Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ज्योति अळवणी on Tue, 01/24/2017 - 08:45
लेखनविषय (Tags)
कथा
एक निर्णय भाग 1 एक निर्णय भाग 2 एक निर्णय भाग 3 भाग ४ हळूहळू दिवस पुढे सरकत होते. लग्नाला तीन वर्षे देखिल झाली. अलीकडे मीनाक्षी घरी वेळेत येऊ शकायची नाही. तिने एक उत्तम गायनॅक म्हणून अत्यंत थोड्या अवधित नाव मिळवले होते. तिच्या पेशंट्स तिनेच तपासावे म्हणून तिची वाट पाहात उशिरापर्यंत थांबायच्या. अशा प्रेग्नेंट बायकांना दुस-याकोणावर सोडायला मीनाक्षीचीही तयारी नसायची. अनेकदा इमर्जंसीज देखिल अनेक असायच्या. त्यामुळे तिला हॉस्पिटलमधेच राहावे लागायचे. त्यामानाने ओर्थपेडीक झालेल्या प्रशांतला अपॉइंटमेंट घेऊन पेशंट्स भेटायला येत. त्याचेदेखिल हळूहळू नाव व्हायला लागले होते. तो भारतातील सर्वात मोठ्या ऑर्थो सर्जनना असिस्ट करत होता. पण फक्त पेशंट्सना तपासणे इतकेच आयुष्य जगणारा प्रशांत नव्हता. दोघेही डॉक्टर असल्याने त्या प्रोफेशनमधे द्यावा लागणारा वेळ.. इमार्जनसीज... सगळ्याची दोघानाही कल्पना होती. दोघेही आपापल्या कामात खुश होते.... आणि तरीही काहीतरी कुठेतरी गड़बड़ होती. अनेकदा प्रशांत घरी वेळेत यायचा. पण मिनाक्षीला उशिर होत असे. ती घरी खूप दमुन येत असे. प्रशांतने जर कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन केला असला तर 'दमले आहे', अस म्हणून ती तो हाणून पाडायची. पण 'एमर्जंसी आहे,' असा कॉल आला तर आहे तशीच पळायची. तिच इमर्जन्सीला जाणं प्रशांतला मान्यच होत... पण त्याला मीनाक्षीचा वेळ हवासा वाटायचा... तो मात्र ती त्याला देत नव्हती. मुळात मीनाक्षीने लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघितले होते. प्रशांतने कधी असा प्लॅन केला नव्हता. हुशार होता आणि यश मिळत गेल मिनक्षीची सोबत होती, म्हणून तो डॉक्टर झाला होता. त्यामुळे दोघांचाही त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. प्रशांतला नाटकं बघायला जायची खूप इच्छा असायची. गाण्याचे कार्यक्रम. विविध फेस्टिवल्सला जावस वाटायच. पण मिनाक्षीला जमायच नाही. सुरवातीला त्याची चिडचिड व्हायची. पण मग त्याने तिच न येण स्वीकारलं आणि एकट्याने जायला सुरवात केली. मिनाक्षीला थोड़ वाईट वाटल. पण ती काही बोलली नाही. कारण एकतर त्यांचा वाद झाला असता आणि मुख्य म्हणजे... तो एकटा जायला लागल्यापासून तिला सूटल्यासारख वाटायला लागल होत. हे वाटण योग्य की अयोग्य याचा त्यावेळी तिने विचारही केला नव्हता. एका शनिवारी ती घरी लवकर आली. त्याचं त्यादिवशी एक नाटक बघायला जायच ठरल होत. प्रशांतचा हॉस्पिटलमधे फोन देखिल आला होता.पण ती तो घेऊ शकली नव्हती. त्याला वाईट वाटल असणार हे तिला लक्षात आल होत; त्यामुळे तर ती ठरलेल्या वेळेच्या अगोदर घरी पोहोचली होती. पण प्रशांत घरी नव्हता. डायनिंग टेबलावर एक छोटी चिठ्ठी होती. 'उशीर होईल. जेउन येणार आहे. तू वेळेत झोप. मी घराच्या किल्या घेऊन गेलो आहे.' चिठ्ठीला मायना नव्हता. खाली नाव नव्हतं. बस एक मजकूर... काही शब्द! ती चिठ्ठी वाचून मिनाक्षी मटकन खुर्चीत बसली. प्रशांत माझी वाट न बघताच गेला? खर तर मी आज ठरलेल्या वेळेच्या लवकर आले आहे. तरीही तो नाही? म्हणजे त्याने हे ठरवूनच टाकल होत की मी येणार नाही आहे. ती चिडली... हिरमूसली.... आणि तिथेच डायनिंग टेबलावर विचार करत बसली. 'कुठेतरी काहीतरी चुकत आहे. तो असा कसा मला सोडून एकटाच नाटकाला जाऊ शकतो? ठरल होत न आपण एकत्र जाऊ या अस. मग का नाही थांबला तो माझ्यासाठी?' मीनाक्षीच एक मन विचार करत होत. त्याचवेळी दूसर मन तिच तिला उत्तर देत होत... 'जेव्हा त्याने पहिल्यांदा एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तू त्याला थंबवल नाहीस न? उलट तुला सुटल्या सारख वाटल होत... विसरलिस? मग आता का ही चिडचिड? आणि त्यातही आत्ता जर तुला काही इमरजेंसी आली तर तू हॉस्पिटलला जाणारच आहेस ना?' 'पण मग ते माझ कर्तव्य नाही का?' पहिल मन. 'इमर्जन्सी आली तरी तुझ्या एवजी पर्याय खरच नाही का हॉस्पिटलमध्ये? डॉक्टर्सनी त्यांच्या प्रोफेशनला प्रामाणिक असलच पाहिजे. तुला तुझ काम सर्वात जास्त प्रिय आहे. पण मुख्य म्हणजे प्रशांतसाठी तुझ काही कर्तव्य किंवा प्रेम आहे की नाही?' दुस-या मनाने सवाल केला. 'हो... पर्याय आहे हॉस्पिटलला. पण मला माझ काम खूप जास्त प्रिय आहे. माझ लहानपणापासूनच स्वप्न होत... एकच धेय.... खूप मेहेनत घेतली आहे मी त्यासाठी. आज काम करताना प्रत्येक क्षण मी एन्जॉय करते. This is what i wanted all my life! प्रशांतवर माझ प्रेम आहेच; पण माझ काम माझ पहिल प्रेम आहे' पहिल्या मनाने उत्तर दिल. 'हो न? मग आता तुला राग का आला आहे? तुझ पाहिलं प्रेम जर तुझ काम आहे तर कदाचित नाटकाला जाणं ही प्रशांतची गरज आहे. तुझ्या प्रायॉरिटीमधे प्रशांत... त्याची स्वप्न... हे कधी होत का? आजही तुला नक्की दुःख कसल झाल आहे? तो न थांबल्याच् की तुझा विचार न करता तो गेल्याच? मीनाक्षी... हीच खरी वेळ आहे. तू निट विचार करायला हवा आहेस. लग्नाला तीन वर्ष झाली आहेत. प्रशांतच्या डोळ्यात तुला संसार आणि एखाद मुलाची अपेक्षा दिसत नाही का? तू याचा काही विचार केला आहेस का?' दुस-या मनाच्या या प्रश्नांच्या भडीमाराने मिनाक्षी गळून गेली. तिने खरच संसार.. मुलं... यासगळ्याचा विचारच केला नव्हता. शाळेत असल्यापासून ऐकत्र असल्याने तिला प्रशांतच्या असण्याची सवय झाली होती. त्यामळे शिक्षण संपल्यावर आई-वडिलांनी लग्नाचा विषय काढला तेव्हा तिने 'मी प्रशांतशी लग्न करणार आहे;' अस म्हणून तिच्यापुरता तो प्रश्न सोडवून टाकला होता. त्याच कारण देखील तसच होत. आजवर ती म्हणेल ते प्रशांत एकत आला होता... मान्य करत आला होता. त्यामुळे तिला खात्री होती की प्रशांत देखील लगेच लग्नाला तयार होईल. नवीन व्यक्तीबरोबर लग्न करून परत एकमेकांची सवय होईपर्यंत थांबण्याची तिला इच्छा नव्हती. म्हणून तिने प्रशांतशी लग्न केले होते. त्यावेळी तिला त्याच्याकडून कोणतेही प्रश्न येतिल किंवा त्याचा तो काही निर्णय घेईल याची अपेक्षा नव्हती. त्यामुळेच आतापर्यंत त्यांचा संसार सरळ सुरळीत चालू होता. पण अलीकडे तो तिला म्हणायचा..,"मिनु किती धावणार आहेस? आता थोड़ जगुया ना! मला तुला काहीतरी सांगायचं आहे...." पण मिनक्षीने कधी हसून.. तर कधी दमले आहे म्हणून त्याच बोलण थांबवाल होत... त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल होत. आज मात्र प्रशांत तिच्यासाठी नाटकाला जायचा थांबला नाही; या एका लहानशा घटनेने तिच तिलाच विचारात टाकल होत. तिला पटत होत की तिच कुठेतरी चुकत आहे; पण तिला ते मान्य करायच नव्हतं. विचार करता-करता तिला तिथेच टेबलाजवळ झोप लागली. मेन डोर उघडण्याच्या आवाजाने तिला जाग आली. "अरे, मिनु तू इथे अशी अवघडून का बसली आहेस? असा अंधार का आहे घरात?" प्रशांतने दिवे लावत तिला विचारले. "प्रशांत आपल् एकत्र जायच ठरल होत न? मग तू असा कसा गेलास एकटाच?" मिनाक्षीने त्याच्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत एकदम भांडण्याचा पवित्रा घेतला. तिला तिच्या मनातल्या विचारांपासून दूर जायच होत. त्यावर एकच उपाय होता... प्रशांतला कोर्टात उभ केल्याप्रमाणे प्रश्न विचारायचे .. आणि ती तेच करत होती. "अग, मी तुला तेच तर सांगायला कॉल केला होता. पण तू घेऊ शकली नाहीस." प्रशांत जाम खुशीत होता. त्याच मिनाक्षीकडे लक्षच नव्हतं. "ओळख बघू मला कोणाचा फोन आला असेल? अग, तुला रेश्मा आठवते? अकरावी, बारावी मधे आपल्याच बरोबर होती. दोन्ही वर्ष नाटकाची हिरोईन होती... तिचा मला आज अचानक फोन आला होता. मिनु अग आजच्या नाटकाची हिरोईन पण तिच होती. तिला समजल मी नाटक बघायला येणार आहे तर तिने लवकर येण्याचा आग्रह केला. तुला माहित आहे; बारावी नंतर तिने साध बी. एससी. केल. तिला त्याच काळात लक्षात आल म्हणे की अभिनय हिच तिची आवड आहे. मग तिने कॉलेज बदलल. जिथुन नाटकं आणि स्पर्धात्मक कार्यक्रम जास्त होते अशा कॉलेजला अडमिशन घेतली. मेहेनत घेतली. आणि आता एक उत्तम नटी म्हणून तिने नाव कमवल आहे. कमाल आहे न?" काय बोलाव मिनाक्षीला सुचेना. कारण तिच्या चिडण्याचा प्रशांतवर काहीही परिणाम झालेला नाही हे तिच्या लक्षात आल होत. तिने फ़क्त ""हम्" एवढाच प्रतिसाद दिला आणि गप्प बसली. पण आज प्रशांतच एकूण लक्षच नव्हतं. "दमली आहेस का? मग उगाच जागु नकोस ह. जेउन घे अन् झोप वेळेत. माझ जेवण झाल आहे. दमलो पण आहे. उद्या थोड लवकर पण निघायचं आहे त्यामुळे मी झोपायला जातो. गुड नाईट." प्रशांत आपल्याच तंद्रित बोलत बोलत आत गेला आणि कपडे बदलून पाच मिनिटांत झोपला देखिल. मिनाक्षीला खरतर खूप भांडायच होत... तो तिला सोडून आणि तिची वाट न बघता एकटाच नाटकाला गेला... बाहेर जेवून आला... एक दोन ओळींची चिठ्ठी तेवढी ठेवली... तिला यासागळ्याचाच राग आला होता. पण तिचा राग काय... तिच असणही प्रशांतनी रजिस्टर केल नव्हतं. हताशपणे ती उठली आणि जाऊन झोपली. तिने प्रशांतच्या अंगावर हात ठेवला. पण झोपतच कुस बदलत तिच्या हातावर क्षणभर थोपटुन प्रशांत परत शांत झोपुन गेला. क्रमश:
  • Log in or register to post comments
  • 4205 views

Book traversal links for एक निर्णय (भाग 4)

  • ‹ एक निर्णय (भाग 3)
  • Up
  • एक निर्णय (भाग 5) ›

प्रतिक्रिया

Submitted by एस on Tue, 01/24/2017 - 09:17

Permalink

हा भाग जास्त चांगला फुलवला

हा भाग जास्त चांगला फुलवला आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Tue, 01/24/2017 - 10:11

Permalink

उत्कंठावर्धक.. पुढे कोणत्या

उत्कंठावर्धक.. पुढे कोणत्या दिशेला तुम्हाला न्ययचा आहे याचा अंदाज येत नाहीये अजून. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 01/24/2017 - 11:55

Permalink

वा! सुरेख!

वा! सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 01/24/2017 - 12:00

Permalink

आताच चारही भाग वाचले.

आताच चारही भाग वाचले. फार सुरेख लिहित आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Tue, 01/24/2017 - 12:21

Permalink

इंटरेस्टिंग! पुभाप्र.

इंटरेस्टिंग! पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Tue, 01/24/2017 - 13:13

Permalink

इंटरेस्टींग..

यश्याच्या मागे धावताना भोगायला लागणार्‍या व्यथा..
  • Log in or register to post comments

Submitted by कौशी on Wed, 01/25/2017 - 01:49

Permalink

छान लिहिलयं..

पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com