Skip to main content

मी आज केलेला व्यायाम...!!

लेखक मोदक यांनी बुधवार, 02/11/2016 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 112732
प्रतिक्रिया 496

प्रतिक्रिया

चांगली उपयुक्त चर्चा सुरू आहे. बरीच माहिती मिळत आहे. जुन पासुन मी जिम जॉईन केले आहे. अधेमधे दाण्ड्या मारतो, पण सुरुवात तर झालिये व तब्येतीत, मानसिक स्थितीत फरकही पडलाय.

आज एक तास ब्याडमिंटन खेळलो. -दिलीप बिरुटे

विन्डोज फोनसाठी कोणते चांगले अँप आहे का ? मी runners+ आणि runtastic हे अँप वापरून पहिले...त्यातल्यात्यात runtastic हे जरा चांगले वाटले. पण कधी कधी अँप बंद पडणं, जीपीएसने नीट ट्रॅक न होणं अथवा चुकीचा मार्ग दाखवणं असे प्रॉब्लेम्स उद्भवतात.

In reply to by पाटीलभाऊ

विंडोजला मायक्रोसॉफ्ट हेल्थ अँड फिटनेस चांगलं चालतं त्याशिवाय जीपीएस ट्रॅकर असं काहीतरी एक अ‍ॅप आहे तेही ठीक. रनटॅस्टिक चुकीचा मॅप देतं. हेल्थ अँड फिटनेस बेस्ट.

In reply to by वेल्लाभट

विंडोज दुकानात शोधलं..पण नाही सापडलं. :( तेव्हा आंतरजालावरून समजलं कि मायक्रोसॉफ्टने हेल्थ अँड फिटनेस हे अँप बंद केलंय.
The MSN Health & Fitness app on Windows, iOS and Android devices will be discontinued on November 1, 2015.

साधारण २२ ते २४ किमी सायकलिंग. अंदाज अश्याकरता की स्ट्रावा किंवा जिपिएस गंडल्यामुळे ट्रिप रेकॉर्ड झाली नाहि देश

मी आऊटडोअर रानिंगसाठी MapMyRun हे अँप वापरतो.. उत्तम चालते..

आजचा व्यायाम : आज लेग्स डे .. क्रॉस जॉगर : ३० मिनिटे लेग प्रेस , लेग एक्सटेंशन , लेग कर्ल & काफ : ३ सेट squatts & lunges : ३ सेट्स स्ट्रेचिंग

धागा चांगला चालु आहे. मीही थोडाफार व्यायाम चालु केला आहे जरा अ‍ॅपविषयी व फिटनेस बँड विषयी कोणीतरी चांगले मार्गदर्शन केले तर बरे होईल!!

फिटनेस ट्रॅकर / बँड्स बद्दल थोडेसे : नुकताच आमच्या ऑफिसमध्ये घडलेला किस्सा : आमचा एक अॅपल प्रेमी मित्र आपले नवे अॅपल वॉच दाखवत म्हणाला .. बघ मी रोज १०००० स्टेप्स चालतो !!! (खर तर हे वाक्य "मी रोज "अॅपल वॉच" हातात घालून १०००० स्टेप्स चालतो" असा वाचावं ).. त्याच्याकडे (वॉचसकट ) दुर्लक्ष करून माझा प्रतिप्रश्न : ते ठीक आहे पण व्यायाम काय करतोस? माझ्या या प्रश्नावर विचित्र चेहरा करून तो निघून गेला... दोन दिवस जरा चिडचिड करून परत ओ के झाला.. हे सर्व फिटेनास बँड्स हे मोशन सेन्सोर्स वापरतात. तसेच आऊटडोअर साठी GPS. त्यामुळे त्यांचा उपयोग स्टेप्स मोजणे , हार्ट रेट मॉनिटर करणे यासाठी चांगला उपयोग होतो. पण ते रेसिस्टन्स मोजू नाहीत. म्हणजेच हात वर खाली करणे आणि वजन घेऊन हात वर खाली करणे हे सारखेच ... याच कारणाने त्यांचा कॅलरी बर्न मोजायलाही फारसा उपयोग नाही. हे बँड्स बाहेर (आऊटडोअर) धावणे किंवा सायकलिंग यासाठी उपयुक्त आहेत. अंतर मोजणे, ऍव्हरेज स्पीड हे बरेचसे बरोबर असते. अर्थात GPS कव्हरेज असेल तर. पण ह्या गोष्टी स्मार्ट फोन आणि MapMyRun सारखे अँप यांनी सुद्धा साध्य होतात. पण इनडोअर / जिम मध्ये व्यायाम करणार असाल तर यांचा फारसा उपयोग नाही. त्यामुळे असे बँड्स घेण्यापूर्वी विचार करा.. याबद्दल अजून खूप काही सांगता येईल ... पण इथेच थांबतो.. इंटरनेटवर वाचनात आलेले एक वाक्य : These bands are like Gym membership. They look shining & attractive when new.. but many times, remain unused to its potential.

आज ५ किमि चाललो

आमच्या पोटाचं सिक्स पॅक कधी होणार कोण जाणे! निस्तीच स्वप्न पडत्यात मेली! :(

महिनाभर खंड पडलेला व्यायाम आजपासून सुरु केला. मी HIIT करते. दर दिवशी शक्यतो ४५ मिनिटे आणि आठवड्याचे ५ दिवस असे शेड्युल आहे. साधारणतः दर ३ आठवड्यांनी वर्कआऊट बदलते. यासाठी 'वर्कआऊट प्रो' नावाचे ऍप डाऊनलोड केले आहे. शक्यतो कोणतेही मशीन वापरत नाही. मुख्य म्हणजे 'वेटलॉस' पेक्षा 'स्टॅमिना' हे लक्ष्य ठेवले आहे.

सायकलींग ६४.५ किमी,२४किमी/तास,२:४१तास,२५०३ उष्मांक...... आणि सर्वात महत्वाचं नवा मित्र गवसला !!! ( सायकलींग चा सर्वात मोठा फायदा):)

आज जिममध्ये फुल लेग्ज वर्कआउट देश

आजचा व्यायाम ५ किमी धावणे (ट्रेडमिल) अप्पर बॉडी सर्किट ट्रैनिंग स्ट्रेचिंग

आजची सुट्टी उद्या राईड मारेन मोठी...

अंतर: २० किमी वेग: २० किमी प्रति तास जळालेले उष्मांक: ७०० आजचा अनुभव: फीलिंग फ्रेश दॅन युज्वल

NA पूर्ण आठवड्यात रोज किमान 16.9 किमी सायकलिंग झाले आठवड्याचा आलेख समतल ठेवण्यात यशस्वी

आज ५०.४६ किमी सायकलींग झालं.... ह्या आठवड्यात २८६ किमी टोटल सायकलींग !!

मिळुन अंदाजे 120 किमी सायकलींग झाले ! देश

NA मागचा आठवडा 1 हि दिवस हुकवला नाही एकूण 126 किमी झाले

NA मागचा आठवडा 1 हि दिवस हुकवला नाही एकूण 126 किमी झाले

धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल) फ्रेंड्स ओन बॅडमिंटन क्लबचे चेअरमन झाले तेव्हा त्यांना जसं वाटलं तसं वाटतय.. काल झालेल्या 'पुणे अल्ट्रामॅरॅथॉन'मधे ध्यानीमनी नसताना अस्मादीक चक्क जिंकले. ५०किमी ५ तास ३४ मिनिटं

In reply to by अप्पा जोगळेकर

मागच्या वर्षी तुम्ही पावणेसहा तासात पूर्ण केली आणि सातवे होतात असे येथे (https://puneultramarathon.com/results/) कळले. यावर्षी डायरेक्ट प्रथम म्हणजे जबर आहे.

In reply to by बाळ सप्रे

सर्वांना धन्यवाद.. फुल मॅरॅथॉनपे़क्षाजास्त अंतर साधारणपणे अल्ट्रा मधे येते.. ५०,७५,१००,१६१ (१०० मैल) वगैरे

In reply to by बाळ सप्रे

अभिनंदन..लय भारी सप्रे काका...! एव्हढं कसं धावता हो ? आणि या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सलग धावावंच लागत कि मध्ये थोड्या वेळ चालू हि शकतो ?

मिपाकर सायक्लीस्ट्स आणि इथला धुमाकूळ बघून प्रेरणा मिळाली आणि आज तडक उठलो आणि हाणली सायकल ४२ किमी. वेग - अंदाजे साडे एकवीस किमी प्रति तास एकूण २५६ मि उंची गाठली साधारण १३०० उष्मांक खर्ची पडले.

१. ट्रेड मिल ब्रिस्क वॉकिंग - २० मि. (७.५ ते ७.८ च्या वेगाने) २. दोरीवरच्या उड्या - ४५० ३. क्रॉस ट्रेनर - २० मि. ४. स्ट्रेचिंग - १० मि. देश

८ नो. पासून पोहायला शिकतोय. एक दिवसाआड धावायचा विचार आहे बरेच दिवस पण अमलात येत नाहीय. तरीही काल १० किमी पुर्ण केलं मास्टेक रन मधे.

पण When in doubt Pedal it out ! असं म्हणत आळस झटकत उठलो ... २४.२२ किमी , २१.२ किमी/तास वेगानी १.०८ तासात ९५३ कॅलरीज खर्चुन सायकलींग केलं.... आजपासून MTB , Road Bike ला काही दिवस विश्रांती .

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

हाफिस २० च किमी लांब आहे.. मी सायकलच चालवायची म्हणून मुद्दाम पुण्याबाहेर पडून "नवीन कात्रज बोगदा - जुना कात्रज बोगदा - स्वारगेट - हाफिस" असा लांबचा रूट घेतो. ट्रॅफिकचा आजिबात प्रॉब्लेम येत नाही. आपण निवांत रस्त्याच्या बाजूने जात रहायचे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

भूमकर चौकातून - मेझ्झा ९ व नंतर नेहमीच्या रस्त्याने पुढे.. असे जाणे जमेल का सायकल ने..?

In reply to by मोदक

मेझा ९ पर्यंत जरातरी सुटेबल, पण नंतर तीनपदरीचा दोनपदरी रस्ता होत असल्याने मारामारी असते लिटरली. मी मागुन जायचा विचार करतोय, सुस, चांदे अन नंतर हिंजवडी. रस्ता बराय, पण एक २ ३ किलोमीटरचा पॅच खराब आहे. ह्या विकेंडी सायकल दुरुस्त करुन नेक्स्ट वीक सुरुवात करावी असा विचार आहे. किंवा हायवेनीच सकाळी साडेसात वाजता वगैरे निघुन ट्राय करीन.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

सूस चांदे नांदे रस्त्यावरील ट्रॅफिक वाढत चाललय. अजिबात सायकल फ्रेंडली नाही .. सायकलने जायचा निर्णय घेतलाच असेल तर खूप खबरदारी घ्यावी !!!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मी भूमकर चौक ते फेज २ पर्यंत दररोज जात होतो आत्ता आत्ता पर्यंत. काही प्रॉब्लेम नाही ट्रॅफिकचा. उलट ४ सीझन नंतर जबर चढ आहे. तिथे ट्रॅफिक असेल तर अजून चांगले. चढ आणि ट्रॅफिक मुळे चांगली प्रॅक्टिस होते. नंतर घाटातल्या राईडला ही प्रॅक्टिस बरी पडते. चांदे रस्ता फालतू आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

आज तिकडुन गेलो होतो बाईकनी बघायला. पण आता वाटतंय चांदे शक्य नाही. दोनेक किमीच्या पॅच मध्ये रस्ता पुर्ण उखडल्या गेलाय. तेव्हा आपलं विकेण्डलाच सायकल फिरवणे चांदणी चौक, फर्ग्युसन रोड पाषाण सर्कल ते परत चांदणी चौक. एक चांगला लूप होतो. अप्पा, दंडवत. त्या भागातुन मोटरसायकल नेणं जिकीरीचं होतं, तिथनं सायकलनी गेलात __/\__

काहिच नाहि.. ऑफिसच्या कामामुळे आज व्यायाम नाही झाला :-( उद्या नक्की !! देश

दररोज ३० मीन्स ब्रिस्क वॉल्क + रन ने सुरुवात झाली आहे .... लवकरच पुढची पायरी गाठू ! -Better Late Than Never