✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307095 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

लोकसत्तामधील विनोदी बातमी

अगम्य
Wed, 11/09/2016 - 02:10 नवीन
हे कोणाच्या तरी डोक्यातून निघालेले fiction दिसतेय.
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

अ फ वा

विकास
गुरुवार, 11/10/2016 - 00:10 नवीन
व्हॉट्सअ‍ॅप वर फिरणारा संदेश बातमी म्हणून दिलेला दिसतोय. पण वास्तव खालील बातमीत कळू शकेल... Arun Jaitley dispels rumours of 'GPS chip' in Rs 2,000 note
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

और ये लगा सिक्सर

रामपुरी
Wed, 11/09/2016 - 00:00 नवीन
आता जो याला विरोध करेल त्याला "चोर की दाढी मे तिनका" न्याय लागू होइल - आणखी एक बूच मस्त... मान गये मोदीजी

आज निर्णय आवडला

वरुण मोहिते
Wed, 11/09/2016 - 00:02 नवीन
अनेक वर्ष हा निर्णय पेंडिंग होता. आणि हो मोरारजी आणि इंदिरा गांधीजींने पण हा निर्णय घेतला होता पण त्यावेळी कोण हजार च्या नोटा ठेवणार खिशात तो त्यामुळे त्यावेळी कालबाह्य ठरला . बाकी उद्या यु. एस निकाल आणि आज हा निर्णय हा पण खचित योगायोग नाही. मत नंतर नोंदवता येईल . पण सध्यातरी निर्णयाचं स्वागत आहे

वरिल विडिओ लेखात टाकता आला तर

संदीप डांगे
Wed, 11/09/2016 - 00:10 नवीन
वरिल विडिओ लेखात टाकता आला तर बघा संपादक, अर्थात लेखकाची परवानगी असेल तर.

माझी काही हरकत नाही

ट्रेड मार्क
Wed, 11/09/2016 - 00:30 नवीन
मला ऑफिसमध्ये व्हिडीओ दिसत नाही. पण डांगेअण्णा विषयाला सोडून काही टाकतील असं वाटत नाही त्यामुळे चालेल.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

पंतप्रधान नोटांबद्दल जी

संदीप डांगे
Wed, 11/09/2016 - 00:33 नवीन
पंतप्रधान नोटांबद्दल जी अधिकृत घोषणा करत आहेत तो व्हिडीओ आहे, अतिशय सुंदर भाषण/निवेदन/घोषणा आहे
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

मग नक्कीच टाकायला पाहिजे

ट्रेड मार्क
Wed, 11/09/2016 - 00:43 नवीन
संपादक मंडळ कृपया लेखामध्ये हा व्हिडीओ टाका.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अजून एक महत्वाचा व्हिडीओ

शब्दबम्बाळ
Wed, 11/09/2016 - 04:33 नवीन
RBI चे अधिकृत स्पष्टीकरण मला व्हिडिओ शेअर कसा करायचा माहित नाही त्यामुळे लिंक देतोय. काही ठळक मुद्दे: 1. सामान्य नागरिकांनी भूलथापांना बळी न पडता कोणालाही आपले पैसे बँकेतून बदलून घ्यायला देऊ नयेत. पैसे बदलून घ्यायला येणाऱ्या प्रत्येक माणसाची ओळख पटवून मगच पैसे दिले जाणार आहेत त्यामुळे काळा पैसे असेल तर पकडला जाऊ शकतो. पण अधिकृत रक्कम असेल तर मात्र काळजी करायचे कारण नाही. 2. बँकेमध्ये कॅमेऱ्याने सगळी प्रोसेस पहिली जाणार आहे त्यामुळे गैर प्रकार करणारे लोक पकडले जातील. 3. 24 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 4000 रुपये आणि आठवड्यात जास्तीत जास्त 20,000 रुपये बदलून घेऊ शकता. या तारखे नंतर RBI परिस्थितीचा अंदाज घेऊन मग पुढचे धोरण ठरवेल. 4. पण तुम्ही "कितीही रकमेच्या 500 किंवा 1000 च्या नोटा तुमच्या अकाउंट मध्ये भरू (deposit ) करू शकता. त्यावर कोणतेही बंधन नाही!" परंतु एका ठराविक रकमेच्या वरचे व्यवहार FIU (Financial Intelligence Unit ) किंवा इनकम टॅक्स विभागाशी शेअर केले जातील आणि ते यावर लक्ष ठेवतील. त्यामुळे जास्ती रकमेचे व्यवहार करताना बँकदेखील काळजीपूर्वकच करतील. 5. RBI ने नोटा छापताना 2000 च्या जास्त नोटा छापल्या आहे जेणे करून 500 आणि 1000 च्या नोटा बदलून देण्यासाठी होणाऱ्या रकमेसाठी 2000 रुपयाच्या कमी नोटा लागतील. त्यामुळे छपाईचा खर्च वाचेल. 6. सध्या बाजारात 500 च्या -- 16.5 बिलियन नोटा आहेत (नंबर ऑफ पिसेस) 1000 च्या -- 6.7 बिलियन नोटा आहेत (नंबर ऑफ पिसेस) 7. या नवीन नोटा "महात्मा गांधी न्यू सिरीज" या नावाने पब्लिश केल्या आहेत. तसेच ब्रेल लिपीमध्ये नोटेचे मूल्य नोटेवर नोंदलेले आहे. 8. सिक्युरिटी फीचर्स मात्र सांगायचे शिताफीने टाळण्यात आले त्यामुळे GPS चा प्रश्न अर्धवट राहिला. तसेच काही दिवसांपूर्वी 2000 रुपयाच्या नोटेचा फोटो फेसबुक वगैरे वर फिरत होता त्यामुळे काही लोकांना आजच्या घटनेची आधीच माहिती मिळाली असेल का? या प्रश्नाचे जास्त समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाही. (चौकशी करण्यात येईल यापलीकडे )
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बिलियन?

निल्या१
Wed, 11/09/2016 - 21:32 नवीन
बिलियन आता ही गणन पद्धति मान्य झाली का भारतात? मरठीत लिहिता वाचणारे मराठी विषय रुपयांचा मग गणन बिलियन मध्ये कशाला?
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

बरोबर आहे हा! तुमचे मत आर.

शब्दबम्बाळ
गुरुवार, 11/10/2016 - 15:20 नवीन
बरोबर आहे हा! तुमचे मत आर. गांधी (डेप्युटी गव्हर्नर RBI ) यांना कळवा बघू... त्यांचेच वाक्य आहे हे...
↩ प्रतिसाद: निल्या१

एक प्रश्न आहे

ट्रेड मार्क
Wed, 11/09/2016 - 00:53 नवीन
अनिवासी भारतीयांकडे बहुतांशी थोड्याफार ५०० आणि १००० च्या नोटा असतात. ज्या भारतात गेल्यावर लगेच लागणाऱ्या गोष्टींसाठी, म्हणजे विमानतळावरून बाहेर पडल्यावर टॅक्सी वगैरेसाठी ठेवलेल्या असतात. तर अश्या नोटांचे काय करणार? प्रत्येकाकडे असे पैसे फारतर ४०००-५००० च्या आसपास असू शकतात. पण अनिवासी भारतीयांची संख्या बघता एकूण बरीच रक्कम असेल. हा काळा पैसा नाहीये पण त्या नोटा भारताबाहेर बदलून कश्या मिळणार? IATA च्या वेबसाईटवर लिहिलंय की भारतीय चलन बाहेरून येताना भारतात आणता येत नाही. याबद्दल कोणाला काही अधिक माहिती आहे का? काही उपाय आहे का?

मार्च 2017 पर्यंत वेळ दिलेला

शब्दबम्बाळ
Wed, 11/09/2016 - 00:56 नवीन
मार्च 2017 पर्यंत वेळ दिलेला आहे. त्या कालावधी पर्यंत जर कोणी भारतात येणार असतील तर बदलून घेता येऊ शकतील.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हो का? अरे वा! बरं झालं.

रेवती
Wed, 11/09/2016 - 01:01 नवीन
हो का? अरे वा! बरं झालं.
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

IATA ने सांगितल्याप्रमाणे

ट्रेड मार्क
Wed, 11/09/2016 - 01:09 नवीन
बाहेरून भारतात येताना भारतीय चलन आणणे कायद्याच्या विरुद्ध आहे. खाली वाचा Currency rules Currency Import regulations: Foreign currencies : unlimited. However, amounts exceeding USD 5,000.- (or equivalent) in cash, or USD 10,000.- (or equivalent) in traveler's cheques must be declared; Local currency (Indian Rupee-INR): Import of INR is prohibited, except for residents of India importing up to INR 7,500.-. Foreign currencies include currency notes, traveler's cheques, cheques, drafts etc. (Re)exchange only through banks and authorized money exchange points.
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

पंतप्रधानांनी

शब्दबम्बाळ
Wed, 11/09/2016 - 03:21 नवीन
पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे, बाहेरच्या देशात प्रवासाला जाणाऱ्यांसाठी किंवा बाहेरच्या देशात असणाऱ्या भारतीय प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5000 रुपयांपर्यंतच्या नोट बदलून नवीन नोट मिळण्याची सोया करून देण्यात येणार आहे. पण लिमिट 5000 रुपये इतकेच आहे...
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हि सरकारी दिवाळखोरी मला

साहना
Wed, 11/09/2016 - 03:27 नवीन
हि सरकारी दिवाळखोरी मला अजिबात समजत नाही. हि ५००० रुपये लिमिट कशा साठी ठेवले आहे ? जखमेवर मीठ लावण्यासाठी का ?
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

5000 रुपयांपेक्षा जास्त

शब्दबम्बाळ
Wed, 11/09/2016 - 03:32 नवीन
5000 रुपयांपेक्षा जास्त भारतीय चलन भारताबाहेर घेऊन जायला कायदेशीर परवानगी नाहीये. त्यामुळे हा निर्णय त्या नियमानुसार योग्यच आहे...
↩ प्रतिसाद: साहना

आजकाल लाखभर डॉलर्स वैध

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/09/2016 - 22:39 नवीन
आजकाल लाखभर डॉलर्स वैध मार्गांनी सहज मिळत असताना रु७५०० पेक्षा जास्त भारतिय चलन बाहेर न्यायची गरजच काय ? याशिवाय, चलनाची तस्करी रोखण्यासाठी सर्व देशांमध्ये चलन आत-बाहेर नेण्यावर अश्या प्रकारची बंधने आहेत.
↩ प्रतिसाद: साहना

पण १००० आणि ५०० गांधी सध्या

साहना
Sat, 11/12/2016 - 08:47 नवीन
पण १००० आणि ५०० गांधी सध्या लीगल टेंडर नसल्याने त्याला चलन म्हणता येणार नाही !
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

NRIs (forwarded as received)

मंदारपुरोहित
Wed, 11/09/2016 - 02:58 नवीन
NRI could deposit indian currency in local SBI at their country supporting with passport copy (or) can be changed at RBI with declaration as tourist. Or can change at airports. Timelimit till 31 Mar 2017
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

याबद्दल खात्रीशीर माहितीचा

सही रे सई
Wed, 11/09/2016 - 21:29 नवीन
याबद्दल खात्रीशीर माहितीचा दुवा मिळू शकेल का?
↩ प्रतिसाद: मंदारपुरोहित

किमान कॅलिफोर्निया मधील SBI

साहना
Sat, 11/12/2016 - 08:48 नवीन
किमान कॅलिफोर्निया मधील SBI पैसे घेत नाही.
↩ प्रतिसाद: सही रे सई

याचा यू टर्न कधी येणारे?

आनंदी गोपाळ
Wed, 11/09/2016 - 00:56 नवीन
याचा यू टर्न कधी येणारे? मार्केटात कानोसा घेतल्यावर फारसं पॅनिक ऐकू आलं नाही. सीए, बँकवाले कूल होते. बँकांना कोणतेही निर्देश अजूनही नाहियेत. उद्या पोस्ट केलेल्या ऑपरेशनांना मी नाही सांगणार आहे. :)

उद्या पोस्ट केलेल्या ऑपरेशनांना मी नाही सांगणार आहे

शब्दबम्बाळ
Wed, 11/09/2016 - 01:00 नवीन
असं का बरे?
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

शंभर रुपयांत पैसे दिलेत तरच

आनंदी गोपाळ
Wed, 11/09/2016 - 01:03 नवीन
शंभर रुपयांत पैसे दिलेत तरच करीन. मी वैद्यकातून उपजीवीका करतो. उद्या पोस्ट केलेले "इमर्जन्सी" नाहीत.
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

ता.क.

आनंदी गोपाळ
Wed, 11/09/2016 - 01:04 नवीन
इमर्जन्सी/लाइफसेव्हिंग आत्ताच केले जातात
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

=))

असंका
गुरुवार, 11/10/2016 - 10:37 नवीन
=))
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

डॉक्टरांकडे कॅशलेस व्यवहार

शब्दबम्बाळ
Wed, 11/09/2016 - 01:27 नवीन
डॉक्टरांकडे कॅशलेस व्यवहार चालत नाहीत का? हि यंत्रणा असली तर गोष्टी सोप्या होतील ना!
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

यावरून आठवलं... शक्यतो

शब्दबम्बाळ
Wed, 11/09/2016 - 01:38 नवीन
यावरून आठवलं... शक्यतो ज्यांचा छोटा दवाखाना असतो असे डॉक्टर कधी तपासायला गेल्यावर बिल देत नाहीत. त्यांचे 100 रुपये वगैरे चार्जेस असतात आणि मग ते गोळ्या लिहून देतात तेव्हढा एकच कागद मिळतो. मग हे पैसे कुठे मॉनिटर होतात? आणि मग अशा डॉक्टरांकडे देखील सरकारी हिशोबात न आलेले पैसे असू शकतात का? अर्थात ते हुशार असल्या कारणाने गुंतवत असतील म्हणा कुठेतरी, पण असाच प्रश्न पडला...
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

उद्या त्या डॉक्टरने 500 ची

मोदक
Wed, 11/09/2016 - 01:59 नवीन
उद्या त्या डॉक्टरने 500 ची नोट घेतली नाही किंवा उपचार केले नाहीत की समजून जा =))
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

>>>>उद्या पोस्ट केलेल्या

मोदक
Wed, 11/09/2016 - 01:03 नवीन
>>>>उद्या पोस्ट केलेल्या ऑपरेशनांना मी नाही सांगणार आहे :) हे विनोदाने लिहिले असले तरी पटले नाही.
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

तुम्हाला पटावे म्हणून

आनंदी गोपाळ
Wed, 11/09/2016 - 01:16 नवीन
तुम्हाला पटावे म्हणून लिहिलेले नाही.
↩ प्रतिसाद: मोदक

गोपाळराव

सुबोध खरे
Wed, 11/09/2016 - 01:23 नवीन
गोपाळराव आपण कितीही पैसे आपल्या खात्यात भरु शकता.जुन्या नोटा असतील तरीही 31 डिसेंबर पर्यंत. पण ते पैसे तिजोरीत जाणार असतील तर 31 डिसेंबर नंतर त्याची किंमत 0. मी हा प्रश्न माझ्या कर सल्लागाराला आणि आयकर आयुक्त मित्राला विचारुन घेतला आहे. माझ्या कडे येणाऱ्या रुग्णानी कोणत्याही नोटा दिल्यास त्या मी घेणार आहे. चिंता नाही.
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

+१...

असंका
गुरुवार, 11/10/2016 - 10:39 नवीन
+१... पण आता नाही त्यांची इच्छा तर राहू द्या ना.... हे सगळं त्यांना माहित नाही असं थोडंच आहे!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एवढ्या मोठ्या निर्णयाचा

पिलीयन रायडर
Wed, 11/09/2016 - 01:13 नवीन
एवढ्या मोठ्या निर्णयाचा युटर्न येईल असं वाटत नाही. सगळे लोक उद्या जाऊन नोटा बदलणार, बँका २ दिवस बंद आहेत. पुष्कळ यंत्रणा कामाला लागली आहे. निर्णय का रद्द होइल?
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

तू चष्मा घातलेला आहेस का?

मोदक
Wed, 11/09/2016 - 01:20 नवीन
तू चष्मा घातलेला आहेस का? नाही. म्हणून तू लॉजिकल विचार करू शकतेस. चष्मे घातले असले की असे काहीतरी लॉजिक सोडून बोलावे लागते
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मोदक सुबोध बघ.

आनंदी गोपाळ
Wed, 11/09/2016 - 01:31 नवीन
मोदक सुबोध बघ. सुबोध, चष्मा बघ. ;) आपण कमळ बघू. सोनोग्राफी चार्जेस, व सर्जिकल चार्जेस, माझ्या सीए ने व्यवहार बंद सांगितले आहेत.
↩ प्रतिसाद: मोदक

चेक आणि बँकेचे व्यवहार

मोदक
Wed, 11/09/2016 - 01:35 नवीन
चेक आणि बँकेचे व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत डॉक्टर, 100% पांढरे व्यवहार करणाऱ्यांना काहीही फरक पडणार नाहीये. (आणि रोजच्या दिनक्रमात बदल करायची गरज भासणार नाही) असो, आपण सुज्ञ आहातच
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

+100

सुबोध खरे
Wed, 11/09/2016 - 01:37 नवीन
+100
↩ प्रतिसाद: मोदक

हसू का?

आनंदी गोपाळ
Wed, 11/09/2016 - 01:39 नवीन
हसू का?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आपल्या सीए आणि माझ्या सीए

सुबोध खरे
Wed, 11/09/2016 - 01:46 नवीन
आपल्या सीए आणि माझ्या सीए च्या सल्ल्यातील फरक लक्षात घ्या आणिमग ठरवा.
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

हसू नका , चांगल्या CA चा

वगिश
Wed, 11/09/2016 - 08:36 नवीन
हसू नका , चांगल्या CA चा सल्ला घ्या .
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

लहान

नाखु
Wed, 11/09/2016 - 08:47 नवीन
असताना वाचलेली म्हण आठवली. "खाई त्याला खवखवे"

"खरे" असलेल्या डॉकनी घाबरण्याचे कारण नाही वरील सच्च्या डॉकनी सांगीतले आहेच.

शिलकीतला हातखर्ची नाखु
↩ प्रतिसाद: वगिश

"खरे" असलेल्या डॉकनी

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/09/2016 - 09:45 नवीन
"खरे" असलेल्या डॉकनी घाबरण्याचे कारण नाही वरील सच्च्या डॉकनी सांगीतले आहेच. झक्कास.
↩ प्रतिसाद: नाखु

व्यवहार का बंद? तुम्हीच

पिलीयन रायडर
Wed, 11/09/2016 - 01:59 नवीन
व्यवहार का बंद? तुम्हीच म्हणालात ना..
मार्केटात कानोसा घेतल्यावर फारसं पॅनिक ऐकू आलं नाही. सीए, बँकवाले कूल होते
मग अगदी निर्देशही ३१ डिसेंबर पर्यंत पैसे परत देऊ शकता असे असतील तर सगळं बंदच करण्याचे कारण कळाले नाही. तुम्ही १००च्या नोटा / चेक / कार्ड / नेटबँकींग वगैरे थ्रु पण पैसे घेऊच शकता ना? माझा गोंधळ उडतोय की नक्की तुमचा आक्षेप काय आहे? तुम्हाला काय नाही पटलं ह्या निर्णयातलं?
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

नॉन मेट्रोमधे कॅशलेस फार कमी होते.

आनंदी गोपाळ
Wed, 11/09/2016 - 04:37 नवीन
आक्षेप काहीच नाही. माझ्याकडे मोठी ट्रँजॅक्शन्स असतात. त्यासाठी बँकेचे दरवाजे झिजवायची माझी इच्छा नाही. http://www.misalpav.com/comment/897289#comment-897289 हे आधीच म्हटलो आहे.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हजारवर रकमेचे चेक घेता येतील

अजया
Wed, 11/09/2016 - 07:11 नवीन
हजारवर रकमेचे चेक घेता येतील की.कॅश डिपाॅझिटची कटकट पण नको.व्यवहार का बंद ठेवायचे?बँक डिटेल्स देऊन आॅनलाइन पैसे घेता येतील.
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अधिक्रुत फी घेत असाल तर DD

कोकणी
Wed, 11/09/2016 - 11:25 नवीन
अधिक्रुत फी घेत असाल तर DD स्वरुपातही घेउ शकता, account payee. रोख रक्कम बाळगायची कट्कट नाही.
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

नवीन सिक्युरिटी आणि

मोदक
Wed, 11/09/2016 - 01:30 नवीन
नवीन सिक्युरिटी आणि डिझाईनच्या 500 च्या नोटा पुढील एक दोन वर्षात पुन्हा बाजारात येण्याची अंधुक शक्यता आहे, त्यावेळी यु टर्न ची हाकाटी होईलच.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा