✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

१०० नंबरी प्रेम

अ — अॅस्ट्रोनाट विनय, Tue, 02/14/2017 - 10:47
--------------------------------------------- बायकांच्या बडबडीने जेव्हा इच अँड एव्हरीजण कंटाळला 'रोज शंभरच शब्द बोलायचे' सरकारने नियम काढला मला फारसा त्रास नव्हता नेहमीच मी कमी बोलायचो गप्पा,भांडण,उपदेश मोजक्या शब्दांत मांडायचो नियम लागू व्हायच्या थोडं आधी मला भलताच नाद लागला एका गोग्गोड बडबड्या पोरीवर नकळंत जीव जडला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिला प्रपोज करायचं ठरवलं शंभर शब्द काय बोलायचे गणित मांडायला घेतलं "हॅपी व्हॅलेंटाईन डे" ऐवजी "हॅपी व्हॅलेंटाईन" पण चालून जाईल "माझं तुझ्यावर प्रेम आहे" पेक्षा "आय लव्ह यू" त कमी शब्दहानी होईल "तुझं हसणं, रुसणं, सत्तत बडबडणं मला आवडतं" सात शब्द...अजून हवी थोडी हमी "तुझं हसणं, रुसणं, सत्तत बडबडणं, गालावरची खळी, तिळ मला आवडतात" दहा शब्द...अजून काही आहे कमी मला आवडतात ऐवजी मला खुप आवडतात? दॅट्स परफेक्ट कायकाय बोलायचं तिच्याशी व्यवस्थित डोक्यात उतरवलं शंभर शब्द राखून ठेवायचे मी मनोमन ठरवलं चहा पोहे त्यादिवशी मी इशाऱ्यानेच मागितले रिचार्जवाल्याला पॅक्सचे आकडे कागदावर लिहून सांगितले रुमवर येतांना माझा बडबड्या मित्र दिसला दुसरीकडे नजर वळवून मी पटकन रस्ता बदलला दोन शब्द वाचवायला आज मी "हाड हाड" नाही केलं कुत्रंसुद्धा भुंकणं विसरून आश्चर्यचकित झालं रूममध्ये घुसणार तेवढ्यात शेजारची राणी समोर आली क्लिपआडून हसंत मला आय लव्ह यू म्हणाली उद्या सांगतो बोलून मी पटकन तिला कटवलं उरलेल्या ९८ शब्दांचं गणित मनामधे जुळवलं आत येऊन रामदेव बाबा स्टाईल लंबा श्वास ओढला प्रेमयुद्ध खेळायला मोबाईल बाहेर काढला तिने कॉल उचलताच मी टोपलंभर माती खाल्ली माहोल बनण्याआधीच जीभ डायरेक्ट आय लव्ह यू बोलली थोडावेळ शांतता पसरली थोडावेळ धडधड वाढली न्यूटनच्या तिसऱ्या नियमाला स्मरून ती त्याच फोर्सने "मी टू" बोलली मनात हजारो शब्दांचा पाऊस पडला अन शेकडो मोर नाचले "आय कान्ट बिलिव्ह धिस पुन्हा बोल न एकदा" मी आठ शब्द उडवले तिकडून मात्र काहीच उत्तर नाही आलं शंभर शब्द संपलेत तिचे मी लगेच जाणलं त्यानंतर एकोणतीस वेळा मीच आय लव्ह यू म्हटलं शांततेच्या कोलाहलात आमचं शंभर नंबरी प्रेम उमललं ----------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
4025 वाचन

💬 प्रतिसाद (14)

कॅलक्युलेटेड लव्ह...

संजय पाटिल
Tue, 02/14/2017 - 11:37 नवीन
कॅलक्युलेटेड लव्ह...
  • Log in or register to post comments

खत्तर्नाक!

चांदणे संदीप
Tue, 02/14/2017 - 11:50 नवीन
कॅलक्युलेटेड लव्ह... +२ कविता आवडली! Sandy
  • Log in or register to post comments

जमलंय बडबड गीत !

संजय क्षीरसागर
Tue, 02/14/2017 - 11:51 नवीन
.
  • Log in or register to post comments

:)

पैसा
Tue, 02/14/2017 - 12:00 नवीन
:)
  • Log in or register to post comments

100नंबरी प्रेम

dhananjay.khadilkar
Tue, 02/14/2017 - 17:08 नवीन
फार छIन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कविता आवडल्याबद्दल सर्वांचा

अॅस्ट्रोनाट विनय
Tue, 02/14/2017 - 18:05 नवीन
कविता आवडल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे
  • Log in or register to post comments

हजार नंबरी !!!! =))

जव्हेरगंज
Tue, 02/14/2017 - 18:37 नवीन
हजार नंबरी !!!! =))
  • Log in or register to post comments

फर्मास !!!!

प्रसाद_कुलकर्णी
Tue, 02/14/2017 - 18:40 नवीन
च्या मारी... काय तुफान कल्पना.. काय तुफान प्रेम.. बेत एकदम फर्मास जमलाय.. लगे रहो उस्ताद !!!!
  • Log in or register to post comments

हेहेहे! छानेय.

एस
Tue, 02/14/2017 - 18:59 नवीन
हेहेहे! छानेय.
  • Log in or register to post comments

:)

अॅस्ट्रोनाट विनय
Tue, 02/14/2017 - 23:16 नवीन
धन्यवाद हत्तीभाऊ, प्रसाद,एस
  • Log in or register to post comments

मस्त कविता...

पुंबा
Wed, 02/15/2017 - 09:50 नवीन
मस्त कविता...
  • Log in or register to post comments

मस्तच.

पद्मावति
Wed, 02/15/2017 - 21:14 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

हे ही भारीच आहे.

सतिश गावडे
Wed, 02/15/2017 - 21:31 नवीन
हे ही भारीच आहे. अक्षरांच्या मर्यादेवरून मागे एकदा मिपावरील समूह व्यनिमधील सदस्य नामांच्या अक्षराच्या मर्यादेमुळे बरेच जणांनी आपले आयडी छोटे केले होते ते आठवलं.
  • Log in or register to post comments

अक्षरांच्या मर्यादेवरून मागे

अॅस्ट्रोनाट विनय
Wed, 02/15/2017 - 22:22 नवीन
अक्षरांच्या मर्यादेवरून मागे एकदा मिपावरील समूह व्यनिमधील सदस्य नामांच्या अक्षराच्या मर्यादेमुळे बरेच जणांनी आपले आयडी छोटे केले होते ते आठवलं. >> हायला हे माहितच नव्हतं
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा