Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निनाद on Tue, 11/15/2016 - 03:21
लेखनविषय (Tags)
जीवनमान
तंत्र
अर्थकारण
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
माहिती
मदत
कालच एकात्मिक भरणा पद्धती हा लेख मराठी विकिवर टाकला तोच येथे ही देत आहे. प्राप्त परिस्थितीत त्याचा उपयोग होईल असे वाटते. एकात्मिक भरणा पद्धती हे युनिफाईड पेमेंट इंटरफेस या इंग्रजी नावाचे भाषांतर आहे. यापेक्षा चपखल शब्द सुचत असतील तर जरूर द्या. तसेच या लेखात भर घालण्यासाठी स्वागत आहे! दुवा: https://mr.wikipedia.org/wiki/युनिफाईड_पेमेंट_इंटरफेस (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8) ----------- एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. दि. ११ एप्रिल २०१६ पासून भारतीय रिझर्व बॅंक व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) संयुक्त विद्यमाने ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही सुविधा वापरून एकावेळी किमान रु. ५० व कमाल एक लाख रुपये इतका भरणा तत्काळ करता येतो. यासाठी लाभार्थींच्या बॅंकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी कोड यासारखी कोणतीही माहिती आवश्‍यक नसते. युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुविधा वापरल्याने कोणत्याही व्यक्तीला कोणालाही पैसे देणे शक्य आहे. तसेच कोणाकडूनही पैसे घेता येणार आहेत. याशिवाय विविध बिले ऑनलाईन देता येणे शक्य आहे. या सुविधेचा उपयोग ऑनलाइन शॉपिंग साठीही करता येणार आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस वापरण्यासाठी फक्त संबंधिताचा व्हर्च्युअल पेमेंट अड्रेस (व्हीपीए) माहीत असणे आवश्‍यक असते. यूपीआय वापरासाठी नोंदणी - रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी यूपीआय ऍप उतरवून घ्यावे. व आपल्या बॅंकेशी जोडावे. ( कसे जोडावे या विषयी या विभागात मुळ लेखात अधिक माहिती आवश्यक आहे) याचे फायदे:
  • सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
  • चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
  • अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
  • पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.
  • Log in or register to post comments
  • 42955 views

प्रतिक्रिया

Submitted by निनाद on Tue, 11/15/2016 - 04:03

Permalink

युपीआय वापरणारे कोणतेही अ‍ॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा.

एकात्मिक भरणा पद्धती - युनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payment Interface (UPI) हे बॅकबोन आहे. यावर आधारीत अ‍ॅपस बनवली आहेत बँकांनी. युपीआय वापरणारे कोणतेही अ‍ॅप गुगलवरुन उतरवून घ्या आणि वापरा. बँकेचे आहे तसेच फ्लिप्कार्ट चे पे पण मिळते आहे... कोणतेही वापरले तरी सेफ असावे असे वाटते कारण बाटली बदलली तरी युपीआय ही दारू तीच असणार आहे. Steps for Registration: 1.User downloads the UPI application from the App Store / Banks website 2.User creates his/ her profile by entering details like name, virtual id (payment address), password etc. 3.User goes to “Add/Link/Manage Bank Account” option and links the bank and account number with the virtual id Generating M – PIN: 1.User selects the bank account from which he/she wants to initiate the transaction 2.User clicks on requried option हे वरचे कुणी सुलभ मराठीत भाषांतर करून देईल का? खालील ब्यांकांनी हे उपलब्ध करून दिले आहे: Banks live as PSP and Issuer: 1 Andhra Bank 2 Axis Bank 3 Bank of Maharashtra 4 Canara Bank 5 Catholic Syrian Bank 6 DCB Bank 7 Karnataka Bank 8 Union Bank of India 9 United Bank of India 10 Vijaya Bank 11 Punjab National Bank 12 Oriental Bank of Commerce 13 TJSB 14 Federal Bank 15 ICICI Bank 16 UCO Bank 17 South Indian Bank 18 HDFC --- मर्चंट एण्ड साठी काय सेट अप आहे याची मात्र कल्पना आली नाही.. त्यावर कुणी काही सांगेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/15/2016 - 05:10

Permalink

//(UPI) ही एक अत्यंत सोपी,

//(UPI) ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित व तत्काळ पैसे चुकते करता येणारी सुविधा आहे. यामुळे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा सरकारतर्फे देण्यात आली आहे. // //या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.// //वापरणारे कोणतेही अॅप गुगलवरुन उतरवून घ्या// - १)स्टेट ब्यान्केचं नाव का नाही? -२)दुकानदार सर्व लबाड आहेत हे चार दिवसांच्या चौकशीत कळले.ते म्हणतात क्याशच द्या - सर्वांच्याकडे स्मार्टफोन्स हवेत -४)गुगल अॅन्ड्राइडला सुरक्षितता कमी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Tue, 11/15/2016 - 05:21

In reply to //(UPI) ही एक अत्यंत सोपी, by कंजूस

Permalink

- १)स्टेट ब्यान्केचं नाव का

- १)स्टेट ब्यान्केचं नाव का नाही? उत्तम प्रश्न आहे. मला ही कळले नाही. पण बहुदा 'वरुन' दट्ट्या आल्या शिवाय ते होत नसावे असे वाटते. -२)दुकानदार सर्व लबाड आहेत हे चार दिवसांच्या चौकशीत कळले.ते म्हणतात क्याशच द्या या विषयी काय बोलणार हो आता? माझा पास. पण ज्या दुकानदारांना हवे आहे त्यांना ही माहिती तरी द्यायला हरकत नाही. - सर्वांच्याकडे स्मार्टफोन्स हवेत सद्य काळात हे असावेत असा समज आहे... नसल्यास शक्य नाही. -४)गुगल अॅन्ड्राइडला सुरक्षितता कमी आहे. याला माझा पास! असो हा ही पैसे देण्या घेण्याचा अधिकृत सरकारी एक मार्ग आहे. याविषयी काही माहिती दिसली नाही म्हणून हा प्रयास केला. हाच वापरला पाहिजे असा आग्रह वगैरे नाही. अनेक व्यावसायिक सुट्टे आणि त्यांचा प्रश्न सोडवताना आपला शिक्का वापरून कुपन्स वगैरे देतात. त्यापेक्षा हा माग बराय असे वाटते इतकेच. (पे वेव आणि पे पास असले तर काहीच प्रश्न रहात नाही...)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/15/2016 - 06:47

In reply to - १)स्टेट ब्यान्केचं नाव का by निनाद

Permalink

जे काही सुटे पैसे आहेत ते

जे काही सुटे पैसे आहेत ते भाजी, रिक्षा ,लोकल ट्रेन/बस तिकिटाला वापरेन आणि दुधवाल्यांस चेक/NFT ने मोठी रक्कम देईन हा विचार केला.दुधवाले/वाणी ब्यान्केत नको बोलतात. शेवटी काल दोन हजारची नोट देऊन अडवान्स पेड कार्ड बनवलं.मला वाटतं दुधवाले मोठ्या स्टॅाकिस्ट कडून दुध घेतात आणि रोजची क्याश ( कमिशन वजा करून )थेट स्टॅाकिस्टच्या ब्यान्क अकाउंटला भरतात. हे नामानिराळे. हे लोक काही ( दहाएक लाखांची अथवा अधिक )मोठी आर्थिक उलाढाल करतात याची कागदोपत्री नोंदच होत नाही. असं टॅक्स-वाचवू लफडं आहे याची पक्की खात्री झाली. फक्त नोकरदार माणसांकडूनच टॅक्स ओरबाडला जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on Tue, 11/15/2016 - 12:04

In reply to - १)स्टेट ब्यान्केचं नाव का by निनाद

Permalink

hdfc आणि sbi अजून टेस्टिंग

hdfc आणि sbi अजून टेस्टिंग मोड मध्ये आहेत , पुढच्या महिनाभरात लाइव्ह होतील बहुतेक. सध्या नेहमीचे दूधवाला, पानवाला यांना educate करण्याचे माझे काम चालू आहे. BTW, एकूण २३ बॅंक्स लाइव्ह आहेत १८ नाही
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 11/29/2016 - 06:35

In reply to hdfc आणि sbi अजून टेस्टिंग by टीपीके

Permalink

HDFC आहे UPI वर.

HDFC Bank च्या app मध्ये UPI मिळतंय. त्यात Virtual Payment Address, IFSC & Bank account number, Phone number & MMID आणि आधार नंबर असे चार पर्याय आहेत. यातला कुठलाही पर्याय वापरून पैसे पाठवता येतात. दुस-या व्यक्तीला ताबडतोब मिळतात.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Tue, 11/15/2016 - 05:41

Permalink

हॉट्सअ‍ॅप फेसबुक वर वापरला तर चालेल!

टीपः हा लेख कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअ‍ॅप फेसबुक वर वापरला तर चालेल!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/15/2016 - 09:18

Permalink

छान काम केलेस.

विक्रेत्याकडचा सेटप व्हिसा किंवा मास्टर कार्डसारखे नाही बहुतेक. पण विक्रेत्याच्या नंबरला पेमेंट पेटीएम प्रमाणेच करता येते. http://www.npci.org.in/imps_product.aspx बँकांच्या मोबाईल बँकिंगचा प्रसार तेवढासा झालेला नाही त्यामुळे इतकी चांगली योजना दुर्लक्षित राहिली आहे. वास्तविक आमची सर्कारी बेंकही मोबाईल बँकिंग वर MMID आणि imps वापरून मोबाईल फंड ट्रान्सफरची सोय देते. म्हणजे ज्या ज्या बँका मोबाईल बँकिंग अ‍ॅपवरून देतात त्या सगळ्यांकडे ही सोय असणार. मात्र लिंक केलेल्या बँकांच्या यादीत आमच्या बँकेचे नाव नाही. वरच्या लोकानी ते यावे म्हणून काही कष्ट घेतलेले नसणार. मोबाईल बँकिंग मधेही मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, कोणालाही छोटे मोठे इन्स्टट फंड ट्रान्सफर सगळे आहे. पण एक टक्का सुद्धा लोक वापरत नसावेत. खरे तर ही अधिकृत आणि पेटीएम पेक्षा सुरक्षित सेवा आहे. शिवाय पैसे विक्रेत्याच्या थेट बँक अकाउंटला जमा होतात. मात्र लोकांपर्यंत पोचण्यात फार कमी पडली आहे. कंजूस म्हणतात तसेच मलाही वाटले होते. ते कन्फर्म झाले. सगळ्याच लोकांकडे मोबाईलने ऑनलाईन पेमेंट घेता येईल. पण त्या लोकाना पैसे बँक अकाउंटला यायला नको आहेत. कारण टॅक्स लागू होईल. फक्त अगदी छोटे विक्रेते कोणी टॅक्सीड्रायव्हर, चहावाल्याचा उल्लेख केला होता त्यांचे उत्पन्न इन्कम टॅक्स लिमिटच्या आत बसत असेल तेच फक्त अशा प्रकारे पैसे घ्यायला तयार होतील.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/15/2016 - 09:47

Permalink

स्टेट ब्यान्केचं इंटरनेट

स्टेट ब्यान्केचं इंटरनेट-ब्यान्किंग साइट वापरून मोबाइलातूनच करतो गेले सहा महिने, अॅप वापरून रिचार्ज करतो,बिल भरतो.एटिम कार्ड मात्र कोणाकडे स्वाइप करत नाही. रुपे नावाचं "सर्व ठिकाणी चालणारं" कार्ड मात्र अवलक्षणी आहे. त्यांचा सर्वर धोका देतो. मोठ्या रकमा दिल्यानंतर छोटी क्याश ठेवायला फारच सोपं आहे. त्यासाठी स्मार्टफोन,इंटरनेट,ब्याटरी डौन होणे,घेणाय्राचं पिटिएम बंद असणे यातून मुक्त राहतो.
  • Log in or register to post comments

Submitted by रघुनाथ.केरकर on Tue, 11/15/2016 - 11:05

Permalink

पॉस टर्मिनल

मी ग्रहकांकडुन पैसे पॉस टर्मिनल ने घेत होतो. ८ तारखेच्या पुर्वी सगळे रोख व्यवहार करायचे, आता मात्र सगळे कार्ड देतात. पण गडबड अशी आहे ना की पॉस वर २.७८ % कमीशन पॉस वाल्याना द्याव लागत. पुर्वी मी लोकांना पर्याय द्यायचो कि एक्तर कार्ड +३ % द्या कींवा रोख. आता न सांगता सगळे कार्ड पुढे करतात, ह्यातील बर्‍याच लोकाना २.७८ टक्क्यांचा नीयम माहीत नसल्याने त्याना वाटतं की मी त्यान्च्या अडचणीचा फ़ायदा घेतोय. बरे हे तीन टक्के सोडावे तर आपलचं नुकसान. घ्यावे तर २ -३ वर्षे कमवलेलं नाव खराब होतय. सध्या ह्यावर तोडगा म्हणुन उधार चालु केलय.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/15/2016 - 11:16

In reply to पॉस टर्मिनल by रघुनाथ.केरकर

Permalink

ऑनलाईन ट्रान्सफर घ्या

ऑनलाईन ट्रान्सफर घ्या, एनईएफ्टी किंवा मोबाईल बँकिंग मधून.
  • Log in or register to post comments

Submitted by रघुनाथ.केरकर on Tue, 11/15/2016 - 11:30

In reply to ऑनलाईन ट्रान्सफर घ्या by पैसा

Permalink

ऑन्लाईन पेमेंट वैगरे प्रकार अजुन इतकासा रुळलेला नाही.

बिलाच्या मागे पर्सनल आणी करंट दोन्ही खात्याचे नंबर प्रिंट करुन देतोय. अजुन एक छदाम देखील आला नाही. ग्राहक वर हा हौसवाईफ़ वर्गातला असल्याने, ऑन्लाईन पेमेंट वैगरे प्रकार अजुन इतकासा रुळलेला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/15/2016 - 12:00

In reply to ऑन्लाईन पेमेंट वैगरे प्रकार अजुन इतकासा रुळलेला नाही. by रघुनाथ.केरकर

Permalink

हम्म

खरं आहे. पण त्यांच्या घरातल्या कोणाची बँकेत खाती असतील, त्यांचीही असतील. बँकेत जाऊन त्या एन ई एफ टी करू शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on Tue, 11/15/2016 - 12:07

In reply to पॉस टर्मिनल by रघुनाथ.केरकर

Permalink

UPI वापरू लागा आणि लोकांना

UPI वापरू लागा आणि लोकांना पण सांगा. सर्वोत्तम फायदा म्हणजे , कोणतेही चार्जेस नाहीत आणि १ मिनिटाच्या आत तुमच्या बँकेत पैसे जमा
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on Tue, 11/15/2016 - 12:10

Permalink

फोने पे हे फ्लिपकार्ट चे असले

फोने पे हे फ्लिपकार्ट चे असले तरी येस बँकेच्या मदतीने (powered by ) ऍप आहे. ICICI पॉकेट्स हे दुसरे चांगले ऍप आहे तुमचे अकाउंट कोणत्याही बँकेत असले तरी तुम्ही ही ऍप्स वापरू शकता सध्या लाइव्ह बँकांची यादी खालील प्रमाणे Andhra Bank Axis Bank Bank of Maharashtra Canara Bank Catholic Syrian Bank DCB Bank Karnataka Bank Union Bank of India United Bank of India Vijaya Bank Punjab National Bank Oriental Bank of Commerce TJSB Federal Bank ICICI Bank UCO Bank South Indian Bank Yes Bank RBL Bank IDFC Bank IDBI Bank Allahabad Bank Kotak Bank
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/15/2016 - 12:38

In reply to फोने पे हे फ्लिपकार्ट चे असले by टीपीके

Permalink

अजून अपुरी यादी

आमच्या सिंडिकेट बँकेचे आणि देना बँकेचे मोबाईल बँकिंग अ‍ॅप आहे. मला मोबाईलवरून आयएमपीएस आणि एमएमाअयडी वापरून पेमेंट्स करता येतात. paymate यानी ती अ‍ॅप्स डेव्हलप केलेली आहेत. त्याअर्थी इतर बँकांचीही असणार. मात्र या सर्व बँका या यादीत आलेल्या नाहीत. मला वाटते की ज्या ज्या बँकांची मोबाईल बँकिंग अ‍ॅप्स आहेत त्यानी ही सुविधा सुरू केलेली असणार. प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर याबद्दल माहिती मिळेल. यादी सापडली http://imps.npci.org.in/P2Pparticipatingbanks.asp Participating Banks for IMPS Funds Transfer A P Mahesh Co-op Urban Bank Allahabad Bank Andhra Bank Axis Bank Bank of Baroda Bank of India Bank of Maharashtra Bassein Catholic Co - operative Bank Canara Bank Catholic Syrian Bank Central Bank Of India Citi Bank Corporation Bank Cosmos Co-operative Bank Dena Bank Development Credit Bank Dhanlaxmi Bank Dombivali Nagari Sahakari Bank Federal Bank Greater Bombay Co-operative Bank HDFC Bank ICICI Bank ING Vysya Bank IDBI Bank Indian Bank Indian Overseas Bank Janata Sahakari Bank Pune Karur Vysya Bank Kotak Mahindra Bank Karnataka Bank Lakshmi Vilas Bank Oriental Bank of Commerce Punjab National Bank Punjab & Maharashtra Co-op Bank Saraswat Co-operative Bank South Indian Bank State Bank of Bikaner & Jaipur State Bank of Hyderabad State Bank of India State Bank of Mysore State Bank of Patiala State Bank of Travancore Syndicate Bank Tamilnad Mercantile Bank The Hongkong And Shanghai Banking Corporation Limited ,India (HSBC India) The Thane Janata Sahakari Bank UCO Bank Union Bank of India United Bank of India Vijaya Bank Yes Bank BNP Paribas Jammu & Kashmir Bank Mehsana Urban Co-operative Bank NKGSB Bank Nainital Bank Pandharpur Merchant Co-operative Bank Punjab and Sind Bank Janaseva Sahakari Bank Gopinath Patil Parsik Janata Sahakari Bank Maharashtra Grameen Bank SUCO Souhadra Sahakari Bank The Surat District Co-op. Bank Ltd Dr. Annasaheb Chougule Urban Co-op Bank Ltd
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on Tue, 11/15/2016 - 12:53

In reply to अजून अपुरी यादी by पैसा

Permalink

नाही , तुमची यादी ही IMPS

नाही , तुमची यादी ही IMPS लाइव्ह असणाऱ्या बँकांची आहे, पण UPI ची यादी वेगळी आहे. बँकांना NPCI बरोबर काम करून UPI एनेबल करून घ्यावे लागते , त्याचे निकष वेगळे आहेत. विश्वास ठेवा :) गेली दिड वर्ष मी हि बातमी ट्रॅक करतो आहे
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/15/2016 - 13:12

In reply to नाही , तुमची यादी ही IMPS by टीपीके

Permalink

ओकी, लक्षात आले

मी बोलते आहे ते आयएमपीएस वापरून एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला पेमेंट करण्याबद्दल. आणि तुम्ही म्हणता आहात ते कमर्शियल युनिफाईड पेमेंटबद्दल. मात्र आयएमपीएस सुद्धा सध्याच्या परिस्थितीत नीट वापरले गेले तरी पुरेसे आहे. कारण वैयक्तिक खात्यात आयएमपीएस द्वारे पैसे ट्रानसफर करता येतात, तसेच मोबाईल डीटीएच रिचार्ज आणि फोन वीज क्रेडिट कार्ड इ बिलांचे पेमेंट याद्वारेच करता येते.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Tue, 11/15/2016 - 13:37

In reply to ओकी, लक्षात आले by पैसा

Permalink

IMPS ला चार्जेस लागतात..

IMPS ला चार्जेस लागतात..
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/15/2016 - 14:04

In reply to IMPS ला चार्जेस लागतात.. by संजय पाटिल

Permalink

माझ्या माहितीत तरी नाही

आपल्या बँकेच्या मोबाईल बँकिंग अ‍ॅपद्वारे केलेल्या imps ला कोणतेही चार्जेस लागत नाहीत. मोबाईल बँंकिंग सुरू करण्यालाही कोणतेही चार्जेस नाहीत. icici hdfc yes axis इ खाजगी बँकाच्या अ‍ॅपला चार्जेस असू शकतील. माहीत नाही. सरकारी बँकाना तरी नाहीत. upi enebled कोणत्याही बँकेचे अ‍ॅप वापरून imps व्यतिरिक्त ऑनलाईन खरेदी वगैरे करता येते तर फक्त imps enebled बँकाच्या स्वतःच्या अ‍ॅपद्वारे फक्त त्याच बँकेतला अकाउंट वापरून डीटीएच-मोबाईल रिचार्ज, बिल्स पेमेंट आणि दुसर्‍या व्यक्तीच्या कोणत्याही खात्यात फंड्स ट्रान्सफर करता येते हा फरक लक्षात आला.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Tue, 11/15/2016 - 15:31

In reply to माझ्या माहितीत तरी नाही by पैसा

Permalink

मी SBI to SBI IMPS केलेले,

मी SBI to SBI IMPS केलेले, तेव्हा ५००० रू ला ५.७५ कमिशन म्हणून डेबीट झालेले.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/15/2016 - 16:08

In reply to मी SBI to SBI IMPS केलेले, by संजय पाटिल

Permalink

सरप्रायझिंग आहे

तुमच्या बॅंकेच्या साईटवर या चार्जेसबद्दल माहिती तपासून घ्या. सिंडिकेट बँक आणि वर कोणीतरी म्हटले की कॅनरा बँकही मोबाईल बँकिंगद्वारे आयएमपीस वर चार्जेस लावत नाहीत नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on Tue, 11/15/2016 - 15:35

In reply to ओकी, लक्षात आले by पैसा

Permalink

हे मात्र बरोबर , पण IMPS

हे मात्र बरोबर , पण IMPS किरकोळ (रिटेल) पेमेंट्स साठी उपयोगी नाही कारण प्रत्येक बँकेचे इम्पलेमेंटेशन वेगवेगळे आहे, अनेक बँकात पहिले registration करावे लागते. आणि हीच अडचण UPI दूर करण्याचा प्रयत्न करते
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/15/2016 - 15:56

In reply to हे मात्र बरोबर , पण IMPS by टीपीके

Permalink

नाही

दुसर्‍या बँक अकाउंटला पेमेंट करता येते. आताच माझे अ‍ॅप उघडून मुद्दाम पाहिले. पेमेंट सेक्शन मधे IMPS other banks -> त्यात (१)IMPS using Account No & IFSC (२) IMPS using Mobile No & MMID (३)Know your MMID असे ऑप्शन्स आहेत. त्याशिवाय Transfer to syndicate bank हा वेगळा उपविभाग आहे. म्हणजेच ज्याच्या अकाउंटला मोबाईल बँकिंग अ‍ॅक्टिव्हेट केले आहे त्याना Mobile No & MMID वापरून किंवा ते नसेल तर Account No & IFSC वापरून पेमेंट करता येते. हे युपिआय पेक्षा जरा किचकट आहे मात्र ज्या बँका अजून युपिआय मधे सहभागी नाहीत त्यांचे ग्राहक सुद्धा मोबाईल बँकिंग वापरून काम भागवू शकतात. फ्लिपकार्टसारख्या साईटवरून ऑनलाईन खरेदी फक्त करता येणार नाही इतकंच काय ते.
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on Tue, 11/15/2016 - 15:59

In reply to नाही by पैसा

Permalink

प्रत्येक बँकेचे ऍप वेगवेगळे

प्रत्येक बँकेचे ऍप वेगवेगळे आहे, त्या मुळे एकच पद्धत नाही चालत
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Tue, 11/15/2016 - 13:04

Permalink

iOS वर युपीअाय अजून अालेले नाही

कोणत्याही बॅंकेचे! अाले, की लगेच वापरणार। ही एक जबरदस्त सुविधा अाहे. सर्वात महत्वाचे: ज्या बॅंकेचे अॅप वापराल, त्या बॅंकेत खाते असण्याची गरज नाही, कोणत्याही बॅंकेचे खाते त्या अॅपला लिंक करू शकता. मक्तेदारीमुक्त अॅप!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 11/15/2016 - 13:53

Permalink

2012 मध्ये m-pesa बद्दल खूप

2012 मध्ये m-pesa बद्दल खूप कौतुक ऐकले होते, आपल्याकडे हे कसे इम्प्लिमेंट करता येईल, किंवा तसे प्रयत्न झालेत का? https://en.m.wikipedia.org/wiki/M-Pesa
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on Tue, 11/15/2016 - 15:31

In reply to 2012 मध्ये m-pesa बद्दल खूप by संदीप डांगे

Permalink

UPI त्या सारखेच आहे, फक्त

UPI त्या सारखेच आहे, फक्त अधिक रेफाईन्ड
  • Log in or register to post comments

Submitted by अंजनेय on Tue, 11/15/2016 - 13:55

Permalink

धन्यवाद

धन्यवाद चालू परिस्थितीत अत्यंत उपयुक्त लेख लिहून लोकांचे प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद. माझा अनुभव सांगतो ICICI ची UPI पद्धती गेले ४-५ महिने वापरत आहे. कोणतीही अडचण आली नाही. १ सुधारणा सुचवतो. मी UPI वापरून मित्राला १० रुपये देखील पाठवले आहेत. त्यामुळे ५० ची किमान मर्यादा नाही. फायदे १) अकाउंट नंबर, IFSC कोड सांगावा लागत नाही. त्यामुळे अकाउंट नंबर, IFSC लक्षात ठेवावे लागत नाहीत. ते सांगताना आणि नोंदवून घेताना होणाऱ्या अपघाती चुका होत नाहीत. ई-मेल सारखा १ VPA फक्त लक्षात ठेवावा लागतो. एका अकॉउंट वरती अनेक VPA बनवू शकतो. २) पैसे रियल टाइम म्हणजे काही सेंकंदात जमा किंवा ट्रान्सफर होतात. ३) भविष्यातील देवाण घेवाण सेट करून ठेवू शकतो. ४) कुणाकडून पैसे येणे असेल तर UPI वर तशी विनंती पाठवू शकतो. समोरच्या व्यक्तीस मेसेजे द्वारे सूचित केले जाते आणि त्यांनी प्रणालीत जाऊन देयक स्वीकार केल्यास लगेच पैसे आपणास मिळतात. आगामी काळांत NEFT, RTGS, IMPS या सर्व पद्धतीची जागा UPI नक्की घेईल असे वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on Tue, 11/15/2016 - 15:37

In reply to धन्यवाद by अंजनेय

Permalink

उत्तम , फक्त ४-५ महिने कसे

उत्तम , फक्त ४-५ महिने कसे वापरात आहात ते कळले नाही कारण UPI ११ एप्रिल ला NPCI ने लाँच केले आणि १८ ऑगस्ट पासून त्यावर ऍप्स आल्या, ICICI माझ्या माहितीप्रमाणे २२ ऑगस्ट पासून लाइव्ह आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अंजनेय on Wed, 11/16/2016 - 20:40

In reply to उत्तम , फक्त ४-५ महिने कसे by टीपीके

Permalink

भावना समजून घ्या हो!!

भावना समजून घ्या हो!! तुम्ही पुणेकर का?
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on गुरुवार, 11/17/2016 - 12:45

In reply to भावना समजून घ्या हो!! by अंजनेय

Permalink

:) sorry

:) sorry
  • Log in or register to post comments

Submitted by अंजनेय on Fri, 11/18/2016 - 17:34

In reply to :) sorry by टीपीके

Permalink

अहो सॉरी कशाला??? ठीक आहे

अहो सॉरी कशाला??? ठीक आहे चालायचंच !!!! रच्याकने तुम्ही पुणेकर वाटत नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by राहुल काटु on Tue, 11/15/2016 - 14:19

Permalink

iOS वर युपीअाय

ios वर ICICI चे imobile हे app आहे, त्यात UPI हा पर्याय उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 11/15/2016 - 14:34

Permalink

paytm पण UPI आहे का ?

paytm पण UPI आहे का ? बाकी सगळं ठीक आहे पण रोजच्या व्यहवारात इंटरेनेटशिवाय हे पेमेंट होणार नाही. स्मार्टफोनचा अनिवार्य यामुळे अनेक लोकांना (ग्राहक , तसेच दुकानदार) हे वापरता येतील याची खात्री नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on Tue, 11/15/2016 - 15:41

In reply to paytm पण UPI आहे का ? by मराठी कथालेखक

Permalink

Paytm UPI नाही , ते एक

Paytm UPI नाही , ते एक क्लोज्ड वॅलेट आहे. हो, इंटरेनेट आणि स्मार्टफोन शिवाय ह्या पद्धती वापरता येत नाहीत, आणि हे सर्वच मोबाईल वॅलेट साठी लागू आहे. एखाद्या वेळी एप्रिल २०१७ मधील UPI व्हर्जन २ मध्ये सध्या फोन साठी पण काही सोय करतील
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 11/15/2016 - 16:01

In reply to Paytm UPI नाही , ते एक by टीपीके

Permalink

हो. म्हणजे एखादा sms पाठवून

हो. म्हणजे एखादा sms पाठवून पेमेंट करता आलं तर बरं होईल. पण त्याकरिता सुरक्षेचे काही नवीन उपाय योजावे लागतील...
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 11/15/2016 - 15:34

Permalink

मोबाईल अ‍ॅप्स वाल्यांचे रेव्हेन्यू मॉडेल काय असते ?

मोबाईल अ‍ॅप्स वाल्यांचे रेव्हेन्यू मॉडेल काय असते ? सध्या किंवा कालांतराने काही चार्जेस घेतले जाण्याच्या शक्यता ? असल्यास चार्जेसचे स्वरुप ? चांगल्या धाग्यासाठी आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 11/15/2016 - 15:42

Permalink

fast भरवसावाले इंटरनेट

fast भरवसावाले इंटरनेट घेणार्र देणाय्रा दोघांचे चालू हवे, स्मार्टफोनचे डबडे ऐनवेळी धोका द्यायला नको. कुठे फुकट वाइफाइ वापरले की काही घुसखोरी नको. पाकिस्तान बॅार्डरजवळच्या गावांत चालेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Wed, 11/16/2016 - 02:34

In reply to fast भरवसावाले इंटरनेट by कंजूस

Permalink

सार्वजनिक वायफाय

फुकट सार्वजनिक वायफाय वापरून बँकेचे व्यवहार कधीही करू नका! आपल्या फोन कंपनीच्या नेटवर्कचा डाटा वापरा तो जास्त सुरक्षित राहील. असेही फोन बँकिंगसाठी फारसा डाटा लागत नाहीच. जोवर तुम्ही तुमच्या फोन कंपनीने दिलेला डाटा वापरत आहात तोवर भारतात (अथवा त्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये कुठेही) फोन बँकिंग वापरायला प्रत्यवाय नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 11/15/2016 - 16:33

Permalink

इ ट्रांझाकशन ची सर्वात मोठी

इ ट्रांझाकशन ची सर्वात मोठी गैरसोय कि व्यवहार पूर्ण व्हायला अजून एक माध्यम लागतं. दोन्हीकडे मोबाईल हवेत, ऍप हवे, इंटरनेट हवे, रोख चलनात ह्यापैकी कशाचीच गरज नसते, म्हणून भारतात 99 टक्के कॅश व्यवहार होतात, हे सत्य आहे व ते मान्य करायलाच हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Wed, 11/16/2016 - 02:28

In reply to इ ट्रांझाकशन ची सर्वात मोठी by संदीप डांगे

Permalink

दोन्हीकडे आवश्यकता नाही.

दोन्हीकडे मोबाईल हवेत, ऍप हवे, इंटरनेट हवे असे नाही. द्यायच्यावेळी देणार्‍याकडे असले म्हणजे झाले. घेत्या खात्यात पैसे जमा होणारच आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 11/16/2016 - 02:54

In reply to दोन्हीकडे आवश्यकता नाही. by निनाद

Permalink

हो, पण जास्तीची माध्यमं

हो, पण जास्तीची माध्यमं लागतात जी उपलब्ध असण्यावर व्यवहार शक्य आहे. असो, किमान 20 टक्के e ट्रान्सफर साठी इन्फ्रा तयार होणे अवघड आहे, अशक्य नसले तरी. जियो ची रेंज खेडोपाडी बऱ्यापैकी आहे, बघूया
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 11/15/2016 - 17:17

Permalink

थोडक्यात माहिती

UPI आणि IMPS द्वारे मोबाईलवरून सोप्या पद्धतीने पेमेंट्स UPI काय आहे? Unified Payments Interface. अर्थात यात सामील झालेल्या बँकापैकी कोणत्याही बँकेच्या ग्राहकांसाठी मोबाईलद्वारे विविध पेमेंट्स करण्याची व्यवस्था. यात सामील असलेल्या एका बँकेचा ग्राहक दुसर्‍या बँकेचे मोबाईल अ‍ॅप वापरून या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. या व्यवस्थेत कोणत्या बँक्स सामील आहेत याची तसेच या व्यवस्थेबद्दल अन्य माहिती http://www.npci.org.in/ या संस्थळावर मिळेल. google app store मधून UPI app डाऊनलोड करून घ्यायचे. आपल्या बँकेशी संपर्क करून मोबाईल बँकिंग सुरू करून घ्यायचे आणि मग मोबाईलवरून या app द्वारे विविध पेमेंट्स करायची अशी ही सोपी पद्धत आहे. यात बँकेकडून एक व्हर्चुअल पत्ता abc@pockets अशा प्रकारचा दिला जातो आणि त्याच्या आधारे दुसर्‍याला पेमेंट करता येते किंवा स्वीकारता येते. पेमेंट घेणार्‍याकडे मोबाईल बँकिँग नसेल तरी Account Number + IFSC वापरून त्याला पैसे देता येतात. Transfer through Virtual ID Account Number + IFSC Mobile Number + MMID Aadhar Number Collect / Pull money basis Virtual ID या सर्व पद्धतीनी दुसर्‍याला पैसे देता येतात. या पद्धतीने दुसर्‍याला छोट्या मोठ्या रकमा मोबाईलद्वारे देता - घेता येतात याशिवाय ऑनलाईन खरेदीच्या साईट्सवरून खरेदी करता येते. pockets हे icici बँकेचे UPI app चे उदाहरण आहे. यात ते ग्राहकाला व्हर्चुअल तसेच मागणी केल्यास फिजिकल व्हिसा कार्ड देतात. IMPS ज्या बँका अजून UPI व्यवस्थेत सामील झाल्या नाहीत त्यांच्या ग्राहकांसाठी IMPS उपलब्ध आहे. यात ऑनलाईन खरेदी वगळता इतर छोटीमोठी पेमेंट्स आणि मोबाईल डीटीएच रिचार्ज, वीज, फोन इ. बिले भरणे ही कामे आपल्या स्मार्टफोनवरून करता येतात. IMPS काय आहे? Immediate Payment Service यातही मोबाईलवरून छोटी मोठी पेमेंट्स दुसर्‍या व्यक्तीला करता येतात. या व्यवस्थेत कोणत्या बँक्स सामील आहेत याची तसेच या व्यवस्थेबद्दल अन्य माहिती http://www.npci.org.in/ या संस्थळावर मिळेल. त्यासाठी आपल्या बँकेचे मोबाईल बँकिंग ऎप डाऊनलोड करून बँकेतून मोबाईल बँकिंग चालू करून घ्यायचे. बँकेतून आपल्याला यासाठी PIN आणि पासवर्ड मिळतो. आणि MMID जनरेट केला जातो. दुसर्‍या व्यक्तीकडे कोणत्याही बँकेचे मोबाईल बँकिंग चालू केले असेल तर या MMID आणि फोन नंबरचा वापर करून पैसे ट्रांसफर करता येतात. समजा दुसर्‍याकडे मोबाईल बँकिंग चालू नसेल तरी त्याचा Account number & IFS Code वापरून मोबाईल NEFT दवारे पैसे ट्रांसफर करता येतात. सध्या नकद पैशांची चणचण भासत असताना या दोन्ही पद्धती वापरणे सर्वांसाठी सोयीचे आहे कारण ५० पासून ५०००० पर्यँतचे पेमेंट अवघ्या काही मिनिटात आपण आपल्या मोबाईलवरून करू शकतो. मात्र यासाठी स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. या व्यवस्था बँकिंग सिस्टीम मधून आल्या आहेत आणि सुरक्षित आहेत. फोन हरवल्यास बँकेत फोन करून नंबर ब्लॉक करता येतो. तसेच पासवर्ड सेव्ह करून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने मोबाईल इतर कोणाच्या हातात पडला तरी तो आपल्या खात्यातून पैसे वापरू शकणार नाही. या व्यवस्थेसाठी काही बँकात कोणतेही चार्जेस नाहीत मात्र आपल्या बँकेत चार्जेस आहेत का आणि असल्यास किती आहेत याची खातरी त्या त्या बँकेच्या वेबसाईट किंवा हेल्पलाईन वरून करून घ्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 11/15/2016 - 17:19

In reply to थोडक्यात माहिती by पैसा

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 11/15/2016 - 18:55

In reply to थोडक्यात माहिती by पैसा

Permalink

एच डी एफ सी बँकेचे IMPS दर

एच डी एफ सी बँकेचे IMPS दर असे आहेत Slabs (Rs) Existing Charges (Excluding Taxes) Revised Charges (Excluding Taxes) Upto Rs, 10,000 3.5 5 10,001 Upto 100,000 5 5 100,001 Upto 200,000 15 15
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Wed, 11/16/2016 - 02:38

In reply to एच डी एफ सी बँकेचे IMPS दर by सुबोध खरे

Permalink

असे असेल तर

असे असेल तर ही बँक लुबाडते आहे. जी बँक या सुविधा फुकट देते त्यांची सेवा घ्यायला हवी. या शिवाय मग अजून काय काय चार्जेस या बँका लावतात याचा ही पडताळा घ्या. सरकारी बँकांशी एकदा पडताळून पहा. लहान सहान करत या बँक्स वर्षभरात बराच पैसा काढत असतील. (शक्य असेल तर हे सर्व चार्जेचासद्य काळात काढून टाकावेत यासाठी अध्यक्षांना इमेल करून पाहा. खास बाब म्हणून काढतीलही...)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Wed, 11/16/2016 - 11:28

In reply to असे असेल तर by निनाद

Permalink

सरकारी बँकांशी एकदा पडताळून

सरकारी बँकांशी एकदा पडताळून पहा.
SBI वाले पण घेतात..
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 11/23/2016 - 19:41

In reply to एच डी एफ सी बँकेचे IMPS दर by सुबोध खरे

Permalink

मी देखील ह्द्फ्चचं ((समजून

मी देखील ह्द्फ्चचं ((समजून घ्या :-) )) इम्प्स (समजून घ्या :-) ) बर्‍याचं वेळेला वापरलेय. कापले जाणारे चार्जेस परवडण्याजोगे वाटतात मला. आजकाल मल्टिप्लेक्सला पण पार्किंग वीस चाळीस रू आकारतात! मर्यादित व्यवहार असतील तर काय पाच-दहा रूपयांकडे पहायचे ? अश्या प्रकारच्या चार्जेस मधिल सवलती नंतर बंद होत असतात अथवा वेगळ्या प्रकारच्या व्यवहारांच्या माध्यमातून आकारल्या जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Wed, 11/16/2016 - 02:29

In reply to थोडक्यात माहिती by पैसा

Permalink

धन्यवाद

वा खुप छान सांगितलेत! धन्यवाद. हे लिखाण विकिवर वापरले तर चालेल का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com