संपादक व्हावं अशी अजिबात इच्छा नाहीये. पण ओशो म्हणतात, इमॅजिनेशन इज अ टॉय, वन कॅन प्ले विथ इट. बट माइंड यू, ओन्ली योर डिझायर शूड नॉट टेकओवर इट ! तर मी संपादक होण्याची शक्यता शून्य . त्यामुळे हा फक्त मौजमजेचा खयाली पुलाव आहे.
जे आयडी पॅन कार्डची कॉपी व्यवस्थापनाकडे पाठवणार नाहीत त्यांचे आयडी महिनाभरानंतर आपोआप ब्लॉक होतील. ही स्वच्छ मिपा अभियानांतर्गत माझी पहिली स्टेप असेल. या मोहिमेमुळे ३०,००० ची संख्या ३,००० वर आली तरी हरकत नाही पण सध्याचे डू आयडी, बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या आवतारात घुसखोरी हे प्रश्न एका झटक्यात आणि कायमचे निकालात निघतील.
सध्याच्या (इनक्लूडींग सद्याच्या) संपादक मंडळाला धक्का न लावता, मी अभ्याला चौथा संपादक म्हणून घेईन. एक स्त्री सदस्या पण मंडळात असलेली बरी असं वाटतं, तरी नक्की कुणाला घ्यावं म्हणजे उर्वरित स्त्री शक्तींचा कोप होणार नाही हा मोठा संभ्रमच आहे. त्यामुळे तूर्तास हे काँपोझिशन बेस्ट आहे. आभ्या आला की आम्हाला नव्या आणि भन्नाट आयडीया राबवता येतील (फॉर एक्झांपल उपरोल्लेखित स्वच्छता मोहिमेची आयडिया!)
शिवाय आरपार पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक आयडीला ब्लॉक करण्यापूर्वी आपलं म्हणणं मांडायची संधी दिली जाईल. म्हणजे मंडळाला `कुणी काय विचारु शकत नसलं' तरी सदस्याला चान्स देणं लोकशाहीला धरुने. इन द मीन टाईम त्या सदस्याचे प्रतिसाद कोल्ड स्टोरेजमधे ठेवले जातील. सदस्य समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही तरच कोल्ड स्टोरेज प्रतिसादांसकट तो ब्लॉक होईल.
सर्व सदस्यांचा एक अटेंडन्स लॉग ठेवण्यात येईल. म्हणजे ही शाळा नाही पण मोफत मजेसाठी सुद्धा जे वेळ काढू शकत नाहीत ते असून नसून सारखेच. या लॉग प्रमाणे वर्षाला किमान साठ दिवसांपेक्षा कमी वेळा लॉगीन झालेले सदस्य, १ एप्रिलला फूल होतील. अर्थात, अशा सदस्यांना सुबुद्धी झाल्यास त्यांनी पुन्हा रिक्वेस्ट केल्यावर त्यांची घरवापसी होऊ शकेल. पण हा प्रकार आयुष्यात फक्त दोनदा होईल.
मिपा डोनेशन फॅसिलीटी ही अभिनव योजना मी सुरु करीन. म्हणजे संकेतस्थळाची सुविधा जरी मोफत असली तरी ज्या सदस्यांना स्वेच्छेनं `आली लहर केला कहर' म्हणायचं असेल, त्यांना ती इच्छा पुरवता येईल. या डोनेशन्समधून वेगवेगळ्या स्पर्धांना कॅश प्रायझेस दिली जातील. त्यामुळे सदस्यांना `आम्ही आमचा वेळ देतो' वगैरे म्हणण्यापूर्वी विचार करावा लागेल.
याव्यतिरिक्त प्रत्येक टॅबमधल्या सर्वोत्कृष्ठ लेखनास सदस्यांची नॉमिनेशन्स मागवून, दर वर्षी, प्रथम आणि द्वितीय असे दोन कॅश पुरस्कार देण्यात येतील. यामुळे इथे येणार्या सर्व पोस्टसचा दर्जा बेफाम सुधारेल.
वर्षातून एकदा `मॅन ऑफ द इयर' अँड `वूमन ऑफ द इयर' हे दोन कॅश पुरस्कार जाहीर केले जातील. ज्या सदस्यांच्या लेखनाला भरघोस प्रतिसाद मिळत गेले, ज्या सदस्यांनी संकेतस्थळासाठी विविध उपक्रम राबवले (उदा. गोष्ट तशी छोटी किंवा उंच माझा झोका), ज्यांनी संकेतस्थळाच्या सुशोभनाची जवाबदारी पेलली अशा निकषांवर हे दोन प्रेस्टीजियस पुरस्कार देण्यात येतील.
निबंध संपला !
वाचने
20557
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
50
>>माझे धागे जरा दमानं ताव
.
In reply to >>माझे धागे जरा दमानं ताव by कंजूस
अमुक आइडी -अध्यात्म,तमुक - नवीन समाज जीवन, इत्यादी. लेखन बंद करा नाही.एका आयडीनं असं सर्व लेखन केलं तर काय फरक पडतो ? शिवाय त्यातून व्यक्तीचा व्यासंगही कळतो.इथे नवाच घोळ सुरु झाला आहे म्हणून हे एक्सप्लनेशन !
`स्वामीजी'ही एकमेकांना संबोधण्याचीकॉमन प्रणालीआहे.ते विशेष नाम नाही.मी (चुकून) संपादक झालो तर ...
बरं
ब (रोब) रं
In reply to मी (चुकून) संपादक झालो तर ... by प्रसाद गोडबोले
ब (रोब) रं
मग काय ठरलं शेवटी?
+१
In reply to मग काय ठरलं शेवटी? by यशोधरा
मी दारु पिणे सोडले तर
मी (चुकून) संपादक झालो तर !
सहमते !
In reply to मी (चुकून) संपादक झालो तर ! by अप्पा जोगळेकर
आता अगदी चाळीस हजार नाही
माझ्या निरीक्षणाप्रमाणे
In reply to आता अगदी चाळीस हजार नाही by कंजूस
म्हणजे महिन्यात चार पाच
नाही तरी सध्या सक्रीय आणि जवाबदार आयडीजच
In reply to म्हणजे महिन्यात चार पाच by कंजूस
हे आपलं सहजच डोळ्याखालून
अनभिज्ञ पोस्ट !
In reply to हे आपलं सहजच डोळ्याखालून by हतोळकरांचा प्रसाद
अनभिज्ञ पोस्ट? वेरी गुड! आपण
In reply to अनभिज्ञ पोस्ट ! by संजय क्षीरसागर
काहीही मुद्दा लावून धरायचाच असं आहे का ?
In reply to अनभिज्ञ पोस्ट? वेरी गुड! आपण by हतोळकरांचा प्रसाद
१. आणि २. फायद्याचं व्यवहार आहे का तोट्याचा हा नंतरचा मुद्दा आहे, अवैध व्यवहार होऊ शकतो हा मुद्दा आहे.तोट्याचा व्यावहारासाठी फ्रॉड करणारा तुमच्या पाहाण्यात आहे का ? २)३. आणि ४. रजिस्टर करण्याचा मुद्दा आहे हो. माझ्या माहितीनुसार इन्कमटॅक्स वेबसाईट ला रजिस्टर करताना पॅन नं. आणि जन्मतारीख वगैरे असेल तर कुठलाही मोबाईल नं आणि ई-मेल टाकून रजिस्टर करता येतं असा तो मुद्दा आहे.एखादा पॅनरजिस्टर्ड नसेलतरच ते शक्य आहे. रजिस्टर्ड पॅनच्याबाबतीत कुणाचेही डॅडी आले तरी ते अशक्य आहे. आणि ज्या सिग्मेंटची इथे चर्चा चालू आहे ते पॅन्स अनरजिस्टर्ड असणं शक्य नाही. ३) लिंक देण्यापूर्वी बातमी तरी नीट वाचत जा :The CBI on Sunday arrested three income tax (I-T) officials and two of their accomplices in connection with a Rs 3-crore fraudulent tax refund scam.हे पॅन कुठेही दिल्यानं झालेलं नाही तर डायरेक्ट आयटी ऑफिशियल्सनी केलेल्या फ्रॉडमुळे झालंय. थोडक्यात, पॅनकार्ड स्विटझर्लंडच्या लॉकरमधे ठेवलं तरी हे घडू शकतं."काहीही मुद्दा लावून धरायचाच
In reply to काहीही मुद्दा लावून धरायचाच असं आहे का ? by संजय क्षीरसागर
.
In reply to "काहीही मुद्दा लावून धरायचाच by हतोळकरांचा प्रसाद
माझ्या पाहण्यात असला तरच खरं मानणार का?स्वतःच्या तोट्यासाठी फ्रॉड करणारी व्यक्ती बिनडोक असेल असा अर्थ आहे त्या वाक्याचा. २)इथे चर्चा चालू असलेले लोक इन्कमटॅक्स वेबसाईटवर रजिस्टर असतीलच हे गृहीतक कशावरून?नसतील कशावरुन ? पेपर रिटर्न रद्द झाल्यावर पॅन रजिस्टर्ड करण्याशिवाय पर्यायच नव्हता. ३)मी तर वाचलीच हो बातमी, रादर तुम्ही बातमी आणि त्यातला अर्थ समजून घेत जावा.जिथे आयटी अधिकारीच फ्रॉड करतात तिथे कुणाचाच पॅन सुरक्षित नाही. तो तुम्ही घरात ठेवा की लंडनला. ४)याशिवाय तुमचा पॅन वापरून बेनामी व्यवहार केले जाऊ शकतात हे तर उघडच आहे,नक्की कोणता बेनामी व्यावहार होऊ शकतो ? फारच इंटरेस्टींग माहिती आहे ही, जरा तपशिलात कळवाल का ? ५)लोकांच्या २६AS बद्दल तक्रारी आहेत.सगळ्या तक्रारी टॅक्स क्रेडीट न मिळाल्यामुळे होतात. फुकटचं टॅक्स क्रेडीट मिळाल्यावर तक्रार कशाला होईल? ओके. आता पुढे ?काही नाही, चालू द्या!
In reply to . by संजय क्षीरसागर
नव्या मुंबईतील भ्रष्ट सरकारी
In reply to हे आपलं सहजच डोळ्याखालून by हतोळकरांचा प्रसाद
पण हे मी वरतीच क्लिअर केलं आहे
In reply to नव्या मुंबईतील भ्रष्ट सरकारी by सुबोध खरे
मला हे झेरॉक्सवर लिहून
तसं नाय
In reply to मला हे झेरॉक्सवर लिहून by आदूबाळ