Skip to main content

मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

लेखक बार्नी यांनी रविवार, 20/11/2016 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे , उदा . १) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत . २) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते . सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की इंडस्ट्री तील लोक आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ?

वाचने 51250
प्रतिक्रिया 254

प्रतिक्रिया

In reply to by आदूबाळ

घाऊक नोंदणी आगाऊ करावी लागेल काय? नोंदणी आगाऊ आहे आम्ही किंवा आपण नाही.तसेच अन्य भुईमूग शेंगा,मक्याची कणसे मिळतील काय? एक्च्च धाग्यात चार पाच धाग्याचा दारूगोळा असल्याने ही चौकशी करीत आहे,लोभ आहेच तो वाढावा ही अपेक्षा. अखिल मिपा हिकमती,अल्पमती,कुरापती,उचापती,चायपत्ती धागे निवारण आणि मिपा स्वच्छता अभियान याच्या "एक पाऊल (मिपा) स्वच्छतेकडे" या सदस्यांचे संयुक्त निवेदन.

In reply to by बार्नी

असल्या जातीयवादी विचाराला मराठीत उत्तर किंवा शिवी देणेसुद्धा मी मराठीचा अपमान समजते. नावावरून जात ओळखण्याची कला तुम्ही पूर्णत्वाला नेलेली दिसते. शक्य झाल्यास त्याचे क्लास काढा. मराठी सिनेमाची १९१३ पासून आतापर्यंत झालेली वाटचाल कशी झाली याचा अभ्यास करा. विकिपांडित्यसुद्धा पुरे. त्यानंतर काय त्या पिंका टाका. याला तुम्ही काही उत्तर देताय का, काय उत्तर देताय याची मला फिकीर नाही. कारण असले बिग्रेडी धागे मी संपादक नसल्याने पुन्हा उघडून बघायची मला सक्ती नाही.

In reply to by बार्नी

का? इंग्रजीबद्दलही अशी काही मतं आहेत का तुमची? बाय द ह्यांव फॉर द ह्यांव ऑफ द ह्यांव? ग्रो अप. एवढंच म्हणेन. इंग्रजीत.

हे बहुतांशी खरे असले तरी बाय द टिम्ब टिम्ब फॉर द टिम्ब टिम्ब फ्रॉम द टिम्ब टिम्ब असेही नाही. सरधोपट गल्लाभरू सिनेमा काढणारे फार फार तर म्हणता येतील. अनेक सो कॉल्ड ब्राह्मण वगैरे कलाकारांनीही ग्रामीण महाराष्ट्र आणि अगदी दलित, आदिवासी, किंवा अजून कुठले हवे ते समाजघटक घ्या, त्यांच्या आयुष्यावर किंवा त्यांच्या विषयांवर देखील चित्रपट काढले आहेत. आणि ब्राह्मणेतर कलाकारांचीही संख्या अलीकडे वाढते आहे. नाहीच असे नाहीत. सर्वच कसे छान छान आहे असे मीही म्हणणार नाही. पण मराठी चित्रपटसृष्टी केवळ अमुक एका जातीच्या परिघापुरतीच संकुचित झालेली आहे असे नाही. गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, विक्रम गोखले, अमोल पालेकर, सुलभा देशपांडे, ज्योती सुभाष, इत्यादी आणि असे अनेक इतर कलाकार अगदी सहजपणे ब्राह्मणेतर व्यक्तिरेखा देखील तितक्याच ताकदीने रंगवताना, त्यांना न्याय देताना दिसतात, अशा चित्रपटात, नाटकांत भूमिका करतात, निर्मिती-दिग्दर्शन करतात. तेव्हा किमान समांतर चित्रपट प्रवाहाबद्दलतरी हा आक्षेप मान्य होण्यासारखा नाही. (मला बऱ्याच कलाकारांची जात-बीत माहीत नाहीये, तेव्हा चूभूदेघे.) आता इतर जातींतूनही चित्रपट-नाटकांत काम करण्याला कुटुंबियांचा पाठिंबा मिळू लागला आहे. हा माझ्या मते सर्वात मोठा फॅक्टर आहे. पुरुषोत्तम करंडकासारख्या नाट्यस्पर्धांची व्याप्ती पुणे-मुंबईच्या बाहेरही वाढायला हवी. असे बरेच उपाय सुचवता येतील.

आजतागायत कोणताही सिनेमा पाहताना समोरच्या वा पडद्यामागच्या कलाकाराची जात हा विषयही मनात आला नाही/ करावासा वाटला नाही. विषय/ कथा वगैरे हेच महत्वाचे वाटले. टीव्ही मालिका क्वचित पाहिल्यात पण मालगुडी डेज, टिपरे ह्या मालिका पाहताना कधी जात हा विषय डोक्यात आला नाही, हेही खरेच.

प्रादेशिक अस्मिता, पैसा, जात, भाषा, रंग, चेहरा, व्यक्तित्व हे आणि असे बरेच फ्याक्टर सर्वच ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवत आहेत, असे वाटते. म्हणुन आपल्या मित्राच्या मुद्यात अजिबात तथ्यच नाही, असे म्हणायचे आणि समजण्याचे कारण नाही, असे वाटते. बाकी, चालू द्या. -दिलीप बिरुटे

१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .
याला आधार?
मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .
याला आधार? आणि तुम्ही किंवा तुमचा तो मित्र म्हणत असलेली भाषा ही काही कोणत्या विशिष्ट वर्गाची भाषा नसून त्याला प्रमाणLमराठी भाषा किंवा त्याअर्थी पुस्तकी मराठी असे म्हणतात. बाकी विशिष्ट वर्गाची विरुद्ध विदर्भ किंवा मराठवाडा (जे भूभाग दर्शवतात) यांची तुलना चुकीची वाटली नाही का? विदर्भ किंवा मराठवाड्यातील तो विशेष वर्ग तिथली बोलीभाषा बोलतो कि त्या विशेष वर्गाची महाराष्ट्रभर एक वेगळी भाषा आहे?
सैराट सारख्या ग्रामीण सिनेमा ला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ?/blockquote> सैराटचं यश हे मुख्यत्वे हे त्यातील प्रत्येकाला स्वतःची वाटणारी प्रेमकहाणी हे होते असे मला वाटते. बाकी सैराट हा पहिला ग्रामीण सिनेमा आहे असे आपले मत तर नाही ना? मला वाटतं मराठी चित्रपटाचा इतिहास बघितला तर अगदी कुठल्याही कालखंडात ग्रामीण भाषेतले चित्रपट सर्वाधिक आहेत. बाकी तुम्हाला तुमच्या मित्राबरोबरच्या चर्चेत जातीयवादाचा वास वगैरे आला नाही का?

प्रश्न केवळ जातीचा नसून region चाही आहे , माझे विदर्भातील कित्येक मित्र मराठी ऐवजी हिंदी चित्रपट बघणे पसंत करतात कारण " अबे त्यायची मराठी आपल्याले समजत नाही " असे आहे . मराठी सिनेमाचा चाहता म्हणून मी ही कित्येकदा विचार करतो की ह्यांना पुण्या-मुंबईबाहेरच्या लोकांच्या कथा सांगू वाटत नाही का , आपणास जातीचा प्रश्न पडला नसेल , परंतु कितीतरी लोकांना असे वाटते आणि तसे वाटण्यास तशी कारणेही आहेत. " Explaining discrimination to an upper caste is like explaining colours to a blind person , they will never understand it " असे कुठेतरी वाचले होते . प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद

In reply to by बार्नी

माझे विदर्भातील कित्येक मित्र मराठी ऐवजी हिंदी चित्रपट बघणे पसंत करतात कारण " अबे त्यायची मराठी आपल्याले समजत नाही " असे आहे
अबे मंग तुये दोस्त शाळा शिकेल नास्तिन, नैतर दुसऱ्या देशातले घुसखोर आस्तिन. कारन ईदरभातला पोट्टा किती बी कुचीन असू दे, त्याले मराठी समजत नाई असं होतंच नाई. तवा काय बी फेकत जाऊन विदर्भाचा अपमान करू नई.

In reply to by महासंग्राम

नागपुरी/ वैदर्भिय / ? मराठिचा लहेजा आवडला म्हणुन "निशाणी डावा अंगठा" अनकदा बघितला. त्याची मराठी तुम्हाला कशी वाटली‌? नेहेमिचेच यशस्वी कलाकार आहेत त्याच्यात.

In reply to by अगोचर

बाकी सगळे ठीक आहे पण निशाणी डावा अंगठा मध्ये भारत गणेशपुरे अन थोडीफार मक्या वगळता कोणालाच वऱ्हाडी जमलेली नाहीये, अशोकमामा तर त्या बाबतीत चक्क चाचपडत असलेले जाणवले होते. सगळ्यात जास्त डोक्यात गेलेली पात्रं म्हणजे संजय नार्वेकर न रंगवलेले मुस्लिम पात्र अन भरत जाधव न रंगवलेला तोताराम , वऱ्हाडातले मुसलमान हैद्राबादी लहज्यात हिंदी बोलताना दाखवून हसावे का रडावे कळत नाही. वऱ्हाडी म्हणजे फक्त वाक्याला १० वेळा अबे काबे लावून बोलणे नसते, ही एक पुस्ती जोडतो. धन्यवाद.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पात्र खबरदार मधील वर्हाडीच धाटणीचे होते का आण्णा चिंबोरी ते सांगा बाप्पू. या सिनेमांनी भाषेची तोडमोड करून एकही प्रादेशीक भाषा मूळ स्वरूपात लहेजासह आणि उच्चारासह दाखवली नाही अपवाद अभ्यासू सिनेमा निवडुंग्,जैत रे जैत.

In reply to by नाखु

नाही, ते पात्रही वऱ्हाडी नीट बोलत नव्हते, पण आपटेंची मेहनत जाणवत होती. बाकी सहमत, अप्रमाणित बोली प्रादेशिक भाषा हेच खरे सौंदर्यस्थान आहे भाषेचे. (नाखु चाचांना ऐकू जाईल असे स्वगत, वाऱ्यावरची वरात मध्ये अरुण नलावडे ह्यांनी सीताहरण जसे ग्रामीण बाजात मांडले होते, किंवा बॅट्यानें जसे ट्रॉयचे युद्ध बोली टाईप भाषेत लिहिले होते तशी एक पौराणिक कथा इन वऱ्हाडी माला लिहावी काय? दशावतारी अन झाडीबोलीची महान पौराणिक कथा बोलीत मांडायची कला वऱ्हाडीत आणावी काय? बोलो चाचा बोलो)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

और पूछ पूछ. बिन्धास लिवा, मिपा आपलाच असा. खरोखरच्या बाल्यांना बोलताना मागच्या कंपनीत पाहून नाटकातले/सिरियलमधले कोकणी बोलणे "नाटकी/ओढून ताणून" लगेच जाणवत असे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

लिव्हाच बाप्पु! बाकी, अरुण नलावडेंनी छानच केलंय पण खुद्द पुलंचा साक्षीचा धंदा आणि रामायण लैच भारी!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू, अशोक सराफ वऱ्हाडी बोलीमध्ये गंडलेत पण त्यांनी चित्रपटात जाम धमाल आणलीय. लै शकलीचं गाठोडं असणारा बंडू भावडा राठोड त्यांनी खतरनाक उभा केलाय. हा चित्रपटच अफलातून जमून आलाय. साधे साधे प्रसंग पण इतक्या बारकाईने मांडलेत कि बस्स. भारत गणेशपुरे, निर्मिती सावन्त, मक्या, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे, अगदी छोट्या रोल मध्ये असणारे ज्योती सुभाष, विशाखा सुभेदार, मंगेश देसाई सगळेच अक्षरश: सुटलेत. कादंबरीचं माध्यमांतर या प्रकारातील हा उच्च कोटीतील प्रकार आहे. माझ्या मते निशाणी डावा अंगठा हा गेल्या 10 वर्षातल्या सर्वश्रेष्ठ मराठी चित्रपटात नक्कीच येईल. संदीप खरेची गीतं सुद्धा सुंदर जमून आलियेत. अस्सल वऱ्हाडी शब्द असणारी गाणी आहेत ती. सहा मेल सहा फिमेल, आता कामच झालं ना, बे एके बे एक से बढकर एक गाणी.

In reply to by पुंबा

प्रश्नच नाही! अशोक मामा आहेत ते, जान आणतात भूमिकेतून, अशोक मामा गंडले आहेत (ह्या चित्रपटात) असे म्हणायचे कारण म्हणजे ते खूप काटेकोरपणे वऱ्हाडी बोलायचा यत्न करत होते पण मधेच हात टेकल्यासारखे फॉर्म सोडून देत असत म्हणून जाणवले मला अन मी नमूद केले, त्यांच्या जावयाच्या अन सहकाऱ्याच्या भूमिकेत ऋषिकेश जोशीने सुद्धा कमाल केली आहे हे ही नमूद करतो, बाकी अबासाहेबांशी सहमत आहे कादंबरी अफलातुन आहे, मुळात ग्रामीण बाजात लिहायला ग्रामीण भाषेची पकड प्रचंड लागते ती उत्रादकरांत आहेच :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कादंबरी वाचायची आहे पण पिक्चर पाहिला आहे त्यामुळे तीच सगळी पात्र डोक्यात येतील असे वाटते म्हणून वाचली नाही. हॅरी पॉटरचा एकही पिक्चर न बघण्याचं कारण अजून 4 पुस्तकं वाचायची राहिलीयेत हे आहे. :P

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सहमत बापू .. मला विचाराल तर अशी ही बनवाबनवी,गंमत-जम्मत, हम पांच ह्यात दिसलेला उत्स्फूर्त अभिनय आजकाल अशोक सराफांच्या भूमिकेत दिसत नाही. हल्ली ते फार सावधगिरीने अभिनय करतात असं वाटते.

त्याच काय आहे.. कि, ब्राह्मण सगळ्याच क्षेत्रात पुढे असतात.. त्याला कोण काय करणार?? असो.. ! कितीही कुणीही बडबड केली तरी जे सत्य आहे, ते ढळढळीत आहे..! पुन्हा असो. बर्‍याच वर्षानी मिपा वर आले, आणि आल्या आल्या असले धागे समोर पडले.. ! अशा धाग्याना एन्टर्टेन केल जातय याच आश्चर्य वाटतं, आणि दु:खही! (व्यथित) प्राजु

In reply to by प्राजु

हाय प्राजु, हा धागा अप्रकाशित होण्याआधी तुझ्या येण्याने आनंद झाल्याचे नमूद करून घेते. मग काय म्हणतेय एंटरटेनमेंट इंडस्ट्री? तू आता रुळलीस बरं का तिथे! आम्हाला व्हिजिट केल्याबद्दल फार्फार धन्यवाद.

In reply to by रेवती

एन्टर्टेन्मेंट इंडस्ट्री मस्त! रुळते आहे मी. चतुरंग नी मेसेज पाठवला आणि ती आज्ञा शिरसावंद्य समजुन आले मी. शेवटी मैत्रीला जागायला हवच ना! :) पण मिपा ब्राह्मण द्वेष्टे झाले आहे हे माहिती नव्ह्ते. येत राहिनच. कारण उत्तर द्यायलाच लागेल अशा धाग्यांना. मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये.

In reply to by प्राजु

नेहमीप्रमाणे "जात" असलेल्या धाग्यावर प्रतिसादांचे शतक झाले आहे! यावेळी प्रतिसाद देणार नव्हतो पण "इंडस्ट्री " मधल्या व्यक्तीची अशी प्रतिक्रिया पाहून राहावले नाही. हा धागा आला कि तुम्हाला लगेच मिपा ब्राम्हण द्वेष्टे झाल्याचा साक्षात्कार झालाय! अगदी प्रतिसाद द्यायला परत आलात वाटत! बर काही माहितीपूर्ण प्रतिसाद दिलात का, तर नाही... आम्हाला फक्त राग काढायचा असतो! "मूक मोर्चे काढले म्हणजे आपण अतिशहाणे झालो असा समज कोणीही करुन घेऊ नये." या वाक्यावरून आपल्याला काय म्हणायचे आहे आणि आपली देखील विचारसरणी काय आहे हे स्पष्ट दिसून येतंय! दुसऱ्याला बोलायच्या आधी स्वतःकडे देखील पहा... "इंडस्ट्री " मधल्या लोकांचे विचार पण असेच असतील तर मग, यु जस्ट प्रुव्हड हिज पॉईंट! (हे असे इंग्रजीत लिहिलं कि वजन येत म्हणे वाक्याला!) आपण बऱ्याच दिवसांनी आलात म्हणताय, या काळात मिपावर मराठा मोर्चा वर डझनभर धागे येऊन गेलेत हजारो प्रतिसाद दिले गेलेत. तेव्हा मिपा मराठा द्वेष्टे होते. जैन समाजावर धागा येऊन गेला त्यात प्रतिसादामध्ये मिपा जैन द्वेष्टे वाटेल. मुस्लिम समाजाचं तर काय बोलायचं सध्या एक ताजा धागा आहे तिकडे कळेलच ते! आरक्षणाचा धागा आला कि मिपा दलित द्वेष्टे वाटेल. थोडक्यात काय, सर्व जाती/धर्माना समानच वागणूक मिळतिये कि इथे! त्यामुळे फक्त, ब्राम्हण किती भारी (हे तुम्हीच लिहिलेल्या वाक्यातील लिहितोय, मला उपरोध वगैरे काही करायचा नाही) हे लिहिण्यासाठी येऊन काय फायदा आधीच्या कित्येक धाग्यांवर ते बऱ्याच लोकांनी सांगितलंय! :)

In reply to by शब्दबम्बाळ

कचकून समर्थन! ज्यांचा ब्राह्मणांवर घसरल्याने तिळपापड होतो, त्यांना असं काही मोरच्यांबद्दल बोलून आपणही तेच करतोय ह्याची जाण नाही... बाकी मिपावर सर्वांची भादरली तर चालते पण काहींना सूट हवीय? 'आम्ही जातीयवादी नाही पण आमच्या जातीबद्दल बोलाल ता खबरदार: असं म्हणणाऱ्यांची किव येते... -

In reply to by संदीप डांगे

आम्ही जातीयवादी नाही पण आमच्या जातीबद्दल बोलाल ता खबरदार
या वाक्याची एक गंमत आहे...समजा अ आणि ब असे दोघे आहेत त्यातला अ हा ब ला "आम्ही जातीयवादी नाही पण आमच्या जातीबद्दल बोलाल ता खबरदार" असे म्हणाला तर त्यावरुन खालील शक्यता निघतात १ - ब हा अ ला काहीतरी जातीवरून म्हणाला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अ ने हे वाक्य वापरले... २ - अ कधीही ब ला जातीवरून वेगळी वागणूक देत नाही पण ब ने भविष्यात अ ला जातीवरून काही बोलू नये यासाठी अ ने हे वाक्य वापरले...(थोडेफार भारताच्या अणुबाँब धोरणासारखे)...इथे ब भविष्यात कधी असे वागू शकतो अशी शक्यता आहे ३ - अ कधीही ब ला जातीवरून वेगळी वागणूक देत नाही पण ब ने भविष्यात अ ला जातीवरून काही बोलू नये यासाठी अ ने हे वाक्य वापरले...(थोडेफार भारताच्या अणुबाँब धोरणासारखे)...इथे ब भविष्यात कधीही असे वागणार नाही अशी शक्यता आहे ४ - अ कधीही ब ला जातीवरून वेगळी वागणूक देत नाही पण ब ने भविष्यात अ ला जातीवरून काही बोलू नये यासाठी अ ने हे वाक्य वापरले...(थोडेफार भारताच्या अणुबाँब धोरणासारखे)...इथे ब भविष्यात कधी असे वागेल की नाही ते आत्ताच सांगू शकत नाही यातल्या नेमक्या कोणत्या शक्यतांसाठी किव करावी?

In reply to by टवाळ कार्टा

'मी अमूक एका जातीचा नाही' हे मनात पक्कं ठरवून घेतलं की अशा कोणत्या शक्यता उद्भवतात..?

In reply to by संदीप डांगे

एक शंका : मी माझी संस्कृती म्हणून वैयक्तिकरित्या जात जपत असेल तर मी जातीयवादी ठरतो का?

In reply to by संदीप डांगे

ओके. ऑक्सफोर्डनुसार जातीयवाद (पक्षी: कास्टिजम) याचा अर्थ - १. जात व्यवस्थेशी संलग्न असणे २. दुसऱ्या जातीतील कोणा बद्दलही पूर्वग्रहदूषित किंवा द्वेषयुक्त मत ठेवणे. अर्थात हे झालं अर्थाअर्थी किंवा अक्षरशः. आपण सर्वच जाणतो आणि गृहीत धरतो कि "जातीयवाद" म्हणजे वरीलपैकी दुसरं. तुमच्या म्हणण्यानुसार मी वरीलपैकी नं. १ मुळे जातीयवादी असेनहि पण त्यामुळे कोणाला काय त्रास व्हायला हवा? किंबहुना त्यावर कुणाचा काय आक्षेप असायला हवा?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पहिल्यामुळे दुसर्‍या शक्यता उद्भवतात. त्यामुळे पहिलेछूट पहिलाच मुद्दा ठेवला नाही तर नंतरच काही होणार नाही. अवांतरः जात व्यवस्थेशी संलग्न असल्याने काय फायदा होतो?

In reply to by संदीप डांगे

असहमत! मूळ प्रश्नाला बाजूला ठेवून काढलेली उत्तरे टिकत नाहीत. बासरी आवडत नाही म्हणून बांबूचं झाडंच लावायचं नाही हे पटत नाही. चांगली-वाईट बासरी वाजवणारे असायचेच. मी चांगली बासरी ऐकणं पसंद करेन. पण तुमच्या मताचा आदर करतो, आजूबाजूला दिसणाऱ्या परिस्थितीवरून जातीबद्द्ल हे मत बनवलं जातं हे उघड आहे.

In reply to by संदीप डांगे

तुम्ही माझी जातीबद्दलची अपेक्षा आणि त्याचा परीघ याबद्दलचा खालचा प्रतिसाद वाचावा! त्यानंतर त्यात फार काही फायदे तोटे शोधण्याचं शिल्लक रहात नाही आणि ती एक नैसर्गिक प्रवृत्ती उरते. बाकी बासरीचं म्हणाल तर ज्याचं त्याचं मत! समाजातून जातपात संपूर्ण संपावी हा दुर्दम्य आशावाद मीहि बाळगून आहे, पण फरक एवढाच आहे कि तुम्ही ऑक्सफर्डमधलं नं. १ (जात) काढून टाका म्हणजे नं. २ (जातीयवाद) रहाणार नाही असे म्हणत आहात आणि मी नं. २ (भारतात सर्वसाधारणपणे अभिप्रेत असलेला जातीयवाद) काढून टाका म्हणजे नं. १ हा अत्यंत कमी महत्वाचं किंवा वैयक्तिक मुद्दा उरेल असं म्हणत आहे. आता यापैकी काय लवकर साध्य होऊ शकतं यावर चर्चा संभवू शकते. स्वातंत्रोत्तर आलेख बघितला तर (आणि मुख्यत्वे आरक्षण) तर समाज नं. १ पासून दूर जाताना दिसत नाही परंतु तेच आंतर्जातीय विवाहांचं प्रमाण बघितलं तर नं. २ कमी होण्याची किमान आशा वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जात पाळणे, तिच्याशी संलग्न असणे, जातबांधवांशी निष्ठा बाळगणे या गोष्टी दिसायला जरी harmlesss असल्या तरी, त्या तुमचा attitude ठरवतात. आपण आणि ते हा भेद नकळत होतोच. सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व विचारांच्या बाबतीत हा attitude मोठा फॅक्टर ठरतो. त्यामुळे व्यक्तीश: मला जातीशी सम्पूर्ण फारकत घ्यावी असे वाटते कारण जात स्वातंत्र्यावर बंधने आणते. परंपरा जसे पाककला, हस्तकला वगैरे जपाव्या ते पण जातीची लेबले न लावता. त्यामुळे, वैयक्तिक आयुष्यात जात पाळावी कि नाही हे जरी व्यक्तीवर अवलंबुन असले तरी त्याला जात हि अजिबातच महत्वाची गोष्ट वाटू नये इथवर जाणे हे आपले समाज म्हणून ध्येय हवे.

In reply to by पुंबा

सहमत. परंपरा, संस्कृतींना जातीची लेबले लावण्याची गरज नाही. काही जाती अगदी पोटजातीही सेम असल्या तरी त्यांच्यातल्या रितिभाती, खानपान बर्‍याच प्रमानात वेगळं असतं. एकाच जातीत कट्टर मांसाहारी ते कट्टर शाकाहारी असेही पाहायला मिलतात. एकाच जातीच्या दोनप्रकारच्या भौगोलिक व आजूबाजूच्या सामाजिक फरकानेही सांस्कृतिक बदल घडून येतात. जात कशाला सांभाळायची याचे कारण कोणी देईल काय? पटण्यासारखे असेल तर मीही (हार्मलेस पद्धतीने) जात पाळायला लागेन मग..

In reply to by संदीप डांगे

जात कशाला सांभाळायची याचे कारण कोणी देईल काय? पटण्यासारखे असेल तर मीही (हार्मलेस पद्धतीने) जात पाळायला लागेन मग.. "जात पाळणे = जातीयवाद" असे असताना हार्मलेस पद्धतीने का होईना पण जात पाळण्याचा मार्ग पत्करणे म्हणजे तुम्हाला मान्य असलेल्या विचारसरणीशी प्रतारणा आहे. जात न पाळण्याचा वैयक्तीक पातळीवर प्रयत्न करणे जास्ती सोपे आहे. अर्थात हा प्रयत्न वैयक्तीक पातळीवरच राहणार. आणखी लोकं जमवून असा प्रयत्न केला की "अजात" चळवळीसारखी अवस्था होईल. :(

In reply to by मोदक

सरळ प्रश्न होता, जात कशाला सांभाळायची याचे कारण देता येईल काय, मी काय करेन न करेन ते मुद्दा नंतर घेऊ. आधी जात चळवळ करुन नक्की काय फायदा होतो ते बघूयात. :)

In reply to by संदीप डांगे

जात कशाला सांभाळायची याचे कारण देता येईल काय कल्पना नाही. आधी जात चळवळ करुन नक्की काय फायदा होतो ते बघूयात. :) जात चळवळ करून फायदा होईल अशी अजुन अपेक्षा आहे..?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

"हातोळकर" हम्म्म जातीयवादीच की, गांधीजींना तुमीच मारले की राव. ******* असे लॉजिक असते, काय बोलणार यावर?

In reply to by मोदक

सहमत! खरंच लॉजिक कळत नाही. शिवाय काही मुद्देसूद चर्चा करावी म्हटली कि लगेच 'खबरदार'वतोय असं मत! खरंच काय बोलणार?

In reply to by संदीप डांगे

तुमचा वरचा प्रतिसाद आणि माझा वरचा प्रतिसाद परत एकदा वाचाल का? मी मला कोणी खबरदारवतंय असं नाही म्हणालो. गांधीवधाला अमुक अमुक जात कारणीभूत होती हे मी अगदी अलीकडे सुद्धा काही चांगल्या सुशिक्षित लोकांकडून ऐकलं आहे. हा माझा काही लोकांबाबत अनुभव असल्याने मोदक यांच्या वरचं वाक्य "असे लॉजिक असते" याला सहमती दर्शवली. गांधीवधाशी लावलं जाणारा जातीय लॉजिक कळंत नाही असा माझा मुद्दा आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

ते गांधीहत्येला तुम्ही 'गांधीवध' जे सारखं म्हणत आहात त्यामुळे असेल कदाचित... :)

In reply to by संदीप डांगे

अच्छा हे लॉजिक आहे तर! बराय! लॉजिक गंडलंय राव पण! पण असो ज्याचं त्याचं वैयक्तिक मत! बाकी तुम्ही हे लॉजिक मानताय काय? नाही म्हणजे स्पष्ट असलेलं बरं!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मला विचाराल तर कोण्या जातीने कोणाची हत्या (तुमच्या भाषेत वध) केली असे मी मानत नाही, हत्या ह्या मनोवृत्तीतून होतात व मनोवृत्ती कोणा जातीची मक्तेदारी नाही, तसे असते तर महात्मा गांधी हत्येनंतर किंवा इंदिरा गांधी हत्येनंतर जे झालं ते झालं नसतं.

In reply to by संदीप डांगे

सहमत! झालं तर मग! हेच न मानणाऱ्या लोकांचं लॉजिक कळत नाही असा वरचा प्रतिसाद होता! ती हत्या होती का वध होता हा अगदी वेगळा विषय होऊ शकतो. तसं याबाबतीत मी अजूनही निष्कर्षाला आलो नाही आणि हे नक्की मानतो कि कायद्याच्या दृष्टिकोनातून ती हत्या होती. तसाही मी जहालमतवाद (पक्षी : एक्स्ट्रिमिजम) फारसा मानत नाही त्यामुळे यावर आपल्यात वेगळी चर्चा संभवू शकते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

जहाल, मवाळ, हत्या, वध ह्याचा प्रश्न नाही आहे हो. मनोवृत्तीचा प्रश्न आहे. एका उदाहरणातून आपण जातव्यवस्थेशी संलग्न असल्यावर काय भूमिका घेतो हे लक्षात येईल. - मी ब्राह्मण आहे. चार नातेवाईकांमधे बसलो असतांना एकाने आपला रिवर्स-अ‍ॅट्रोसिटी चा अनुभव सांगितला की अमुक एकाने त्याला "बामन्या, गांधींचा हत्यारा, आमच्यावर लै अत्याचार केले" असे काहीतरी अपमानास्पद बोलले आहे. आता तुम्ही त्याला 'हा त्याच्या स्वतःच्या घाणेरड्या मनोवृत्तीचा प्रश्न आहे, ह्यात तो कोणत्या जातीच्या आहे त्याचा काही संबंध नाही' हे सांगू शकाल काय? असे सांगितले तर इतर चार 'संस्कृती म्हणून जात जपणारी' मंडळी तुमच्या मताला दुजोरा देतात की असहमती व्यक्त करतात? - वरिल उदाहरण कोणत्याही जातीच्या संदर्भात घेतले तरी चालेल.

In reply to by संदीप डांगे

उदाहरण व्यवस्थित समजलं नाही (पण तरीही गंडलंय असं म्हणणार नाही) पण तरीही - १. होय मी त्याच्या वैयक्तिक मनोवृत्तीचा प्रश्न आहे असं सांगेन (आणि समजा मी तसं नाही सांगू शकलो तर भविष्यात तसं सांगण्याचं धाडस जमवण्याच्या दृष्टीने विचार करेन, पण मी तसं सांगू नाही शकलो तर याचा अर्थ मी ती जातच तसली आहे असं सांगेन असं नाही. ) २. इतर चार खरंच "संस्कृती म्हणून जात जपणारी" मंडळी असतील तर दुजोरा देतील, नाहीतर असहमती दर्शवतील. या "अमुक एकांची" आणि इतर चार मधल्या "नाहीतर" वाल्यांची संख्या कमी होत जाणे म्हणजे जातीयवाद संपणे असे मी मानतो.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

उदाहरण गंडलेलं असू शकतं, माझं काय म्हणणं नाही त्याबद्दल! पण स्वजातीय लोकांच्या बैठकीत असा विरुद्ध पवित्रा सहज शक्य होत नाही हे सर्वांना अनुभवाने ठाऊक असेल, (तुमच्याच प्रतिसादात तुम्ही जर तर ची भाषा वापरली आहे की! पण तुम्ही प्रामाणिक आहात हेही त्यावरून दिसतंय) स्वजातीय लोकांना गोळा करून जातीयवादाबद्दल प्रबोधन करणे विरोधाभास आहे. सर्वच जातींच्या संघटना असतात त्या जेव्हा भेटतात, तेव्हा एकमेकां साह्य करू हा एक उद्देश असतो, दुसरा, एकी कायम ठेवायला इतर जाती त्यांच्यावर कशा अन्याय करतात, आपल्यावर जातीमुळे कसा अन्याय होतो, याची उजळणी करतात. आपली जात इतरांपेक्षा कशी वेगळी आहे (श्रेष्ठ वा कनिष्ठ चा संबंध नाही), आपल्याच जातीचे महापुरुष कसे ग्रेट होते ह्याच्या चर्चा व्याख्याने होतात, जातीतल्या पुढारलेल्या व्यक्तींकडून इतरांना प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन होते (हे सरसकट नाही,असे मार्गदर्शन जातिनिरपेक्षही होते पण तो विषय वेगळा), लग्नसंबंधासाठी वधुवरसंमेलने होतात, (काही लोक म्हणतात की आपल्याच जातीत कोणाची इच्छा असेल लग्न करायचं तर त्यात काय समस्या? याबद्दल आधी एका धाग्यावर चर्चा झालीये), जात हा एक वैशिष्ट्य दर्शवणारा समूह आहे त्याला जपणे म्हणजे भेदाभेद जपणेच होय. खाद्यसंस्कृती, पोशाख, इत्यादीसाठी जात जपतो म्हणणे जन्माधारित विशेषत्व जपणे होय. अनेक परंपरा आज शुद्ध स्वरूपात नाहीत, अनेक घरात तीन पिढ्यांत काहींना काही बदलतं. आज एकाच जातीच्या चार विरुद्ध ठिकाणच्या लोकांमध्ये चार वेगवेगळ्या संस्कृती दिसून येतात, अशावेळेस आपलं 'अमुक तमुक' म्हणून विशेष लेबल सांभाळण्याशिवाय जातीचा उपयोग तो काय? मनुष्याला इतरांपेक्षा वेगळं असावं वाटतं, आपला एक खास कंपू असावा असं वाटतं हे नैसर्गिक आहे. ती भूक भागवायला जातीसारखं नैसर्गिक काही नाही. (काही लोकांनी इथे आपण भेदाभेद पाळत नाही, श्रेष्ठ कनिष्ठ मानत नाही असे म्हटले आहे, असे लोकही आहेतच, नाहीच असे सरसकट म्हणत नाहीये.) आपल्या जातीसंबंधी कोणी काही बोललं कि ते वैयक्तिक नसलं तरी अंगावर घेऊन लोक प्रतिकाराला उभे राहतात तेव्हा कोणती संकृती, पोशाख, चालीरीती इत्यादींचे रक्षण करायला ते उभे असतात? ते फक्त 'जातीय अस्मिता' नावाच्या पोकळ भावनेचे समर्थन करत असतात. (प्रत्येक नियमाला अपवाद असतात, वरील विधाने ते लक्षात घेऊनच केलेली आहेत)

In reply to by संदीप डांगे

आपल्या जातीसंबंधी कोणी काही बोललं कि ते वैयक्तिक नसलं तरी अंगावर घेऊन लोक प्रतिकाराला उभे राहतात तेव्हा कोणती संकृती, पोशाख, चालीरीती इत्यादींचे रक्षण करायला ते उभे असतात? ते फक्त 'जातीय अस्मिता' नावाच्या पोकळ भावनेचे समर्थन करत असतात.>>>> -- अगदी असंच घडतंय आणि यात कोणतेच जात समूह अपवाद नाहीत. अवांतर: मी जरी मुक मोर्चा समर्थक असलो तरी हे समर्थन फक्त एका लोकसंख्येने मोठ्या समूहाला शैक्षणिक आणि नोकरी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आहे. हेतू थोडा स्वार्थी असला तरी इतर ज्यांना आरक्षण नाही ते यातून निभावून पुढे जातील हा विश्वास आहे. त्यामुळे सकल समाजाचे कल्याण होईल. आरक्षणातून मराठा समाजाचा किती फायदा होईल, हे अगदी नोटबंदी मुळे किती फायदा होईल या सारखे आहे, असे मला वाटते.

In reply to by विशुमित

विशुमित भाई, तुमचा उद्देश गरीब मराठा तरुणांना संधी नाकारली जाऊ नये असा आहे हे खरंय, मात्र खूप चांगले गुण असूनपण चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळत नाही या पेक्षा फी भरायला पैसा नसल्याने शिक्षण घेऊ न शकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता आरक्षण मिळणं कायद्याने तर दुरापास्तच आहे, तर समाजातीलच धनिकांकडून, धुरिणांकडून आपल्या समाजातील गरीब मुलांना मदत होते का? असे ट्रस्ट वगैरे मोठ्या प्रमाणात का उभे राहत नाहीत. अर्थात असतील देखील पण मला माहित नसतील. कारण सरकारकडे मागून जेवढं मिळू शकेल त्याच्यापेक्षा किती तरी पटीने मोठे काम समाज एकत्र येऊन करू शकेल.

In reply to by पुंबा

समाजातील धनिक आणि धुरिणांकडून स्वतःच्याच समाजातील गरीब मुलांना मदत करायची म्हंटलं की पुन्हा त्यांच्या वर जातीवादाची टीका होणार.