✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा फिटनेस विकांत

प
प्रशांत यांनी
Sun, 12/04/2016 - 20:39  ·  लेख
लेख
नमस्कार, एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत. यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग.. आपले लक्ष्य ठरवा, इथे लिहा आणि १० व ११ डिसेंबरला पूर्ण करा. मिपा सायकल ग्रुप चे एकुलते एक डॉक ११ डिसेंबरला औरंगाबाद ते पुणे सायकल ने येणार म्हणून हा विकांत निवडला काहिंना गुरुवार (७ डिसेंबर) किंवा सोमवार (१२ डिसेंबर) आठवड्याची सुट्टी असते, त्यांनी ते दिवस फिटनेस विकांत समजुन व्यायाम करण्यास करण्यास हरकत नाही ************************* नेहमीप्रमाणे कांही सूचना. १) आपण लक्ष्य ठरवून आपणच पार करायचे आहे त्यामुळे आपली स्वतःशी स्पर्धा असणार आहे. २) कोणताही व्यायामप्रकार ठरवा आणि दोन दिवसात लक्ष्य पूर्ण करा. ३) भरपूर फोटो काढा.. व्यायाम न करणार्‍या मिपाकरांना इनो घ्यायला लागेल याची काळजी घ्या..!! ;) *************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
51109 वाचन

💬 प्रतिसाद (179)

प्रतिक्रिया

माझं चुकलं का?

कंजूस
गुरुवार, 12/08/2016 - 19:47 नवीन
माझं चुकलं का?

टैम्प्लीज,

नीलमोहर
गुरुवार, 12/08/2016 - 20:05 नवीन
एरवी नियमित चालणं असतं, सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या, आठवण आणि इच्छा झाली की कधीतरी असतात, मात्र एक वर्षाचं बाळ सांभाळणे, त्याच्या मागे पळणे हा जगातील सगळ्यात मोठा व्यायाम आहे म्हणतात, आता तुम्हीच सांगा मालक, अजून वेगळ्या व्यायामाची गरज आणि त्यासाठी स्टॅमिना असेल का :) तरीही मालकांनी कधी नव्हे ते धागा काढलाय म्हटल्यावर प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्या जाईल.

फिट्नेस

प्रशांत
Fri, 12/09/2016 - 22:14 नवीन
मात्र एक वर्षाचं बाळ सांभाळणे, त्याच्या मागे पळणे हा जगातील सगळ्यात मोठा व्यायाम आहे म्हणतात,
नाहि यावर डॉ. अधीक सांगतील. फिट्नेस विकांतापासुन सुरुवात करा आणि नियमित करण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम करावा म्हणुन मी मित्रासोबत पैज लावतो ज्याने महिन्यात जास्त खाद खाडे केलेत त्यानी पार्टि द्यावी.
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मिपाकरांनो, उठा, चला, उठा,

एस
Fri, 12/09/2016 - 00:47 नवीन
मिपाकरांनो, उठा, चला, उठा, राष्ट्रवीर हो! सुसज्ज व्हा उठा चला... (आठवण करून दिली. आत्ता झोपा. अजून एक दिवस आहे. शनवार मात्र गाजवा!) गुरूवारवाले, काय अपडेट?

गेल्या ३ दिवसात....

डॉ श्रीहास
Fri, 12/09/2016 - 08:31 नवीन
गेल्या ३ दिवसात.... १२३ किमी सायकलींग झालंय... आता मोठी राईड रविवारची !!
↩ प्रतिसाद: एस

All the best doc!

देशपांडेमामा
Fri, 12/09/2016 - 13:11 नवीन
डॉक तुम्हाला सदिच्छा देण्यासाठी मीसुध्द्धा उद्या (शनिवारी ) २०० किमी सायकलींग करणार आहे :-) देश
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

वा !!

डॉ श्रीहास
Fri, 12/09/2016 - 19:04 नवीन
तुम्हाला २०० किमी ब्रेव्हे साठी शुभेच्छा...
↩ प्रतिसाद: देशपांडेमामा

बेस्ट हॉप लक

प्रशांत
Fri, 12/09/2016 - 22:16 नवीन
मामा उद्या सकाळी पुणे विद्यापिठात भेटण्याचा प्रयत्न करतो
↩ प्रतिसाद: देशपांडेमामा

१०km फास्ट वॉक

सप्तरंगी
Fri, 12/09/2016 - 20:36 नवीन
चांगले motivation आहे. मी आठवड्यातुन ५ वेळा ४km चालते (फास्ट वॉक), आठवड्याला २०km , एरवी शनिवार-रविवार दांडी मारते पण या शनिवारी आणि रविवारी १०km फास्ट वॉक नक्की करेन.

सहा सूर्यनमस्कार घालून झाले

एस
Sat, 12/10/2016 - 05:37 नवीन
सहा सूर्यनमस्कार घालून झाले आहेत. उद्या उर्वरित सहा. आता सायकलिंग सुरू. @श्रीहासराव, निघालात का औरंगाबादवरून? प्राडॉंची भेट झाली का?

दोन डॉक्टरांची ऐतिहासिक भेट

मोदक
Sat, 12/10/2016 - 10:19 नवीन
दोन डॉक्टरांची ऐतिहासिक भेट उद्या होईल.
↩ प्रतिसाद: एस

_/\_

डॉ श्रीहास
Sat, 12/10/2016 - 14:34 नवीन
_/\_
↩ प्रतिसाद: मोदक

उद्या निघणार...

डॉ श्रीहास
Sat, 12/10/2016 - 14:36 नवीन
डाॅ. बिरूटेंना भेटणार.... फोटो सर टाकतीलच वृत्तांतासकट..
↩ प्रतिसाद: एस

जमलं हो देवा!

अनिरुद्ध.वैद्य
Sat, 12/10/2016 - 10:00 नवीन
विकांताच ६० सुर्य नमस्काराचं टारगेट पुर्ण झाल :) ६० झाल्यावरही उत्साह होता, म्हणुन अजुन १२ घालुन घेतले. तेव्हा, आजचा आकडा ७२. संध्याकाळी इच्छा झाली तर जीममध्ये जाईल. उद्या जीमला सुटी असल्याने परत सुन घालीन अथवा माझी पण सुट्टी ;) सगळ्यांना शुभेच्छा!

12 सून

सामान्य वाचक
Sat, 12/10/2016 - 10:15 नवीन
आणि 1तास strength training

मिपा फिटनेस विकांत राइड

प्रशांत
Sat, 12/10/2016 - 10:20 नवीन
मिपा फिटनेस विकांत राइड ५६.४ किमि २ तास ३७ मिनिट सरासरी वेग २१.६ किमि. + १२ सुर्यनमस्कार

क्या बात !!

डॉ श्रीहास
Sat, 12/10/2016 - 16:26 नवीन
लिडींग फ्राॅम द फ्रंट ....
↩ प्रतिसाद: प्रशांत

रांजनगाव राइड

प्रशांत
Mon, 12/12/2016 - 15:01 नवीन
रविवार ची राइड ठरल्याप्रमाणे झाली.मी, नकुल, सागर आणि मोदक रांजनगाव पर्यंय सायकल ने गेलो आणि डॉ सोबत पुण्याला आलो माझी १०६ किमी सायकलींग झाली Image removed.
↩ प्रतिसाद: प्रशांत

लय भारी हो दादा

अरिंजय
Mon, 12/12/2016 - 16:41 नवीन
जोरदार राईडी झाल्या सगळ्यांच्या. सर्वांचे अभिनंदन.
↩ प्रतिसाद: प्रशांत

धन्यवाद हो..

मोदक
Mon, 12/12/2016 - 18:39 नवीन
धन्यवाद हो.. माझे काल १३० किमी झाले आणि संपूर्ण आठवड्यात ३१० किमी झाले. :)
↩ प्रतिसाद: अरिंजय

हे भारी आहे....

इरसाल कार्टं
Mon, 12/12/2016 - 23:04 नवीन
हे भारी आहे, तुम्हाला पुण्यासारख्या शहरात राहून पण सायकलिंग करता येते, इकडे आम्ही गावाकडे आहोत पण रस्ते खूप खराब आहेत छोटे मोठे सगळे. किमान सायकलिंगच्या लायकीचे तर अजिबात नाहीत. असो, आम्ही हरिश्चंद्रगड ची ट्रेक संपवून आलोय आत्ताच अन हॉटेलात आलोय. छान झाली ट्रेक अन त्या निमित्ताने फिटनेस वीकांतही. फोटो टाकेनाच उद्या परवा.
↩ प्रतिसाद: प्रशांत

प्रशांत, स्ट्रावामधले

कंजूस
Sat, 12/10/2016 - 10:53 नवीन
प्रशांत, स्ट्रावामधले "elevation 290 meters" हे अल्टिट्युडचे मोजमाप इतर gps route tracerप्रमाणेच गंडलेलं असतं का? खरे gps unit altitude किती दाखवते पुणे/पिंपरी/चिंचवडची? ५५०मिटर्स ना?

अहो ते सायकलने किती चढ चढलात

एस
Sat, 12/10/2016 - 21:11 नवीन
अहो ते सायकलने किती चढ चढलात त्याची बेरीज करतं. म्हणून इतके एलेव्हेशन गेन. अल्टिट्यूड गेन नाही.
↩ प्रतिसाद: कंजूस

कात्रज चढून गेलात तर २९० मि

कंजूस
Sun, 12/11/2016 - 04:58 नवीन
कात्रज चढून गेलात तर २९० मि गेन होत असेल. पिंचिंत चढ उताराचे मोजले गेलेत वाटतं. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: एस

altitude/elevation gain 29

कंजूस
Sat, 12/10/2016 - 10:55 नवीन
altitude/elevation gain 29 meters ठीक वाटते.

70 किमी सायकल राईड पूर्ण.

एस
Sat, 12/10/2016 - 14:34 नवीन
70 किमी सायकल राईड पूर्ण.

वा!!

डॉ श्रीहास
Sat, 12/10/2016 - 16:25 नवीन
जोरदार ७० !!
↩ प्रतिसाद: एस

व्वाह..!!!!

मोदक
Sat, 12/10/2016 - 19:10 नवीन
व्वाह..!!!!
↩ प्रतिसाद: एस

मी थोडे स्ट्रेचेस आणि १२

रेवती
Sat, 12/10/2016 - 19:43 नवीन
मी थोडे स्ट्रेचेस आणि १२ सूर्यनमस्कार घातले. उजवा हात अजूनही पूर्णपणे टेकवता येत नाहीये तरी जमले म्हणायचे.

५० सूर्यनमस्कार घातले आज!

चतुरंग
Sat, 12/10/2016 - 19:56 नवीन
फारच एनर्जेटिक वाटतंय! आता उद्या ५० घालणार. (आनंदी)रंगा

कुठल्याही प्रकारचा व्यायाम

एस
Sat, 12/10/2016 - 22:34 नवीन
कुठल्याही प्रकारचा व्यायाम केला तरी इथे टाका. 'फिटनेस' महत्त्वाचा आहे. व्यायामप्रकार आपापल्या आवडीनुसार करायचा आहे.

काल आणि आज मिळून १० किमी चालण

पिंगू
Sat, 12/10/2016 - 22:35 नवीन
काल आणि आज मिळून १० किमी चालण झालेय आणि तेही दिवसभरात.

आजची राईड

अरिंजय
Sat, 12/10/2016 - 22:49 नवीन
विकांताच्या पहिल्या दिवसाची सायकल राईड ४४.८ किमी. Image removed.

माझी विकेन्ड राईड- पार्ले ते कल्याण

चंबा मुतनाळ
Sun, 12/11/2016 - 07:31 नवीन

आज सहा सूर्यनमस्कार झाले.

एस
Sun, 12/11/2016 - 09:05 नवीन
आज सहा सूर्यनमस्कार झाले. एकूण काल आणि आज मिळून बारा पूर्ण झाले. पाय मुरगळल्यामुळे चालण्याचे लक्ष्य पूर्ण करता येणार नाही मात्र! :-(

साडे पाच किमी

सामान्य वाचक
Sun, 12/11/2016 - 09:50 नवीन
जॉग झाले आज

काल 200 किमी...

देशपांडेमामा
Sun, 12/11/2016 - 10:17 नवीन
200 किमीची BRM 10 तासांमध्ये पूर्ण केली देश

बापरे! जबरदस्त!

एस
Sun, 12/11/2016 - 10:27 नवीन
बापरे! जबरदस्त!
↩ प्रतिसाद: देशपांडेमामा

साष्टांग नमस्कार!

पैसा
Sun, 12/11/2016 - 10:26 नवीन
सगळ्या सायकलवाल्यांना साष्टांग नमस्कार!

मी आज हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली.

शलभ
Sun, 12/11/2016 - 17:00 नवीन
मी आज हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. ह्या वीक च 50 चं टारगेट होतं 47 झाले. शुक्र-शनी रेस्ट घेतली आजच्यासाठी. माझ्याबरोबर मिपाकर अमित जोशी सुद्धा होते. त्यांनीही पूर्ण केली.

अभिनंदन शलभराव

अरिंजय
Mon, 12/12/2016 - 16:36 नवीन
अभिनंदन शलभराव
↩ प्रतिसाद: शलभ

_/\_

प्रशांत
Mon, 12/12/2016 - 18:12 नवीन
अभिनंदन
↩ प्रतिसाद: शलभ

Today I finished Vasai-Virar

अनिल मोरे
Sun, 12/11/2016 - 22:08 नवीन
Today I finished Vasai-Virar Half Marathon in 1hr 50mins

व्वा वा!

कंजूस
Mon, 12/12/2016 - 07:24 नवीन
व्वा वा!
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

अभिनंदन... खूपच चांगला वेग

बाळ सप्रे
Mon, 12/12/2016 - 12:28 नवीन
अभिनंदन... खूपच चांगला वेग आहे..
↩ प्रतिसाद: अनिल मोरे

+१ खुपच मस्त वेग..

शलभ
Mon, 12/12/2016 - 14:35 नवीन
+१ खुपच मस्त वेग..
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

तुम्ही रनींगवर काहीतरी लिहा

मोदक
Mon, 12/12/2016 - 16:09 नवीन
तुम्ही रनींगवर काहीतरी लिहा की.. (सायकलिंग सारखे..)
↩ प्रतिसाद: शलभ

माझी तर आत कुठे सुरुवात आहे.

शलभ
Mon, 12/12/2016 - 17:24 नवीन
माझी तर आत कुठे सुरुवात आहे. अजून १-२ वर्षांनी लिहू शकेन रनिंग चालू राहिले तर..:) हीच विनंती बाळ सप्रेंना करूयात.
↩ प्रतिसाद: मोदक

सुरुवात

प्रशांत
Mon, 12/12/2016 - 18:12 नवीन
माझी तर आत कुठे सुरुवात आहे.
तुम्हि आता लिहायला सुद्धा सुरुवात करा बाळ सप्रेंना आपण त्यात भर टाकायला विनंती करु..
↩ प्रतिसाद: शलभ

अभिनंदन

अरिंजय
Mon, 12/12/2016 - 16:38 नवीन
अभिनंदन मोरेसाहेब. वेळ पण भारी नोंदवलीत.
↩ प्रतिसाद: अनिल मोरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा