Skip to main content

मी (चुकून) संपादक झालो तर !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 21/03/2017 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
संपादक व्हावं अशी अजिबात इच्छा नाहीये. पण ओशो म्हणतात, इमॅजिनेशन इज अ टॉय, वन कॅन प्ले विथ इट. बट माइंड यू, ओन्ली योर डिझायर शूड नॉट टेकओवर इट ! तर मी संपादक होण्याची शक्यता शून्य . त्यामुळे हा फक्त मौजमजेचा खयाली पुलाव आहे. जे आयडी पॅन कार्डची कॉपी व्यवस्थापनाकडे पाठवणार नाहीत त्यांचे आयडी महिनाभरानंतर आपोआप ब्लॉक होतील. ही स्वच्छ मिपा अभियानांतर्गत माझी पहिली स्टेप असेल. या मोहिमेमुळे ३०,००० ची संख्या ३,००० वर आली तरी हरकत नाही पण सध्याचे डू आयडी, बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या आवतारात घुसखोरी हे प्रश्न एका झटक्यात आणि कायमचे निकालात निघतील. सध्याच्या (इनक्लूडींग सद्याच्या) संपादक मंडळाला धक्का न लावता, मी अभ्याला चौथा संपादक म्हणून घेईन. एक स्त्री सदस्या पण मंडळात असलेली बरी असं वाटतं, तरी नक्की कुणाला घ्यावं म्हणजे उर्वरित स्त्री शक्तींचा कोप होणार नाही हा मोठा संभ्रमच आहे. त्यामुळे तूर्तास हे काँपोझिशन बेस्ट आहे. आभ्या आला की आम्हाला नव्या आणि भन्नाट आयडीया राबवता येतील (फॉर एक्झांपल उपरोल्लेखित स्वच्छता मोहिमेची आयडिया!) शिवाय आरपार पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक आयडीला ब्लॉक करण्यापूर्वी आपलं म्हणणं मांडायची संधी दिली जाईल. म्हणजे मंडळाला `कुणी काय विचारु शकत नसलं' तरी सदस्याला चान्स देणं लोकशाहीला धरुने. इन द मीन टाईम त्या सदस्याचे प्रतिसाद कोल्ड स्टोरेजमधे ठेवले जातील. सदस्य समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही तरच कोल्ड स्टोरेज प्रतिसादांसकट तो ब्लॉक होईल. सर्व सदस्यांचा एक अटेंडन्स लॉग ठेवण्यात येईल. म्हणजे ही शाळा नाही पण मोफत मजेसाठी सुद्धा जे वेळ काढू शकत नाहीत ते असून नसून सारखेच. या लॉग प्रमाणे वर्षाला किमान साठ दिवसांपेक्षा कमी वेळा लॉगीन झालेले सदस्य, १ एप्रिलला फूल होतील. अर्थात, अशा सदस्यांना सुबुद्धी झाल्यास त्यांनी पुन्हा रिक्वेस्ट केल्यावर त्यांची घरवापसी होऊ शकेल. पण हा प्रकार आयुष्यात फक्त दोनदा होईल. मिपा डोनेशन फॅसिलीटी ही अभिनव योजना मी सुरु करीन. म्हणजे संकेतस्थळाची सुविधा जरी मोफत असली तरी ज्या सदस्यांना स्वेच्छेनं `आली लहर केला कहर' म्हणायचं असेल, त्यांना ती इच्छा पुरवता येईल. या डोनेशन्समधून वेगवेगळ्या स्पर्धांना कॅश प्रायझेस दिली जातील. त्यामुळे सदस्यांना `आम्ही आमचा वेळ देतो' वगैरे म्हणण्यापूर्वी विचार करावा लागेल. याव्यतिरिक्त प्रत्येक टॅबमधल्या सर्वोत्कृष्ठ लेखनास सदस्यांची नॉमिनेशन्स मागवून, दर वर्षी, प्रथम आणि द्वितीय असे दोन कॅश पुरस्कार देण्यात येतील. यामुळे इथे येणार्‍या सर्व पोस्टसचा दर्जा बेफाम सुधारेल. वर्षातून एकदा `मॅन ऑफ द इयर' अँड `वूमन ऑफ द इयर' हे दोन कॅश पुरस्कार जाहीर केले जातील. ज्या सदस्यांच्या लेखनाला भरघोस प्रतिसाद मिळत गेले, ज्या सदस्यांनी संकेतस्थळासाठी विविध उपक्रम राबवले (उदा. गोष्ट तशी छोटी किंवा उंच माझा झोका), ज्यांनी संकेतस्थळाच्या सुशोभनाची जवाबदारी पेलली अशा निकषांवर हे दोन प्रेस्टीजियस पुरस्कार देण्यात येतील. निबंध संपला !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20557
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

हाफशेंच्युरी निमीत्त संक्षीना "भावी संपादक" ही पदवी आणी रु. 2000 च्या 5 नोटा देऊन सत्कार करण्यात येत आहे. -शुमेच्छुक- जेपी आणी तमाम संपादक पदाचे इच्छुक उमेदवार.

>>माझे धागे जरा दमानं ताव पकडतात ! आता हळूहळू सुरुवात होईल असं दिसतंय.>> चालेल चालेल. >>जितके आयडी तितकी बेजवाबदार वृती >> नाही तसं नाही. अमुक आइडी -अध्यात्म,तमुक - नवीन समाज जीवन, इत्यादी. लेखन बंद करा नाही.

In reply to by कंजूस

अमुक आइडी -अध्यात्म,तमुक - नवीन समाज जीवन, इत्यादी. लेखन बंद करा नाही. एका आयडीनं असं सर्व लेखन केलं तर काय फरक पडतो ? शिवाय त्यातून व्यक्तीचा व्यासंगही कळतो.

मी (चुकून) संपादक झालो तर ... फक्त " बरं" इतकाच प्रतिसाद असलेले एक प्रतिसादाचे टेम्प्लेट तयार करीन आणि त्याचे वैशिष्ठ्य असेल की त्याच्यावर उपप्रतिसाद देता येणार नाही ! नो उपप्रतिसाद= नो विषयांतर+ नो फालतु वादविवाद + नो स्कोअर सेटलिंग !

बरं


मी (चुकून) संपादक झालो तर ! तुम्ही संपादक झालात तर अतिशय चांगले होईल या संस्थळासाठी. म्हणजे काय होईल की संपादनाच्या व्यग्र कामातून तुम्हाला लिहायला वेळच मिळणार नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

पण एकदा आयडी पॅनलिंक्ड केले की उधम करणारे आयडी आपोआप वगळले जातील आणि प्रशासनावरचा ताण कमालीचा कमी होईल लक्षात आलं का ?

आता अगदी चाळीस हजार नाही परंतू पाच हजार व्यक्ती मिपाशी संबंधित असाव्यात आणि त्यामधल्या पाचशे वर्षभरात एकदा तरी लिहित असतील. प्यानकार्डानंतर तो आकडा पन्नासवर आला तर?

In reply to by कंजूस

हे आकडे ३,००० आणि २५० असे आहेत. लिहीणारे लिहीत राहातील आणि नवेनवे आयडी येतच राहातील. इट इज अ लाइफ सायकल.

म्हणजे महिन्यात चार पाच प्रतिसाद आले तर सगळी मजाच जाईल. कॅसिनोमध्ये काही पगारी खेळाडू ठेवतात ते गर्दी दिसण्यासाठीच.

In reply to by कंजूस

रिलेवंट प्रतिसाद देतात असा अनुभव आहे. सो महिन्याला ४/५ प्रतिसाद वगैरे शक्यता दिसत नाही.

हे आपलं सहजच डोळ्याखालून घालावं - कुठेही पॅन कार्ड कॉपी देताना या गोष्टी माहित असलेल्या बऱ्या, कसे? https://www.quora.com/Can-a-PAN-card-number-be-misused-in-any-way

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

१. Even though if you are not related with the original transaction, if someone is going to quote your PAN for TDS, TCS or for some thing else, it will be recorded in your Form 26AS at later. हे डिडक्टरच करु शकतो आणि त्यानं तसं केलं तर तो टॅक्स पॅनहोल्डरला (म्हणजे तुम्हाला) क्रेडीट होईल. हे पॅनहोल्डरला फायद्याचं आहे त्यामुळे असं कुणीही करणार नाही कारण तो डिडक्टरला रिवाइज्ड रिटर्न भरुन दुरुस्त करण्याचा उपद्याप होईल. २) If someone is able to get your xerox copy of the PAN, then also it may be misused to obtain a loan or credit card or something else in your name याविषयी वर लिहीलं आहे. ३) Chances are also there some suspicious person may try to register on the Income tax website and try to file income tax return by using your PAN number. इन्कमटॅक्स साईटवर पॅनला मेल आणि मोबाईल अशी दुहेरी सिक्युरिटी आहे त्यामुळे हे जवळजवळ अशक्य आहे. त्याला तुमचा सेल आणि मेल दोन्ही हॅक व्हायला हवेत. ४) In order to register on the site the person should have to know your surname and date of birth correctly. This can be easily traced by your social profile. So be careful sharing your date of birth publicly on the social media. पुन्हा गोंधळ. लेखकाला मेल आणि सेल सिक्युरिटीची कल्पनाच नाही ! ६) Recently a scam came into light where a person got a refund of four crore rupees from tax department by giving fake PAN numbers of other people. एकदम फेकू ! लाख रुपयांवरचे सगळे रिफंडस पेपर फॉर्ममधेच ( एसबीआय चेक्स) येतात. त्यावर पॅनहोल्डरचा अकाऊंट नंबर असतो. असा रिफंड त्याच बँक अकाऊंटला क्रेडीट होऊ शकतो.

In reply to by संजय क्षीरसागर

अनभिज्ञ पोस्ट? वेरी गुड! आपण पॅन कार्ड कॉपीजचा मिसयुज होऊ शकत नाही हे छातीठोकपणे सांगताय? वरील कोराचा एक धागा आहे, अशा अनेक चर्चा आणि पॅन कार्डचा गैरवापर सांगणारे धागे सहज मिळतील हो ! अर्थात या चर्चेनंतरही मतं बदलली जातील अशी अपेक्षा नाहीये, पण इतरांना पॅन कार्डच्या गैरवापराबद्दल माहिती असावी म्हणून - १. आणि २. फायद्याचं व्यवहार आहे का तोट्याचा हा नंतरचा मुद्दा आहे, अवैध व्यवहार होऊ शकतो हा मुद्दा आहे. ३. आणि ४. रजिस्टर करण्याचा मुद्दा आहे हो. माझ्या माहितीनुसार इन्कमटॅक्स वेबसाईट ला रजिस्टर करताना पॅन नं. आणि जन्मतारीख वगैरे असेल तर कुठलाही मोबाईल नं आणि ई-मेल टाकून रजिस्टर करता येतं असा तो मुद्दा आहे. ६. फेकू? खालील बातमी वाचून घ्या (असा अनेक बातम्या गुगल केल्या तर दिसतात) - https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://m.timesof…

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

१) १. आणि २. फायद्याचं व्यवहार आहे का तोट्याचा हा नंतरचा मुद्दा आहे, अवैध व्यवहार होऊ शकतो हा मुद्दा आहे. तोट्याचा व्यावहारासाठी फ्रॉड करणारा तुमच्या पाहाण्यात आहे का ? २) ३. आणि ४. रजिस्टर करण्याचा मुद्दा आहे हो. माझ्या माहितीनुसार इन्कमटॅक्स वेबसाईट ला रजिस्टर करताना पॅन नं. आणि जन्मतारीख वगैरे असेल तर कुठलाही मोबाईल नं आणि ई-मेल टाकून रजिस्टर करता येतं असा तो मुद्दा आहे. एखादा पॅन रजिस्टर्ड नसेल तरच ते शक्य आहे. रजिस्टर्ड पॅनच्याबाबतीत कुणाचेही डॅडी आले तरी ते अशक्य आहे. आणि ज्या सिग्मेंटची इथे चर्चा चालू आहे ते पॅन्स अनरजिस्टर्ड असणं शक्य नाही. ३) लिंक देण्यापूर्वी बातमी तरी नीट वाचत जा : The CBI on Sunday arrested three income tax (I-T) officials and two of their accomplices in connection with a Rs 3-crore fraudulent tax refund scam. हे पॅन कुठेही दिल्यानं झालेलं नाही तर डायरेक्ट आयटी ऑफिशियल्सनी केलेल्या फ्रॉडमुळे झालंय. थोडक्यात, पॅनकार्ड स्विटझर्लंडच्या लॉकरमधे ठेवलं तरी हे घडू शकतं.

In reply to by संजय क्षीरसागर

"काहीही मुद्दा लावून धरायचाच असं आहे का?" हेच, हेच विचारायचे होते मला! तुम्ही एक तज्ज्ञ असतानांही पॅन कार्ड सारखी गोष्ट सेन्सिटिव्ह नाहीये आणि ती पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे देऊ शकता हे सांगायचं प्रयत्न करत आहात. मी फक्त ते कसे त्रासदायक ठरू शकते हे सांगायचं प्रयत्न केला तर मी मुद्दा लावून धरतोय? आता - १. माझ्या पाहण्यात असला तरच खरं मानणार का? २.अहो रजिस्ट्रेशनचा मुद्दा ऑलरेडी रजिस्टर्ड गोष्टींना लागू करताय तुम्ही. अर्थातच न रजिस्टर केलेल्या अकाउंट्स ना रजिस्टर केले जाऊ शकते हेच सांगायचा प्रयत्न चाललंय ना? रजिस्टर्ड अकाउंटला कोणाचेही डॅडी रजिस्टर करतीलच कशाला? इथे चर्चा चालू असलेले लोक इन्कमटॅक्स वेबसाईटवर रजिस्टर असतीलच हे गृहीतक कशावरून? ३. मी तर वाचलीच हो बातमी, रादर तुम्ही बातमी आणि त्यातला अर्थ समजून घेत जावा. तो घोटाळा कोणी केला पॅन कोठून मिळवले, IT वाल्यानी स्वतःच काढले शोधून कि असेच मिळाले हा दुय्यम मुद्दा आहे, असे होऊ शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि हा एकच घोटाळा आहे का? याशिवाय तुमचा पॅन वापरून बेनामी व्यवहार केले जाऊ शकतात हे तर उघडच आहे, तुम्ही त्या क्षेत्रातले आहात तुम्हाला नक्कीच माहिती असेल. नुसतं गुगल करून पहा किती लोकांच्या २६AS बद्दल तक्रारी आहेत. इतका सरळ मुद्दा आहे कि तुम्हाला, मला मिपा व्यवस्थापनाबद्दल विश्वास असू शकतो, सगळ्यांनाच असेल असे नाही. त्याला जोडून मुद्दा आला की पॅन विश्वास नसलेल्या ठिकाणी देणे धोकादायक ठरू शकते. यावर तुमहाला मुद्दा लावून धरायचाच असेल तर खुशाल धरा, सांगणे एवढेच की पॅन कार्ड वगैरे अव्यवहार्यच!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

१) माझ्या पाहण्यात असला तरच खरं मानणार का? स्वतःच्या तोट्यासाठी फ्रॉड करणारी व्यक्ती बिनडोक असेल असा अर्थ आहे त्या वाक्याचा. २) इथे चर्चा चालू असलेले लोक इन्कमटॅक्स वेबसाईटवर रजिस्टर असतीलच हे गृहीतक कशावरून? नसतील कशावरुन ? पेपर रिटर्न रद्द झाल्यावर पॅन रजिस्टर्ड करण्याशिवाय पर्यायच नव्हता. ३) मी तर वाचलीच हो बातमी, रादर तुम्ही बातमी आणि त्यातला अर्थ समजून घेत जावा. जिथे आयटी अधिकारीच फ्रॉड करतात तिथे कुणाचाच पॅन सुरक्षित नाही. तो तुम्ही घरात ठेवा की लंडनला. ४) याशिवाय तुमचा पॅन वापरून बेनामी व्यवहार केले जाऊ शकतात हे तर उघडच आहे, नक्की कोणता बेनामी व्यावहार होऊ शकतो ? फारच इंटरेस्टींग माहिती आहे ही, जरा तपशिलात कळवाल का ? ५) लोकांच्या २६AS बद्दल तक्रारी आहेत. सगळ्या तक्रारी टॅक्स क्रेडीट न मिळाल्यामुळे होतात. फुकटचं टॅक्स क्रेडीट मिळाल्यावर तक्रार कशाला होईल? ओके. आता पुढे ?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

नव्या मुंबईतील भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी शोधून काढलेली एक शक्कल. निश्चलनीकरणामुळे उद्योग धंद्यांनी बँकेतून पैसे काढता येत नाहीत म्हणून कानावर हात ठेवले. यावर या अधिकाऱ्यांनी तिवारी म्हणून माणसाच्या नावाने चेक द्या म्हणून चेक घेतले. कोणा तरी दुसऱ्याच तिवारी म्हणून माणसाचा पॅन आणि आधार कार्डची फोटोकॉपी वापरून एका तिवारी नावाच्या माणसाने नव्या मुंबईत सहकारी बँकेत खाते उघडले. त्या खात्यात या भ्रष्ट लोकांनी तेथील उद्योगधंद्याकडून आपले घेतलेले भ्रष्टाचाराच्या पैशाचे चेक भरले.नंतर निर्बंध उठवल्यावर ते पैसे रोखीने त्या खात्यातून मग काढून घेतले आणि ते खाते आता बंदहि केले. सहकारी बँकेचा एकंदर कारभार ढिसाळ असतो त्यामुळे या खात्याच्या सत्यासत्यतेची चौकशी होईस्तोवर वेळ जातो. त्यातून जुन्या नोटा ते घेत नसल्याने आयकर खात्याचे या काळात त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. नंतर एवढे पैसे भरले गेले म्हणून आयकर अधिकाऱ्यांनी चौकशी केले असताना कोणतरी गरीब भाजी विकणारा भय्या ज्याने मोबाईलच्या सिम कार्डासाठी दिलेले पॅन आणि आधार कार्डाचे झेरॉक्सचा असा गैरवापर केलेला आढळला. आता हा प्रकार अफरातफर म्हणून आहे आणि आयकर खाते आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. सरकारी अधिकारी कानावर हात ठेवत आहेत आणि "दुसरा" तिवारी गायब आहे. तेंव्हा आपल्या पॅन किंवा आधार कार्डाचा गैरवापर होणारच नाही असे म्हणणे हे चुकीचे आणि अज्ञानजन्य आहे. आणि प्रत्येक वेळेस झेरॉक्स देताना ती कशासाठी देत आहोत हे सही शेजारी लिहिणे हे सुरक्षितते चाय दृष्टीने आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

आयकर अधिकारीच फ्रॉड करायला लागले तर कोणताच पॅन सुरक्षित नाही मग भले झेरॉक्सवर तुम्ही काहीही लिहून द्या.

मला हे झेरॉक्सवर लिहून द्यायचं प्रकर्ण नीटसं कळलं नाही. फोटोशॉप आणि तत्सम गोष्टी वापरून त्या लिहून द्यायचा नामोनिशाण मिटवता येईल, किंवा त्यावरची सही तशीच ठेवून 'ज्यासाठी दिलंय ते कारण' बदलता येईल. त्याने सिक्युरिटी कशी येणार? की हा आपला 'दिल बेहलाने के लिये' टैपचा उपाय आहे?

In reply to by आदूबाळ

१) झेरॉक्समधे फोटो आणि सहीवर अ‍ॅक्रॉस लिहून दिलं की ते मिटवणं औघड ! २) ती झेरॉक्स इतर ठिकाणी वापरणंही औघड.