ट्रेलर समिक्षा : गौतमीपुत्र सातकर्णी.
गौतमीपुत्र सातकर्णी.
चित्रपटाचा ट्रेलर समिक्षा.
दुसर्या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन राजघराणातल्या गौतमीपुत्र सातकर्णी ह्याच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक-काल्पनिक घटनांचा समावेश असलेला चित्रपट येत आहे. गौतमीपुत्र सातकर्णी म्हटल्यावर मला सर्वात आधी प्रचेतसभौ उर्फ वल्लीदा यांची आठवण झाली. केवळ त्यांच्यासाठी म्हणून हा धागा काढत आहे.
ट्रेलरमधे दिसत असलेल्या कथानक, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, वास्तुकला, ऐतिहासिक खुणा यांचा उहापोह करुयात.
ट्रेलर आवडला. पहिल्या चाळीस सेकंदापर्यंत हा चित्रपट श्रीदेवीच्या पुली नामक भंगारपटाच्या लायकीचा वाटला. पण पुढे जरा लक्ष वेधून घेणारे प्रसंग दिसले. अगदी बाहुबलीच्या तोडीसतोड नसला तरी बर्यापैकी वाटतो. आपल्या आवडत्या राजा सातकर्णी वर असल्याने विषय आवडला, थेटरातच बघितला जाईल. तेलूगू भाषा आवडते.
बालय्या तेलुगूत फेमस असला तरी मला कास्टींग रुचली नाही.
प्रतिसादांत पुढे जमेल तसं लिहितो. तुम्हीही लिहा.
प्रतिक्रिया
हर हर महादेव ही घोषणा या
उत्सुकता आहे.
धन्स संदीप :)
हा सिनेमा येतोय हे
सच्चं भण गोदावरी,
सातकर्णी आहे म्हटल्यांवर तो
छान. एकदाची दखल घेतली गेली तर
मस्त!
टिप्पिकल सौधिंडियन शिणुमा
टिप्पिकल सौधिंडियन शिणुमा दिसतोय! पण आपल्याला असले पातालभैरवी टैप पोशाखी सिनेमे लै आवडतात.सेम पिंच पैसा. पौराणिक तेलुगू सिनेमे मी खूप पाहयले आहेत. एक नंबर असतात =)) आता हा चित्रपट नक्कीच बघणार.सातकर्णी अर्थ व व्युत्पत्ती