✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी आज केलेला व्यायाम...!!

म
मोदक यांनी
Wed, 11/02/2016 - 17:16  ·  लेख
लेख
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
112305 वाचन

💬 प्रतिसाद (496)

प्रतिक्रिया

चांगली उपयुक्त चर्चा सुरू आहे

limbutimbu
गुरुवार, 11/10/2016 - 09:41 नवीन
चांगली उपयुक्त चर्चा सुरू आहे. बरीच माहिती मिळत आहे. जुन पासुन मी जिम जॉईन केले आहे. अधेमधे दाण्ड्या मारतो, पण सुरुवात तर झालिये व तब्येतीत, मानसिक स्थितीत फरकही पडलाय.

सध्या नो वॉक..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/10/2016 - 09:45 नवीन
आज एक तास ब्याडमिंटन खेळलो. -दिलीप बिरुटे

विन्डोज फोनसाठी अँप

पाटीलभाऊ
गुरुवार, 11/10/2016 - 13:15 नवीन
विन्डोज फोनसाठी कोणते चांगले अँप आहे का ? मी runners+ आणि runtastic हे अँप वापरून पहिले...त्यातल्यात्यात runtastic हे जरा चांगले वाटले. पण कधी कधी अँप बंद पडणं, जीपीएसने नीट ट्रॅक न होणं अथवा चुकीचा मार्ग दाखवणं असे प्रॉब्लेम्स उद्भवतात.

विंडोजला मायक्रोसॉफ्ट हेल्थ

वेल्लाभट
गुरुवार, 11/10/2016 - 15:49 नवीन
विंडोजला मायक्रोसॉफ्ट हेल्थ अँड फिटनेस चांगलं चालतं त्याशिवाय जीपीएस ट्रॅकर असं काहीतरी एक अ‍ॅप आहे तेही ठीक. रनटॅस्टिक चुकीचा मॅप देतं. हेल्थ अँड फिटनेस बेस्ट.
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

ते अँप बंद झालं

पाटीलभाऊ
गुरुवार, 11/10/2016 - 17:51 नवीन
विंडोज दुकानात शोधलं..पण नाही सापडलं. :( तेव्हा आंतरजालावरून समजलं कि मायक्रोसॉफ्टने हेल्थ अँड फिटनेस हे अँप बंद केलंय.
The MSN Health & Fitness app on Windows, iOS and Android devices will be discontinued on November 1, 2015.
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

फॉर नोकिया फोन्स इट सीम्स.

वेल्लाभट
गुरुवार, 11/10/2016 - 18:19 नवीन
फॉर नोकिया फोन्स इट सीम्स. पण असो; ट्राय जीपीएस ट्रॅकर (राखाडी-लाल रंगाचा आयकॉन)
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

मंगळवारची सायकलिंग १७ किमी

अंजनेय
गुरुवार, 11/10/2016 - 13:47 नवीन
मंगळवारची सायकलिंग १७ किमी आणि बुधवारची १७.२ किमी

आजचा व्यायाम.....

देशपांडेमामा
गुरुवार, 11/10/2016 - 14:20 नवीन
साधारण २२ ते २४ किमी सायकलिंग. अंदाज अश्याकरता की स्ट्रावा किंवा जिपिएस गंडल्यामुळे ट्रिप रेकॉर्ड झाली नाहि देश

विन्डोज फोनसाठी अँप

अमर विश्वास
गुरुवार, 11/10/2016 - 15:29 नवीन
मी आऊटडोअर रानिंगसाठी MapMyRun हे अँप वापरतो.. उत्तम चालते..

बघतो वापरून

पाटीलभाऊ
गुरुवार, 11/10/2016 - 18:27 नवीन
बघतो वापरून
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

आजचा व्यायाम :

अमर विश्वास
गुरुवार, 11/10/2016 - 15:35 नवीन
आजचा व्यायाम : आज लेग्स डे .. क्रॉस जॉगर : ३० मिनिटे लेग प्रेस , लेग एक्सटेंशन , लेग कर्ल & काफ : ३ सेट squatts & lunges : ३ सेट्स स्ट्रेचिंग

धागा चांगला चालु आहे. मीही

मोहनराव
गुरुवार, 11/10/2016 - 15:35 नवीन
धागा चांगला चालु आहे. मीही थोडाफार व्यायाम चालु केला आहे जरा अ‍ॅपविषयी व फिटनेस बँड विषयी कोणीतरी चांगले मार्गदर्शन केले तर बरे होईल!!

फिटनेस ट्रॅकर / बँड्स बद्दल थोडेसे

अमर विश्वास
गुरुवार, 11/10/2016 - 18:09 नवीन
फिटनेस ट्रॅकर / बँड्स बद्दल थोडेसे : नुकताच आमच्या ऑफिसमध्ये घडलेला किस्सा : आमचा एक अॅपल प्रेमी मित्र आपले नवे अॅपल वॉच दाखवत म्हणाला .. बघ मी रोज १०००० स्टेप्स चालतो !!! (खर तर हे वाक्य "मी रोज "अॅपल वॉच" हातात घालून १०००० स्टेप्स चालतो" असा वाचावं ).. त्याच्याकडे (वॉचसकट ) दुर्लक्ष करून माझा प्रतिप्रश्न : ते ठीक आहे पण व्यायाम काय करतोस? माझ्या या प्रश्नावर विचित्र चेहरा करून तो निघून गेला... दोन दिवस जरा चिडचिड करून परत ओ के झाला.. हे सर्व फिटेनास बँड्स हे मोशन सेन्सोर्स वापरतात. तसेच आऊटडोअर साठी GPS. त्यामुळे त्यांचा उपयोग स्टेप्स मोजणे , हार्ट रेट मॉनिटर करणे यासाठी चांगला उपयोग होतो. पण ते रेसिस्टन्स मोजू नाहीत. म्हणजेच हात वर खाली करणे आणि वजन घेऊन हात वर खाली करणे हे सारखेच ... याच कारणाने त्यांचा कॅलरी बर्न मोजायलाही फारसा उपयोग नाही. हे बँड्स बाहेर (आऊटडोअर) धावणे किंवा सायकलिंग यासाठी उपयुक्त आहेत. अंतर मोजणे, ऍव्हरेज स्पीड हे बरेचसे बरोबर असते. अर्थात GPS कव्हरेज असेल तर. पण ह्या गोष्टी स्मार्ट फोन आणि MapMyRun सारखे अँप यांनी सुद्धा साध्य होतात. पण इनडोअर / जिम मध्ये व्यायाम करणार असाल तर यांचा फारसा उपयोग नाही. त्यामुळे असे बँड्स घेण्यापूर्वी विचार करा.. याबद्दल अजून खूप काही सांगता येईल ... पण इथेच थांबतो.. इंटरनेटवर वाचनात आलेले एक वाक्य : These bands are like Gym membership. They look shining & attractive when new.. but many times, remain unused to its potential.

सहमत

पाटीलभाऊ
गुरुवार, 11/10/2016 - 18:31 नवीन
नक्कीच...या बँड्सवर दहा-बारा हजार रुपये खर्च करणे पटत नाही. मोबाईल अँप वापरूनहि अंतर, वेळ वगैरे मोजता येत.
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

मोलाची माहीती. याबद्दल जरा

मोहनराव
गुरुवार, 11/10/2016 - 19:00 नवीन
मोलाची माहीती. याबद्दल जरा साशंक होतोच मी!!
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

वॉक

प्रशांत
गुरुवार, 11/10/2016 - 19:27 नवीन
आज ५ किमि चाललो

एस हेल्थ नावाचे एप्लीकेशन आहे

खटपट्या
गुरुवार, 11/10/2016 - 19:48 नवीन
एस हेल्थ नावाचे एप्लीकेशन आहे. मोफत आहे. बर्‍यापैकी चालणे मोजता येते. मी वापरतोय.

अरेरे :( :(

अन्नू
Fri, 11/11/2016 - 00:02 नवीन
आमच्या पोटाचं सिक्स पॅक कधी होणार कोण जाणे! निस्तीच स्वप्न पडत्यात मेली! :(

महिनाभर खंड पडलेला व्यायाम

सपे-पुणे-३०
Fri, 11/11/2016 - 11:52 नवीन
महिनाभर खंड पडलेला व्यायाम आजपासून सुरु केला. मी HIIT करते. दर दिवशी शक्यतो ४५ मिनिटे आणि आठवड्याचे ५ दिवस असे शेड्युल आहे. साधारणतः दर ३ आठवड्यांनी वर्कआऊट बदलते. यासाठी 'वर्कआऊट प्रो' नावाचे ऍप डाऊनलोड केले आहे. शक्यतो कोणतेही मशीन वापरत नाही. मुख्य म्हणजे 'वेटलॉस' पेक्षा 'स्टॅमिना' हे लक्ष्य ठेवले आहे.

नक्की काय व्यायाम करता

स्थितप्रज्ञ
Sat, 11/12/2016 - 13:45 नवीन
व्यायाम परत सुरु केल्याबद्दल अभिनंदन! HIIT मध्ये नक्की काय करता? याचा (HIIT) नक्की काय फायदा होतो?
↩ प्रतिसाद: सपे-पुणे-३०

आज......

डॉ श्रीहास
Fri, 11/11/2016 - 12:01 नवीन
सायकलींग ६४.५ किमी,२४किमी/तास,२:४१तास,२५०३ उष्मांक...... आणि सर्वात महत्वाचं नवा मित्र गवसला !!! ( सायकलींग चा सर्वात मोठा फायदा):)

आजचा दिवस शून्य व्यायामाचा

वेल्लाभट
Fri, 11/11/2016 - 13:05 नवीन
पण उद्या जोमाने व्यायाम करणार

आज लेग्ज

देशपांडेमामा
Fri, 11/11/2016 - 13:06 नवीन
आज जिममध्ये फुल लेग्ज वर्कआउट देश

आजचा व्यायाम

अमर विश्वास
Fri, 11/11/2016 - 15:44 नवीन
आजचा व्यायाम ५ किमी धावणे (ट्रेडमिल) अप्पर बॉडी सर्किट ट्रैनिंग स्ट्रेचिंग

मी काल केलेला व्यायाम

अरिंजय
Fri, 11/11/2016 - 20:44 नवीन
Image removed. ३९ किमी हायवेवर मारल्यामुळे स्पिड चांगली मिळाली.

"मी आज केलेला व्यायाम" असे

अरिंजय
Fri, 11/11/2016 - 22:19 नवीन
"मी आज केलेला व्यायाम" असे वाचावे
↩ प्रतिसाद: अरिंजय

आज रेस्ट .....

डॉ श्रीहास
Sat, 11/12/2016 - 09:21 नवीन
आजची सुट्टी उद्या राईड मारेन मोठी...

आजचे सायकलिंग

स्थितप्रज्ञ
Sat, 11/12/2016 - 13:43 नवीन
अंतर: २० किमी वेग: २० किमी प्रति तास जळालेले उष्मांक: ७०० आजचा अनुभव: फीलिंग फ्रेश दॅन युज्वल

माझी सायकलिंग

अंजनेय
Sat, 11/12/2016 - 16:23 नवीन
Image removed. पूर्ण आठवड्यात रोज किमान 16.9 किमी सायकलिंग झाले आठवड्याचा आलेख समतल ठेवण्यात यशस्वी

आजचे सायकलिंग - 62 किमी

मोदक
Sun, 11/13/2016 - 00:16 नवीन
आजचे सायकलिंग - 62 किमी

आजचं सायकलींग...

डॉ श्रीहास
Sun, 11/13/2016 - 14:23 नवीन
आज ५०.४६ किमी सायकलींग झालं.... ह्या आठवड्यात २८६ किमी टोटल सायकलींग !!

आज आणि काल...

देशपांडेमामा
Sun, 11/13/2016 - 15:08 नवीन
मिळुन अंदाजे 120 किमी सायकलींग झाले ! देश

नविन आठवड्याची सुरुवात...

डॉ श्रीहास
Mon, 11/14/2016 - 09:39 नवीन
२३.७३ किमी , १.०५ तास , २१.५ किमी/तास ,८८३ कॅलरीज् .... आजचं सायकलींग :))

सायकल

अंजनेय
Mon, 11/14/2016 - 10:22 नवीन
Image removed. मागचा आठवडा 1 हि दिवस हुकवला नाही एकूण 126 किमी झाले

सायकल

अंजनेय
Mon, 11/14/2016 - 10:22 नवीन
Image removed. मागचा आठवडा 1 हि दिवस हुकवला नाही एकूण 126 किमी झाले

धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल

बाळ सप्रे
Mon, 11/14/2016 - 10:44 नवीन
धोंडो भिकाजी जोशी (डी बी अंकल) फ्रेंड्स ओन बॅडमिंटन क्लबचे चेअरमन झाले तेव्हा त्यांना जसं वाटलं तसं वाटतय.. काल झालेल्या 'पुणे अल्ट्रामॅरॅथॉन'मधे ध्यानीमनी नसताना अस्मादीक चक्क जिंकले. ५०किमी ५ तास ३४ मिनिटं

अभिनंदन सप्रे साहेब

खटपट्या
Mon, 11/14/2016 - 11:25 नवीन
अभिनंदन सप्रे साहेब
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अभिनंदन

झेन
Mon, 11/14/2016 - 12:13 नवीन
अभिनंदन सप्रे सर
↩ प्रतिसाद: खटपट्या

अभिनंदन सप्रे साहेब...!!

मोदक
Mon, 11/14/2016 - 12:15 नवीन
अभिनंदन सप्रे साहेब...!! Image removed.
↩ प्रतिसाद: खटपट्या

मन:पुर्वक अभिनंदन

डॉ श्रीहास
Mon, 11/14/2016 - 16:07 नवीन
मन:पुर्वक अभिनंदन..._/\_
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

नमस्कार घ्या आमचा.

अप्पा जोगळेकर
Mon, 11/14/2016 - 17:35 नवीन
नमस्कार घ्या आमचा. अल्ट्रा मॅरेथॉन १०० + असते असा माझा समज होता.
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मागच्या वर्षी तुम्ही पावणेसहा

अप्पा जोगळेकर
Mon, 11/14/2016 - 17:44 नवीन
मागच्या वर्षी तुम्ही पावणेसहा तासात पूर्ण केली आणि सातवे होतात असे येथे (https://puneultramarathon.com/results/) कळले. यावर्षी डायरेक्ट प्रथम म्हणजे जबर आहे.
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अभिनंदन!!

सूड
Mon, 11/14/2016 - 17:59 नवीन
अभिनंदन!!
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

एक नंबर. अभिनंदन..

शलभ
Mon, 11/14/2016 - 21:30 नवीन
एक नंबर. अभिनंदन..
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

सर्वांना धन्यवाद..

बाळ सप्रे
Tue, 11/15/2016 - 12:19 नवीन
सर्वांना धन्यवाद.. फुल मॅरॅथॉनपे़क्षाजास्त अंतर साधारणपणे अल्ट्रा मधे येते.. ५०,७५,१००,१६१ (१०० मैल) वगैरे
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अभिनंदन...

पाटीलभाऊ
Wed, 11/16/2016 - 13:36 नवीन
अभिनंदन..लय भारी सप्रे काका...! एव्हढं कसं धावता हो ? आणि या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सलग धावावंच लागत कि मध्ये थोड्या वेळ चालू हि शकतो ?
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

अभिनंदन साहेब !!!

बेकार तरुण
गुरुवार, 11/17/2016 - 05:44 नवीन
अभिनंदन साहेब !!!
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

आणि प्रेरणा मिळाली

स्थितप्रज्ञ
Mon, 11/14/2016 - 11:09 नवीन
मिपाकर सायक्लीस्ट्स आणि इथला धुमाकूळ बघून प्रेरणा मिळाली आणि आज तडक उठलो आणि हाणली सायकल ४२ किमी. वेग - अंदाजे साडे एकवीस किमी प्रति तास एकूण २५६ मि उंची गाठली साधारण १३०० उष्मांक खर्ची पडले.

आज ३७ किमी सायकलिंग करून

मोदक
Mon, 11/14/2016 - 12:16 नवीन
आज ३७ किमी सायकलिंग करून हाफिसात पोहोचलो. १ तास ५० मिनीटे वेळ लागला.

परततानाचे 20 किमी सायकलिंग

मोदक
Mon, 11/14/2016 - 22:27 नवीन
परततानाचे 20 किमी सायकलिंग झाले. आजचे एकूण सायकलिंग 57 किमी
↩ प्रतिसाद: मोदक
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा