Skip to main content

आकर्षणाचे नियम

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 10/10/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
Law of attraction अर्थात आकर्षणाचा नियम याविषयावरचा whatsapp समुह सुरु करत आहोत. आकर्षणाचा नियम याबद्दल बर्याच जणांनी वाचलं असेल,"सिक्रेट" हे पुस्तक तसेच याच विषयावरचा चित्रपटही पाहिला असेल. तुम्ही सतत जो विचार कराल तसेच परिणाम तुम्हाला मिळतील.ही या नियमाची सुरुवात;पण फक्त सकारात्मक विचार करुन हवं तसं घडेल का? मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करता येईल? ते सकारात्मक विचार फलद्रुप होण्यासाठी आणखी काय काय करावं लागतं? त्यासंबंधी चर्चा ,माहितीची देवाणघेवाण यासाठीच आहे हा समुह. हा आकर्षणाचा नियम आहे तरी काय? तो कसा वापरायचा? वापरताना होणार्या चुका कोणत्या? तो केव्हा कशाप्रकारे अस्तित्वात येतो? काय तर्क आहे या आकर्षणाच्या नियमामागे? प्रभावीपणे वापरता येण्यासाठी काय करता येईल? याबाबत इथे बोलता येईल. काहीजणांची या विषयात बर्यापैकी प्रगतीही झाली असेल.आकर्षणाचा नियम हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भागही झाला असेल.अशा जाणकारांशी इथे चर्चा करता येईल.त्यांनी केलेले उपाय,केलेले प्रयोग याबाबत बोलता येईल.अनुभव सांगता येतील. त्याशिवाय 'आकर्षणाचा नियम' या विषयावरचे या विषयाशी संबंधित असे लेख,पुस्तके,व्याख्याने,शिबीरे यांचीही माहिती देता येईल. मनातल्या इच्छेपासून ते परिणामांपर्यंतचा प्रवास यशस्वी कसा करता येईल यासंबंधीचा संवाद इथे व्हावा;अशी अपेक्षा आहे.Law of attraction खरा की खोटा याची चर्चा इथे करता येणार नाही. मिपावर Law of attraction या विषयावर या आधी धागे निघाले आहेत.पण मूळ विषय सोडून ट्रोलिंगच जास्त झालं. समुहात सामील होण्यासाठी इच्छुकांनी 'आकर्षणाचे नियमसाठी' असा व्यनि करुन सोबत आपला WhatsApp क्रमांकही द्यावा. विश्वास ही Law of attraction ची सुरुवात आहे. जसा विश्वास तसं प्रत्यंतर.विश्वास ठेवून सकारात्मक कृती केली की हवी ती माणसं आपोआप भेटतात,हव्या त्या घटना आपोआप घडायला सुरुवात होते. उद्याचा दसरा हा सीमोल्लंघनाचा दिवस.नकारात्मक विचारांना उल्लंघून सकारात्मक विचारउर्जेच्या क्षेत्रात प्रवेशासाठी हे आवाहन. सर्वांना उद्याच्या दसर्याच्या शुभेच्छा.

वाचने 21538
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

मिपाने आता रॉयल्टी घ्यायला सुरुवात करावी!चाललंय काय? दर 15 दिवसांनी कोणत्या ना कोणत्या कायप्पा ग्रुपची जाहिरात दिसतेय!

In reply to by यशोधरा

यशोतै धागाच काढावा म्हणतोय मी आमच्या कडे सर्व प्रकारच्या कायप्पा गटांची जाहिरात करून मिळेल, नवीन सदस्य मिळतील ..

In reply to by महासंग्राम

भागीदारीत काढू! अवांतर: बाकी सगळी मजा राहूदेत बाजूला, कायप्पा ग्रूप काढून जी काय उत्तम चर्चा/ उपाय वगैरे सुचवले जातील ते इथेच लिहा. उत्तम चर्चेत खीळ घालू नये हे मिपाकरांना उत्तमरीत्या समजते आणि कोणी प्रयत्न केलाच तरी मिपाकरच अशा आयडीला गप्प बसवतात, हा अनुभव आहे. इथेच यायचं, इथेच अलाणाफलाण्या ग्रूपची जाहिरात करायची आणि त्यातच इथे ट्रोलिंग होतं वगैरे म्हणायचं, अरे काये!

In reply to by सूड

सहमत म्हणजे काय होईल ती माहिती सर्वानाच समजेल... तसंही संतांनी म्हंटलंच आहे जे जे आपण वाचावे, ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे, सकळ जन हे ग्रुप करणं म्हणजे १६ व्य शतकात इल्युमिनाटी, मेसन वगैरे नावाचे पंथ होते जे गुप्त रीतीने ज्ञान प्राप्त करून जतन करून ठेवायचे त्यातला प्रकार वाटतो.

In reply to by सूड

मिपाची ताकद ही खुप मोठी आहे.लाखो करोडो लोक इथे येऊन लिहू वाचू शकतात.त्यामुळे मिपा हे मिपाच राहील.WhatsApp शी त्याची तुलना योग्य नाही. Law of attraction संबंधी निघालेल्या मिपावरच्याच धाग्याला ट्रोलिंग बघा.म्हणजे WhatsApp group का काढावा लागतोय ते कळेल.

In reply to by उपयोजक

बंधी निघालेल्या मिपावरच्याच धाग्याला ट्रोलिंग बघा एक आदा-पादा ग्रुपपण काढा आता ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan

In reply to by उपयोजक

मिपाची ताकद ही खुप मोठी आहे.लाखो करोडो लोक इथे येऊन लिहू वाचू शकतात
मग त्याच लाखो करोडो लोकांचा पण फायदा होईल कि इथेच धागा काढला तर.

In reply to by उपयोजक

मिपाची तुलना करत नाहीये. उलट मिपाचा असा केवळ जाहिरातीसाठी वापर करु नका, अशी विनंती आहे. व्यवस्थित, मुद्देसूद लिहिलंत तर काही होत नाही ट्रोलिंग.

सूड - यांच्याशी सहमत. मिपा हे एक प्रभवी साधन लेखना करीता उपलब्ध असतना बाकी कुठल्या मध्यमाचा वापर का करावा?, ग्रुप केला की तो सिमित होइल. त्याचा व्यापक अशी संख्या असलेले मिपाचे वाचक आणि लाभक (मिपाच्या चर्चेचा बर्याच जणांना लाभ होतो) यांना तितका उपयोग होणार नाही.

In reply to by नाखु

इतर धोबीघाटांवर असले धागे घाटावर मारत असतील.

मंदारजी आपल्या मताशी सहमत.तिकडची चांगली माहिती इथेही देता येईल.सुचना चांगली आहे.पण या धाग्यावर http://www.misalpav.com/node/34883 बघा की काय झालंय ते!आपल्याला पटणारे विषयच मिपावर यावेत अशी काहिजणांची धारणा आहे. असं जर होत असेल तर काय करणार? शिवाय मूळ विषय सोडून भलतीकडेच नेलं जातं.

In reply to by उपयोजक

केअशु धागा पहिला तिथे २-३ उपहासात्मक प्रतिसाद सोडले तर बऱ्यापैकी गंभीर चर्चा झाली असल्याचे जाणवते. आणि आपण लिहितो तर थोड्या प्रमाणात ट्रोलिंग ( मराठी शब्द नाही माहित) होण्याची पण तयारी असावी असे मला वाटते.
काय झालंय ते!आपल्याला पटणारे विषयच मिपावर यावेत अशी काहि जणांची धारणा आहे.
माफ करा हा गैरसमज सर्वप्रथम आपण हि विनंती. मिपा सुरवातीपासूनच विषय वैविध्यतेसाठी जाणले जाते. इथे भरपूर इतिहास, संस्कृती, राजकारण, कला, साहित्य इ विषयांवर सकस लिखाण झाल्याचे उदाहरणे देता येतील. जयंत काकांचा कोणताही लेख घ्या अगदी मुद्देसूदपणे लिहिला असतो, आणि याच कारणाने त्यावरचे प्रतिसाद पण अगदी संतुलित असतात. मी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर उत्तम आणि सुदृढ चर्चा झाल्याची उदाहरणे देतो ती आपल्याला पटतील अशी आशा आहे. मराठा लाईट इनफंट्री राजाराम सीताराम. East India Company ब्रायन क्लोज - द मॅन ऑफ स्टील! प्रचेतस मोसाद - भाग १३ अकादमी

अहो WhatsApp ही मिपाची replacement नव्हे! मिपा आणि WhatsApp या वेगळ्या गोष्टी आहेत.मघाशीच सांगितलं की मिपाची ताकद मोठी आहे.तसंच मिपाला काही तांत्रिक मर्यादाही आहेत.तशाच WhatsApp ला सुध्दा तांत्रिक मर्यादा आहेत.दोघांची तुलना करु नका. whatsapp वर video upload करता येतात. मिपावर येतात का करता? आणि ही जाहिरात नाही.हे केवळ आवाहन आहे.झालीच तर मदत व्हावी हा उद्देश आहे. अगदी आजसुध्दा आंतरजालावर मराठीतून माहिती शोधताना मिपाचेच बरेचसे रिझल्टस दिसतात.एवढी मिपाची ताकद आहे. मी स्वत:सुध्दा एवढी माहिती देणारं हे संकेतस्थळ आहे तरी काय या उत्सुकतेनेच आलो.चार वर्षांपासून मिपाचा वाचक आहे.मग WhatsApp ग्रुपचं नुसतं आवाहन केल्यावर एवढा गदारोळ का? एवढंच काय दुसर्या एखाद्या WhatsApp group वर तुम्ही असाल आणि admin ला नम्रपणे विनंती केली की तर तो आपल्या समुहावर दुसर्या समुहाची आवाहन करणारी पोस्ट टाकू देतो.तिथे जर विरोध होत नाही तर इथे का? आणि WhatsApp मुळे मिपाचा लेखक,वाचक कमी होईल ही भिती मनातून काढून टाका. असाच विरोध होत असल्याने मिपा दुसर्या क्रमांकावर गेलं असावं का?असं आता वाटू लागलंय.ते पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी नावडत्या विषयाला ट्रोलिंग करणं थांबलं पाहिजे. मिपाची तांत्रिक बाजू सुधारली,विषय समजून न घेता होणारं ट्रोलिंग बंद झालं तर मिपावरही हे विषय सुरु करायला कोणाचीच हरकत असणार नाही.

In reply to by उपयोजक

दुसर्‍याच काय विसाव्या क्रमांकावर गेलं तरी चालेल. इथे उत्तम लिखाणही होतं आणि ते वाचायला आणि खफ गप्पा करायला यायचे ते येतीलच. नुसत्या कायप्पाच्या जाहिरातींच्या धाग्याने पहिल्या क्रमांकावार आलेल्या मिपावर येण्यापेक्षा विसाव्या क्रमांकावरच्या मिपावरील उत्तम लिखाण वाचायला यायला अधिक बरं वाटेल. अवांतरः मिपा प्रथम क्रमांकावर यावे असे लेखन मिपावर करण्यामध्ये/ असे कोणी लिहित असेल तर त्यांना मिपाचा रस्ता दाखवण्यामध्ये/ चांगल्या लिखाणाला प्रतिसाद देऊन दाद देण्यामध्ये आपण कितीसा सहभाग नोंदवला आहे? उत्सुकता म्हणून हा प्रश्न विचारत आहे.

In reply to by यशोधरा

चांगल्या लिखाणाला प्रतिसाद देऊन दाद देण्यामध्ये आपण कितीसा सहभाग नोंदवला आहे?
हा प्रश्न मिपाविषयी कोकलणार्‍या/फुकाचे उमाळे आणणार्‍या बर्‍याच जणांना विचारता येईल.

In reply to by यशोधरा

मराठीतून आंतरजालावर माहिती शोधणार्यांना मिपा हमखास आढळतंच. पण मिपावरचे माहितीपूर्ण संदर्भाने भरलेले लेख वाचून आपल्याला ते जमेल की नाही याची भिती मिपा नवीन असणार्या बर्याच जणांना वाटते.त्यामुळे जी काही चांगली माहिती मिळतेय ती वाचून गप बसतात असे लोक. नवीन लेखक पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने निराश होतात.काहीजण लिहिण्याच्तया बाबतीत चक्क आळशी असतात. हे मराठीतून माहिती शोधणार्यांबद्दल. बरेचसे असेही मराठी लोक आहेत;ज्यांना मिपा काय आहे हेच माहिती नाही.मिपाची कुठे जाहिरातही नाही. शिवाय मिपावर लेख कसा प्रकाशित करायचा? मराठीतून कसं लिहायचं हे बाजूलाच देऊनही काहीजणांना ते जमत नाही.यासाठी स्टेप बाय स्टेप समजावणारा धागाही कुणीतरी उघडा. मिपावर फोटो कसे द्यायचे याचेच धागे बर्याचदा का काढावे लागतात? काही वेळा मिपा मध्येच बंद पडतं. मिपा हा विना जाहिरात चालणारा स्तुत्य उपक्रम आहे.त्यामुळेच तांत्रिक मर्यादाही आहेत.हे का नाही समजून घेत? मिपाचा उल्लेख बर्याचदा WhatsApp group वर होतो त्यावेळी हे सदस्य मिपा काय आहे असं विचारतात.त्यावेळी आवर्जून माहिती देतो.सदस्य होण्याबद्दल सुचवतो.मिपासारख्या माहितीच्या महासागराची माहिती द्यायला नेहमीच तयार असतो. WhatsApp group काढला म्हणजे हमखास मिपाचा विरोधक असा का समज करुन घेताय? तसाच चांगला विषय असेल तर मिपावर लिहूच की. आता मिपा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी काय काय केलंत ते माझ्या उत्सुकतेपोटी तुम्हीही सांगा.

In reply to by उपयोजक

WhatsApp group काढला म्हणजे हमखास मिपाचा विरोधक असा का समज करुन घेताय?
हे विरोधक वैगरे तुम्हीच लिहीताय बरं का!! आम्ही, पक्षी मी इतकंच म्हटलंय की जे काही व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप उघडून ज्ञानदान करणार आहात ते इथे करा. म्हणजे आम्हालाही ज्ञानाचे कण वेचता येतील. अनोळखी माणसाला एखाद्या व्यक्तीने आपला संपर्क क्रमांक का म्हणून द्यावा?

In reply to by सूड

पेपरात कशा छोट्या झैरातींचे क्लासिफाइड पेज असते तसा अशा ग्रुपिपासू लोकांसाठी एक पेड धागा काढा म्हणले होते. ;) तिथे खाली व्यवस्थापनाचा मजकुराशी संबंध नाहि, व्यवहार स्वतःच्या जबाबदारीवर करावे अशी टिप पण देता येईल. गरज आहे ते बघतील अन नंबर देतील. बादवे... विनाकारण फुल्ल मापं काढणार्‍यांचा ग्रुप करायचाय. हाय का कोण? ;)

In reply to by अभ्या..

बादवे... विनाकारण फुल्ल मापं काढणार्‍यांचा ग्रुप करायचाय. हाय का कोण? ;)
आता तू ग्रुप काढणार म्हंजे हळदच.. ;)

In reply to by नीलमोहर

लावला बुक्का? हे असं असतंय. नेमका शब्द अन त्याचा उपयोग माहीत नसला की अशा उपमा सुचतेत. :( निमोबाई अभ्यास वाढवा.

In reply to by अभ्या..

ते म्हटले तुम्ही ग्रुप काढणार म्हणजे हळद, हळद खेळणे हा प्रकार अर्थातच माहिती आहे, आमचा अ भ्या स पक्का आहे त्यामुळे लाल रंग तुमची खास निशाणी आहे हेही माहित आहे, म्हणून तो ऍड करुन हळदकुंकू कॉम्बो करून टाकला, शब्द अन त्याचे उपयोग बरोबर विच्चार करून करतो हो आम्ही, इथे आल्यापासून जास्तच :)

In reply to by उपयोजक

एवढंच काय दुसर्या एखाद्या WhatsApp group वर तुम्ही असाल आणि admin ला नम्रपणे विनंती केली की तर तो आपल्या समुहावर दुसर्या समुहाची आवाहन करणारी पोस्ट टाकू देतो.तिथे जर विरोध होत नाही तर इथे का?
तुम्हीच वरती दिलय कि मिपा आणि WhatsApp या वेगळ्या गोष्टी आहेत राहता राहिला ट्रोलिंग चा प्रश्न तर पुन्हा एकदा सांगू इच्छितो कि २-३ प्रतिसादांचच्या ट्रोलिंग बद्दल एवढी भीती का ??? सरळ दुर्लक्ष करायचं आणि खरोखरी तुम्हला ट्रोलिंग पहायचं असेल तर गंगाधर मुटे यांचे धागे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल होते आणि याला जबाबदार कोण असतं.

In reply to by सतिश गावडे

तुमच्या सोयीसाठी तुम्ही वस्तूच्या जागी हवं ते घाला ;) अश्लिल अश्लिल ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan

In reply to by सतिश गावडे

हँ... हँ... हॅ... इथं मंत्र पुटपुटला कि तिकडं पाखरु जीव फडफडला ! ;) अशा खास गुप्त मंत्रासाठी संपर्क करा... बामा मिया आल्लाउद्दिन वल सुलतान वल कामुद्दिन पता :- अहमदाबाद स्टेशन के पिछे, बुलेट ट्रेन प्लॅटफॉर्म १ के पहिले छोर से सिधा रस्ता... १०० % गारंटी ! पाखरु न फसने पर पैसा वापस, मेरे मंत्र का तोड / जोड हो नही सकता इसकी पर्सनल गारंटी. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan

सामील होऊ इच्छिणार्या सर्वांचे आभार.उद्यापासून उपक्रमाच्या कार्यास सुरुवात करु.

व्हाटस अ‍ॅप ग्रुप ही वेगळी चूल नाही आहे. हे एक वेगळे माध्यम आहे. मराठीच्या हितासाठी जितकी काही माध्यमे येतील ती सर्व वापरली गेली पाहिजे आणि आत्मसातही केली गेली पाहिजे. आता मिपावर चर्चा करण्यात काय हरकत आहे हा मुद्दा. तशी चर्चा होऊही शकते. परन्तु व्हाटस अ‍ॅपला त्या विषयातच रस असणारे लोक असतील. मिपावर आला तर विषय आला आणि त्याला तत्कालिक प्रतिक्रिया देण्यायच सर्वसाधारणपणे लोकांना रस असतो किंवा इतकी विषये येत असतात ती पूर्णपणे वाचूनही होत नाही. अजून एक मूद्दा, स्मार्टफोनावर व्हाटस अ‍ॅप असतो तर मिपा हे डेस्कटॉप वर वाचण्यातच मजा असते. कधीही जूने संदर्भ शोधता येतात. असो. सध्यातरी शुभेच्छा देऊ या.

In reply to by कलंत्री

द्वारकानाथजींशी सहमत आहे.

मिपाचा आय्डी कधी मिळणार याची वाट पहात ह्तो. आकर्षण ग्रुप जॉइन केल्यावर लगेच अयडी मिळाला.

In reply to by टवाळ कार्टा

डूआयडी कसे काय ओळखू येतात, म्हणजे बिफोर, आफ्टर कसं काय कळतं म्हणे,

In reply to by नीलमोहर

त्याना स्वप्नात दृष्टांत मिळतो

In reply to by chitraa

खिक्क...

मिपावर Law of attraction या विषयावर या आधी धागे निघाले आहेत.पण मूळ विषय सोडून ट्रोलिंगच जास्त झालं. ^^^ बाकी सगळं ठीक पण प्रत्येक whatsapp समूहाच्या जाहिरातीसाठी मिपाचे subvertising कशासाठी?

समुहाच्या नावात आणि विषयात काही बदल करण्यात आले आहेत.ते कोणते? आणि नावात बदल करावा लागण्याची कारणे समुहात स्पष्ट केली आहेत. नवीन सदस्यांना याबाबतचा खुलासा समुहावर केला जाईल.