Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 11/24/2016 - 16:53
८ नोव्हेंबर १६ ला जाहीर झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या इन्व्हॅलिडेशनने देशात अभूतपूर्व चलनकोंडी झाली आहे. पण सध्या ती आपण बाजूस ठेवू. या निर्णयाने ज्यांच्याकडे काळा पैसा ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होता त्यांना तो जाहीर करून त्यावर कर आणि दंड भरावा लागणार आहे. पंतप्रधानांनी काळ्या पैशाच्या आणि भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीवर जालीम उपाय केल्याने सर्व राष्ट्रभक्त नागरिक खूष झाले आहेत. यात एक अडचण आहे. काही अर्थतज्ञांच्या मते खर्‍या काळ्या पैशापैकी थोडाच या क्षणी रोख रकमेच्या स्वरूपात असेल. त्यामुळे काही थोडे लोक पकडले गेले तरी सर्व काळा पैसा काही बाहेर पडणार नाही. "चोराच्या हातची लंगोटी" असे समजून सरकार कदाचित तेवढ्यावर समाधान मानणारही असेल. पण आपण एवढ्यावर समाधान मानायची काही गरज नाही. ही एक नामी संधी आपल्याकडे चालून आली आहे. आपण यापूर्वी झालेला भ्रष्टाचारसुद्धा उघडकीस आणून देशसेवा करू शकतो गेल्या पाच वर्षात आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल. घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील. घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्‍यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील. पाल्यांच्या अ‍ॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल. घरात कुठला अ‍ॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल. आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू. आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल. आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल. तर आपण या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देऊन योग्य तो दंड भरून देशसेवा करू शकतो. तसेच आपण ज्यांना रोखीने पैसे दिले त्यांची नावे सरकारला कळवून त्यांच्याकडून पण देशाला कर आणि दंड मिळेल असे करू शकतो. आपल्याला यात थोडा त्रास, आर्थिक नुकसान वगैरे होईल. कदाचित आपले आपल्या स्नेह्यांशी संबंध ताणले जातील पण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी थोडा त्याग तर करावाच लागणार !!! तर मग चला मित्रहो !! कामाला लागा. ९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच.
  • Log in or register to post comments
  • 69247 views

प्रतिक्रिया

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 11/28/2016 - 17:40

In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी

Permalink

काका, हा जो काही वाढीव टक्का

काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे). उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ? असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता. ८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Mon, 11/28/2016 - 17:45

In reply to काका, हा जो काही वाढीव टक्का by अप्पा जोगळेकर

Permalink

बँक / पेटीम जे कोणी मध्ये

बँक / पेटीम जे कोणी मध्ये आहेत ते. ते दोघांकडून पैसे उकळतात. हे असे करूनच आता बँक नफ्या मध्ये आणण्याचा सरकारचा विचार आहे ...
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 11/28/2016 - 17:56

In reply to बँक / पेटीम जे कोणी मध्ये by अभिजित - १

Permalink

ओके. म्हणजे पेमेंट बँक्स च्या

ओके. म्हणजे पेमेंट बँक्स च्या २ टक्के कमिशनसाठी नोट बंदी केली असे म्हणायचे आहे का ? बाकी, पेटीएमचे बिझनेस मॉडेल वेगळे आहे. पेमेंट बँकिंगचे वेगळे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Mon, 11/28/2016 - 18:30

In reply to ओके. म्हणजे पेमेंट बँक्स च्या by अप्पा जोगळेकर

Permalink

सर्व वडापाव वाले, सँडविच वाले

सर्व वडापाव वाले, सँडविच वाले, प्लम्बर , वायरमन , सुतार आणि किराणा याना टॅक्स नेट मध्ये आणणे हा मुख्य उद्देश .. आधी इनकम टॅक्स , २ वर्षात सर्व्हिस टॅक्स . आता हे सर्व लोक स्वतःच्या खिशातून हे भरणार नाहीतच. शेवटी हा सगळं भार आपल्या डोक्यावरच पडणार .. आपण देशभक्त आहोत .. आपण तो उचलू !! विनातक्रार ..
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 11/29/2016 - 07:21

In reply to काका, हा जो काही वाढीव टक्का by अप्पा जोगळेकर

Permalink

अप्पाजी,

अप्पाजी, प्रश्र्न तो नाही. मला १ % किंवा काय असेल ते परवडत नाही. मला दुसरा पर्याय उपलब्ध रोखीचाच आहे. तो मी वापरणार.. म्हणजे रोखीचे व्यवहार जाणार नाहीत. सरकारने कितीही प्रयत्न केले तरीही.... आणि सरकारने जर जबरदस्ती केली तर ती न्यायालयात टिकणार नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 11/28/2016 - 18:10

In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी

Permalink

डीलरने घेणे चुकीचे आहे

http://www.ebharatgas.com/ebharat/forHome/home.html आता ऑनलाईन पेमेंट करून प्रीपेड रिसिट जनरेट होते असे दिसते. तिथेही जादा चार्ज पडतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by दिगोचि on Mon, 11/28/2016 - 17:00

Permalink

Many comments made in these

Many comments made in these pages seem to be unworkable. A commentator has written that those farmers who do not depend only on rainfall for their crops should be taxed. This suggestion will create such a ruckus that PM Modi will not last for a day in the job. PM Modi may not care about his job but the party does care and wants to stay in power for long time. Any astute leader will get some his policies passed and once that is done fight for the remaining ones and thus will eventually get all his policies passed by the parliament. Recently the Australian Parliament passed a law which will tax itinerant farm workers 15% tax on their earnings. The government wanted 33% whereas the opposition wanted to charge 10% and because Government is in minority in the upper house compromised on a lesser figure. Indian political leaders are not that compromising they want Modi out and a return to previous situation in which politicians and business leaders and goondas got richer and the people remained poor. Therefore Modi has to move softly.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Mon, 11/28/2016 - 17:06

In reply to Many comments made in these by दिगोचि

Permalink

But Mr. Prime-minister said

But Mr. Prime-minister said in one of his emotional speeches in which he shed some tears for the poor that he will take all the harsh measures possible to collect Govt. share from the economy and in doing so he does not care if he loses power...etc...etc... Now tell me considering such a honest man he is, how can he adopt double standards for various types of Monies in the economy, for acquiring share of the Govt.?...
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 11/28/2016 - 18:17

Permalink

आपण सगळे साधारणपणे सरकारी व

आपण सगळे साधारणपणे सरकारी व राजकिय नेत्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतो. काळा पैसा निर्माण होण्याचे आणखी एक मोठे क्षेत्र जे की कॉर्पोरेट व खाजगी क्षेत्रातले व्यवहार. माझा एक अनुभवः देशात लोखंड उद्योगात अग्रणी असलेल्यांपैकी एका मोठ्या उद्योगसमूहाचे नाशिकला एक मोठे युनिट आहे. त्यांच्या अमेरिकेतल्या एका खटल्यानिमित्त त्यांना एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचे अ‍ॅनिमेशन ताबडतोब बनवून हवे होते. अशी मोठी कामे सहसा मध्यस्थांकडून येतात व त्यांचे पैसे वेण्डर-मध्यस्थ बीलींगच्या स्वरुपावर ठरतात. मी तिकडे गेलो तेव्हा ज्या एम्प्लोयीला मला ब्रिफ करायला व प्रोजेक्ट मॅनेज करायला ठेवले होते तो 'मलाही पैसे हवे' असे काहीही बोलला नाही, ना मला मध्यस्थाने तसे काही आगावू कळवले. हा एम्प्लॉयी (बड्या पदावर होता) आपण या नोकरीत किती मजेत व सर्व बाबतीत सुखी समाधानी आहोत ह्याबद्दल बोर होईस्तोवर बडबडत होता. (त्यामुळे तर मला अजिबात शंका आली नाही) मी जेव्हा थेट प्लांट महाव्यवस्थापकाला स्टोरीबोर्ड आणि आयडीया डिस्कशन सोबत कोटेशन दिले तेव्हा सर्व हिशोब करुन पैसे सांगितले व त्यांनी लगेच तिथे मंजूर केलेही, त्यांना विचार करायला वेळ नव्हता. काम झाल्यावर नंतर चेक काही येईना. वास्तवात अ‍ॅडव्हान्स पेमेंट ची अट होती, तरी मोठं नाव बघून मी ती अट सौम्य केली, म्हटले आधी यांचे काम काढून देऊ कारण ते फार अर्जंट होते. काम होऊन वीस दिवस मी रोज फॉलो-अप घेत होतो. पैसेच येत नव्हते. जो एम्प्लॉयी नियुक्त केला होता सुरुवातीला तो अकाउंटला शिव्या घालायचा, अरे ते कामच करत नाहीत, आणि शंभर कारणे. मग मला मध्यस्थाचा फोन आला, अरे बाबा, त्याचे पाच हजार देऊन टाक तो तुला स्वतः घरी चेक आणून देइन. मी मध्यस्थावर उखडलो, अरे त्याने आधी सांगायला हवे ना पैसे हवेत म्हणून, खालीपिली टाईमपास कशाला केला. मला असं माहित असतं तर कोटेशन जास्त दिलं असतं. तर मला मध्यस्थ म्हणाला, अहो नाशिकात असेच असते, कोणी स्वत:हून म्हणणार नाही, आपण देऊन टाकायचे, रितच आहे ती इथली. मी म्हटले बाबारे, मी बरीच कामे केली पण मला कोणी आजवर असे पैसे मागितले नाहीत. हे लोक वरुन साधु आतून चोर दिसतात. शेवटी त्याला पाच हजार दिले तेव्हा सर्व पैसे लगेच मिळाले. माझ्या आजवरच्या व्यवसायतला हा एकमेव प्रसंग आहे, त्याआधी किंवा नंतर असे कधी झाले नाही. तसेच कॉर्पोरेट ब्राईबींन्ग मधे थेट कॅश तर देतातच, पण इतर महागड्या वस्तू, गाड्या परस्पर विकत घेऊन डिसिजन मेकर किंवा चेक साईन करण्याची ऑथोरिटी असलेल्या कार्यकर्त्यांना लाच म्हणून देतात. त्या वस्तू त्यांच्य नावावर नसतात्/असतात. ही लफडी कशी बंद होतील? माझा प्रश्न आहे की असे हे मध्यस्थाला पैसे कोणत्या टायटलखाली दिले जातात व ही लाच कशी नियमित केली जाते. कारण अनेक ठिकाणी लाखांमधे (कोटींमध्येही) कमिशन-लाच दिली जातं. (आता प्लिज याचे ट्रकसारखे पुरावे मागू नका.. ;) भारत सरकारचं छपाईचं-का-कागदाचं कंत्राट मिळवून देणार्‍या मध्यस्थाला १५% कमीशन देणार्‍या एक परदेशी कंपनीला ब्लॅकलिस्ट केली होती २०११ मधे. )
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 11/28/2016 - 18:21

In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे

Permalink

ही लफडी कशी बंद होतील?

ही लफडी कशी बंद होतील? मध्यस्थ हा अधिक्रूतपणे व्यवसाय म्हणून मान्य होईल तेव्हा. बाकी अनुभव रोचक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 11/28/2016 - 18:27

In reply to ही लफडी कशी बंद होतील? by अप्पा जोगळेकर

Permalink

तो मूळ खटला व ते अ‍ॅनिमेशनचं

तो मूळ खटला व ते अ‍ॅनिमेशनचं कामही रोचक आहे. पूर्ण किस्सा टाकेन कधीतरी.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 11/28/2016 - 18:59

In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे

Permalink

डांगेजी माफ करा पण

तुम्हीही... नाही का ? मग ही लफडी कशी....?
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 11/28/2016 - 19:07

In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे

Permalink

मग तुम्ही थत्तेचाचांच्या

मग तुम्ही थत्तेचाचांच्या आवाहनाला का प्रतिसाद दिला नाहीत..? राष्ट्रोद्धाराचा सवाल आहे राव. लेखातले पुढील मुद्दे तुम्हाला लागू नाहीत का..? १) आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल. २) तसेच आपण ज्यांना रोखीने पैसे दिले त्यांची नावे सरकारला कळवून त्यांच्याकडून पण देशाला कर आणि दंड मिळेल असे करू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 11/28/2016 - 20:14

In reply to मग तुम्ही थत्तेचाचांच्या by मोदक

Permalink

वरचा अनुभव कॉर्पोरेट ब्राइब

वरचा अनुभव कॉर्पोरेट ब्राइब चा मला आलेला म्हणून दिलाय. त्याबद्दल प्रश्न होता म्हणून हा किस्सा सांगितला. थोडे डिटेल्सः काम झाल्यावर मला पहिला चेक वीस दिवसांनी आला पन्नास हजाराचा. सव्वा लाख बाकी होते. तोवर मला लाचप्रकरणाबद्दल शष्प माहिती नव्हती. हा उच्चपदस्थ (त्याला लाच हवी हे मला कळण्याआधी) मला सतत फोन करुन मध्यस्थाचे पैसे मोकळे करण्याबद्दल सांगत होता. म्हणे, अशा मध्यस्थांची आम्हाला काळजी घ्यावी लागते, अन्यथा ते मग अशी अर्जंट कामे असतील तर करत नाहीत वगैरे, मला काही कळत नव्हते का हा कंपनीचा माणूस मध्यस्थाच्या पैशाची का काळजी करतोय व त्याला पैसे द्यायला माझ्यावर का दबाव आणतोय. तो व्यवहार तर त्याचा-माझा आहे ना? (माझी ट्यूब पेटलीच नाही तेव्हा) मी मध्यस्थाला ठरल्याप्रमाणे मला पैसे 'पूर्ण' मिळाल्यावरच कमीशन द्यायचे होते. मध्यस्थ व मी पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करत होतो, हा अनोळखी मध्यस्थही आणखी एका ओळखीच्या मध्यस्थाच्या मार्गाने आला होता. पण गाडं कुठेच पुढे सरकत नाही असे पाहून मध्यस्थाने मला लाचप्रकरणाबद्दल सांगितले. हे आता मध्येच उगवल्याने मी त्या मध्यस्थाला पटवले की ह्याबद्दल आधी काहीच न सांगितल्याने मी माझ्या पैशातून काहीच देणार नाही, तू तुझ्या कमीशनमधून त्याला दे. तो तयार झाला पण त्याला बहुतेक भीती वाटत होती की मी पैसे निघाल्यावर त्याला टांग मारेल, कारण काम झाल्यावर वीस दिवसांनी एक पन्नास चा जो एक चेक आला होता, त्यातून मी त्याला पैसे दिले नव्हते. सव्वा लाखाचा बाकी होता व तोच चेक अडवून धरला होता. मला ह्या सर्वाचा अंदाज आल्याने मी मध्यस्थाला पेमेंट रिलिज करत नव्हतो. वाटले, मध्यस्थ पैसे घेऊन बाजुला होईल आणि मी बसेल चकरा मारत. पण आता पुढचं पेमेंट यायला हवे म्हणून मी आधी पाच हजार थेट मध्यस्थालाच बॅन्क ट्रान्सफर केले, त्याने ते नेऊन त्या उच्चपदस्थाला दिले व चेक मिळवला. चेक वटल्यावर उरलेले कमीशनचे १० हजार मी मध्यस्थालाच बॅन्क ट्रान्सफर केले. ह्यात रोखीचा कोणताच व्यवहार माझा व त्या एम्प्लॉयीचा झाला नाही. कारण लाच असो का काहीही, आधी स्पष्ट कल्पना न दिल्याने मुळात मला ते पटले नव्हते. मी आधीच कोटेशन काटेकोर दिले होते, त्यात एक रुपयाही नुकसान होणे अगदी जीवावर येत होते. या कामात मी इन्वॉल्व असलो तरी प्रत्यक्ष व्यवहार कंपनीकर्मचार्‍याशी झाला नाही, मला त्याचे डबलस्टॅन्डर्ड कळल्यावर कॉन्टॅक्ट केला नाही. असली लफडी मला अगदी जीवावर येतात, कारण आधीच क्लायंट लोक चार ठिकाणी चौकशी करुन रेट निगोशिएट करत असतात, त्यात मोठ्या कामाचे क्रिएटीव अ‍ॅसेसमेंट, व्हॅल्यू अ‍ॅसेसमेंट चुकले (जे इथे २०-२५% चुकले होते - कोटेशनच्या आधीचं ब्रीफींग नंतरच्या डिस्कशनमधे क्लायंटच्या मते 'थोडंसं' बदलतं) तर जबर भुर्दंड पडतो. अन्डरकोट झाले तर नुकसान माझेच, त्यात असा कोणी दोन पाच टक्के फुकट खाईल तर रात्र रात्र जागून केलेलं गुरासारखं काम मनात रुतत राहतं. त्यामुळे कमीशनवाल्या मध्यस्थांसाठी एक नियमावली ठरवून दिली आहे तेव्हापासून. लाचवालं काम अजून आलं नाहीये. आलं तर बघू काय करायचं. :) आपल्याकडे उत्पादन खर्च वाढायच्या कारणांमधे हे कॉर्पोरेट ब्राइबींग एक मोठ्ठं कारण आहे. (अगदी बीसीसीआयमध्ये ही मोठ्या रकमेची कामं केलेली पण तिथेही कोणी एक पैशाने कुठली अपेक्षा व्यक्त केली नव्हती. उलट अन्डरकोट होत असलेलं कोटेशन योग्यप्रमाणात वाढवून घ्यायला सल्ला मिळाला. पैसे वेळेवर चुकते झाले )
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 11/28/2016 - 20:33

In reply to वरचा अनुभव कॉर्पोरेट ब्राइब by संदीप डांगे

Permalink

हे समजु शकतो, धागा ज्या

हे समजु शकतो, धागा ज्या भावनेने काढला आहे त्याच भावनेनुसार माझा प्रतिसाद घ्यावा - गैरसमज नसावा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 11/28/2016 - 19:13

In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे

Permalink

माझा प्रश्न आहे की असे हे

माझा प्रश्न आहे की असे हे मध्यस्थाला पैसे कोणत्या टायटलखाली दिले जातात व ही लाच कशी नियमित केली जाते कंपनीच्या कर्मचार्‍याने अशी लाच मागणे गुन्हा आहे - सरकारी खात्याप्रमाणेच. तुम्ही कंपनीच्या हेड ऑफिसला किंवा कंपनीच्या अंतर्गत व्हिजिलन्स डिपार्टमेंटला हे प्रकरण कळवू शकता. मात्र याचा परिणाम असा होतो की तुम्हाला परत त्यांच्याकडून काम मिळणार नाही. काम देणारे काही ना काही कारण काढून तुम्हाला काम मिळणार नाही अशी व्यवस्था करतात. माझ्या अंदाजाप्रमाणे - जे दलाल किंवा कमीशन एजंट असतात त्यांनी हे उत्पन्न दाखवून त्यावर टॅक्स भरला तर हा पैसा सरकारदरबारी नोंद राहतो. (चुकीचे असल्यास प्रतिसादावे.)
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रेड मार्क on Tue, 11/29/2016 - 00:47

In reply to आपण सगळे साधारणपणे सरकारी व by संदीप डांगे

Permalink

पुरावे नाही मागणार

आता प्लिज याचे ट्रकसारखे पुरावे मागू नका.. ;)
तुम्ही फक्त "फर्स्टह्यांड अनुभव" असं लिहा म्हणजे कोणी पुरावे मागणार नाही. कृहघ्या हेवेसांनलगे
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Mon, 11/28/2016 - 20:06

Permalink

अशा प्रकारचे व्यवहार हे सरकारी दृष्टीने व्हाईट असतात

मोदक भाऊ अशा प्रकारचे व्यवहार हे सरकारी दृष्टीने व्हाईट असतात ... कसे ते सांगतो (८ वर्षे सेल्स मॅनेजर म्हणुन हे व्यवहार कसे चालतात याचा अंदाज आहे ) कंपनी A ही कंपनी B साठी काम करते कामाची मुळ किंमत ५००० दलाली ५०० त्यामुळे कंपनी A ५५०० चे कोटेशन देते. त्यामुळे व्यवहार झाला ५५०० चा .. टॅक्स भरला ५५०० वर .... त्यामुळे सरकारच्या दृष्टीने ब्लॅक मनी शुन्य यात नुकसान होते ते कंपनी B चे .. त्यांना ५००० चे काम करण्यासाठी ५५०० मोजावे लागतात आणि कंपनी A चे कारण त्यांना ५००० ऐवजी ५५०० वर टॅक्स लागतो .. अर्थात अनुभवी कंपन्या ५५०० ऐवजी ५७०० चे कोटेशन देऊन आपला खर्च कव्हर करतात .... अयोग्य आहे .. पण सत्य आहे ..
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 11/28/2016 - 21:06

In reply to अशा प्रकारचे व्यवहार हे सरकारी दृष्टीने व्हाईट असतात by अमर विश्वास

Permalink

ओके, हे माहिती नव्हते.

ओके, हे माहिती नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Mon, 11/28/2016 - 21:34

Permalink

दीड सेंचुरी झाली की !

दीड सेंचुरी झाली की !
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 11/30/2016 - 02:00

Permalink

डॉ सुहास म्हात्रे साहेब,

डॉ सुहास म्हात्रे साहेब, (ओके! फाइन. परत कम्प्युटर हातात मिळाल्यावर शोधाशोध सोपी झाली. अनेक धागे व अनेक शतकी प्रतिसादात विशिष्ट प्रतिसाद शोधणे, त्यातही तुमचे प्रतिसाद 'कधीकधी' अर्थगर्भ असतात, म्हणजे थेट स्पष्टपणे म्हटलेलं नसतं त्यामुळे बरेच प्रतिसाद बारकाईने वाचावे लागले. असो.) --------------------- डिस्क्लेमरः पुढील स्पष्टीकरण आपल्यावर व्यक्तिगतरित्या कोणतेही आरोप करणारे नाही ह्याची नोंद घ्यावी. आपण व्यक्तिगत आयुष्यात अनेक थोर कामे केलेली आहे, खूप विविध क्षेत्रातलं अत्युच्च शिक्षण उत्तम ग्रेडसोबत मिळवलेलं आहे. आपल्या खर्‍या आयुष्यातले प्रत्यक्ष अनुभव, विचार इथल्या आपल्या जालावरिल सीमीत वावरापेक्षा प्रचंड मोठे व व्हॅल्यूड आहेत. ते कोणत्याही प्रकारे आरोपित होणार नाहीत ह्याची माझ्यातर्फे मी पुरेपुर काळजी नेहमीच घेत असतो. तेव्हा हा प्रतिसाद व यातील व्यक्त मतेही त्यासंदर्भातूनच बघितली जावी अशी विनंती. तसेच हा प्रतिसाद केवळ 'नोटाबंदी व संबंधित विषयावरिल चर्चा' ह्या अनुषंगानेच आलेल्या आपल्या निवडक प्रतिसादांवर आधारित आहे. आपल्या इतर विषयावरल्या कोणत्याही प्रतिसादांचे, भूमिकेचे, मतांचे, तत्त्वांचे मूल्यमापन किंवा निर्णयन ह्या प्रतिसादातून होत नाही असे आपण व सर्व वाचकांनी समजून घ्यावे. धन्यवाद. ----------------------- हा तुमचा प्रतिसाद रविशकुमारच्या रिपोर्टबद्दलचा. http://www.misalpav.com/comment/900502#comment-900502 त्यामुळेच, सर्वच वाहिन्यांचे सर्वच रिपोर्ट मी, त्याच्या "झुकावकडे" आणि त्यांच्या "भूतकाळातील वागणूकीकडे" पाहून कधी चिमूटभर तर कधी मूठभर मीठ टाकून पहातो ! ह्याचा मला लागलेला अर्थ: 'काय' बोललं जातंय याच्या आधी 'कोण' बोलतंय हे तुम्ही बघता असे दिसते. नंतर त्यात किती तथ्य आहे हे बघता, बघता म्हणजे ठरवता. 'ठरवणे' म्हणजे काय तर आपल्या स्वतःजवळ उपलब्ध तुटपुंज्या माहितीवर स्वतःच्या तर्कावर आधारित निष्कर्ष काढणे. हा आपला तर्क अंतिम सत्य आहे असे आपले एकूण मांडणे असते. रविशकुमारच्या रिपोर्टबद्दलच्या विश्लेषणात्मक प्रतिसादात -केवळ तो रविशकुमार व एनडीटीवी आहे म्हणून (जरी 'निष्पक्ष करुया' असे तुम्ही सांगितले तरी)- आपण एक बाजू धरुन त्याच बाजूने विचार करुन (झुकून असे मी म्हणणार नाही) विश्लेषण केलेले होते. एका बाजूने म्हणजे ह्याला खोटं ठरवायचं तर काय मुद्दे देता येतील ह्या अर्थाने. त्या विश्लेषणातून निघालेल्या निष्कर्षाला किती महत्त्व द्यायचे हे ज्याच्यात्याच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे म्हणून तिथे आपल्या विश्लेषणावर प्रतिसाद देणे उचित वाटले नाही. त्याच्या रिपोर्टमधली माहिती, लोक, प्रसंग, घटना ह्या खर्‍या किंवा खोट्या हा निर्णय आपण तो कोण आहे व तो कोणाच्या बाजूने वा विरुद्ध बोलतोय ह्याबद्दल आधी घेऊन, नंतर त्यापद्धतीने विश्लेषण करता. हे विश्लेषण अत्यंत बायस्ड होते व त्या पत्रकारावर तुमचा विश्वास नाही व तो कोणाचा तरी भाडोत्री आहे हे वाक्यावाक्यात डोकावत होते. आपण स्वतः खोडा इथे गेलेला नाहीत, तिथल्या रांगांमधे गेलेला नाहीत, तिथल्या रांगांमधल्या लोकांना भेटला नाहीत. जे काही मत, निष्कर्ष, निर्णय आपण घेत आहात ते केवळ त्याच्याच एका विडियोवर आधारुन घेत आहात. त्या रिपोर्टमधे सादर होणार्‍या माहितीला काउंटर-करेक्ट करण्यासाठी तुमच्याकडे थर्डपार्टी विश्वसनीय स्रोतातून आलेली कोणतीही माहीती नाही. (असलीच तर ती आपण तिथे दिली नव्हती) अशा स्थितीत आपण जे विश्लेषण निष्पक्ष म्हणून करु जाताय ते मुळात बायस्ड आहे हेच दिसले व ते का बायस्ड होते कारण तो रिपोर्ट खरा की खोटा यापेक्षा कोणी सादर केला ह्याचा आपण 'आधी' विचार केलाय व त्याअनुषंगाने त्याचे पोस्टमॉर्टम केलेत. हे म्हणजे निष्कर्ष आधी काढून मग त्याला सिद्ध करतील असे 'पुरावेसदृश्य' मुद्दे-मतं पुढे करणे होय. (आपल्या त्या पूर्ण विश्लेषणाचा प्रतिवाद मी करणार आहेच.) विश्वासार्ह हा जो शब्द आपण नेहमी वापरत आला आहात तो इतका संकुचित नसावा अशी अपेक्षा आहे. अमर्त्य सेन ह्यांच्याबद्दल आपण "त्यांची मते ते त्यांचा पुर्वेइतिहास बघून विश्वासार्ह मानावी की नाही?" असे संभ्रमीत वातावरण निर्माण करता, इथेही आपल्याकडे सेन यांच्या अर्धवट मुलाखतीशिवाय काहीच नाही, त्यांनी कोणते पुरावे, तपशील दिलेत की नाही हे आपल्याला माहिती नाही. त्यांच्या वाक्यरचना एखाद्या विरोधी पक्षाच्या राजकारण्याला शोभून दिसणार्‍या ह्या तुम्हाला वाटल्या म्हणजे त्या असतीलच असे नाही. हे वाटणे आपला अमर्त्य सेन यांच्याबद्दलचा पूर्वैतिहास बघून ठरलेले दिसते. (माझ्या मते तर जसजशा घटना समोर येत आहेत तसतशी अमर्त्य सेनांची वाक्ये खरी ठरत आहेत असेही दिसते) आता आपण शास्त्रिय मताबद्दल बोललात त्याविषयी. मुळात अर्थशास्त्र हे शास्त्र (भौतिक-रसायन-जीव यांच्याप्रमाणे) नव्हेच असे आपण आनंद मोरे यांच्या लेखमालेत बहुधा वाचले. तो एक अभ्यास आहे. अनेक सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासांप्रमाणे यात मतमतांतरे, मतभिन्नता असतेच. अर्थशास्त्र्यांची मते व भविष्यकथन अचूक किंवा जवळपास जाणारे असते तर जग आज सर्वथासंपन्न असते. अर्थशास्त्री झालेल्या घटनांचा अभ्यास करुन, चालू घटनांचा अभ्यास करुन भविष्यकालिन योजनांचे आराखडे मांडतात अशी माझी अर्थशास्त्री, अर्थतज्ञ यांच्याबद्दलची समजूत आहे. ते जे बोलतात ते अंतिम सत्य असते की नसते ह्यावर मतभेद-मतांतरे असू शकतात. पण त्यांची अर्थशास्त्रिय मते ही त्यांच्या राजकिय भूमिकेतूनच आली आहेत असे ठामपणे म्हणणे बायस्ड असल्याचे लक्षण आहे. म्हणजे परत काय म्हटलं यापेक्षा कोणी म्हटलं हेच महत्त्वाचं ठरलं इथेही. ह्याच नियमाप्रमाणे जे अर्थशास्त्री ह्या निर्णयाचे समर्थन करत आहेत ते सरकारधार्जिणे आहेत म्हणून समर्थन करत आहेत असेही म्हणता येईल. तुम्ही वर विधान केलंत की कोण बोललं ह्यापेक्षा काय बोललं हे लक्षात घेतलं पाहीजे. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसली नाही. "कोण बोललं" हे बघितल्यावर "तो जे काय बोलला ते कोण्या भूमिकेतून बोलला" हे बघण्यावर आपला भर दिसला. ह्याचा अर्थ 'काय' पेक्षा 'कोण' व तेही 'कोणत्या बाजूचा' हेही आपण ध्यानात घेता असेच आपल्या प्रतिसादांवरुन माझे वैयक्तिक मत झाले. तटस्थ असण्यात चूक नाही, तटस्थ राहून सरकारी निर्णयांची बाजू घेण्यात/विरोध करण्यात चूक नाही, आपल्या आवडत्या/नावडत्या पक्षाच्या-विचारधारेच्या बाजूने किंवा विरोधात असण्यात चूक नाही. पण बायस्ड असून निष्पक्ष आहे हे सांगण्यात चूक आहे व तसे वारंवार बजावून सांगण्यात तर अधिकच आहे. आपल्या भूमिकेवर, मतांवर, तत्त्वांवर आपल्याला जर प्रचंड विश्वास आहे तर तेच सगळीकडे सर्वथा प्रचलित, स्वयंप्रकाशित असतेच. स्वयंभू जीवनतत्त्वांना कोणाच्याच सर्टीफिकेटची गरज नसते. त्यामुळे ह्यात मिपाकरांना ओढून आणून "मिपाकरांना काय ते बरोबर समजले असेलच." असे अप्रत्यक्षरित्या 'मीच कसा बरोबर आहे' हे सुचवणे गैर आहे. कारण मिपाकरांना बरोबर काय ते समजतेच. त्यांना सुचवणीची आवश्यकता नाही. (अशी सुचवणी वेळोवेळी करतांना आपण अनेकांना बघतो, अशा सुचवणीची गरज का पडत असावी? दोन सदस्यांच्या घमासान चर्चेत मिपाकरांना न्यायाधिश बना, निर्णय घ्या अशी आळवणी करायची गरजच काय?) असे अजिबात नसेल तर... "मी आपली इथे मिसळपाववर जाहिर माफी मागत आहे. आपल्याला माझ्यामुळे कोणताही क्लेश, मनस्ताप, अपमानास्पद भावना झाली असल्यास त्याबद्दल सखेद दिलगीरी व्यक्त करतो व माझे मूळ विधान मागे घेतो. पुढे असे काही होणार नाही याची काळजी घेण्याची खात्री देतो. धन्यवाद!" (क्षमा असावी, मला लिहिलेली वाक्ये अनावश्यक भली मोठी दणकट फॉन्टात लिहायची व परत परत खूपवेळा पिवळी करायची गरज वाटत नाही म्हणून साध्या फॉन्टात जाहीर माफीचा कबुलीनामा लिहिला आहे. फॉन्टाच्या साईज व कलरपेक्षा भावना व अर्थ महत्त्वाचे असे माझे मत. आंतरजालीय चर्चांमधे मोठे मोठे फॉन्ट्साईज वापरणे हे आदळाआपट, त्रागा, आरडाओरडा, आवाज चढवून बोलणे ह्यासदृश्य मानले जाते. 'महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करायला' वापरले जातात तरी पण उद्देश कळतोच.)
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 11/30/2016 - 03:04

In reply to डॉ सुहास म्हात्रे साहेब, by संदीप डांगे

Permalink

नोप्स...

कुछ जम्या नहि डांगे भाई. तुम्हाला एकाच धाग्यावर सपोर्ट आणि विरोध करण्याचे अनेक प्रसंग आले आहेत आमच्यावर (आदरार्थी अनेकवचनी :प ). त्यातले बहुतेक थ्रेड्स व्यवस्थीत सुटले, काहि गुंता न होता. त्यामुळे इथे बिट्वीन द लाइन्स इंटरप्रिटेशनचा जंगी मुकाबला बघण्याशी आशा होती... पण सामना रंगलाच नाहि :( .
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 11/30/2016 - 07:59

In reply to डॉ सुहास म्हात्रे साहेब, by संदीप डांगे

Permalink

१७ व्या बॉलला सेंच्युरी

१७ व्या बॉलला सेंच्युरी व्हावी इतके फुलटॉस आहेत राव. =))
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 11/30/2016 - 11:46

In reply to १७ व्या बॉलला सेंच्युरी by मोदक

Permalink

ते फलंदाजाच्या दृष्टीकोनातुन.

ते फलंदाजाच्या दृष्टीकोनातुन. गोलंदाजाच्या दृष्टीकोनातुन बघायचे झाल्यास एकही (वैध) बॉल पडलेला नसेल. असो. प्राथमिक मत इतकेच नोंदवतो की या प्रतिसादाला "पराचा कावळा करणे " ही म्हण लागू करणे म्हणजे देखील अतिशयोक्तीची परमावधी असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/30/2016 - 12:50

In reply to डॉ सुहास म्हात्रे साहेब, by संदीप डांगे

Permalink

आता अनेक सोनारांनीच कान टोचणे

आता अनेक सोनारांनीच कान टोचणे चालू असल्याने मी काही बोलायची गरजच नाही... आणि बोलून फायदा नाही हे सुद्धा पूर्णपणे कळून चुकले आहे. सूचना : यापुढे तुमच्या कोणत्याही अतिरंजीत, शब्दांची मोडतोड केलेल्या, विपर्यास केलेल्या, इत्यादी (इतरही बरेच आहे म्हणून इत्यादी) लेखनावर, अगदी वैयक्तीक उल्लेख असले तरीसुद्धा, प्रतिसाद न देण्याचा हक्क मी राखून ठेवत आहे. अश्या वेळेस तुमचा मुद्दा बरोबर असल्याने मी प्रतिसाद दिला नाही असे समजण्याची चूक करू नये. मिपाभाषेत म्हणायचे तर, ते लिखाण फाट्यावर मारले आहे असे समजावे. धन्यवाद व राम राम !
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 11/30/2016 - 08:32

Permalink

अन म्हणे आम्ही कंपूबाजी करीत

अन म्हणे आम्ही कंपूबाजी करीत नाही! =)) असो
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 11/30/2016 - 11:49

In reply to अन म्हणे आम्ही कंपूबाजी करीत by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

+१०००१ :)

+१०००१ :)
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 11/30/2016 - 11:51

Permalink

डांगे आजकाल काय अस्थिर झालात

डांगे आजकाल काय अस्थिर झालात काय? कायच्याकई लिहून राहले न बापा तुम्ही!!
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Wed, 11/30/2016 - 14:33

Permalink

डांगे अण्णा ... बात कुछ हजम नाहि हुई

डांगे अण्णा ... बात कुछ हजम नाहि हुई .. हाजमोला घ्यावा लागणार ... वपुंच वाक्य आहे : सर्व प्रश्न सोडवण्याची गरज नसते .. काही प्रश्न सोडून दिल्यानेही सुटतात ... थोडक्यात ... आऊट साईड ऑफ स्टंप खेळताना चेंडू सोडून द्यायला लागा .. नाहीतर असा स्लिप मध्ये झेल उडतो
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Wed, 11/30/2016 - 17:10

In reply to डांगे अण्णा ... बात कुछ हजम नाहि हुई by अमर विश्वास

Permalink

विश्वासराव वपुंच हे वाक्य

म्हणजे सर्व प्रश्न सोडवण्याची गरज नसते .. काही प्रश्न सोडून दिल्यानेही सुटतात ... हे वाचुन माझ्यासमोर खरच अनेक मोठ मोठे प्रश्न उभे राहीलेत. शिवाय शेवटी आता या सर्व प्रश्नांना जे वपुंच महावाक्य वाचुन मनात निर्माण झालेत त्यांना सोडुन देऊन सुटण्यासाठी की धरुन ठेऊ सोडवण्यासाठी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणजे बघा अजुन दोन सिच्युएशन घेतो १- मी लायनीत चार तास उभा आहे युपीच्या एका गावात ( महाराष्ट्रात नाही ) एक दरोगा येतो मला लायनीतल्या इतरांना काही इतर कारणासाठी चार दंडुके लावतो. अशा वेळी मी वपुंच्या महावाक्याचा " प्रत्यक्षात उपयोग कसा करावा ? दरोगा चा दांडु धरावा की सोडुन द्यावा कारण धरला तरी तो रागावुन एक एक्स्ट्राचा मारणार सोडुन दिला तर म्हणजे विरोध नाहीच केला तरी जोरात बसणार. दुसर मला पैसे भयंकर महत्वाचे आहेत माझे जीवलग खासगी ( सरकारी नाही ) रुग्णालयात आहेत. तर दरोगा म्हणतोय " जाव साला घरको आज पैसा नही मिलेगा कल आओ" मग मी काय करावे त्याला वपु च्या सुविचाराचा अनुवाद समजा हिन्दीत करुन दाखवावा का ? की समजा त्याने मराठी साहीत्याचा रसिक असल्याने वपु वाचलेले आहे व तो समजा मला यावर म्हणाला सब सवालवा छुडानेकी जरुरत नही है बबुवा कुछ सवाल छोड देनेसे छुट जाते है जैसन मोदी करत है एक बडा सवाल सॉल्व कीया काले पैसनका दुसरा छोड दिया की लोग लाईन मे कबतक खडा रहेंगे ? वपु प्रातस्मरणीय आहेत दवणे नंतर माझे एकच गुरु आहेत वपु बाय द वे आपण सारे अर्जुन मध्ये हेच वपु प्रश्ना मागुन प्रश्न विचारत बसतात सोडत एकही नाही. असो
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Wed, 11/30/2016 - 18:37

In reply to विश्वासराव वपुंच हे वाक्य by मारवा

Permalink

मारवा जी ...

मारवा जी ... काही प्रश्न सोडून द्यावेत ,, पण कुठले प्रश्न सोडून द्यावेत हे ज्याचे त्याने ठरवायचे .... दरोगा चा दांडु धरावा की सोडुन द्यावा हे तुम्ही विरोध करताना कुठल्या थराला जाऊ शकता यावर अवलंबून आहे तसेही मोदींनी "लोग लाईन मे कबतक खडा रहेंगे ?" हा प्रश्न सोडून दिलेला नाही त्यांनी ५० दिवस असे सांगितले आहे .. हे उत्तर बरोबर का चुक त्याचे उत्तर ५० दिवसांनेच मिळेल .. हे झाले मोदींचे .. पण आता तुम्ही तुमच्या पुरते ठरावा कोणता प्रश्न धरून ठेवायचा : काले पैसनका? कि लोग लाईन मे कबतक खडा रहेंगे ?
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Wed, 11/30/2016 - 19:42

In reply to मारवा जी ... by अमर विश्वास

Permalink

या निर्णयापुरता मोदीं बरोबरच आहे हो मी

वरील खरा आक्षेप वपु वगैरेंचे जे क्ले कोट असतात त्यावर होता. ज्याचा ते स्वतःही कधी आयुष्यात उपयोग करत नसतील बहुधा अर्थात सर्वच कोट तसे असतात असेही नाही काही अती मार्मिक आणि हादरवुन टाकणारे ही असतात. तुम्ही तो पोलिस क्रुरतेने लाइनतल्या साध्या लोकांनाही लाठी ने अक्षरश: तोडुन काढतो तो व्हीडियो बघितला का ? एका ठिकाणी तर काठीच तुटलेली दिसतेय स्पष्ट त्याहुन भारी ते युपीतले लोक ज्या शांतपणे सहजतेने त्याच्या अमानुष वर्तनाला विरोध न करता उभे राहतात तो त्या लोकांचा सहजपणा शांतपणा..... असो
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Wed, 11/30/2016 - 16:07

Permalink

प्रत्येक धाग्याच एक तापमान असतं

म्हणजे काही साधारण २०-२२ वातानुकुलीत मर्यादेत असतात. एक दोन जण येतात बघतात थोड फार बोलतात आल्या पावली निघुन जातात. जैसे कुछ हूआ ही नही. उदा. एक सहज सकाळी सकाळी अनोळखी टपरीवर थंडीच्या दिवसात चहा विडी प्यायला गेलो. बसलो एखाद दोन बसलेले असतात. चहा उकळतोय... धुम्रवलये संथ लयीत उठताय .. फारशी खळखळ न करता वलये विलग व अखेर विसर्जीत होतायत.... तेवढ्यात चहा येइपर्यंत आपण फक्त नजरेनेच समोरच्याशी हसतो.... फार तर फार " थंडी फार वाढली बुवा आज " अस कायतरी जुजबी बोलतो. नंतर चहा येतो वाफाळलेला...तो गिळल्यावर आपण आपला रस्ता धरतो. अस. काहीस दवणीय तापमान काही धाग्यांच असत. काही धाग्यांना मात्र .... काय जमुन नाही राह्यल तर या धाग्याच तापमान अनेक ठीकाणी फारच वाढलेल दिसतय अगदी कुठे कुठे आता ५० पर्यंत तर नाही जाणार अस एकुण प्रतिसाद वाचुन वाटतय. थोडे दिवस पळाव म्हणतो असही आज महीना आखेर आहेच. नविन तारखेला नवि सुरुवात करण हे खुप आवडत. बाकी तापलेल्या धाग्याच वर्णन माझ्या प्रतिभाशाली मित्रांनो कृपया करावे .....थोड तापमान कमी त होइल.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 06/03/2018 - 21:13

Permalink

लोग तब मुझपर हस पडे थे.

लोग तब मुझपर हस पडे थे. https://www.businesstoday.in/current/policy/it-dept-new-scheme-inform-govt-about-tax-evasion-get-rewards-up-to-rs-5-crore/story/278269.html
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Mon, 06/04/2018 - 10:47

In reply to लोग तब मुझपर हस पडे थे. by नितिन थत्ते

Permalink

अबी भी कुछ नहीं बदला होगा.

अबी भी कुछ नहीं बदला होगा. खाली ओ RAID पिचर आकार चली गयी.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Wed, 06/06/2018 - 18:22

Permalink

थत्ते साहेब माफ करा , पण ही

थत्ते साहेब माफ करा , पण ही तर , ... राष्ट्रोद्धाराची संधी नव्हे स्वतःच्या तुंबड्या भरण्याची सुवर्णसंधी !! २०१४ नंतर देशात खा स करुन मिपावर सुद्धा १५ लाख सरकार कधी देणार म्हणुन वाटेवर डोळे लावुन बसलेल्या काही फुकट्या लोकांनासाठी तर ही सुवर्ण संधीच चालुन आलेली आहे. १५ लाख नाही तर तब्बल ५ कोटी मिळणार !! पण एक आहे की हे ५ कोटी मिळवण्यासाठी , त्या लोकांना काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरुद्ध पुरावे सरकारला द्यायला लागणार !! बुड हलवल्याशिवाय घबाड मिळणार नाही !! I-T Dept's new scheme: Inform govt about tax evasion, get rewards up to Rs 5 crore !! त्या निमित्याने मोदी सरकारचा हा आणखी एक "मास्टर स्ट्रोक" अस म्हणायला हरकत नाही !! काँग्रेसच्या नेत्यांचे धाबे दणाणुन जाणार, त्यांचेच चेले चपेटे आता धनदांडग्या विरुद्ध पुरावे सरकारला देणार, सरकारचा खजिना आता परत भरणार !!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 06/07/2018 - 11:20

In reply to थत्ते साहेब माफ करा , पण ही by डँबिस००७

Permalink

कसं काय हो?

कसं काय हो? म्हणजे ज्यांना पैसे हवेत ते भाजप नेत्यांच्या काळ्या पैशाची पण माहिती देतीलच ना? त्यांचं पण धाबं दणाणणार ना?
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on गुरुवार, 06/07/2018 - 12:33

Permalink

भाजप नेत्यांच्या काळ्या

भाजप नेत्यांच्या काळ्या पैशाची पण माहिती देतीलच ना? मुळातच भाजपा ने त्यांकडे काळा पैसा असायला पाहीजे ना ? बाकी खोट्या ईनफॉर्मेशन देणार्याला सुद्धा चांगलाच धडा शिकवला पाहीजे !!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 06/07/2018 - 13:31

In reply to भाजप नेत्यांच्या काळ्या by डँबिस००७

Permalink

जोक आवडला. अजून एक सांगा.

जोक आवडला. अजून एक सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 06/07/2018 - 15:31

In reply to जोक आवडला. अजून एक सांगा. by नितिन थत्ते

Permalink

सहमत. प्ण जोक म्हणून नका होत

सहमत. प्ण जोक म्हणून नका होत थत्ते साहेब. चमत्कार म्हणा चमत्कार. भाजप च्या नेत्यांकडचे पैसे पक्ष बदलल्याबरोबर रंग पण बदलतात. रेड्डी बंधुंचे उदाहरण आहेच समोर. नारायण राणे अजून तळ्यात मळ्यात आहेत. जावडेकरांचे काय झाले ते समजले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 06/07/2018 - 17:08

In reply to भाजप नेत्यांच्या काळ्या by डँबिस००७

Permalink

मला तर प्रत्येक पक्षाच्या

मला तर प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या एकंदरीत राहणीमान व व्यवहारावरून त्यांच्या आर्थिक स्त्रोताबद्दल कायम संशय येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 06/21/2020 - 23:04

Permalink

या धाग्यावर बर्‍याच जणांनी

या धाग्यावर बर्‍याच जणांनी नोटबंदी ही पहिली पायरी आहे असं म्हटलं होतं. तर आज साडेतीन वर्षानंतर पुढच्या पायर्‍यांविषयी (भ्रष्टाचार कमी करणे काळा पैसा नष्ट होणे) काही घडल्याचे, घडत असल्याचे कुठे कुणाला ऐकायला आले आहे काय?
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Sun, 06/21/2020 - 23:19

In reply to या धाग्यावर बर्‍याच जणांनी by नितिन थत्ते

Permalink

आता चिनी वस्तूंवर बहिष्कार हि राष्ट्रोद्धाराची दुसरी पायरी

आता चिनी वस्तूंवर बहिष्कार हि राष्ट्रोद्धाराची दुसरी पायरी म्हणावी काय?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com