भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे.
सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.
तर खूप वर्षे भारतात नोकरी केल्यावर आमच्या कंपनीने एकदाचे आम्हाला अमेरिकावारी घडवून आणण्याचे ठरवले. नियमाप्रमाणे सुरुवातीच्या खर्चासाठी $३००० हे ऍडव्हान्स म्हणून देतात, त्यातील $२८०० हे HDFC च्या प्री लोडेड डेबिट कार्डवर तर $२०० रोख अश्या स्वरूपात मिळतात. मला $२०० हे $१०० च्या २ नोटा अश्या स्वरूपात मिळाले. तेव्हा अमेरिकेची काहीच माहिती नसल्याने एवढा विचार केला नाही आणि $१०० च्या २ नोटा आणि बरोबर स्वतः घेतलेले थोडे डॉलर्स घेऊन न्यू यॉर्क मध्ये पाऊल ठेवले.
जवळचे सुट्टे डॉलर्स तर लगेच संपून गेले आणि $१०० च्या २ नोटा व डेबिट कार्ड वरचे $२८०० उरले. बहुतेक सर्व दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे बोर्ड्स लावलेले असतात. आता आली का पंचाईत, पक्का भारतीय असल्याने कॅशने खर्च करण्याची सवय आड येत होती आणि वर HDFC डेबिट कार्ड असल्याने काही ठिकाणी स्वीकारले जायचे तर काही ठिकाणी प्रॉब्लेम यायचे. दुकानदारांना HDFC म्हणजे काय हे माहित नसल्याने त्यांचीही काही मदत होऊ शकत नव्हती. शेवटी बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडताना त्यात सुरुवातीची रक्कम म्हणून भरून सुटका करून घेतली. मग BOA च्या डेबिट कार्डवरून ATM मधून $२० च्या नोटा मिळू लागल्या.
तर, अमेरिकन बँकेचे डेबिट कार्ड मिळवून एक अडथळा पार झाला. पण माझे मित्र म्हणत होते की क्रेडिट कार्ड काढणे महत्वाचे आहे कारण त्यातून क्रेडिट हिस्टरी तयार होते व ते पुढे बरेच फायदेशीर पडते. हे काही माझ्या डोक्यात शिरत नव्हते की एक तर क्रेडिट हिस्टरी का बनवायची आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे? मी माझी सगळी बिलं, म्हणजे विजेचं; पाण्याचं; फोनचं बिल, व्यवस्थित भरलं की झालं. पण तसं नाही, क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं कर्ज आहे आणि तुमची पत तयार करायची असेल तर हे कर्ज घेऊन ते सलग वेळच्या वेळी फेडले पाहिजे.
तरी पण विचार होता की क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे, उगाच कर्ज काढून नसतं लचांड मागे लावून घ्यायचं. पण मग एकदा गाडी भाड्याने घेताना लक्षात आलं की क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. डेबिट कार्डवर मिळत नाहीच असं नाही पण कमी रेंटल कंपन्या डेबिट कार्ड स्वीकारतात. मग आता क्रेडिट कार्ड मिळवणे आले. पण ते एवढे सोपे नाही. बँक ऑफ अमेरीकेने क्रेडिट कार्ड द्यायचे नाकारले म्हणून मग इथे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड म्हणून मिळते ते घ्यायचे ठरवले. हे थोडक्यात असे असते की तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम म्हणजे उदा. $१००० ठेवायची आणि त्याबदल्यात बँक तुम्हाला $१००० चे क्रेडिट कार्ड देणार, वर $४० वार्षिक फी पण घेणार. मी $१००० दिले व कार्डसाठी अर्ज दिला. पण इथेही नशीब असं की तो अर्ज पण रिजेक्ट झाला. इथे माझ्या नंतर आलेल्यांना महिन्याभरात क्रेडिट कार्ड्स मिळत होती आणि तब्बल १ वर्ष अकाउंट असूनही मला मात्र मिळत नव्हते.
अखेरीस दीड वर्षांनी एकदाचे बँक ऑफ अमेरिकेने कृपा केली आणि मला एक क्रेडिट कार्ड दिले. मग त्याचे बिल मी अगदी नित्यनेमाने भरले. होताहोता क्रेडिट स्कोअर वाढू लागला. मग हळू हळू कार्डच्या ऑफर यायला लागल्या. त्यात पहिली मिळालेली म्हणजे तुम्ही त्या कार्डवर, तुमच्या लिमिटच्या आत, कितीही खर्च करा पण जर का बिल वेळेवर भरलं तर प्रत्येक तिमाहीला $२५ कार्डवर क्रेडिट देणार. मग काय घेऊन टाकलं. थोड्या दिवसांनी अजून एका कार्डावर काहीतरी ऑफर मिळाली असं करता करता कार्ड्स जमा होऊ लागली. पण मग त्यांचे बिल वेळेवर भरणे ही एक डोकेदुखी होऊ लागली. जर का एक जरी दिवस उशीर झाला तरी भरभक्कम लेट फी आणि व्याज भरायला लागणार. पण मग ऑटो पे नावाची एक सुविधा कामी आली. मग कार्ड्स वरच्या जमा झालेल्या पॉइंट्सने एखादी वस्तू घेता यायला लागली. उदाहरणार्थ एक कार्डच्या पॉईंट्स वरून मला एकही पैसे न देता $८० चे ब्लूटूथ हेडसेट्स घेता आले. पण हे किरकोळ ठरेल असे दोन फायदे अजून दोन कार्डने मिळाले.
एका कार्डची ऑफर आली की कार्ड मिळाल्यावर पहिल्या ३ महिन्यात $३००० खर्च केले तर ५०००० पॉईंट्स मिळणार. या कार्डची वार्षिक फी $९५ होती जी पाहिलं वर्ष माफ असणार. म्हणून घेतलं कार्ड, पण $३००० खर्च करायचे? मग एक आयडिया काढली. तसंही घराचं भाडं भरायला लागतंच ते कार्ड वर भरूया. पण जर कम्युनिटीच्या (सोसायटी) च्या वेबसाईट वरून $३५ फी लागत होती. मग अजून शोध घेतला तर rent.कॉम नावाच्या एका साईटवर $२० चार्जेस होते. पण म्हणजे $६० खर्च करायचे? अजून एक आयडिया काढली की ३ महिन्याचं भाडं एकदम भरायचं मग त्याला पण $२० चार्जेस पडणार. पण मग $३००० ची एकदम सोय करायची? तर नाही, जर का नीट बघितलं तर पहिल्या महिन्याच्या शेवटी भाडं भरायला लागलं आणि ते भरायला जवळपास ५० दिवसाचा अवधी मिळाला. म्हणजे उलट मला $१००० ते $२००० वापरायला मिळाले.
आता या ५०००० पॉईंट्स चा काय फायदा होऊ शकतो? ५०००० पॉईंट्स म्हणजे ५०० डॉलर्स, एक मार्ग म्हणजे हे पॉईंट्स वापरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. पण मी दुसरा मार्ग निवडला. हे पॉईंट्स युनाइटेड एरलाईन्सला ट्रान्सफर करायची सुविधा होती. आणि ४२५०० पॉईंट्स वापरून पुणे ते अमेरिका वन वे तिकिट काढता येते, ज्याची तशी किंमत जवळपास ९००-१००० डॉलर्स असते. मला माझ्या वडिलांचे एका बाजूचे तिकीट या पॉईंट्सवर निघाले. पण आता परतीची पण सोय बघणे आवश्यक होते. पण ते वर्षभर थांबणार असल्याने वेळ होता. या कार्डला एक वर्ष पूर्ण होताच ते बंद करून टाकलं आणि अजून एक ऑफर घेतली ज्यात पहिल्या ३ महिन्यात $२००० खर्च केले की ४०००० पॉईंट्स आणि एक कार्ड वापरणारी व्यक्ती ऍड केली की १०००० पॉईंट्स असे ५०००० पॉईंट्स मिळणार होते. माझ्या कॅनडा ट्रीपचं बुकिंग मी या २००० डॉलर मध्ये केलं आणि टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे वडिलांचं परतीचं तिकीटसुद्धा ४२५०० पॉईंट्स च्या बदल्यात अमेरिका ते पुणे मिळालं. म्हणजे माझे जवळपास १५००-१७०० डॉलर्स वाचले.
पुढे दुसऱ्या एका कार्डवर एक ऑफर आली की ३ महिन्यात २००० डॉलर्स खर्च करायचे, यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचा फोन सगळे पैसे देऊन घेऊ शकता. आणि मग त्यातले ६५० डॉलर्स तुम्हाला परत मिळणार. म्हणजे मला ८०० डॉलर्सचा फोन फक्य २५० डॉलर्स ला पडला (बाकीचे खर्च मिळून).
तर मंडळी, क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? मी म्हणीन जर तुम्ही कार्डचं बिल वेळच्यावेळी पूर्णपणे भरू शकत असाल तर नक्कीच फायदेशीर आहे. पण मग ट्रान्झॅक्शन चार्जेसचं काय? अमेरिकेत तरी बहुतेक कुठल्याही दुकानात, पेट्रोल पंपावर चार्जेस लागत नाहीत. अर्थात अमेरिकेतली काही भारतीय दुकानं अपवाद आहेत, ज्यात $१० च्या आतल्या बिलासाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर ५० पैसे जादा द्यावे लागतात. पण त्याव्यतिरिक्त मला कुठे चार्जेस लागले नाहीत. उलट एक विशिष्ट सोय असलेलं कार्ड असेल तर दुसऱ्या देशात केलेल्या ट्रान्झॅक्शनवर पण Foreign Transaction चार्जेस लागत नाहीत.
अजून सांगायचे फायदे म्हणजे काही कार्ड्स अशी सुविधा देतात की रेंटल कार घेताना जर का ते कार्ड वापरलं तर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागत नाही. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी आणि त्याचा इन्शुरन्स असेल तर तो रेंटल कारला पण वापरता येतो. पण जर नसेल तर मात्र रेंटल कंपनीकडून इन्शुरन्स घ्यायला लागतो तो जवळपास गाडीच्या भाड्याएवढा असतो. तसेच कार्ड वापरून खरेदी केलेल्या वस्तूंना आपोआप जास्तीची वॉरंटी किंवा इन्शुरन्स आपोआप मिळतो. उदा. मी जर रेबॅनचा गॉगल एक कार्ड वापरून घेतला. पण ३ महिन्यांनी तो फुटला किंवा चोरीला गेला तर जरी रेबॅनने मला पैसे किंवा नवीन गॉगल द्यायला नकार दिला (माझा गहाळपणा हे कारण सांगून) तर मला कार्ड कंपनीकडून परतावा मिळतो. एखादी मोठी खरेदी, म्हणजे समजा आमची ४ जणांची भारतवारीची तिकिटं मी कार्ड वापरून काढली तर जवळपास ४-५ हजार डॉलर्स खर्च येतो. अश्या वेळेला मला बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा वापरता येते आणि त्याला भरायला बिनव्याजी १२-१८ महिन्यांचा कालावधी मिळतो. इथे स्टोअर कार्ड वापरून तुम्हाला त्या स्टोअरमधील खरेदीवर सूट मिळते. तसेच जमा झालेले पॉईंट्स पुढील खरेदीवर जास्तीची सूट मिळवून देतात.
अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच. उलट आता इथे नवीन आलेल्याला जर कार्ड लगेच मिळालं नाही तर त्रास होतो. तसेच तुम्ही केलेल्या काही उद्योगांमुळे क्रेडिट हिस्टरीवर परिणाम झाला असेल तरी कार्ड्स मिळत नाहीत व त्रास होतो.
हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा .... | लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
86867
प्रतिक्रिया
290
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचा दुसरा फ्लॅट
In reply to सुबोधजी, तुमचा मुद्दा हुकतो आहे by संजय क्षीरसागर
मला संक्षी साहेबाना एकच
सुबोधजी,
In reply to मला संक्षी साहेबाना एकच by सुबोध खरे
मिपावरीलच ९० % लोक( कदाचित ९९.९%) ज्यांनी इ एम आय वर घेतले आहे ते आनंदी आणि सुखात जगात आहेत असा माझा अंदाज आहे.लोक्स रुटीन जगतायंत ! जीवनाच्या प्राइम टाईमचा ९० % भाग जर ऑफिसमधे जातोयं तर स्वच्छंद कल्पनेत आहे, वास्तवात नाही. सुट्टीच्या दिवशी केलेली सहल म्हणजे आनंद नाही. सहलीला आल्यासारखं रोजचं जगणं हा खरा आनंद आहे.सहलीला आल्यासारखं रोजचं जगणं
In reply to सुबोधजी, by संजय क्षीरसागर
हप्र !
In reply to सहलीला आल्यासारखं रोजचं जगणं by हतोळकरांचा प्रसाद
काम करण्यात जेवढा आनंद गाठीला जमा होतो तो इतर कुठल्याही गोष्टीने होत नाही.स्वच्छंद आणि अकर्मण्य यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. काम स्वेच्छेचं असेल तरच आनंद आहे. नाही तर बलात्कार आणि संभोग यात फरकच उरला नसता.कर्मण्य- अकर्मण्य असा विषयच
In reply to हप्र ! by संजय क्षीरसागर
हप्र !
In reply to कर्मण्य- अकर्मण्य असा विषयच by हतोळकरांचा प्रसाद
स्वछंदी जगणे हि एक वृत्ती आहे. त्याचा आर्थिकतेशी किंवा आर्थिक नियोजनाशी संबंध नसावास्वच्छंद जगण्यासाठी मोकळा वेळ हवा. जर इएमआयचं तुमचा महत्त्वाचा वेळ घेत असेल तर कसला आलायं स्वच्छंद ?कामावर जाणे आणि स्वछंदी असणे याचा काही संबंध नाही.स्वेच्छेनं केलेलं काम आणि कामावर जाण्यापरता पर्यायच नाही ही परिस्थिती यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. त्यामुळेच बहुदा तुम्हाला बलात्कार आणि संभोग यातला फरक कळला नाही !नाक्यावरचे मवाली पोरं -
In reply to हप्र ! by संजय क्षीरसागर
ह प्र साहेब
In reply to नाक्यावरचे मवाली पोरं - by हतोळकरांचा प्रसाद
एकच मुद्दा आहे !
In reply to नाक्यावरचे मवाली पोरं - by हतोळकरांचा प्रसाद
दळण आणणेदेखील उत्सवासारखे साजरा करता येत असताना नौकरीतला प्रत्येक दिवस बांधून ठेवणारा असतो असं का वाटावं? लिफ्टचा दरवाजा उघडणे आणि लिफ्ट खाली वर करण्याची नौकरीदेखील आत येणाऱ्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लोकांमुळे किती वेगळी ठरू शकते.दळण आणणं माझा ऑप्शन आहे, मी जाईन न जाईन. लिफ्टमन लिफ्ट सोडू शकत नाही आणि नोकरादार खुर्चीवरुन हालू शकत नाही . आणि इएमायवाला तर शक्यच नाही. बळजबरी आणि स्वेच्छा हा फरक तुम्हाला समजावं म्हणून संभोग आणि बलात्काराचं उदाहरण दिलं. ते जर निरर्थक वाटत असेल तर बहुदा बलात्कारालाच तुम्ही संभोग समतायं.तुम्ही ज्याला स्वछंदीपणा
In reply to एकच मुद्दा आहे ! by संजय क्षीरसागर
.
In reply to तुम्ही ज्याला स्वछंदीपणा by हतोळकरांचा प्रसाद
तुमच्या नॉन-इमर्जन्सी प्रकारातल्या व्यवसायामुळे आलेली मोकळीक आहे एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहेतुम्ही लाईफ सेवींग व्यावसायात आहात काय ?मला ईएमआय आहे म्हणून मी खुर्चीवरून हलू शकत नाही हा दावा फोल आहे. मी स्वेच्छेने कामाला जातो, एन्जॉय करतोमग तुम्ही स्वच्छंदावर बोला ना ! काय असतं तुमचं रुटीन ? सकाळी ९ ते संध्याकाळी ५ मधे नोकरीच्या कामाव्यतिरिक्त काय छंद पुरवता ?माझ्याकडे उदंड पैसा असता आणि तुमच्यासारखा नॉन-इमर्जन्सी वैयक्तिक व्यवसाय असता तरी मी मला वाटलं तेव्हा दळण आणायला जाता यावं असा स्वछंद जोपासला नसता.तुम्हाला मुद्दा समजत असेल तर बघा. काम हे निर्वैयक्तिक आहे. तुम्ही कोड क्रॅकींकचा विषय काढला म्हणून मी दळणाचं उदाहरण दिलं. पुन्हा बघा : आनंद कामात नाही, काम न करण्याच्या विकल्पात आहे.संक्षि, मी काय म्हणतो आपण
In reply to . by संजय क्षीरसागर
स्वच्छंदाची माझी व्याख्या साधी आहे
In reply to संक्षि, मी काय म्हणतो आपण by हतोळकरांचा प्रसाद
आपल्यासोबत घडणारी प्रत्येक गोष्ट हसत खेळत आनंदाने उपभोगणे म्हणजे स्वछंदीपणाप्रश्न समोर आलेलं काम आनंदानं करण्याचा नाही. त्याला हात घालण्यापूर्वी ते करु किंवा न करु ही असलेली आपमर्जी. ही आपमर्जी जर प्रामाणिकपणे उपलब्ध असेल तर कामाच्या प्रत्येक क्षणी ते केव्हाही थांबवण्याचा विकल्पही अनायासे उपलब्ध असतोच. या स्थितीत मन दुय्यम आणि आपण प्राथमिक असतो. असं काम अत्यंत सहजपणे पूर्ण होतं कारण मनाला सैरभैर व्हायला वावच नसतो. अशा कामातून कार्यपूर्तीचा आनंद मिळतो कारण फलप्राप्ती लक्ष वेधून घेत नाही तस्मात, आपला फोकस भविष्याकडे न लागता वर्तमानात स्थिर असतो. असं काम बहुदा वेळेपूर्वीच पूर्ण झालेलं असतं आणि त्याचा मोबदला अॅडीशनल बोनस मिळावा असं सुख देऊन जातो. माझ्या दृष्टीनं हा खरा कर्मयोग आहे. मागच्या प्रतिसादात मी स्वच्छंद केव्हापासून जगतोयं असं तुम्ही विचारलं होतं. साधारण १९९७ च्या दरम्यान मी संपूर्ण क्षणस्थ झालो, तेव्हापासून वर्तमान हा एकच काळ रिलेवंट झाला. तस्मात, स्वच्छंद जगण्याचा वीस वर्षांचा अनुभवान या प्रतिसादामागे आहे.ओके. म्हणजे आपल्या व्याख्या
In reply to स्वच्छंदाची माझी व्याख्या साधी आहे by संजय क्षीरसागर
तस्मात, स्वच्छंद जगण्याचा वीस
In reply to स्वच्छंदाची माझी व्याख्या साधी आहे by संजय क्षीरसागर
खरंतर विषय काय आहे हेच आठवत
In reply to कर्मण्य- अकर्मण्य असा विषयच by हतोळकरांचा प्रसाद
खरंतर विषय काय आहे हेच आठवत नाहीयेहांग अश्शी ! म्हणजे तुम्हाला नक्की काय चालले आहे याचे पूर्ण ज्ञान झालेले आहेच की ;) =)) =)) (सर्वांनी हघ्या ! :) )मिपावर असे होतेच :)
In reply to कर्मण्य- अकर्मण्य असा विषयच by हतोळकरांचा प्रसाद
मिपावर असे होतेच.
In reply to मिपावर असे होतेच :) by गॅरी ट्रुमन
म्हणजे रोज ह्पिसच्या बसमध्ये
In reply to सहलीला आल्यासारखं रोजचं जगणं by हतोळकरांचा प्रसाद
=))
In reply to म्हणजे रोज ह्पिसच्या बसमध्ये by अप्पा जोगळेकर
डॉक्टरसाहेब,
फ्लॅट बुकींगमधे घेतले तर
In reply to डॉक्टरसाहेब, by संदीप डांगे
बिल्डींग कागदावर असो वा
In reply to फ्लॅट बुकींगमधे घेतले तर by सुबोध खरे
भोंगळ युग्तीवात
In reply to बिल्डींग कागदावर असो वा by संदीप डांगे
बुकिंग मध्ये घर अपफ्रंट
In reply to भोंगळ युग्तीवात by सुबोध खरे
माझ्या भावाने २०१० मध्ये
In reply to बुकिंग मध्ये घर अपफ्रंट by संदीप डांगे
तुम्ही काय बोलताय ते तुमचं
In reply to माझ्या भावाने २०१० मध्ये by सुबोध खरे
भोंगळ युग्तीवात
In reply to तुम्ही काय बोलताय ते तुमचं by संदीप डांगे
भोंगळ युग्तीवातबाकी काहीही असो पण
बाकी डांगे सर कोणी फ्लॅट
In reply to बाकी काहीही असो पण by वरुण मोहिते
डांगेअण्णा कधी कधी तुम्ही मला
In reply to बाकी डांगे सर कोणी फ्लॅट by संदीप डांगे
=)) =))
In reply to डांगेअण्णा कधी कधी तुम्ही मला by गणामास्तर
क्षमा असावी, बोल्ड सगळेच झाले
In reply to बाकी डांगे सर कोणी फ्लॅट by संदीप डांगे
संदीप,
In reply to क्षमा असावी, बोल्ड सगळेच झाले by संदीप डांगे
गुंतवणूक म्हणून कर्ज काढून घर घेणे व त्यासाठी गरज नसतांना ऐपत आहे म्हणून ईमाय चे शुक्लकाष्ठ मागे लावून घेणे माझ्या वैयक्तिक मतांनुसार योग्य नव्हे. अशाने बाजारातली अनावश्यक फुगलेली मागणी कमी होईल, त्याने दर कमी होतील व गरजू लोकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळतील.शंभर टक्के बरोबरे ! पब्लिक हेवी इएमआय घ्यायला तयार आहे हे बघून बिल्डर्सनी रिवर्स वर्कींग करुन फ्लॅटच्या किंमती भडकवल्या आहेत. कंस्ट्रक्शन कॉस्ट इतकी बेफाट अजिबात वाढलेली नाही. त्यात लोकांचा फ्लॅटकडे इनवेस्टमेंट म्हणून बघण्याचा अँगल आणि गरज नसतांना दोनदोन फ्लॅट घेणं ही तर गरजूंच्या जीवावर केलेली सट्टेबाजी आहे. जर लोकांनी सूज्ञ विचार करुन ही सट्टेबाजी थांबवली तर बिल्डर्स झक मारत लाईनीत येतील आणि गरजवंतांना घरं मिळू शकतील.वमो,
In reply to बाकी काहीही असो पण by वरुण मोहिते
स्वच्छंदीपणा म्हणजे मनात येईल तेव्हा काम करणे नाही तर योग्य जबाबदाऱ्या सांभाळून मिळालेला वेळ सत्कारणी लावणेस्वच्छंद म्हणजे जवाबदारी वगैरे विचारच मनात न येणं ! मी स्वतः (वडीलांच्या रिटायरमेंटनंतर) एकत्र कुटुंबाचा कर्ता आहे आणि तरीही स्वच्छंद आहे.कारण कामात मजा असतेमजा काम स्वेच्छेनं करण्यात असते. कोणतंही काम निर्वयैक्तिक आहे, त्यात मजा तुम्ही आणता. पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण आणायचा मी उत्सव करतो. दळणवाल्याशी गपा, मध्यंतरीच्या काळात तीच्याबरोबर घेतलेला कटींग चहा, चहा घ्यायला जातांना तिच्याबरोबर झालेली एक-दीड किलोमिटरची पायपीट आणि तीची केली छेडखानी, ओझं हलकं करण्यासाठी दोघांनी धरलेला पिशवीचा एकेक बंद....आणि लोक्स दळण आणणं जवाबदारी समजतात. सो द पॉइंट इज, इट इज नॉट द वर्क बट दि ऑप्शन नॉट टू वर्क इज द फन !त्यामुळे कसलही कर्ज असल तरी रात्रंदिवस लोक तोच विचार करतात स्वच्छंदी जगत नाहीत असं काही एक नाही आहे .इएमआयवाले झोप येत असली तरी हप्त्याचा विचाराचं हँडलच जोरदार फिरवून सकाळी उठतात हा सार्वत्रिक अनुभव आहे.हँडल
In reply to वमो, by संजय क्षीरसागर
अहो, तो त्यांचा छंद आहे.
In reply to हँडल by गॅरी ट्रुमन
गॅरी,
In reply to हँडल by गॅरी ट्रुमन
तुमच्या क्लाएंटची गरज, त्यांनी दिलेली डेडलाईन इत्यादी विचारांचे हँडल जोरदार फिरवून तुम्ही सकाळी कसे उठत नाही याचेच आश्चर्य वाटत आहे.कारण मला इएमआयचं झेंगट नाही ! सकाळी खेळायला मजा येते म्हणून उठतो (याला विकल्प म्हणतात) आणि मन मानेल तेव्हाच काम करतो. तरीही (किंवा त्यामुळेच ) माझी सगळी कामं वेळेपूर्वीच संपलेली असतात. इथेच काही क्लायंटस आहेत आणि त्यांच्यासमोर लिहीतोयं, याशिवाय आणखी वेगळ्या पुराव्याची गरज नाही.मी तर बा सकाळी एकच हॅण्डल
In reply to हँडल by गॅरी ट्रुमन
हहपुवा
In reply to मी तर बा सकाळी एकच हॅण्डल by चिनार
=)) =)) =))
In reply to मी तर बा सकाळी एकच हॅण्डल by चिनार
हो ना...
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
नव्हे नव्हे, ते एखाद्या
In reply to हो ना... by चिनार
चायला हसुन फुटलो ना. आईशप्पथ
In reply to नव्हे नव्हे, ते एखाद्या by खेडूत
काहीतरीच काय
In reply to नव्हे नव्हे, ते एखाद्या by खेडूत
ख्या ख्या ख्या ख्या!!!!!
In reply to काहीतरीच काय by ट्रेड मार्क
अगागागा! :):):)
In reply to मी तर बा सकाळी एकच हॅण्डल by चिनार
पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण
In reply to वमो, by संजय क्षीरसागर
मला तर संक्षी म्हणजे जादूगारच
In reply to पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण by अप्पा जोगळेकर
=))))))
In reply to पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण by अप्पा जोगळेकर
एखाद्याने लोकांची दळणे आणून
In reply to पत्नीबरोबर जाऊन १५ किलोचं दळण by अप्पा जोगळेकर
कुठल्याही कामाचा जर उत्सव करु
In reply to वमो, by संजय क्षीरसागर
इट इज द अदर वे
In reply to कुठल्याही कामाचा जर उत्सव करु by बाळ सप्रे
उत्सव
In reply to इट इज द अदर वे by संजय क्षीरसागर
बाकी सगळे करा
धमु,
In reply to बाकी सगळे करा by धर्मराजमुटके
कामाच्या वेळेत (म्हणजे साधारण १० ते ६ ) कामासाठीचा फोन आला असेल तर 'ते झोपले आहेत' असा निरोप समोरच्याकडे पोहोचवू नका प्लीज.खरं बोलणारा कायम निर्धास्त असतो. एकदा सुरु केल्यावर काम संपल्याशिवाय मी जेवत सुद्धा नाही. आणि रात्री दोन वाजता काय की पहाटे चार वाजता सुद्धा काम करु शकतो. क्लायंटचा एकही ओरिजिनल पेपर माझ्याकडे नाही, माझं ऑफिस पूर्णपणे पेपरलेस आहे आणि क्लायंटचे (इन्कमटॅक्स , वॅट वगैरेचे) पासवर्डस बिनदिक्कतपणे त्यांचाकडे दिलेले आहेत. त्यामुळे मी केव्हाही झोपू शकतो आणि घरचेही नेमकं तेच सांगतात.देवा
In reply to धमु, by संजय क्षीरसागर
मी तर चार दिवसाआधीच दंडवत
In reply to देवा by धर्मराजमुटके
डांगे सर
अगदी योग्य आणि सुंदर प्रश्न
In reply to डांगे सर by वरुण मोहिते
संजयजी
.
In reply to संजयजी by ट्रेड मार्क
व्यावहारिक जगात कर्ज न घेता घर किंवा कोणतीही मालमत्ता कशी घ्यायची ते प्लीज सगळ्यांना सांगा.यावर मागच्या प्रतिसादात. चर्चा झाली आहे.तुमच्या व्यवसायाप्रमाणे तुम्ही किती स्वच्छंदपणे प्रत्येक दिवशी जगू शकता शकता हे ठरतं. ...त्यामुळे स्वच्छंद जगायला पाहिजे हे तत्वतः ठीक आहे पण वास्तवात ते सगळ्यांनाच सतत शक्य होईल असे नाही.पुन्हा तोच मुद्दा येतोयं. काम न करण्याचा विकल्प काम स्वच्छंद करतो. आता शेवटी एकदाच सांगतो : प्रत्येक काम न्यूट्रल आहे मग तो चित्रकार असो, सर्जन असो की मी उदाहरण दिलंय ते दळण आणायचं काम असो. आनंद कामात नाही, तुमच्यात आहे. एखादा चित्रकारही क्लायंटची डेड लाईन आहे म्हणून मन मारुन चित्र पूर्ण करुन देऊ शकतो आणि दळण आणण्याची कुठलीही बळजबरी नसतांना केवळ मजा म्हणून दळण आणता येतं. एक्स्ट्रीम उदाहरण द्यायचं झालं तर वेश्येचं देता येईल. संभोग एकच आहे पण वेश्येला तो बलात्कार आहे कारण तिला विकल्प नाही. तस्मात, ज्या वेळी काम न करण्याचा विकल्प हरवतो त्या वेळी काम प्राथमिक आणि आपण दुय्यम होतो. परिणामतः कामातला स्वच्छंद हरवतो. नीट बघा, प्रश्न काम न करण्याचा नाही. ते स्वेच्छेनं करण्याचा आहे. जिथे विकल्प आहे तिथे काम आनंद देऊन जातं कारण तुम्ही प्राथमिक आणि काम दुय्यम असतं. इएमआयवाला वर्तमान भविष्याकडे उधार ठेवून असतो त्यामुळे त्याचा काम न करण्याचा विकल्प हरवतो.अजूनही स्पष्ट नाहीये
In reply to . by संजय क्षीरसागर
उद्या जेवण मिळालं नाही तरी बेहत्तर अशा जिद्दीनं, एका वेळी सगळेच्या सगळे पैसे आणि इतर सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन तुम्ही फ्लॅटवर लावायला तयार आहात का?" तर माझ्याकडे हे सगळं करूनही २०% नव्हते. मग मी काय करायला पाहिजे होते?इएमआयवाला वर्तमान भविष्याकडे उधार ठेवून असतो त्यामुळे त्याचा काम न करण्याचा विकल्प हरवतो.समजा माझ्याकडे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळे पैसे काढून आणि सर्व इनवेस्टमेंटस लिक्विडेट करुन ५० लाख रुपये जमा होतात. मी हे सगळं करून ५० लाखाचा फ्लॅट घेतला. आता माझ्या बँकेत एक पैसा नाहीये. मग माझ्याकडे काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असेल का? जर एखादी कठीण वेळ आली तर मी पैसे कसे उभे करणार? आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर मी २०% म्हणजे १० लाख भरले व फ्लॅट घेतला. ईएमआय माझ्या उत्पनातून सहज भरला जातोय. आता माझ्याकडे या फ्लॅटशिवाय ४० लाखाची मालमत्ता अजून आहे. समजा काही कठीण वेळ आलीच तर मी या ४० लाखातून खर्च करू शकतो.ट्रेमा,
In reply to अजूनही स्पष्ट नाहीये by ट्रेड मार्क
आता माझ्या बँकेत एक पैसा नाहीये. मग माझ्याकडे काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असेल का? जर एखादी कठीण वेळ आली तर मी पैसे कसे उभे करणार?यालाच तर साहस म्हणतात ! अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, वीसवर्षापूर्वी जेव्हा स्वच्छंद जगायचा निर्णय घेतला तेव्हा मी पैसे मोजले नाहीत, फक्त भविष्य या कल्पनेला पराभूत केलं. आणि माझ्या जीवनातला धसका संपला ! त्या वेळी वडील रिटायर्ड होते आणि सहा जणांच्या कुटुंबाची जवाबदारी प्रॅक्टीकली माझ्यावर होती. आज वीस वर्षानंतरसुद्धा दोन / तीन फ्लॅटस असणारे आणि करोडो रुपयांची इनवेस्टमेंट केलेले माझे मित्र मला त्या वेळी विचारलेला प्रश्नच विचारतात `असं जगायला नक्की किती पैसा लागतो ?' खाली दिलेल्या या प्रतिसादाचा कदाचित तुम्हाला उपयोग होईल. माझा एकच फंडा आहे आपण पैश्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. काय वाट्टेल ते झालं तरी पैसा प्राथमिक आणि आपण दुय्यम होता कामा नाही. एकदा हा निश्चय झाला की `दि ऑप्शन नॉट टू वर्क ' उपलब्ध होतो आणि जगणं स्वच्छंद होतंव्यावहारिक जगात कर्ज न घेता
In reply to . by संजय क्षीरसागर
पुण्यात 23 लाखात? कुठे? :):)
In reply to व्यावहारिक जगात कर्ज न घेता by आदूबाळ
आबा,
In reply to व्यावहारिक जगात कर्ज न घेता by आदूबाळ
वरील मुलाने कर्जाशिवाय घर घेण्यासाठी काय कृती केली पाहिजे?एकच तर मुद्दा पहिल्यापासून सांगतोयं! त्याला पहिल्यांदाला हे ठरवावं लागेल की घर महत्त्वाचं की मनसोक्त जगणं. कारण कर्ज घेतलं की हप्ता आला आणि हप्ता आला की बांधिलकी आली. एकदा मनसोक्त जगणं मालकीच्या घरापेक्षा श्रेष्ठ आहे हे ठरलं की मनातलं द्वंद्व संपतं आणि द्वंद्व संपलं की भीती संपते ! माझीच स्टोरी सांगतो. २५ वर्षापूर्वी माझ्याकडे सगळं लिक्विडेट करुन ३.५० लाख होते. रिसेलमधला मला अत्यंत आवडलेला फ्लॅट ४ लाखाला होता. मी त्याला सांगितलं की माझ्याकडे ३.५० लाख आहेत, उद्या सकाळी व्यावहार होऊ शकतो. त्यानं सहा महीने इतर बायर्स शोधले, माझ्याशी निगोशिएट करत राहीला पण मी अत्यंत प्रामाणिकपणे मला कर्ज मंजूर नाही आणि आहे ते सर्व पैसे मी देतोयं हाच स्टँड ठेवला. शेवटी रेडी मनी हाच क्रायटेरिया यशस्वी झाला आणि आम्ही गृहप्रवेश केला. इट इज नॉट अ क्वेस्टशन ऑफ मनी, इट इज कन्विक्शन अँड द रेस्ट फॉलॉज.सर, पण मी (क्लायंट)
In reply to आबा, by संजय क्षीरसागर
कन्सलटंसीचा काय उपयोग आहे ?
In reply to सर, पण मी (क्लायंट) by आदूबाळ
वरच्या उदाहरणातल्या मुलाकडे तेवढे नाहीत, आणि येत्या तीन वर्षांत उभे राहणं शक्य नाही हे उघड दिसतं आहे.... आणि पंचवीस वर्षांपूर्वीचे संक्षी आणि आजचा हा मुलगा आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या पायर्यांवर उभे आहेत.म्हणून तर सुरुवातीलाच म्हटलंय :त्याला पहिल्यांदाला हे ठरवावं लागेल की घर महत्त्वाचं की मनसोक्त जगणं. कारण कर्ज घेतलं की हप्ता आला आणि हप्ता आला की बांधिलकी आली. एकदा मनसोक्त जगणं मालकीच्या घरापेक्षा श्रेष्ठ आहे हे ठरलं की मनातलं द्वंद्व संपतं आणि द्वंद्व संपलं की भीती संपते !तुझा फोकस घर घेण्यावर आहे, माझा जगण्यावर आहे. फ्लॅट सोडून द्यायची माझी तयारी होती. दुसरी गोष्ट मी सगळे पैसे एकदम लावायला तयार होतो. डिस्काऊंट % किती माझ्याकडे किती टक्के आहेत इतकी काँप्लीकेशन्स मी केलीच नाहीत. माझ्या किंमतीत फ्लॅट मिळाला तर घेईन नाही तर सोडून देईन ही मानसिकता कामी आली. आणि असे व्यावहार मी आजपर्यंत चार वेळा केलेत, प्रत्येक वेळी तीच मानसिकता होती आणि आजही तशीच आहे. त्यामुळे तो ब्रेड आणि केक असा इश्यू नाही. तर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे :इट इज नॉट अ क्वेस्टशन ऑफ मनी, इट इज कन्विक्शन अँड द रेस्ट फॉलोज.