Skip to main content

ताज्या घडामोडी : भाग ४

लेखक संदीप डांगे यांनी शनिवार, 25/02/2017 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागाचे ३०० प्रतिसाद झालेत म्हणून नवीन धागा... विषय ताज्या घडामोडी असल्याने मागचा दुवा देणे संयुक्तिक वाटत नाही. ------------------------------------------------ अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती.... 1 इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्‍या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))

वाचने 62617
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

गायकवाडांची चूक असेल अथवा नसेल पण एअर इंडिया च्या कर्मचाऱ्याने मार खाल्ला (खरचं खाल्ला असेल तर) याचाच आनंद झालाय :)

फेब्रुवारी २०१५ च्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकांमध्ये बवाना मतदारसंघातून निवडून गेलेले आम आदमी पक्षाचे आमदार वेदप्रकाश यांनी आआपला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्याबरोबरच दिल्ली विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षात आपली घुसमट होत होती असा या वेदप्रकाशांचा दावा आहे.तसेच मंत्री पक्षाच्या आमदारांकडे फारसे लक्ष देत नाहीत असेही त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे दिल्लीतील दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक पक्की. पहिला मतदारसंघ आहे राजौरी गार्डन आणि दुसरा मतदारसंघ आहे हा बवाना. राजौरी गार्डनमधून आआपचे उमेदवार म्हणून निवडून गेलेल्या जर्नैलसिंग यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पंजाबमध्ये लांबीमधून प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. त्याच मतदारसंघात कॅप्टन अमरिंदरसिंगही उभे होते. या भानगडीत जर्नेलसिंग तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आणि त्यांनी त्यांचे डिपॉझिटही गमावले. म्हणजे हातात असलेली राजौरी गार्डनची आमदारकी घालवून बसले आणि लांबीमध्येही पराभवच झाला. या दोन मतदारसंघांमध्ये यावर्षी (कदाचित जून किंवा ऑक्टोबरमध्ये) पोटनिवडणुका होतील. केजरीवालांची लोकप्रियता किती शिल्लक आहे याचा निकाल दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये लागणारच आहे. त्याबरोबरच ही आणखी एक परीक्षा होऊन जाईल.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

दिल्लीतील तीन महापालिका निवडणुकांविषयी लेख लिहिण्यासाठी दिल्लीच्या कुठल्या भागात कोणाचा जोर जास्त वगैरे गोष्टी माहित पाहिजेत. महापालिका निवडणुकांमध्ये ही गोष्ट विधानसभा-लोकसभेपेक्षा जास्त महत्वाची होते. मला तितकी माहिती मुंबईची पण नाही :) एकूणच दिल्लीतील महापालिका निवडणुकांमध्ये केजरीवालांची मोठीच कसोटी लागणार आहे. दिल्ली महापालिकांमध्ये गेल्या १० वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. आणि इतर कोणत्याही महापालिकांप्रमाणे या तीन महापालिकांचा कारभारही भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहे. अशावेळी आआपला ही निवडणुक अगदी सहज जिंकता आली पाहिजे. तसेच २०१५ मधील कामगिरी लक्षात घेता नुसती जिंकताच नव्हे तर स्वीप करता आली पाहिजे. आणि तसे करता आले नाही, किंवा बहुमत मिळवता आले नाही किंवा दुसर्‍या नंबरला जावे लागले तर मात्र ते केजरीवालांचे मोठे अपयश समजले जाईल. सचिनसारख्या बॅट्समनने शतक ठोकले तर त्यात काय मोठे, सचिन ना तो मग त्याने शतक ठोकलेच पाहिजे ही अपेक्षा तर शतक ठोकले नाही तर मात्र सचिनचा फॉर्म गेला असे म्हटले जाणे ही सचिनसाठी फार उत्साहवर्धक स्थिती नसायची. तशीच काहीशी गोष्ट केजरीवालांबाबतीत या निवडणुकांसाठी. आणि २०१९ मध्ये तीच गोष्ट मोदींबाबत लोकसभा निवडणुकांसाठी होईल. रच्याकने दिल्लीत काँग्रेस निवडून यावी असे वाटते. महापालिकांचा कारभार कसा आहे हे दिल्लीत राहणारा कोणीही सांगू शकेल. अशा भाजपला परत सत्ता मिळू नये आणि अर्थातच त्याचबरोबर आआपही जिंकायला नको.

In reply to by गॅरी ट्रुमन

ओके. केजरीवालांना पंजाब मध्ये मिळालेला मेसेज दिल्लीत अजून तीव्रपणे पोहोचावा असे वाटते.

अरूण जेटलींनी अरविंद केजरीवाल आणि आशुतोष, कुमार विश्वास, संजय सिंग आणि राघव चढ्ढा या आआप नेत्यांवर ठोकलेला मानहानीचा खटला चालू ठेवण्यास दिल्लीतील न्यायालयाने मान्यता दिली आहे. अरूण जेटली २००० ते २०१३ या काळात दिल्ली क्रिकेट असोसिएअशनचे अध्यक्ष होते. या काळात अरूण जेटलींनी भ्रष्टाचार केला असा आरोप डिसेंबर २०१५ मध्ये केजरीवालांनी आणि इतरांनी केला होता. त्यानंतर अरूण जेटलींनी मानहानीचा खटला यांच्यावर ठोकला आणि १० कोटी रूपयांची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली. अरूण जेटलींनी हा खटला ठोकल्यानंतर केजरीवालांनी शक्य तितका वेळकाढूपणा केला होता. अरूण जेटली हे लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यामुळे त्यांना मुळात 'मानच' नाही मग मानहानी कशी होईल असा हास्यास्पद दावा केजरीवालांकडून झाला. कधीतरी निवडणुका हरलेल्यांमध्ये डॉ. आंबेडकर, अटलबिहारी वाजपेयी,इंदिरा गांधी, मनमोहनसिंग, कामराज, पी.व्ही.नरसिंहराव इत्यादी दिग्गजांचाही समावेश होता म्हणजे या सगळ्यांना मान नव्हता असे म्हणायचे का? इतकेच नाही तर स्वतः केजरीवालही २०१४ मध्ये वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींविरूध्द निवडणुक हरलेच होते. मग या न्यायाने त्यांना स्वतःलाही मान नव्हता असे म्हणायचे का? न्यायालयाने हा हास्यास्पद दावा अमान्य केल्यानंतर गेल्या काही वर्षातली अरूण जेटलींची आयकर विवरणपत्र द्यावीत अशी नवी टूम यांनी काढली. वास्तविकपणे या खटल्याशी त्याचा काय संबंध होता? जर अरूण जेटलींनी भ्रष्टाचार केल्याचा छातीठोक दावा हे महाशय करत असतील तर त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते न्यायालयापुढे ठेवावेत. त्यात तथ्य असेल तर जेटलींना शिक्षा व्हावी/होईलच. इतका साधासरळ मामला असूनही हे फालतूचा वेळकाढूपणा करत होते त्यातच त्यांच्याकडे जेटलींविरूध्द काडीमात्र पुरावा नाही हे स्पष्टच होते. अर्थातच न्यायालयाने ही पण मागणी अमान्य केली. या प्रकरणी २० मे पासून सुनावणी होणार आहे. त्यातही आणखी वेळकाढूपणा करायला केजरीवालांनी या खटल्याची सुनावणी रोजच्यारोज न करता जशा तारखा मिळतील त्याप्रमाणे करावी (Let this trial also proceed in the due course and not on a fast-track basis) अशी मागणी केली. त्यामागे कारण काय तर म्हणे कोर्टामध्ये इतके सगळे खटले प्रलंबित आहेत!! कोर्टाच्या वेळेची इतकीच पडलेली असती तर इतके फालतूचे दावे करून कोर्टाचा वेळ वाया घालवताना यांना काही वाटले नाही तर. ज्या पध्दतीने हे वेळकाढूपणा करत आहेत त्यातूनच त्यांच्याकडे अजिबात पुरावा नाही असे दिसते. अन्यथा खटल्याची सुनावणी लवकरात लवकर होऊन निकालही लवकरात लवकर लागावा या मागणीत विरोध करण्यासारखे काय आहे? फेब्रुवारी १९९८ मध्ये तामिळनाडूत कोईम्बतूरला लालकृष्ण अडवाणी प्रचारसभेत भाषण करणार होते तिथे बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये रा.स्व.संघाचा हात आहे आणि त्याचा पुरावाही आपल्याकडे आहे असा दावा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांनी केला होता. त्याविरूध्द रा.स्व.संघाने केसरींवर असाच मानहानीचा खटला दाखल केला होता. पण केसरींचे वय झाले आणि कदाचित म्हातारचळ लागल्यामुळे ते असे काहीतरी बडबडत आहेत असे वाटून केसरींना नुसत्या माफीवर सोडून दिले गेले. या युगपुरूषांना मात्र अरूण जेटलींनी अजिबात दयामाया न दाखवता शेवटपर्यंत हा खटला चालवला पाहिजे आणि त्यात केजरीवाल दोषी आहेत असा न्यायालयाचा निकाल येऊन या युगपुरूषांची होतीनव्हती तितकी पूर्ण लाज जावी असे फार वाटते. अरूण जेटलींचा पूर्वेतिहास लक्षात घेता फार अपेक्षा नाहीत. तरीही काय होते हे बघूच.

In reply to by गॅरी ट्रुमन

या युगपुरूषांना मात्र अरूण जेटलींनी अजिबात दयामाया न दाखवता शेवटपर्यंत हा खटला चालवला पाहिजे
+११११. मागच्या वेळी बहुतेक गडकरींनी खटला अर्ध्यावरच माफीनामा घेऊन सोडला. तसे व्हायला नको.

"राष्ट्रपतीपदासाठीची चर्चा फक्त मातोश्रीवरच होईल" इति- नेहमीचेच पेपरवाले दोन नंबरचे नेते. मोहन भागवतांना उमेदवार करण्याची मागणी. भाजपने गरज असलेल्या २०-२२ हजार मतांची व्यवस्था करावी आणि तोंडावर पाडावे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मोहन भागवत राष्ट्रपती होतील असे वाटत नाही. अडवाणींनाही करू नये. डॉ कलामांप्रमाणे एखाद्या वेगळ्याच उमेदवाराला उभे करावे.

In reply to by कुंदन

पवारांना राष्ट्रपती केले की महाराष्ट्रात भाजपाचा बाजार उठणार, आठवले निवडून येतील आणि मनसे + रिपाई सरकार स्थापन करतील. =)) मुलायम सिंह आणि अमित शहा यांचे पटत नाही असे ऐकले आहे. त्यामुळे तो ही पर्याय बाद. बघू...

In reply to by मोदक

श्री एन आर नारायण मूर्ती सारखा वादातीत आणि राजकारणी नसलेला मनुष्य राष्ट्रपती म्हणून निवडावा.

In reply to by सुबोध खरे

अजिबात नको. एन आर नारायण मूर्ती हे अमर्त्य सेन यांच्याप्रमाणेच डाव्या विचारांचे आहेत. ते प्रचंड उपद्र्व देतील.

In reply to by श्रीगुरुजी

अजिबात नको. एन आर नारायण मूर्ती हे अमर्त्य सेन यांच्याप्रमाणेच डाव्या विचारांचे आहेत. ते प्रचंड उपद्र्व देतील.
बरं.....बनवून टाका मग कुणालातरी सोयीच्या माणसाला, सोयीने हवे तिथे सही करणार्‍याला.

In reply to by सुबोध खरे

श्री एन आर नारायण मूर्ती सारखा वादातीत आणि राजकारणी नसलेला मनुष्य राष्ट्रपती म्हणून निवडावा. खरं तर सचिन तेंडुलकरला राष्ट्रपती करावे. तो कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. वागणुकीने अतिशय सभ्य व सुसंस्कृत आहे. कोणताही गाजावाजा न करता तो खासदारनिधीचा अत्यंत योग्य विनियोग करीत आहे. अशी व्यक्ती राष्ट्रपतीपदी असणे देशासाठी भूषणावह ठरेल. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर एक अत्यंत सुयोग्य राष्ट्रपती भारताला मिळेल. हे वाचल्यानंतर सचिनबद्दलचा आदर व अभिमान द्विगुणित झाला.

In reply to by श्रीगुरुजी

सचिन ग्रेट आहेच, पण BCCI मधल्या भ्रष्टाचाराविषयी तो का कधी बोलला नाही याचे आश्चर्य वाटते. असो, त्याच्या पण काही लिमिटेशन्स असतील.

In reply to by अत्रे

माझ्या माहितीप्रमाणे तो बीसीसीआय मध्ये कोणत्याही पदावर नाही. तो कोणत्याही राज्याच्या निवडसमितीत किंवा प्रमुख निवडसमितीत नाही. तो बीसीसीआयचा पदाधिकारीही नाही. तो कोणत्याही संघाचा प्रशिक्षक नाही. तो बीसीसीआयचे कोणतेही काम करीत नाही. (चूभूदेघे)

In reply to by श्रीगुरुजी

नसेल, पण ज्येष्ठ खेळाडू म्हणून त्याला काही आतल्या गोष्टी माहीत असाव्यात असे वाटते. त्याने खेळावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तिकडे बघण्याची उसंत मिळाली नसेल.

In reply to by अत्रे

BCCI मधल्या भ्रष्टाचाराविषयी तो का कधी बोलला नाही याचे आश्चर्य वाटते

In reply to by श्रीगुरुजी

इथे सविस्तर बातमी आहे. प्रसिद्धीपराङ्मुख राहून करत असलेल्या सचिनच्या कार्याला व सचिनला सलाम!!! http://www.thehindu.com/news/national/maestros-second-innings/article17…

In reply to by श्रीगुरुजी

I have received unconditional love and support from people across the country during the 24 years on the cricket field. My second innings is about giving back in some way and I am trying my best to do that in whatever small way possible. It is an opportunity to touch people’s lives and make a difference in many different ways. It has also been a phase of learning for me as I come to understand the different aspects of life beyond the cricket field.
सुंदर.

In reply to by श्रीगुरुजी

अशा प्रकारे भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून तेंडुलकरांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. चला दोन्ही विषय आवडींचे, आता काय लिबंधावर लिबंध

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

भाजपने शिवसेनेचे पाणी जोखले आहे. शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दगाफटका करू शकते याचा भाजपला अंदाज असेलच. मोदी आणि शहा काही बोळ्याने दूध पिणारे राजकारणी नाहीत. ते मुद्दामच अशी काहीतरी पुडी सोडून देतात, जेणेकरून शिवसेनेला त्यामागाचा हेतू न समजता ते आपले पत्ते लगेच उघडे करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी स्नेहभोजन व त्यात उद्धव ठाकरेंना आमंत्रण अशी पुडी सोडून दिल्यावर लगेच शिवसेनेने आपला ताठा दाखवायला सुरूवात केली. राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडे फक्त २० हजार मते कमी आहेत व सेनेकडे अंदाजे २६ हजार मते आहेत. त्या मतांसाठी आपण भाजपला ब्लॅकमेल करू ही आपली चाल सेनेने आधीच उघड केली. भाजप कच्चा खेळाडू नाही. तेलंगणा राष्ट्रीय समिती, बिजद, अद्रमुक असे अनेक पर्याय भाजप चाचपू शकतो. शिवसेनेच्या दगाबाजीचा अंदाज आल्यामुळे पुढील ३-४ महिन्यात सेनेला पूर्ण अंधारात ठेवून, सेनेला खेळवत ठेवून भाजप पर्यायी मतांची व्यवस्था करेल. सेना नेत्यांकडे राजकीय शहाणपण असते तर या स्नेहभोजनांच्या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यांनी आपले पत्ते उघड केले नसते.

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेनेने २००२ चा अपवाद वगळता प्रत्येक राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराविरूध्द मत दिले आहे. १. १९९२ मध्ये भाजप आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी मेघालयमधील नेते जी.जी.स्वेल यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेसच्या शंकरदयाळ शर्मांना मते दिली आणि त्या बदल्यात सतीश प्रधानांना राज्यसभेवर निवडून आणायला काँग्रेसची मदत घेतली. शिवसेनेने असाच प्रकार मुंबई महापालिकेत १९७७ मध्ये केला होता. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेसच्या मुरली देवरांना महापौरपदासाठी पाठिंबा देऊन त्या बदल्यात वामनराव महाडिकांना विधानपरिषदेवर निवडून आणायला काँग्रेसचा पाठिंबा घेतला होता. २. १९९७ मध्ये शिवसेना वगळता सर्वच पक्षांनी के.आर.नारायणन यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता. माजी मुख्य निवडणुक आयुक्त टी.एन.शेषन निवडून यायची सुतराम शक्यता नसतानाही शिवसेनेने त्यांना के.आर.नारायण यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. ३. २००७ मध्ये राष्ट्रपतीपदासाठी भाजपने भैरोसिंग शेखावत यांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेसने प्रतिभा पाटील यांना. त्यावेळी प्रतिभा पाटील मराठी असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. ४. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसने प्रणव मुखर्जींना उमेदवारी दिली होती तर भाजपने माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए.संगमांना. त्यावेळी शिवसेनेने प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता. हा इतिहास लक्षात घेता शिवसेनेने सगळे काही गोड असते तरीही विरोधी उमेदवारालाच मत दिले असते हीच शक्यता जास्त. २०१२ मध्ये प्रणव मुखर्जी मुंबईत येऊन मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना भेटले होते. यावेळी उधोजीरावांची तशीच अपेक्षा दिसते की कोणी मोठा नेता मातोश्रीवर यावा आणि पाठिंब्यासाठी मिनतवार्‍या कराव्यात. वाजपेयी-अडवाणींच्या काळात असे होतही होते. त्यांना एक गोष्ट समजलेली दिसत नाही. ती म्हणजे उधोजीराव हे बाळासाहेब नाहीत आणि मोदी-शहा हे वाजपेयी-अडवाणी नाहीत. अजून २० हजार मतांची बेगमी करणे तितके जड जाईल असे वाटत नाही. बिजू जनता दलाकडे लोकसभेत २० आणि राज्यसभेत ७ खासदार आहेत. या २७ खासदारांकडे प्रत्येकी ७०८ मते आहेत. म्हणजे जर नवीन पटनायकांना पसंत असलेला उमेदवार दिला तर या २७ खासदारांकडूनच १९,११६ मते मिळू शकतील. ओरिसा विधानसभेतील आमदारांची मते वेगळीच. तीच गोष्ट तेलंगण राष्ट्रसमिती आणि अण्णा द्रमुकची. त्याचप्रमाणे वाय.एस.आर काँग्रेससारखे काही पक्ष काही हजार मतांची बेगमी करू शकतीलच. तेव्हा शिवसेनेकडे तितक्या प्रमाणावर बार्गेनिंग पॉवर नाही. आणि जर इतर पक्षांच्या मदतीने भाजपला राष्ट्रपतीपदावर आपला उमेदवार निवडून आणता येत असेल तर शिवसेनेला हिंग लावूनही विचारू नये. फारच माजलेत शिवसेनावाले.

उधोजी नवीन मातोश्री बांधताहेत. ११.६० कोटी रूपयांच्या भूखंडावर १०००० वर्ग फूट बांधकाम असलेले ६ मजले बांधणार आहेत. म्हणजे भूखंडाची, बांधकाम व नंतरची सजावट यांचा एकूण खर्च १५ कोटींच्या वर जाईल. शिवसेनेला शेतकर्‍यांविषयी प्रचंड कळवळा आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी यासाठी त्यांनी रान उठविले आहे. एक मातोश्री असताना १५+ कोटी खर्च करून नवीन मातोश्री बांधण्यापेक्षा त्यांनी कर्जबाजारी शेतकर्‍यांचे प्रत्येकी १ लाख रूपये कर्ज फेडले तर किमान १५०० शेतकरी कुटुंबे त्यांना दुवा देतील. १ लाखाऐवजी प्रत्येकी ५०००० रूपयांचे कर्ज त्यांनी फेडले तरी किमान ३००० शेतकरी कुटंबाना हायसे वाटेल.

दिल्लीजवळील नॉयडामध्ये एका कंपनीत कामाला असलेल्या एका चीनी अधिकार्‍याने भारतीय झेंडा फाडला आणि कचर्‍यात टाकला यामुळे संतापाची लाट उसळली आणि कंपनीबाहेर जोरदार निदर्शने झाली. या चीनी माणसाने हा प्रकार मुद्दामून डिवचायला केला होता का याची कल्पना नाही. आपण झेंड्याला जितका मान भारतात देतो तितका परदेशांमध्ये दिला जातोच असे नाही. अमेरिकेत अनेकदा सरकारविरोधी निदर्शनांमध्ये देशाचा झेंडा जाळायचे प्रकारही होतात. तसेच त्यांच्या देशाच्या झेंड्याचे डिझाईन असलेली अंतर्वस्त्रेही सर्रास वापरली जातात. तेव्हा त्या चिनी माणसाने भारतातही असेच असते असे समजून आपण झेंड्याला किती मान देतो याचे भान न ठेवता हा प्रकार केला असेल ही पण शक्यता आहेच. आपण भारतीय देशाचे मानबिंदू म्हणून अशी काही प्रतिके वापरतो. तसे करणे योग्य आहे की अयोग्य हा मुद्दा वेगळा झाला. पण सांगायचा मुद्दा म्हणजे देशाच्या झेंड्याचा अनादर हा आपण आपल्या देशाचा अपमान असे समजतो. या निमित्ताने एक गोष्ट लिहाविशी वाटते. कन्हैय्या प्रकरणानंतर देशाच्या संसदभवनावर हल्ला करून, संसदभवन उडवून देणे किंवा कदाचित फिजीमध्ये झाले त्याप्रमाणे मंत्रीमंडळ ओलिस ठेऊन वाटेल त्या मागण्या मान्य करून घेणे असे भयंकर प्रकार करायचा इरादा असलेल्या कटात सहभागी असलेल्या हरामखोराचा काही विचारवंत (इथेही आहेतच असे महाभाग) उदोउदो करतात, भारताचे तुकडेतुकडे होईपर्यंत शांत बसणार नाही वगैरे गोष्टी अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून खपवतात याला सामान्य भारतीयांचा पाठिंबा मिळणे कदापि शक्य नाही. असले प्रकार करणे म्हणजे खायच्या ताटात *** आहे हे सामान्य भारतीयांना समजत नाही असे अजिबात नाही. हे असले विचारवंत जनेयु, किंवा त्यांचेच पित्ते असलेल्या संस्था, परिसंवाद इत्यादी ठिकाणे सोडून बाहेर असे काही बरळायला लागले तर किमान एक कानफाटीत हे विचारवंत खातीलच. मोदी सरकारविरोधात जर काही मुद्दे उभे करायचे असतील तर हा अगदीच काऊंटर प्रॉडक्टिव्ह मुद्दा आहे हे या विचारवंतांच्या लक्षात कसे येत नसेल हेच समजत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

कन्हैय्या प्रकरणानंतर देशाच्या संसदभवनावर हल्ला करून, संसदभवन उडवून देणे किंवा कदाचित फिजीमध्ये झाले त्याप्रमाणे मंत्रीमंडळ ओलिस ठेऊन वाटेल त्या मागण्या मान्य करून घेणे असे भयंकर प्रकार करायचा इरादा असलेल्या कटात सहभागी असलेल्या हरामखोराचा काही विचारवंत (इथेही आहेतच असे महाभाग) उदोउदो करतात, भारताचे तुकडेतुकडे होईपर्यंत शांत बसणार नाही वगैरे गोष्टी अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून खपवतात याला सामान्य भारतीयांचा पाठिंबा मिळणे कदापि शक्य नाही. हा लेख वाचा. यातील काही मुक्ताफळे - संघप्रणीत विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोदींच्या सत्ताकाळात नको तेवढे उत्साहात आहेत आणि संघाच्या विचारापासून दूर असणाऱ्यांची वैचारिक नाकेबंदी करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. दुर्दैव याचे की त्यांच्या या धुडगुसाला केंद्र सरकारची साथ आहे. प्रथम पुण्याची एफटीटीआय ही संस्था अशा राजकीय हस्तक्षेपापायी रसातळाला गेली. एफटीआयआय रसातळाला गेली म्हणजे नक्की काय झाले असावे? गजेंद्र चौहानांची नेमणूक होण्यापूर्वी २००८ च्या बॅचचे टगे तिथे ७ वर्षे मुक्काम ठोकून होते. ३ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम ७ वर्षे घालविल्यानंतर सुद्धा त्यांनी पूर्ण केला नव्हता आणि तेच टगे गुणवत्तेच्या गफ्फा हाणत होते. गजेंद्र चौहांनानी व्यवस्थित योजना आखून २०१६ मध्येच या विद्यार्थ्यांची अ‍ॅसेसमेंट करून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करायला लावला. तिथे अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू करून प्रस्थापित टग्यांच्या मुजोरीला आळा घातला. असे करणे म्हणजे रसातळास जाणे असावे.
नंतर रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यावर लादलेल्या आत्महत्त्येने हैदराबादचे विद्यापीठ विस्कळित झाले.
विद्यापीठ विस्कळीत झाले म्हणजे नक्की काय झाले असावे? नालंदा विद्यापीठाचे माजी कुलगुरु व देशातील सध्याचे एकमेव नोबेल विजेते डॉ. अमर्त्य सेन यांचा नको तसा पाणउतारा स्मृती इराणी या संशयित पदवीधर मंत्रीणबार्इंनी करून त्यांना घालविले. परिणामी त्या ऐतिहासिक महत्त्वाचे विद्यापीठ नासले. अमर्त्य सेन हे वेगळेच प्रकरण आहे. २०१२ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी मनमोहन सिंगांनी त्यांना नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमले. त्याच विद्यापीठात मनमोहन सिंगांच्या मुलीची भक्कम पगारावर इतिहास विभाग प्रमुखपदी नेमणूक करून अमर्त्य सेनांनी मनमोहन सिंगांनी केलेल्या उपकारांची परतफेड केली. त्यांची कुलगुरूपदाची ३ वर्षांची मुदत २०१५ मध्ये संपली. ती मुदत संपली तेव्हा त्यांचे वय ८१ होते व त्यांना अजून एक ३ वर्षांची टर्म हवी होती. परंतु मोदींनी त्यांना मुदतवाढ न देता नवीन कुलगुरूची नेमणूक केल्यावर त्यांना संताप अनावर झाला. माझ्यावर अन्याय झाला, विद्यापीठात यांना उजव्या विचारांची माणसे बसवायची आहेत असा कांगावा त्यांनी सुरू केला. जर मोदींना ते नको असते तर मोदींनी २०१४ मध्येच त्यांना काढले असते. तसे न करता मोदींनी त्यांची ३ वर्षाची टर्म पूर्ण होऊन दिली. वयाच्या ८१ व्या वर्षी या व्यक्तीचा पदाचा मोह सुटत नव्हता. जर मोदींनी विद्यापीठात उजव्या विचारांची माणसे बसवायची होती तर त्यात काय चूक आहे? उजव्या विचारांची माणसे नालायक व डाव्या विचारांची माणसे सर्वगुणसंपन्न असे काही असते का? मनमोहन सिंगांनी त्यांना इतक्या वृद्धापकाळात पद दिले ते आपली माणसे घुसडण्याचे कृत्य नव्हते का? दिल्ली विद्यापीठात डाव्या विचारांची स्टुडण्ट्स फेडरेशन आणि विद्यार्थी परिषद यांच्यात गेले काही महिने सरळसरळ हाणामारी सुरू आहे आणि सरकारने त्यातल्या डाव्या विचारांच्या काही तरुणांना तुरुंगातही पाठविण्याचा अविचार केला आहे. (त्यातून उदयाला आलेले कन्हैयाकुमारचे बुलंद नेतृत्व, त्याला अद्याप थोपविता आले नाही ही बाब वेगळी) कानपुरातही डावे-उजवे हा राडा झाला व तोच अलाहाबाद आणि कोलकात्यातही झाला. डाव्या विद्यार्थी संघटनांना आजवर आव्हान मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांची टगेगिरी निरंकुश सुरू होती. जनेवि मध्ये भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा देणे, अफझल गुरू या महात्म्याचा महानिर्वाण दिन साजरा करणे यात यांना काहीच वावगे वाटत नाही. कन्हैयाकुमारचे बुलंद नेतृत्व वगैरे वाचून हसू आवरले नाही. त्याने विद्यापीठात चारचौघांसमोर (त्यात मुलीसुद्धा होत्या) भर रस्त्यात पोस्ट उघडून लघुशंका केली हे यांच्या मते बुलंद नेतृत्वाचे उदाहरण असावे.

In reply to by श्रीगुरुजी

त्याच विद्यापीठात मनमोहन सिंगांच्या मुलीची भक्कम पगारावर इतिहास विभाग प्रमुखपदी नेमणूक करून
उपिंदर सिंग या नावाजलेल्या इतिहास अभ्यासिका आहेत बहुधा. एक संदर्भ

शशी थरूर यांचा काल रेडिट वर AMA ("कोणताही प्रश्न विचारा" धागा) झाला. लिंक - https://www.reddit.com/r/india/comments/626l9b/hi_im_shashi_tharoor_ask… उत्सुक लोकांनी वाचावा. अजून नेते लोक असेच जनतेच्या प्रश्नांना डायरेक्ट उत्तरे देत राहोत! त्यांनी दिलेल्या उत्तरातली दोन उत्तरे मला especially आवडली -
Q. Which book would you recommend to a typical Indian youth?
A: The Mahabharata
Q: What can a normal citizen do to impact political environment in between elections considering one will be short on both time and money working long hours to feed one's family?
A: I agree that democracy is not just about elections every five years but about public accountability between them. And that means asking questions of your representatives both directly and in public forums, and making your voice heard on the decisions and actions of the Govt. I appreciate the constraints you mention -- but it's up to each of us to decide how much of our other interests and priorities to sacrifice in the pursuit of the public good.

In reply to by अत्रे

श्रीयुत थरूर यांना १) तुमचे पाकिस्तानी पत्रकार मेहेर तारर यांच्याशी नक्की कसे संबंध होते किंवा आहेत, २) सुनंदा थरूर यांचा गळा आवळून खून करण्यात आला त्यादिवशी तुम्ही मेहेर तारर त्याच हॉटेलच्या वेगवेगळ्या खोल्यामध्ये असणे या योगायोगाबद्दल तुमचे मत काय आहे ? असे प्रश्न कॊणीतरी विचारून त्यावर थरूर यांचे उत्तर आले की अजून नेते लोक असेच जनतेच्या प्रश्नांना डायरेक्ट उत्तरे देत राहोत! या आशावादाला बळ मिळेल आणि जनता सध्याच्या सत्ताधाऱ्यांना अजून प्रश्न विचारायला उत्सुक होईल.

In reply to by lakhu risbud

१) तुमचे पाकिस्तानी पत्रकार मेहेर तारर यांच्याशी नक्की कसे संबंध होते किंवा आहेत,
त्याची माहिती घेऊन जनतेला काय फायदा होणार?
सुनंदा थरूर यांचा गळा आवळून खून करण्यात आला त्यादिवशी तुम्ही मेहेर तारर त्याच हॉटेलच्या वेगवेगळ्या खोल्यामध्ये असणे या योगायोगाबद्दल तुमचे मत काय आहे ?
ज्यांना ह्याच प्रश्नामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी खुशाल विचारावेत. या प्रश्नांच्या उत्तरातून जनतेचे काय भले होणार हे मला माहित नाही.
जनता सध्याच्या सत्ताधाऱ्यांना अजून प्रश्न विचारायला उत्सुक होईल.
आधी भारतीय सत्ताधाऱ्यांनी इंटरनेटवर तर आले पाहिजे! मागे बराक ओबामा यांनीही एक AMA केला होता. त्याची लिंक - https://www.reddit.com/r/IAmA/comments/z1c9z/i_am_barack_obama_presiden… (लिंक चालत नसल्यास थोड्या वेळाने ट्राय करा)

अत्रे,
ज्यांना ह्याच प्रश्नामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी खुशाल विचारावेत. या प्रश्नांच्या उत्तरातून जनतेचे काय भले होणार हे मला माहित नाही.
एका मंत्र्याच्या बायकोचा खून होतो आणि त्या मंत्र्याची कथित प्रेयसी पाकिस्तानची हेर असते. यावरून भारतीय जनतेच्या हितासाठी थारुड्याला धारेवर धरलं पाहिजे असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.

अस वाटत उत्तरप्रदेश आणि योगि आदित्यनाथ सोडुन हे मर्त्य जग खरच मर्त्य झालेय, दुसर्‍या काहि बातम्याच नाहि हो टि.व्हि. वर, एव्हढे हिट तर आमचे अण्णा किंवा केजरिवाल सुद्धा नव्हते लोकपाल कालात. बर अस काहि लिहायचि सुद्धा पंचाईत झालिये लगेच "अंधसमर्थक" "अंधविरोधक" "भक्त" काय काय शिक्के मारले जातात आणि ते सुद्धा पट्टकन. अरे देवानु एखादि व्यक्ति निरपेक्ष राहुन सुद्धा त्याच्या त्याच्या बुद्धिनुसार, आकलन शक्तिनुसार कुठल्याहि पक्षाचे, नेत्याचे समर्थन किंवा विरोध करुच शकतो ना ! आता माझ्याच प्रतिक्रियेच घ्या जी मि दिलि होति जेंव्हा आदरणिय प्राध्यापक गायकवाड साहेब ह्यांनि चपलेने वार करुन एकंदर मोगलि रुप आलेल्या एअर ईंडियाच्या एका सुभेदारास पुरते नामोहरम केले होते. मि वापरलेले काहि शब्द निसंदेह अशोभनिय आहेत जे कि मि मागे घेउ शकतो, पण त्यामागचि भावना मात्र कायम राहिल. माझ्यामते तरी ति आदरणिय प्राध्यापक गायकवाड साहेब ह्यांचि चुक होति. ह्यांच्याकडे लोकसभेसारखा प्लॅटफॉर्म आहे, सरकारात हे सहभागि आहेत. थोडासा दबाव वापरुन हे एअर ईंडियाच्या सि.एम.डि ला धारेवर धरु शकत होते. मिडियाचा सुद्धा ह्यांना चतुर पणे वापर करता आला असता. पण ...असो. कधि काळि म्हणजे अक्कलदाढ आलेलि नसतांना आस्मादिक सुद्धा शिवसैनिक होते ते हि रजिस्टर्ड बर का. भारावुन जायच वय असत ते, अज्जाबात डोक्याचा वापर न करता प्रेमात पडायच वय, गेलो होतो भारावुन, झालो होतो सदस्य. त्यावेळचे अकोल्याचे सुविद्द पालकमंत्रि आणि क्रिडा राज्य मंत्रि (अकोल्या वाल्याईन बातच वळखल :) ) ह्यांचे खुप मोठे समर्थक होतो आम्हि. पण तिकडे युति सरकारने चर चर चरुन पाच वर्षात कुरण संपवल आन आम्हाले बि समजल का भाई हमाम मे सब नंगे :) आता एक नविन पर्व सुरु झालेय सेनेत वाड्यावर या , अबे लेकहो तुम्हाले समजणार बि नाहि अन मोदि गेम करुन टाकिल, तुम्हि जर जयललितांच्या निधनाच्या वेळेस मोदिंचि चेन्नई भेटिचे दृष्य आठवाल तर भाजपा ने अद्रमुक ला तेव्हाच गळास लावले आहे बहुधा नविन पटनायक सुद्द्धा तयार आहेत. असो. म्हात्रे काकांच्या परमिशन शिवाय त्यांचे वाक्य जसेच्या तसे वापरतोय, अपेक्षाय काका समजुन घेतिल :)) कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्यावर व त्यांच्या पत्नीवर आरोपपत्र दाखल त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. निवडणुकीला जेमतेम ९ महिने राहिले असताना काँग्रेसला हा अजून एक धक्का बसला आहे.

काळा पैसा पांढरा करणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकारचा दणका; देशभरात छापेमारी एका कंपनीच्या कागदपत्रात छगन भुजबळांना ४६ कोटी दिल्याची नोंद सापडली आहे असे बातम्यात सांगत होते. काल ३१ मार्चला जुन्या नोटा जमा करण्याचा शेवटचा दिवस होता. आज लगेच छापासत्र सुरू झाले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

>>काल ३१ मार्चला जुन्या नोटा जमा करण्याचा शेवटचा दिवस होता. तो ३१ डिसेंबर होता ना?

In reply to by नितिन थत्ते

३१ डिसेंबर भारतीय लोकांसाठी होता जे भारतात राहतात. जे अनिवासी भारतीय आहेत त्यांच्यासाठी ३१ मार्च होता.

In reply to by नितिन थत्ते

हो. बातमीप्रमाणे देशभर छापे अशासाठी मारण्यात आलेत की काही कंपन्या काळा पैसा पांढरा करून देण्याच्या उद्योगात होत्या. भुजबळांनी त्यांचे ४६.७ कोटी रुपये अशा बोगस कंपन्यांमार्फत पांढरे करून घेतले होते. ह्या छाप्यांचा नोटाबंदिशी तसा संबंध नाही तर काळा पैसा पांढरा केला (मग तो कोणत्याही काळात का असेना) हा आहे.

(आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मुलांबरोबर जेवण करताना काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते) एरवी एकमेकांना पाण्यात पाहणारे हे नेते आता मांडीला मांडी लावून जेवणाचा आस्वाद धेतान दिसताहेत. वातानुकुलीत मर्सिडिंज बेंझ बसून मधून प्रवास केल्यावर शिणवटा घालविण्यासाठी केलेल्या जेवणात गुलाबजाम आहेत व प्यायला खोकेबंद ज्यूस (फ्रूटी किंवा ट्रॉपिकाना ज्यूस असावा) व बिसलेरीचे बाटलीबंद पाणीही आहे. नशीब यावेळी जेवणासाठी सुवर्णपात्रे नाहीत. शेतकर्‍यांसाठी यांनी काढलेली ही संघर्ष यात्रा पाहून डोळे पाणावले.

In reply to by पुंबा

यात काय डोळे उघडायचेत? यांच नाटक स्पष्ट दिसतंय. वातानुकुलीत गाड्यातून हिंडताहेत, बिसलेरी पाणी पिताहेत आणि म्हणे शेतकऱ्यांसाठी संघर्ष करताहेत. राहुल सुद्धा असाच कधीतरी उगवतो आणि जेवणाची नौटंकी करून परदेशात पळतो.

In reply to by पुंबा

अरेरे, सॉरी सॉरी. इतर दोन प्रतिसाद वाचल्यानंतर हा उपरोध आहे हे लक्षातच आलं नाही. बाकी लोकमत हे अत्यंत भिकार वृत्तपत्र (अग्रलेखासहीत) आहे याविषयी सहमत.

In reply to by श्रीगुरुजी

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मुलांसाठी हे जेवण होते. त्यांना पिठलं भाकरी खाऊ घालायला पाहिजे होते का? गुलाब जाम आता खूप कॉमन झाले आहे आणि फ्रुट जूस हार्डली रु.१० मिळाले असेल. त्यात एवढे बाव करायचं काय कारण आहे? काय लोकं आहेत राव त्या मुलांचे जेवण पण काढाय लागले आता. याला नाटक-बिटक म्हणणे चालू होईल पण या पेक्षा खतरनाक नाटके करण्यात एक माणूस जग प्रसिद्ध आहे. गाड्यांचं म्हणाल तर सगळ्या रथ यात्रा तर AC बस मधेच निघत होत्या. (फोटो चिटकवता येईना ओ)

In reply to by विशुमित

मुलांचं जेवण नाही हो, वातानुकुलीत बसमधून हिंडणाऱ्या या नाटक्यांबद्दल बोलतोय. शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर धरणात लघुशंका करण्याची भाषा करणाऱ्याला आता सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांचा कळवळा आलाय.

In reply to by विशुमित

गाड्यांचं म्हणाल तर सगळ्या रथ यात्रा तर AC बस मधेच निघत होत्या. (फोटो चिटकवता येईना ओ) हे भारी लॉजिक आहे.. भाजपाने व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला करणारे बिल आणले म्हणून दंगा झाला, मी दाखवून दिले की काँग्रेसने पूर्वी असा हल्ला केलेला आहे. तर म्हणताय काँग्रेसने पूर्वी हल्ले केले म्हणून भाजपने पण आत्ता करावेत का..? इथे बरोब्बर उलटे लॉजिक. सोयीस्करपणाची हद्द आहे राव..! =))

In reply to by मोदक

लॉजिक तुमचं गंडलं. फायनान्स बीला बाबत काँग्रेस गटारात लोळत होती म्हणून भाजप ने पण गटारात लोळायचा का, हा माझा सवाल होता. त्या उलट AC रथाबाबत मी कुठे म्हंटले की ते चुकीचे करत होते. बरोबरच होते त्यांचे. एवढ्या उन्हं तान्हाचं वातानुकूलित गाडी ने प्रवास करू नाहीतर उघड्या टपाच्या गाडीत काय फरक पडतो? हा माझा प्रश्न होता.

In reply to by श्रीगुरुजी

जेवणात गुलाबजाम आहेत ह्यात वावगे काय आहे हे कळले नाही. जर आपण कुणाला घरी जेवायला बोलावले तर नेहमीचे पदार्थ न करता जरा वेगळे पदार्थ करतोच की. अर्थात ही संघर्ष यात्रा काढणे म्हणजे नौटंकी आहे हे मान्य आहे. खुद्द ह्यांच्या सत्ताकाळात किती पैसे सिंचन सुविधा निर्माण करण्यात खर्च झाले आणी त्यातून किती जमीन ओलिताखाली आहे हे जाहीर झाले होतेच.

In reply to by अभिजीत अवलिया

>>> अर्थात ही संघर्ष यात्रा काढणे म्हणजे नौटंकी आहे हे मान्य आहे. हेच म्हणतोय मी

मी काय म्हणतो, की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दिवसरात्र शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आकाशपाताळ एक करीत आहेत. शेतकर्‍यांच्या हालअपेष्टांमुळे त्यांना जेवण जात नाही आणि रात्री डोळ्याला डोळा लागत नाही. शेतकर्‍यांचे हाल संपविण्यासाठी हे तीनही पक्ष अत्यंत कासावीस झाले आहेत. त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. एवढे असूनसुद्धा फडणवीस सरकार शेतकर्‍यांची मजा बघत आहे. ते शेतकर्‍यांना कर्जमाफी देणार नाहीत हे स्पष्ट आहे. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याऐवजी ते जलयुक्त शिवार सारखी फालतूगिरी करण्यात मग्न आहेत. हे निर्दयी सरकार गेलेच पाहिजेत. २५ वर्षे पोसलेल्या विश्वासघातकी सापाला ठेचण्याची शिवसेनेलाही इच्छा आहेच. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे एकत्रित १४६ आमदार आहेत. शिवसेनेने या सरकारमधून बाहेर पडावे व या तिघांनी फक्त कर्जमाफीच्या मुद्द्यावर एकत्रित सरकार स्थापून कर्जमाफी जाहीर करावी व नंतर राजीनामा देऊन मध्यावधी निवडणूक लढवावी. सुरवातीला चिठ्ठ्या टाकून मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार व कोणती खाती कोणाला देणार ते ठरवावे. शिवसेनेसारख्या जातीयवादी व संकुचित पक्षाबरोबर गेल्यास आपल्या निधर्मी व उदारमतवादी भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागेल असे दोन्ही काँग्रेस पक्षांना वाटत असले तरी शेतकर्‍यांसाठी एवढी किंमत द्यायला हरकत नाही. तशीच वेळ आली तर कर्जमाफी जाहीर करून लगेच त्यांनी लगेच सरकारमधून बाहेर पडावे, म्हणजे शिवसेनेबरोबर गेल्याचे पाप धुतले जाईल. समजा कर्जमाफीनंतर हीच व्यवस्था सुरू ठेवाविशी वाटली तर उर्वरीत ३० महिन्यात तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपद प्रत्येकी १० महिने सांभाळावे. सर्वच पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी कासावीस झालेले अनेकजण असल्याने काँग्रेसमधून पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे व पतंग कदम यांनी प्रत्येकी अडीच महिने मुख्यमंत्री व्हावे. राष्ट्रवादीतून अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी प्रत्येकी ५ महिने मुख्यमंत्री व्हावे. समजा राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदावरून नळावरची भांडणॅ सुरू झाली तर दस्तुरखुद्द डॉ. शरदराव पवारसाहेबांनी १० महिने मुख्यमंत्री व्हावे. तशीही त्यांना शेतीची, शेतकर्‍यांच्या सर्व समस्यांची, महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांची खडानखडा माहिती आहेच. शिवसेनेच्या अष्टप्रधान मंडळातील प्रत्येकाने सव्वा महिने मुख्यमंत्री व्हावे. अशी व्यवस्था मान्य केली तर भाजपप्रणित निर्दय सरकारला धडा शिकविता येईल व शेतकर्‍यांविषयी खर्‍या अर्थाने कळवळा असलेले व शेतकर्‍यांच्या हिताची काम करणारे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असेल.

आपले दिल्लीचे युगपुरूष श्री.रा.रा.अरविंद केजरीवाल अत्यंत साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि जनहिताची तळमळ यासाठी नावाजलेले आहेतच. पण कधीकधीच त्यांचा तोल ढळतो. आता हेच बघा ना. पूर्ण त्रिखंडात केवळ आपण तेवढे स्वच्छ आणि आपल्याला इतर सगळ्यांवर पुरावा असो वा नसो बेलगाम आरोप करत सुटायचा परवानाच मिळाला आहे असे समजून इतरांवर वाटेल ते आरोप करत सुटायचे. आणि इतरांनी अब्रूनुकसानीचा दावा ठोकला तर राम जेठमलानींसारखा महागडा वकील करायचा. कोर्टात एकदा बाजू मांडायचे ते २२ लाख रूपये घेतात म्हणे. आणि इतक्या महागड्या वकीलाची फी कोणी भरायची? उत्तर सोपे आहे. अर्थातच दिल्लीच्या जनतेने. दिल्लीच्या करदात्यांनी. विश्वास बसत नसल्यास http://www.financialexpress.com/india-news/arvind-kejriwal-writes-to-lg… हे बघा. राम जेठमलानींनी श्री.रा.रा युगपुरूष अरविंद केजरीवाल यांची बाजू कोर्टात मांडली आणि त्याबद्दलची त्यांची ३.८६ कोटी रूपये फी दिल्ली सरकारने भरावी अशी नायब राज्यपालांकडे शिफारस केली!! अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी हा भारतीय राजकारणावर लागलेला कलंक आहे हे माझे अगदी पहिल्यापासूनचे मत होते. काँग्रेस, कम्युनिस्ट, राजद, सपा, बसपा इत्यादी इतर सर्व थर्ड क्लास पक्षांच्या बेरजेपेक्षा वाईट पक्ष आहे हा!! १. केजरीवालांनी अनेकांवर आरोप केले. त्यात अरूण जेटलींनी दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी असताना भ्रष्टाचार केला हा एक आरोप होता तर एस्सेल ग्रुपचे सुभाष चंद्रा यांच्याकडे काळा पैसा आहे हा दुसरा आरोप होता. केजरीवालांनी हे आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर असताना केले होते. मुख्यमंत्र्यांनी हे आरोप करून दिल्लीच्या करदात्यांचे नक्की कोणते भले झाले? असे बेताल बडबडणे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या के.आर.ए मध्ये समाविष्ट आहे का? २. जर वरच्या प्रश्नाचे उत्तर नाही असे असेल तर मग केजरीवालांनी हे आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री या नात्याने नाही तर वैयक्तिक पातळीवर केले होते. तसे असेल तर मग त्यांच्यावर अरूण जेटली आणि सुभाष चंद्रा (आणि कदाचित इतरांनी सुध्दा) ठोकलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्याच्या वकीलाचा खर्च दिल्ली सरकारने पक्षी दिल्लीच्या करदात्यांनी का करायचा? ३. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर असताना केलेल्या प्रकारामुळे हे खटले ठोकले गेले आहेत त्यामुळे दिल्ली सरकारने त्यासाठीचा खर्च करावा अशी अजब अपेक्षा टाईम्स नाऊवर आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्याने मांडली. त्यावर संबित पात्रांनी प्रत्युत्तर केले की मग याच न्यायाने ए.राजावरील भ्रष्टाचाराच्या खटल्याचा खर्चही भारत सरकारने करायला हवा कारण राजाने मंत्रीपदावर असताना केलेल्या कृत्यांमुळे भ्रष्टाचाराचा खटला आला आहे!! ४. अरूण जेटलींनी दिल्ली क्रिकेट असोशिएशन प्रकरणी खटला भरला आहे तो केजरीवालच नाही तर आम आदमी पक्षाच्या आशुतोष, कुमार विश्वास, संजय सिंग, राघव चढ्ढा आणि दिपक वाजपेयी या इतर नेत्यांवरही. यापैकी कोणीही दिल्लीमध्ये आमदारही नाही. मग आम आदमी पक्षाच्या नेत्यांवरील भरल्या गेलेल्या या खटल्याचा खर्च दिल्लीच्या करदात्यांनी का करायचा? दिल्लीचे जावई लागून गेले की नाही हे!! आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासूनच, किंबहुना अण्णांच्या एप्रिल २०११ मधील पहिल्या उपोषणापासूनच माझे मत होते की हे सगळे good for nothing idiots आणि morons of highest order आहेत!! केजरीवालांच्या या सगळ्या मर्कटलीलांमुळे माझे मत अधिकाधिक पक्के बनले आहे. त्याचमुळे केजरीवाल आणि आम आदमी पक्ष यांचे नाव जरी ऐकले तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. मिपावर आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल या ढोंगी सर्कशीचा माझ्याहून कडवा विरोधक मिळणे कठिण आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. या सगळ्या भानगडीत वाईट इतकेच वाटते की भविष्यातही भ्रष्टाचाराला विरोध, लोकाभिमुख शासन वगैरे मुद्दे प्रामाणिकपणे घेऊन कोणी राजकारणात उतरले तर त्या नेत्यांकडेही मतदार संशयानेच बघतील. या सगळ्या चळवळीचे कधी भरून न येणारे नुकसान अरविंद केजरीवाल या गृहस्थाने केले आहे. (केजरीवालचे नाव ऐकताच कोक आणि मेंटॉसच्या मिश्रणासारखा उसळणारा आणि त्याचा अभिमान वाटणारा) गॅरी ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

शब्दाशब्दाशी सहमत! केजरीवाल हा पराकोटीचा ढोंगी आणि निर्लज्ज माणूस आहे. भारतीय राजकारणाच्या इतिहासात व वर्तमानात इतका नालायक नेता झाला नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

(केजरीवालचे नाव ऐकताच कोक आणि मेंटॉसच्या मिश्रणासारखा उसळणारा आणि त्याचा अभिमान वाटणारा) गॅरी ट्रुमन =))

In reply to by गॅरी ट्रुमन

या सगळ्या भानगडीत वाईट इतकेच वाटते की भविष्यातही भ्रष्टाचाराला विरोध, लोकाभिमुख शासन वगैरे मुद्दे प्रामाणिकपणे घेऊन कोणी राजकारणात उतरले तर त्या नेत्यांकडेही मतदार संशयानेच बघतील. या सगळ्या चळवळीचे कधी भरून न येणारे नुकसान अरविंद केजरीवाल या गृहस्थाने केले आहे.
अगदी नेमकं.

In reply to by गॅरी ट्रुमन

राम जेठमलानींनी श्री.रा.रा युगपुरूष अरविंद केजरीवाल यांची बाजू कोर्टात मांडली आणि त्याबद्दलची त्यांची ३.८६ कोटी रूपये फी दिल्ली सरकारने भरावी अशी नायब राज्यपालांकडे शिफारस केली!!
ही दोन्हीही माणसं पराकोटीची नीच आहेत.

In reply to by पुंबा

ही दोन्हीही माणसं पराकोटीची नीच आहेत. हा संपूर्ण पक्षच अत्यंत नीच व्यक्तींनी भरलेला आहे. इतक्या खालच्या थरावर गेलेले नेते इतर कोणत्याही पक्षात नाहीत. Fine, won't charge 'poor Kejriwal': Jethmalani on his Rs 3.42 crore bill या वॄत्तानुसार केजरीवाल हे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत. “Even now if the government doesn’t pay or he can’t pay, I will appear free. I will then treat him as one of my poor clients,” Jethmalani told ANI. “Everybody knows in this country that I charge only the rich, but for poor people I do work free and the poor people are about 90 per cent of my clientele,” he said. मागील वर्षी सोनिया व राहुलवरील नॅशनल हेरॉल्ड लूटमारीचा खटला आपण मोफत लढू अशी जेठमलानींनी ऑफर दिली होती.

In reply to by श्रीगुरुजी

प्रत्यक्षात राम जेठमलानींना करदात्यांचे पैसे दिले गेले नाहीत तरी केजरीवाल मात्र या प्रकरणात पूर्णच उघडे पडले आहेत. याचे कारण करदात्यांचे पैसे स्वतःच्या खाजगी खटल्यांसाठी देण्यात केजरीवालांना काहीही गैर वाटत नाही हाच त्याचा अर्थ आहे!! या असल्या लांडग्याला लोक कसे काय भुलले हेच समजत नाही. काहीही असले तरी दिल्लीच्या मतदारांना अडाण्यांना निवडून दिल्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. २०२० पर्यंत दिल्लीमध्ये केजरीवालच मुख्यमंत्री असू देत आणि अशीच ती सरकारी खजिन्याची लूट करू देत. जे मतदार "दुसर्‍या कोणाचे पैसे आपल्याला मिळतील" ही अपेक्षा ठेऊन मते देतात (सगळ्या गोष्टी फुकटात पाहिजेत ना ) त्यांना त्यांचे पैसे दुसर्‍या कोणी हडपले तर तक्रार करायचा काहीही अधिकार राहात नाही. दिल्लीमध्ये पूर्ण बजबजपुरी माजूदे आणि इतर राज्यांमधील मतदारांसाठी तो एक धडा होऊ दे--- अडाण्यांना निवडून दिल्याचे हे परिणाम होतात!! आता खुद्द आम आदमी पक्ष समर्थक जरी म्हणत नसले तरी मी म्हणतो--- पाच साल केजरीवाल!!

In reply to by गॅरी ट्रुमन

केजरीवाल नामक भामट्याने आता नवीन शक्कल लढविली आहे. सार्वजनिक ठिकाणी काढलेल्या आपल्या ओकार्‍या साफ करण्याची किंमत जनतेच्या पैशातून वसूल करण्याचा प्रयत्न करून त्याला भ्रष्टाचारविरोधाचा तात्विक मुलामा देण्याचे घृणास्पद प्रयत्न अंगावर यायला लागलेत असं दिसल्यानंतर त्यांनी आपली नेहमीचीच ट्रिक सुरू केली आहे. आपल्या पित्ते जमवलेल्या सभेत हे आता माईकवरून विचारतात की या केसची फी मी द्यावी का सरकारने द्यावी? या प्रश्नावर त्यांचे पित्ते सरकारने द्यावी असे ओरडतात. आपल्या खटल्याची वकीलाची फी सरकारने भरावी अशी जनतेचीच इच्छा आहे असा दावा करायला हे मोकळे. म्हणजे जाणूनबुजून घाण ह्यांनी करायची आणि घाण साफ करण्याचा खर्च लोकांनी द्यायचा. पूर्वी सरकार बनविण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा घेण्यासाठी त्यांनी अशीच ट्रिक वापरून एसएमएस मागविले होते आणि मी काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा अशी जनतेचीच इच्छा आहे अशी मखलाशी करून आपल्या सत्तेच्या अभिलाषेला जनतेच्या पाठिंब्याचा मुलामा दिला होता. हे जेव्हा इतर सर्वावर पुरावे नसताना बेछूट आरोप करतात, मोदींविरूद्ध अत्यंत घाण भाषेत ट्विट्स करतात, दिल्लीचे मुख्यमंत्री असून एकाही खात्याची जबाबदारी न घेता दिल्ली सोडून इतरत्र उंडारत असतात, लालूसारख्या नालायकाशी हातमिळवणी करतात तेव्हा हे जनतेचे मत विचारतात का? हा भामटा आपली कृष्णकृत्ये लपविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो व त्याबद्दल त्याला खेद, खंत, लाज, लज्जा, शरम असे काहीही वाटत नाही. Arvind Kejriwal asks if he should pay Jethmalani's fee from his pocket. CM wants aam aadmi to decide

In reply to by श्रीगुरुजी

हा भामटा आपली कृष्णकृत्ये लपविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो व त्याबद्दल त्याला खेद, खंत, लाज, लज्जा, शरम असे काहीही वाटत नाही.
ही नवीन नौटंकी दिसत आहे. अरूण जेटलींनी केजरीवालांविरूध्द दिवाणी आणि फौजदारी (सिव्हिल आणि क्रिमिनल) असे दोन्ही खटले दाखल केले आहेत. या दोन खटल्यांविषयी स्वतः केजरीवालांनी कोर्टापुढे दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की या दोन्ही खटल्यांमध्ये सहभागी असलेले पक्ष, दोन्ही खटल्यांशी संबंधित पार्श्वभूमी इत्यादी सारखेच आहेत आणि दोन्ही खटले 'प्रायव्हेट' आहेत. Kejru या अर्जातून केजरीवालांनी कोर्टापुढे विनंती केली होती की हे दोन खटले वेगळे न चालवता एकच खटला चालवला जावा. आपल्या या विनंतीची कारणमिमांसा अर्जात देताना दोन्ही खटले "प्रायव्हेट" आहेत असे केजरीवालांनी स्वतःच म्हटले होते. अर्थातच कोर्टाने हा अर्ज फेटाळला. http://www.ndtv.com/india-news/private-case-arvind-kejriwal-told-court-… आणि वकीलाची फी भरायची वेळ आल्यावर मात्र हेच प्रायव्हेट खटले रातोरात पब्लिक खटले बनले. माणसाने किती खालच्या थराला जावे? काही मर्यादा आहे की नाही? प्रत्येक वेळी वाटते की केजरीवाल यापेक्षा खाली जाऊ शकणार नाहीत. पण तरीही पुढच्या वेळेस मागच्यापेक्षाही हलकटपणा करत हे आपलेच रेकॉर्ड मोडत असतातच. अपेक्षेप्रमाणे आपटर्ड केजरीवालांविरूध्दच्या खटल्याचा खर्च दिल्ली सरकारने द्यायला हवा अशी पोपटपंची करायला लागले आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की या खटल्यात पक्षकार आहेत अरूण जेटली विरूध्द अरविंद केजरीवाल आणि इतर. जर पक्षकार अरूण जेटली विरूध्द दिल्ली सरकार असा खटला असता तर त्याचा खर्च दिल्ली सरकारने द्यायचा निदान विचार तरी करता आला असता. आणि कोणत्या परिस्थितीत दिल्ली सरकार या खटल्यात पक्षकार होऊ शकेल? जर मुख्यमंत्री आणि सरकार बदलले तरी त्याची जबाबदारी पुढील सरकारची असेल तेव्हा. एक उदाहरण द्यायचे झाले तर समजा मनमोहन सरकारने केलेल्या कुठल्या कराराअंतर्गत कुणा कंपनीला पैसे दिले नसतील आणि त्या कंपनीने त्याविषयीचा खटला दाखल केला तर ते देणे भारत सरकारकडून देणे असल्यामुळे पैसे दिले न गेल्यास मनमोहन सरकारचे उत्तराधिकारी म्हणून मोदी सरकार या प्रकरणी उत्तरदायी असेल आणि ते प्रकरण कोर्टात गेल्यास त्याचा जबाब मोदी सरकारला द्यावा लागेल. केजरीवालांच्या प्रकरणात जर काही कारणांनी केजरीवाल मुख्यमंत्रीपदावरून जाऊन नवा मुख्यमंत्री आणि नवे सरकार सत्तेत आले तर या खटल्याशी संदर्भातील जबाबदारी त्या नव्या सरकारची कशी काय असेल? तेव्हा या प्रकरणात दिल्लीच्या करदात्यांकडून पैसे घ्यायचे काहीही काम नाही. तरीही समर्थन करणारे करत आहेतच आणि हेच लोक इतरांना भक्तही म्हणत आहेत!! रच्याकने, आम आदमी पक्षाचे नेते नेहमीप्रमाणे असंबद्ध फाटे फोडून लोकांची दिशाभूल करायचे काम करत आहेतच. मकराश्रू फेम आशुतोषचा पुढील टिवटिवाट त्याचेच द्योतक आहे--- क्षणभर धरून चालू की केजरीवाल गरीब आहेत आणि अरूण जेटली श्रीमंत आहेत. तरीही या गरीब केजरीवालला कुठलेही पुरावे नसताना इतरांविरूध्द वाटेल ते आरोप करायचा परवाना मिळतो का? खरोखरच आम आदमी पक्षाइतका नालायक, ढोंगी, हलकटातला हलकट पक्ष मिळणे नाही.

तो वरचा आशुतोष ने केलेला ट्विट वाचून हसावे की रडावे तेच कळत नाही. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला, रामजेठमलानी सारखा महागडा वकिल स्वत:साठी नियुक्त करताना, त्याची एका सुनावणीची फि बावीस लाख रुपये आहे हे माहिती नसणे म्हणजे अगदिच आश्चर्यकारक आहे. आणि जर का अरविंद केजरिवाल इतकेच गरिब आहेत, तर रामजेठमलानी यांनी 'मी पैसे फक्त श्रीमंताकडूनच घेतो, अनेक गरिबांच्या केसेस मी फ्रि मध्ये देखिल लढवतो' असे म्हटले आहेच, तर अरविंद केजरिवाल यांनी जनतेचे पैसे उधळण्याऐवजी, जेठमलानी यांच्या या योजनेचा फायदा घ्यावा.

In reply to by प्रसाद_१९८२

हा जर खाजगी खटला नसून सरकारविरूद्ध केलेला खटला आहे तर कायद्याप्रमाणे केजरीवालांनी खाजगी वकील देण्याऐवजी दिल्ली सरकारचा पब्लिक प्रॉसिक्यूटरच द्यायला पाहिजे. या भामट्याला हे नक्कीच माहित असणार.

In reply to by श्रीगुरुजी

शिवाय निवडणुक आयोगाला दिलेल्या संपत्तीच्या विवरणात या नौटंकीवालनी त्याची एकुण संपत्ती दोन करोड, तेरा लाख, सहास्षट हजार, सहाशे अडुष्ट इतकी आहे असे जाहिर केले आहे. आता २ करोड+ संपत्ती असलेला माणूस गरिब कसा ह्याचे उत्तर आपटार्ड नी द्यावे ?? http://myneta.info/delhi2015/candidate.php?candidate_id=302