✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ

स
संजय क्षीरसागर यांनी
Fri, 10/28/2016 - 01:01  ·  लेख
लेख
डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख त्यांच्या रिंगची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की. तर मुद्दा असा की वरकरणी डॉ वेरेकरांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि पारस्पारिक आदर आणि समानता यावरुन स्त्री-पुरुष संबंधात वाद दिसले तरी ते स्त्रीची अतृप्ती आणि पुरुषाचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून निर्माण होतात. याचा अर्थ स्त्रीला कामतृप्त करुन पुरुष पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना प्रणयतृप्त स्त्री आणि पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला अर्थ आणि मोक्ष हे पुरुषार्थ अचंबित होण्याइतपत साधता आले नाहीत तरी, काम हा पुरुषार्थ साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
82832 वाचन

💬 प्रतिसाद (252)

प्रतिक्रिया

छोड़ दो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/01/2016 - 13:35 नवीन
माणुस म्हटलं उन्नीस बीस चालायचंच मोदकसेठ. माझीच जिलेबी भारी आणि मी म्हणेल तीच जिलेबी भारी अशी "मी मी मिरवणारी" खुप लोक आहेत मिपावर काही दिसतात काही नाही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

समोरच्यावर एक बोट रोखलेलं असताना

बोका-ए-आझम
Tue, 11/01/2016 - 13:40 नवीन
चार बोटं स्वतःवर रोखलेली असतात हे लोक्स का विसरतात ते कळत नाही. (अज्ञ विद्यार्थी) बोका-ए-आझम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपला आदेश डोक्याडोळ्यांवर

मोदक
Tue, 11/01/2016 - 14:36 नवीन
आपला आदेश डोक्याडोळ्यांवर प्राडॉ..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हायला, असल्या धाग्यांना

अप्पा जोगळेकर
Tue, 11/01/2016 - 14:31 नवीन
हायला, असल्या धाग्यांना जिलबीची उपमा देऊन'जिलबी' या सुंदर पदार्थाचा आणि ती बनवणार्‍या आचार्‍यांचा कशाला अवमान करता भाऊ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

प्राध्यापक साहेब

सुबोध खरे
Tue, 11/01/2016 - 13:41 नवीन
प्राध्यापक साहेब मी कोण हो चूक कि बरोबर सांगणारा? ते प्रत्येकाने स्वतः शोधायचे असते. वैद्यकाची चार बुकं शिकली कि माणूस सर्वज्ञ होत नाही. संक्षी यांनी दिलेला दुवा ज्या डॉक्टरांचा आहे त्यांच्या (डॉ प्रकाश वेरेकर) दाव्यातील फोलपणा आणि शाब्दिक कोलांट्या मी दाखवल्या एवढेच. मुळात स्त्रीपुरुष संबंधाचा संभोग हा एक पैलू आहे. यातील संभोग आणि त्याचा स्त्री/पुरुषांवर होणार परिणाम हा एक अत्यंत मोठा आणि गहन विषय आहे या पूर्ण विषयावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे अर्थात मी जर लिहिलं तर ते फक्त या विषयाचा वैद्यकीय अंगाचा एक पैलू असेल एवढंच. एखाद्या संगीताच्या अभ्यासकाने एखाद्या रागाबद्दल काही विवेचन केल्यासारखे. त्याला तो राग गाता येईल असेही नाही. माझं म्हणणं एवढंच आहे कि अंतिम सत्य फक्त मलाच गवसलं आहे असे कुणी म्हणून नये किंवा मला गवसलं तेच अंतिम सत्य आहे असंही म्हणू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसले असहिष्णू आणि अप्रगल्भ आहात हो तुम्ही डाॅक!

बोका-ए-आझम
Tue, 11/01/2016 - 13:38 नवीन
एवढ्या जबरदस्त आध्यात्मिक अनुभवाबद्दल असं लिहवतं कसं तुम्हाला म्हणतो मी! प्रस्तुत धागाकर्ते बोलले म्हणजे साक्षात कामदेव बोलला हे माहित आहे ना तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

निराकार पोकळीवरुन आठवले,

सतिश गावडे
Tue, 11/01/2016 - 12:10 नवीन
निराकार पोकळीवरुन आठवले, निराकार गाढव नाही आले अजून या धाग्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

गाढवाला गुळाची....

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 11/01/2016 - 12:12 नवीन
गाढवाला गुळाची.....आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र रिंगेची गरज काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

गाढवाला गुळाची....

टवाळ कार्टा
Tue, 11/01/2016 - 12:53 नवीन
गाढवाला गुळाची.....आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र रिंगेची गरज काय? =))
या अर्थाने वरचे वाक्य बरोबरच आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

बाकी माझा हा विडंबनाचा धागा

मराठी कथालेखक
Tue, 11/01/2016 - 14:47 नवीन
बाकी माझा <सॉफिस्टिकेटेड> हा विडंबनाचा धागा संमनी पुन्हा जिवंत करण्यास हरकत नसावी... इतकाही वाह्यात नव्हता हो..
  • Log in or register to post comments

नक्की नक्की, अनुमोदन!

संदीप डांगे
Tue, 11/01/2016 - 14:53 नवीन
नक्की नक्की, अनुमोदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

धन्यवाद

मराठी कथालेखक
Tue, 11/01/2016 - 15:00 नवीन
अन्य मिपाकरांना अनुमोदनाकरिता विनंती ,आवाहन. कृपया भरभरून पाठिंबा द्यावा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

दुरुस्ती

मराठी कथालेखक
Tue, 11/01/2016 - 15:03 नवीन
बाकी माझा "(सॉफिस्टिकेटेड)" हा विडंबनाचा धागा संमनी पुन्हा जिवंत करण्यास हरकत नसावी
असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

एका साध्याश्या, रोजच्या जगण्यात उपयोगी होईलशा पोस्टला

संजय क्षीरसागर
Tue, 11/01/2016 - 15:03 नवीन
किती भरकटवलं गेलं. एकतर हा धागा रिलेशनशीपच्या फिजिकल परिमाणावर आहे. त्यात टाईम लॅग हा उघड इश्यूच इथले सदस्य काय वैद्यकसुद्धा मान्य करत नाहीत तर चर्चा कशी होईल. आणि बेडरुम टू बोर्ड (पोस्ट व्यक्तिगत प्रश्नाचं सार्वत्रिकरण आहे) असा स्टँड घेतला तर मग बोलणंच संपलं. प्युबिस रिंग निर्धोक आहे किंवा नाही हे किमान एकदा वापरुन पाहिली तर कळेल. ज्याप्रमाणे खेळतांना प्लेअर्स रिस्ट बँड बांधतात तसा रिंगाचा सपोर्ट आहे. पण एखादी एक्स्ट्रीम केस किंवा priapism शी रिंगचा संबंध जोडून धसका निर्माण केला तर टाईम लॅग सोडवायला दुसरा उपाय काय तर मंत्र ! पॉज हा सामान्यातल्या सामान्य माणसानं सुद्धा केलेला प्रयोग असेल पण तो किती तकलादू आहे याचा अनुभव नसेल असं नाही. मग तो मुद्दा लढवण्यात काय हशील आहे? विवाहसंबंधातल्या मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंवर या पोस्टमधे विवेचन व्हावं अशी अपेक्षा केली आहे. मारवांना दिलेल्या प्रतिसादात, विषयाला अनुसरुन जमेल तितका मानसिक पैलूचा उलगडा केला आहे. अध्यात्मिक परिमाणावर चर्चा होऊ शकेल असा माझ्या मते तरी हा फोरम नाही.
  • Log in or register to post comments

ओ गुरूजी....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/01/2016 - 15:28 नवीन
>>>>> प्युबिस रिंग निर्धोक आहे किंवा नाही हे किमान एकदा वापरुन पाहिली तर कळेल. संक्षिसेठ, आता तुम्ही रिंग बद्दल माहिती सांगितली. अनुभव सांगितला. आता वापरायचा हट्ट नका धरु राव. रिंग बद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. आता नवीन गझल वगैरे विषय घ्या...! बाकी, कोनाशी वैचारिक भांडन वगैरे फार लांबवू नका. मै तो चला ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

डिबी !

संजय क्षीरसागर
Tue, 11/01/2016 - 15:43 नवीन
कुणी हट्ट धरावा आणि इतरांनी तो अनुसरावा अशी परिस्थिती इंटरनेटवर तरी नाही. बाकी तुमच्या सर्व प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. नवी गज़ल नक्कीच घेईन पण ही पोस्टसुद्धा त्याच रोमँटिसिझमचा गद्य अविष्कार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणते अध्यात्मिक परिणाम ?

चित्रगुप्त
Wed, 11/02/2016 - 04:00 नवीन
अध्यात्मिक परिमाणावर चर्चा होऊ शकेल असा माझ्या मते तरी हा फोरम नाही.
नसेना का तेवढी लायकी मिपाकरांची, पण एवढ्या तळमळीनं नारीजातीच्या कल्याणाचा विडा उचललाय, तर इथेच सांगा ना रिंगेचे अध्यात्मिक परिणाम. शंभरातल्या एका तरी कळेल ना काहीतरी, की तेवढीही लायकी नाही तुमच्या मते मिपाकरांची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

. त्यात टाईम लॅग हा उघड

सुबोध खरे
Tue, 11/01/2016 - 15:14 नवीन
. त्यात टाईम लॅग हा उघड इश्यूच इथले सदस्य काय वैद्यकसुद्धा मान्य करत नाहीत तर चर्चा कशी होईल. हा निष्कर्ष आपण कशावरून काढला?
  • Log in or register to post comments

मला तरी त्या इश्यूवर फोकस करणारा

संजय क्षीरसागर
Tue, 11/01/2016 - 15:34 नवीन
एकही प्रतिसाद इथे दिसला नाही. आणि तसं झालं असतं तर चर्चेनं वेगळं वळण घेतलं असतं. कदाचित तुम्ही आता मान्य करत असाल तर तदनुषंगिक मुद्दे असे येतील : > टाईम गॅप आहे > टाईम गॅप हा स्त्रीच्या प्रणय तृप्तीतला (किमान फिजिकल लेवलवर तरी) मुख्य घटक आहे > सेक्श्युअल कंपॅटीबिलिटी आणि सटायटी (अर्थातच दोघांचीही) जोडप्यातले विसंवाद बरेच कमी करते आणि इतर बरेच प्रश्नही शांतपणे हाताळले जातात असा निष्कर्ष बर्‍याच मनोविकारतज्ज्ञांच्या अभ्यासातून दिसतो (सातीजींचा प्रतिसाद) > टाईम गॅप मॅच करायचा उपाय (आणि तोच तर या धाग्याचा विषय आहे). मी सुरुवातीच्या प्रतिसादात म्हटलंय की वेरेकरांना वगळून टाईम गॅप आणि स्त्रीची (फिजिकल लेवलवर) अतृप्ती यावर चर्चा झाली असती तर बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

प्रस्तुत धागालेखक अध्यात्मिक

श्रीगुरुजी
Tue, 11/01/2016 - 15:39 नवीन
प्रस्तुत धागालेखक अध्यात्मिक तत्वज्ञ व 'काम'सू दिसतात. अध्यात्म व कामशास्त्र या दोन्ही क्षेत्रात एक्सपर्ट असलेले एक महान अवतारी युगपुरूष २० व्या शतकात भारतात होऊन गेले होते. त्यांनी मिपावर पुनर्जन्म घेतलेला दिसतो.
  • Log in or register to post comments

इशारा ओशोंकडे असेल तर

संजय क्षीरसागर
Tue, 11/01/2016 - 15:53 नवीन
त्यांच्याशी जोडलं जाणं हे माझ्या दृष्टीनं भाग्याचं लक्षण समजतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ओशो सुद्धा रिंग वापरायचे का?

श्रीगुरुजी
Tue, 11/01/2016 - 17:46 नवीन
ओशो सुद्धा रिंग वापरायचे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

टाईम लॅग म्हणजे काय? जेट लॅग

सतिश गावडे
Tue, 11/01/2016 - 15:49 नवीन
टाईम लॅग म्हणजे काय? जेट लॅग सारखे काही असत का?
  • Log in or register to post comments

मला पण टाइम लॅग म्हणजे काही

खटपट्या
Tue, 11/01/2016 - 18:05 नवीन
मला पण टाइम लॅग म्हणजे काही माहीती नाही. पण संक्षींसरांच्या मते जर संभोग लांबवणे म्हणजे स्त्रीला त्रुप्त करणे असेल. तर संभोग लांबवण्यासाठी काही योग्याभ्यास आहेत. बाकीचेही उपाय आहेत. लोकलज्जेस्तव मी इथे ते सांगू शकत नाही. संक्षीसरांना याबाबत खाजगीत सांगायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

लोकलज्जेस्तव मी इथे ते सांगू

सतिश गावडे
Tue, 11/01/2016 - 20:27 नवीन
लोकलज्जेस्तव मी इथे ते सांगू शकत नाही.
याचाच दुसरा अर्थ असा की तुम्ही प्रगल्भ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आपण रिंग वापरतो हे सांगायला

सूड
Tue, 11/01/2016 - 16:59 नवीन
आपण रिंग वापरतो हे सांगायला एखादी एवढा द्राविडी प्राणायाम करु शकते तर!!
  • Log in or register to post comments

आपण रिंग वापरतो हे सांगायला

सूड
Tue, 11/01/2016 - 17:00 नवीन
आपण रिंग वापरतो हे सांगायला एखादी व्यक्ती* एवढा द्राविडी प्राणायाम करु शकते तर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वशाडी येवो

पैसा
Tue, 11/01/2016 - 17:33 नवीन
त्यांचा प्रामाणिकपणा बघ. जल्लां मेलां तुमान्ला काय कवतुकच नाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मिसेस संक्षि बद्दल मनात

मितान
Tue, 11/01/2016 - 18:00 नवीन
मिसेस संक्षि बद्दल मनात कमालीची करुणा दाटून आली. आपले खाजगीपण असे जाहीर उधळलेले त्या माउलीला नक्कीच माहीत नसणार किंवा सहन करावे लागत असणार !
  • Log in or register to post comments

असा नवरा सहन करावा

कविता१९७८
Tue, 11/01/2016 - 20:55 नवीन
असा नवरा सहन करावा लागण्याइतकी काय मजबुरी असु शकेल??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

सहमत

अजया
Tue, 11/01/2016 - 18:24 नवीन
पत्नी म्हणजे प्रयोगशाळेतले चंचुपात्र असते का संसारातले? मी कसे वेगवेगळे प्रयोग करतो पत्नीवर हे ओपन फोरमवर न सांगता लेख असता तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानले असते.ज्या माणसाला आपण पत्नीची प्रतिष्ठा जपत नाहीये हे कळत नाही त्यांनी पत्नीला मिळणार्या कामतृप्तीची चर्चा करणे हा प्रचंड संभावितपणा आहे.खरंतर विकृतीकडे झुकणारा. सौ संक्षींसाठी अतिशय वाईट वाटत आहे.
  • Log in or register to post comments

आंतरजाल आहे

पैसा
Tue, 11/01/2016 - 18:27 नवीन
त्यांच्यापर्यंत हे पोचत नसेलच का? समजा त्या मिपावर किंवा अनाहितामध्ये असल्या तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

समजा त्या मिपावर किंवा

सूड
Tue, 11/01/2016 - 18:32 नवीन
समजा त्या मिपावर किंवा अनाहितामध्ये असल्या तर?
तर एव्हाना दिवाळी साजरी होऊन शिमगा देखील सुरु झाला असेल. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

समजा त्या मिपावर असल्याच आणि

टवाळ कार्टा
Tue, 11/01/2016 - 19:02 नवीन
समजा त्या मिपावर असल्याच आणि त्यांना काही वावगे वाटले नसल्यास?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खिखिखि!

पैसा
Tue, 11/01/2016 - 19:05 नवीन
एवढ निरागस फक्त लग्न न झालेला शोनुच असू शकतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मग, आहेच मी निरागस

टवाळ कार्टा
Wed, 11/02/2016 - 07:47 नवीन
मग, आहेच मी निरागस बाकी मिपाचे साचलेपण घालवायला आणि आपण प्रगल्भ आहोत हे दाखवायला "तसली खेळणी" या विषयावर धागा काढावा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तसली म्हणजे?

पैसा
Wed, 11/02/2016 - 11:55 नवीन
तसली म्हणजे कसली? - यत्ता दुश्ली ब निरागस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

समजा त्या मिपावर असल्याच आणि

अप्पा जोगळेकर
Tue, 11/01/2016 - 19:08 नवीन
समजा त्या मिपावर असल्याच आणि त्यांना काही वावगे वाटले नसल्यास? तर त्यांना अगदी योग्य जोडीदार मिळाला असे म्हणता येईल. पण उद्या त्यांनासुद्धा त्यांचे वैयक्तिक अनुभव इथे न टंकण्याची बुद्धी झाली तर सदस्यांवर मेहेरबानी होईल. जर त्यांनाही वावगे वाटत असेल तर वरच्या दया ,करुणा इत्यादी भावनांशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्यांनी जो अनुभव लिहिलाय

बोका-ए-आझम
Tue, 11/01/2016 - 19:29 नवीन
तो त्यांना प्रत्यक्षात आलाय असं तुम्ही गृहीत का धरतात? जर हा सगळा लेखकाचा कल्पनाविलास असला तर? पुलंनी ' मी आणि माझा शत्रुपक्ष ' मध्ये लिहिल्याप्रमाणे - दाखवायला आणलेल्या पहिल्या चि.सौ.कां.च्या गळ्यात माळ घालणाऱ्या अनेक लेखकांनी प्रेमकथा आणि कादंबऱ्या नाही लिहिल्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मला वाटतं आक्षेप रिंगने

पिलीयन रायडर
Tue, 11/01/2016 - 19:39 नवीन
मला वाटतं आक्षेप रिंगने आलेल्या अनुभवांवर नसुन; "हा प्रतिसाद लिहीण्याच्या आधी जस्ट रिंग वापरुन आलोय" ह्या वाह्यातपणाला आहे.. तुमचा नाहीये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

जेव्हा ते मी लेख लिहिण्याआधीच

अजया
Tue, 11/01/2016 - 19:49 नवीन
जेव्हा ते मी लेख लिहिण्याआधीच रिंग वापरून बघितली लिहितात तेव्हा ते भलेही कल्पना रंगवताना असले तरी पत्नीला पात्र म्हणून वापरत आहेत.आणि त्यात अशा प्रकारे एका स्त्रीचा उल्लेख होणे हा खटकणारा भाग आहे.यावर आक्षेप आहे.कोणत्या स्त्रीला तिच्या कामतृप्तीची चर्चा नवरा ओपन फोरमवर करतो हे वाचायला आवडेल? तिचा असा उल्लेख केला गेलाय याची तिला कल्पना नसताना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सहमत

श्रीगुरुजी
Tue, 11/01/2016 - 22:52 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अर्थातच आहे.

बोका-ए-आझम
Wed, 11/02/2016 - 01:15 नवीन
मुळात स्वतःचे असे intimate अनुभव मांडणं - खरे किंवा काल्पनिक - आणि तेही ज्या व्यक्तीबरोबर तो अनुभव घेतलाय त्या व्यक्तीच्या भावनांचा विचार न करता - हे घृणास्पद आहे. पण कसं आहे की माणसाचं मन fantasize करु शकतं. तशी fantasy धागाकर्त्याने मनात कल्पिलेली असण्याचा एक benefit of doubt त्यांना देणं किंवा निदान तसा विचार करणं हे आपण करु शकतो. पैसाताईंनी मागे एकदा एका लेखाच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे - इथे आंतरजालावर लोक एकमेकांना प्रत्यक्ष पाहू शकत नसल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया या टोकाच्या असतात. तशा प्रतिक्रिया ते समोरासमोर भेटल्यावर देणार नाहीत. मीही धागाकर्त्याने असं का लिहिलंय यावर वैतागलो होतोच. पण ही एक शक्यता मी विचारात घेतली, एवढंच. (हुश्श!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

बोकेशा, हाईट आहे राव तुमची!

संदीप डांगे
Wed, 11/02/2016 - 01:21 नवीन
बोकेशा, हाईट आहे राव तुमची! इतका निरागसपणा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सर्वसाधारणपणे हे बरोबर असले

सतिश गावडे
Wed, 11/02/2016 - 07:33 नवीन
सर्वसाधारणपणे हे बरोबर असले तरी यालाही अपवाद असतात. माझ्या पलीकडे एक सोसायटी सोडून एक मिपाकर राहत असे. तो समोर आला की माझ्याशी जिभेवर साखर ठेऊन बोलत असे. मात्र मिपावर मी काही प्रतिसाद दिला रे दिला की हा त्यावर तुटून पडत असे. हातात भाकरी घेऊन लहान मूल अंगणात आले की कावळा जसा झडप घालतो तसा. मात्र हा अपवादात्मक अनुभव झाला. बहुतांशी वेळा एखाद्या व्यक्तीशी प्रत्यक्ष भेट झाली की प्रतिसादात तुटून पडणे अवघड जाते; प्रोव्हायडेड दॅट तुमच्यातील मतभेद विकोपाला गेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कोण हो ते मिपाकर?

टवाळ कार्टा
Wed, 11/02/2016 - 07:41 नवीन
कोण हो ते मिपाकर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

जे तुमच्या मनात आहेत ते नाही.

सतिश गावडे
Wed, 11/02/2016 - 08:26 नवीन
जे तुमच्या मनात आहेत ते नाही. ते समोर राहतात. आणि ते लाखोलीच्या ऐवजी पुरणपोळी खाऊ घालतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कदाचित त्यांचं लग्न झालंय हीच

मराठी कथालेखक
Wed, 11/02/2016 - 14:06 नवीन
कदाचित त्यांचं लग्न झालंय हीच एक फॅन्टसी (त्यांची) असेल आणि प्रत्यक्षात ते अविवाहित असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मी मागवलेल्या रिंगला बीडस

सूड
Tue, 11/01/2016 - 22:57 नवीन
मी मागवलेल्या रिंगला बीडस आहेत त्यामुळे क्लिटोरल स्टिम्युलेशन उत्तम होतं शिवाय ती अत्यंत उच्च दर्जाच्या सिलीकॉनपासून बनवल्यामुळे कमालीची सॉफ्ट आहे.
हे वाचून देखील तुम्हाला वाटतं की मिपाकर गृहीत धरत आहेत? आता कोणी काय आणि किती मोकळेपणाने सांगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण जी गोष्ट सांगतोय ती आपल्यापुरती मर्यादित नसून काही अंशी जोडीदाराशीही संबंधित आहे याचं भान असावं. आणि आता सांगतच आहे तर मिपाकरांचा अज्ञानातून उद्धार करायला आपला अवतार झालाय असे आव आणू नयेत. मूळ मुद्द्यावर यावेत. या अशा स्वभावावर मला एक मिपाच्याच एका कट्ट्यात ऐकलेला संवाद नेहमी आठवतो...तो येणेप्रमाणे (अर्थात पात्रांची नावं बदलून): "सुमे तुला सांगते शेजारणीचा चकलीचा सोर्‍या पाहून मी माझ्या नवर्‍याकडे धोशाच लावला मलाही असाच सोर्‍या हवा. तात्पुरता म्हणून जावेच्या माहेरुन सोर्‍या घेऊन आले. माझ्या जावेचं माहेर म्हणजे ते अत्तर वाले केळकर आहेत कीनईऽऽऽ, ते!!" वरील सगळ्या पाल्हाळात जसा सोर्‍या हा महत्वाचा नसून शेवटचं बडेजावाचं वाक्य अधोरेखित करायचं आहे, त्यातलाच एकूण प्रकार हा धागा आहे. असे लोक प्रचंड डोक्यात जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तंतोतंत!

संदीप डांगे
Tue, 11/01/2016 - 23:40 नवीन
तंतोतंत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा