Skip to main content

मिपा फिटनेस विकांत

लेखक प्रशांत यांनी रविवार, 04/12/2016 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत. यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग.. आपले लक्ष्य ठरवा, इथे लिहा आणि १० व ११ डिसेंबरला पूर्ण करा. मिपा सायकल ग्रुप चे एकुलते एक डॉक ११ डिसेंबरला औरंगाबाद ते पुणे सायकल ने येणार म्हणून हा विकांत निवडला काहिंना गुरुवार (७ डिसेंबर) किंवा सोमवार (१२ डिसेंबर) आठवड्याची सुट्टी असते, त्यांनी ते दिवस फिटनेस विकांत समजुन व्यायाम करण्यास करण्यास हरकत नाही ************************* नेहमीप्रमाणे कांही सूचना. १) आपण लक्ष्य ठरवून आपणच पार करायचे आहे त्यामुळे आपली स्वतःशी स्पर्धा असणार आहे. २) कोणताही व्यायामप्रकार ठरवा आणि दोन दिवसात लक्ष्य पूर्ण करा. ३) भरपूर फोटो काढा.. व्यायाम न करणार्‍या मिपाकरांना इनो घ्यायला लागेल याची काळजी घ्या..!! ;) *************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 51644
प्रतिक्रिया 179

प्रतिक्रिया

मी एका लॅपनंतर थांबतो त्याऐवजी दोन लॅप्सनंतर थांबायचं लक्ष्य ठेवेन. फक्त कितीही फोटो काढू म्हटलं तरी ते शक्य होईलसं दिसत नाहीय.

आणि सूर्यनमस्कार घालेन. ...अर्थातच लवकर उठले तर! नाहीतर संध्याकाळी वेळ मिळाला कि चांद्रनमस्कार! ;)

मी विकांताला १२ किमी धावणे आणि चालण्याचं उद्दिष्ट आहे त्यापैकी किमान ८ किमी धावण्याचा प्रयत्न राहील.

In reply to by साधा मुलगा

काही अपरिहार्य कारणांमुळे मला विकांताला काही करता आले नाही पण म्हणून आज 4 किमी धावून आणि 2 किमी चालून टार्गेट पेक्षा जास्त व्यायाम केला. सर्व मिपाकरांचे अभिनंदन!!उपक्रमात सहभागी झाल्याचे समाधान वाटत आहे.

चायला मागे नवी मुंबई कट्ट्याचे फोटो पाहून मिपाकरांना फिटनेसची गरज आहे असे वाटले होते, आता बघतो तर एक सो एक लोक इथे मिळत आहे , १०० किमी सायकलिंग काय, १० किमी धावणे काय, ६०-७० सूर्यनमस्कार काय, इथे ३-४ किमी धावून आपला स्टॅमिना संपतो, मानलं बुआ मिपाकरांना _/\_

येत्या शनिवारी ३५ किमी सायकलिंग करेन.. रविवारी जमत नाहिये वैयक्तिक कामामुळे :(

घरी ट्रेंड मिल डंबेल्स असूनसुद्धा कधी व्यायाम केला नाही पहिल्यापासून आम्ही स्लिम अँड ट्रिम हो. त्यामुळे हातावर फिटबीट बांधणं आणि फिरणं याउपर व्यायाम नाही :) . ट्रेकिंग करतो स्विमिन्ग करतो पण नियमित काहीच नाही . जिमखाना आणि एक क्लब ला मेम्बरशिप असून काही केलं नाही. चांगला उपक्रम ५ किमी धावण्यात येईल आमच्या इथल्या मैदानात .

प्रतिसादा बद्दल सर्वांचे मनापासुन आभार्स... सर्वांनी फिटनेस विकांताची तयारी सुरु केली असेलच... नाहि का?

In reply to by प्रशांत

हो. आमच्या शून्य किमी चालण्याच्या सवयीप्रमाणे पाहता ६ किमी विकांती (३+३) हे मोठंच आव्हान आहे. इथले दिग्गज फिट लोक पाहून अतिन्यूनगंड येत आहे. पण गेला महिनाभर या धाग्यांना वाचून चालणं सुरु केलंय. कालपर्यंत २ आणि आज सलग तीन किमीपर्यंत स्टॅमिना वाढवण्याचा प्रयत्न केला. आज तीन किमी सलग जमले. विकांताचं ध्येय पूर्ण करण्याची ही पूर्वतयारी आहे. इतरांच्या मानाने हे ध्येय चिमुकलंच आहे. पण अनेक वर्षं कसल्याच व्यायामाची सवय नसलेल्याला हे ध्येय सध्या जास्तच आहे. सर्वांनी एकमेकांना अशीच स्फूर्ती देत रहा.

तयारी सुरु केलीए! दोन्ही दिवस प्रत्येकी ५० सूर्यनमस्काराचे (एकूण १००) लक्ष्य ठेवले आहे! -रंगा

एस, रेवती , पिलीयन रायडर, अजया, स्नेहांकिता, इशा१२३, सानझरी, खेडूत, प्रीत-मोहर, अनिरुद्ध.वैद्य,लीमाउजेट,पिंगू आणि चतुरंग व ईतर मिपाकर यांना यांच्यासोबत २४ (१२+१२ असे) सूर्यनमस्कार घालण्यात येतील

शनवार रैवार मिळून ८ माईल ट्रेडमिल वॉकिंगचे उद्दिष्ट ठेवतोय. उत्तम उपक्रम. व्यायामातल्या सातत्यासाठी मोटिव्हेशनची गरज वारंवार भासते, ती अश्या धाग्यातून मिळो. धन्यवाद.

Prophet Muhammad कृपेने मोठा विकांत मिळेल. मोठा विकांत असल्याने ६० की मी होतील ३ दिवसात.

हरिश्चंद्रगड चे ट्रेकिंग करणार आहे. ११ आणि १२ डिसेंबर ला. चालेल ना?

In reply to by इरसाल कार्टं

तर येवु द्या फोटो येथे आणि भट्कंती मधे

In reply to by प्रशांत

तयारी चालू झालीय, चौथी वेळ असली हरिश्चंद्रगड ट्रेकची तरी एक्सायटिंग वाटतंय.

एरवी नियमित चालणं असतं, सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या, आठवण आणि इच्छा झाली की कधीतरी असतात, मात्र एक वर्षाचं बाळ सांभाळणे, त्याच्या मागे पळणे हा जगातील सगळ्यात मोठा व्यायाम आहे म्हणतात, आता तुम्हीच सांगा मालक, अजून वेगळ्या व्यायामाची गरज आणि त्यासाठी स्टॅमिना असेल का :) तरीही मालकांनी कधी नव्हे ते धागा काढलाय म्हटल्यावर प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्या जाईल.

In reply to by नीलमोहर

मात्र एक वर्षाचं बाळ सांभाळणे, त्याच्या मागे पळणे हा जगातील सगळ्यात मोठा व्यायाम आहे म्हणतात,
नाहि यावर डॉ. अधीक सांगतील. फिट्नेस विकांतापासुन सुरुवात करा आणि नियमित करण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम करावा म्हणुन मी मित्रासोबत पैज लावतो ज्याने महिन्यात जास्त खाद खाडे केलेत त्यानी पार्टि द्यावी.

मिपाकरांनो, उठा, चला, उठा, राष्ट्रवीर हो! सुसज्ज व्हा उठा चला... (आठवण करून दिली. आत्ता झोपा. अजून एक दिवस आहे. शनवार मात्र गाजवा!) गुरूवारवाले, काय अपडेट?

In reply to by डॉ श्रीहास

डॉक तुम्हाला सदिच्छा देण्यासाठी मीसुध्द्धा उद्या (शनिवारी ) २०० किमी सायकलींग करणार आहे :-) देश

In reply to by देशपांडेमामा

तुम्हाला २०० किमी ब्रेव्हे साठी शुभेच्छा...

In reply to by देशपांडेमामा

मामा उद्या सकाळी पुणे विद्यापिठात भेटण्याचा प्रयत्न करतो

चांगले motivation आहे. मी आठवड्यातुन ५ वेळा ४km चालते (फास्ट वॉक), आठवड्याला २०km , एरवी शनिवार-रविवार दांडी मारते पण या शनिवारी आणि रविवारी १०km फास्ट वॉक नक्की करेन.

सहा सूर्यनमस्कार घालून झाले आहेत. उद्या उर्वरित सहा. आता सायकलिंग सुरू. @श्रीहासराव, निघालात का औरंगाबादवरून? प्राडॉंची भेट झाली का?

विकांताच ६० सुर्य नमस्काराचं टारगेट पुर्ण झाल :) ६० झाल्यावरही उत्साह होता, म्हणुन अजुन १२ घालुन घेतले. तेव्हा, आजचा आकडा ७२. संध्याकाळी इच्छा झाली तर जीममध्ये जाईल. उद्या जीमला सुटी असल्याने परत सुन घालीन अथवा माझी पण सुट्टी ;) सगळ्यांना शुभेच्छा!

आणि 1तास strength training

In reply to by प्रशांत

रविवार ची राइड ठरल्याप्रमाणे झाली.मी, नकुल, सागर आणि मोदक रांजनगाव पर्यंय सायकल ने गेलो आणि डॉ सोबत पुण्याला आलो माझी १०६ किमी सायकलींग झाली .

In reply to by प्रशांत

हे भारी आहे, तुम्हाला पुण्यासारख्या शहरात राहून पण सायकलिंग करता येते, इकडे आम्ही गावाकडे आहोत पण रस्ते खूप खराब आहेत छोटे मोठे सगळे. किमान सायकलिंगच्या लायकीचे तर अजिबात नाहीत. असो, आम्ही हरिश्चंद्रगड ची ट्रेक संपवून आलोय आत्ताच अन हॉटेलात आलोय. छान झाली ट्रेक अन त्या निमित्ताने फिटनेस वीकांतही. फोटो टाकेनाच उद्या परवा.

प्रशांत, स्ट्रावामधले "elevation 290 meters" हे अल्टिट्युडचे मोजमाप इतर gps route tracerप्रमाणेच गंडलेलं असतं का? खरे gps unit altitude किती दाखवते पुणे/पिंपरी/चिंचवडची? ५५०मिटर्स ना?

altitude/elevation gain 29 meters ठीक वाटते.

मी थोडे स्ट्रेचेस आणि १२ सूर्यनमस्कार घातले. उजवा हात अजूनही पूर्णपणे टेकवता येत नाहीये तरी जमले म्हणायचे.

कुठल्याही प्रकारचा व्यायाम केला तरी इथे टाका. 'फिटनेस' महत्त्वाचा आहे. व्यायामप्रकार आपापल्या आवडीनुसार करायचा आहे.

विकांताच्या पहिल्या दिवसाची सायकल राईड ४४.८ किमी.

आज सहा सूर्यनमस्कार झाले. एकूण काल आणि आज मिळून बारा पूर्ण झाले. पाय मुरगळल्यामुळे चालण्याचे लक्ष्य पूर्ण करता येणार नाही मात्र! :-(

200 किमीची BRM 10 तासांमध्ये पूर्ण केली देश

मी आज हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. ह्या वीक च 50 चं टारगेट होतं 47 झाले. शुक्र-शनी रेस्ट घेतली आजच्यासाठी. माझ्याबरोबर मिपाकर अमित जोशी सुद्धा होते. त्यांनीही पूर्ण केली.