✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी आज केलेला व्यायाम...!!

म
मोदक यांनी
Wed, 11/02/2016 - 17:16  ·  लेख
लेख
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत. व्यायामाचे फायदे येथे कोणाला समजावून सांगावेत अशी परिस्थिती नक्कीच नाही. तसेच आपल्या सर्वांच्या व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा इच्छा असूनही व्यायाम होत नाही हे ही तितकेच खरे आहे. मग आपण या धाग्यावर "आज केलेला व्यायाम" नोंदवत राहूया. व्यायाम करणे आवश्यक आहे मग तो कोणत्याही प्रकारे करा. सायकल चालवा, सकाळी फिरायला जा, पळा, सूर्यनमस्कार घाला, योगासने करा, जिम मध्ये घाम गाळा पण नियमीतपणे काहीतरी करा आणि येथे नक्की नोंदवा. आपल्यामुळे आणखी बरेच लोक प्रोत्साहन घेतील आणि व्यायामाला नक्की सुरूवात करतील. मग... आज किती व्यायाम केला..? ************************************************************** काही डिस्क्लेमर्स. १) या धाग्याचा उद्देश "जास्तीतजास्त लोकांनी व्यायाम करावा" इतकाच आहे. २) आपल्या व्यायामाच्या अनुषंगाने अनेकांना अनेक शंका असू शकतात त्या येथे बिन्धास्त विचारा. मिपाकर भरपूर उत्साही आहेत आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारात निष्णात आहेत. माझीही शँपेन (उर्फ चंपाग्ने) हाफ / फुल मॅरेथॉन पळतो, वेल्लाभट नियमीतपणे जिम करतो, शैलेंद्र, प्रशांत मालक, डॉ श्रीहास, आनंदराव, (शेफ) केडी असे अनेक मुरलेले सायकलिस्ट लोक आहेत. डॉक्टर खरे आणि एक्काकाका वैद्यकीय सल्ले देतातच. अशा अनेक अनुभवी लोकांना आपले पेटारे उघडण्यासाठी उद्युक्त करूया. ३) ही कोणतीही स्पर्धा नाहीये त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून येथे नोंदी करा. फायदा तुम्हालाच मिळणार आहे. :) ************************************************************** टीप - येथे अवांतर पोस्ट शक्यतो टाळाव्यात. बाकी संपादक मंडळ व चालक-मालक समर्थ आहेतच. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव

प्रतिक्रिया द्या
112306 वाचन

💬 प्रतिसाद (496)

प्रतिक्रिया

आजचा व्यायाम.....

देशपांडेमामा
Tue, 11/08/2016 - 09:54 नवीन
सायकलने ऑफिसला आलो...१२.५ किमी देश

एक प्रांजळ मत सांगतो. मत असं

वेल्लाभट
Tue, 11/08/2016 - 10:19 नवीन
एक प्रांजळ मत सांगतो. मत असं नाही हे बर्‍याच माध्यमांतून म्हटलं, सिद्ध केलं गेलंय. की रोजच्या दिनचर्येतले व्यायाम सदृश घटक शोधून 'माझा असाच किती व्यायाम होतो' या भावनेत समाधान मानणं म्हणजे स्वतःची मोठी फसवणूक आहे. जर एखादा विक्रेता गोष्टी विकण्यासाठी रोज १० किमी चालत असेल तर तो त्याचा व्यायाम म्हणता येत नाही. व्यायाम कुठला असेल तर जो त्याला ते दहा किमी चालण्याची ताकद देईल. सायकलने ऑफिस गाठणे हा कार्डिओ व्यायाम झालाच, but to build power in those legs, you also need to do squats. काहीसा फंक्शनल स्ट्रेन्ग्थ आणि वर्काउट स्ट्रेन्ग्थ चा प्रकार. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. थोडक्यात, व्यायाम हा दैनंदिन हालचालींपेक्षा वेगळा असायला हवा.

थोडक्यात, व्यायाम हा दैनंदिन

सुबोध खरे
Tue, 11/08/2016 - 10:26 नवीन
थोडक्यात, व्यायाम हा दैनंदिन हालचालींपेक्षा वेगळा असायला हवा. बाडीस याचं उत्तम उदाहरण कालच एक ताईनि दिलं. त्यांचं वजन ८४ किलो आहे. व्यायाम काय करता विचारले तेंव्हा त्या म्हणाल्या मुलाचा मागे धावताना इतका व्यायाम होतो कि अजून व्यायामाची गरजच नाही. मुलाचे वय वर्ष दीड.
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अजून व्यायामाची गरजच नाही

वेल्लाभट
Tue, 11/08/2016 - 11:28 नवीन
अजून व्यायामाची गरजच नाही
आणि गंमत म्हणजे इतर हगल्या पादल्याला दहा जणांचे सल्ले घेणारी मंडळी हे मात्र आपलं आपण ठरवून मोकळी होतात.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

किती लोकांना सांगुन थकलो की

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/08/2016 - 11:56 नवीन
किती लोकांना सांगुन थकलो की रोजची धावपळ म्हणजे व्यायाम नाही, पण पटणार कसं त्यांना? मग आहेच बीपी शुगरची कवतिके, इत्क्याची इतकी केली वगैरे वगैरे!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

व्यायाम करणे हा संस्कारांचा भाग व्हायला हवा....

डॉ श्रीहास
Tue, 11/08/2016 - 16:19 नवीन
"डाॅक्टर ह्याला/हिला सांगा बरं व्यायाम करायला" ..... रुग्णाचे आई/वडील/नातेवाईक/मित्र जेव्हा विचारतात तेव्हा माझ्याकडे एवढचं ऊत्तर असतं की " आपण घोड्याला नदीपर्यंत नेऊ शकतो, आंघोळसुध्दा घालु शकतो पण पाणी प्यायचं की नाही हे फक्त घोडाच ठरवु शकतो, त्यामुळे जर खरंच ईच्छा असेल तर व्यायाम करा असं सांगण्याची गरज पडणार नाही" अनेकदा व्यायाम करता का किंवा रोज चालता का असं विचारल्यावर रुग्णचं म्हणातात काही गरजच पडत नाही ..... मग अनुत्तरित होऊन जायला होतं. व्यायाम करणे हा संस्कारांचा भाग व्हायला हवा....
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरेंशी सहमत!!

संदीप डांगे
Tue, 11/08/2016 - 10:20 नवीन
खरेंशी सहमत!! एक विनंती, हा धागा खफसारखा वाहता करता आला तर बघा बुवा.. काही सदस्य आज केलेला व्यायाम पहिल्या-दुसर्‍या पेजवर टाकतायत, त्यामुळे थोडी गडबड होते. टीप्स, सल्ले ह्यांचा ट्रॅक ठेवतांना अवघड होते आहे. धन्यवाद!

+१

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/08/2016 - 11:57 नवीन
सहमत.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हे आधीच सांगितले होते मी

धोणी
Tue, 11/08/2016 - 14:39 नवीन
हे आधीच सांगितले होते मी मोदक भाऊ नि खवचट उत्तर दिले मग गप्प बसलो
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

खरंच माहिती नाही राव, म्हणून

मोदक
Tue, 11/08/2016 - 17:07 नवीन
खरंच माहिती नाही राव, म्हणून विचारले, खवचट काय त्यात?
↩ प्रतिसाद: धोणी

आजचा व्यायाम

मोहन
Tue, 11/08/2016 - 11:33 नवीन
२.५ कि.मी चालणे, स्ट्रेचेस -१५ मि. जिने २ मजले .

आजचा व्यायाम ............

नितीन पाठक
Tue, 11/08/2016 - 12:16 नवीन
माझा कालचा व्यायाम ..... सकाळी ६.५ किमी चालणे आणि संध्याकाळी १७.२ किमी सायकलींग वेळ ५५ मिनीटे माझी सायकल म्हणजे साधी सायकल १९८२ चे मॉडेल, बेसिक सायकल, गिअर नाही. चालवयाची म्हणजे धर हैंडल आणि मार पायडल ... मार पायडल. ऑफिस तिस-या मजल्यावर. दररोज साधारण ७-८ वेळा चढ-उतार होतेच.

मी रोजसकाळी 2 किलोमिटर धावतो

तनिश
Tue, 11/08/2016 - 12:22 नवीन
मी गेल्या वर्षभरापासून रोजसकाळी 2 किलोमिटर धावतो ..वजन 100 वरुन 87 आले..पण कंबरेचा घेर कमी होत नाही आहे..

पोटाच्या भागाची फॅट सर्वात

वेल्लाभट
Tue, 11/08/2016 - 13:41 नवीन
पोटाच्या भागाची फॅट सर्वात शेवट कमी होते. मेजरमेंट्स (पूर्ण शरीराची) घेत रहा दर महिन्याला. सर्वात शेवटी अ‍ॅब्डॉमिनल फॅट कमी होईल आणि तीही फास्टर दॅन यू एक्स्पेक्ट. हे म्हणताना, मसल बिल्डिंग किंवा ताकद वाढवणारे व्यायामही करा असं सुचवेन. मसल बिल्डिंग बर्न्स फॅट फास्टर दॅन एनी अदर वर्काउट. सो, बैठका, पुल अप्स, जोर, डिप्स इत्यादी जमतील तसे स्ट्रेन्ग्थ वर्काउटही करा असं सुचवेन.
↩ प्रतिसाद: तनिश

अगदी बरोबर...

डॉ श्रीहास
Tue, 11/08/2016 - 16:25 नवीन
पोटावर सर्वात आधी जमते आणि सर्वात नंतर जाते ...... फर्स्ट यु लुज किलोज् देन इन्चेस् !!
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

छान उपयोगी धागा,

नीलमोहर
Tue, 11/08/2016 - 13:26 नवीन
चालणं बरंच असतं, बाकी व्यायाम काही होत नाही, एक प्रश्न होता, हातांचे स्नायू बळकट होण्यासाठी कुठले व्यायाम आहेत, किंवा काय करता येईल, पायांचे कितीही व्यायाम करता येतात पण हातांमध्ये तेवढी strength नाही,

मला एक विचारायचे आहे मी सायकल

कविता१९७८
Tue, 11/08/2016 - 13:26 नवीन
मला एक विचारायचे आहे मी सायकल कधीच चालवली नाही , आधी टु व्हीलर गाडी घेतली पण ती जमेना म्हणुन सायकल घेतली पण ती काही जमली नाही पण गेल्या २ वर्षापासुन टु व्हीलर गाडी चालवते आहे तर आता मला सायकल चालवणे जमेल का?

सहज जमेल.

मोदक
Tue, 11/08/2016 - 14:15 नवीन
सहज जमेल. सायकल आणि पोहणे आपण कधीही विसरत नाही असे म्हणतात. सायकल वरून पाय आरामात टेकतील अशा उंचीची सायकल बघा आणि सायकलिंग सुरू करा, या प्रकाराची दुचाकी वाहने थोड्या गतीमध्ये असताना सहज कंट्रोल होतात त्यामुळे मोकळी जागा बघून सुरुवात करा. सोसायटीत सुरुवात केली आणि कोणी आडवे आले तर उगाचच धडपडायला होते आणि आत्मविश्वास जातो
↩ प्रतिसाद: कविता१९७८

जोरबैठका अन दंडबैठका

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/08/2016 - 16:23 नवीन
नेमका फरक काय?

फरक किंवा अर्थ

डॉ श्रीहास
Tue, 11/08/2016 - 16:37 नवीन
जोरबैठका किंवा दंडबैठका हे सारखेच .... जोर किंवा दंड म्हणजे Indian styled push ups आणि बैठका म्हणजे Squats सारखेच पण हातांची योग्य हालचाल असते ह्यामधे.....
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

डेफिनिशन चुकताय प्रथमतः

वेल्लाभट
Tue, 11/08/2016 - 17:04 नवीन
डेफिनिशन चुकताय प्रथमतः हे दोनही काहीतरी अपभ्रंश होऊन तयार झालेले शब्द आहेत. जोर किंवा दंड हा एक व्यायामप्रकार झाला. दंड हे बहुदा जोरांचं हिंदी नामकरण असावं असं निरीक्षणांती वाटतं. याला आता हिंदू पुशअप किंवा डाईव्ह बाँबर्स वगैरे नावं पडलेली आहेत. पण याचाच अर्थ हा परदेशातही मान्य असलेला व्यायाम झालाय. आणि बैठका हा दुसरा. जोरबैठका असं काही नसतं, एक्सेप्ट फॉर द टू पर्फॉर्म्ड सेपरेटली. आता जोर म्हणजे माहित नसेल तर Image removed. एक उत्तम अपर बॉडी वर्काउट. नीट केला असता स्टार्टिंग पोझिशन मधे बायसेपस, लॅट्स, डेल्टॉईड्स म्हणजे खांदे, पाठ, हॅम्स्ट्रिंग्स म्हणजे मांड्यांचा मागचा भाग, पोठर्‍या, हे स्नायू ताणले जातात. आणि ट्रायसेप्स, चेस्ट, थोडेफार मांड्यांचे स्नायू व पोटाचे स्नायू हे आकुंचित होतात. पोझिशन २: चेस्ट मसल, ट्रायसेप्स ताणले जातात व बायसेप्स, खांदे आकुंचित होतात पोझिशन ३: पोटाचे स्नायू, छाती, बायसेप्स, क्वाड्रासेप्स किंवा मांड्या (पुढचा भाग) हे ताणले जातात व पाठ, हिप्स (कुले) हॅम्स्ट्रिंग्स हे आकुंचित होतात. थोडक्यात हा खर्‍या अर्थाने सर्वांगाचा व्यायाम म्हणता येऊ शकतो. बैठकांचे दोन प्रकार असतात. एक पारंपारिक बैठका ज्या आपल्याकडे रूढ आहेत त्या. आणि एक स्क्वॉट्स. मुख्य फरक सांगतो. पारंपारिक बैठकात चवद्यावर बसलं जातं, यात पाऊल व गुडघ्याखालील पायातला कोन ९० अंशापेक्षा कमी असतो. किंवा गुडघे पावलांच्या पुढे येतात. खाली बसताना श्वास सोडला जातो व वर येताना घेतला जातो. स्क्वॉट्स मधे बसण्याची पद्धत जरा वेगळी असून यात गुडघा पायाच्या अंगठ्यापुढे यायला नको. शरीराचं वजन हे मागे टाकून खाली बसलं जातं. पाऊल व गुडघ्याखालचा पाय यातला कोन ९० अंशाहून कमी नको. व खाली बसताना श्वास घ्यायचा असतो आणि वर फोर्सफुली येताना उच्छ्वास सोडायचा असतो. दोनही बैठकात पाठीचा कणा ताठ'च' असायला हवा. अन्यथा दुखापतीचा संभव असतो. विशेषतः वजन घेऊन करत असल्यास. Image removed. पारंपारिक बैठका Image removed. स्क्वॉट्स
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

धन्यवाद!

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/08/2016 - 17:05 नवीन
डीटेल मध्ये खरच माहीती नव्हत. म्हणजे मी जोर अन स्क्वॅटस करतोय रोज :)
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अगदी मान्य....

डॉ श्रीहास
Tue, 11/08/2016 - 17:05 नवीन
करतो हेच पण शब्दात मांडणी नाही जमलं _/\_
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

बर्पी बद्दल सांगाल ..

डॉ श्रीहास
Tue, 11/08/2016 - 17:50 नवीन
Burpee बद्दल कन्फुजन आहे... त्याबद्दल सांगा
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

www.misalpav.com/node/26718

वेल्लाभट
Tue, 11/08/2016 - 17:58 नवीन
एकच व्यायाम सर्वांगाचं काम - बर्पी
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

धन्यवाद...

डॉ श्रीहास
Tue, 11/08/2016 - 18:48 नवीन
उत्तम माहीती _/\_
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

आजच व्यायाम

अमर विश्वास
Tue, 11/08/2016 - 17:01 नवीन
आजच व्यायाम वॉर्म अप : 10 मिनिटे इंटर्वल ट्रेनिंग (HIIT) : (4+4) * 4 = 32 मिनिटे रोयिंग मशीन : 15 मिनिटे बॉडीवेट वर्काउट : 20 मिनिटे स्ट्रेचिंग 15 मिनिटे

१25 डंबेल्स आणि वावरात

Ram ram
Tue, 11/08/2016 - 19:12 नवीन
१25 डंबेल्स आणि वावरात कुदळ्या मारल्या

तेच आपल नेहमीच.....

विखि
Tue, 11/08/2016 - 23:20 नवीन
३ सेट दोरीच्या उड्या ४ सेट बॅक पूल अपस ४ सेट डीप्स उन्च उड्या ६ मजले चढले :)

मी काल केलेला व्यायाम

अरिंजय
Wed, 11/09/2016 - 06:53 नवीन
Image removed. मी काल ११० किमी सायकल चालवली. स्ट्रावा या अॅप वरचे ग्रॅन फोंडो हे आव्हान पुर्ण केले. सकाळी ७ वाजता सायकल चालवायला सुरुवात केली आणि दुपारी सव्वा दोनला घरी परतलो. या प्रवासात एक १५ किमी चा खराब पट्टा लागला. अतिशय दळभद्री रस्ता. त्यात १.५ किमी चा छोटा घाटवजा चढ. रस्ता इतका खराब की सायकल चालवणे अवघड, वेगच घेता येत नव्हता. अंगावर येणारे ३ चढ पायी पायीच पार करावे लागले. छोटे छोटे चढ सुद्धा सायकल हातात घेऊन पार करावे लागले. या पट्ट्यामुळेच थोडा उशीर झाला. बाकी प्रवासात काहीही त्रास झाला नाही.

जबराट..._/\_

डॉ श्रीहास
Wed, 11/09/2016 - 11:06 नवीन
फारच जोरदार ते पण बिना गियर !!!
↩ प्रतिसाद: अरिंजय

८-११-१६ व ९-११-१६

वेल्लाभट
Wed, 11/09/2016 - 10:44 नवीन
८-११-१६ १ किमी धावलो ९-११-१६ फारच माफक पण २५ जोर फक्त.

वॉर्मअप अधिक पाच जोर.

एस
Wed, 11/09/2016 - 10:54 नवीन
वॉर्मअप अधिक पाच जोर.

आजचं सायकलींग....

डॉ श्रीहास
Wed, 11/09/2016 - 11:02 नवीन
४०.६२ किमी, १:३६ तास,२५.२ किमी/तास,१६०४ उष्मांक ....

सायकलींग....

प्रशांत
Wed, 11/09/2016 - 11:21 नवीन
दि. ०८/११/२०१६: २० किमि सायकल घर-ऑफिस-घर आजचं सायकलींग: ३७.६,१:४० तास,२२.६ किमी/तास

आज लोअर बॅक / कोअर आणि ऍब्स चा दिवस..

अमर विश्वास
Wed, 11/09/2016 - 14:26 नवीन
आज लोअर बॅक / कोअर आणि ऍब्स चा दिवस.. 5 किमी ट्रेडमिल (32 मिनिटे.. टार्गेट 30 मिनिटे) डेड लिफ्ट्स बेंटओवर रोयिंग हाइपर एक्सटेंशन प्लॅंक्स भुजंगासन सीट अप क्रंच लेग रेजेस ऑब्लीक्स

आज घरातल्या नोटा शोधल्या... =

संदीप डांगे
Wed, 11/09/2016 - 14:30 नवीन
आज घरातल्या नोटा शोधल्या... =))

सॉरी, अवांतराबद्दल. :(

संदीप डांगे
Wed, 11/09/2016 - 14:30 नवीन
सॉरी, अवांतराबद्दल. :(

घरात सापडलेल्या प्रत्येक

अमर विश्वास
Wed, 11/09/2016 - 14:38 नवीन
घरात सापडलेल्या प्रत्येक १००० रुपयाच्या नोटेसाठी एक जोर आणि पाचशेच्या नोटेसाठी बैठका मारा ... भरपूर व्यायाम होईल

आज व्यायाम केला का?

पाणीपुरी
Wed, 11/09/2016 - 15:12 नवीन
धागा अत्यंत motivational आहे पण धाग्याला उत्तर खूप पुरुष लोकांचे आहेत!महिला वर्ग कमी!खूपदा ईच्छा असून पण प्रापंचिक जबाबदाऱ्या मूळे जमत नाही!

धागा मस्त आहे आणि

पाणीपुरी
Wed, 11/09/2016 - 15:28 नवीन
धागा मस्त आहे आणि motivational पण बऱ्याच प्रतिक्रिया पुरुषांच्या आहेत,महिलांना प्रापंचिक जाबाबदारी मूळे जमत नाही!

हा मुद्दा मी अनेकदा ऐकलाय ....

अमर विश्वास
Wed, 11/09/2016 - 15:42 नवीन
पाणीपुरी .... हा मुद्दा मी अनेकदा ऐकलाय .... या धाग्यावर महिलांचा प्रतिसाद कमी आहे.. पण त्याचवेळी मराठी मालिकांच्या धाग्यांवर उदंड प्रतिसाद मिळतो... प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे व्यायामाला वेळ नाही.. पण मालिका बघायला आहे... प्रत्येकाकडे दिवसाचे २४ तासच असतात ... या २४ तासात काय करायचे / कशाला प्राधान्य द्यायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्या स्वात:पुरते : जर मी स्वात: साठी दिवसातली ३० मिनिटेही काढु शकत नसेन तर मला आत्मपरीक्षणाची गरज आहे असे मी समजतो.

आहो मालिका बघायला मुळात tv च

पाणीपुरी
Wed, 11/09/2016 - 16:42 नवीन
आहो मालिका बघायला मुळात tv च आवडत नाही,आणि बघायला वेळ पण मिळत नाही,खरंच!त्यामुळे फालतू सेरिअल्स मध्ये नो इंटरेस्ट आणि स्वतःच्या संसाराच्या खूप गोष्टी चर्चा करण्या सारख्या असल्याने दुसरऱ्या च्या संसारात काय चाललाय यात काही रुची नाही!

आहो मालिका बघायला मुळात tv च

पाणीपुरी
Wed, 11/09/2016 - 16:45 नवीन
आहो मालिका बघायला मुळात tv च आवडत नाही,आणि बघायला वेळ पण मिळत नाही,खरंच!त्यामुळे फालतू सेरिअल्स मध्ये नो इंटरेस्ट आणि स्वतःच्या संसाराच्या खूप गोष्टी चर्चा करण्या सारख्या असल्याने दुसरऱ्या च्या संसारात काय चाललाय यात काही रुची नाही!

मी आजच पाहिला हा धागा

बेकार तरुण
Wed, 11/09/2016 - 19:21 नवीन
मी आजच पाहिला हा धागा मी गेले काही वर्ष नियमित धावपळ करत आहे, आधी अत्यंत जाड होतो, आता बर्‍यापैकी बारीक झालेलो आहे सध्या साधारण आठवड्यातील ५ दिवस मी ४ किमी/दिवस असे पळतो, आणी शनिवारी बॅड्मिंटन / क्रिकेट खेळतो, रविवारी फक्त आराम. आजचा व्यायाम - आज ९ किमी पळलो, सकाळी ट्रेडमिलवर (पाउस असल्याने) ५ किमी आणी संध्याकाळी मुलीला सायकल चालवायची प्रॅक्टिस म्हणुन ती सायकल आणि मी पळत असे ४ किमी मी रनकीपर अ‍ॅप वापरतो आणी फिटबिट ब्लेझ, लै भारी वाटते रनकीपरवर काही एक हजार किमी धावपळ केली आहे ते बघुन !! मला वजने उचलायचा जाम कंटाळा येतो, पण आता जिमही चालु करावे असे वाटत आहे, गेले काही वर्ष मी फक्त आणी फक्त पळतो पण खूप लोकांनी सांगितले की जिमही केलेच पाहिजे थोडे ! कन्फ्युज्ड आहे, कृपया सल्ला द्यावा.

२१ वर्ष

नमकिन
Wed, 11/09/2016 - 22:43 नवीन
१० वी नंतर व्यायामशाळा लावली होती. पण आजपर्यंत २१ महिने व्यायाम झालेला नाहीं एकूण. तरी कधी पोहणे, चालणे, योगासन इ इ प्रकारें हालचाल असायची. असो, वजन ६०-६५ किलोग्राम, ऊंची १६९सेमी, वय ३७. मागील ३ महिन्यांपासून नियमित संध्याकाली १ तास व्यायामशाळेत घालवतो. सुरुवात २०मि शरीर ताणतो व तापवतो (वॅार्म अप) पुढील २० मि- शारीरिक वजनाचे व्यायाम - ६० जोर, ५-५ बैठका ( Squats) शेवटाल्या २० मि- १० मि ०-७-३किमी/तास धावपट्टा व नंतर १० मि- सायकल किंवा १०मि - पोटाचे /पाठीचे झोपून व्यायाम पुलअप्स करताना डावा खांदा २०वर्ष दुखतोच, म्हणून सध्या नाद सोडलाय. आता वजनी मशीन चे पण व्यायाम सुरु केलेत. कधी कधी सर्वांगीण व्यायाम करतो तर कधी अवयव ठरवून करतोय. फरक जाणवतोय. फिरती नोकरी असल्याने नियमित करता रहाते पण आता पुढचे तिमाही चे पैसे भरणार, हे नक्की. एक प्रश्न - १ तास आधी वा नंतर काही खाऊ-पिऊ नये व्यायामात असे म्हणतात, त्यामुळे जेवून झोपायला (१ तासाने) उशीर होतो. तर साधारण कुठले दमवणूकीचे व्यायाम असतील तरंच १ तास वेळमर्यादा पाळावी की सरसकट?

ऍक्टिव्हिटी ट्रॅकर ऍप बद्दल

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 11/10/2016 - 06:25 नवीन
ऍक्टिव्हिटी ट्रॅकर ऍप बद्दल कोणी उद्बोधन करू शकेल काय ?

हे दोन्ही बघून घ्या एकदा..

डॉ श्रीहास
गुरुवार, 11/10/2016 - 12:25 नवीन
Endomondo आणि STRAVA , जे बरं वाटेल ते वापरा( दोन्हीही फुकट उपलब्ध आहेत),मी दोन्ही वापरलेत ... उत्तम आहेत
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

वॉर्म अप + दहा जोर.

एस
गुरुवार, 11/10/2016 - 08:09 नवीन
वॉर्म अप + दहा जोर.

आजची हाफ सेन्चुरी राईड...

डॉ श्रीहास
गुरुवार, 11/10/2016 - 09:37 नवीन
५१ किमी, २.०९ तासात, १८७० उष्मांक/कॅलरीज्, सरासरी वेग २३.६ किमी/तास.....
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा