्वाची वाटते त्यांनी मला फंडिंग करावे मी कधी पासुन टेस्ला मॉडेल एस विकत घ्यायची स्वप्ने पहात आहे ;) म्हणजे कसे की त्यांच्या पर्यावरणाचे प्रदुषण ही होणार नाही आणि माझ्या पैशाचीही बचत होईल ! एकदम विन विन ! खी खी खी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हैला! अशीच अमुची बुद्धी असती

संदीप डांगे
गुरुवार, 03/30/2017 - 20:21 नवीन
हैला! अशीच अमुची बुद्धी असती आम्हीपन मॉडेसएससंपन्न झालो असतो. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

इलेक्ट्रिक कार घेतलीस तरी तु

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 03/30/2017 - 22:37 नवीन
इलेक्ट्रिक कार घेतलीस तरी तु तुझ्या गाडीतुन धुर सोडायच्या ऐवजी जिथे वीजनिर्मिती होतेय तिथे धुर निर्माण करणार आहेस. फक्तं तुझ्या लोकालिटीमधे दिसायला कार्बन फुटप्रिंट कमी दिसेल. प्रत्यक्षात मात्रं वीजनिर्मितीच्या जागी कार्बन उत्सर्जन होणारचं आहे. हायड्रोजन फ्युएल सेल कार त्यातल्या त्यात निअर झिरो एमिशन असेल. त्यातही निअर झिरो अश्यासाठी म्हणतोय की गाडी बनवायसाठी परत उर्जा लागणारचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

Electricity can be created

वगिश
Fri, 03/31/2017 - 00:12 नवीन
Electricity can be created using renewable energy sources ( solar, wind etc).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचा मुद्दा रास्तं आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 03/31/2017 - 06:38 नवीन
तुमचा मुद्दा रास्तं आहे. https://en.wikipedia.org/wiki/Electricity_sector_in_India हा जो सर्व्हे आहे त्यानुसार सगळ्यात जास्तं वीजनिर्मिती आजही कोळश्यापासुन अर्थात कोल थर्मल पॉवर प्लांट मधुन होते. अश्या परिस्थितीमधे ही वीज वापरुन चालवलेली गाडी कार्बन फुटप्रिंट कमी करु शकणार नाही. सद्द्यपरिस्थितीमधे सोलर, विंड, बायोमास वगैरेंपासुनची उर्जानिर्मिती तुलनेनी अतिशय कमी आहे. ह्या परिस्थितीमधे हायड्रोजन फ्युएल सेल कारच्या संशोधनावरती जास्तीत जास्तं भर दिला जायला हवाय. अर्थात हायड्रोजन फ्युएल सेल हि एक प्रचंड धोकादायक गोष्टं आहे. जमलं तर प्रोटोटाईप वर एक लेख टाकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश

जमलं तर प्रोटोटाईप वर एक लेख

शलभ
Fri, 03/31/2017 - 13:27 नवीन
जमलं तर प्रोटोटाईप वर एक लेख टाकेन.
कृपया जमवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एक विचारणा..

चिगो
Fri, 03/31/2017 - 16:47 नवीन
ह्या परिस्थितीमधे हायड्रोजन फ्युएल सेल कारच्या संशोधनावरती जास्तीत जास्तं भर दिला जायला हवाय.
'हायड्रोजन इंजिन'वर भारतात काही संशोधन झालेले आहे का? मला २००७ कि २००८ च्या नागरी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत ह्यावर एक प्रश्न आल्याचे आठवत आहे. तेव्हा टाटाच्या मदतीने भारत सरकारने ह्या विषयावर काही संशोधन करण्याचा प्रयत्न केला होता वाटतं. पण मागच्या १० वर्षांमधे त्यात काय प्रगती झाली आहे, हे ठाऊक नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पण (कोळसानिर्मित) विजेची आणी

आदूबाळ
Fri, 03/31/2017 - 18:51 नवीन
पण (कोळसानिर्मित) विजेची आणी फॉसिल फ्युएलची एफिशियन्सी सारखीच असते का? कोळशाची एफि० जास्त असेल तर कार्बन फूटप्रिंट कमी असायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कोळसा = फॉसिल फ्युएल

नेत्रेश
Sat, 04/01/2017 - 00:26 नवीन
कोळसा, ऑइल आणी गॅस हे ३ ही फॉसिल फ्युएल आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हायड्रोजन फ्युएल सेल हि एक प्रचंड धोकादायक गोष्टं आहे?

नेत्रेश
Sat, 04/01/2017 - 00:32 नवीन
होंडा, टोयाटा आणी हुंडई या कंपन्यांच्या हायड्रोजन फ्युएलवर चालण्यार्‍या गाड्या गेली ३ - ४ वर्षे रस्त्यावर धावत आहेत, (Honda Clarity, Toyota Mirai, Hyundai ix35 FCEV ) तसा काही धोका दीसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या फ्युएल सेल्स मधे प्रकार

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 04/01/2017 - 08:42 नवीन
ह्या फ्युएल सेल्स मधे प्रकार आहेत. जर का धातुचा टँक प्रेशराइझ्ड हायड्रोजन सेल म्हणुन वापरला जात असेल तर तो अपघाताच्या प्रसंगी प्रचंड धोकादायक ठरु शकतो. कारण हायड्रोजनची घनता पेट्रोल, डिझेल वगैरेंपेक्षा कमी असते त्यामुळे तो प्रचंड दाबाखाली टँकमधे भरावा लागतो. अपघात प्रसंगी जर का दुर्दैवानी फुएल टँक रप्चर झाला तर स्फोटाचा धोका असतो. ह्यामधे आता सॉलिड स्टेट हायड्रोजन कंपोनंटही वापरतात. म्हणजे उष्णता वापरुन सॉलिड स्टेट मधल्या फ्युएल सोर्स मधुन हायड्रोजन एक्स्ट्रॅक्ट करायचा आणि इंधन म्हणुन वापरायचा. ही तुलनेनी सोपी पद्धत आहे. आज उद्या वेळ मिळाला तर एक लेख टाकतो रेफरन्स जर्नल्स सकट. बाकी येणार्‍या काही वर्षांमधे ह्या तंत्रज्ञानाला पर्याय नसेल असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

मंजी अता १ यप्रील पासूण सगळी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/30/2017 - 20:18 नवीन
मंजी अता १ यप्रील पासूण सगळी माडेल णविण होनार???
  • Log in or register to post comments

BS III चे प्रदुषण म्हणजे काय?

कंजूस
गुरुवार, 03/30/2017 - 20:26 नवीन
BS III चे प्रदुषण म्हणजे काय? १०० किमीटरला किती पेट्रोल जळते किती कार्बन डाइओक्साइड,मॅानॅाक्साइड,नाइट्रोजन ओक्साइड बाहेर पडतो याची आकडेवारी ??
  • Log in or register to post comments

BS III चे प्रदुषण म्हणजे काय?

खेडूत
गुरुवार, 03/30/2017 - 21:12 नवीन
BS III चे प्रदुषण म्हणजे काय?
इथे चर्चा झालेय.. ( स्वतःच्या धाग्याची झैरात! ) त्यातल्या आलेखावरून स्पष्ट व्हावे. भारत स्टेज-३ २००५ ते २०१० पर्यंत लागू होते. भारत स्टेज-४ डिसेंबरात लागू झालेय. स्टेज-५ रद्द करून २०२० मधे थेट स्टेज-६ सक्तीचे आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे जागतिक टाईमलाईनच्या बरोबर आपण लवकर येऊ. (हे युरोपात १ जाने. २०१५ ला झाले)...म्हणजे आपण आता ५ वर्षेच मागे राहू. जे आधी १० वर्षे असायचो! २०२१-२२ ला या सवलतीच्या गाड्या भंगारात काढण्याची सक्ती होऊ शकते. ज्यांनी आधीच घेतल्यात त्यांनी त्या आधीच एक-दोन वर्षे वापरल्या आहेत. आजपर्यंत लोकानुनयाचे अनेक निर्णय झाल्याने सगळे बेसावध होते.(जसे १९९५-२०००-२००५ आधीच्या झोपडया नियमित होणे इ.) एकेकाळी मागे असलेल्या चीनने हा फरक आपल्याहून जलद पार केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अॅक्सेसरी प्रमाणित करावी.

कंजूस
Fri, 03/31/2017 - 05:52 नवीन
त्या लेखात ती माहिती नाही. मला वाटतं अमुक एक इंधन जळल्यावर अमुकएक वायू बाहेर पडतात त्यात bs 2/3/4 एंजिनात फरक नसून त्या एंजिनाच्या पुढे जोडलेले उपकरण ते वायू कमी करते. मग ती उपकरणे प्रमाणित करून कोणत्याही एंजिनास जोडून प्रदुषण कमी करता आले तर कोणत्याच जुन्या गाड्या बाद होणार नाहीत ( डिस्काउंट जाइल हो तुमचं).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

२०२० ला बी एस ६ कंपलसरी करणार

त्रिवेणी
गुरुवार, 03/30/2017 - 21:13 नवीन
२०२० ला बी एस ६ कंपलसरी करणार आहेत.
  • Log in or register to post comments

अभ्या, भारत ४चा स्टिकर छापूण

आदूबाळ
गुरुवार, 03/30/2017 - 21:25 नवीन
अभ्या, भारत ४चा स्टिकर छापूण देतो कं?
  • Log in or register to post comments

देतो की, अरे लै शिंपल आहे.

अभ्या..
Fri, 03/31/2017 - 11:59 नवीन
देतो की, अरे लै शिंपल आहे. कारण तो लोगो काही आयएसआय टाईप गव्हरमेंट अ‍ॅप्रुव्हड वगैरे डिझाईनचा नाहीचे. कंपन्या अ‍ॅज अ ग्राफीक्स म्हणून ते करतात, प्रत्येक कंपनी वेगवेगळी डिझाईन वापरते. त्यात काही कंपन्या प्लास्टिक, अ‍ॅक्रेलिक, टोटल मेटल, मेटल प्लेटेड प्लास्टिक, युव्ही लॅमिनेटेड स्टीकर्स, व्हिनाईल स्टिकर्स अशा वेगवेगळ्या मिडियात करतात. कार न बाईक ग्राफीक्स बनवणारी क्लासिक स्टिकर्स ही कंपनी मोस्टली व्हिइकलची कामे कर्रते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तयारच हाय की डिझाईन..! . .

खेडूत
Fri, 03/31/2017 - 12:09 नवीन
तयारच हाय की डिझाईन..! . . Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हे कारवर असते

अभ्या..
Fri, 03/31/2017 - 12:28 नवीन
हे कारवर असते बाईक्सवर असे असते Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

BS म्हणजे भारत स्टेज.

शब्दबम्बाळ
गुरुवार, 03/30/2017 - 22:15 नवीन
BS म्हणजे भारत स्टेज. युरोपियन इमिशन नियमांप्रमाणेच हि भारतीय नियमन प्रणाली आहे. १९९१ मध्ये प्रथम पेट्रोल वाहनांसाठी प्रदूषण नियम प्रणाली सुरु झाली. त्यानंतर मग BS -II , BS - III आणि आता BS -IV असा हा प्रवास सुरु आहे. ज्यांना उत्सर्जनाचे प्रमाण आणि इतर तुलना जाणून घ्यायची आहे त्यांच्यासाठी खाली एक pdf ची लिंक देतो. ARAI ची pdf आहे. संपूर्ण माहिती मिळेल त्यात! Indian_Emission_Regulation_Booklet
  • Log in or register to post comments

स्टॉक संपला

कपिलमुनी
Fri, 03/31/2017 - 18:58 नवीन
पुणे , पिंचि मधील डीलर्सनी स्टॉक संपला असे जाहीर केले . आज कंपनीमधील काही जणांनी सुट्टी काधून गाडी घ्यायचा प्रयत्न केला पण हवे ते मॉडेल मिळाले नाही.
  • Log in or register to post comments

या गाडी विक्रिसाठी लागलेल्या

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 04/02/2017 - 12:21 नवीन
  • Log in or register to post comments

माझ्या माहितीप्रमाणे केवळ

अभिजीत अवलिया
Sun, 04/02/2017 - 12:50 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे केवळ गाडी BS- ४ असून उपयोग नाही. तर पेट्रोल डिझेल पण त्याच दर्जाचे असावे लागते. सध्या उत्तर भारतात BS -४ दर्जाचे इंधन मिळते तर महाराष्ट्र व दक्षिण भारतात BS -३. पेट्रोल कंपन्यांनी पूर्ण भारतात BS -४ दर्जाचे पेट्रोल डिझेल द्यावे ह्यासाठी न्यायालयाने काहीतरी टाइमलाईन आखून दिली आहे. तसेच BS -५ ही स्टेज न आणता २०२० साली BS -६ मानक येणार आहे त्यावेळी जुन्या गाड्या ( BS -१ व BS -२) भंगारात काढाव्या लागतील आणी BS -३ व BS -४ ला अजून थोडी मुदत दिली जाईल (२०२५ पर्यंत) असे वाटते.
  • Log in or register to post comments

या गाडी विक्रिसाठी लागलेल्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 04/03/2017 - 00:22 नवीन
  • Log in or register to post comments

या गाडी विक्रिसाठी लागलेल्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 04/03/2017 - 00:22 नवीन
या गाडी विक्रिसाठी लागलेल्या रांगांच्या संबंधी दोन रोचक मेसेजेस व्हॉट्सॅपवर फिरत आहेत... १. एक एप्रिल पासून BS-III च्या विक्रीला बंदी आल्याने, गाड्यांच्या विक्रीला आलेल्या उधाणाची आणखी एक गोष्ट म्हणजे बहुतांश गाडया ह्या रोख रकमेने खरेदी झाल्या तेव्हा नोटबंदी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, वाढते तापमान काहीच नडले नाही. मुख्य म्हणजे त्या रांगात देशभरात एकही मृत्यू झाला नाही, इतकेच काय एकही जण चक्कर येऊन पडल्याची बातमी नाही !...... आहे की नाही मजेशीर ! २. दो पहिया वाहन मोटर साइकल में 15-20 हजार की छुट मिलने पर लोग काल नक्षत्र, चौघडिया और मुहूर्त सब भूल गये !!! => वास्तव में... लालच से बड़ा कोई धर्म नहीं !!!
  • Log in or register to post comments

व्हॉट्सॅपवर वरती काहीही फिरत

शब्दबम्बाळ
Mon, 04/03/2017 - 09:00 नवीन
व्हॉट्सॅपवर वरती काहीही फिरत असत हो! आपल्याला सोयीच्या असलेल्या गोष्टी रोचक वाटतात इतकंच काय ते! सगळ्या मिळून ८ लाख गाड्या होत्या! १२५ कोटी लोकांच्या देशामध्ये... असो! लोक किमतीचा प्रॅक्टिकली विचार करून फायदा बघून गाड्या घेत असतील आणि धर्म मुहूर्त अशा बिनकामाच्या गोष्टींना महत्व द्यायचे बंद करत असतील तर ते बरंच आहे म्हणायचं मग! रोचकच की! :) फन फॅक्ट: भारतातल्या ६०% टक्के गाड्या PUC न करता बिनधास्त धावत आहेत! फक्त नव्या गाड्यांवर बंधने लावून प्रदूषण कमी होणार नाही, असलेल्या गाड्यांनी नियम पाळणे महत्वाचे आहे! संदर्भ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एक रोचक फेसबुकवरील पोस्टः

संदीप डांगे
Mon, 04/03/2017 - 00:59 नवीन
एक रोचक फेसबुकवरील पोस्टः नोटाबंदीच्या रांगेत उभे राहणाऱ्यांची तुलना दुचाकी खरेदी करणाऱ्यांच्या रांगेशी करणाऱ्या महानुभावांच्या बुद्धीला विनम्र आदरांजली !! ज्यांना सक्ती , अगतिकता आणि स्वेच्छा, स्वनिर्णय ह्यामधला फरकही समजत नसेल त्यांच्या बुद्धीला आदरांजली वाहण्याशिवाय काय करू शकतोय ?
  • Log in or register to post comments

छान..!!

विशुमित
Mon, 04/03/2017 - 12:39 नवीन
छान..!! चांगले धोतरास हात घातला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

समतोलपणे चालूनच धोतराला हात

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 04/03/2017 - 19:02 नवीन
समतोलपणे चालूनच धोतराला हात घालता येतो. कोलांट्याउड्या मारून तसा प्रयत्न केल्यास, हात धोतराशी पोचण्याच्या अगोदर तोंडावर पडायला होते ! अगदी, कंपूबाजी करून टाळ्या वाजवायला लोक आणले तरी, बाकिच्यांपासून ते लपून राहत नाही ! =)) बाकी चालूद्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

अरेवा, माननीय महोदय! मस्त आहे

संदीप डांगे
Mon, 04/03/2017 - 20:17 नवीन
अरेवा, माननीय महोदय! मस्त आहे की हे...? आपल्याबाजूने लोक बोलले (नाही बोलले तरीही) तरीही ते जाणीव वगैरे असलेले, सूज्ञ मिपाकर वगैरे आणि आपल्याविरोधात बोलले की "कंपूबाजी करुन टाळ्या वाजवायला आणलेले लोक" खुद्द माननीय संपादकच असा मिपासदस्यांचा घाऊक अपमान करायला लागलेत.. आता तक्रार कुणाकडे करावी ब्रे? कि तुमच्याही प्रतिसादाला कोणी अनुमोदन दिले की ' टाळ्या वाजावयाला आणलेले भाडोत्री, कंपूबाज प्रतिसादक' म्हणावे अशी मुभा मिळेल...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

व्हॉट्सॅपच्या मेसेजमधून एखादा

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 04/03/2017 - 21:21 नवीन
व्हॉट्सॅपच्या मेसेजमधून एखादा विरोधाभास कधी जरासा विनोदाच्या, कधी स्पष्टपणे व्यक्त होतो. पण, त्यातून व्यक्त होणारे सत्य कधीकधी कटू असते, हे मात्र खरे. पण, त्यावरून इतका राग-राग आश्चर्यकारक आहे ! लेखन मराठीत असावे व मिपाच्या धोरणात बसणारे असावे, हे पथ्य पाळले तर कोणी काय लिहावे यावर काहीही बंधन नाही, हा तर मिपादंडक आहे. लेखक कोण असावा किंवा लेखकालेखका-प्रमाणे कोणाला कोणते मत व्यक्त करण्यावर इतर काही बंधने असल्याचे काही नियम असल्याचे माहीत नाही. तसेच, एखाद्या लेखनावर कोणी उघडपणे प्रतिसाद दिला/न दिला तरी मिपाकर त्या मूळ लिखाणाचा व दिलेल्या प्रतिसादांचा योग्य तो उघड-गुप्त अर्थ जाणून घेण्यात समर्थ आहेत. तसे ते वेळोवेळी आपल्या लेखनातून व्यक्त करत असतातच. तेव्हा काळजी नसावी. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

व्हॉट्सॅपच्या मेसेजमधून एखादा

संदीप डांगे
Mon, 04/03/2017 - 21:30 नवीन
व्हॉट्सॅपच्या मेसेजमधून एखादा विरोधाभास कधी जरासा विनोदाच्या, कधी स्पष्टपणे व्यक्त होतो. पण, त्यातून व्यक्त होणारे सत्य कधीकधी कटू असते, हे मात्र खरे. पण, त्यावरून इतका राग-राग आश्चर्यकारक आहे ! >> हो, अगदी १००% सत्य... जसे खालच्या वाक्यांत आलेला इतका राग राग मलाही आश्चर्यकारकच वाटला बघा... समतोलपणे चालूनच धोतराला हात घालता येतो. कोलांट्याउड्या मारून तसा प्रयत्न केल्यास, हात धोतराशी पोचण्याच्या अगोदर तोंडावर पडायला होते ! अगदी, कंपूबाजी करून टाळ्या वाजवायला लोक आणले तरी, बाकिच्यांपासून ते लपून राहत नाही ! =)) असो. धन्यवाद! यावर जास्त चर्चा गरजेची नाही. जो होगया सो गया.. काय म्हणता तुम्ही ते बूंद से गयी वो हौदसे का कायतरी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अगदी, कंपूबाजी करून टाळ्या

विशुमित
Tue, 04/04/2017 - 10:05 नवीन
अगदी, कंपूबाजी करून टाळ्या वाजवायला लोक आणले तरी, बाकिच्यांपासून ते लपून राहत नाही ! =)) ==>> कुंपणच शेत खायला लागल्यावर आता पुढे काय बोलायचं. मिपावर राहायचं असेल तर मिपावर जेष्ठ झालेल्या, अभ्यासू, भाजप समर्थक आणि संपादकांच्या धोतरास हात घालायचा नाही, असा अलिखित नियम वगैरे आणला आहे का? मिपा मालकांना विनंती असले वयक्तिक आरोप पचवण्याच्या पलीकडे आहेत. विशिष्ट कंपूलाच सोबत घेऊन जाणारे असे संपादक आम्हाला नको आहेत, असे खेदाने नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा