✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

राज ठाकरे यांचे काय चाललेय?

आ
आशु जोग यांनी
Wed, 10/23/2013 - 16:32  ·  लेख
लेख
काही वर्षांपूर्वी राजसाहेब ठाकरे सेनेतून बाहेर पडले .. त्यांनी मराठी आणि विकास हे मुद्दे उचलून धरले. तेव्हा महाराष्ट्राला नवनिर्माणाच्या काही आशा निर्माण झाल्या होत्या. त्याचं प्रतिबिंब मतांमधेही दिसून आलं... पण काही प्रश्न निर्माण होतातच. राज यांनी बांगलादेशींच्या हिंसाचाराचा निषेध करणारा मोर्चा आझाद मैदानावर नेला त्यावेळी "आता यापुढे आपण हिंदुत्त्ववाचा मुद्दा उचलून धरणार का ? " असं विचारल्यावर त्यांनी हिदुत्त्व झटकून टाकलं. "छे छे हिंदुत्त्व वगैरे मला चिकटवू नका" असं उत्तर होतं. हिंदुत्त्वाचा इतका तिटकारा का असावा ... राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते उघडपणे टीका करतात पण आतून सगळ्यांशी सगळीकडे घरोबा करतात. याबाबत सेनेनी टीका केल्यावर म्हणतात "सेनेनी तरी सुरुवातीच्या काळात दुसरं काय केलं ? " राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते टीका करतात. अपवाद फक्त - शरद पवार. त्यांचा उल्लेख ते पवारसाहेब असाच करतात. मधे टोलविरोधी आंदोलन हाती घेतले. ते पुढे का बंद पडले ? मोदींच्या गुजरातचं त्यांना केवढं कौतुक पण मोदींचे हात बळकट करावेसे मात्र वाटत नाहीत. मागच्या २००९ च्या विधानसभा निवडणूकीत सेना-भाजप युतीचे जवळपास ४४ उमेदवार मतविभागणीमुळे पडले. पुणे लोकसभेचे उदाहरण सर्वांसमोर आहे. काँग्रेसला भाजपपेक्षा २८००० मते अधिक मिळाली. मनसेने मते मिळवली ७६०००. ही मतविभागणी झाली नसती तर ! बरं याचा फायदा उठवून पुण्यात कोण विजयी झाले ? सुरेश कलमाडी. म्हणजे नेमका फायदा कुणाला होतोय. विचारावसं वाटतं... "आता गप्प बसायला काय घ्याल(टोलबद्दल) ? तसं आता निवडणूकीत हरायला काय घ्याल" त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका काय ? आणि कुणाचा फायदा करून देणार ? याबाबत उत्सुकता आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
26039 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

अहो माईसाहेब ....

गामा पैलवान
Tue, 10/25/2016 - 11:56 नवीन
माईसाहेब कुरसूंदीकर, १.
तुझ्या त्या ट्वीटर,फेसबूकावर बोटे मोडणे व थिएटरमध्ये येऊन खुर्च्या मोडणे..ह्यात फरक आहे की नाही रे गाम्या?
काहीही हं माई. थेटरात खुर्च्या कोण मोडतंय? त्यापेक्षा थेटराबाहेरच्या काचा फोडणं अधिक समर्पक नाही का? २.
व्हिसा द्यायचा की नाही हे कोण ठरवते? जुहु-तारा लेनमधे राहणारे लोक की दिल्लीत नॉर्थ-ब्लॉक्मध्ये बसणारे मंत्री व अधिकारी?
करण जोहरने खुशाल जावं की उत्तरेच्या ठोकळ्यात आपलं रडगाणं गायला. आ.न., -गा.पै..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा