✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307039 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

घंटा!

आनंदी गोपाळ
Wed, 11/09/2016 - 01:33 नवीन
.
↩ प्रतिसाद: मोदक

घंटा

मोदक
Wed, 11/09/2016 - 02:06 नवीन
घंटा
सांभाळून ठेवा, इन्कम टॅक्स वाले देवळांची पण काढून नेतात. तुम्ही आम्ही तर सामान्य माणसे
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

५०० च्या नोटा तर नवीन रुपात

सस्नेह
Wed, 11/09/2016 - 11:24 नवीन
५०० च्या नोटा तर नवीन रुपात उद्याच बाजारत येऊ घातल्या आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/ban-on-rs-500-rs-1000-notes-is-surgical-strike-on-terror-funding/articleshow/55321796.cms
↩ प्रतिसाद: मोदक

निषेध

प्रसाद गोडबोले
Wed, 11/09/2016 - 01:31 नवीन
मी व्यक्तिगत पातळीवर ह्या आतातायी आणि एककल्ली निर्णयाचा निषेध करतो. अवांतर : आता बिटकोईन आणि अन्य क्रीप्टो करन्सीजचा सिरीयसली विचार करावा लागणार !

का

नाखु
Wed, 11/09/2016 - 11:17 नवीन
बरे?
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खाबू सरकारी अधिकारी, राजकारणी

सुबोध खरे
Wed, 11/09/2016 - 01:35 नवीन
खाबू सरकारी अधिकारी, राजकारणी, गुंठामंत्री यांच्या कडे असलेली कोट्यावधी रुपयांची रोकड त्यांना ना वापरता येईल ना बँकेत भरता येईल.धंद्यात मिळालेली रोकड एकदम बँकेत भरली तर आयकर वाले पुढच्या वर्षी शेंडी धरणार? मागील वर्षी एवढा नफा आणि आता का नाही? मायावती यांची "माया" आता रद्दी झाली आणि मुलायम सिंह यांचे "कठीण" झालंय. निवडणूकीसाठी टेंपो ट्रक मध्ये भरुन ठेवलेला पैसा कोणत्यातरी देवस्थान च्या पेटीत टाकायला लागेल. सरकार अशा देवस्थानांच्या CCTV वर नजर ठेवून असेल. एकंदर मोदी साहेबांनी बर्याच लोकांची गोची करून ठेवली आहे.

Hyat bil n denare doctor pan

वगिश
Wed, 11/09/2016 - 08:38 नवीन
Hyat bil n denare doctor pan add kara
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

चूक आहे

सुबोध खरे
Wed, 11/09/2016 - 12:26 नवीन
चूक आहे बिल न देता हि जर पैसे बँकेत भरले आणि त्यावर कर भरला तर ते पैसे काळे होत नाहीत.
↩ प्रतिसाद: वगिश

Tumhala nahi ho pratisad, te

वगिश
Wed, 11/09/2016 - 20:11 नवीन
Tumhala nahi ho pratisad, te dusre Doctor ka tension madhe aale asawe tyach reason.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+1

पुंबा
Wed, 11/09/2016 - 11:37 नवीन
+1
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+२०

धोणी
Wed, 11/09/2016 - 11:42 नवीन
+२०
↩ प्रतिसाद: पुंबा

पॅनिक करण्याची गरज नाही. ५०

साहना
Wed, 11/09/2016 - 01:45 नवीन
पॅनिक करण्याची गरज नाही. ५० दिवस आहेत आपल्याकडे पैसे विविध मार्गानी सफेद करण्याचा. बहुतेक छोट्या मंडळींनी आधीच इनकम डिस्कोजर स्कीम वापरून पैसा पांढरा केला होता. मोदींचा निर्णय स्तुत्य आहेच पण त्याच वेळी बिल्डर माफिया आणि राजकीय पक्षा वर त्यांचा हा हल्ला आहे. ह्याचे पडसाद हळू हळू उमटतील. ज्यांचे नेट वर्थ १०० कोटी पेक्षा जास्त आहे त्यांच्या ओळखी सुद्धा मोठ्या असतात. त्यांच्यासाठी ५० दिवस म्हणजे खूप झाले अर्थांत मोदींच्या निर्णयामुळे सर्वच पैसा सफेद करता येणार नाही अगदी ३०% जरी पैसा सेव झाला तरी चालेल. एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुंतवणूकदाराकडून खालील माहिती प्राप्त झाली. १. स्मर्फ ट्रांसकशन्स करणार्यांना आता भारतांत प्रचंड मागणी होईल. काही चतुर मंडळींनी जनधन वगैरे स्कीमच्या निमित्ताने हजारो खाती उघडून ठेवली आहेत त्यांना आता विंडफाल प्राप्ती होईल. २. मध्यरात्री पर्यंतच्या वेळांत कॅसिनो मध्ये आपली कॅश जमा केली आणि कॅसिनो चालक ओळखीचा असेल तर सुमारे ७०% रक्कम सफेद करता येते. सफेद रकमेवर टॅक्स भरायचा नको असेल तर चिप्स तुम्ही मकाऊ मध्ये जाऊन वटवू शकता. तिथे तुम्हाला डॉलर मिळू शकतात. कॅसिनो मध्ये जुन्या डेट वर ट्रांसकशन्स करता अली तर आणखीन चांगले. ३. देवळे आणि मठ हा सुद्धा एक मार्ग आहे. इथे रोख रकमेत मध्ये भरपूर देणग्या येतात तुम्ही एकतर ५००,१००० च्या नोटा देऊन ७०% रक्कम चिल्लर मध्ये घेऊ शकता किंवा. देणगी म्हणून देऊन भविष्यांत कधी तो पैसे देवळा/मठा कडून वसूल करवू शकता. ४. कॉ-ऑप बॅंक्स. येथील मार्ग टेक्निकल असल्याने मला समजले नाहीत. तात्पर्य: मोदी ह्यांच्या ह्या निर्णयाने सर्वच काळ्या पैश्या वाल्याना हादरा बसला असला तरी मोठे क्रायसिस झाले नाही. मोठे शार्क ह्यातून सुद्धा सहज मार्ग काढतील. मोदींच्या निर्णयाचा एक चांगला परिणाम आहे तो म्हणजे एकूणच काळा पैसा जमा करून ठेवण्याच्या प्रथेतील रिस्क फार वाढली आहे. त्यामुळे कला पैसा कमी ठेवण्याची सवय अनेक लोक जास्त प्रमाणात लावून घेतील. मोदी ह्यांनी असेच निर्णय वेळोवेळी आणि पुन्हा पुन्हा घेतले तर चांगले. सर्व ५००, १००० रुपयांच्या नोटा दर दोन वर्षांनी रद्द बॅटल करण्याचा निर्णय घेतला तर आणखीन चांगला. कला बाजार आता बिटकॉईन्स, अमेरिकन डॉलर, जास्त रोबस्ट हवाला सिस्टम इत्यादींवर आता जास्त गुंतवणूक करेल.

हे समजले नाही.

प्रदीप
Sun, 11/13/2016 - 17:03 नवीन
२. मध्यरात्री पर्यंतच्या वेळांत कॅसिनो मध्ये आपली कॅश जमा केली आणि कॅसिनो चालक ओळखीचा असेल तर सुमारे ७०% रक्कम सफेद करता येते. सफेद रकमेवर टॅक्स भरायचा नको असेल तर चिप्स तुम्ही मकाऊ मध्ये जाऊन वटवू शकता. तिथे तुम्हाला डॉलर मिळू शकतात. कॅसिनो मध्ये जुन्या डेट वर ट्रांसकशन्स करता अली तर आणखीन चांगले.
भारतात कुठे कॅसिनो आहेत? आणि जे काही आहेत त्यांचा मकाऊच्या कॅसिनोजशी संबंध काय?
↩ प्रतिसाद: साहना

निर्णय पक्का आहे आता राज्यसभेत मजा पाहू .

वरुण मोहिते
Wed, 11/09/2016 - 01:45 नवीन
पण तरी डोन्ट वरी बी हैप्पी ...कारण सेट टॉप बॉक्स प्रमाणे हा निर्णय पुढे ढकलला जाणार आहे कारण मार्केट क्रॅश होईल. सो आरामसे आधीच 50 दिवस आहेत .

इतका महत्त्वाचा निर्णय इतक्या

एस
Wed, 11/09/2016 - 02:13 नवीन
इतका महत्त्वाचा निर्णय इतक्या तातडीने घेतला याचा अर्थ याची तयारी बऱ्याच आधीपासून सुरू होती. सर्व पोस्ट आणि बँक शाखांमध्ये पुरेशा प्रमाणात १०० वा कमी डिनॉमिनेशन च्या नोटांच्या स्वरूपात रोखता उपलब्ध करून देणे लॉजिस्टिकली अवघड नाही जाणार? सामान्य माणसांना नाही म्हटले तरी त्रास आहेच. माझ्याकडे आत्ता जी थोडी रोख रक्कम आहे ती पाचशेच्या नोटांमध्ये आहे. दोन दिवस तरी मला त्या नोटा बदलून मिळणार नाही. सर्वत्र कॅशलेस व्यवहार अजून प्रचलित नाहीत. तेव्हा आकस्मित आणि अत्यावश्यक खर्चाची तरतूद मी कशी करावी हे कृपया सांगावे.

नोटा बदलून देण्यात येणार

साहना
Wed, 11/09/2016 - 04:05 नवीन
नोटा बदलून देण्यात येणार नाहीत. फक्त ४००० रुपये पर्यंत बदलून मिळतील. त्यानंतर आपल्याला ते डिपॉझिट करून नंतर काढावे लागतील.
↩ प्रतिसाद: एस

हो.पण ते चार हजार घेण्यासाठी

अजया
Wed, 11/09/2016 - 08:35 नवीन
हो.पण ते चार हजार घेण्यासाठी अख्खे गाव बँकेत लाइन लावून उभे असणार आहे.कामधंदा बघावा की लाइन लावायला जावे हा प्रश्न आहेच.
↩ प्रतिसाद: साहना

चर्चा

स्वाती दिनेश
Wed, 11/09/2016 - 02:20 नवीन
वाचते आहे. स्वाती

ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात

आतिवास
Wed, 11/09/2016 - 08:15 नवीन
ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे, त्यांच्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही असं वाटतं. त्यांनी आधीच वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक केलेली असते. त्रास होणार तो मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि छोट्या उद्योजकांना. विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि माझ्याकडच्या पाचशेच्या दहा नोटा मात्र पॅन कार्डच्या पुराव्यानिशी सरकार जाणून घेतं - हा विनोद आहे. बरंच लिहिता येईल. पण असो.

उगाच!

साती
Wed, 11/09/2016 - 09:15 नवीन
उगाच टीकेसाठी टीका करता हां तुम्ही अतिवास! तुम्हाला ना आमच्या मोदीकाकांचं काही म्हंजे काही कौतुकच नाही! :) एक मल्ल्या सुटले तरी चालतील, हजारो छोटे उद्योजक अडकले पाहिजेत. त्या भरवशावरच परवा गरीब बिचार्‍या अंबानींना करात सवलत मिळाली.
↩ प्रतिसाद: आतिवास

अदानी र्‍हायले.

मोदक
Wed, 11/09/2016 - 14:05 नवीन
अदानी र्‍हायले.
↩ प्रतिसाद: साती

.

अन्नू
Fri, 11/11/2016 - 14:30 नवीन
एक मल्ल्या सुटले तरी चालतील, हजारो छोटे उद्योजक अडकले पाहिजेत. >>> =)) =)) =))
↩ प्रतिसाद: साती

>>विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि

कोकणी
Wed, 11/09/2016 - 11:30 नवीन
>>विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि माझ्याकडच्या पाचशेच्या दहा नोटा मात्र पॅन कार्डच्या पुराव्यानिशी सरकार जाणून घेतं - हा विनोद आहे.<< विजयभाउ सुटलेले वाटतात कारण ते देशाबाहेर आहेत. तुम्ही पण तिकडे जा, नोटा बदलायचा त्रास नाही. जर अधिक्रुत उत्पन्न असेल, तर ओळख द्यायला लाज कसली?
↩ प्रतिसाद: आतिवास

तरी म्हटलं अजून व्यक्तिगत

आतिवास
Wed, 11/09/2016 - 12:24 नवीन
तरी म्हटलं अजून व्यक्तिगत हल्ला कसा नाही झाला! ओके सरजी. आपल्या आदेशाचे पालन केले जाईल. :-)
↩ प्रतिसाद: कोकणी

जरासा त्रास झाला तरीही हाकाटी

सुबोध खरे
Fri, 11/11/2016 - 18:43 नवीन
जरासा त्रास झाला तरीही हाकाटी पिटायची कि श्री विजय मल्ल्याना कसं सोडलं? कायदेशीर प्रक्रिया असते ती पूर्ण न करता गोष्टी केल्या तर अंगलट येणायची शक्यता असते. थोडासा सुद्धा धीर धरण्याची लोकांची तयारी नाही हे पाहून कीव करावीशी वाटते http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/ed-seizes-vijay-mallyas-shares-worth-rs-1700-crore/articleshow/55368941.cms
↩ प्रतिसाद: आतिवास

इतके लिहित बसायचे नसते डॉक्टर

मोदक
Fri, 11/11/2016 - 18:57 नवीन
इतके लिहित बसायचे नसते डॉक्टर.. मत व्यक्त करायचे आणि त्यावर प्रतिसाद आले की फक्त स्मायली टाकायची व सोडून द्यायचे.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

=)) =)) =))

अन्नू
Fri, 11/11/2016 - 19:04 नवीन
आजकाल मिपावर त्या (पहिल्याच्या) स्माईलीपण दिसत नाहित. कि त्याच्यावर पण सर्जिकल स्ट्राईक झालाय ;)
↩ प्रतिसाद: मोदक

आपल्या पाचशेच्या नोटा आपल्या

सुबोध खरे
Wed, 11/09/2016 - 12:30 नवीन
आपल्या पाचशेच्या नोटा आपल्या स्वतःच्या खात्यात भरण्यासाठी कोणतेही पॅन कार्ड आधार याची गरज नाही.
↩ प्रतिसाद: आतिवास

फक्त के वाय सी नॉर्मस् पूर्ण

शाम भागवत
Wed, 11/09/2016 - 12:48 नवीन
फक्त के वाय सी नॉर्मस् पूर्ण केलेले असले पाहिजेत.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कारण ती माहिती बँक खात्याशी

आतिवास
Wed, 11/09/2016 - 12:50 नवीन
कारण ती माहिती बँक खात्याशी आधीच जोडली गेली आहे.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सहमत. पण मग सरकारने सुरूवात

मोदक
Wed, 11/09/2016 - 13:13 नवीन
सहमत. पण मग सरकारने सुरूवात नक्की कशी करणे अपेक्षित आहे..?
↩ प्रतिसाद: आतिवास

केवायसीबद्दल (अपडेट दर दोन

आतिवास
Wed, 11/09/2016 - 17:10 नवीन
केवायसीबद्दल (अपडेट दर दोन वर्षांनी करावा लागतो आणि ऑनलाईन करता येत नाही एवढं सोडलं तर) काही तक्रार नाही. केवायसी नसेल किंवा अद्ययावत नसेल तर पॅन /आधार लागेल - इतकंच म्हणायचं होतं.
↩ प्रतिसाद: मोदक

विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि

मोदक
Wed, 11/09/2016 - 18:19 नवीन
विजयभाऊ मल्ल्या सुटतात आणि माझ्याकडच्या पाचशेच्या दहा नोटा मात्र पॅन कार्डच्या पुराव्यानिशी सरकार जाणून घेतं - हा विनोद आहे. यात काय विनोद आहे..? विजय मल्ल्याला परत आणण्याची प्रोसेस सुरू झाली आहे आणि नोटांना चलनातून हद्दपार करणे आर्थिक संरचनेमधला बदल आहे. या दोन्ही गोष्टी (आणि अशा अनेक गोष्टी) समांतररीत्या सुरू आहेत. एक संपवून मगच दुसरी सुरू करावी असे आपले मत आहे का..? किंवा विजय मल्ल्याला परत आणा, मग, राजा आहे, मग १९८४ च्या हत्याकांडाचे निकाल लावा, मग बाबरी मशीद, दाऊद, मग या सगळ्या क्रमाने जेंव्हा कधी पैशाची गोष्ट येईल तेंव्हा चलने बदला असे काही..?
↩ प्रतिसाद: आतिवास

:-)

आतिवास
Wed, 11/09/2016 - 18:34 नवीन
:-)
↩ प्रतिसाद: मोदक

अपेक्षित प्रतिसाद. असो. :-)

मोदक
Wed, 11/09/2016 - 18:49 नवीन
अपेक्षित प्रतिसाद. असो. :-)
↩ प्रतिसाद: आतिवास

तुम्ही उत्तर द्यावे हि विनंती

अर्धवटराव
Fri, 11/11/2016 - 20:57 नवीन
नेमका विनोद काय झाला हे मलाही कळलं नाहि. मिपावर लॉजीकल प्रतिसादांची आब राखुन असणार्‍या व्यक्तींपैकी आपण एक आहात. त्या प्रतिमेला तडा जातोय. (तरिही आम्हि आपले पंखे असुच).
↩ प्रतिसाद: आतिवास

अर्धवटराव, हा प्रतिसाद मला

मोदक
Sun, 11/13/2016 - 08:17 नवीन
अर्धवटराव, हा प्रतिसाद मला उद्देशून आहे का?
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र....

अर्धवटराव
Sun, 11/13/2016 - 13:27 नवीन
प्रतिसाद अतिवास मॅडमसाठी होता. नोटा गायबल्याचा परिणाम हो.
↩ प्रतिसाद: मोदक

प्रश्न

विकास
गुरुवार, 11/10/2016 - 00:18 नवीन
हा खरच प्रश्न आहे.. कृपया गैरसमज नको.. आपल्या पाचशेच्या नोटा आपल्या स्वतःच्या खात्यात भरण्यासाठी कोणतेही पॅन कार्ड आधार याची गरज नाही. म्हणजे नक्की कसे करायचे? (कसे समजणार की कुणाचे पैसे आहेत ते?) कारण या वाक्याचा अर्थ असा होतो की दुसर्‍याच्या खात्यात आपले पैसे भरायला अथवा आपल्या खात्यात दुसर्‍यांचे पैसे भरायला पॅनकार्ड लागणार का?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

स्वतःच्या खात्यात नकद पैसे

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/10/2016 - 14:38 नवीन
स्वतःच्या खात्यात नकद पैसे टाकायला स्वतःच्या फोटो-ओळखपत्राची गरज आहे. दुसर्‍याच्या खात्यात नकद पैसे टाकायला, "तशी परवानगी दिल्याचे व पैसे जमा करणार्‍याचे नाव असलेले" खातेधारकाचे पत्र जरूर आहे. पैसे जमा करणार्‍याने आपले फोटो-ओळखपत्र बरोबर नेणे जरूर आहे. हे नियम केवळ या योजनेसाठी नाहीत... स्थायी नियम आहेत.
↩ प्रतिसाद: विकास

कोणकोणते फोटो-ओळखपत्र मान्य

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/10/2016 - 14:40 नवीन
कोणकोणते फोटो-ओळखपत्र मान्य आहे ते पाहण्यासाठी याच लेखावरील इतरत्र दिलेल्या पैसे बदलण्याच्या फॉर्मवर दिलेली यादी पहावी.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

असा प्रयत्न

चौकटराजा
Wed, 11/09/2016 - 08:25 नवीन
नोटा बदलण्याचा प्रयोग माझ्या माहितीप्रमाणे श्रीलंका या देशात झाला होता. त्यावेळी तेथील बँका तीन दिवस बम्द होत्या. आपल्या खंडप्राय देशात हे शक्य नाही असा मतप्रवाह होता. व त्याला आपल्या खरे म्हणजे आपल्या कडे त्यावेळेस तसे करणे निरनिराळी कार्ड नसल्याने शक्य नव्हते. रस्त्यात मोठा दुभाजक आणला की वहातुकीत नैसर्गिक अशी शिस्त तयार होते त्यासाठी रत्यावर वहाने नीट हाका अशा पाट्या लावून काही साधत नाही .याचे पुरेपुर भान मोदी सरकारला आहे. त्यामूळे श्रीमंत वा गरीब दोन्ही स्तरांवर भ्रष्ट लोकाना नागवे करायचे असेल तर त्याना बॅकेशी संलग्न करणे हा कॉमन सेन्स ही मनमोहन सिम्ग यानी वापरला नाही. मोदींच्या या हल्ल्याने बर्‍याचे स्तारावरचे लोक अस्वस्थ होणार आहेत. त्यात व्यावसायिक फार मोठ्या प्रमाणात अडकणार आहेत. नोकरदार वर्ग फारसा कर बुडवीत नाही ( तो अगदीच बुडवीत नाही असे नाही). हळू हळू सर्व प्रकारच्या व्यवहाराना बॅन्काच्या कक्षेत आणले जाईल पण त्यासाठी भारत देशावर कॉंग्रेस संस्कृतीचे राज्य येता कामा नये हा यातील राजकीय मतितार्थ आहे. एकाने सिस्टेमिक बदल हवे आहेत असे म्हटले आहे पण दोन हजारावरील सर्व व्यवहार सक्तीने चेकद्वारे करणे हे बोकिल यानी सुचविलेले पाउल आल्यास देशाचा पुरता नजारा बदलून जाईल. वडा पाव विकणारा देखील आयकराच्या पंखाखाली आलेला दिसेल कदाचित .

वडा पाव विकणारा देखील

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/09/2016 - 09:50 नवीन
वडा पाव विकणारा देखील आयकराच्या पंखाखाली आलेला दिसेल कदाचित . काळा पैसा डिक्लेअर करायच्या योजने दरम्यान आयकर विभागाने मुंबईमध्ये रस्त्यावरच्या डोसा, वडेवाल्यांवर धाडी घालून एकेकाकडून १-१ कोटीची कॅश जप्त केली होती.
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बरोबर

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 11/09/2016 - 12:58 नवीन
मुळात काळ्या पैशाऐवजी, जे २७% पॅरॅलल ईकॉनॉमी आहे, तीवर बराच आळा पडेल.
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

आयकराच्या दृष्टीने एकदा आवक

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/11/2016 - 23:10 नवीन
आयकराच्या दृष्टीने एकदा आवक वैध स्त्रोतातून आलेली असली की, "ती करपात्र आहे का ?", "तिच्यावर किती कर बसेल ?" आणि "तो कर योग्य मुदतीत भरला आहे की नाही ?" हे प्रश्न महत्वाचे असतात. तेथे स्त्रोताचा प्रकार (उदा. वडापावचा धंदा की तेलशुद्धीकरणाचा) गैरलागू असतो. आवक अवैध स्त्रोतातून आलेली असली तर तो गुन्हा असतो व त्याची पडताळणी वेगळ्या पद्धतीने होते. विकसित देशांत छोटे व मध्यम आकाराच्या व्यवसायधंद्यांचा वित्तव्यवस्थेत, करव्यवस्थेत व एकंदर अर्थप्रणालीत मोठा सहभाग असतो. भारतात तो कमी असला तरी लक्षणीय आहे. आपल्याकडे पैश्यांच्या व्यवहारांत बॅकेचा उपयोग अटळ झाल्यावर त्याची खरी व्याप्ती ध्यानात येईल.
↩ प्रतिसाद: चौकटराजा

जे लोक हजारो, लाखो कोटींचे

अभिजीत अवलिया
Wed, 11/09/2016 - 08:27 नवीन
जे लोक हजारो, लाखो कोटींचे घपले करतात (उदा. सध्या जेलची हवा खात असलेले आर्मस्ट्रॉंग साहेब) ते सगळा काळा पैसा नोटांच्या स्वरूपात साठवून ठेवण्या एवढे मूर्ख नाहीत. त्यांचा बराचसा पैसा हा जमीन, शेती, शहरातील मोक्याच्या ठिकाणचे भूखंड, फ्लॅट्स, बंगले, देश विदेशात स्थापन केलेल्या बनावट कंपन्या आणि त्याचे भाग भांडवल, शेअर मार्केट, सोने अशा ठिकाणी अगोदरच गुंतलेला आहे. काही लाख किंवा कोटीचे घपले करणारे सरकारी अधिकारी फार फार तर थोडे अडचणीत सापडतील. पण देशातील एकूण काळ्या पैशाचा विचार करता ह्या सरकारी अधिकाऱ्यांकडे असलेली रक्कम ही तशी किरकोळ असेल. एकूणच ह्या निर्णयाने सोशल मीडियावर जेवढी 'हवा' निर्माण झाली आहे की आता जणू काही सर्व काळा पैसा बाहेर पडलाच तसे काहीही होणार नाहीये. तसेच 500/2000 च्या नव्या नोटा चलनात आणण्याचे कारण समजले नाही. 100 ची नोट ही देशातील जास्तीत जास्त मोठी न असायला हवी होती. असो पण ह्या निर्णयाने जो काही नगण्य का असेना काळा पैसा नष्ट होईल त्याचे समाधान म्हणून ह्या निर्णयाचे स्वागत.

असा

नाखु
Wed, 11/09/2016 - 08:59 नवीन
बेहिशोबी व ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असलेल्यांना आता बेनामी संपत्ती (जमीन-शेती-बंगले-बनावट कंपन्यात) ठेवता येणार नाही. प्र्त्येक ठिकाणी पॅनकार्ड आणि ओळ्ख (आधारकार्ड ) अनिवार्य असल्याने मोठ्ठी गोची होणार. बदल हे हळू हळू होतात.देशातून देवीचा रोग्,पोलिओ जायला किमान ४०-५० वर्षे लागली ही कीड कमी करायला किमान ५-१० वर्षे (मोदींच्या दोन पंचवार्षीक खेळ्या) तर नक्कीच लागतील. बड्या धेंडावर सक्त वसुली संचनालय आणि आयकर दोघेही लक्ष ठेऊन आहेत्च अगदी लग्न समारंभांवरही.फक्त सगळे कायम जनतेला जाहीर आणि खुले केले जात नाही. सच्च्या आणि कर्तव्यदक्ष अधिकार्यांनाही हुरुप आणि धाडस येतच असेल ना अश्या निर्णयांनी. मुढेंच्या पाठीशी ठाम राहिले फडणवीस तसेच या काही सक्तवसुली संचाल्कांच्या पाठीशी मोदी ठाम पणे उभे आहेत. परिणामांसाठी थोडा धीर धरायला काय हरकत आहे?
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

>>>>परिणामांसाठी थोडा धीर

मोदक
Wed, 11/09/2016 - 09:13 नवीन
>>>>परिणामांसाठी थोडा धीर धरायला काय हरकत आहे? १००% सहमत.
↩ प्रतिसाद: नाखु

नक्कीच सहमत

पाटीलभाऊ
Wed, 11/09/2016 - 18:09 नवीन
परिणामांसाठी थोडा धीर धरायला काय हरकत आहे?
+१११
↩ प्रतिसाद: नाखु

+१००

सस्नेह
Wed, 11/09/2016 - 11:20 नवीन
अभिजित अवलिया. ब्लॅकवाले नोटा बाळगत नाहीत, त्याऐवजी स्थावर मालमत्ता शेअर्स, सोने, परकीय चलन / परकीय बॅंकातून गुंतवणूक याचे प्रमाण जादा आहे. सो या निर्णयाने सुमारे 25 टक्के इतकाच काळा पैसा बाद होईल. भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी यांचे फारसे काही बिघडणार नाही. तरीही या धाडसी निर्णयाने त्यांना जरब नक्कीच बसेल.
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा