✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लग्नासाठी नकार- मजेशीर कारणे

स
सतिश पाटील यांनी
Mon, 10/17/2016 - 18:03  ·  लेख
लेख
माझ्या एक मित्राचे हात पिवळ करण्याचे त्याच्या पालकांनी ठरवलय. मागच्याच महिन्यात मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची बोनी झालिये. २८ वर्ष वय, MBA, बऱ्यापैकी देखणा, सधन कुटुंब,भरपूर बागायती शेती, पुण्यात आईटी मधे नोकरी, चांगला पगार,५;९ उंची लग्नाच्या बाजारात मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत असे ऐकून होतो. (माझ्या बाबतीत मात्र पहिल्याच फटक्यात पोरगी गटवली. त्यामुळ ऐकून आहे , अनुभव नाही.) त्याने ज्या २ मुली पहिल्या त्या दोघिन्नी त्याला नकार दिलाय. त्याची मजेदार कारणे एकंदरीत अशी. 1) मुलगी पहायला गेल्यावर चहा पोहे हदाडून झाल्यावर पोरीचा बा म्हणतो, आम्हाला सरकारी नोकरी करणारा पाहिजे हाय...तवा तुमी या... आयला पोरगा आपल्या पोरीला लग्नासाठी बघायला घरी येतोय तेव्हा त्याच्याबद्दल एवढी जुजबी माहिती देखील त्या पोरीच्या "बा" ला नसेल का्य? २) कालच दूसरा नकार आला आहे. त्याचे कारण तर कहर आहे. म्हणे मुलाचे वजन कमी आहे. ऐशाप्पथ... याला का्य त्या पोरीच्या बा ने उचलून पहिला? का च्या पिउन झाल्यावर वजन काट्यावर उभा केला? अणि खरच तो मुलगा एवढा लुकड़ा फुकड़ा नाहीये दिसायला.६५ किलो वजन असेल त्याचे. काल पासून मला फ़ोन करुन " साला जिन्दगी झंड झालिये बे माझी, असा सुर लावायला लागलय. ये आपण बसुया म्हणून आमंत्रण देतोय... साला ही का्य कारणे असतात यार नकार द्यायची? पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो, कारण तरी स्पष्ट सांगा न राव? असो..सुरुवातीला मला खुप हसू येत होते, परन्तु आता लक्षात येते आहे की म्याटर सीरियस आहे......
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
19375 वाचन

💬 प्रतिसाद (98)

प्रतिक्रिया

अचूक =))

टवाळ कार्टा
Fri, 10/21/2016 - 10:15 नवीन
अचूक =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

औरतही औरतकी दुष्मन, अजून काय?

संदीप डांगे
Fri, 10/21/2016 - 10:22 नवीन
औरतही औरतकी दुष्मन, अजून काय? दोघींच्या भांडणात तिसऱ्याचा भुगा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नै तर काय..

पिलीयन रायडर
Sat, 10/22/2016 - 01:26 नवीन
नै तर काय.. पण तरी मिपावर लग्नासाठी मुली आणि त्यांचे नकार ह्यावरचे धागे काही संपत नाहीत.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

बरं आता इतक्यांनी चुकीचा अर्थ

पिलीयन रायडर
Sat, 10/22/2016 - 01:25 नवीन
बरं आता इतक्यांनी चुकीचा अर्थ लावलाय म्हणुन सांगते.. जितक्या प्रमाणात आपल्याकडे बायकांनी कसे रहावे, काय करावे, काय घालावे इ इ इ इ गोष्टी बोलल्या जातात, त्याच्या १% सुद्धा त्या पुरुषांना सांगितल्या जात नाहीत. बायको म्हणुन कसे असावे हे रामतीर्थकर बाई तास न तास प्रवचन देऊन सांगतात, पण नवर्‍यांनी कसे वागावे ह्या बद्दल अवाक्षरही नसते. सासर आणि माहेर ह्या कन्सेप्ट टेक्निकली पुरुषालाही असतात. लग्न त्याचंही होत असतं. पण अजुनही स्त्रियांना बायको / सुन म्हणुन ठराविक चौकटीत बसवण्याचा अट्टाहास संपत नाही. तुम्ही सगळे एक बायको आपल्या नवर्‍याला काय बोलते, बोलत नाही ह्यावर बोलताय. मी समाजातला साधारण पद्धतीबद्दल बोलतेय. "बायकांच्या जातीने.." ह्या दोन शब्दांनी सुरु होणारी वाक्य..यु नो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

रामतीर्थकर बाई भयाण प्रकरण

संदीप डांगे
Sat, 10/22/2016 - 01:41 नवीन
रामतीर्थकर बाई भयाण प्रकरण आहे! तर, असली प्रवचने ऐकायला उतारवायतल्या बायका मुख्यत्वे जास्त असतात, त्यांना सुख व्हावे असे बोलले कि त्या वक्त्याला भारी मान देतात, सर्व खुश होतात पण घरातल्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतात. आमची आत्या देवाच्या गायनाचे कार्यक्रम (मोफत) करते, तिचे एक गाणे आईबापाला विसरू नये, त्यांचा सांभाळ करावा या विषयावर आहे, त्यात मुलाला जाम उपदेश केले आहेत. हे गाणे सुपरहिट आहे, कारण जे लोक हे कार्यक्रम ऐकतात त्यांच्यासाठीच आहे ते! सुनांशी-मुलांशी कसं वागावे ह्याची परखड भाषणे-गाणी केली तर कोण ऐकणार! समाजाला -ह्यात स्त्रीपुरुष दोन्ही- स्त्रीने टिपिकल वागणे अपेक्षित आहे, चौकटीबाहेर वागले कि संस्कृती बुडेल ना? बाकी पुरुषकडून अपेक्षाच नसतात असे नाही, वेगळ्या असतात. ज्या अपेक्षा स्त्रीकडून त्याच पुरुषकडून नसतात पण म्हणून पुरुषाचे काही प्रश्नच नाहीत असे समजणे हेही गैर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

पुरुषांचे प्रश्नच नाहीत असं

पिलीयन रायडर
Sat, 10/22/2016 - 02:06 नवीन
पुरुषांचे प्रश्नच नाहीत असं कधी म्हणणंच नव्हतं माझं. त्यांनाही भरपुर स्टिरिओटाईप्सचा सामना करावा लगतो जसे की कमावलेच पाहिजे, रडता कामा नये, अमुक-तमुक केले की बायकी इ इ. फक्त त्यांना हे इतक्या प्रमाणात ऐकवले जात नाही. शिवाय संस्कृती पासुन ते खनदान की इज्जत असं खुप काही बायकांच्या मागे लावुन दिलंय. पुरुषांना प्रश्नच नाहीत असं म्हणायचं नाहीचे.. पण बायकांचे प्रश्न बरेच जास्त आणि गंभीर आहेत हे तरी मान्य असायला हरकत नसावी. (मी सास बहु ड्रामाच्याही पलीकडे जाऊन असणारे प्रश्न म्हणतेय.. लग्न आणि त्यातल्या वैतगावाडी भानगडी स्त्री असो वा पुरुष.. कुणालाही चुकत नाहीत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आमची जुन्या अमदानीतली आजी

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/20/2016 - 21:46 नवीन
आमची जुन्या अमदानीतली आजी आठवली (आईची आई) अस्सल ग्रामीण म्हातारी! आमच्या वाईफला पहिल्यांदा भेटली तेव्हा पहिला प्रश्न "भाकरी करायला येते का?" आमचं प्रकरण हो म्हणताच आईला म्हणाली "बरी सून शोधलीस गो आक्के राजस्थान भाकरी पण बडवती म्हणजे आक्रीतच आहे" आमचं प्रकरण फ्लॅट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुम्हाला वेळ असेल तर अपर्ना

महासंग्राम
Fri, 10/21/2016 - 09:38 नवीन
तुम्हाला वेळ असेल तर अपर्ना रामतीथकर बाईंचे व्हिडिओज बघावेत असे सुचवीन.
नको नको एकदाच पहिले होते या आजीचे व्हिडीओज परत पाहणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली . बादवे ठाण्याला असतात ना या आजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ते जाऊ द्या.....

शंतनु _०३१
Tue, 10/18/2016 - 22:01 नवीन
बसल्यावर काय काय घेतलं ते पण सांगा
  • Log in or register to post comments

एक तावीज

बाजीप्रभू
Wed, 10/19/2016 - 11:47 नवीन
पौर्णिमेच्या रात्री घेऊन या तुमच्या मित्राला. एक तावीज देईन बांधायला. मुलगीच काय मुलीची आईसुद्धा तयार होईल लग्नाला. इति, तंत्र मंत्र सम्राट, काले इल्म और सिफली इल्म के माहिर, बाबा अकबर खान थायलंडवाले.
  • Log in or register to post comments

त्याच्याच चुलत भावाचा हा

सतिश पाटील
Wed, 10/19/2016 - 12:58 नवीन
त्याच्याच चुलत भावाचा हा किस्सा ... शिकलेला शेतकरी, नगर जिल्ह्यात एक मालकीची ईमारत एल आय सि ला भाड्याने दिलेली, थोडक्यात नोकरीची गरज न्हावतीच, परंतु मुलींची अपेक्षा याला नोकरी असयाला पाहिजे होती तर पसंत केला असता. शेवटी बापाने १३ लाख भरून नगरच्या प्रसिद्ध अश्या मामांच्या ब्यांकेत " चिटकवले". पोस्टिंग पनवेल.१४ हजार रुपये पगार घेतो, शेवटच्या ज्या मुलीने नोकरी नाही म्हणून नाकारले होते, तिनेच त्याच्याशी लग्न केले. मुलगी घरीच असते. सास्रयाने राहण्यासाठी 1 RK फ्ल्याट दिलाय स्वतःचा. शेती संभाळनारा मुलगा शहरात गेल्याने, बापाने २ गडी कामाला ठेवले शेतात पगारावर !!!!!
  • Log in or register to post comments

होकार कसा मिळवावा

पाटीलभाऊ
गुरुवार, 10/20/2016 - 14:12 नवीन
नकाराची कारणे काहीही असोत हो...कोणी होकार कसा मिळवावा यावर उपाय सांगा कि राव...!
  • Log in or register to post comments

होकार मिळवू शकणारांचे

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 14:21 नवीन
होकार मिळवू शकणारांचे प्रेमविवाह होतात... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

ना घर के ना घाट के

पाटीलभाऊ
गुरुवार, 10/20/2016 - 14:32 नवीन
अच्छा म्हणजे आमच्यासारख्या गरिबांना कोणीच वाली नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अण्णा, पाटील भाऊ तेच म्हनायले

महासंग्राम
गुरुवार, 10/20/2016 - 14:34 नवीन
अण्णा, पाटील भाऊ तेच म्हनायले तुम्ही उपाय सांगा कि राव...! ते लगेच पिरेमइवाह करतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

प्यार किया नही जाता, हो जाता

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 14:39 नवीन
प्यार किया नही जाता, हो जाता है केल्यावर निभावायची हिम्मत असेल तर नकाराची भीती नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

हांग असशी बरुबर सांगितलात...

महासंग्राम
गुरुवार, 10/20/2016 - 14:44 नवीन
हांग असशी बरुबर सांगितलात....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

प्यार किया नही जाता, हो जाता

पाटीलभाऊ
गुरुवार, 10/20/2016 - 14:47 नवीन
प्यार किया नही जाता, हो जाता है
अहो त्याचीच वाट बघत होतो इतकी वर्ष...पण कसलं काय.. :( अजून एकटा, पाटील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आधी होकार देण्यासाठी कोणीतरी

शब्दबम्बाळ
गुरुवार, 10/20/2016 - 15:13 नवीन
आधी होकार देण्यासाठी कोणीतरी शोधा! शोधली असेल तर आमच्या अति आवडत्या चित्रपटात (रांझना) मुरारी ने सांगितलेल्या स्टेप्स वापरून बघा! ;) लडकी का सुबह शाम पीछा करो! घर के बाहर, स्कुल के बाहर, सडक पे, सायकल पे, टेम्पो मे, रिक्षा मे, रो दो, खाना खाना छोड दो, वजन घटा दो... और लडकी को इतना थका दो के लडकी थक के हा बोल दे! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

नाही हो...

सतिश पाटील
गुरुवार, 10/20/2016 - 15:17 नवीन
एवढी डेरिंग नाही त्याच्यात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

च्या मारी

पाटीलभाऊ
गुरुवार, 10/20/2016 - 15:22 नवीन
च्या मारी...एवढं सगळं करावं लागेल तर...! जाऊ द्या मग...बरं चाललंय आमचं... एकटा जीव सदाशिव :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ

एकटा जीव सदाशिव

मराठी कथालेखक
गुरुवार, 10/20/2016 - 16:27 नवीन
एकटा जीव सदाशिव
आणि 'आपला हात जगन्नाथ' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ

लग्नाबद्दल अपेक्षा /निकष

मराठी कथालेखक
गुरुवार, 10/20/2016 - 14:35 नवीन
लग्नाबद्दल अपेक्षा /निकष काहीही असू शकतात, हरकत नाही. पण आपल्या निकषांत समोरची व्यक्ती बसत नाही हे आधीच माहित असताना विनाकारण 'वधू/वर परि़क्षण' करण्यात वेळ वाया घालू नये आणि समोरच्याला मानसिक त्रासही देवू नये उदा: वर लेखकाने सांगितलेला पहिला नकार. मुलाला सरकारी नोकरी नाही हे आधीच माहित होते ना, मग आलेत कशाला बघायला ?
  • Log in or register to post comments

अजून नाडी जुळत नाही हे यायच

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 10/20/2016 - 14:59 नवीन
अजून नाडी जुळत नाही हे यायच आहे वाटत!
  • Log in or register to post comments

नाडी ??

सतिश पाटील
गुरुवार, 10/20/2016 - 15:18 नवीन
कसली नाडी ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अय्या!!

स्मिता.
गुरुवार, 10/20/2016 - 15:32 नवीन
अय्या, अजून दोनच मुलींकडून नकार आला आणि एवढं नैराश्य आलं!! किमान डझनभर नकारांनंतर हा लेख वाजवी होता.
  • Log in or register to post comments

असतात हो काही लोक स्वतःला

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 15:46 नवीन
असतात हो काही लोक स्वतःला ग्रेट समजणारे, दोन नवीन लेखांना नकारात्मक प्रतिसाद मिळाले तर मिपावर लिहणे सोडणारे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

तरीच म्हटले अजुन लाल डांगे

सतिश पाटील
गुरुवार, 10/20/2016 - 16:56 नवीन
तरीच म्हटले अजुन लाल डांगे आले कसे नाहीत या धाग्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

उगी उगी हां,

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 21:11 नवीन
उगी उगी हां, यायला नको होते का? त्रास झाल्याबद्दल क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

नै तर काय.. तिकडे लोक

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/20/2016 - 19:26 नवीन
नै तर काय.. तिकडे लोक वर्षानुवर्ष किल्ला लढवत आहेत. आणि हे पंधरा मिनिटात थकले.. काय राव!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

हे थोर आहे हो! :D

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 10/20/2016 - 19:42 नवीन
हे थोर आहे हो! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

काही मजेशीर कारणे

ट्रेड मार्क
गुरुवार, 10/20/2016 - 19:59 नवीन
ही मुलाने नकार दिलेली दोन्ही माझ्या नजरेसमोर घडलेली उदाहरणे . माझ्या एका मित्राला परीसारखी बायको पाहिजे होती. आम्ही त्याला किती समजावले की अरे आधी स्वतःकडे बघ. म्हणजे तो काही वाईट नव्हता दिसायला पण गंधर्व किंवा गेलाबाजार राजबिंडा म्हणावा असा पण नव्हता. परीच्या नादात त्याने कितीतरी चांगल्या मुलींना नकार दिला. शेवटी वयाच्या ४० नंतर त्याला शोभेश्या मुलीशी लग्न झाले. गमतीची गोष्ट म्हणजे ती त्याच्या घरापासून ३ किमी वर रहात होती. अजून एकाचे आईवडील भयंकर संशयी. गुजरातमध्ये स्थायिक असलेले मराठी कुटुंब आणि एकुलता एक मुलगा. संपूर्ण गुजरात, मुंबई, नाशिक आणि पुण्यातल्या मुली बघून झाल्या. नकाराची काही मजेशीर कारणे, अर्थात वेगवेगळ्या मुलींसाठी - १. मुलगी येताना scooty वरून गॉगल लावून आली - मग ती फॅशनेबल वाटतेय. २. कारखानदार वडिलांची एकुलती एक मुलगी - लग्नानंतर घरजावई करून घेतलं तर ३. कार चालवता येते असं मुलीने सांगितलं - लग्नानंतर तिने कार पाहिजे म्हणून हट्ट धरला तर ४. बाकी सगळं ठीक होतं (मुलगी आवडली पण होती) - पण मग अजून तिचं लग्न का बरं झालं नसेल. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार आणि ते सांगत नाहीयेत. हे संभाषण माझ्या समोर चालू होतं तर मी नकळत म्हणलं सुद्धा की या न्यायाने याचे पण अजूनपर्यंत लग्न झालं नाहीये त्याचं काय? अशी काही मजेशीर तर काही विचित्र कारणे. शेवटी याचे पण लग्न ४० नंतर घरापासून २ गल्ल्या सोडून राहणाऱ्या मुलीबरोबर झालं. ४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या टीम मधला एक मुलगा MPSC ची तयारी करत होता. मी विचारलं त्याला की तुला चांगल्या बहुद्देशीय IT कंपनीमध्ये नोकरी आहे, चांगला पगार आहे, पुढे मागे परदेशी जायला मिळेल मग एकदम सरकारी नोकरीच्या मागे का लागलास? तो म्हणाला आजकाल मुली IT वाले नको म्हणतात. कामाचे अनिश्चित तास, प्रोजेक्टचे टेन्शन, कंपनी कधी कुठे पाठवेल सांगता येत नाही. त्यापेक्षा सरकारी नोकरी बरी. ९-५ ऑफिसला जायचं त्यात काम केलं तर केलं नाहीतर नाही. ६व्या वेतन आयोगामुळे पगारही IT च्या तोडीसतोड आहेत आणि वरकमाईचे मिळतील ते वेगळेच. सरकारी घर मिळायची पण शक्यता असते. त्यामुळे म्हणे मुली आजकाल IT वाला मुलगा असेल तर आधीच नकार देतात.
  • Log in or register to post comments

पूर्वी रोहिणी की अश्याच

रेवती
गुरुवार, 10/20/2016 - 20:41 नवीन
पूर्वी रोहिणी की अश्याच कोणत्यातरी वधुवर मासिकात अपेक्षा असायच्या. आमच्या राजकन्येला शोभेसा राजपुत्र हवा जो तिला प्रेमाच्या पंखांवर बसवून परदेशी नेईल. किंवा मग आमच्या ज्येष्ठ राजकुमाराला अमक्या तमक्या विवाहमंडलाने स्वप्नांची राणी मिळवून दिलीये तश्याच अपेक्षेने कनिष्ठ राजकुमाराला एखादी राजकुमारी मिळावी म्हणून पुन्हा येथे आलोय. जिच्या हसण्याने आमची मंगलप्रभात होईल वगैरे वगैरे. अश्या जाहिराती देऊन किंवा वाचून ज्यांची लग्ने झालियेत ते आता काय करत असतील असे एकदा मनात आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

ओ ताई

सुबोध खरे
गुरुवार, 10/20/2016 - 20:47 नवीन
ओ ताई त्या रोहिणी मासिकाला नावं ठेवायचं काम नाही. आमचं लग्न पण त्यातूनच झालेलं आहे आणि २४ वर्षं झाली. मागच्या वर्षी तोच हनिमून परत रिपीट करूनही झाला. आता या वर्षी सिमल्याला जातोय. हि पहा झैरात http://www.misalpav.com/node/33431
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मासिकाला नावं ठेवत नाहिये पण

रेवती
गुरुवार, 10/20/2016 - 20:59 नवीन
मासिकाला नावं ठेवत नाहिये पण स्थळाची माहिती देताना जे लिहितात ते पाहून मजा वाटायची. तुमच्या लग्नावेळीही स्थळाचे वर्णन असेच केले होते काय? ही चेष्टा म्हणून विचारत नाहीये. सिमल्याची जाहिरात आवडलीच. लग्नाच्या पंचविसाव्या वादीला लोक आवर्जून न ऐकलेल्या, वेगळ्या ठिकाणी जातात. तुम्ही कुठे जाणार आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

झैरात मागच्या वर्षी कुणूरला

सुबोध खरे
गुरुवार, 10/20/2016 - 21:24 नवीन
झैरात मागच्या वर्षी कुणूरला गेलो होतो त्याची होती सिमल्याला आता जाणार आहे. आणि पंचविसाव्या वाढदिवसाचे अजून ठरवलेले नाही. महाबळेश्वर पासून स्वित्झर्लंड पर्यंत कुठेही. तेंव्हा खिशाकडे पाहून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

होय. लिहायचं राहिलं. स्वारी.

रेवती
गुरुवार, 10/20/2016 - 22:12 नवीन
होय. लिहायचं राहिलं. स्वारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मला विचार न. आमचे हे पण तिथलच

त्रिवेणी
गुरुवार, 10/20/2016 - 21:03 नवीन
मला विचार न. आमचे हे पण तिथलच फाईंडिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हां, मग सांग, त्यांनी

रेवती
गुरुवार, 10/20/2016 - 22:11 नवीन
हां, मग सांग, त्यांनी जाहिरातीत आमचा राजकुमार, त्याची राणी असं लिहिलं होतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

ह्या प्रचंड ब्रह्माण्डात

अभिजीत अवलिया
गुरुवार, 10/20/2016 - 20:41 नवीन
ह्या प्रचंड ब्रह्माण्डात योग्य वेळी जन्म झाला, जवळ स्वतः:चे घर, गाडी, स्मार्टफोन सुद्धा नसताना (घर अजून देखील नाही) देखील लग्न झाले आणी योग्य वेळी निरोप घेईन ह्याबद्दल भाग्यवान समजावे का मी आता स्वतःला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

तुम्ही 'लाल' समजा स्वतःला, ;)

संदीप डांगे
गुरुवार, 10/20/2016 - 21:09 नवीन
तुम्ही 'लाल' समजा स्वतःला, ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

शंकाच नाही

ट्रेड मार्क
गुरुवार, 10/20/2016 - 21:20 नवीन
अश्या परिस्थितीत ज्यांचे लग्न तर झालेच पण त्याचबरोबर जे नवराबायको एकमेकांबरोबर सुखाने नांदत आहेत यासाठी त्यांनी स्वतःला भाग्यवान समजावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

लग्न हा एवढा का इश्यू आहे

पिशी अबोली
गुरुवार, 10/20/2016 - 21:08 नवीन
लग्न हा एवढा का इश्यू आहे कधीच समजलं नाही. कधीतरी बस करा ना हा विषय. बरं, स्वतःचं लग्न झालेले लोक दुसऱ्यांना नकार मिळाला म्हणून धागे-बिगे काढतात.. तुमचं झालं ना लग्न? होईल की समस्त मित्रपरिवाराचं.. आता लग्न होणं ही गोष्ट अत्यंत दुर्मीळ आणि अगदी चुकून घडणारी असती तर ठीक होतं. इथे वीट येईल इतक्या संख्येने लग्नं करतात दर हंगामात लोक. इतकं नैराश्य यायला काय झालं?
  • Log in or register to post comments

बरोबरेय ग

सामान्य वाचक
गुरुवार, 10/20/2016 - 22:16 नवीन
छोट्यात छोट्या गोष्टीला लग्न या शब्दही चा परिस स्पर्श झाला कि संपले कुटावा तेवढा काथ्या कमीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

लग्न हा एकच इश्यू आहे असं

रुपी
Sat, 10/22/2016 - 01:39 नवीन
लग्न हा एकच इश्यू आहे असं नाहीये बरं. दुसर्‍यांचं लग्न झालेलं असलं की त्यांनी मूल होऊ द्यावे की नाही, असेल तर त्याची ड्युटी कुणी करावी, त्यांनी मुलांना कसे वळण लावावे, शाळेत डब्बा काय द्यावा हेही विषय आहेत की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

गोषवारा अर्थात

नाखु
Fri, 10/21/2016 - 08:51 नवीन

गोळाबेरीज.

  • पुढच्यास ठेच मागचा शहाणा धागाकर्त्याची सामाजीक कळकळ
  • केली परदेशवारी तरी त्रिशतकी धाग्याचीच याद भारी (मिपाकरांना)
  • नकार पचवणे एक कला (फक्त तो दुसर्यानेच नेहमी पचवावा)
  • आधी आमच्यावर अन्याय झाला अता आम्ही तुमच्यावर करू (एक सामाजीक क्रांती अशीही )
  • नकारावस्थेतून जायचे नसेल तर प्रेमविवाह करा (अर्थात दोन्ही एकाच स्थळी अनिवार्य .प्रेम एका ठिकाणी व विवाह दुसरीकदे हा मालिकांचा हक्काचा विषय आहे तसे अजिबात करू नये
  • जाहीरातीला भुलू नये ,जाहीरातीतले दावे अवाच्या सव्वा असतातच आपण सजग रहावे आणि भ्रमनिरास करून घेऊ नये.
  • भाकर्या बडविण्याचे कसब पुढे वाया जात नाही. इतर बडविण्यात उपयोगी पडते.
  • वेळेत लग्न होणे आणि टिकणे हे भाग्याचे लक्षण असू शकते पण त्यामुळे नास्तीकांना न्युनगंड येऊ शकतो त्याचे काय? असा विचार प्रतिसादकर्त्याचा कोमल मनास का शिवला नाही?
  • विवाहीत्,विवाहोत्सुक आणि नवविवाहीत अश्या सगळयांना सामावून घेणारा सदाबहार धागाविषय.
  • Log in or register to post comments

उत्तम गोषवारा. एखादा

अभिजीत अवलिया
Sat, 10/22/2016 - 00:30 नवीन
उत्तम गोषवारा. एखादा कार्यक्रम संपला की कसे सगळ्यांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमातून काय साध्य झाले ते सांगितले जाते तसे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नास्तिकांची लग्न

ट्रेड मार्क
Sat, 10/22/2016 - 03:03 नवीन
वेळेत लग्न होणे आणि टिकणे हे भाग्याचे लक्षण असू शकते पण त्यामुळे नास्तीकांना न्युनगंड येऊ शकतो त्याचे काय? असा विचार प्रतिसादकर्त्याचा कोमल मनास का शिवला नाही?
म्हणजे नास्तिकांची लग्न वेळेवर होत नाहीत किंवा टिकत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं नसेल आशा करतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा