Skip to main content

नोटाबंदी : एक अपरिपक्व निर्णय.

लेखक मार्मिक गोडसे यांनी शुक्रवार, 06/01/2017 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा? पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.

वाचने 51358
प्रतिक्रिया 312

प्रतिक्रिया

मग काय आता १०० % यश मिळवण्यासाठी परत नोटाबंदी करणार का?

काहीतरी सबळ पुरावे हवेत नै...? खाली काही देतोय, बघून घ्या सबळ आहेत की नाही ते. मोदींच्या ३१ डिसेंबरच्या भाषणातले काही खोटे दावे. https://thewire.in/91122/modi-fact-check/

अजून खूप वेळ जाणारे निश्चित कळायला . नोटबंदी नंतर पण दहशतवाद्यांकडे २ हजाराच्या नोटा सापडल्या होता , त्यामुळे नोटबंदी हा पर्याय नाही दहशतवादाला मानलं कि १-२ महिने थोडा फरक पडला असेल तर सारखी नोटबंदी करणार का ?? नोटा चलनात आल्यावर परत होणारे ते .त्यामुळे दहशत वाद संपला हा मुद्दा हास्यास्पद आहे . आज बिटकॉइन सारखा चलन आहे वेगवेगळे उपाय आहेत . सध्यातरी दहशत वाद कमी झाला म्हणून ग्रेट असं म्हणता येणार नाही

In reply to by वरुण मोहिते

सध्यातरी दहशत वाद कमी झाला म्हणून ग्रेट असं म्हणता येणार नाही
कुठे कमी झालाय?? फक्त त्याच्या बातम्या येत नाहीत.

वर कोणीतरी रिझल्ट येईपर्यंत वाट पहावी म्हणत आहेत, पण परिक्षाच झाली नाही तर कसल्या रिझल्टची वाट पहायची? बोकीलांच्या एबीपी माझावरच्या दोन मुलाखती तर निवळ्ळ अभिनिवेशी अन् हास्यास्पद आहेत.

In reply to by निष्पक्ष सदस्य

वर कोणीतरी रिझल्ट येईपर्यंत वाट पहावी म्हणत आहेत,
आणि रिझल्ट आधीच मेरिटमधे आल्याच्या थाटात पेढे वाटायला सुरुवात केली आहे त्याकडे बघायचे नसते. =))

पिरा,
म्हणजे जेवढं चलन बाद केलं ते सगळं जवळपास बँकेत परत आलं. मग काळा पैसा कुठे गेला?
हा सगळा काळा पैसा नष्ट झाला आहे. काळ्या पैशाची नोंद नसते. याउलट बँकेत जमा झालेल्या पैशाची नोंद असते. हा पैसा उजेडात आलेला आहे. सबब तो काळा राहिलेला नाही. मात्र जरी तो पैसा पांढरा असला तरी त्याच्या मालकांना आयकर विभागास उत्तरे द्यावीच लागतील. किंबहुना मालकाचे उत्तरदायित्व हाच काळ्या आणि पांढऱ्या पैशातला फरक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गैरसमज आहे. ह्याद्वारे फक्त इन्स्पेक्टर राज आले आहे. आधी बॅन्कवाल्यांनी मजा केली आता आयकरवाले करतील. ज्यांनी अडीच लाख च्या आत भरलेत त्याची चौकशी करणार? आधी सरकार ते करणार नाही असं बोलले होते. म्हणजे सरकार आपल्या वचनाला कलटी मारणार? ज्यांनी चार चार हजार बदलून नेलेत त्यांना कुठे शोधणार? ही शोधमोहिम किती वर्षे चालणार?

In reply to by संदीप डांगे

मला हे काही धागे मिळाले गुगल्यावर, अजून कोणाकडे काही जास्त माहिती असेल तर टाकावी - http://indianexpress.com/article/india/gujarat-panchayat-polls-bjp-feli… "Gujarat panchayat polls: BJP felicitates 8,000 new सर्पांचेस" http://indianexpress.com/article/india/gujarat-rural-polls-una-village-… http://indianexpress.com/article/cities/ahmedabad/gujarat-gram-panchaya… हि मध्यप्रदेशची एक बातमी - http://zeenews.india.com/madhya-pradesh/good-news-for-bjp-party-sweeps-…

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

ग्रामपंचायत निवडणुका पक्षचिन्हावर लढवल्या जातात काय? मला माहित नाही म्हणून विचारतोय. अवांतरः अनेक पक्षातले प्रस्थापित लोक (भ्रष्ट+गुंड+आरोपी) आपले पक्ष सोडून भाजपमधे प्रवेश करत आहेत, बहुतेक त्यांचे अच्छे दिन त्यांना मिळाले असावेत. अशा तर्‍हेने कॉन्ग्रेसमुक्त भारत झाला तर काय मजा येईल? =))

In reply to by संदीप डांगे

माझ्या माहितीनुसार, अशी निवडणूक कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही पण लढवणारे लोक कुठल्यातरी पक्षाशी निगडित असतातच! त्यामुळे अशा निवडणुकांमधून पक्ष ग्राउंड लेवल ला पोहोचवणे शक्य होत असावे! तुम्ही वर नोटबंदीसंदर्भात त्याचा उल्लेख केला म्हणून वरील लिंका टाकल्या. बाकी, भ्रष्ट + गुंड + आरोपी हे सरसकट विधान न करता केस बाय केस बघुयात ना! असे हे कोण लोक भाजपमध्ये येत आहेत ते निश्चित करून त्याबद्दल चर्चा शक्य आहे. भाजप पूर्णच्या पूर्ण धुतल्या तांदळासारखा पक्ष आहे हा गैरसमज आहे. निष्ठवंतांच्या जोरावर सत्तेत येण्याइतका बेस तयार झाला की असले झुगाड बंद करतील अशी अपेक्षा आहे.

पण आता अचानक रांगा बंद का झाल्या? आता शेतकरी काय करतायत? व्यवहार चालू झाले ना सर्व? देशात अराजक माजेल वगैरे अंदाज होता. अजून कुठे अराजक माजले नाही ते? काळा पैसा बाहेर आला की नाही हा मुद्दा आहे. त्याबद्दल सरकारचे निवेदन येइपर्यंत थांबूया.

विरोधक फारच रडतायत. मला तर परवा एक रिक्शावाला "मोदीना अजून १० वर्ष द्यायला हवी तरच सुधारणा होतील" अस म्हणणारा भेटला! खुश होता एकंदरीत मोदींवर म्हणजे नोकरदार खुश आणि गरिब खुश कारण काहीतरी पावल उचलली गेली..... हल्ली फ्लेक्स पण रोडावले आहेत......

In reply to by Nitin Palkar

नक्की कुठे रोडावलेत म्हणे फ्लेक्स ? बाहेर फिरताना तर हे फ्लेक्स सगळे विश्व व्यापून दशांगुळे उरलेत असे वाटतंय.

In reply to by Nitin Palkar

नक्की कुठे रोडावलेत म्हणे फ्लेक्स ? बाहेर फिरताना तर हे फ्लेक्स सगळे विश्व व्यापून दशांगुळे उरलेत असे वाटतंय.

In reply to by सुखीमाणूस

हव्या तशा नोटा छापल्याने हवी तशी जिडीपी मिळते हे ज्ञान नवीनच...! आमच्यासारख्या अजाण बालकांवर अजून असे ज्ञानकण उधळावे ही विनम्र प्रार्थना.

In reply to by सुखीमाणूस

आधी हे सांगा की नोटा 'कमी छापल्याने' जीडीपी कमी होतो हे कसे कळले तुम्हाला?

In reply to by सुखीमाणूस

मार्मिक गोडसे पण म्हणतायत तसे... GDP चे आकडे आल्यावर नोटाबंदीच्या समर्थकांचे जिमनॅस्ट बघायची ईच्छा आहे.

रिक्षावाला खुश म्हणून सगळं ओके. चालुद्या .गरिबी हटाव पण आलेला मागे त्यावेळी पण लोक खुश होती . बाकी फ्लेक्स दिसत नाहीयेत ते मोदींमुळे असे अर्थ मस्त असतात . पंतप्रधानांना फ्लेक्स हटवा असा आदेश देण्याइतका वेळ असतो काय ???लोल

In reply to by वरुण मोहिते

पंतप्रधानांनी एकदा झाडू मारल्यापासून संपूर्ण भारत स्वच्छ झाला. नवीन नोटेवरच्या चष्म्यालाही 'स्वच्छ भारत'चा वायपर लावला आहे.

मोदी भक्त आणि मोदी रुग्ण या भांडणात न पडत मी एकच म्हणेन स्वच्छ भारत असावा आणि त्यासाठी मोहीम चालवणे यात गैर काय आहे हेच कळत नाही. शौचालये बांधणे किंवा स्वच्छते बद्दल स्वातंत्र्याला होऊनही ७० वर्षे जनजागृती करायला लागणे यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी नसेल. स्त्रियांना देहधर्मासाठी रात्रीपर्यंत वाट पाहायला लागणे या सारखी लांच्छनास्पद गोष्ट दुसरी नसावी. स्वच्छ भारत मोहिमेवर टीका करणार्यांनी या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करावे आणि त्याची खिल्ली उडवावी यासारखी दुर्दैवी गोष्ट नसावी. https://www.cdc.gov/healthywater/global/sanitation/toilets.html

In reply to by सुबोध खरे

स्वच्छ भारत मोहिमेवर टीका करणार्यांनी "या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करावे आणि त्याची खिल्ली उडवावी यासारखी दुर्दैवी गोष्ट नसावी." >>> कुणी खिल्ली उडवली आहे काय इथे किंवा इतर कोणत्या धाग्यावर?

संदीप डांगे,
ह्याद्वारे फक्त इन्स्पेक्टर राज आले आहे. आधी बॅन्कवाल्यांनी मजा केली आता आयकरवाले करतील.
तुम्हाला इन्स्पेक्टर राज म्हणजे काय ते ठाऊक नाही. बरं ते जाउद्या. बँकवाल्यांनी अगोदर अशी काय मजा केली होती, जी आता आयकरवाल्यांकडे वर्ग झालीये? जरा समजावून सांगणार का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुम्हाला इन्स्पेक्टर राज म्हणजे काय ते ठाऊक नाही ^^^ कृपया तुम्ही सांगा... ज्ञानदान हे पुण्यकर्म...

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, इन्स्पेक्टर राज ही संज्ञा तुम्ही पहिल्यांदा वापरली आहे. ती तिच्या पारंपरिक अर्थाशी जुळंत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शब्द माझा आहे ना? मग मला ठावूक नाही असं कसं म्हटलंत? मी कोणत्या अर्थाने वापरला तो अर्थ सांगा व तुम्हाला अचूक कसं कळलं तेही. तसेच ते पारंपरिक अर्थाशी कसं जुळत नाही हे सांगा.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, बेअकलीपणाचं सोंग घेताय खरं, पण मुखवटा चेहऱ्याचा भाग बनू घातलाय. इन्स्पेक्टर राज म्हणजे काय ते इथे आहे : https://www.quora.com/What-is-the-Inspector-Raj-and-what-are-benefits-o… आता हे राज नोटाबंदीशी कसे संबंधित आहे ते कृपया सांगावे. आ.न., अ.पै.

In reply to by गामा पैलवान

टॅक्स इन्स्पेक्टरच्या (आयकर अधिकारी) हातात खरे, खोटे ठरवण्याची सत्ता दिल्यावर इन्स्पेक्टरराज येणार नाही तर काय रामराज येणार? http://indianexpress.com/article/business/business-others/demonetisatio…

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, तुम्ही दिलेल्या लेखात इन्स्पेक्टर राज येण्याची शक्यता आहे असं अत्यंत मोघमपणे सूचित केलं आहे. पूर्ण लेख वाचल्यावर कळून येतं की मोठे मासे पकडण्यासाठीही आयकर विभागाकडे मनुष्यबळ तोकडं आहे. तर छोट्या प्रामाणिक करदात्यांकडे ढुंकूनदेखील बघायला वेळ मिळणार नाहीये. तुम्ही उगीच पराचा कावळा करंत आहात. आ.न., -गा.पै.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, अहो, मी नीतिमत्तेचा महामेरू आहे. मी कशाला घुमवाघुमवी करेन? हे इन्स्पेक्टर राज तर आयकरविभागात फार पूर्वीपासून चालू आहे. नोटाबंदीमुळे याला परत उधाण कसं येईल ते कृपया समजावून सांगावे. तसेच बँकांनी काय मजा मारली होती हेही सांगावे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ग्लास अर्धा रिकामा आहे हे बघणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असते असं फ्रोइड म्हणून गेलाय...

अनेक प्रतिक्रिया वाचल्या.... नोटाबंदी मुळे मला स्वतःला काय त्रास झाला हे कोणी म्हटल्याचे दिसले नाही. आपण संगणक साक्षर आहोत का ? आपण डिजिटल व्यवहार करु शकतो का? या बद्दल कुणीच काही बोलत नाही. परदेशस्थ भारतीयांच्या अडचणींची मला कल्पना नाही, परंतू भारतीय सामान्य नागरिकांच्या काय अडचणी आहेत मला समजू शकले नाही. सर्व भारतीयांनी साक्षर व्हावे, सर्वांनी कर भरावेत अशी अपेक्षा शासानाने, प्रशासनाने, सरकारने करावी यात गैर काय? हम नाही सुधरेंगे असं म्हणून आम्ही शेतात किंवा नदीकाठीच बसणार हे म्हणण्यात जसा अर्थ नाही, तसा आम्ही सर्व व्यवहार रोखीनेच करू यात आहे. आज आपण आपला वाणी, डॉक्टर, दुधवाला, आणि असे अनेक यांना आपण रोख पैसे देतो; हे लोक कर भारतात का...? याचा विचार करायला नको का? माझा घामाचा पैसा ज्यावर मी सर्व करांसह आयकर भरतो, त्यावर हे सर्व करबुडवे ईमले बांधतात हे योग्य आहे का?

In reply to by Nitin Palkar

सर्व भारतीयांनी साक्षर व्हावे, सर्वांनी कर भरावेत अशी अपेक्षा शासानाने, प्रशासनाने, सरकारने करावी यात गैर काय? >> कोण म्हटले ह्यात काही गैर आहे म्हणून? साक्षर होउ नये, कर भरु नये असे इथे कोणी म्हणत आहे काय? पण त्याचा नोटाबंदीच्या निर्णयाशी काय संबंध ते तर त्याशिवायही होऊ शकते, नाही होऊ शकत काय? हम नाही सुधरेंगे असं म्हणून आम्ही शेतात किंवा नदीकाठीच बसणार हे म्हणण्यात जसा अर्थ नाही, तसा आम्ही सर्व व्यवहार रोखीनेच करू यात आहे. >> रोखीने व्यवहार म्हणजे मागासलेपण हा एक 'आधुनिक' विचार ह्या नोटबंदीमुळे दिसला. विकसित व पुढारलेल्या देशातल्या रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण बघितले तर ते सुधरलेले लोक अजून नदीकाठीच बसत असावे असे वाटते. उदा. जर्मनी. 1 खालील ओळी ओळखीच्या वाटतील. Governments have been increasingly pushing for a cashless society. Ostensibly, by having a paper trail for all transactions, such a move would decrease crime, money laundering, and tax evasion. France’s finance minister recently stated that he would “fight against the use of cash and anonymity in the French economy” in order to prevent terrorism and other threats. पण १७ मे २०१६ चं आर्टिकल आहे हे. http://www.visualcapitalist.com/shift-cashless-society-snowballing/ (ही सरकारे अचानक कॅशलेसच्या मागे लागण्याची काय कारणे असावीत ह्याचा शोध घेतला पाहिजे. काय शिजत असावे?) While there are certainly benefits to using digital payments, our view is that going digital should be an individual consumer choice that can be based on personal benefits and drawbacks. People should have the voluntary choice of going plastic or using apps for payment, but they shouldn’t be pushed into either option unwillingly. आज आपण आपला वाणी, डॉक्टर, दुधवाला, आणि असे अनेक यांना आपण रोख पैसे देतो; हे लोक कर भारतात का...? याचा विचार करायला नको का? >> ह्याचा विचार करायलाच तर सरकारला बसवलंय. कोण कर भरतं, नाही भरत ह्याची जबाबदारी सरकारवर आहे. बॅन्क ट्रान्झॅक्शन झाले तर करचोरी पकडलीच जाईल हा स्वप्नवाद आहे. त्यासाठी सरकारी कररचना, कायद्यांची सुसूत्रता, आणि योग्य व परिणामकारक अंमलबजावणीची गरज असते. नाही तर सत्यम सारखी उदाहरणे आहेतच समोर. माझा घामाचा पैसा ज्यावर मी सर्व करांसह आयकर भरतो, त्यावर हे सर्व करबुडवे ईमले बांधतात हे योग्य आहे का? >> तुमच्या घामाच्या पैशावर हे लोक मजा मारतात असे म्हणायचे आहे का? अंमळ गैरसमज. तुमचा घामाचा पैसा काही सेवा-वस्तू घ्यायला तुम्ही त्यांच्याकडे देता तेव्हा ती लूट नसते, व्यवहार असतो. जेव्हा तुम्ही त्यांच्या हातात सोपवता तेव्हा तो 'त्यांच्या घामाचा' पैसा होतो, तुमचा राहत नाही. तेव्हा ते त्या पैशातून कर भरतात की मजा मारतात याच्याशी कीतीही वाटले तरी तुमचा संबंध राहत नाही. जो कर बुडतो तो सरकारचा पैसा असतो, तुमचा-माझा वैयक्तिक नाही. सो डोन्ट गेट इमोशनल अबाउट इट. सरकार कर नीट गोळा करतं की नाही, गोळा झालेल्या कराचा योग्य वापर करते की नाही, मधल्यामधे मंत्री-अधिकारी-कंत्राटदार आपल्या करांचा पैसा खाऊन इमले बांधतात का यावर लक्ष ठेवणे व आवाज उठवणे हे नागरिकांचे काम. काय वाटतं? बाकी, कॅशलेस होण्यास माझा वैयक्तिक कोणताही विरोध नाही, फक्त जबरदस्ती ढकलल्या जाणे, त्यासाठी जनतेला आपल्या पैशापासून वंचित करणे अयोग्य आहे एवढेच माझे मत.

In reply to by संदीप डांगे

पण त्याचा नोटाबंदीच्या निर्णयाशी काय संबंध ते तर त्याशिवायही होऊ शकते, नाही होऊ शकत काय? कसे? ते सांगा... आज कुठेही "कागदावर वजन ठेवणे" म्हणजे लाच देणे हे नोटांच्या माध्यमाशिवाय कसे करता येईल? तुम्ही जर्मनी चे उदाहरण देताय... Top 5 Cashless Countries - Total Payments www.totalpayments.org/2013/07/08/top-5-cashless-countries/ Jul 8, 2013 - Here's a look at some countries that are really making a move toward becoming cashless: Sweden. The number of bank robberies in Sweden plunged from 110 in 2008 to 16 in 2011—not because security has vastly improved, but because most Swedish banks simply don't handle cash anymore. ... ही लिंक देखील एकदा बघा. तेव्हा ते त्या पैशातून कर भरतात की मजा मारतात याच्याशी कीतीही वाटले तरी तुमचा संबंध राहत नाही. जो कर बुडतो तो सरकारचा पैसा असतो, या तुमच्या विधानाचा अर्थ ' ज्यांना शक्य असेल त्यांनी कर बुडवावा' असं होत नाही का? सो डोन्ट गेट इमोशनल अबाउट इट. WHY SHOULDN'T I? जर मी इमाने इतबारे सर्व कर भरत असेन तर मी तुमच्याकडून तशी अपेक्षा करणे चुकीचे नक्कीच नाही. लास्ट बट नॉट द लीस्ट ... ३१ डिसेंबरच्या मोदींच्या (आदरणीय पंतप्रधान वगैरे न म्हणता) भाषणातील एक महत्वाचे विधान, आयकर खात्याच्या माहितीनुसार 'संपूर्ण सव्वाशे कोटींच्या या देशात दहा लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणारे केवळ ३४,००,००० चौतीस लाख लोक आहेत, ' थिंक ओव्हर इट संदीपजी .

In reply to by Nitin Palkar

कसे? ते सांगा... आज कुठेही "कागदावर वजन ठेवणे" म्हणजे लाच देणे हे नोटांच्या माध्यमाशिवाय कसे करता येईल? >> फार बाळबोध कल्पना आहेत भ्रष्टाचाराबद्दलच्या ह्या... सो चाइल्डिश! कसे करता येईल या प्रश्नाचे उत्तर: http://www.hindustantimes.com/india-news/gujarat-govt-staff-caught-taki… तुम्ही स्वीडनचे उदाहरण देताय, अनेक समर्थक डोळे झाकून स्वीडन ची स्वीटडीश पुढे करतायत. अर्धसत्य मात्र. स्वीडनची लोकसंख्या एक कोटी आहे फक्त. पर कॅपिटा इन्कम सुमारे ५०,००० डॉलर, आपले किती १५०० डॉलर. स्वीडनपेक्षा तर मुंबईची लोकसंख्या जास्त आहे. नगाला नग लावून तुलना करु नये. बाकी मी कॅशलेसच्या विरोधात नाही हे तर नेहमीच सांगत आलोय, पण काहीच्या काही विधाने येत असतील तर तपासून पाहावी असं म्हणालेत इथले दबंगगुरुजी... :-) या तुमच्या विधानाचा अर्थ ' ज्यांना शक्य असेल त्यांनी कर बुडवावा' असं होत नाही का? >> त्या वाक्याचा अर्थ स्पष्ट पुढे-मागे दिलेला असतांना वाट्टेल तो अर्थ का बुवा काढायचा? सरकारचा कर बुडतोय तर सरकारने कर वसूल करायला अजिबात हयगय करु नये. कर हा सरकारचा मूलभूत हक्क आहे. त्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा आहे. त्याचा वापर करावा. तुमच्या घामाचा पैसा घेऊन कोणी इमले बांधत असेल तर तुम्हाला का जळजळ? तो इमले बांधणारा कर भरत नाही अशी तुमची धारणा असेल तर आयकरविभागला सूचना द्या. लोकांना घामाच्या पैशांनी इमले बांधता येत नाहीत, हरामाच्याच पैशांनी श्रीमंत होता येते ह्या जुनाट खोट्या समजूतीतून बाहेर या असं सुचवतो. जर मी इमाने इतबारे सर्व कर भरत असेन तर मी तुमच्याकडून तशी अपेक्षा करणे चुकीचे नक्कीच नाही. मी जर तुम्हाला तुमच्याकडून सेवा-वस्तूच्या बदल्यात घेतलेल्या पैशाचं अधिकृत बील देत नसेल तर मागून घ्या. तो तुमचा हक्क आहे. त्याउपर तुमचा माझा संबंध नाही. मी कर भरतो, नाही भरत हा माझा आणि सरकारचा विषय आहे. मुळात मी कर भरतो की नाही ह्यात तुम्हाला नाक खुपसायची काय गरज असावी नै का? सरकारचे काम तुम्ही करणार तर मग सरकार काय करणार? :-) लास्ट बट नॉट द लीस्ट ... ३१ डिसेंबरच्या मोदींच्या (आदरणीय पंतप्रधान वगैरे न म्हणता) भाषणातील एक महत्वाचे विधान, आयकर खात्याच्या माहितीनुसार 'संपूर्ण सव्वाशे कोटींच्या या देशात दहा लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणारे केवळ ३४,००,००० चौतीस लाख लोक आहेत, ' >> ३४ नाही २४ लाख. हे काय नोटबंदीमुळे कळले काय?

In reply to by Nitin Palkar

आपण डिजिटल व्यवहार करु शकतो का? या बद्दल कुणीच काही बोलत नाही. नोटाबंदीचा हा उद्देश होता का? असेल तर भारतीय जनतेचा 'गिनी पीग ' म्हणून वापर केला गेला काय?

In reply to by मार्मिक गोडसे

डिजिटल व्यवहार / कॅशलेस / लेस कॅश हा काळा पैसा नावाच्या वाघाच्या शिकारीला गेले असता अचानक समोर आलेला ससा आहे. आता असा आविर्भाव आणला जातोय की या सशाच्या शिकारीसाठीच आम्ही जंगलात आलो होतो ;)

In reply to by संदीप डांगे

हो. ती ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र ते ही चांगलं आहे. करदाते वाढू शकतील त्याने :)

In reply to by सतिश गावडे

अहो तुम्ही सश्याची तरी शिकार होतेय हे मान्य करताय, हेही नसे थोडके! बाकी काही लोक तर मुद्दलात शिकारीला गेल्याचेच मान्य करत नाहीत आणि वरून शिकारीचं नाव सांगून शिनेमाला गेल्याचं ठोकून देतात! :):)

अपरीक्व कसे हे तुम्ही विषद केले नाही. मनुष्य अथवा कोणताही प्राणी बदल सहज स्वीकारत नाही. कोणतीही राजकीय भूमिका न घेता, कोणताही राजकीय अभिनिवेश न अन्गीकारता हा निर्णय कसा अपरिपक्व/चुकीचा आहे ते तुम्ही सांगा. निव्वळ चिखलफेक का करताय?

ह्या बॅन्केतून इतके पैसे मिळत आहेत की लोक आनंदाने वेडे होऊन दगडफेक करायला लागले. व्वा मोदीजी वाह! http://www.dnaindia.com/india/report-gujarat-villagers-pelt-stones-at-b…

In reply to by संदीप डांगे

म्हणजे हेच भारतभर चाललं आहे तर! अजेन्डा क्लिअर दिसतोय! व्वा डांगेंजी व्वाह!

In reply to by संदीप डांगे

कुठेही कोणाला काही त्रास नाही सांगतांना
द्या बरे दाखवून हे कुठे म्हणालो ते!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

जे लोक असं सांगतायत त्यांच्यासाठी आहे ते... तुम्ही का अंगावर ओढून घेताय प्रत्येकवेळी?

In reply to by संदीप डांगे

तसं तुम्ही स्पष्ट लिहिलं नाही म्हणून! माझ्या प्रतिसादाला उत्तर देताना तुम्ही तसं म्हणत आहात! आणि तसंही सरसकटीकरण नको असं आधीपासूनच माझं मत आहे!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

महामहिम डांगे यांच्या सहीशिक्क्याने आणि गोडसे यांच्या सहीने साक्षांकित असलेले *सदरहू इसम हा मोदी चा भक्त नाही. भाजपा या पक्षाशी त्याच्या दुरान्वये हि संबंध नाही.* हे प्रमाणपत्र आणून इथे त्याची छायाप्रत दिल्यावरच तुमचा प्रतिसाद ग्राह्य धरला जाईल अन्यथा इथे हतोळकर,खरे,म्हात्रे आणि इथे ट्रुमन आणि गामा पैलवान नावाने वावरणारी व्यक्ती,तुमचे सगळे म्हणजे अगदी प्रत्येक प्रतिसाद हे पूर्णपणे पक्षपाती,आंधळे समर्थन करणारे,असंबद्ध आणि गैरलागू,आहेत.

In reply to by संदीप डांगे

कुठेही कोणाला काही त्रास नाही सांगतांना कोणता एजेंडा दिसतो मग? मिपावर किंवा अन्य कोठे, कोण म्हणाले आहे की "कुठेही कोणाला काही त्रास नाही..?" लिंका द्या. नेहमी खोटे बोलून बोलून कंटाळा कसा येत नाही हो तुम्हाला..?

In reply to by मोदक

आधी सांगा, तुम्हाला दुसर्‍यांवर पैसे खाऊन प्रतिसाद देतो असे खोटेनाटे आरोप करतांना व सतत खोटे बोलता म्हणतांना कसा कंटाळा येत नाही?

In reply to by संदीप डांगे

तुम्हाला पैसे मिळत नाहीत..? मग इतके कोडगेपणाने खोटे बोलून नक्की काय मिळवता..? तुमचे प्रतिसाद खोटे पाडायचा कंटाळा आला होता म्हणून थोडा ब्रेक घेतला होता. पण तुमची कावीळ बरी झाली नाही म्हणून अनिच्छेने परत खोटे प्रतिसाद उघडे पाडत आहे. लिंका मिळाल्या का..? की नेहमीप्रमाणे पळ काढणार..?

In reply to by मोदक

जर मी खोटे बोलतो आणि ते पब्लिकला सगळं कळतं असा तुमचा दावा आहे (कुठेतरी तुम्हीच केलाय बॉ, त्याच्याही लिंका मागाल नाहीतर) तर जिथेतिथे परत परत त्याच त्याच ओकार्‍या करायला का बरे यावे वाटते? स्वत:च्या सत्यावर (लोल!) भरोसा नाही काय? हे लिंका द्या लिंका द्या काय लावलंय...? मी कधी म्हटलो लिंका देईन म्हणून...? स्वतःच आपलं कुस्तीसाठी षड्डु ठोकत फिरायचं आणि कोणी भाव देत नाही म्हटल्यावर बघा कसे घाबरले म्हणून मिशीला पीळ भरायचा... लगे रहो! उद्या मी जर म्हटले की सुर्य पुर्वेकडून उगवतो तर त्याच्याही लिंका मागाल....!