✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राज ठाकरे यांचे काय चाललेय?

आ
आशु जोग यांनी
Wed, 10/23/2013 - 16:32  ·  लेख
लेख
काही वर्षांपूर्वी राजसाहेब ठाकरे सेनेतून बाहेर पडले .. त्यांनी मराठी आणि विकास हे मुद्दे उचलून धरले. तेव्हा महाराष्ट्राला नवनिर्माणाच्या काही आशा निर्माण झाल्या होत्या. त्याचं प्रतिबिंब मतांमधेही दिसून आलं... पण काही प्रश्न निर्माण होतातच. राज यांनी बांगलादेशींच्या हिंसाचाराचा निषेध करणारा मोर्चा आझाद मैदानावर नेला त्यावेळी "आता यापुढे आपण हिंदुत्त्ववाचा मुद्दा उचलून धरणार का ? " असं विचारल्यावर त्यांनी हिदुत्त्व झटकून टाकलं. "छे छे हिंदुत्त्व वगैरे मला चिकटवू नका" असं उत्तर होतं. हिंदुत्त्वाचा इतका तिटकारा का असावा ... राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते उघडपणे टीका करतात पण आतून सगळ्यांशी सगळीकडे घरोबा करतात. याबाबत सेनेनी टीका केल्यावर म्हणतात "सेनेनी तरी सुरुवातीच्या काळात दुसरं काय केलं ? " राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते टीका करतात. अपवाद फक्त - शरद पवार. त्यांचा उल्लेख ते पवारसाहेब असाच करतात. मधे टोलविरोधी आंदोलन हाती घेतले. ते पुढे का बंद पडले ? मोदींच्या गुजरातचं त्यांना केवढं कौतुक पण मोदींचे हात बळकट करावेसे मात्र वाटत नाहीत. मागच्या २००९ च्या विधानसभा निवडणूकीत सेना-भाजप युतीचे जवळपास ४४ उमेदवार मतविभागणीमुळे पडले. पुणे लोकसभेचे उदाहरण सर्वांसमोर आहे. काँग्रेसला भाजपपेक्षा २८००० मते अधिक मिळाली. मनसेने मते मिळवली ७६०००. ही मतविभागणी झाली नसती तर ! बरं याचा फायदा उठवून पुण्यात कोण विजयी झाले ? सुरेश कलमाडी. म्हणजे नेमका फायदा कुणाला होतोय. विचारावसं वाटतं... "आता गप्प बसायला काय घ्याल(टोलबद्दल) ? तसं आता निवडणूकीत हरायला काय घ्याल" त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका काय ? आणि कुणाचा फायदा करून देणार ? याबाबत उत्सुकता आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
26039 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

chitraa - Sun, 23/10/2016 -

मदनबाण
Sun, 10/23/2016 - 23:12 नवीन
chitraa - Sun, 23/10/2016 - 09:52 इतका थर्ड ग्रेड प्रतिसाद वाचनात आला नव्हता, अश्या आयडीजचा बंदवस्त आता तरी व्हावा ही अपेक्षा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अय्यो पापम... :- Yevadu
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chitraa

अश्या आयडीच्या थर्ड ग्रेड

श्रीगुरुजी
Sun, 10/23/2016 - 23:34 नवीन
अश्या आयडीच्या थर्ड ग्रेड प्रतिसादांंना टाळ्या पिटणारे सदस्य सुद्धा इथे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हा, आता टक्याच्या धाग्याची

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 12:21 नवीन
हा, आता टक्याच्या धाग्याची लिंकही टाकून द्या कसे गुर्जी! मुद्दे सुचले नाहीत की ऍड होमिनेम करायचे हे बरे नव्हे , सायबर सेल ने डिजिटल भाटांस नीट ट्रेनिंग दिलेले दिसत नाही देवा, =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बाकी कुठल्या सदस्याने

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 12:25 नवीन
बाकी कुठल्या सदस्याने मोगाच्या थर्ड ग्रेड प्रतिसादाला टाळ्या पिटल्या आहेत हे दाखवून द्या हे उघड चॅलेंज देतो मी तुम्हाला, बीजेपी विरोधी ते सगळे थर्ड ग्रेड असे तुम्हाला वाटत असल्यास तो तुमचा प्रश्न आहे, तुमची रोजी रोटी बीजेपी चालवत असेल आमची नाही. तेव्हा तोंड सांभाळून बोलायचं हि विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

मोगाच्या थर्ड ग्रेड

श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 12:50 नवीन
मोगाच्या थर्ड ग्रेड प्रतिसादाला टाळ्या पिटून ट्रोलिंगला प्रोत्साहन दिले गेल्याची असंख्य उदाहरणे आहेत. ती पाहण्यासाठी स्वत:च शोध घ्यावा ही नम्र विनंती. जर तुम्ही तसे करत नसाल तर 'खाई त्याला खवखवे' या वाक्प्रचाराला अनुसरून तुम्हाला माझा प्रतिसाद अंगावर ओढवून घेण्याची गरज नाही कारण माझ्या प्रतिसादात मी कोणाचेच नाव घेतलेले नाही. आणि अजून एक. माझी रोजी रोटी मीच चालवितो. माझी रोजी रोटी चालविण्यासाठी मला कोणत्याही पक्षाची गरज नव्हती, नाही आणि नसेल. भाजप किंवा इतर कोणताही पक्ष किंवा संघटना माझी रोजी रोटी चालवित नाही. हे यापूर्वीच सांगून झाले आहे. ते समजलं नसेल तर मी फक्त कीव करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

धन्यवाद

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 12:58 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

...

आशु जोग
Sun, 10/23/2016 - 12:11 नवीन
मनसेला नेमकं धोरण नाही राज सोडून दुसरा प्रवक्ता नाही म्हणून मनसे पुढे जात नाही
  • Log in or register to post comments

च्यायला!

पैसा
Sun, 10/23/2016 - 12:34 नवीन
पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी सिनेमे काढायच्या परवानगीची आणि आपल्या हजारों सैनिकांच्या जिवाची किंमत का? मांडवलीसाठी मध्यस्थी करणारे नरकात जातीलच. पण तोडगा स्वीकारणार्‍या सरकारचे काय? तो नालायक करण जोहर एका सिनेमामागे ५० कोटीचा निव्वळ अधिकृत फायदा कमावतो म्हणे. आणि सैनिकांच्या तोंडावर पाच कोटी फेकायची हिंमत कशी झाली त्याची?
  • Log in or register to post comments

अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/23/2016 - 13:30 नवीन
अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर फंडचे सुद्धा वार्षिक बजेट सहज २५ कोटी असेल हो, ही काय भिकारी पंचायत लावली आहे लेकाच्यांनी आर्मीच्या नावं देव जाणे ह्या पुंड लोकांनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एक नंबर बंडल व्यक्ती आहे ती.

अभिजीत अवलिया
Sun, 10/23/2016 - 22:04 नवीन
एक नंबर बंडल व्यक्ती आहे ती. नुसता मूर्खपणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर

श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 12:58 नवीन
अहो आर्मी वाइव्ज वेलफेयर फंडचे सुद्धा वार्षिक बजेट सहज २५ कोटी असेल हो, ही काय भिकारी पंचायत लावली आहे लेकाच्यांनी आर्मीच्या नावं देव जाणे ह्या पुंड लोकांनी
काहीतरी चुकीची माहिती असावी. या बातमीप्रमाणे हा निधी फक्त २ महिन्यांपूर्वी ऑगस्ट २०१६ मध्ये सुरू झाला व मागील २ महिन्यात त्यात आजतगायत फक्त १ कोटी ४० लाख रूपये आलेले आहेत. जर करण जोहर त्यात ५ कोटी रूपये टाकणार असेल तर सध्याच्या शिलकीच्या तुलनेत ही खूपच मोठी रक्कम होते. तसेच निधी फक्त २ महिन्यांपूर्वीच सुरू झाल्याने निधीचे वार्षिक बजेट २५ कोटी इतके असेल असे वाटत नाही कारण निधीला अजून १/४ वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

लिंक उघडत नाहीये, परत द्यावीत

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 15:30 नवीन
लिंक उघडत नाहीये, परत द्यावीत ही नम्र विनंती, वाचून प्रतिसाद देतो लिंक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

http://indianexpress.com

श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 15:42 नवीन
http://indianexpress.com/article/india/india-news-india/ae-dil-hai-mushkil-protest-raj-thackeray-karan-johar-donate-rs-5-cr-to-army-welfare-fund-3099528/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

तुमचा काहीतरी गोंधळ उडालेला

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 16:07 नवीन
तुमचा काहीतरी गोंधळ उडालेला दिसतो आहे, तुम्ही म्हणता आहात त्या फंड बद्दल मी बोलत नाहीये, तर मी आर्मी वाईव्ज वेल्फेयर असोसिएशन बद्दल बोलतोय, १९६६ मध्ये स्थापन झालेल्या ह्या संघटनेची अध्यक्ष जो तत्कालीन चीफ ऑफ आर्मी स्टाफ असतो त्याची पत्नी असते, ह्यांचे कार्य फक्त पैसे गोळा करणे नाही तर अगदी युद्ध विधवांना (त्यांना वीरनारी म्हणले जाते) व्यवसाय शिक्षण देणे ते इन सर्व्हिस आर्मी पर्सोनेलला मानवी हक्क उल्लंघन कायद्याच्या केसेस मध्ये कायदेशीर मदत वगैरे पुरवणे इतके उत्तुंग आहे, माझा प्रतिसाद परत वाचा त्यात मी आर्मी वाईव्जबद्दल बोलतोय, नवीन फंड नुसार नाही, तसेही ह्या नव्या फंडाचे प्रयोजन कळलेले नाही कारण, १. वर मी आर्मी वाईव्जचे योगदान मांडले आहेच २. नॅशनल ट्राय सर्व्हिसेस फ्लॅग डे किंवा झंडा दिवसला गोळा होणारे सगळे पैसे आर्मी वेल्फेयर मध्ये लावले जातात ३. प्रधानमंत्री कोष सुद्धा असतो बहुदा एक रक्षा विभागाला वाहिलेला (ह्या बद्दल ऐकीव माहिती आहे, तरी हा ऑप्शन बाद ठरवला तरी हरकत नाही) माझ्या प्रतिसादाचे सार, करण जौहरच्या ५ कोटी न काय होणार आहे ? इथे आर्मीवाल्यांच्या बायका अन दुर्दैवी विधवाच कोटी कोटी रुपयात वर्गणी काढून शांतपणे करायचे ते काम करत असतात. त्यातही ते मांडवली खंडणीचे पैसे आर्मीवाले घेतील का नाही ही शंकाच आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आपण दोघे दोन वेगवेगळ्या

श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 20:49 नवीन
आपण दोघे दोन वेगवेगळ्या निधीबद्दल बोलत आहोत. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार करण ज्या निधीला ५ कोटी रूपये देणार आहे तो निधी जेमतेम २ महिन्यांपूर्वी सुरू झालेला आहे. तुम्ही ज्या निधीबद्दल सांगत आहात तो पूर्ण वेगळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी

श्रीगुरुजी
Mon, 10/24/2016 - 14:40 नवीन
पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी सिनेमे काढायच्या परवानगीची आणि आपल्या हजारों सैनिकांच्या जिवाची किंमत का? मांडवलीसाठी मध्यस्थी करणारे नरकात जातीलच. पण तोडगा स्वीकारणार्‍या सरकारचे काय? तो नालायक करण जोहर एका सिनेमामागे ५० कोटीचा निव्वळ अधिकृत फायदा कमावतो म्हणे. आणि सैनिकांच्या तोंडावर पाच कोटी फेकायची हिंमत कशी झाली त्याची?
मी एका दुसर्‍या धाग्यावर या विषयावर सविस्तर प्रतिसाद दिलेला आहे. सरकारला तोडगा काढावाच लागला. फडणविसांकडे दुसरा पर्यायच नव्हता. करण जोहरने पाकड्यांना चित्रपटात काम देणे कितीही संतापजनक असले तरी त्याची भूमिका कायदेशीर होती. कायदेशीर मार्गाने भारतात आलेल्या पाकड्यांना चित्रपटात काम देणे हे कायदेशीर आहे. त्यामुळे शेवटी सरकारला त्याच्या चित्रपटाला संरक्षण द्यावेच लागले असते. परंतु मनसेने हा मुद्धा प्रतिष्ठेचा केल्याने जर चित्रपट दाखविला गेला असता तर त्यातून दगडफेक, तोडफोड, दंगे, लाठीमार इ. होऊन ऐन दिवाळीमध्ये समाजात अशांतता निर्माण झाली असती. मनसेच्या काही कार्यकर्त्यांना आधीच अटक झाली होती व सरकारने चित्रपटाला संरक्षण देणार हे आधीच सांगितले होते. चित्रपट सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक करून डांबले असते तरीसुद्धा बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांनी अशांतता निर्माण केलीच असती. अशा परिस्थितीत मनसेला आंदोलन रद्द करण्यास लावणे व त्याचबरोबर लोकभावनेचा विचार करून करण जोहरला 'भविष्यात पाकड्यांना चित्रपटात घेणार नाही' असे जाहीररित्या सांगायला लावणे हाच सर्तोत्तम तोडगा होता. असे करण्याने शांतताभंगही टळला व लोकभावनेचाही आदर झाला. जर फक्त कायदेशीर बाजू बघून चित्रपट पोलिस संरक्षणात प्रदर्शित केला असता तर लोकभावनेचा अनादर झाला असता. जर लोकभावनेचा आदर करून चित्रपट प्रदर्शित होऊन दिला नसता तर मनसेच्या गुंडगिरीपुढे झुकल्यामुळे कायद्याचे पालन झाले नसते. अशा परिस्थितीत योग्य तो तोडगा शांततेच्या मार्गाने काढला गेला आहे. मनसेच्या आंदोलनाला घाबरून चित्रपट प्रदर्शित होऊन न देण्याची भूमिका घेणे राज्य सरकारला शक्य नव्हते. त्याचवेळी चित्रपटाला पूर्ण संरक्षण देऊनसुद्धा तोडफोड झाली असती तर संरक्षण देण्यात कुचराई केल्याचा आरोप सरकारवर झाला असता व त्यामुळे लोकभावनेचाही अनादर झाला असता. त्यामुळे हे दोन्ही पर्याय राज्य सरकारसाठी उपलब्ध नव्हते. बाकी ५ कोटी रूपये देणगी किंवा चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्यातील शहीद सैनिकांना श्रद्धांजलीचा फलक दाखविणे या तोडग्यातूनच निघालेल्या दुय्यम गोष्टी आहेत. हिंसक आंदोलन रद्द होऊन शांतताभंग टळला आणि त्यामुळे कायदापालन झाले व निदान भविष्यात तरी पाकड्यांना काम मिळणे बंद होईल या घोषणेमुळे लोकभावनेचाही विजय झाला हेच दोन महत्त्वाचे निर्णय या यशस्वी तोडग्यातून निघाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

दाऊदच्या पैशांनी सिनेमे

मराठी कथालेखक
Mon, 10/24/2016 - 16:34 नवीन
दाऊदच्या पैशांनी सिनेमे
हा सिनेमा दाऊदच्या पैशांनी निघालाय का ? तुम्हाला कसं माहित ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओ काका

पैसा
Mon, 10/24/2016 - 17:15 नवीन
सिनेमा दाऊदच्या पैशाने काढलाय असे मी म्हटलंय का? सिनेमात दाऊद आणि त्याच्यासारख्या गुन्हेगार धंदेवाल्यांचा पैसा येतो ही लोकांची समजूत आहे. तिला पुरावे देता येणार नाहीत तसेच खोटीही म्हणता येणार नाही. उद्या कोणीही दाऊदच्या पैशाने सिनेमा काढील आणि पाच कोटी सैनिक फंडाला भीक फेकेल. ते चालेल का? म्हणजे लोक गरीबाना लुबाडतात. त्यांच्या अंगावर गाड्या घालून मारतात आणि मग सिद्धीविनायकाला देणगी देऊन सगळी पापे धुवून काढतात. अजून एक दानपेटी असेच सैनिक फंडाला समजले का काय हे खंडणीखोर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

सिनेमात दाऊद आणि

मराठी कथालेखक
Mon, 10/24/2016 - 19:20 नवीन
सिनेमात दाऊद आणि त्याच्यासारख्या गुन्हेगार धंदेवाल्यांचा पैसा येतो ही लोकांची समजूत आहे.
९० च्या दशकात हा प्रकार जास्त होता. आता हे फारसे होत नाही. आता कॉर्पोरेट कंपन्या सिनेमात पैसा ओततात. आता बॉलीवूडमधले बहुतेक मोठे व्यहवार पांढरे असतात, मोठे स्टार्स चेकने पैसे घेतात, रग्गड टॅक्स भरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Sun, 10/23/2016 - 23:28 नवीन
व्यक्तीकेंद्रीत पक्ष आणि राजकारणाला लोक कंटाळले आहेत हेच मनसेच्या दारुण पराभवातून लक्षात येतेय.मोदींच्या प्रतिमेतून भाजप बाहेर पडला नाही तर भाजपचाही मनसे व्हायला वेळ लागणार नाही.
  • Log in or register to post comments

कम्युनिश्टांचे वेगळेच

अभ्या..
Sun, 10/23/2016 - 23:38 नवीन
कम्युनिश्टांचे वेगळेच पक्षांतर्गत धोरण सोडले तर भारतातील असा कोणताही एक पक्ष सांगा जो व्यक्तीकेंद्रीत नाहीये. सगळेच एकसारख्या माळा आहेत आणि मधल्या पेंडंटवर त्यांची व्हॅल्यु आहे. बादवे गेल्या इलेक्शनाला मनसेचे बरेच काम केले तेंव्हाच त्यांचा पोकळपणा लक्षात आलेला. जास्त चर्चा करण्यातही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर

तू पण...? मी पहिल्या

संदीप डांगे
Sun, 10/23/2016 - 23:42 नवीन
तू पण...? मी पहिल्या इलेक्शनला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दादा काम म्हणजे नॉट अ‍ॅज अ

अभ्या..
Sun, 10/23/2016 - 23:54 नवीन
दादा काम म्हणजे नॉट अ‍ॅज अ कार्यकर्ता. मिडीया होते. प्रिंट, रेडिओ, सोशल आणि ३-४ इव्हेंट्स. पैसे घेऊन केले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

पैसे वसूल केलेस

बोका-ए-आझम
Mon, 10/24/2016 - 07:31 नवीन
हे एक बरं केलंस भावा. राजकीय पक्षांकडून पैसे काढणं महाकठीण काम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+++१११ अभ्यादादा, त्यावेळेचे

पुंबा
Mon, 10/24/2016 - 12:12 नवीन
+++१११ अभ्यादादा, त्यावेळेचे अनुभव येऊ द्या.. अर्थात वेळ आणि ईच्छा असेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

राज व मोदी ..... ?

चौकटराजा
Mon, 10/24/2016 - 16:51 नवीन
मोदी हे जरी अगदी निष्पाप निरागस नसले तरी ते आतापर्यंतचे सर्वोत्तम नेते आहेत. ते पुष्कळसे व्यवहारी आहेत. कारण ते इतिहास, नाटक, सिनेमा यांच्यात रमणार्‍या महाराष्ट्रातून पुढे आलेले नाहीत. त्यांची तुलना राज उद्धव यांच्याशी नको. भाजपा हा मोदींच्या प्रतिमेत अडकण्यापेक्षा तो कटियार कंपनीच्या तावडीत सापडणार की कसे याची खरी समस्या आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर

...

आशु जोग
Tue, 10/25/2016 - 00:15 नवीन
भाजपचाही मनसे व्हायला वेळ लागणार नाही पटतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 10/24/2016 - 10:12 नवीन
मनसे म्हणजे ७०च्या दशकातली शिवसेना वाटतेय असे ह्याण्चे मत. आधी भूमीपुत्र,मग गिरणी कामगार मग इण्दिरा गाण्धींना जोरदार विरोध मग अचानक घुमजाव करून आणीबाणीला पाठिंबा.स्वतः काहीतरी विधायक करण्यापेक्षा दुसरे पक्ष काय करता आहेत ह्याकडेच लक्ष जास्त..म्हणूनच मुंबई,ठाण्यातले खड्डे बुजवण्यापेक्षा कधी ब्रेझनेव्ह तर कधी जिमी कार्टरना 'मार्मिक' सल्ले-ईशारे शिवसेना द्यायची. मनसेचा राजकीय प्रवासही तसाच दिसतोय. दत्ताजी साळवी,प्रधान्,वामनराव महाडिक हे लोक असल्याने शिवसेना टिकली.सध्या अशा लोकांची समाजातच वानवा असल्याने मनसेचे भवितव्य कठीण दिसते.
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Mon, 10/24/2016 - 10:43 नवीन
अ गूड कमेंट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

फक्त अवघड जागीच दुखणं बनायचं !

सामान्यनागरिक
Mon, 10/24/2016 - 11:29 नवीन
फक्त अवघड जागीच दुखणं बनायचं हाच त्यांचा उद्देश होता. आपल्याला सत्ता मिळणार नाहीत, आणि कोणी जवळ उभे पण करणार नाही हे त्यांना माहीत होतं. काहीही न करता , काही करण्याचे किंवा न करण्याचे पैसे घ्यायचे केवळ या साठी पक्ष स्थापन केला. नुकत्याच झालेल्या सिनेमाच्या प्रकरणाने हेच सिद्ध केले.
  • Log in or register to post comments

राज ठाकरे यांचे काय चाललेय?

पुंबा
Mon, 10/24/2016 - 12:10 नवीन
राज ठाकरे यांचे काय चाललेय? उत्तरः तोडपाणी
  • Log in or register to post comments

+१

मराठी कथालेखक
Mon, 10/24/2016 - 16:32 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

मनसे = मध्यस्ती न सेटलमेंट

सोत्रि
Mon, 10/24/2016 - 12:24 नवीन
मनसे = मध्यस्ती न सेटलमेंट - (दिलसे) सोकाजी
  • Log in or register to post comments

हे तोडपाणी नव्हे.

गामा पैलवान
Mon, 10/24/2016 - 17:53 नवीन
लोकहो, राज ठाकऱ्यांनी तोडपाणी केले असा काही मिपाकरांचा सूर आहे. मला मात्र तसं वाटंत नाही. राज ठाकऱ्यांनी हे पैसे स्वत:साठी वा पक्षासाठी घेतले नाहीयेत. ही करण जोहरला केलेली शिक्षा आहे. त्या शिक्षेतून निर्माण होणारा पैसा हरामाचा असल्याची जनभावना आहे. म्हणून त्या पैशास कोणी हात लावायला तयार नाही, ही बाब वेगळी. मी राज ठाकरे यांचा समर्थक व/वा चाहता नाही. पैशांचा यथोचित संबंध स्पष्ट व्हावा म्हणून माझं मत लिहितोय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

कुठल्या भारतीय कायद्यान्वये

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 18:21 नवीन
कुठल्या भारतीय कायद्यान्वये राज ठाकरेंनी करण जौहरला शिक्षा केली म्हणे?? ती करण्यासाठी कोणी परवानगी दिली ?? ते कुठल्या कायदेशीर अथवा घटनासिद्ध पदावर विराजमान आहेत म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

+१

मराठी कथालेखक
Mon, 10/24/2016 - 19:15 नवीन
+१ करण जोहरने पाकिस्तानी कलाकाराला सिनेमात घेतल हे पटत असो वा नसो, पण त्यात बेकायदा काहीच नव्हतं. राज ठाकरेला हव तर त्यानी केंद्र सरकारवर आपल्या (शून्य) खासदारांच्या मार्फत दबाव आणून असा काही कायदा करण्यास वा अधिसूचना घेण्यास भाग पाडावं. तोडपाण्याबद्दल : त्याने स्वतःसाठी वा पक्षासाठी जे काही पैसे घेतले असतील त्याची तो जाहिरात करणार नाहीच. आता याबद्दल पुरावा नाहीये असं म्हणता येईल.. पण तरी पदरात पाडून घेतलेली प्रसिद्धी, 'आपणच काय ते देशप्रेमी आणि सैन्याची काळजी वाहणारे' अशी प्रतिमा छापणं हा ही तोडपाण्याचा प्रकार आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

गुन्हा आणि शिक्षा

गामा पैलवान
Mon, 10/24/2016 - 19:15 नवीन
सोन्याबापु, बाजारात ग्राहकांचा कल न पाहता वस्तू विकायचा प्रयत्न केल्याबद्दल ही शिक्षा झाली आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ह्या प्रतिसादाने डोसक्यात

अभ्या..
Mon, 10/24/2016 - 19:23 नवीन
ह्या प्रतिसादाने डोसक्यात अचाट प्रश्न उभारलेत पण विचारु पण वाटेनात. :( गामाजी का बळंच्च्च लॉजिक फेकायलात? नसंल एखादा युक्तीवाद तर राहु द्या ना. द्या सोडून. आम्ही नाही राज ठाकरेला अशा शिक्षा देणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

अहो ते अलंकारीक सोडा हो सगळे,

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 20:15 नवीन
अहो ते अलंकारीक सोडा हो सगळे, कुठल्या अधिकाराने दिली म्हणे राज ठाकरेंनी शिक्षा? तो अधिकार कोणी दिलाय? ह्यावर काही बोला की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

शिक्षा देण्याचा अधिकार राज

पुंबा
Mon, 10/24/2016 - 19:51 नवीन
शिक्षा देण्याचा अधिकार राज ठा़करेंना कोणी दिला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

काय राव मनसे ला काय

हृषीकेश पालोदकर
Mon, 10/24/2016 - 17:54 नवीन
काय राव मनसे ला काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय ? "सबको बाटते और मनसे को हि दाटते" अस्स झालंय. करू द्या त्यांना पण थोडा अर्थसंचय.
  • Log in or register to post comments

आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 20:18 नवीन
आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरताना दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी तुम्हाला मान्य आहे का हृषीकेश भाऊ? शिवाय मनसेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या मुद्द्याला आवरायला खुद्द मुख्यमंत्र्याला मांडवली करावी लागली हा मुद्दा ग्राह्य धरला जाईल का नाही?? अशी कधी अन किती उदाहरणे झाली आहेत ह्या अगोदर महाराष्ट्रात ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हृषीकेश पालोदकर

बापू.. कुठे मनसे वर वेळ

मोदक
Mon, 10/24/2016 - 20:27 नवीन
बापू.. कुठे मनसे वर वेळ घालवताय..? नवीन लिहा काहीतरी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

लिहून पोचतं केलंय दिवाळी

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 21:01 नवीन
लिहून पोचतं केलंय दिवाळी अंकाकरता, तुम्हाला आवडेल असाच फॉरमॅट आहे ;) , बस कुछ दिन और, बघा खरडलंय काहीतरी गोड़ मानून घ्याल!, बाकी मनसे महत्वाची नाही पण असल्या भिकार लोकांमुळे माझ्या युद्धक परंपरा असलेल्या महाराष्ट्राचा घाऊक अपमान होतो, हा तोच महाराष्ट्र आहे ज्याच्या आराध्य दैवताचा पुतळा म्हणजे थोरल्या महाराजांचा पुतळा, अरुणाचल प्रदेशात बॉर्डर जवळ बीजिंगच्या दिशेने चीनच्या छाताडात भवानी खुपसत तीनताड उभा आहे , चीन विरुद्धच्या युद्धात मराठा लाईट इनफंट्रीने केलेल्या अतुलनीय कामगिरीची आठवण अरूणाचली लोकांनी लक्षात ठेऊन तिथे पोस्टिंग असलेल्या एका मराठमोळ्या आयएएस अधिकारी प्रशांत लोखंडे सर ह्यांच्या मदतीने लोकवर्गणी अन राज्यपाल फंडातून उस्फुर्त बांधला आहे, त्यांना कोणी खळ्ळफटॅकची धमकी दिली नव्हती रे भावा, आजही तो पुतळा नुसता डोळ्यापुढे आला की अंगाला कापरे भरते, एकदम जाणवते, ह्या सीमेवर मी परीक्षा वगैरे पास होऊन आलो असेलही पण तो आदेश थोरल्या राजांचा आहे मला आलेला, ती इज्जत जपणे परम कर्तव्य आहे माझे, माझ्या सारखे लाखो बापूसाहेब एकीकडे तो शब्द एकीकडे अरे तो देव आहे रे देव , ह्यांनी इकडे मागव्या वाटेल तितक्या खंडण्या रे त्याला फौज प्रेमाचे मुलामे देऊ नयेत, सालं 72 72 तास जागं राहून राखली आहेत ठाणी मी माझी , प्रांताच्या विचारात संकुचित न होता सर्वप्रांतीय जवानांना पोटच्या पोरांप्रमाणे जपले आहे ते का ? असल्या येडझव्या लोकांनी माझ्या प्याऱ्या अन जबाबदार महाराष्ट्राची असली बेइज्जती करायला ? सालं महाराष्ट्राचं रेप्युटेशन म्हणजे भारताचे मसाच्युसेट्स किंवा फिलाडेल्फिया असावे तसे आहे रे, सामाजिक चळवळीत अग्रणी, शिक्षण नवे विचार नवे जग ह्यात एक पाऊल पूढे देशासाठी सर्वाधिक मेहनत करणारा, राडा म्हणजे माझा महाराष्ट्र नाही, जीव तुटतो अन लेखणी मोकाट सुटते ती फक्त तितक्यासाठीच भावड्या, सांभाळा लेको सांभाळा नका खाली पडू देऊ हे वैभव *भावनावेगात बोललोय, कोणाच्या भावना दुखवल्यास माफी मागतो अगोदरच, पण बाहेर राहून हे ताल पाहणे म्हणजे एक यातना आहे :'(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

__/\__

अर्धवटराव
Mon, 10/24/2016 - 22:33 नवीन
सलाम बापुसाहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

महाराष्ट्राचा अपमान

गामा पैलवान
Mon, 10/24/2016 - 22:32 नवीन
सोन्याबापु,
बाकी मनसे महत्वाची नाही पण असल्या भिकार लोकांमुळे माझ्या युद्धक परंपरा असलेल्या महाराष्ट्राचा घाऊक अपमान होतो
करण जोहरमुळे महाराष्ट्राची शान वाढलीये का? मनसेच्या नावाने शिमगा का? आ.न., -गा.पै. वि.सू. : मी मनसे वा राज ठाकऱ्यांचा चाहता नाही
  • Log in or register to post comments

करण जोहर ने कुठला लिखित कायदा

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/24/2016 - 22:37 नवीन
करण जोहर ने कुठला लिखित कायदा मोडला आहे/ मोडायची धमकी दिली आहे का भारताचा/महाराष्ट्राचा?? त्याने तो तोडू द्या त्याच्याही नावाने ओरडू, बाकी एक विनंती आहे शब्दसंयोजन थोडे जपून करा, मिपावर आधीच एक अपमान पचवलाय, अजून हलाहल पचवायला मी शिवशंभो नाही, माझ्याही मर्यादा आहेत, त्या ताणून न तपासणे तुमच्या अन माझ्या हिताचेच आहे, बघा विचार करून शांतपणे... ह्याला धमकी समजलात तरी हरकत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

...

आशु जोग
Tue, 10/25/2016 - 10:19 नवीन
करणने कायदे मोडले नाहीत पण राज ठाकरेनी जी हवा केली त्याप्रमाणे करायला हवे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

कुठला कायदा कोणी मोडला

गामा पैलवान
Tue, 10/25/2016 - 03:05 नवीन
सोन्याबापु, पहिल्याप्रथम अपमान पचवल्याबद्दल अभिनंदन. असेच सहनशील व्हा. चांगली सवय आहे. तुम्ही माझ्यासारखे होऊ लागलात हे पाहून मला अतीव आनंद झाला आहे. इतर कोणी केलेल्या अपमानांचा खुन्नस तुम्ही माझ्यावर काढंत नाही हे माझं अहोभाग्यच होय. असे भाग्यानंदवृद्धीचे प्रसंग माझ्या आयुष्यात वारंवार येवोत. असो. आता विषयावर येऊया. शोभा डे या बाईंनीही कुठलेही कायदे मोडले नाहीयेत. मग त्यांच्या नावाने लोकं बोटं का मोडतात? करण जोहरला पाकिस्तानी कलाकार घ्यायचे लांडे कारभार कोणी करायला सांगितले होते? तेव्हा नाही का महाराष्ट्राचा अपमान झाला? पाकिस्तान हा शत्रू आहे हे माहित नव्हतं का? आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. म्हणूनच आत्महत्या करतांना पकडले न जाण्याची खबरदारी घ्यायची असते. ती घ्यायची नसेल तर आत्महत्येचा विचार सोडून द्यायला पाहिजे. (खुलासा : आत्महत्या म्हणजे पाकी कलाकारांना चित्रपटात घेणे.) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 10/25/2016 - 11:10 नवीन
"शोभा डे या बाईंनीही कुठलेही कायदे मोडले नाहीयेत. मग त्यांच्या नावाने लोकं बोटं का मोडतात?"
तुझ्या त्या ट्वीटर,फेसबूकावर बोटे मोडणे व थिएटरमध्ये येऊन खुर्च्या मोडणे..ह्यात फरक आहे की नाही रे गाम्या?
करण जोहरला पाकिस्तानी कलाकार घ्यायचे लांडे कारभार कोणी करायला सांगितले होते? तेव्हा नाही का महाराष्ट्राचा अपमान झाला? पाकिस्तान हा शत्रू आहे हे माहित नव्हतं का?"
व्हिसा द्यायचा की नाही हे कोण ठरवते? जुहु-तारा लेनमधे राहणारे लोक की दिल्लीत नॉर्थ-ब्लॉक्मध्ये बसणारे मंत्री व अधिकारी? देश्प्रेमाचे भरते आलेले लोक दिल्लीत जंतरमंतर् वर उपोषणाला का नाही बसत? असा ह्याण्चा सवाल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा