क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का?
लेखनविषय (Tags)
भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे.
सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.
तर खूप वर्षे भारतात नोकरी केल्यावर आमच्या कंपनीने एकदाचे आम्हाला अमेरिकावारी घडवून आणण्याचे ठरवले. नियमाप्रमाणे सुरुवातीच्या खर्चासाठी $३००० हे ऍडव्हान्स म्हणून देतात, त्यातील $२८०० हे HDFC च्या प्री लोडेड डेबिट कार्डवर तर $२०० रोख अश्या स्वरूपात मिळतात. मला $२०० हे $१०० च्या २ नोटा अश्या स्वरूपात मिळाले. तेव्हा अमेरिकेची काहीच माहिती नसल्याने एवढा विचार केला नाही आणि $१०० च्या २ नोटा आणि बरोबर स्वतः घेतलेले थोडे डॉलर्स घेऊन न्यू यॉर्क मध्ये पाऊल ठेवले.
जवळचे सुट्टे डॉलर्स तर लगेच संपून गेले आणि $१०० च्या २ नोटा व डेबिट कार्ड वरचे $२८०० उरले. बहुतेक सर्व दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे बोर्ड्स लावलेले असतात. आता आली का पंचाईत, पक्का भारतीय असल्याने कॅशने खर्च करण्याची सवय आड येत होती आणि वर HDFC डेबिट कार्ड असल्याने काही ठिकाणी स्वीकारले जायचे तर काही ठिकाणी प्रॉब्लेम यायचे. दुकानदारांना HDFC म्हणजे काय हे माहित नसल्याने त्यांचीही काही मदत होऊ शकत नव्हती. शेवटी बँक ऑफ अमेरिकेत खाते उघडताना त्यात सुरुवातीची रक्कम म्हणून भरून सुटका करून घेतली. मग BOA च्या डेबिट कार्डवरून ATM मधून $२० च्या नोटा मिळू लागल्या.
तर, अमेरिकन बँकेचे डेबिट कार्ड मिळवून एक अडथळा पार झाला. पण माझे मित्र म्हणत होते की क्रेडिट कार्ड काढणे महत्वाचे आहे कारण त्यातून क्रेडिट हिस्टरी तयार होते व ते पुढे बरेच फायदेशीर पडते. हे काही माझ्या डोक्यात शिरत नव्हते की एक तर क्रेडिट हिस्टरी का बनवायची आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे? मी माझी सगळी बिलं, म्हणजे विजेचं; पाण्याचं; फोनचं बिल, व्यवस्थित भरलं की झालं. पण तसं नाही, क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचं कर्ज आहे आणि तुमची पत तयार करायची असेल तर हे कर्ज घेऊन ते सलग वेळच्या वेळी फेडले पाहिजे.
तरी पण विचार होता की क्रेडिट कार्ड कशाला पाहिजे, उगाच कर्ज काढून नसतं लचांड मागे लावून घ्यायचं. पण मग एकदा गाडी भाड्याने घेताना लक्षात आलं की क्रेडिट कार्ड गरजेचे आहे. डेबिट कार्डवर मिळत नाहीच असं नाही पण कमी रेंटल कंपन्या डेबिट कार्ड स्वीकारतात. मग आता क्रेडिट कार्ड मिळवणे आले. पण ते एवढे सोपे नाही. बँक ऑफ अमेरीकेने क्रेडिट कार्ड द्यायचे नाकारले म्हणून मग इथे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड म्हणून मिळते ते घ्यायचे ठरवले. हे थोडक्यात असे असते की तुम्ही बँकेत एक ठराविक रक्कम म्हणजे उदा. $१००० ठेवायची आणि त्याबदल्यात बँक तुम्हाला $१००० चे क्रेडिट कार्ड देणार, वर $४० वार्षिक फी पण घेणार. मी $१००० दिले व कार्डसाठी अर्ज दिला. पण इथेही नशीब असं की तो अर्ज पण रिजेक्ट झाला. इथे माझ्या नंतर आलेल्यांना महिन्याभरात क्रेडिट कार्ड्स मिळत होती आणि तब्बल १ वर्ष अकाउंट असूनही मला मात्र मिळत नव्हते.
अखेरीस दीड वर्षांनी एकदाचे बँक ऑफ अमेरिकेने कृपा केली आणि मला एक क्रेडिट कार्ड दिले. मग त्याचे बिल मी अगदी नित्यनेमाने भरले. होताहोता क्रेडिट स्कोअर वाढू लागला. मग हळू हळू कार्डच्या ऑफर यायला लागल्या. त्यात पहिली मिळालेली म्हणजे तुम्ही त्या कार्डवर, तुमच्या लिमिटच्या आत, कितीही खर्च करा पण जर का बिल वेळेवर भरलं तर प्रत्येक तिमाहीला $२५ कार्डवर क्रेडिट देणार. मग काय घेऊन टाकलं. थोड्या दिवसांनी अजून एका कार्डावर काहीतरी ऑफर मिळाली असं करता करता कार्ड्स जमा होऊ लागली. पण मग त्यांचे बिल वेळेवर भरणे ही एक डोकेदुखी होऊ लागली. जर का एक जरी दिवस उशीर झाला तरी भरभक्कम लेट फी आणि व्याज भरायला लागणार. पण मग ऑटो पे नावाची एक सुविधा कामी आली. मग कार्ड्स वरच्या जमा झालेल्या पॉइंट्सने एखादी वस्तू घेता यायला लागली. उदाहरणार्थ एक कार्डच्या पॉईंट्स वरून मला एकही पैसे न देता $८० चे ब्लूटूथ हेडसेट्स घेता आले. पण हे किरकोळ ठरेल असे दोन फायदे अजून दोन कार्डने मिळाले.
एका कार्डची ऑफर आली की कार्ड मिळाल्यावर पहिल्या ३ महिन्यात $३००० खर्च केले तर ५०००० पॉईंट्स मिळणार. या कार्डची वार्षिक फी $९५ होती जी पाहिलं वर्ष माफ असणार. म्हणून घेतलं कार्ड, पण $३००० खर्च करायचे? मग एक आयडिया काढली. तसंही घराचं भाडं भरायला लागतंच ते कार्ड वर भरूया. पण जर कम्युनिटीच्या (सोसायटी) च्या वेबसाईट वरून $३५ फी लागत होती. मग अजून शोध घेतला तर rent.कॉम नावाच्या एका साईटवर $२० चार्जेस होते. पण म्हणजे $६० खर्च करायचे? अजून एक आयडिया काढली की ३ महिन्याचं भाडं एकदम भरायचं मग त्याला पण $२० चार्जेस पडणार. पण मग $३००० ची एकदम सोय करायची? तर नाही, जर का नीट बघितलं तर पहिल्या महिन्याच्या शेवटी भाडं भरायला लागलं आणि ते भरायला जवळपास ५० दिवसाचा अवधी मिळाला. म्हणजे उलट मला $१००० ते $२००० वापरायला मिळाले.
आता या ५०००० पॉईंट्स चा काय फायदा होऊ शकतो? ५०००० पॉईंट्स म्हणजे ५०० डॉलर्स, एक मार्ग म्हणजे हे पॉईंट्स वापरून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. पण मी दुसरा मार्ग निवडला. हे पॉईंट्स युनाइटेड एरलाईन्सला ट्रान्सफर करायची सुविधा होती. आणि ४२५०० पॉईंट्स वापरून पुणे ते अमेरिका वन वे तिकिट काढता येते, ज्याची तशी किंमत जवळपास ९००-१००० डॉलर्स असते. मला माझ्या वडिलांचे एका बाजूचे तिकीट या पॉईंट्सवर निघाले. पण आता परतीची पण सोय बघणे आवश्यक होते. पण ते वर्षभर थांबणार असल्याने वेळ होता. या कार्डला एक वर्ष पूर्ण होताच ते बंद करून टाकलं आणि अजून एक ऑफर घेतली ज्यात पहिल्या ३ महिन्यात $२००० खर्च केले की ४०००० पॉईंट्स आणि एक कार्ड वापरणारी व्यक्ती ऍड केली की १०००० पॉईंट्स असे ५०००० पॉईंट्स मिळणार होते. माझ्या कॅनडा ट्रीपचं बुकिंग मी या २००० डॉलर मध्ये केलं आणि टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे वडिलांचं परतीचं तिकीटसुद्धा ४२५०० पॉईंट्स च्या बदल्यात अमेरिका ते पुणे मिळालं. म्हणजे माझे जवळपास १५००-१७०० डॉलर्स वाचले.
पुढे दुसऱ्या एका कार्डवर एक ऑफर आली की ३ महिन्यात २००० डॉलर्स खर्च करायचे, यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचा फोन सगळे पैसे देऊन घेऊ शकता. आणि मग त्यातले ६५० डॉलर्स तुम्हाला परत मिळणार. म्हणजे मला ८०० डॉलर्सचा फोन फक्य २५० डॉलर्स ला पडला (बाकीचे खर्च मिळून).
तर मंडळी, क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? मी म्हणीन जर तुम्ही कार्डचं बिल वेळच्यावेळी पूर्णपणे भरू शकत असाल तर नक्कीच फायदेशीर आहे. पण मग ट्रान्झॅक्शन चार्जेसचं काय? अमेरिकेत तरी बहुतेक कुठल्याही दुकानात, पेट्रोल पंपावर चार्जेस लागत नाहीत. अर्थात अमेरिकेतली काही भारतीय दुकानं अपवाद आहेत, ज्यात $१० च्या आतल्या बिलासाठी क्रेडिट कार्ड वापरलं तर ५० पैसे जादा द्यावे लागतात. पण त्याव्यतिरिक्त मला कुठे चार्जेस लागले नाहीत. उलट एक विशिष्ट सोय असलेलं कार्ड असेल तर दुसऱ्या देशात केलेल्या ट्रान्झॅक्शनवर पण Foreign Transaction चार्जेस लागत नाहीत.
अजून सांगायचे फायदे म्हणजे काही कार्ड्स अशी सुविधा देतात की रेंटल कार घेताना जर का ते कार्ड वापरलं तर इन्शुरन्स वेगळा घ्यायला लागत नाही. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी आणि त्याचा इन्शुरन्स असेल तर तो रेंटल कारला पण वापरता येतो. पण जर नसेल तर मात्र रेंटल कंपनीकडून इन्शुरन्स घ्यायला लागतो तो जवळपास गाडीच्या भाड्याएवढा असतो. तसेच कार्ड वापरून खरेदी केलेल्या वस्तूंना आपोआप जास्तीची वॉरंटी किंवा इन्शुरन्स आपोआप मिळतो. उदा. मी जर रेबॅनचा गॉगल एक कार्ड वापरून घेतला. पण ३ महिन्यांनी तो फुटला किंवा चोरीला गेला तर जरी रेबॅनने मला पैसे किंवा नवीन गॉगल द्यायला नकार दिला (माझा गहाळपणा हे कारण सांगून) तर मला कार्ड कंपनीकडून परतावा मिळतो. एखादी मोठी खरेदी, म्हणजे समजा आमची ४ जणांची भारतवारीची तिकिटं मी कार्ड वापरून काढली तर जवळपास ४-५ हजार डॉलर्स खर्च येतो. अश्या वेळेला मला बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा वापरता येते आणि त्याला भरायला बिनव्याजी १२-१८ महिन्यांचा कालावधी मिळतो. इथे स्टोअर कार्ड वापरून तुम्हाला त्या स्टोअरमधील खरेदीवर सूट मिळते. तसेच जमा झालेले पॉईंट्स पुढील खरेदीवर जास्तीची सूट मिळवून देतात.
अमेरिकेतसुद्धा कार्ड्स वापरणे किंवा रोखीशिवाय व्यवहार करणे ही संकल्पना रुजवताना त्रास झाला असेलच. उलट आता इथे नवीन आलेल्याला जर कार्ड लगेच मिळालं नाही तर त्रास होतो. तसेच तुम्ही केलेल्या काही उद्योगांमुळे क्रेडिट हिस्टरीवर परिणाम झाला असेल तरी कार्ड्स मिळत नाहीत व त्रास होतो.
हे सगळे माझे स्वतःचे अनुभव आहेत इतरांना वेगळे अनुभव येऊ शकतात. या धाग्याचा उद्देश फक्त कार्ड्स वापरून फायदा कसा करून घेता येईल हे सांगण्याचा आहे. ज्यांना घेता येईल त्यांनी फायदा करून घ्यावा अथवा ....
प्रतिक्रिया
धन्यवाद. खुप चांगली महिती
DCU
कॅपिटल वन व्हेंचर
काय ठरलं?
माझे कार्ड
=))
चिरंजीव कार्ड?
बचतवर balance जर minus असेल
@ ट्रेमा
उदा. द्यायचं झालं तर मी पण नोकरी करत असूनही मनाला येईल तेव्हा सुट्टी घेऊ शकतो, फिरायला जाऊ शकतो.प्रश्न सुट्टी घेता येण्याचा नाही, काम न करण्याचा विकल्प कायम उपलब्ध आहे का ? असा आहे. सकाळी उठल्यावर जर अनिवार्यपणे कामाचे वेध लागत असतील तर जीवन स्वच्छंद होत नाही. कर्ज घेतलेली व्यक्ती काम न करण्याचा विकल्प डेली रुटीनमधे आणू शकत नाही. रीतसर रजा घेऊन ( शक्यतो बॉसच्या मर्जीनं) ती लिमीटेड स्वातंत्र्य घेऊ शकते.त्यामुळे कर्ज घेतलं, इएमआयचं शुक्लकाष्ठ मागे लागलं म्हणजे आयुष्याची वाट लागली असं काही नाहीये.काम न करण्याचा विकल्प हाच स्वच्छंद आहे. इएमआयच्या दडपणामुळे तो हरवतो.बाकी पैसा हा भाग सोडून जबाबदारी हा एक मोठा फॅक्टर आहे.स्वच्छंदी व्यक्ती जवाबदारी सहज पेलू शकते. कर्ज घेतलेली व्यक्ती हरवलेल्या स्वच्छंदाला जवाबदारीचं लेबल लाऊन मनाची समजूत काढते.कारण छंद म्हणा वा सवय, आपण सर्व मिपावर वेळ घालवतो, ज्यातून पैसे मिळत नाहीत.इथे केलेला टिपी हा संपूर्ण दिवसाच्या पाच टक्के पण नसेल त्याची तुलना स्वच्छंदाशी होऊ शकत नाही. स्वच्छंद हे दिवसभरासाठी आणि सदैव उपलब्ध असलेलं स्वातंत्र्य आहे.काम न करण्याचा विकल्प
काम न करण्याचा विकल्प कायम उपलब्ध आहे का ?म्हणजे तुम्ही १२ ही महिने एकही दिवस काम न करण्याबद्दल बोलताय का? तर माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. कारण मधेच १ दिवस ते काही दिवस सुट्टी घेण्याचा विकल्प मलाही उपलब्ध आहे आणि बहुतांशी लोकांना असतो. माझा छंद म्हणजे माझ्या कुटुंबाला घेऊन विविध ठिकाणांना भेटी देणे, वेगवेगळे Cuisines खाणे आणि मित्रांबरोबर पार्टी करणे. हे सर्व मी मनाला येईल तेव्हा करतो.काम न करण्याचा विकल्प हाच स्वच्छंद आहे. इएमआयच्या दडपणामुळे तो हरवतो.माझे पण इएमआय चालू आहेत. पण ते चालू आहेत म्हणून मी माझ्या जीवनाचा आनंद घेण्याचं सोडलं नाहीये. काम न करणे म्हणजे आयुष्यात अजिबात कामधंदा न करणे म्हणताय का? बाकी इएमआय आहे म्हणून मला काम करणं बंद करता येणार नाही असं वाटत असेल तर मी ते घर कधीही विकून कर्ज फेडू शकतो. माझ्या मते हे सगळं तुमची पार्श्वभूमी काय आहे त्यावर अवलंबून आहे. आधी सांगितल्याप्रमाणे २००१ साली मला १८ लाख एकरकमी भरणे शक्य नव्हते आणि आता १.२५ कोटी भरणे पण शक्य नाही.कर्ज घेतलेली व्यक्ती हरवलेल्या स्वच्छंदाला जवाबदारीचं लेबल लाऊन मनाची समजूत काढते. असं सरसकट तुम्ही म्हणू शकत नाही. प्रत्येकाचं आयुष्य, त्यांचे प्रॉब्लेम्स; प्रेफरन्सेस, त्यांचा आवडीनिवडी हे वेगळं असतं. आता एखाद्याचा काम करणं हा छंद असू शकतो. जबाबदारी फक्त इएमआय फेडायचाय ही नसून एक मुलगा, पती व पिता या नात्यांमुळे येणाऱ्या कर्तव्यांमुळे पण आहे. याचबरोबर हाती घेतलेले कार्य व्यवस्थित पूर्णत्वास नेणे हे पण जबाबदारीत मोडते. मी तुम्हाला माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणलं त्याप्रमाणे तुमच्याशी क्लायंट महत्वाच्या विषयावर बोलत असताना मूड नाही म्हणून तुम्ही उठून जाऊ शकत नाही. ऍडव्हान्स टॅक्सेस assess करायच्या व भरायच्या आणि टॅक्स रिटर्न्स फाईल करायच्या वेळेत तुम्ही ४ महिने तुमचं ऑफिस बंद करून बसू शकत नाही. आणि याचा इएमआयशी संबंध येत नाही.@ ट्रेमा
म्हणजे तुम्ही १२ ही महिने एकही दिवस काम न करण्याबद्दल बोलताय का?नाही. मी रोज सकाळी उठल्यावर असणार्या ऑप्शनबद्दल बोलतो आहे. नोकरी करणार्याला तो नसतो आणि त्या उप्पर इएमआय असेल तर विषयच संपला ! (खरं तर सगळ्या उहापोहाचा इतकाच साधा मुद्दा आहे)बाकी इएमआय आहे म्हणून मला काम करणं बंद करता येणार नाही असं वाटत असेल तर मी ते घर कधीही विकून कर्ज फेडू शकतो.हे कधीही कुणी करत नाही.आता एखाद्याचा काम करणं हा छंद असू शकतोज्याला काम न करण्याचा विकल्प आहे तोच काम स्वच्छंदानं करु शकतो. कोणतंही काम निर्वैयक्तिक आहे. स्वछंद वैयक्तिक आहे आणि तो कामात मजा आणतो.व्यवसायामुळे (आणि खासकरून नॉन
थोडं स्पष्टीकरण
मी रोज सकाळी उठल्यावर असणार्या ऑप्शनबद्दल बोलतो आहे. नोकरी करणार्याला तो नसतो आणि त्या उप्पर इएमआय असेल तर विषयच संपला !माझा पण एक ईएमआय चालू आहे पण मी याच आठवड्यात एक दिवस मला वाटलं म्हणून काम केलं नाही. वाटलं असतं तर अजून १-२ दिवस सुट्टी घेऊ शकलो असतो. हातात असलेलं आणि ते सुद्धा मी स्वीकारलेलं काम पूर्ण केलं की झालं, मग काही प्रॉब्लेम नाही.हे कधीही कुणी करत नाही.पाहिलं घर सुद्धा २००९ साली कर्ज काढून घेतलं. कुठलाही ताण न घेता आणि इतर खर्चात कपात न करता ते कर्ज ४ वर्षात फेडून टाकलं. मग दुसरा फ्लॅट पण कर्ज काढून घेतला आहे. या दुसऱ्या घराचा ईएमआय चालू आहे. जर मला वाटलं की तो डोईजड होतोय तर ते घर मी विकून कर्ज फेडूनसुद्धा हातात पैसे राहतील.कर्ज घेतलेली व्यक्ती काम न
आवडलं
सुबोधजी, तुमचा मुद्दा हुकतो आहे
मी जगतो तेच "खरे आयुष्य" आणि मी करेन तोच व्यवहार बरोबर हा आपला दुराग्रह आहे हेच मी परत म्हणेन.असं माझं म्हणणं नाही आणि प्रश्न तुमच्या आणि माझ्या जगण्याचा नाही. आजच्या किंमतीत फ्लॅट घेऊन सत्तर/ ऐंशी हजार रुपये इएमआय बसला तर आयुष्य स्वच्छंदपणे जगता येईल का? हा मुद्दा आहे. तुम्ही कर्ज काढूनही मोकळीक मिळवली कारण तुमचा दुसरा फ्लॅट बूमपूर्वीच्या किंमतीत मिळाला त्यामुळे हप्ता कमी बसला आणि समहाऊ भाड्याचं गणित जुळून गेलं. हा उघड नशीबाचा भाग आहे . माझ्या वहिनीला याच लाईन्सवर ७,००० रुपये पगार होता आणि ४,००० हप्ता होता तेंव्हा सॉलीड गोची झाली होती. पुढे वेतन आयोगामुळे पगार भरमसाठ वाढला आणि ग्लोबलायझेशनमुळे फ्लॅटची किंमत बेफाम वाढली, परिणामी भाडं हप्त्याच्या तिप्पट झालं. हे नशिब आहे. ते स्वच्छंद जगण्यासाठी केलेलं साहस नाही. मुद्दा इतका उघड आणि साधा आहे > उत्पन्नाच्या ६० / ६५ टक्के भाग जर इएमआय मधे गुंतला असेल तर इएमआय व्यक्तीला लाईनवर ठेवतो .अपवाद हाच नियम समजून
कुठेयं फिलॉसॉफी ?
कर्ज घेतल्यानं वर्तमान भविष्यकाळाकडे गहाण पडतोदॅटस ऑल !काम न करण्याचा विकल्प हाच
प्रॅक्टिकली विचार करायचं
अगदी असेच
हे स्वच्छंदी जगण्यासाठी ई.एम
भविष्याचे ओझे नको, कशाला उगाच
हहपुवा
अजो !
कोपर्यावर उभे राहून सकाळ संध्याकाळ सिगरेट फुकत बसणारी मवाली मुले सुद्धा स्वच्छंदी जीवन जगतात.मवालीपणा आणि स्वच्छंदीपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.स्वच्छंदी जीवन म्हणजेच आनंदी जीवन हा एक मोठाच गैरसमज आहे.स्वच्छंद हाच आनंद आहे !कर्ज काढण्यासाठी स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास असावा लागतो. हे एक साहस आहे.खरं साहस पैश्यावर किंवा कर्ज घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून नाही. भविष्यकाळापासून मुक्त होण्यात आहे. आणि खरी कर्तबगारी मन मानेल तेव्हा काम करण्यात आहे.जे इएमाय भरतात ती सगळी ओझ्याची गाढवे असे एखाद्याचे मत असेल तर......गैरसमज होतोयं ! कर्जमुक्त व्यक्तीला कर्जदार व्यक्तीपेक्षा मनमोकळं जगता येतं इतका साधा मुद्दा आहे.गैरसमज होतोयं ! कर्जमुक्त
विचित्र वाटेल पण वस्तुस्थिती आहे
जरी काही कर्ज वा इएमआय डोक्यावर नसले तरी उद्या उठल्यावर काम न करण्याचा विकल्प या जगात अत्यंत तुरळक लोकांकडे उपलब्ध आहे असे वाटते.अर्थात ! बँकात आणि इतरत्र वॉलंटरी रिटायरमेंटची सुरुवात झाल्यावर तो ऑप्शन अनेकांनी निवडला. मजबूत पैसे मिळाले पण मोकळ्या दिवसाचं काय करायचं यानं सॉलीड घुसमट होऊन पब्लिकनं परत इकडेतिकडे नोकर्या धरल्या आणि पुन्हा तेच रुटीन चालू केलं !म्हणजे ज्या लोकांकडे अमाप पैसे गाठीला आहे तिचं लोकं भविष्याची चिंता सोडून वर्तमानात स्वच्छंदी जगू शकतील असे आपल्या प्रतिसादांतून ध्वनित होऊ शकते.अजिबात नाही. भविष्याची चिंता सोडणं हा साहसाचा भाग आहे, पैश्यामुळे ते येईल असं वाटतं पण जोपर्यंत पैसा हाच आधार वाटतो तोपर्यंत साहस असंभव आहे. स्वच्छंद जगण्यासाठी जीवनातल्या विविध व्यासंगात रस हवा. खेळ, साहित्य, संगीत, लेखन, चित्रपट, नाटकं, पत्नीबरोबर रमण्याची कला, योगासनं, प्राणायाम, भोजनाच्या वैविध्याचा आनंद, भटकंतीची आवड आणि हे सर्व करण्यासाठी भरपूर वेळ आणि माफक पैसा इतकं असलं की झालं. मुख्य म्हणजे तुमचा इंटरेस्ट अॅक्टीव हवा, उदा. संगीताची आवड आहे आणि गाणी ऐकतो ही पॅसिविटी झाली. तुम्हाला स्वतःला गायन किंवा वादन जमलं तर मजा आहे. साहित्याची आवड आहे आणि वाचतो हे ठीके पण स्वतःच्या अनुभवाची किमान कविता तरी करता आली पाहिजे तर मजा. लोक रिसॉर्टला जातात आणि पंधराव्या मिनीटाला मोबाईलवर वॉटस अॅप बघायला लागतात किंवा टिवी चालू करतात, घरचंच रुटीन फक्त जागा बदलून सुरु होतं. रिसॉर्टला जाऊन पोहोण्यात मजा आहे, तिथल्या कराओकेवर पाच-सात गाणी म्हणण्यात आनंद आहे. तिथल्या पूल टेबलवर जमेल तसा स्नूकर खेळण्यात मजा आहे. जे येत नाही ते आत्मसात करत रोज काही तरी नवीन शिकलं तर जीवन बदलतं, स्वच्छंद जगण्यासाठी आवडीचे विकल्प उपलब्द्ध होतात.अर्थात ! बँकात आणि इतरत्र
अशाने बाजारातली अनावश्यक
सुबोधजी ,
"आमच्यासारखे" लोक दुसरे घर घेतात त्यामुळे --बाजारातील घरांची मागणी अनावश्यक रित्या वाढते आणि गरजू लोकांना घर घेता येत नाहीयात काय चूक आहे ? असंख्य लोकांनी गरज नसतांना `इनवेस्टमेंट' म्हणून दुसरे फ्लॅट घेतले आहेत आणि त्यामुळेच तर बिल्डर्सचं फावलं आहे.हे विधान आकसपूर्ण आहे हे स्पष्ट आहेआकसाचा प्रश्नच नाही. गरज नसलेल्यांनी घेतलेले दोन/ तीन फ्लॅटस, आयटीवाल्यांनी हेवी इएमआय पत्करुन घेतलेली कर्ज आणि त्यातून बिल्डर्सची केलेली धन, एनारायजनी किंमती वाढतायंत म्हणून खेळलेला सट्टा यामुळेच तर फ्लॅट सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत. मागच्याच महिन्यात परांजप्यांच्या फॉरेस्टट्रेल मधल्या क्लिफ रिसॉर्टला मी ट्रीपला गेलो होतो. सकाळी फिरायला गेलो तर इतक्या अफाट स्किममधे फक्त १०% लोक राहायला आले होते आणि ९०% बंगले बंद होते. आणि कहर म्हणजे परांजपे अजून कलोसल प्रमाणावर उरलेल्या जागेत नवे बंगले बांधत होते !असंख्य लोकांनी गरज नसतांना
हे म्हणजे सर्व मध्यम वर्गाने
सुबोधजी,
लोकांनी घरे घेणे बंद केले तर.....मुद्दा वेगळा आहे आणि अगदी साधा आहे. लोकांनीइनवेस्टमेंटम्हणून,गरज नसतांनादोनदोन ( किंवा काही केसेसमधे तर तीनतीन) फ्लॅटवरसट्टा खेळणंबंद केलं तर घराच्या किंमती वाजवी होतील.गुंतवणूक आणि सट्टा यातील फरक
आजच्या किंमतीत फ्लॅट घेऊन
उत्पन्नाच्या ६० / ६५ टक्के
सुबोधजी,
कोणती पत संस्था उत्पन्नाच्या
वाचा
The figure can be higher if you are in a high-income bracket.Home Loan Eligibility Calculatorडोंगर पोखरून उंदीर काढणे
तुमचा दुसरा फ्लॅट
मला संक्षी साहेबाना एकच
सुबोधजी,
मिपावरीलच ९० % लोक( कदाचित ९९.९%) ज्यांनी इ एम आय वर घेतले आहे ते आनंदी आणि सुखात जगात आहेत असा माझा अंदाज आहे.लोक्स रुटीन जगतायंत ! जीवनाच्या प्राइम टाईमचा ९० % भाग जर ऑफिसमधे जातोयं तर स्वच्छंद कल्पनेत आहे, वास्तवात नाही. सुट्टीच्या दिवशी केलेली सहल म्हणजे आनंद नाही. सहलीला आल्यासारखं रोजचं जगणं हा खरा आनंद आहे.सहलीला आल्यासारखं रोजचं जगणं
हप्र !
काम करण्यात जेवढा आनंद गाठीला जमा होतो तो इतर कुठल्याही गोष्टीने होत नाही.स्वच्छंद आणि अकर्मण्य यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. काम स्वेच्छेचं असेल तरच आनंद आहे. नाही तर बलात्कार आणि संभोग यात फरकच उरला नसता.कर्मण्य- अकर्मण्य असा विषयच
हप्र !
स्वछंदी जगणे हि एक वृत्ती आहे. त्याचा आर्थिकतेशी किंवा आर्थिक नियोजनाशी संबंध नसावास्वच्छंद जगण्यासाठी मोकळा वेळ हवा. जर इएमआयचं तुमचा महत्त्वाचा वेळ घेत असेल तर कसला आलायं स्वच्छंद ?कामावर जाणे आणि स्वछंदी असणे याचा काही संबंध नाही.स्वेच्छेनं केलेलं काम आणि कामावर जाण्यापरता पर्यायच नाही ही परिस्थिती यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. त्यामुळेच बहुदा तुम्हाला बलात्कार आणि संभोग यातला फरक कळला नाही !नाक्यावरचे मवाली पोरं -
ह प्र साहेब
एकच मुद्दा आहे !
दळण आणणेदेखील उत्सवासारखे साजरा करता येत असताना नौकरीतला प्रत्येक दिवस बांधून ठेवणारा असतो असं का वाटावं? लिफ्टचा दरवाजा उघडणे आणि लिफ्ट खाली वर करण्याची नौकरीदेखील आत येणाऱ्या जाणाऱ्या वेगवेगळ्या लोकांमुळे किती वेगळी ठरू शकते.दळण आणणं माझा ऑप्शन आहे, मी जाईन न जाईन. लिफ्टमन लिफ्ट सोडू शकत नाही आणि नोकरादार खुर्चीवरुन हालू शकत नाही . आणि इएमायवाला तर शक्यच नाही. बळजबरी आणि स्वेच्छा हा फरक तुम्हाला समजावं म्हणून संभोग आणि बलात्काराचं उदाहरण दिलं. ते जर निरर्थक वाटत असेल तर बहुदा बलात्कारालाच तुम्ही संभोग समतायं.Pagination