Skip to main content

क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?

लेखक ट्रेड मार्क यांनी गुरुवार, 19/01/2017 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे. सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते. तर खूप वर्षे भारतात नोकरी केल्यावर आमच्या कंपनीने एकदाचे आम्हाला अमेरिकावारी घडवून आणण्याचे ठरवले. नियमाप्रमाणे सुरुवातीच्या खर्चासाठी $३००० हे ऍडव्हान्स म्हणून देतात, त्यातील $२८०० हे HDFC च्या प्री लोडेड डेबिट कार्डवर तर $२०० रोख अश्या स्वरूपात मिळतात. मला $२०० हे $१०० च्या २ नोटा अश्या स्वरूपात मिळाले. तेव्हा अमेरिकेची काहीच माहिती नसल्याने एवढा विचार केला नाही आणि $१०० च्या २ नोटा आणि बरोबर स्वतः घेतलेले थोडे डॉलर्स घेऊन न्यू यॉर्क मध्ये पाऊल ठेवले. जवळचे सुट्टे डॉलर्स तर लगेच संपून गेले आणि $१०० च्या २ नोटा व डेबिट कार्ड वरचे $२८०० उरले. बहुतेक सर्व दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे बोर्ड्स लावलेले असतात. आता आली का पंचाईत, पक्का भारतीय असल्याने कॅशने खर्च करण्याची सवय आड येत होती आणि वर HDFC डेबिट कार्ड असल्याने काही ठिकाणी स्वीकारले जायचे तर काही ठिकाणी प्रॉब्लेम यायचे. दुकानदारांना HDFC म्हणजे काय हे माहित नसल्याने त्यांचीही काही मदत होऊ शकत नव्हती. शेवटी बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडताना त्यात सुरुवातीची रक्कम म्हणून भरून सुटका करून घेतली. मग BOA च्या डेबिट कार्डवरून ATM मधून $२० च्या नोटा मिळू लागल्या. तर, अमेरिकन बँकेचे डेबिट कार्ड मिळवून एक अडथळा पार झाला. पण माझे मित्र म्हणत होते की क्रेडिट कार्ड काढणे महत्वाचे आहे कारण त्यातून क्रेडिट हिस्टरी तयार होते व ते पुढे बरेच फायदेशीर पडते. हे काही माझ्या डोक्यात शिरत नव्हते की एक तर क्रेडिट हिस्टरी का बनवायची आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे? मी माझी सगळी बिलं, म्हणजे विजेचं; पाण्याचं; फोनचं बिल, व्यवस्थित भरलं की झालं. पण तसं नाही, क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं कर्ज आहे आणि तुमची पत तयार करायची असेल तर हे कर्ज घेऊन ते सलग वेळच्या वेळी फेडले पाहिजे. तरी पण विचार होता की क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे, उगाच कर्ज काढून नसतं लचांड मागे लावून घ्यायचं. पण मग एकदा गाडी भाड्याने घेताना लक्षात आलं की क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. डेबिट कार्डवर मिळत नाहीच असं नाही पण कमी रेंटल कंपन्या डेबिट कार्ड स्वीकारतात. मग आता क्रेडिट कार्ड मिळवणे आले. पण ते एवढे सोपे नाही. बँक ऑफ अमेरीकेने क्रेडिट कार्ड द्यायचे नाकारले म्हणून मग इथे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड म्हणून मिळते ते घ्यायचे ठरवले. हे थोडक्यात असे असते की तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम म्हणजे उदा. $१००० ठेवायची आणि त्याबदल्यात बँक तुम्हाला $१००० चे क्रेडिट कार्ड देणार, वर $४० वार्षिक फी पण घेणार. मी $१००० दिले व कार्डसाठी अर्ज दिला. पण इथेही नशीब असं की तो अर्ज पण रिजेक्ट झाला. इथे माझ्या नंतर आलेल्यांना महिन्याभरात क्रेडिट कार्ड्स मिळत होती आणि तब्बल १ वर्ष अकाउंट असूनही मला मात्र मिळत नव्हते. अखेरीस दीड वर्षांनी एकदाचे बँक ऑफ अमेरिकेने कृपा केली आणि मला एक क्रेडिट कार्ड दिले. मग त्याचे बिल मी अगदी नित्यनेमाने भरले. होताहोता क्रेडिट स्कोअर वाढू लागला. मग हळू हळू कार्डच्या ऑफर यायला लागल्या. त्यात पहिली मिळालेली म्हणजे तुम्ही त्या कार्डवर, तुमच्या लिमिटच्या आत, कितीही खर्च करा पण जर का बिल वेळेवर भरलं तर प्रत्येक तिमाहीला $२५ कार्डवर क्रेडिट देणार. मग काय घेऊन टाकलं. थोड्या दिवसांनी अजून एका कार्डावर काहीतरी ऑफर मिळाली असं करता करता कार्ड्स जमा होऊ लागली. पण मग त्यांचे बिल वेळेवर भरणे ही एक डोकेदुखी होऊ लागली. जर का एक जरी दिवस उशीर झाला तरी भरभक्कम लेट फी आणि व्याज भरायला लागणार. पण मग ऑटो पे नावाची एक सुविधा कामी आली. मग कार्ड्स वरच्या जमा झालेल्या पॉइंट्सने एखादी वस्तू घेता यायला लागली. उदाहरणार्थ एक कार्डच्या पॉईंट्स वरून मला एकही पैसे न देता $८० चे ब्लूटूथ हेडसेट्स घेता आले. पण हे किरकोळ ठरेल असे दोन फायदे अजून दोन कार्डने मिळाले. एका कार्डची ऑफर आली की कार्ड मिळाल्यावर पहिल्या ३ महिन्यात $३००० खर्च केले तर ५०००० पॉईंट्स मिळणार. या कार्डची वार्षिक फी $९५ होती जी पाहिलं वर्ष माफ असणार. म्हणून घेतलं कार्ड, पण $३००० खर्च करायचे? मग एक आयडिया काढली. तसंही घराचं भाडं भरायला लागतंच ते कार्ड वर भरूया. पण जर कम्युनिटीच्या (सोसायटी) च्या वेबसाईट वरून $३५ फी लागत होती. मग अजून शोध घेतला तर rent.कॉम नावाच्या एका साईटवर $२० चार्जेस होते. पण म्हणजे $६० खर्च करायचे? अजून एक आयडिया काढली की ३ महिन्याचं भाडं एकदम भरायचं मग त्याला पण $२० चार्जेस पडणार. पण मग $३००० ची एकदम सोय करायची? तर नाही, जर का नीट बघितलं तर पहिल्या महिन्याच्या शेवटी भाडं भरायला लागलं आणि ते भरायला जवळपास ५० दिवसाचा अवधी मिळाला. म्हणजे उलट मला $१००० ते $२००० वापरायला मिळाले. आता या ५०००० पॉईंट्स चा काय फायदा होऊ शकतो? ५०००० पॉईंट्स म्हणजे ५०० डॉलर्स, एक मार्ग म्हणजे हे पॉईंट्स वापरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. पण मी दुसरा मार्ग निवडला. हे पॉईंट्स युनाइटेड एरलाईन्सला ट्रान्सफर करायची सुविधा होती. आणि ४२५०० पॉईंट्स वापरून पुणे ते अमेरिका वन वे तिकिट काढता येते, ज्याची तशी किंमत जवळपास ९००-१००० डॉलर्स असते. मला माझ्या वडिलांचे एका बाजूचे तिकीट या पॉईंट्सवर निघाले. पण आता परतीची पण सोय बघणे आवश्यक होते. पण ते वर्षभर थांबणार असल्याने वेळ होता. या कार्डला एक वर्ष पूर्ण होताच ते बंद करून टाकलं आणि अजून एक ऑफर घेतली ज्यात पहिल्या ३ महिन्यात $२००० खर्च केले की ४०००० पॉईंट्स आणि एक कार्ड वापरणारी व्यक्ती ऍड केली की १०००० पॉईंट्स असे ५०००० पॉईंट्स मिळणार होते. माझ्या कॅनडा ट्रीपचं बुकिंग मी या २००० डॉलर मध्ये केलं आणि टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे वडिलांचं परतीचं तिकीटसुद्धा ४२५०० पॉईंट्स च्या बदल्यात अमेरिका ते पुणे मिळालं. म्हणजे माझे जवळपास १५००-१७०० डॉलर्स वाचले. पुढे दुसऱ्या एका कार्डवर एक ऑफर आली की ३ महिन्यात २००० डॉलर्स खर्च करायचे, यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचा फोन सगळे पैसे देऊन घेऊ शकता. आणि मग त्यातले ६५० डॉलर्स तुम्हाला परत मिळणार. म्हणजे मला ८०० डॉलर्सचा फोन फक्य २५० डॉलर्स ला पडला (बाकीचे खर्च मिळून). तर मंडळी, क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? मी म्हणीन जर तुम्ही कार्डचं बिल वेळच्यावेळी पूर्णपणे भरू शकत असाल तर नक्कीच फायदेशीर आहे. पण मग ट्रान्झॅक्शन चार्जेसचं काय? अमेरिकेत तरी बहुतेक कुठल्याही दुकानात, पेट्रोल पंपावर चार्जेस लागत नाहीत. अर्थात अमेरिकेतली काही भारतीय दुकानं अपवाद आहेत, ज्यात $१० च्या आतल्या बिलासाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर ५० पैसे जादा द्यावे लागतात. पण त्याव्यतिरिक्त मला कुठे चार्जेस लागले नाहीत. उलट एक विशिष्ट सोय असलेलं कार्ड असेल तर दुसऱ्या देशात केलेल्या ट्रान्झॅक्शनवर पण Foreign Transaction चार्जेस लागत नाहीत. अजून सांगायचे फायदे म्हणजे काही कार्ड्स अशी सुविधा देतात की रेंटल कार घेताना जर का ते कार्ड वापरलं तर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागत नाही. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी आणि त्याचा इन्शुरन्स असेल तर तो रेंटल कारला पण वापरता येतो. पण जर नसेल तर मात्र रेंटल कंपनीकडून इन्शुरन्स घ्यायला लागतो तो जवळपास गाडीच्या भाड्याएवढा असतो. तसेच कार्ड वापरून खरेदी केलेल्या वस्तूंना आपोआप जास्तीची वॉरंटी किंवा इन्शुरन्स आपोआप मिळतो. उदा. मी जर रेबॅनचा गॉगल एक कार्ड वापरून घेतला. पण ३ महिन्यांनी तो फुटला किंवा चोरीला गेला तर जरी रेबॅनने मला पैसे किंवा नवीन गॉगल द्यायला नकार दिला (माझा गहाळपणा हे कारण सांगून) तर मला कार्ड कंपनीकडून परतावा मिळतो. एखादी मोठी खरेदी, म्हणजे समजा आमची ४ जणांची भारतवारीची तिकिटं मी कार्ड वापरून काढली तर जवळपास ४-५ हजार डॉलर्स खर्च येतो. अश्या वेळेला मला बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा वापरता येते आणि त्याला भरायला बिनव्याजी १२-१८ महिन्यांचा कालावधी मिळतो. इथे स्टोअर कार्ड वापरून तुम्हाला त्या स्टोअरमधील खरेदीवर सूट मिळते. तसेच जमा झालेले पॉईंट्स पुढील खरेदीवर जास्तीची सूट मिळवून देतात. अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच. उलट आता इथे नवीन आलेल्याला जर कार्ड लगेच मिळालं नाही तर त्रास होतो. तसेच तुम्ही केलेल्या काही उद्योगांमुळे क्रेडिट हिस्टरीवर परिणाम झाला असेल तरी कार्ड्स मिळत नाहीत व त्रास होतो. हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा ....

वाचने 86867
प्रतिक्रिया 290

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

तुमचा दुसरा फ्लॅट बूमपूर्वीच्या किंमतीत मिळाला त्यामुळे हप्ता कमी बसला आणि समहाऊ भाड्याचं गणित जुळून गेलं. हा उघड नशीबाचा भाग आहे परत चूक संक्षी साहेब हा फ्लॅट मी २०११ मध्ये घेतला तेंव्हा बूम वगैरे संपलेली होती उलट २००८-०९ च्या मंदीनंतर अर्थव्यवस्था खुरडत होती. मी फ्लॅट बुकिंग मध्ये घेतला म्हणून तो स्वस्त मिळाला आणि तो पुढे वाढ कुठे होईल हे गणित करून घेतला म्हणून त्याच्या किमतीत वाढ झाली. ती गुंतवणूक बुडाली नाही हा नशिबाचा भाग आहे असे तुम्ही म्हणाल तर त्याला काय उत्तर? शेवटी आपण जिवंत आहोत तेच नशीब असेच म्हणावे लागेल.

मला संक्षी साहेबाना एकच प्रश्न विचारायचा आहे. शेकडा किती लोक असे आहेत कि ज्यांनी एक पैसाही कर्ज न घेता स्वतःच्या पैशाने घर घेतले आहे? याची आकडेवारी काढली तर माझ्या अंदाजाप्रमाणे असे लोक १ दशांश टक्के (०. १%) किंवा हजारात एक सुद्धा निघणार नाहीत. वडिलोपार्जीत पैशावर घर बांधलेले लोक वेगळे. अर्थात सर्वसामान्य माणसांपैकी ९९ . ९ % लोकांनी इ एम आय वर घर घेतले आहे म्हणजेच आपल्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे आयुष्य हालअपेष्टात जाते आहे पण वस्तुस्थिती काही वेगळेच दिसते आहे. मिपावरीलच ९० % लोक( कदाचित ९९.९%) ज्यांनी इ एम आय वर घेतले आहे ते आनंदी आणि सुखात जगात आहेत असा माझा अंदाज आहे. स्वतःच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असणे याचा आनंद ज्याने घर घेतले आहे त्याला सांगण्याची गरज नाही.

In reply to by सुबोध खरे

मिपावरीलच ९० % लोक( कदाचित ९९.९%) ज्यांनी इ एम आय वर घेतले आहे ते आनंदी आणि सुखात जगात आहेत असा माझा अंदाज आहे. लोक्स रुटीन जगतायंत ! जीवनाच्या प्राइम टाईमचा ९० % भाग जर ऑफिसमधे जातोयं तर स्वच्छंद कल्पनेत आहे, वास्तवात नाही. सुट्टीच्या दिवशी केलेली सहल म्हणजे आनंद नाही. सहलीला आल्यासारखं रोजचं जगणं हा खरा आनंद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सहलीला आल्यासारखं रोजचं जगणं हा खरा आनंद आहे.
म्हणजे नेमकं काय करायचं रोज? आणि ऑफिसमध्ये दिवस आनंदात जात नाही हे गृहीतक कशाला? दिवसभर सलनारा एखादा कोडींग इशू सुटल्यावर जो आनंद मिळतो तो रिसॉर्टमध्येपण मिळणार नाही. आपलं तर बाबा सरळ मत आहे, काम करण्यात जेवढा आनंद गाठीला जमा होतो तो इतर कुठल्याही गोष्टीने होत नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

काम करण्यात जेवढा आनंद गाठीला जमा होतो तो इतर कुठल्याही गोष्टीने होत नाही. स्वच्छंद आणि अकर्मण्य यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. काम स्वेच्छेचं असेल तरच आनंद आहे. नाही तर बलात्कार आणि संभोग यात फरकच उरला नसता.

In reply to by संजय क्षीरसागर

कर्मण्य- अकर्मण्य असा विषयच नाही (खरंतर विषय काय आहे हेच आठवत नाहीये, आणि संभोग वि. बलात्कार मूळे कुठे जाईल तेही सांगता येत नाही ;);)). ईएमआय घेणे = कामावर जाणे = स्वछंदी जगू न शकणे असं तर्कट आपण मांडलं आहे. म्हणून सांगितलं की कामावर जाणे आणि स्वछंदी असणे याचा काही संबंध नाही. "स्वछंदी" याचे दोन अर्थ वरील प्रतिसादांमध्ये मांडले जात आहेत. एक "मन मानेल तसे वागणे" आणि दुसरा "हसत खेळत आनंदात जगता येणे". तुम्ही बहुतकरून पाहिल्याची भलामण करत आहात तर मी दुसऱ्याची. आता पहिला अर्थ जरी धरला तरी तसं वागण्यासाठी कर्ज असणं नसणं नौकरी असणं नसणं काही गरजेचं नाही, आणि दुसरा धरला तरी गरजेचं नाही. तर सांगायचा मुद्दा असा की स्वछंदी जगणे हि एक वृत्ती आहे. त्याचा आर्थिकतेशी किंवा आर्थिक नियोजनाशी संबंध नसावा.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

स्वछंदी जगणे हि एक वृत्ती आहे. त्याचा आर्थिकतेशी किंवा आर्थिक नियोजनाशी संबंध नसावा स्वच्छंद जगण्यासाठी मोकळा वेळ हवा. जर इएमआयचं तुमचा महत्त्वाचा वेळ घेत असेल तर कसला आलायं स्वच्छंद ? कामावर जाणे आणि स्वछंदी असणे याचा काही संबंध नाही. स्वेच्छेनं केलेलं काम आणि कामावर जाण्यापरता पर्यायच नाही ही परिस्थिती यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. त्यामुळेच बहुदा तुम्हाला बलात्कार आणि संभोग यातला फरक कळला नाही !

In reply to by संजय क्षीरसागर

नाक्यावरचे मवाली पोरं - दोन्ही अटींची पूर्तता होते. वेळी आणि कर्जही नाही. ती तुमच्या व्याख्येनुसार स्वछंदी असतात मग. बाकी ईएमआयमूळे मी (किंवा सगळे ईएमआयवाले) नौकरी करतो हे तुमचं गृहीतक भारी आहे. छोटासा फरक असा आहे की ईएमआयच्या बऱ्याच आधीपासून मी नौकरी करतो. वर म्हटल्याप्रमाणे ईएमआयच्या सुरुवातीच्या दोन वर्षात होते थोडी अडचण पण स्वतःच घर असल्याचं सुख "स्वछंदी" बनवते हा माझा स्वानुभव! बाकी संभोग आणि बलात्काराचं म्हणाल तर अत्यंत निरर्थक तुलना आणि परत एकदा मला त्यातला फरक कळत नाही ही निरर्थक तुलना! आणखी एक, अगदी दळण आणणेदेखील उत्सवासारखे साजरा करता येत असताना नौकरीतला प्रत्येक दिवस बांधून ठेवणारा असतो असं का वाटावं? लिफ्टचा दरवाजा उघडणे आणि लिफ्ट खाली वर करण्याची नौकरीदेखील आत येणाऱ्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लोकांमुळे किती वेगळी ठरू शकते. पण असो, स्वछंदी असणे ही एक वृत्ती आहे हेच मान्य नाही तर मग पुढे काय बोलणे होऊ शकते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

ह प्र साहेब अण्णासाहेब किर्लोस्करांनी जाळला तोच धूप, बाकी सब झूट आहे. तद्वतच मी म्हणेन बायको बरोबर १५ किलोचे दळण एक एक बंद हातात धरून घरी आणणे हाच उत्सव बाकी सर्व कामाची ओझी (कोण रे तिकडे म्हणतो आहे स्कुटर वरून दळण का आणत नाही? किंवा पंधरा किलो गहू एकदम आणल्यामुळे गव्हाच्या भावात वाढ होऊन गरीब लोकांना त्रास होतो ते.)

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

दळण आणणेदेखील उत्सवासारखे साजरा करता येत असताना नौकरीतला प्रत्येक दिवस बांधून ठेवणारा असतो असं का वाटावं? लिफ्टचा दरवाजा उघडणे आणि लिफ्ट खाली वर करण्याची नौकरीदेखील आत येणाऱ्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लोकांमुळे किती वेगळी ठरू शकते. दळण आणणं माझा ऑप्शन आहे, मी जाईन न जाईन. लिफ्टमन लिफ्ट सोडू शकत नाही आणि नोकरादार खुर्चीवरुन हालू शकत नाही . आणि इएमायवाला तर शक्यच नाही. बळजबरी आणि स्वेच्छा हा फरक तुम्हाला समजावं म्हणून संभोग आणि बलात्काराचं उदाहरण दिलं. ते जर निरर्थक वाटत असेल तर बहुदा बलात्कारालाच तुम्ही संभोग समतायं.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही ज्याला स्वछंदीपणा म्हणत आहेत ती तुम्हाला तुमच्या नॉन-इमर्जन्सी प्रकारातल्या व्यवसायामुळे आलेली मोकळीक आहे एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. असलीच मोकळीक अजूनही बऱ्याच व्यवसायांमध्ये आहे/असते. मला ईएमआय आहे म्हणून मी खुर्चीवरून हलू शकत नाही हा दावा फोल आहे. मी स्वेच्छेने कामाला जातो, एन्जॉय करतो हे स्पष्ट वर सांगितलेले असतानाही त्याला बलात्कार प्रकारात ढकलायचं असेल तर त्याला काय उपाय असू शकतो? बाकी एक प्रश्न पडलाय - तुम्ही स्वछंदी जगायला केव्हा सुरुवात केली? म्हणजे कशी सुरुवात झाली? (ऑप्शनल प्रश्न अर्थातच) अवांतर : माझ्याकडे उदंड पैसा असता आणि तुमच्यासारखा नॉन-इमर्जन्सी वैयक्तिक व्यवसाय असता तरी मी मला वाटलं तेव्हा दळण आणायला जाता यावं असा स्वछंद जोपासला नसता. कारण प्रत्येकाच्या स्वछंदी जीवनाच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तुमच्या नॉन-इमर्जन्सी प्रकारातल्या व्यवसायामुळे आलेली मोकळीक आहे एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे तुम्ही लाईफ सेवींग व्यावसायात आहात काय ? मला ईएमआय आहे म्हणून मी खुर्चीवरून हलू शकत नाही हा दावा फोल आहे. मी स्वेच्छेने कामाला जातो, एन्जॉय करतो मग तुम्ही स्वच्छंदावर बोला ना ! काय असतं तुमचं रुटीन ? सकाळी ९ ते संध्याकाळी ५ मधे नोकरीच्या कामाव्यतिरिक्त काय छंद पुरवता ? माझ्याकडे उदंड पैसा असता आणि तुमच्यासारखा नॉन-इमर्जन्सी वैयक्तिक व्यवसाय असता तरी मी मला वाटलं तेव्हा दळण आणायला जाता यावं असा स्वछंद जोपासला नसता. तुम्हाला मुद्दा समजत असेल तर बघा. काम हे निर्वैयक्तिक आहे. तुम्ही कोड क्रॅकींकचा विषय काढला म्हणून मी दळणाचं उदाहरण दिलं. पुन्हा बघा : आनंद कामात नाही, काम न करण्याच्या विकल्पात आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षि, मी काय म्हणतो आपण आधी स्वछंदीपणाची एक दोघानाही मान्य असलेली व्याख्या ठरवू आणि मग प्रतिवाद करू कारण मुद्दे रिपीट होत आहेत, कसे? "मन मानेल तेव्हा (म्हणजे एखादया दिवशी नाही तर अगदी दिवसाच्या मध्येही) काम न करण्याचा पर्याय निवडणे/निवडता येणे म्हणजे स्वछंदी असणे" ही व्याख्या तुमच्या प्रतिसादातून दिसतेय. याविरुद्ध मला असे वाटते की "आपल्यासोबत घडणारी प्रत्येक गोष्ट हसत खेळत आनंदाने उपभोगणे म्हणजे स्वछंदीपणा". आता जर आपल्या व्याख्याच सामान नसतील तर मते मांडून काय उपयोग? म्हणून मी नौकरीच्या 9 ते 5 च्या मधून (उदा.) दळण दळण्याचा उत्सव साजरा करू शकत नसणे हे मी गृहीत धरलेल्या व्याख्येला तडा देत नाही. याउलट तुम्ही मात्र म्हणू शकता कि मी स्वछंदी नाही. जाताजाता - मी माझ्या व्याख्येनेदेखील पूर्णपणे स्वछंदी नाही कारण दिवसभरात बहुतांशी गोष्टी हसत खेळत घालवत असलो तरी सगळ्याच गोष्टी आनंदाने घेतो असा दावा नाही. बाकी ते लाईफ सेविंग काय कळलं नाही. मी व्यवसायच करत नाही शिवाय तुमच्या व्यवसायाला "नॉन-इमर्जन्सी" हे काही खोचकपणे म्हटलेले नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

कोणतंही काम सुरु करण्यापूर्वी ते न करण्याचा असलेला ऑप्शन. आपल्यासोबत घडणारी प्रत्येक गोष्ट हसत खेळत आनंदाने उपभोगणे म्हणजे स्वछंदीपणा प्रश्न समोर आलेलं काम आनंदानं करण्याचा नाही. त्याला हात घालण्यापूर्वी ते करु किंवा न करु ही असलेली आपमर्जी. ही आपमर्जी जर प्रामाणिकपणे उपलब्ध असेल तर कामाच्या प्रत्येक क्षणी ते केव्हाही थांबवण्याचा विकल्पही अनायासे उपलब्ध असतोच. या स्थितीत मन दुय्यम आणि आपण प्राथमिक असतो. असं काम अत्यंत सहजपणे पूर्ण होतं कारण मनाला सैरभैर व्हायला वावच नसतो. अशा कामातून कार्यपूर्तीचा आनंद मिळतो कारण फलप्राप्ती लक्ष वेधून घेत नाही तस्मात, आपला फोकस भविष्याकडे न लागता वर्तमानात स्थिर असतो. असं काम बहुदा वेळेपूर्वीच पूर्ण झालेलं असतं आणि त्याचा मोबदला अ‍ॅडीशनल बोनस मिळावा असं सुख देऊन जातो. माझ्या दृष्टीनं हा खरा कर्मयोग आहे. मागच्या प्रतिसादात मी स्वच्छंद केव्हापासून जगतोयं असं तुम्ही विचारलं होतं. साधारण १९९७ च्या दरम्यान मी संपूर्ण क्षणस्थ झालो, तेव्हापासून वर्तमान हा एकच काळ रिलेवंट झाला. तस्मात, स्वच्छंद जगण्याचा वीस वर्षांचा अनुभवान या प्रतिसादामागे आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

ओके. म्हणजे आपल्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत , तेव्हा चर्चा करण्यात हशील नाही. तस्मात माझ्याकडून स्वछंदीपणावर पास! विषय अर्थकारणापासून तत्वज्ञानापर्यंत पोहोचला आहे म्हणून आठवण करू देऊ इच्छितो की "ज्याला कर्ज नाही त्याचीच पत जास्त" इथून विषय भरकटत या प्रतिसादापर्यंत पोहोचला आहे. तर परत ट्रॅकवर आणताआणता - याचा अर्थ भारतातील खूप मोठ्या लोकसंख्येची पत मूठभर श्रीमंत उद्योगपतींपेक्षा जास्त आहे असा अर्थ काढता येईल का?

In reply to by संजय क्षीरसागर

तस्मात, स्वच्छंद जगण्याचा वीस वर्षांचा अनुभवान या प्रतिसादामागे आहे. हॅ हॅ हॅ. याचा अर्थ इतकाच की ९७ सालापासून तुमच्याकडे पैसा धो धो वाहतो आहे. बाकी सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. पैसे मिळवण्याची गरजच नसेल तर काम न करण्याचा ऑप्शन उप्लब्ध होतोच आपोआप. सगळेच जण तो वापरत नसतील इतकेच. एखाद्याचे वडील आजारी आहेत, बायकोला एखादा विकार आहे किंवा मुला मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत त्याला असे स्वच्छंद जगणे अशक्य आहे. २००७ ते २०१४ मधे अनैसर्गिक वाढ झाली घरांच्या किमतीची असे तुम्हीच म्हटले आहे बहुतेक. म्हणजे तुम्ही सगळा पैसा लावून जसे घर घेतले तसे आज २०१७ मधे कोणत्याच मध्यम कींवा उच्च मध्यमवर्गीयाला अशक्य आहे. कारण २००७ ते २०१४ मधील अनैसर्गिक वाढ वगैरे. माझ्या मते तरी असे बूम्स दर थोड्या वर्षांनी येतच असतात. त्याला अनैसर्गिक म्हणणे पटत नाही पण तो वेगळा मुद्दा आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

खरंतर विषय काय आहे हेच आठवत नाहीये हांग अश्शी ! म्हणजे तुम्हाला नक्की काय चालले आहे याचे पूर्ण ज्ञान झालेले आहेच की ;) =)) =)) (सर्वांनी हघ्या ! :) )

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

खरंतर विषय काय आहे हेच आठवत नाहीये
मिपावर असे होतेच. रच्याकने मागच्या वर्षीचा सुप्रसिध्द मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा धागा आठवतोय का? धाग्याचा मूळ विषय काय, जास्तीत जास्त चर्चा कशावर झाली-- कशाचा कशाशी पत्ता नव्हता :)

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

म्हणजे रोज ह्पिसच्या बसमध्ये गाण्याच्या भेंड्या खेळणे. डब्यात दररोज गोड शिरा, लोणचे आणि आईने कौतुकाने तळलेल्या पुर्या खाणे, साहेबाला गाणी म्हणून दाखविणे किंवा साहेबाबरोबर दमशेरा वगैरे खेळणे असे काही असावे. निदान माझ्या तरी शाळेत असतानाच्या सहलीच्या एवढ्याच आठवणी आहेत. नंतर कधी सहलीला गेलो नाही आणि इच्छा पण नाही. काय फँटसी असते एकेकाची. असो.

डॉक्टरसाहेब, "आमच्यासारखे" लोक दुसरे घर घेतात त्यामुळे --बाजारातील घरांची मागणी अनावश्यक रित्या वाढते आणि गरजू लोकांना घर घेता येत नाही असा स्पष्ट अर्थ तुमच्या वरील वाक्यातून निघतो. आणि हे विधान आकसपूर्ण आहे हे स्पष्ट आहे. >>> तसा अर्थ काढून तुमचा तुम्हीच वैयक्तिक त्रास करुन घेत आहात ज्याचा माझ्या जनरल निरिक्षणावरुन काढलेल्या मांडणीशी काडीमात्रही संबंध नाही. माझे जे मत आहे ते एकतर माझ्या घरच्या व्यवसायावर आधारित आहे. माझे वडील गेले वीस वर्षे घरांच्या खरेदी-विक्रीत ब्रोकर म्हणून काम करत आहेत. तसेच दुसरं असं, मी स्वतः ठाण्यातल्या दिशा डायरेक्ट ह्या सेकंडहोम मार्केटींग मधल्या अग्रणी कंपनीत २०१०-२०१२ ह्या दोन वर्षात किएटीव हेड म्हणून काम केलंय. तेव्हा तिथले सर्व ३२ प्रोजेक्ट्स मार्केटींगच्या दृष्टीने अ‍ॅनालायज करणे, कस्टमरबेसचा सर्व प्रकारचा (डेमोग्राफिक, अर्निंग, अ‍ॅस्पिरेशन्स, ट्रिगर पॉइन्ट, इत्यादी इत्यादी) अभ्यास करुन मार्केटींग-अ‍ॅडवर्टायझिंगचे स्ट्रॅटेजी ठरवणे ह्यात अ‍ॅक्टीवली सहभागी होतो. ती नोकरी सोडल्यावरही ३-४ वर्षे मी मुंबईतल्या अनेक रिअल इस्टेट मार्केटींग कंपन्यांचे-बिल्डरांचे अ‍ॅडवर्टायझिंगचे काम करत होतो. त्यासोबत व्यवसायाची गरज म्हणून माझा ह्याच क्षेत्राचा अभ्यास चालूच होता - आजही आहे. मी स्वत:ला तज्ञ म्हणत नाही तर अ‍ॅक्टीव पार्टीसिपंट समजतो. तेव्हा माझे जे मत आहे ते कुठल्याही आकसावर नाही. जास्तीत जास्त तुम्ही असे म्हणू शकाल की माझी गॄहितके चुकीची आहेत, अभ्यास गंडलाय, इत्यादी. पण थेट आकसच म्हणणे भलतंच. खुद्द माझे स्वतःचे घर ४ लाख गुंतवून २५ लाखाचे झाले आहे, त्यामुळे कोणा मिपाकराच्या पैशाकडे बघून मला आकस वाटण्याची तशी काही गरज तर नाही. बेटर, आपण आकडेवारी व तथ्यांवर आधारित मुद्द्यांवर चर्चा करावी. असे तोंडावर सांगितले तर तुम्ही राजकारण्यांसारखे माझ्या म्हणण्याचा विपर्यास होतो आहे, गोल गोल फिरवून "अपवाद हाच नियम समजून बहुसंख्यकांच्या समस्यांकडे पाहणे योग्य नाही हे सांगता आहात." >> २००७ ते २०१३ ह्या दरम्यान झालेल्या प्रॉपर्टी, सोने इत्यादींमधली भाववाढ ही अनैसर्गिक होती हे काय मी शोधून काढलेले नाही. सर्व अभ्यासक तसंच म्हणतात. त्यामुळे आधीच मी सांगितले की आपल्या गुंतवणूकीबद्दल विचार करतांना हा कालखंड रेफरन्स पॉइन्ट म्हणून बघू नये, तो एक चमत्कार, अपवाद होता. आणि त्याला बरेच बरेच बरेच पैलू आहेत. त्यासाठी एक वेगळा लेख लिहायला लागेल. जमलं तर लिहिन.. मला गोल बोलायची किंवा लिहायची सवय नाही म्हणून मी स्पष्ट आकस असा शब्द वापरला >> तथ्यांवर आधारित मुद्द्यांवर बोलल्यास सवयी सांगत बसायची गरज पडत नाही. बाकी काहीच कारण नसतांना आपण थेट आकस आहे असे म्हणता तेव्हा बहुदा इथल्या धाग्याशिवाय इतर ठिकाणी इतर कोणाच्या तरी आपल्याशी झालेल्या वार्तालापाचा ह्या प्रतिसादावर प्रभाव आहे की काय असे वाटते. किंवा संक्षी सारख्या वित्त विषयातील तज्ज्ञांची मते सुद्धा स्पष्टपणे पुराव्यासकट चूक म्हणतो आहे. मला गुळमुळीत बोलायची सवय नाही ( लष्करात असे बोलणे भंपकपणा समजला जातो). आणि मी तत्वज्ञानाचा प्राध्यापक नाही. >> तुम्ही काय आहात काय नाही हा चर्चेचा मुद्दा नाही. सध्या इतकेच दिसत आहे की एका सरळ साध्या निरिक्षणाला आपण सरधोपट आकसपूर्ण बोलून मोकळे झालात, तसेच तुमचेच गणित मी आजच्या किंमतीनुसार पुढच्या पंधरा वर्षांसाठी मांडून दाखवले आहे. तिथे ते गणित मोडून पडते, हवं असल्यास २००० सालाच्या आधी कोणत्याही १५-१५ वर्षांचे गणित पगार आणी जमिनीच्या किंमतींशी जुळवून बघा... २००४ ते २०१६ ह्या काळात जे भाव वाढून १८ लाखाचे सव्वाकोटी झाले असे उदाहरण सापडल्यास मला सांगा, माझ्या ज्ञानात भर पडेल. संक्षी साहेब हा फ्लॅट मी २०११ मध्ये घेतला तेंव्हा बूम वगैरे संपलेली होती उलट २००८-०९ च्या मंदीनंतर अर्थव्यवस्था खुरडत होती. . >> "२००४ साली १८ लाखाला घेतलेल्या घराची आजमितीस किंमत सव्वा कोटी रुपये आहे. (निश्चलनीकरणामुळे कमी झालेली किंमत गृहीत धरून)" डॉक्टर साहेब, हे वरिल वाक्य आपलेच आहे ह्या धाग्यावरचे ते कोणत्या फ्लॅटबद्दल आहे आणि आताचे बोल्ड केलेले तुमचे विधान कोनत्या फ्लॅट बद्दल आहे? बरं, संक्षी जी बूम म्हणत आहेत ती आपण बेमालूम कॉर्नर करत आहात. अमेरिकेच्या सबप्राईम चा भारतावर काय परिणाम झाला ते जगजाहिर आहे. २००८ च्या मंदीने शेअरबाजार कोसळला, अनेक एमएनसी नोकरदारांच्या नोकर्‍या गेल्या वगैरे सत्य आहेच. पण २००७ ते २०१३ मधे जमीन-सोने-चांदी यातली फास्टेट दरवाढही सत्यच आहे. त्यालाच संक्षी बूम म्हणत आहेत. ज्या कोणी २०११ च्या आत घरे घेतली त्यांनाच बूमचा फायदा झाला व नंतर २०१३ च्या नंतर घेणार्‍यांची स्थिती खेळात आपल्या हाती बॉल यावा आणी म्युझिक थांबावे अशी झाली. मी फ्लॅट बुकिंग मध्ये घेतला म्हणून तो स्वस्त मिळाला आणि तो पुढे वाढ कुठे होईल हे गणित करून घेतला म्हणून त्याच्या किमतीत वाढ झाली फ्लॅट बुकींगमधे घेतले तर स्वस्त मिळतात आणि हार्डकॅश किंवा पूर्ण पेमेंट केले तर महाग मिळतात काय? तुम्ही 'गणित करुन घेतले' म्हणून किंमतीत वाढ झाली हे लॉजिकही मस्त आहे.... ती गुंतवणूक बुडाली नाही हा नशिबाचा भाग आहे असे तुम्ही म्हणाल तर त्याला काय उत्तर? शेवटी आपण जिवंत आहोत तेच नशीब असेच म्हणावे लागेल. आधीच्याच वाक्यात आपण गणित करुन फ्लॅट घेतला म्हणून त्याच्या किंमतीत वाढ झाली असे म्हणताय तिथे दुसर्‍याच वाक्यात गुंतवणूक बुडाली नाही हे नशीब म्हणताय... म्हणजे फायदा झाला तर 'माझ्या निर्णयामुळे', नुकसान झाले तर 'नशिबामुळे' असे काही लॉजिक आहे काय? असो. तो काही माझ्या मांडणीचा भाग नाही, तुमची वैयक्तिक विचारसरणी आहे. (परत वितंडवाद घालतोय म्हणून आरोप येणार असतीलच. तेव्हा असो.)

In reply to by संदीप डांगे

फ्लॅट बुकींगमधे घेतले तर स्वस्त मिळतात आणि हार्डकॅश किंवा पूर्ण पेमेंट केले तर महाग मिळतात काय? मग निवेशक (investor) लोक प्रकल्प कागदावरच असताना का हो आपला पैसा त्यात टाकतात? तुम्ही बांधकाम क्षेत्रात "इतकी वर्षे काढूनही" असे विधान करता हेच आश्चर्य आहे. साधा माणूसही सांगू शकेल कि बुकिंगमध्ये घर स्वस्त मिळते. हहपुवा विसंगती दाखवायला इतकेच पुरे आहे. बाकी मेगाबायटी प्रतिसादाला उत्तर देण्याची गरज नाही (कारण त्यातच इतका अंतर्विरोध आहे). बाकी तुम्ही काय संक्षी काय आपला मुद्दा सिद्ध करण्याकरता किती टोकाला जाऊन हास्यास्पद वाद घालता हे दिसून येतच आहे. परत हहपुवा

In reply to by सुबोध खरे

बिल्डींग कागदावर असो वा जमीनीवर, कॅशमधे किंवा चेकने पूर्ण अपफ्रंट पेमेंट केल्यावर कोणा बिल्डरने डिस्काउंट देण्याचा अनुभव तुम्हाला आला नाही यात माझा काय दोष? तुम्हाला हसायचं असेल तर खुशाल हसा बुवा. विनाकारण आपल्याआपण हसत सुटणारांना जग काय म्हणतं ते जगजाहिर आहे. भोंगळ युग्तीवात बाजारात उपयोगात येत नाहीत...

In reply to by संदीप डांगे

भोंगळ युग्तीवात हा आमवातापेक्षा खतरनाक असतो. बुकिंग मध्ये घर अपफ्रंट पेमेंट पेक्षा भरपूर स्वस्त मिळतं हे तर बांधकाम व्यवसायातील मजूर सुद्धा सांगेल असे असूनही केवळ आपल्या मताचे समर्थन करण्यासाठी फुकाचा "भोंगळ युग्तीवात" करत आहात हे पाहून हा हा पु वा ( हा हा म्हणजे मोठ्याने हसून)

In reply to by सुबोध खरे

बुकिंग मध्ये घर अपफ्रंट पेमेंट पेक्षा भरपूर स्वस्त मिळतं हे तर बांधकाम व्यवसायातील मजूर सुद्धा सांगेल अर्रर्र..... घर वगैरे घेण्याचे डिल साईटवरच्या मजूरांसोबत करता की काय डॉक्टरसाहेब? चला, मला नाही माहीतीच नाही आता. मग तुम्हीच सांगा बुकींगमध्ये अपफ्रंट पेक्षा "भरपूर स्वस्त" कसं मिळतं ते... माझ्याही ज्ञानात भर पडेल तितकी... हसायचं कुणी व कसं ते मग नंतर बघू... ------------------------------------------------------- बाकी, ही खाली बातमी देऊन ठेवतो. :-) If you have money in hand, realtors are ready to welcome buyers with heavy discounts and freebies. Inquiries made by this correspondent, who posed as prospective buyer, revealed that sellers were willing to offer up to 25% discounts if the payment was made within 48 hours. For instance, an upcoming posh residential complex on the SP Ring Road near new Chandkheda is priced at 45 lakh for a two-bedroom flat. Offer to pay cash and the price is instantly scaled down by 22%. http://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Buying-house-Pay-upfr…

In reply to by संदीप डांगे

माझ्या भावाने २०१० मध्ये बुकिंग मध्ये मुलुंडला फ्लॅट बुक केला तेंव्हा दर होता ५५००/-स्क्वेअर फुटाला आणि २०१६ मध्ये तो रहायला आला तर आता दर आहे २५०००/-. (हे सर्व चेकचे पैसे आहेत.) किती टक्के डिस्काउंट झाला हे सांगायला कितवी पास असायला हवे. चौथी कि पाचवी? आपला मुद्दा सिद्ध करायला किती टोकाला जाताय आणि स्वतःला हास्यास्पद करून घेताय?

In reply to by सुबोध खरे

तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला कळत असेल तर बघा बुवा... २०१० चा रेट आणि २०१६ चा रेट यातला फरक हा 'डिस्काउंट' सांगत आहात. तुमचा भाऊ केव्हा राहायला आला ह्याच्याशी काय मतलब? ज्याने २०१० मध्ये पूर्ण अपफ्रंट कॅश/चेक देऊन ५००० हजार दराने फ्लॅट घेतला असेल त्याला तेव्हाच तुमच्या भावापेक्षा कमी किंमतीत मिळाला असेल, आणि त्याने तेव्हा पूर्ण पैसे भरले म्हणून २०१६ मध्ये त्याच्या फ्लॅट चा दर २५००० नसेन असे काही आहे काय? तरी वर धडधडीत बातमीही दिली आहे, ती ही नाकारत आहात. हास्यास्पद कोण होतंय हे दिसतंय स्पष्ट. रच्याकने, ते डॉक्टर व्हायला कितवी यत्ता पास असायला लागतं?

संक्षी सरांचे प्रतिसाद वाचून भारावून गेलो आज . कर्जमुक्त जीवन काय, स्वच्छंदी जीवनाची व्याख्या काय ..जबरदस्त अनोखं सरसकटीकरण . एखाद्यावर कर्ज नाही म्हणून तो आनंदी आणि ज्याच्यावर कर्ज आहे तो दु:खी??असं असतं का .? अस असेल तर कित्येक लोक दाखवतो कर्ज नाहीये पण दु:खी आहेत .तेव्हा सरसकटीकरण नको. स्वच्छंदीपणा म्हणजे मनात येईल तेव्हा काम करणे नाही तर योग्य जबाबदाऱ्या सांभाळून मिळालेला वेळ सत्कारणी लावणे . उद्या मी ठरवलं पैसे आहेत जाऊ पटकन गोव्याला तरी माझ्यावर माझ्या स्वतःच्या कंपनीची जबाबदारी आहे काही लोक अवलंबून आहेत ते राहूदे ते सोडूनही मी स्वतः नोकरीही करतो जिथे मला रोज जाण्याची गरज नाहीये कित्येकदा बाहेर मीटिंग असतात भरपूर वेळ असतो. वेळेची बंधन नसतात पण म्हणून डोळे उघडले की उठाव,खेळावा ,झोपावं ,मनात येईल तेव्हा काम कराव हा सल्ला कोणाला पटेल. अगदी भरपूर पैसे असले तरी नाही. कारण कामात मजा असते . टेन्शन मध्ये पण एक आंनद असतो . काहीतरी सध्या करण्याची आस असते जिद्ध असते. फार तर आपण इतका म्हणू शकतो कि काम आवडता हव. मनात येईल तेव्हा काम करणे हा उपाय नाही . असो आपली मत आपला जीवन . राहता राहिला मुद्दा कर्जाचा तर कर्ज घेऊन योग्य वापर करणे ह्यात हुशारी असते . कुठलाही धंदा कर्जविनं चालत नसतो.उदाहरणादाखल गुजराती आणि कच्छी समाजाचे व्यवहार पाहावेत किंवा शेट्टी समाजाचा हॉटेल व्यावसायिकांचा सिंडिकेट ..हि अत्यंत बेसिक उदाहरण आहेत बाकी व्यवसाय म्हटलं कि कर्ज आल व्यवसाय विस्तार म्हटलं तरी कर्ज आल ते फेडण्याचा विश्वास स्वतःवर असेल कि झालं. आणि सध्याच्या काळात मुंबई पुण्यात घर घेताना एखादा नोकरी करणारा माणूस कसं घर घेणार ह्याची युक्ती सांगावी सगळ्यांना कामाला येईल. कच्छी भाषेत एक म्हण आहे ज्याच्यावर कर्ज नाही त्याचा धंदा नीट नाही अश्या अर्थाची असो . त्यामुळे कसलही कर्ज असल तरी रात्रंदिवस लोक तोच विचार करतात स्वच्छंदी जगत नाहीत असं काही एक नाही आहे . ज्याचा त्याचा चष्मा . प्रत्येकजण आपल्या परीने आनंद शोधत असतो. बाकी डांगे सर कोणी फ्लॅट जास्त घेतले किंवा अगदी कोणी ठरवलं कि एकच फ्लॅट घ्यायचा त्यामुळे गरिबांना घरे मिळतील हे गृहितीक मुळातच चुकीचा आहे .

In reply to by वरुण मोहिते

बाकी डांगे सर कोणी फ्लॅट जास्त घेतले किंवा अगदी कोणी ठरवलं कि एकच फ्लॅट घ्यायचा त्यामुळे गरिबांना घरे मिळतील हे गृहितीक मुळातच चुकीचा आहे .
माझ्या प्रतिसादातली विधाने ही "श्रीमंतांनी उधळपट्टी केली नाही तर गरिबांना खायला मिळेल" ह्या विचारसरणीवर आधारित नाही. श्रीमंतांनी घरे घेतली म्हणून गरिबांना घरे मिळत नाहीत असे ते गृहितकही नाही. माझे मूळ विधान खालीलप्रमाणे: गुंतवणूक म्हणून कर्ज काढून घर घेणे व त्यासाठी गरज नसतांना ऐपत आहे म्हणून ईमाय चे शुक्लकाष्ठ मागे लावून घेणे माझ्या वैयक्तिक मतांनुसार योग्य नव्हे. अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील. ह्यातील प्रत्येक बोल्ड शब्द महत्त्वाचा आहे. त्यात कोठेही श्रीमंत विरुद्ध गरिब वगैरे कोणत्याही इझमची मांडणी नाहीये. त्यामुळे माझे हे मत कुठल्याही इझममधे न बघता खोडून काढता येत असल्यास मलाही आनंदच होईल. कारण ह्याची दुसरी बाजू मांडलेली माझ्या वाचनात आलेली नाही. कोणी ती दिल्यास आभारी राहीन....

In reply to by गणामास्तर

=)) =)) फॉर सेक ऑफ क्लॅरिफिकेशन वन्स अगेनः (श्रीमंत आणि गरिब) व (परवडणारी किंमत आणि गरजू) ह्या दोन ठळक वेगळ्या बाबी आहेत एवढं परत एकदा स्पष्ट करतोय. "गरजू, परवडणे" असे शब्द आले की लगेच रस्त्यावरचे गरिब- महालातले श्रीमंत वगैरे समाजवादी+साम्यवादी विचार आठवायला लागतात हा आपल्या सर्वांच्यावर झालेला संस्कार आहे. त्याला काय करु शकत नाही. नीड टू थिंक क्लिअर विदाउट बायस... :-)

In reply to by संदीप डांगे

क्षमा असावी, बोल्ड सगळेच झाले :-) गुंतवणूक म्हणून कर्ज काढून घर घेणे व त्यासाठी गरज नसतांना ऐपत आहे म्हणून ईमाय चे शुक्लकाष्ठ मागे लावून घेणे माझ्या वैयक्तिक मतांनुसार योग्य नव्हे. अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील.

In reply to by संदीप डांगे

गुंतवणूक म्हणून कर्ज काढून घर घेणे व त्यासाठी गरज नसतांना ऐपत आहे म्हणून ईमाय चे शुक्लकाष्ठ मागे लावून घेणे माझ्या वैयक्तिक मतांनुसार योग्य नव्हे. अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील. शंभर टक्के बरोबरे ! पब्लिक हेवी इएमआय घ्यायला तयार आहे हे बघून बिल्डर्सनी रिवर्स वर्कींग करुन फ्लॅटच्या किंमती भडकवल्या आहेत. कंस्ट्रक्शन कॉस्ट इतकी बेफाट अजिबात वाढलेली नाही. त्यात लोकांचा फ्लॅटकडे इनवेस्टमेंट म्हणून बघण्याचा अँगल आणि गरज नसतांना दोनदोन फ्लॅट घेणं ही तर गरजूंच्या जीवावर केलेली सट्टेबाजी आहे. जर लोकांनी सूज्ञ विचार करुन ही सट्टेबाजी थांबवली तर बिल्डर्स झक मारत लाईनीत येतील आणि गरजवंतांना घरं मिळू शकतील.

In reply to by वरुण मोहिते

स्वच्छंदीपणा म्हणजे मनात येईल तेव्हा काम करणे नाही तर योग्य जबाबदाऱ्या सांभाळून मिळालेला वेळ सत्कारणी लावणे स्वच्छंद म्हणजे जवाबदारी वगैरे विचारच मनात न येणं ! मी स्वतः (वडीलांच्या रिटायरमेंटनंतर) एकत्र कुटुंबाचा कर्ता आहे आणि तरीही स्वच्छंद आहे. कारण कामात मजा असते मजा काम स्वेच्छेनं करण्यात असते. कोणतंही काम निर्वयैक्तिक आहे, त्यात मजा तुम्ही आणता. पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण आणायचा मी उत्सव करतो. दळणवाल्याशी गपा, मध्यंतरीच्या काळात तीच्याबरोबर घेतलेला कटींग चहा, चहा घ्यायला जातांना तिच्याबरोबर झालेली एक-दीड किलोमिटरची पायपीट आणि तीची केली छेडखानी, ओझं हलकं करण्यासाठी दोघांनी धरलेला पिशवीचा एकेक बंद....आणि लोक्स दळण आणणं जवाबदारी समजतात. सो द पॉइंट इज, इट इज नॉट द वर्क बट दि ऑप्शन नॉट टू वर्क इज द फन ! त्यामुळे कसलही कर्ज असल तरी रात्रंदिवस लोक तोच विचार करतात स्वच्छंदी जगत नाहीत असं काही एक नाही आहे . इएमआयवाले झोप येत असली तरी हप्त्याचा विचाराचं हँडलच जोरदार फिरवून सकाळी उठतात हा सार्वत्रिक अनुभव आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

इएमआयवाले झोप येत असली तरी हप्त्याचा विचाराचं हँडलच जोरदार फिरवून सकाळी उठतात हा सार्वत्रिक अनुभव आहे.
माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही सी.ए आहात. मग तुमच्या क्लाएंटची गरज, त्यांनी दिलेली डेडलाईन इत्यादी विचारांचे हँडल जोरदार फिरवून तुम्ही सकाळी कसे उठत नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. तुमच्यासारख्यांचे माहित नाही पण आमच्यासारख्या सामान्य लोकांना हे नाहीतर ते असे कुठलेतरी हँडल जोरदार फिरवूनच सकाळी उठावे लागते ब्वा. कुणाला ते ई.एम.आय चे असेल, कुणाला बॉसचे असेल अन्यथा कुणाला बिझनेसमध्ये टिकून राहायला आपले क्लाएंट जपायचे असेल!!

In reply to by गॅरी ट्रुमन

अहो, तो त्यांचा छंद आहे. वाचले नाहीत का. ते दळण आणायचा सुद्धा उत्सव करतात, कामाऐवजी सहलीला जातात. मला तर संक्षी म्हणजे जादूगारच वाटताहेत. खूप उलट्सुलट विचारु नका त्यांना नाहीतर जादूची छडी फिरवून उंदीर वगैरे करतील तुमचा आमचा.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुमच्या क्लाएंटची गरज, त्यांनी दिलेली डेडलाईन इत्यादी विचारांचे हँडल जोरदार फिरवून तुम्ही सकाळी कसे उठत नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. कारण मला इएमआयचं झेंगट नाही ! सकाळी खेळायला मजा येते म्हणून उठतो (याला विकल्प म्हणतात) आणि मन मानेल तेव्हाच काम करतो. तरीही (किंवा त्यामुळेच ) माझी सगळी कामं वेळेपूर्वीच संपलेली असतात. इथेच काही क्लायंटस आहेत आणि त्यांच्यासमोर लिहीतोयं, याशिवाय आणखी वेगळ्या पुराव्याची गरज नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

मी तर बा सकाळी एकच हॅण्डल फिरवायला उठतो...फ्लश चं !! रच्याकने निसर्गाच्या हाकेला ओ देणं ह्याला ओझं म्हणावं की स्वछंदीपणा ???

In reply to by चिनार

हहपुवा. हे वाचून हसू खरोखरच नियंत्रित करता आले नाही आणि ऑफिसातले इतर लोक माझ्याकडे बघू लागले की हा ट्रुमन असा काय वेड्यासारखा हसत आहे म्हणून!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हो ना... पण निसर्गाच्या हाकेला ओ द्यावं लागतं हे ओझंच म्हणावं लागेल ना !! ते हॅण्डल बिंडल नंतर येते हो..

In reply to by खेडूत

चायला हसुन फुटलो ना. आईशप्पथ ग्रीन टी सांडला फोनवर आणि किबोर्डावर. आता स्वच्छंदीपणे किबोर्ड साफ करायला लागणार. !!!!

In reply to by खेडूत

अश्या हाकांना तुम्ही उत्तर देत बसता म्हणजे मग तुम्ही स्वच्छंदी जगत नाही. तुमचा तुमच्या मनावर आणि शरीरावर कंट्रोल पाहिजे. आणि मग जर का हाकेला उत्तर द्यायलाच लागलं तर त्याचा उत्सव करता आला पाहिजे. सो द पॉईंट इज, इट इज नॉट द हाक बट द ऑप्शन नॉट टू रिस्पॉन्ड इज द फन!

In reply to by संजय क्षीरसागर

पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण आणायचा मी उत्सव करतो. दळणवाल्याशी गपा, मध्यंतरीच्या काळात तीच्याबरोबर घेतलेला कटींग चहा, चहा घ्यायला जातांना तिच्याबरोबर झालेली एक-दीड किलोमिटरची पायपीट आणि तीची केली छेडखानी, ओझं हलकं करण्यासाठी दोघांनी धरलेला पिशवीचा एकेक बंद....आणि लोक्स दळण आणणं जवाबदारी समजतात. सो द पॉइंट इज, इट इज नॉट द वर्क बट दि ऑप्शन नॉट टू वर्क इज द फन ! हसून वारल्या गेलो आहे. :)

In reply to by अप्पा जोगळेकर

मला तर संक्षी म्हणजे जादूगारच वाटताहेत. खूप उलट्सुलट विचारु नका त्यांना नाहीतर जादूची छडी फिरवून उंदीर वगैरे करतील तुमचा आमचा. हायला अप्पासाहेब तुम्ही असे लिहिता कि हसून हसून मी खुर्चीतून पडणार होतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

एखाद्याने लोकांची दळणे आणून देण्याचा व्यवसाय केला तर त्याचा उत्सव पण होईल आणि उत्पन्न सुद्धा मिळेल... ही डब्बल बेनिफिट स्कीम मनात आली ;)

बाकी सगळे करा पण कामाच्या वेळेत (म्हणजे साधारण १० ते ६ ) कामासाठीचा फोन आला असेल तर 'ते झोपले आहेत' असा निरोप समोरच्याकडे पोहोचवू नका प्लीज. एकेकाळी अशी विचारसरणी बाळगून असलेल्या मला स्वतःला एका वाईट वेळी या कारणामुळे धंद्यात झोपण्याची वेळ आली होती आणि मग झोपेतून उठायला तब्बल ५ वर्षे गेली. अर्थात तुमच्यावर आणि कोणावरच ती वेळ कधीच येऊ नयेच अशी मी माझ्याच देवाच्या चरणी अपेक्षा करतो. बाकी आपल्या इतर प्रतिसादांचे समर्थन / खंडन करण्याची माझी योग्यता नव्हे.

In reply to by धर्मराजमुटके

कामाच्या वेळेत (म्हणजे साधारण १० ते ६ ) कामासाठीचा फोन आला असेल तर 'ते झोपले आहेत' असा निरोप समोरच्याकडे पोहोचवू नका प्लीज. खरं बोलणारा कायम निर्धास्त असतो. एकदा सुरु केल्यावर काम संपल्याशिवाय मी जेवत सुद्धा नाही. आणि रात्री दोन वाजता काय की पहाटे चार वाजता सुद्धा काम करु शकतो. क्लायंटचा एकही ओरिजिनल पेपर माझ्याकडे नाही, माझं ऑफिस पूर्णपणे पेपरलेस आहे आणि क्लायंटचे (इन्कमटॅक्स , वॅट वगैरेचे) पासवर्डस बिनदिक्कतपणे त्यांचाकडे दिलेले आहेत. त्यामुळे मी केव्हाही झोपू शकतो आणि घरचेही नेमकं तेच सांगतात.

In reply to by संजय क्षीरसागर

देवा. दंडवत घ्यावा.

आपण पकडून चालू कि माझ्याकडे एक घर राहता आहे इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा भविष्याची तरतूद म्हणा मला अजून एक घर घ्यायचाय ईएमआय द्यायला मी तयार आहे कसे द्यायचे ते माझं मी पाहीन तर ते चूक आहे का??मी वापरेन भाड्याने देईन बंद ठेवेन माझं मी पाहीन कारण पैसे माझे आहेत हा झाला एक मुद्दा . आपण कितीही म्हटलं तरी रेडी रेकनर दराच्या खाली घर विकू शकणार नाही आता भाव आणि रेडी रेकनर दर ह्यातील तफावत कुठे जास्त आहे कुठे अगदीच कमी आहे .मी घर घेतोय समजा २५ लाखाचं अशी माझ्यासारखी १०० लोकं आहेत पण आता लोकांनी ठरवलं कि नाही उदात्त हेतूने घर नाही घ्यायचं एक बस्स तर तो प्रोजेक्ट त्याच्या होल्डिंग कॅपॅसिटी वर एक वर्ष राहील असे समजूयात तरी भाव किती टक्के खाली येतील असं वाटतं आपल्याला . अगदी २५ लाखाचे २० लाख झाले तरी २० लाख देणारा तो घेणारच ना .५ लाख कमी म्हणून तो गरीब तर नाही किंवा तोच फ्लॅट अगदी १ लाख रुपयाला तर देणार नाहीत . बर ५ लाख कमी झाले त्याला फायदा झाला ज्याने घेतला त्याला तो परत फायदा मिळवण्याच्या उद्देशाने विकणार नाही कशावरून ?मग माझ्या उदात्त हेतूचा काय ?? अवांतर -गणपती उत्सव माहिती आहे पण दळण कधी आणला नाही त्यामुळे तो उत्सव राहून गेला भविष्यात करण्यात येईल :))))

In reply to by वरुण मोहिते

अगदी योग्य आणि सुंदर प्रश्न मांडले आहेत आपण.. असे प्रश्न आले तर चांगली चर्चा होऊ शकते. ह्याचा वेगळा धागा काढून केवळ याच मुद्द्यावर चर्चा करूयात. ईथे बरेच अवांतर झाले. आणखी नको... ;-)

ईएमआय सकल उत्पन्नाच्या प्रमाणात जास्त असेल (तुम्ही म्हणताय तास ६०-६५%) तर नोकरी असो वा धंदा, ती व्यक्ती कदाचित स्वच्छंदपणे जगू शकणार नाही. पण हे सुद्धा व्यक्तीच्या प्रवृत्तीप्रमाणे बदलते. काही लोक्स तर फेडता येणार नसूनही कर्ज घेतात आणि तरीही निवांत राहतात. माझ्यामते जो पैसे कर्जाऊ देतो त्याला ते वसूल करायची जास्त चिंता असते. ज्यांना तणाव घ्यायची सवय असते ते कशाचाही ताण घेतात. तर मुख्य प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही दिलं नाहीये. ज्यांना एकरकमी पैसे देऊन घर घेता येईल असे किती लोक आहेत किंवा अगदी २००४ च्या आधी होते? जर का मी माझ्याकडची आहे नाही तेवढी सर्व संपत्ती विकूनही घर घेण्याएवढे पैसे २००१ साली आणि आत्ता सुद्धा जमा करू शकत नसेन तर मी घर कसे घ्यावे? कृपया आम्हाला सर्वांना याचे मार्गदर्शन करावे. तुमच्या व्यवसायाप्रमाणे तुम्ही किती स्वच्छंदपणे प्रत्येक दिवशी जगू शकता शकता हे ठरतं. डॉ. खरे म्हणतात त्याप्रमाणे चित्रकार किंवा कलाकार म्हणा मन मानेल तसं जगू शकतात. पण जर का याच कलाकाराला काम पूर्ण करण्याची डेडलाईन असेल तर? मग ईएमआय आहे का नाही हा मुद्दा वेगळा आहे. जर एखादे प्रथितयश सर्जन आहेत जे फक्त वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्जरी करतात. पैसे भरपूर मिळतात, ईएमआय नाहीये पण ते किती स्वच्छंदपणे जगू शकतील? त्याचप्रमाणे एखादा व्यावसायिक घ्या, जर का त्याने एक काम वेळेत पूर्ण करून द्यायचं अग्रीमेंट केलं आहे, तर कर्ज असो व नसो तो हॅन्डल मारल्यासारखा काम करेलच. त्यामुळे स्वच्छंद जगायला पाहिजे हे तत्वतः ठीक आहे पण वास्तवात ते सगळ्यांनाच सतत शक्य होईल असे नाही. बाकी व्यावहारिक जगात कर्ज न घेता घर किंवा कोणतीही मालमत्ता कशी घ्यायची ते प्लीज सगळ्यांना सांगा.

In reply to by ट्रेड मार्क

व्यावहारिक जगात कर्ज न घेता घर किंवा कोणतीही मालमत्ता कशी घ्यायची ते प्लीज सगळ्यांना सांगा. यावर मागच्या प्रतिसादात. चर्चा झाली आहे. तुमच्या व्यवसायाप्रमाणे तुम्ही किती स्वच्छंदपणे प्रत्येक दिवशी जगू शकता शकता हे ठरतं. ...त्यामुळे स्वच्छंद जगायला पाहिजे हे तत्वतः ठीक आहे पण वास्तवात ते सगळ्यांनाच सतत शक्य होईल असे नाही. पुन्हा तोच मुद्दा येतोयं. काम न करण्याचा विकल्प काम स्वच्छंद करतो. आता शेवटी एकदाच सांगतो : प्रत्येक काम न्यूट्रल आहे मग तो चित्रकार असो, सर्जन असो की मी उदाहरण दिलंय ते दळण आणायचं काम असो. आनंद कामात नाही, तुमच्यात आहे. एखादा चित्रकारही क्लायंटची डेड लाईन आहे म्हणून मन मारुन चित्र पूर्ण करुन देऊ शकतो आणि दळण आणण्याची कुठलीही बळजबरी नसतांना केवळ मजा म्हणून दळण आणता येतं. एक्स्ट्रीम उदाहरण द्यायचं झालं तर वेश्येचं देता येईल. संभोग एकच आहे पण वेश्येला तो बलात्कार आहे कारण तिला विकल्प नाही. तस्मात, ज्या वेळी काम न करण्याचा विकल्प हरवतो त्या वेळी काम प्राथमिक आणि आपण दुय्यम होतो. परिणामतः कामातला स्वच्छंद हरवतो. नीट बघा, प्रश्न काम न करण्याचा नाही. ते स्वेच्छेनं करण्याचा आहे. जिथे विकल्प आहे तिथे काम आनंद देऊन जातं कारण तुम्ही प्राथमिक आणि काम दुय्यम असतं. इएमआयवाला वर्तमान भविष्याकडे उधार ठेवून असतो त्यामुळे त्याचा काम न करण्याचा विकल्प हरवतो.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही म्हणताय "उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन तुम्ही फ्लॅटवर लावायला तयार आहात का?" तर माझ्याकडे हे सगळं करूनही २०% नव्हते. मग मी काय करायला पाहिजे होते? इएमआयवाला वर्तमान भविष्याकडे उधार ठेवून असतो त्यामुळे त्याचा काम न करण्याचा विकल्प हरवतो. समजा माझ्याकडे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळे पैसे काढून आणि सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन ५० लाख रुपये जमा होतात. मी हे सगळं करून ५० लाखाचा फ्लॅट घेतला. आता माझ्या बँकेत एक पैसा नाहीये. मग माझ्याकडे काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असेल का? जर एखादी कठीण वेळ आली तर मी पैसे कसे उभे करणार? आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर मी २०% म्हणजे १० लाख भरले व फ्लॅट घेतला. ईएमआय माझ्या उत्पनातून सहज भरला जातोय. आता माझ्याकडे या फ्लॅटशिवाय ४० लाखाची मालमत्ता अजून आहे. समजा काही कठीण वेळ आलीच तर मी या ४० लाखातून खर्च करू शकतो.

In reply to by ट्रेड मार्क

आता माझ्या बँकेत एक पैसा नाहीये. मग माझ्याकडे काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असेल का? जर एखादी कठीण वेळ आली तर मी पैसे कसे उभे करणार? यालाच तर साहस म्हणतात ! अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, वीसवर्षापूर्वी जेव्हा स्वच्छंद जगायचा निर्णय घेतला तेव्हा मी पैसे मोजले नाहीत, फक्त भविष्य या कल्पनेला पराभूत केलं. आणि माझ्या जीवनातला धसका संपला ! त्या वेळी वडील रिटायर्ड होते आणि सहा जणांच्या कुटुंबाची जवाबदारी प्रॅक्टीकली माझ्यावर होती. आज वीस वर्षानंतरसुद्धा दोन / तीन फ्लॅटस असणारे आणि करोडो रुपयांची इनवेस्टमेंट केलेले माझे मित्र मला त्या वेळी विचारलेला प्रश्नच विचारतात `असं जगायला नक्की किती पैसा लागतो ?' खाली दिलेल्या या प्रतिसादाचा कदाचित तुम्हाला उपयोग होईल. माझा एकच फंडा आहे आपण पैश्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. काय वाट्टेल ते झालं तरी पैसा प्राथमिक आणि आपण दुय्यम होता कामा नाही. एकदा हा निश्चय झाला की `दि ऑप्शन नॉट टू वर्क ' उपलब्ध होतो आणि जगणं स्वच्छंद होतं

In reply to by संजय क्षीरसागर

व्यावहारिक जगात कर्ज न घेता घर किंवा कोणतीही मालमत्ता कशी घ्यायची ते प्लीज सगळ्यांना सांगा. यावर मागच्या प्रतिसादात. चर्चा झाली आहे.
बाकीचं जाऊदे, पण या प्रश्नात मलाही इंट्रेस्ट आहे. 'त्या' प्रतिसादात तत्त्व होतं, ते समजलं. आता आकडे घेऊन विचार करूया का? अविवाहित मुलगा वय वर्षं २२. पगार रु. ६ लाख (ग्रोस, बिफोर टॅक्स) दर वर्षी. घरची / वडिलार्जित प्रॉपर्टी किंवा अन्य अ‍ॅसेट्स काहीही नाहीत. पण कुटुंबाची आर्थिक जबाबदारीही नाही. पुण्यात भाड्याने घर घेऊन राहतो आहे. चांगलं शिक्षण, स्टेबल नोकरी आहे. पुढच्या वर्षी पगार रु. ७ लाख, आणि त्याच्या पुढच्या वर्षी रु. ९.५ लाख होईल. (दोन्ही ग्रोस बिफोर टॅक्स.) (आणखी काही तपशील लागल्यास जरूर विचारा.) पुण्यात बर्‍यापैकी फ्लॅट घेण्यासाठी लागणारे एकूण पैसे = रु. २३ लाख. प्रश्नः वरील मुलाने कर्ज न घेता घर कसं घ्यावं? मुलाने जिंदगीत काय करावं (मनभावन असावं की नसावं, दळण आणताना लैफची मजा लुटावी की दात घासताना, इ०) हा प्रश्न नाहीये. प्रश्न आहे की वरील मुलाने कर्जाशिवाय घर घेण्यासाठी काय कृती केली पाहिजे? स्टेप १, स्टेप २ या पद्धतीने सांगितल्यास चट्कन कळेल.

In reply to by आदूबाळ

वरील मुलाने कर्जाशिवाय घर घेण्यासाठी काय कृती केली पाहिजे? एकच तर मुद्दा पहिल्यापासून सांगतोयं! त्याला पहिल्यांदाला हे ठरवावं लागेल की घर महत्त्वाचं की मनसोक्त जगणं. कारण कर्ज घेतलं की हप्ता आला आणि हप्ता आला की बांधिलकी आली. एकदा मनसोक्त जगणं मालकीच्या घरापेक्षा श्रेष्ठ आहे हे ठरलं की मनातलं द्वंद्व संपतं आणि द्वंद्व संपलं की भीती संपते ! माझीच स्टोरी सांगतो. २५ वर्षापूर्वी माझ्याकडे सगळं लिक्विडेट करुन ३.५० लाख होते. रिसेलमधला मला अत्यंत आवडलेला फ्लॅट ४ लाखाला होता. मी त्याला सांगितलं की माझ्याकडे ३.५० लाख आहेत, उद्या सकाळी व्यावहार होऊ शकतो. त्यानं सहा महीने इतर बायर्स शोधले, माझ्याशी निगोशिएट करत राहीला पण मी अत्यंत प्रामाणिकपणे मला कर्ज मंजूर नाही आणि आहे ते सर्व पैसे मी देतोयं हाच स्टँड ठेवला. शेवटी रेडी मनी हाच क्रायटेरिया यशस्वी झाला आणि आम्ही गृहप्रवेश केला. इट इज नॉट अ क्वेस्टशन ऑफ मनी, इट इज कन्विक्शन अँड द रेस्ट फॉलॉज.

In reply to by संजय क्षीरसागर

सर, पण मी (क्लायंट) तुमच्याकडे (कन्सल्टंट) हा प्रश्न घेऊन आलो आहे:
वरील मुलाने कर्ज न घेता घर कसं घ्यावं?
मी "कसं जगायचं" याचा सल्ला विचारलेलाच नाहीये. ---------------- एनीवे: तुमची स्टोरी आणि प्रस्तुत उदाहरण कंपेअरेबल नाहीये. तुमच्याकडे फ्लॅटच्या किमतीच्या ( ३.५० / ४ *१०० = ) ८७.५% पैसे उपलब्ध होते. तस्मात् विक्रेत्याने तुम्हाला १२.५% कॅश डिस्काऊंट दिला. असा १२.५% कॅश डिस्काऊंट विक्रेता आजही द्यायला तयार आहे असं समजू (कंपेअरेबिलिटी आणण्यासाठी.) म्हणजे, माझ्या उदाहरणातल्या मुलाला (२३ लाख * ८७.५% = ) रु. २०.१२५ लाख रुपये कॅशमध्ये उभे करावे लागतील. वरच्या उदाहरणातल्या मुलाकडे तेवढे नाहीत, आणि येत्या तीन वर्षांत उभे राहणं शक्य नाही हे उघड दिसतं आहे. ∴ पंचवीस वर्षांपूर्वीचे संक्षी आणि आजचा हा मुलगा आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या पायर्‍यांवर उभे आहेत. या परिस्थितीत सरसकटपणे "कर्ज न घेता घर घे बर्का" हा सल्ला देणं आणि मारी-आंत्वानेत-छाप "ब्रेड नसेल तर केक का खात नाहीस" हा सल्ला देणं हे मात्र कंपेअरेबल आहे! -----

In reply to by आदूबाळ

जगायचं कसं हा पश्न सोडवला की सगळे प्रश्न सुटतात. वरच्या उदाहरणातल्या मुलाकडे तेवढे नाहीत, आणि येत्या तीन वर्षांत उभे राहणं शक्य नाही हे उघड दिसतं आहे.... आणि पंचवीस वर्षांपूर्वीचे संक्षी आणि आजचा हा मुलगा आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या पायर्‍यांवर उभे आहेत. म्हणून तर सुरुवातीलाच म्हटलंय : त्याला पहिल्यांदाला हे ठरवावं लागेल की घर महत्त्वाचं की मनसोक्त जगणं. कारण कर्ज घेतलं की हप्ता आला आणि हप्ता आला की बांधिलकी आली. एकदा मनसोक्त जगणं मालकीच्या घरापेक्षा श्रेष्ठ आहे हे ठरलं की मनातलं द्वंद्व संपतं आणि द्वंद्व संपलं की भीती संपते ! तुझा फोकस घर घेण्यावर आहे, माझा जगण्यावर आहे. फ्लॅट सोडून द्यायची माझी तयारी होती. दुसरी गोष्ट मी सगळे पैसे एकदम लावायला तयार होतो. डिस्काऊंट % किती माझ्याकडे किती टक्के आहेत इतकी काँप्लीकेशन्स मी केलीच नाहीत. माझ्या किंमतीत फ्लॅट मिळाला तर घेईन नाही तर सोडून देईन ही मानसिकता कामी आली. आणि असे व्यावहार मी आजपर्यंत चार वेळा केलेत, प्रत्येक वेळी तीच मानसिकता होती आणि आजही तशीच आहे. त्यामुळे तो ब्रेड आणि केक असा इश्यू नाही. तर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे : इट इज नॉट अ क्वेस्टशन ऑफ मनी, इट इज कन्विक्शन अँड द रेस्ट फॉलोज.