Skip to main content

सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 01/11/2016 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
. डॉ जुलाबचंद एनिमावाला एनिमालॉजिस्ट आहेत. त्यांनी अन्न -विष्ठा संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असल्यास एकाद्या पिडीएफमधे वाचता येतील. त्यात अन्न -विष्ठा संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (एनिमाचे भांडे ) इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख कोणत्याही विशिष्ट भांड्याची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की. तर मुद्दा असा की वरकरणी डॉ जुलाबचंद एनिमावालांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि खादाडपणा वरुन स्त्री-पुरुषात वाद दिसले तरी ते जिव्हेची अतृप्ती आणि आतड्याचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून ते निर्माण होतात. याचा अर्थ जिव्हेला तृप्त करुन कोणीही पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना जिव्हातृप्त स्त्री-पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ अजिबात साधता आले नाहीत तरी सहज रेचन साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.

वाचने 6705
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by भालचंद्र_पराडकर

भ्रामक आणि भंपक महागुरुचा, स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू समजणा-या भंपक महाभागाचा खुरादा उडवलेबद्दल धप्यवाद

हा केवळ तात्कालीन मौजमजेचा धागा असल्याने एक दोन दिवसात उडवून टाकावा, ही संपादक मंडळास विनंती.

जबरी!

चित्रगुप्त, बस्ती म्हंटलं की मला तो सरकारी महात्माच आठवतो. आ.न., -गा.पै.

भारी

कोना एका व्यक्तिचा हिशेब चुकता होत असल्यामुळे विडंबनाला प्रतिसाद भरपूर मिळतील. पण मजा आली नाही.कानडाऊ योगेशु ची एक कविता होती - "नको वाळवुस तु असे.. केस ओलेचिंब उन्हात.. वणवा पेटतो गं माझ्या. हळव्या नाजुक मनात.." याला अनुरूप चित्र आणि मग विडंबन पेरायला पाहिजे होतं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा ! :) -दिलीप बिरुटे

पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असे ऐकले होते. हे ते मार्गक्रमण करण्याचे साधन आहे का ?